Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुन्हा झकीर नाईक

ह
हुप्प्या
गुरुवार, 07/07/2016 - 21:23
🗣 271 प्रतिसाद
https://www.youtube.com/watch?v=I6GY8WvRHo8 झकीर नाईक हा एक तल्लख स्मरणशक्ती असणारा, खर्‍या खोट्याची बेमालूम मिसळ करून सांगणारा एक वहाबी तत्त्वज्ञानाचा पाईक आहे. अरबी देशातून ह्याच्या संघटनेला भक्कम पैसा मिळतो. बांगला देशात ढाका इथे जे जीवघेणे अतिरेकी हल्ले झाले त्यातील अतिरेकी हे झकीर नाईकचे भक्त होते. त्यामुळे ह्या इसमाला आपले विचार खुलेपणाने मांडू द्यावेत की बंदी घालावी अशा चर्चा भारतीय माध्यमात होऊ लागल्या आहेत. खरे तर कुठल्याही विचारावर बंदी घालणे चूक. पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही. सॅटॅनिक व्हर्सेस एक मोठे उदाहरण आहे. जेम्स लेनचे शिवाजी महाराजांवरचे पुस्तक हे एक दुसरे. अशा प्रकारची बंदी घातलेल्या साहित्याची यादी प्रचंड मोठी आहे. (https://en.wikipedia.org/wiki/List_of_books_banned_in_India) माझ्या मते ह्या माणसाचे विचार खंडन करुन टाकावेत. बंदी घालून काही साध्य होत नाही. व्यासपीठावर, झगमगाटात, हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत (ज्यातले बहुतेक त्याचे भक्तच असतात) तो अगदी दिपवून टाकणारे काहीतरी भव्यदिव्य बोलतो. पण बारकाईने तपास केला तर त्याच्या मुद्द्यातील कच्चे दुवे सहज कळतात. सौदी अरेबियात बाकी धर्मस्थळे बनवायला परवानगी नाही ह्याचे उत्तर असे की गणिताचे शिक्षक नेमायचा असेल तर २+२=४ उत्तर देणारा नेमाल का २+२=५ असे उत्तर देणारा? इस्लाम हा २+२=४ उत्तरवाला आणि बाकी धर्म २+२=५ किंवा २+२=३ वाले आहेत म्हणून त्यांना परवानगी नाही असे खरे तर संतापजनक आणि अन्य धर्मांना तुच्छ लेखणारे ह्याचे उत्तर यू ट्युबवर उपलब्ध आहे. https://www.youtube.com/watch?v=mzq--C6rHIY अशा विचारांनी प्रभावित होऊन कुणी ढाक्यातील अतिरेक्यांप्रमाणे कुराणातील आयतांवर प्रश्न विचारून ते न येणार्‍यांचा शिरच्छेद केला तर झकीर नाईकाचा त्यात वाटा नाहीच असे कसे म्हणता येईल? एखाद्या देशातील लोकशाही, विचारस्वातंत्र्य ह्यांचा वापर करुन असहिष्णूपणा, दहशतवादाला पूरक विचार मांडणे ही एक डोकेदुखी बनत आहे. भारताप्रमाणे इंग्लंड, अमेरिका इथेही असले प्रकार होताना दिसतात. ह्याला आळा कसा घालावा हा एक क्लिष्ट प्रश्न आहे. असल्या प्रकारावर उतारा म्हणून हा उपाय कसा वाटतो? https://www.youtube.com/watch?v=F630rQ2lrWU
वर्गीकरण
समाजकारण बातमी

प्रतिक्रिया द्या
58860 वाचन

💬 प्रतिसाद (271)
म
माहितगार Fri, 07/08/2016 - 19:00 नवीन
..पण ते 'विचार' असतील तर....
हम्म ते जे काही -काठावरचे- बोलतात ते आपल्याला पटणारे नसले तरी काही लोकांना अनीष्ट कृती करण्या इतपत प्रभाव पाडत असेल तर त्याची दखल घेऊन खंडण करण्या जोग्या मुद्द्यांचे खंडण करणे जरुरी राहते किंवा कसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 07/08/2016 - 19:18 नवीन
मिसळपाववर आपण(सर्व) आपल्या आयुष्यावर कपर्दिकही प्रभाव न पाडणार्‍या विषयांबद्दल्ची आपली घट्ट मते मेगाबायटी चर्चांनंतरही बदलत नाही ह्यातून काय ते समजावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
अ
अभ्या.. Fri, 07/08/2016 - 20:21 नवीन
मला झाना म्हणजे झापडबंद नास्तिकचा शॉफॉ वाटलेला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
संदीप डांगे Tue, 07/12/2016 - 19:08 नवीन
;) हे पण चालेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
माहितगार Fri, 07/08/2016 - 19:03 नवीन
...किंबहुना जे जे कोणी कोणाही धार्मिक व्यक्तीला गुरु, आदर्श इ इ मानतात त्यांच्या विचारांना बदलणे शक्य नसते.
आपल्याला हि व्यक्ती पुजेतून येणारी मर्यादा असेल असे म्हणावयाचे आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 07/08/2016 - 19:16 नवीन
हो. व्यक्तिपूजा हा एक भाग झाला. धर्म, समाज, चालिरीती, अस्मिता इत्यादींच्या पारंब्यांना लटकून राहण्याची गरज सामान्य माणसांना असते, ती सुटू नये म्हणून विचारांपेक्षा अविचारांना किंवा फक्त मूढ आदेशपालनाला महत्त्व दिलं जातं. अविचार म्हणजे वाईट विचार नव्हे. अविचार म्हणजे अशी अवस्था जिथे माणूस स्वतःच्या डोक्याने विचार-विनिमय न करता आदर्श-गुरु व्यक्तिने सांगितले ते तसेचे तसे स्विकारतो. मोठा विषय आहे. तुर्तास, विस्तार करावयास मजकडे पुरेसा वेळ नाही ह्याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 07/08/2016 - 19:39 नवीन
मुद्दा छान मांडलात, बाकी गोष्टींच्या मर्यादांची वेळ प्रसंगी चर्चा होताना दिसते तेवढी व्यक्ती पुजेच्या मर्यादांची होताना दिसत नाही. व्यक्तीपुजेच्या संदर्भाने पुढे मागे याच विषयावर वेगळा धागा लेख टाकावयास हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Fri, 07/08/2016 - 20:37 नवीन
वर बर्‍याच प्रतिसादात दाभोळ्कर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येचा उल्लेख असून या हत्या धार्मिक हत्या असून सनातनच्या सदस्यांनी त्या केलेल्या आहेत असा प्रतिसादकर्त्यांचा ठाम विश्वास आहे. जरा वस्तुस्थिती पाहूया. १) दाभो़ळकर हत्या - ऑगस्ट २०१३ मध्ये दाभोळकरांचा खून झाल्याझाल्या लगेच काही मिनिटातच या खुनामागे सनातन आहे असे आरोप सुरू झाले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांपासून अनेकांनी हे आरोप केले. एकप्रकारे पोलिसांचा तपास फक्त एका विशिष्ट दिशेला वळावा हाच त्यामागे उद्देश असावा. हत्येनंतर पुढील २-३ आठवडे पोलिसांना सनातनच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. सनातनच्या ६०-७० कार्यकर्त्यांची चौकशी झाली. त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. हत्येच्यावेळी झालेले वेगवेगळे २ लाख कॉल्स तपासण्यात आले. सीसीटीव्हीवरील चित्रण अनेक प्रयोगशाळेतून तपासण्यात आले. त्यातून काहीच मिळाले नाही. तपास भरकटलेला होता हे दिसून आले. ४-५ महिन्यांनी अचानक नागोरी व खंडेलवाल या बेकायदा पिस्तुले विकणार्‍यांना हत्येच्या आरोपाखाली अटक झाली. ते ज्या प्रकारची पिस्तुले विकायचे त्याच प्रकारच्या पिस्तुलातून हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. या फुसक्या संशयावरून दोघांना अटक करून तुरूंगात ठेवले. तब्बल ९० दिवस तुरूंगात ठेवून कोणताच पुरावा न मिळाल्याने आरोपपत्र दाखल करता आले नाही व त्यामुळे त्यांना जामिनावर सोडावे लागले. तपास भरकटलेला होता हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या खुनानंतर जवळपास दीड वर्षाने फेब्रुवारी २०१५ मध्ये पानसरेंची याच प्रकारे हत्या झाली. नंतर पुन्हा एकदा सनातनवर आरोप सुरू झाले. परंतु काहीच सापडले नाही. नंतर ऑगस्ट २०१५ मध्ये कर्नाटकमध्ये कलबुर्गींचा असाच खून झाला. सप्टेंबर २०१५ मध्ये समीर गायकवाड नावाच्या एका सनातनच्या कार्यकर्त्याला संशयावरून अटक झाली. लगेच त्याचा संबंध दाभोळकरांच्या व कलबुर्गींच्या खुनाशी लावला गेला. आजतगायत समीरचा या ३ खुनांशी संबंध असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. खुनानंतर जवळपास पावणेतीन वर्षानंतर जून २०१६ मध्ये वीरेंद्र तावडे नावाच्या सनातनच्या कार्यकर्त्याला दाभोळकरांच्या खुनाचा आरोपावरून अटक केलेली आहे. तावडेला अटक झाल्याझाल्या वेगवेगळ्या माध्यमातून लगेच सनातनवर दोषारोप सुरू झाले. तावडेकडे काय सापडले याचे रोज अपडेट्स देणे सुरू झाले. आश्चर्य म्हणजे पोलिसांपेक्षा दाभोळकरांचे चिरंजीव व कन्या हेच रोज माध्यमांना अपडेट्स देण्यात पुढे होते. तावडेकडे म्हणे २००९ साली लिहिलेली काही ईमेल्स सापडली. त्यात त्याने हिंदूराष्ट्र निर्माण करण्याबद्दल व त्यासाठी १५ हजारांची सशस्त्र फौज निर्माण करण्याबद्दल लिहिले होते. काय चावटपणा आहे! १५ हजारांच्या फौजेसाठी दरमहा किमान ६०-७० कोटी रूपये लागतील. इतके पैसे तावडे कोठून आणणार होता? ही फौज कोठे राहणार होती? इतकी शस्त्रे कोठून आणणार? या सर्व गोष्टी गुपचूप करणे शक्य होते का? नंतर पोलिसांनी असा दावा केला की तावडे या कटाचा सूत्रधार होता व त्यानेच खुन्यांना शस्त्रे पुरविली होती. खुनात वापरली गेलेली काळी मोटरसायकल म्हणे तावडेच्या काळ्या मोटरसायकलशी मिळतीजुळती आहे (रस्त्यावर दिसणार्‍या प्रत्येक १०० मोटरसायकलींपैकी किमान ९० काळ्या रंगाच्या असतात). पोलिसांनी नंतर एका साक्षीदाराची साक्ष काढली. हा साक्षीदार एका वाहिनीवर तोंड झाकून माहिती सांगत होता. त्याचे नाव पोलिसांनी जाहीर केले नव्हते. नंतर सनातननेच त्याचे नाव जाहीर केले. सनातनने त्याच्यावर एका प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. कदाचित त्याचा सूड म्हणून तो साक्ष देत असावा. नंतर म्हणे तावडेच्या बायकोने अशी माहिती दिली की तोच या खुनामागचा सूत्रधार आहे. पोलिस व दाभोळकर कुटुंबीय रोज माध्यमांमध्ये बातम्या पेरत होते. माध्यमांना रोजच्या तपासाची बातमी पुरवू नका अशी शेवटी न्यायालयानेच पोलिसांना तंबी दिल्यावर सर्व बातम्या बंद झाल्या. मुळात दाभोळकरांच्या खुनामागे सनातन आहे याच गृहितकावर जवळपास ३ वर्षे सुरू आहे. त्यामागे दुसरे कोणी असावे ही शक्यताच पोलिसांनी गृहित धरली नसावी. आजतगायत ज्या दोघांनी खून केला ते सापडलेले नाहीत, खुनात वापरलेले पिस्तुल व मोटरसायकल मिळालेली नाही, खुनामागचा हेतू समजलेला नाही, आजवर जे जे पकडले त्यांच्याकडून निर्णायक पुरावे मिळाल्याचे दिसत नाही. परंतु सनातनच या खुनामागे आहे याच गृहितकावर तपास सुरू आहे. २) पानसरे हत्या - पानसरेंच्या हत्येनंतर जवळपास ७ महिन्यांनी सनातनच्या समीर गायकवाडला १५ सप्टेंबर २०१५ ला पकडण्यात आले. अजूनही तो अटकेत आहे. त्याला अटक केल्याकेल्या माध्यम ट्रायल सुरू झाली. तो सराईत गुन्हेगार आहे असे अनेक वृत्तवाहिन्यांवरून दाखविले गेले. प्रत्यक्षात त्याच्यावर यापूर्वी एकाही गुन्ह्याची नोंद नव्हती. त्याच्याकडे म्हणे २५-३० मोबाईल सापडले. नंतर जाहीर झाले की तो मोबाईल दुरूस्तीचे काम करीत होता व त्यामुळे त्याच्याकडे २५-३० मोबाईल असणे अगदी स्वाभाविक आहे. पानसरेंच्या खुनातील दोघे आरोपी अजून सापडलेले नाहीत. खुनात वापरलेले पिस्तुल व मोटरसायकल मिळालेली नाही, खुनामागचा हेतू समजलेला नाही. खून होताना पानसरेंच्या पत्नी उमा पानसरे त्याच स्थळी उपस्थित होत्या. त्यांनी खुन्यांना प्रत्यक्ष पाहिलेले आहे. समीर गायकवाडला ओळखपरेडमध्ये त्यांना ओळखता आलेले नाही. खरं तर इथेच तो खटला संपलेला आहे. त्या गल्लीतील इतर ३-४ प्रत्यक्षदर्शींना समीरला ओळखता आलेले नाही. नंतर म्हणे एका १४ वर्षांच्या मुलाने त्याला ओळखले. न्यायालयात हे टिकणार नाही. खुनाच्या वेळी तो ठाण्यात होता असे त्याचे कॉल रेकॉर्ड सांगते. एकंदरीत त्याच्याविरूद्ध काहीच पुरावा दिसत नाही. "मी दोन पापे केली आहेत" असे तो मैत्रिणीला म्हणाला असे पोलिस सांगतात. दोन पापे म्हणजे दोन खून असे कोणतेच न्यायालय मान्य करणार नाही. तरीसुद्धा गेले १० महिने तो अटकेत आहे. पोलिसांनी मे २०१६ मध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू केल्यावर पानसरे कुटंबियांनी न्यायालयात अर्ज दाखल करून इतक्यात आरोपपत्र दाखल करू नका असा आदेश देण्याची न्यायाधिशांना विनंती केली. म्हणजे समीरला जामिनावर सोडायचे नाही व आरोपपत्र दाखल करून खटलाही सुरू करायचा नाही कारण खटला सुरू झाला तर पुराव्याअभावी तो निर्दोष सुटेल आणि मग सनातनवर कसे आरोप करता येतील? दरम्यानच्या काळात सनातनला झोडपत रहायचे व त्यांनीच खून केलेत असे आरोप सुरू ठेवायचे. पानसरे हत्येचा तपासही एकाच दिशेने सुरू आहे. पानसरे कोल्हापूरमधील टोलला विरोध करीत होते. कदाचित त्याचाही खुनाशी संबंध असू शकतो. परंतु हा मुद्दाच विचारात घेतलेला दिसत नाही. परंतु त्याचा खून सनातननेच केला अशी काही जणांची ठाम श्रद्धा आहे. ३) कलबुर्गी हत्या - कलबुर्गींची हत्या ऑगस्ट २०१५ मध्ये झाली. आजतगायत एकाही संशयिताला पकडलेले नाही. परंतु हत्येसाठी सनातनलाच जबाबदार धरले जात आहे. एकंदरीत या तीनही खुनांमागे सनातनच आहे, याच गृहितकावर तपास सुरू आहे. सनातनविरूद्ध अजूनपर्यंत फारसे भक्कम पुरावे मिळाल्याचे दिसत नाही. पकडलेल्यांविषयी माध्यमातून खोट्या बातम्या पुरविण्याचे उद्योग सुरू दिसताहेत. ज्यांनी प्रत्यक्ष गोळ्या झाडल्या त्यातील एकही जण अजून सापडलेला नाही, खुनात वापरलेली पिस्तुले मिळालेली नाहीत, खुनात वापरलेली मोटरसायकल मिळालेली नाही, खुनांमागचा हेतू अजूनही समजलेला नाही. ज्यांना आ़जवर पकडलेले आहे, त्यांच्याविरूद्ध फारसे पुरावे मिळाल्याचे दिसत नाही. परंतु तरीही धार्मिक कारणांवरूनच हे खून झाले व या खुनांमागे फक्त सनातनच आहे अशी काही जणांची ठाम श्रद्धा आहे. वास्तविक हे खून अत्यंत सराईत सुपारी किलर्सने केले असावे असे वाटते. साधारणपणे पुढारी, बिल्डर्स, माफिया गँग्ज असे सुपारी किलर्स प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्यासाठी वापरतात. सनातन ही अत्यंत मूर्ख व दुराग्रही लोकांची संघटना आहे. परंतु सनातनकडे अस सुपारी किलर्स व त्यासाठी लागणारा पैसा व हेतू असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 07/08/2016 - 21:25 नवीन
आपण वेगळा धागा लेख होईल इतपत मोठे उत्तर दिलेत हे ठिक पण हा सर्वच वस्तुतः वेगळ्या धागा लेखाचा विषय आहे, धागा लेखाचा मुख्य विषय भरकटण्यात फरक पडेल असे दिसत नाही मग झानांच्या (अ)विचारांची चिकित्सा बाजूला पडते. इतरांनी विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला तरी आपण मुख्य विषय हाताळून मग अवांतर प्रकाशित करणे हा ही एक उपाय असू शकतो किंवा कसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रसाद गोडबोले Fri, 07/08/2016 - 21:43 नवीन
अत्यंत अभ्यासपूर्ण अशा संपूर्ण प्रतिसादाला टाळ्या !!
सनातन ही अत्यंत मूर्ख व दुराग्रही लोकांची संघटना आहे.
आणि विशेष करून ह्या वाक्याला standing ovation आणि जोरदार टाळ्या ! सनातन प्रभाताला सनातन धर्माची काडीमात्र अक्कल / जाण नाहीये पण ज्याप्रकारे स्वमतांध दाम्भीक लोक त्यांच्या विरुद्ध कंपूबाजी करत आहेत ते पाहून उगाचच softcorner वाटायला लागलाय ह्या मूर्ख आणि अनाभ्यासू लोकांविषयी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
भ
भोळा भाबडा Sat, 07/09/2016 - 07:10 नवीन
सनातन प्रभाताला सनातन धर्माची काडीमात्र अक्कल / जाण नाहीये
"दहशतवाद्यांना खरा इस्लाम कळलाच नाहीये" या पठडीतले वाक्य!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
न
नाखु Sat, 07/09/2016 - 12:56 नवीन
सनातन वाल्यांचा धिक्कार्/अव्हेर करायला माणसं पुढाकार तरी घेतात मिपावर्/जालावर आणि प्रत्यक्षात पण दहशतवादी/कट्टर इस्लामींचा धिक्कार तर लांबची गोश्ट त्यांच्या क्रूरपंणा आणि अमानवी वर्तणुकीबाबत चकार शब्दही बोलला जात नाही तथाकथीत धर्मनिरपेक्षवाद्यांकडून. धाग्यातील विंबल्डनचा साक्षीदार नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा
भ
भोळा भाबडा Sat, 07/09/2016 - 13:41 नवीन
म्हणूनच "पुरोगामी" शब्द ही एक शिवी होऊन बसली आहे.आणि तथाकथित धर्मनिरपेक्षवाद्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रसाद गोडबोले Sat, 07/09/2016 - 17:06 नवीन
"दहशतवाद्यांना खरा इस्लाम कळलाच नाहीये" या पठडीतले वाक्य!!
हा हा हा . गावडे सर हे पहा , आणि तुम्ही म्हणत होता की हा माझा डु आयडी आहे =)))) बाकी भोळाभाबडा ह्यांच्या काय नादाला लागायचे , त्याना ना आर्य सनातन वैदिक धर्म माहीत आहे ना सनातन प्रभात प्रणीत धर्म . जर त्यांनी सनातन ची वेबसाईत पाहिली असती आणि मिपावरील उपनिषदांची सीरीज वाचली असती तर त्यांचे त्यांनाच कळाले असते की सनातन प्रभाताला सनातन धर्माची काडीमात्र अक्कल / जाण नाहीये !! असो. भोळाभाबडा ह्यांना आमचा सनातनी नमस्कार =)))) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा
ब
बोका-ए-आझम Sat, 07/09/2016 - 05:34 नवीन
सनातन ही अत्यंत मूर्ख व दुराग्रही लोकांची संघटना आहे.
अगदी. पण हा काही गुन्हा नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Sat, 07/09/2016 - 06:02 नवीन
गुरूजी, अगदी संजीव पुनाळेकर जसं वरवरचं स्पष्टीकरण देतात तसच बोललात. आता "सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला" हे त्या वकील पुनाळेकरचं व्यक्तव्य बरच काही सांगून जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
भ
भोळा भाबडा Sat, 07/09/2016 - 06:24 नवीन
मग अकोलकर का फरार आहे?? आणि खामुंपाधुं ने म्हटल्याप्रमाणे एबीपी माझावरची त्या साक्षीदाराची मुलाखत तुम्ही ऐकली नाही वाटतं. डाॅ तावडे बंदूका बनवण्यासाठी गेला होता तिथे. एबीपीवरची मुलाखत सापडत नाहीये , ही सामवरची ऐका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चंपाबाई Sat, 07/09/2016 - 06:34 नवीन
सनातनची शेकडो ब्यान्क खाती असुन त्यात तो फरारी मनुष्य उलाढाली करतो, असे पेप्रात आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा
च
चंपाबाई Sat, 07/09/2016 - 06:57 नवीन
http://indianexpress.com/article/india/india-news-india/narendra-dabholkar-murder-pansare-sanatan-members-bank-accounts-phone-calls-scanner-virendra-tawade-2865399/ THE CENTRAL Bureau of Investigation (CBI) team probing the murder of rationalist Narendra Dabholkar told the court on Monday that it had come across 119 bank accounts that are suspected to be used by the Sanatan Sanstha members including Rudra Patil, Vinay Pawar, Sarang Akolkar, who are currently on the run. गुर्जी मोड ऑन. तो फरारी असला तरी तो एक साधक असल्याने तो सनातनचे व्यवहारकरु शकतो. गुर्जी मोड ऑफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Sat, 07/09/2016 - 06:35 नवीन
सनातनची शेकडो ब्यान्क खाती असुन त्यात तो फरारी मनुष्य उलाढाली करतो म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा
ब
बोका-ए-आझम Sat, 07/09/2016 - 17:18 नवीन
तो कितपत विश्वासार्ह आहे? असा तर कुणीही साक्षीदार येईल आणि कुणाहीबद्दल काहीही बोलेल. कोर्टात शपथेवर बोललाय का? नाही ना? मग असल्या गोष्टींना काहीही अर्थ नाही.असल्या पुराव्यांच्या एखादा नवशिका वकील पण चिंध्या करेल. साम हे सकाळचं, म्हणजे बोलून चालून राष्ट्रवादीचं चॅनेल. ते काहीही म्हणतील. कोर्टात त्यातले किती दावे टिकतील ते बघू. मग या वाद घालायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा
म
माहितगार Sat, 07/09/2016 - 07:53 नवीन
दोन्ही बाजू एवढं सगळ व्यक्तील़क्ष्य तर्कदोष असलेले 'आमचे-तुमचे' वादात वेळ घालवतात विरुद्ध बाजूचे दहा वैचारीक मुद्दे घ्यायचे आणि त्याचे खंडण मंडण करावयाचे यास कुणीच वेळ देत नाही त्यामुळे अविचारी कृत्य करणार्‍यांना त्यांचा विचार विचार नसण्याची शक्यता नसून अविचार असण्याची शक्यता आहे हे लक्षात येण्याची संधीच प्राप्त होताना दिसत नाही.
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Sat, 07/09/2016 - 11:05 नवीन
¤एबीपी माझावरची मुलाखत¤ साक्षीदार-संजय साडविलकर तावडेने बंदुक तयार करण्यासाठी साडविलकरकडे एक माणूस पाठवला होता,तोच तो अकोलकर!! दोन-तीन माणसेही मागितली होती, सकाळच्यावेळी वाॅच ठेवायला इ. सर्व आणि बरीच माहिती साडिलकरने सांगितली आहे. https://www.youtube.com/watch?v=VMa-Fs_Di1s&feature=youtube_gdata_player
  • Log in or register to post comments
श
शिद Sat, 07/09/2016 - 11:25 नवीन
मिपावर बरेच जाणकार आहेत व धर्माच्या/अध्यात्माच्या धाग्यावर मेगाबायटी/मेगाफायटी चर्चा देखील करतात. एखादा कोणी ह्या झानाला आव्हान नाही देऊ शकत का? हुप्प्यासाहेब तुम्हीच का नाही ट्राय करत?
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Sat, 07/09/2016 - 11:34 नवीन
करण्यात आलेला आहे. झा ना वर चर्चा होण्या ऐवजी मोगा आणी सोनेरी टोळी ने नेहमी प्रमाणे हिंदू धर्मात किती वाईट गोष्टी आहेत आणिहिरवा धर्म कसा तारणहार आहे इथवर चर्चा आणुन सोडली आहे
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 07/09/2016 - 12:11 नवीन
सोनेरी टोळी म्हणजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिमौ
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Sat, 07/09/2016 - 12:32 नवीन
आणि हिरवा धर्म कसा तारणहार आहे इथवर चर्चा आणुन सोडली आहे
चंपाबाईव्यतिरिक्त अन्य कोणीही असे म्हटले नाही.
धागा हायजॅक केलेला आहे.
मुद्दामच केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिमौ
च
चंपाबाई Sat, 07/09/2016 - 13:46 नवीन
Akbar, states Sheikh Muhammad Ikram, was the first Mughal emperor to issue general orders to stop sati.[46] Aurangzeb issued another order in 1663, after returning from Kashmir, "in all lands under Mughal control, never again should the officials allow a woman to be burnt".[46 https://en.m.wikipedia.org/wiki/Sati_(practice) इतिहासात लिहिलेल्य गोष्टी सा ंगणे म्हणजे हिरवी जाहिरात करणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
प
प्रदीप Sun, 07/10/2016 - 06:17 नवीन
विकीपेडियातील संदर्भ छातीठोकपणे देता येत नाहीत, हे तुम्हास ठाऊक नाही काय? आता हाच जो संदर्भ तुम्ही वारंवार देत आहात, तो जनाब शेख मुहम्मद इक्रम ह्या पाकिस्तानी इतिहासकाराचा आहे. तेव्हा तो कितपत ग्राह्य धरायचा? कमीतकमी तो व्यवस्थित तपासून पहावयास पाहिजे. सर्वसाधारणपणे, मोघलांच्या सैन्यापासून बचाव करण्यासाठी तत्कालिन हिंदू राजांच्या, हिंदू सैनिकांच्या स्त्रीया, त्याच्या युद्धात झालेल्या मृत्यूनंतर त्याच्याच चितेत आत्मदहन करीत, असे सतिच्या प्रथेचे मूळ आहे असे सांगितले जाते. ते चुकिचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Sun, 07/10/2016 - 06:26 नवीन
महाभारतात माद्री सती गेली रामायणात मेघनादची बायको सती गेली. तेंव्हाही मोघल होते का ? की , चुकुन वीस हजार वर्षे आयुष्य मिळाले तर पुढे भविष्यात मोघल त्रास देतील या भीतीने त्या बिचार्‍या आधीच सती गेल्या म्हणायच्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
ब
बोका-ए-आझम Sun, 07/10/2016 - 06:29 नवीन
तुम्हीच रामायण आणि महाभारत या काल्पनिक कथा असल्याचं सांगितलं होतं. मग काल्पनिक कथेत काहीही होऊ शकतं. कोणी पाहिलंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
ध
धनावडे Mon, 07/11/2016 - 06:44 नवीन
तुमच्या गावात आजून सती प्रथा चालू आहे? त्या प्रथा वाईटच पण आता आहेत का नाहीत ना? आणि तरी सुद्धा आता २०० वर्षापूर्वीच्या गोष्टीमुळे आता दोष देत असाल तर तुम्ही धन्य आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
न
नगरीनिरंजन Sat, 07/09/2016 - 11:36 नवीन
न्या. काट्जूंनी झकीर नाईकला खुल्या डिबेटचं आव्हान दिलंय. फेसबुकवर नाईकच्या भक्तांच्या कॉनेंट्स वाचून हहपुवा झाली आणि त्रासही झाला. जगात स्टुपिडिटी ठासून भरली आहे आणि ह्या एकमेव कारणासाठी आत्महत्या करणार्‍याला मी तरी मनोरुग्ण म्हणणार नाही.
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Sat, 07/09/2016 - 12:41 नवीन
ज्याहिरारीने इतर धर्माची चिकित्सा पक्षी द्वेष करता त्याच हिरारीने स्वतःच्या धर्माची चिकित्सा करण्याचं धाडस नाय तुमच्यात. काल्पनिक देवांबद्दल अपशब्द काढल्यावर लगेच भावना दुखावतात.प्रसंगी खून पडतात,त्याचं सोयरसुतक नाही पण आपली सोडून दुसर-याची खाजवण्याची हौस लै!!!
  • Log in or register to post comments
झ
झेन Sat, 07/09/2016 - 16:17 नवीन
'आपली सोडून दुसर-याची खाजवण्याची हौस लै' हे अकबर आणि औरंगजेब यांच्यासाठी लागू होतं का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
इ
इरसाल Sat, 07/09/2016 - 13:10 नवीन
स्वतःभोवती असलेल्या वलयाचा (चांगले किंवा वाईट) अतिशय गैरफायदा घेण्याचा अतिशय अशक्य आणी निर्लज्ज प्रकार सुरु आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Sat, 07/09/2016 - 14:18 नवीन
नाइकानी अतिरेक्यांचा कुत्रे असे संबोधुन निशेध केलाय म्हणे. नथुराम , गायकवाड इ इ चा त्याम्च्या गुरुनी / सनातनने निशेध केला होता काय ?
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Sat, 07/09/2016 - 17:12 नवीन
नथुराम गोडसेने १९४८ साली गांधींना मारले. त्याला आता ६८ वर्षे झाली. त्या घटनेशी संबंधित असणारे कुणी आज जिवंत असण्याची शक्यता नाही. त्यामुळे वर्तमानात या. हवे तर वेगळा धागा काढून त्यात झकीर नाईक व गोडसे ह्यांची तुलना करण्याकरता काथ्या कुटा. उगाच विषय का भरकटवताय? एका चुकीचे समर्थन करण्याकरता दुसरी चूक दाखवणे ही तिसरी चूक आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
म
मुक्त विहारि Sat, 07/09/2016 - 20:42 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
प
प्रसाद गोडबोले Sun, 07/10/2016 - 05:58 नवीन
तो त्यांचा अजेंडाच आहे मुवी ! कारण नीट रीतसर चर्चा झाली तर नाईक साहेब जे सांगतात त्याचे पितळ उघडे पडेल ना ! ते तसे पडु नये म्हणुन मध्येच अकबर , औरंगजेब , नथुराम , अकोल्कर, सती प्रथा , भगवा दहशतवाद वगैरेंना घुसडायचे की झालेच धाग्याचे काश्मीर ... मुळ मुद्दा राहिला बाजुला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
सामान्य वाचक Sun, 07/10/2016 - 16:49 नवीन
लक्ष्य का देतात बरे लोक्स त्या आयडी ला उकळ्या फुटत असणार हे वाच वाचून Sample treatment म्हणून यापुढे या सोनेरी टोळीच्या एकही पोस्ट ला उत्तर देऊ नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
श
शाम भागवत Sun, 07/10/2016 - 17:07 नवीन
मूळ मुद्यावर यायचय? मग हे वाचा. ढाका घातपाताच्या निमीत्ताने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
ब
बोका-ए-आझम Sun, 07/10/2016 - 07:49 नवीन
समीर गायकवाडने हत्या केलीय हे सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे निषेध केला नसेल. तुम्हाला भारी घाई सगळ्याची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
आ
आरोह Sat, 07/09/2016 - 18:53 नवीन
http://www.faithfreedom.org/debates/ZakirNaikp2.htm कट पेस्ट करा...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 07/10/2016 - 16:30 नवीन
धागा भरकटविण्यात नेहमीच्याच यशस्वी कलाकारांनी यश मिळविले हे खरे आहे. त्यामुळे झाकीर नाईक व त्याची धर्मांध विषारी वक्तव्ये या मूळ विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. परंतु धागा भरकटविण्यासाठी जे खोटे आरोप केले आहेत त्यावर प्रत्त्युत्तर देणे आवश्यक आहे. यापूर्वीच एक दीर्घ प्रतिसाद देऊन सनातनवर केलेले खोटे आरोप व त्यामागची वस्तुस्थिती समोर आणलेली आहे. त्यानंतर अजून काही खोटे आरोप झाले आहेत. त्यावर पुन्हा एकदा वस्तुस्थिती समोर आणणे आवश्यक आहे.
गुरूजी, अगदी संजीव पुनाळेकर जसं वरवरचं स्पष्टीकरण देतात तसच बोललात. आता "सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला" हे त्या वकील पुनाळेकरचं व्यक्तव्य बरच काही सांगून जातं.
तुम्ही वर्तमानपत्रात किंवा वाहिन्यांवर तावातावाने जे पूर्वग्रहदूषित आरोप केले जात आहेत, तेच इथे मांडले आहेत. त्यामागे काहीही सत्य नाही. "सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला" हे वाक्य श्रीपाल सबनीस नामक आचरटशिरोमणी संदर्भात हे उद्गार होते. हे वक्तव्य खूप काही सांगून जाते असा भास होत असेल तर इथेही ते सांगा आणि संबंधित तपाससंस्थांनाही सांगा.
मग अकोलकर का फरार आहे?? आणि खामुंपाधुं ने म्हटल्याप्रमाणे एबीपी माझावरची त्या साक्षीदाराची मुलाखत तुम्ही ऐकली नाही वाटतं. डाॅ तावडे बंदूका बनवण्यासाठी गेला होता तिथे. एबीपीवरची मुलाखत सापडत नाहीये ,
अकोलकर फरारी आहे असे पोलिस म्हणतात. तो का फरार आहे ते पोलिस आणि तोच जाणे. तो गेली ६-७ वर्षे फरारी आहे म्हणे. असेल. पण या खुनाशी त्याचा संबंध आहे का याबद्दल अजून पुरावे मिळाल्याचे दिसत नाही. एखादा माणूस फरारी आहे हे कारण त्याला दोषी ठरविण्यासाठी पुरेसे नाही. हा साक्षीदार तोंड लपवून का मुलाखत देत होता? दाभोळकरांच्या खुनानंतर जवळपास पावणेतीन वर्षानंतर तावडेला पकडले. त्याआधी २०१३ मध्ये नागोरी व खंडेलवालला पकडले होते. पावणेतीन वर्षे हा साक्षीदार का गप्प राहिला? त्याला खुनाची पूर्ण माहिती होती तर त्याने ती इतके दिवस का लपवून ठेवली? तो जे काही बोलला त्याचा आधार काय? तो जे म्हणेल त्यावर न्यायालय डोळे झाकून विश्वास ठेवणार का? एकंदरीत खोटा साक्षीदार उभा करण्याचा हा प्रकार दिसतोय.
सनातनची शेकडो ब्यान्क खाती असुन त्यात तो फरारी मनुष्य उलाढाली करतो म्हणे
शेकडो खाती असण्याचा आणि खुनाचा संबंध आहे काय? भारतीय नागरिक कायद्याप्रमाणे कितीही खाती उघडू शकतो. ज्याप्रमाणे गायकवाडकडे २५-३० भ्रमणध्वनी संच सापडले अशा ब्रेकिंग न्यूज झळकत होत्या, तसेच हे पण आहे. या गोष्टींचा खुनाशी संबंध आहे का?
तावडेने बंदुक तयार करण्यासाठी साडविलकरकडे एक माणूस पाठवला होता,तोच तो अकोलकर!! दोन-तीन माणसेही मागितली होती, सकाळच्यावेळी वाॅच ठेवायला इ. सर्व आणि बरीच माहिती साडिलकरने सांगितली आहे.
तावडेने माझ्याकडे अण्वस्त्रे तयार करण्यासाठी माणूस पाठविला होता असे उद्या साडविलकर सांगेल! असे सांगणारा व त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारे धन्य आहेत. __________________________________________________ एकंदरीत पुरावे गोळा करून नंतर तावडे व गायकवाडला पकडण्याऐवजी आधी त्यांना पकडून नंतर खटल्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टी माध्यमांना सांगून (२५-३० मोबाईल, शेकडो खाती इ.) तोच गुन्हेगार आहे असे समाजात पसरविणे म्हणजे आधी बाण मारून नंतर त्याभोवती वर्तुळ काढण्याचा प्रकार आहे. हे दोघेही, प्रज्ञा सिंह व कर्नल पुरोहित यांच्याप्रमाणे पुढील अनेक वर्षे, जामीन न मिळता व खटला सुरू न होता तुरूंगात राहतील व त्यांच्याविरूद्ध सातत्याने दोषारोप केले जातील असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Sun, 07/10/2016 - 17:37 नवीन
तुम्ही वर्तमानपत्रात किंवा वाहिन्यांवर तावातावाने जे पूर्वग्रहदूषित आरोप केले जात आहेत, तेच इथे मांडले आहेत. त्यामागे काहीही सत्य नाही.
मग तुम्हाला थेट NIA मधून माहिती मिळते का?
"सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला" हे वाक्य श्रीपाल सबनीस नामक आचरटशिरोमणी संदर्भात हे उद्गार होते.
खिक्क, सबनीसांना आचरट शिरोमणी म्हणताय? तुमच्या बुद्धीची कीव येत आहे,अहो त्यांनी पत्र लिहून मोदींची माफी मागितली होती. आणि " सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला" या व्यक्तव्यात तुम्हाला काहीही आक्षेपार्ह वाटत नाही?
हे दोघेही, प्रज्ञा सिंह व कर्नल पुरोहित यांच्याप्रमाणे पुढील अनेक वर्षे, जामीन न मिळता व खटला सुरू न होता तुरूंगात राहतील व त्यांच्याविरूद्ध सातत्याने दोषारोप केले जातील असं दिसतंय.
ख्याक्, उजव्या विचारसरणीचं सरकार असूनसुद्धा तुम्ही असे म्हणताय?
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 07/10/2016 - 18:20 नवीन
यात आक्षेपार्ह नक्की काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Sun, 07/10/2016 - 18:29 नवीन
माॅर्निंग वाॅकला आल्यावरच दाभोलकरांना मारले,म्हणून सबनीसांना घाबरवण्यासाठी पुनाळेकरने तसे ट्वीट केले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्रीगुरुजी Sun, 07/10/2016 - 18:44 नवीन
कशावरून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Sun, 07/10/2016 - 19:31 नवीन
आदरणीय गुरूजी, त्यांनी ट्वीट कोणत्या आशयाने केले होते ते सार-या जगाला माहित आहे,तरीही तुम्ही सोंग घेताय? इथल्या निरपेक्ष आयडींनी पुनाळेकरच्या ट्वीटबद्दल प्रकाश टाकावा. वरच्या प्रतिसादामध्ये गुरूंजींचे ढोंग उघड पडले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा