Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुन्हा झकीर नाईक

ह
हुप्प्या
गुरुवार, 07/07/2016 - 21:23
🗣 271 प्रतिसाद
https://www.youtube.com/watch?v=I6GY8WvRHo8 झकीर नाईक हा एक तल्लख स्मरणशक्ती असणारा, खर्‍या खोट्याची बेमालूम मिसळ करून सांगणारा एक वहाबी तत्त्वज्ञानाचा पाईक आहे. अरबी देशातून ह्याच्या संघटनेला भक्कम पैसा मिळतो. बांगला देशात ढाका इथे जे जीवघेणे अतिरेकी हल्ले झाले त्यातील अतिरेकी हे झकीर नाईकचे भक्त होते. त्यामुळे ह्या इसमाला आपले विचार खुलेपणाने मांडू द्यावेत की बंदी घालावी अशा चर्चा भारतीय माध्यमात होऊ लागल्या आहेत. खरे तर कुठल्याही विचारावर बंदी घालणे चूक. पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही. सॅटॅनिक व्हर्सेस एक मोठे उदाहरण आहे. जेम्स लेनचे शिवाजी महाराजांवरचे पुस्तक हे एक दुसरे. अशा प्रकारची बंदी घातलेल्या साहित्याची यादी प्रचंड मोठी आहे. (https://en.wikipedia.org/wiki/List_of_books_banned_in_India) माझ्या मते ह्या माणसाचे विचार खंडन करुन टाकावेत. बंदी घालून काही साध्य होत नाही. व्यासपीठावर, झगमगाटात, हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत (ज्यातले बहुतेक त्याचे भक्तच असतात) तो अगदी दिपवून टाकणारे काहीतरी भव्यदिव्य बोलतो. पण बारकाईने तपास केला तर त्याच्या मुद्द्यातील कच्चे दुवे सहज कळतात. सौदी अरेबियात बाकी धर्मस्थळे बनवायला परवानगी नाही ह्याचे उत्तर असे की गणिताचे शिक्षक नेमायचा असेल तर २+२=४ उत्तर देणारा नेमाल का २+२=५ असे उत्तर देणारा? इस्लाम हा २+२=४ उत्तरवाला आणि बाकी धर्म २+२=५ किंवा २+२=३ वाले आहेत म्हणून त्यांना परवानगी नाही असे खरे तर संतापजनक आणि अन्य धर्मांना तुच्छ लेखणारे ह्याचे उत्तर यू ट्युबवर उपलब्ध आहे. https://www.youtube.com/watch?v=mzq--C6rHIY अशा विचारांनी प्रभावित होऊन कुणी ढाक्यातील अतिरेक्यांप्रमाणे कुराणातील आयतांवर प्रश्न विचारून ते न येणार्‍यांचा शिरच्छेद केला तर झकीर नाईकाचा त्यात वाटा नाहीच असे कसे म्हणता येईल? एखाद्या देशातील लोकशाही, विचारस्वातंत्र्य ह्यांचा वापर करुन असहिष्णूपणा, दहशतवादाला पूरक विचार मांडणे ही एक डोकेदुखी बनत आहे. भारताप्रमाणे इंग्लंड, अमेरिका इथेही असले प्रकार होताना दिसतात. ह्याला आळा कसा घालावा हा एक क्लिष्ट प्रश्न आहे. असल्या प्रकारावर उतारा म्हणून हा उपाय कसा वाटतो? https://www.youtube.com/watch?v=F630rQ2lrWU
वर्गीकरण
समाजकारण बातमी

प्रतिक्रिया द्या
58860 वाचन

💬 प्रतिसाद (271)
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 07/14/2016 - 11:40 नवीन
जाऊ द्या हो ! नका मनावर घेऊ इतके! वाचायचे तितके वाचा बाकी गंगार्पणमस्तु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिग्विजय भोसले
स
सतिश गावडे गुरुवार, 07/14/2016 - 12:08 नवीन
माझ्या मनात श्रीगुरुजींबद्दल अतीव आदर दाटून आला आहे. मात्र ही खरंच श्रीगुरुजींची विचारसरणी आहे की त्यांचं सनातन प्रभातवाल्यांसोबत जोरात वाजलं असावं अशी शंकेची पाल चुकचुकत आहे. ;)
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 07/14/2016 - 12:16 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
माहितगार गुरुवार, 07/14/2016 - 12:27 नवीन
प्रवक्त्यांना खेचू नये ;) कैका असेना त्यांच्या बाजूने भूमिका शक्य तेवढी रचनात्मक आणि पॉलीटीकल पण राईट ठेवत असतात, त्यासाठी मराठीआंजावर त्यांची (श्रीगुरुजींची) मुख्यप्रवक्तेपदी नेमणूक करण्यास आमचे अनुमोदन आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 07/14/2016 - 12:44 नवीन
आज माहितगार ह्यांच्या आयडीवरून कोणी दुसरेच कॉमेंटते आहे असे भासते! चक्क त्रिविया अन चर्चेचे बादशाह सलामत हलक्याफुलक्या कॉमेंट्स अन तंगडी ओढत आहेत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
न
नाखु गुरुवार, 07/14/2016 - 12:57 नवीन
थोडं थांबुन तरी प्रतिक्रिया द्यायची होती असा माझा मत आहे आणि ते प्रत्येकाला पटलेच पाहिजे असे नाही. कसोटी प्रेक्षक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
माहितगार गुरुवार, 07/14/2016 - 14:53 नवीन
..अन तंगडी ओढत आहेत
मला वाटले होते मी फक्त निसटत्या बाजू ओढत असतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
संदीप डांगे गुरुवार, 07/14/2016 - 12:45 नवीन
+१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ब
बाळ सप्रे गुरुवार, 07/14/2016 - 12:57 नवीन
करेक्ट हेच मुद्दे वर्तकांऐवजी भाजप प्रवक्त्याकडून आले असते तर त्याच मुद्द्यांचे जोरदार समर्थन झाले असते. इतकं विचित्र वाटत होतं वाचताना.. गुरुजींचा प्रतिसाद आहे की अंनिसच्या कोणाचा हेच कळत नव्हतं.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
माहितगार गुरुवार, 07/14/2016 - 13:07 नवीन
इतकं विचित्र वाटत होतं वाचताना.. गुरुजींचा प्रतिसाद आहे की अंनिसच्या कोणाचा हेच कळत नव्हतं.. :-)
का ब्रे, किमान थेअरॉटीकली सनातनची अधिकृत भूमिका शास्त्र आणि तर्काधारीत असणे अभिप्रेत असताना, त्यांचा विरोधाभास होत असेल आणि गुरुजी प्वाईंट आऊट करत असतील तर काय चुकले यात अंनिस कुठून टपकली म्हणतो आम्ही. सर्वात चांगली गोष्ट भाजपा सनातन संस्थेला आंदण गेलेली नाही आणि त्यांचे सर्व वर्तन शास्त्र आणि तर्काला धरून नाही हा संदेश प्रवक्त्यांनी दिलेला दिसतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे गुरुवार, 07/14/2016 - 13:49 नवीन
थेअरॉटीकली सनातनची अधिकृत भूमिका शास्त्र आणि तर्काधारीत असणे अभिप्रेत असताना, त्यांचा विरोधाभास होत असेल आणि गुरुजी प्वाईंट आऊट करत असतील
ROFL
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 07/14/2016 - 16:36 नवीन
किती निर्व्याज हास्य ते! एखादी गोष्ट समजली नाही की लहान मुलं अशीच हसतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ई
ईश्वरसर्वसाक्षी गुरुवार, 07/14/2016 - 16:39 नवीन
अहो असे का करता बोका भौ ! त्यांचे नावच तर 'बाळ' आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ज
जगप्रवासी गुरुवार, 07/14/2016 - 13:55 नवीन
झाकीर नाईक याची स्मरणशक्ती चांगली आहे, त्याला आपली गीता पाठांतर आहे पण या पाठांतराला तो ज्ञान समजतोय. विचित्र माणूस आहे, काहीही बरळतोय. जाताजाता : नाईक म्हणजे मूळ मराठी का? म्हणजे मुस्लिमांनी जबरदस्तीने धर्मांतर केले असावे आणि खापरपणजोबा / पणजोबां पासून चालत आलेल्या धर्माला स्वतःचा धर्म मानतोय का?
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 07/14/2016 - 14:50 नवीन
पाठांतर चांगले असणार्‍यांना सोईस्कर तेवढे उधृतकरणे कठीण नसते, लोक पाठांतराला दाद देत असतात त्यातील विश्लेषण तर्कपूर्ण असेलच असे नाही किंबहूना बर्‍यापैकी तर्कदोष असू शकतात. ह्या लेख दुव्यात त्यांच्या काही तार्कीक उणीवा मुद्देसूद खोडलेल्या दिसतात लेख पटतोय का बघा. ते मुंबईतले आणि व्यवसायाने डॉक्टर होते, कोणातरी साऊथ आफ्रीकेतील मूलतत्ववादी विचारवंताच्या प्रभावा खाली आले असावेत. व्यक्तिगत माहिती पेक्षा त्यांचे मुद्दे तर्कशुद्धपणे खोडले जाणे महत्वाचे, असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी
ह
हुप्प्या गुरुवार, 07/14/2016 - 15:16 नवीन
https://www.youtube.com/watch?v=rIJ_3BccAIU ह्यात तो म्हणतो की तो मराठी समजू शकतो पण बोलू शकत नाही. अवांतरः अनेकदा असे आढळते की मूळचे महाराष्ट्रातले मुस्लिम अट्टाहासाने उर्दू बोलतात जे अत्यंत भ्रष्ट, मराठीची सरमिसळ असणारे असते. मुस्लिमाने घरात मराठी बोलले तर तो बाटेल असा गैरसमज त्यांनी करुन घेतला आहे का देव जाणे! वास्तविक, बाहेरच्यांशी बोलताना ह्यातले कित्येक लोक अस्खलित मराठी बोलतात पण घरी नाही. दक्षिणेतील तमिळ, मल्याळी मुस्लिम सर्रास तमिळ वा मल्ल्याळी बोलतात. मोडकी तोडकी उर्दू बोलत नाहीत. मुस्लिमांची धार्मिक भाषा अशी कुठली असेल तर ती नि:संशय अरबी हीच आहे. उर्दू वा अन्य कुठली नाही तरी स्थानिक भाषेपेक्षा उर्दूला भारतातील अनेक भागातील मुस्लिम जास्त जवळची मानतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 07/14/2016 - 16:28 नवीन
मुस्लिमांशी संबंध आलेला आहे. कोकणी मुस्लिम आपल्या भाषेला दालदी भाषा असं म्हणतात असं त्यांच्याकडूनच कळलं. मराठवाड्यातील मुस्लिम (परभणी, नांदेड इथले) आपल्या भाषेला दख्खनी उर्दू म्हणतात. त्यांच्यातल्या कुणीही मराठी आपली भाषा असल्याचं म्हटलं नाही, मराठी येत असलं तरी. महाराष्ट्रातल्या बाकीच्या भागातील मुस्लिमांबद्दल माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
भ
भंकस बाबा गुरुवार, 07/14/2016 - 15:43 नवीन
हेच म्हणतो आहे मी, त्याने केलेले वादविवाद बघितले (ऐकले)तर याची प्रचिती येईल. विचारलेल्या अपेक्षित प्रश्नाना उत्तर देण्यापेक्षा त्या विषयाला दळने जास्त पसंद करतो तो. हिंदू वा किरिस्ताव पैकी असाच कोणी भांड जर त्याच्या विरोधात वादविवादाला उभा राहीला तर कपिल कॉमेडी नाइटपेक्षा विनोदी कार्यक्रम होऊन जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/14/2016 - 23:21 नवीन
श्रीगुरुजी, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १. >> अघोरी प्रथा पद्धतशीरपणे बंद करायची म्हणजे काय करायचं? म्हणजे पाळण्याऐवजी सुपात बाळ ठेवायचं. आणि विहिरीऐवजी घरच्या उथळ रांजणात सोडायचं. एव्हढा साधा तोडगाही असू शकतो ना? २. >> पूर्वी कर्नाटकातील चंद्रेगुत्ती इथे नग्नपूना चालायची. नग्नपूजा हिंदूंच्या कुठल्याही भक्तीग्रंथांत नाही. हां, तांत्रिक विधी असू शकतो. पण भक्तीमार्गाने जाणाऱ्याने तांत्रिक साधना करायची नसते. नग्नपूजेस शास्त्राधार नाही. ३. >> शनी चौथर्‍यावर महिलांना प्रवेश हवा का नको याविषयी शंकराचार्यांची मते काहीही असोत, >> तिथे महिलांना पुरूषांच्या बरोबरीने प्रवेश हवाच असे माझे मत आहे. परंतु वर्तक मात्र याबाबतीत >> शंकराचार्यांचा सल्ला घ्यावा असा आग्रह धरीत होते. मूर्खपणा तो हाच. कशाला हवाय महिलांना पुरुषांबरोबर प्रवेश तिथे? काय थोर समता साधली जाणार आहे? नियम पाळायचे नसतील तर सार्वजनिक जागी जाऊ नये. ४. >> तृप्ती देसाई पाखंडी असो वा अजून काही असो, तिने पुढे आणलेला मुद्दा योग्यच होता मुद्दा आजिबात योग्य नाही. महिलांवर अन्याय करायच्या उद्देशाने प्रथा सुरू झाली नाही. महिलांना जिथे प्रवेश वर्ज्य आहे तिथे त्यांनी जाऊ नये. तरीही ज्या बायकांना स्पर्श करून दर्शन घ्यायचंच आहे त्यांनी खुशाल घरी शनीचा पाषाण बसवून त्याची दैनंदिन पूजा करावी. ५. >> असे असेल तर मग साईबाबांची पूजा करू नका असा अत्यंत मूर्खपणाचा आदेश त्यांनी का काढला? >> आणि सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष का केले? ते तोतया शंकराचार्य आहेत. ६. >> खून झाला त्याच दिवशी लगेचच सनातनवर संशयाची सुई वळलेली होती. पृथ्वीराज चव्हाण काहीबाही बरळले म्हणून सनातन संस्थेने गप्प बसायचं का? वाघ म्हंटलं तरी खातो, वाघोबा म्हंटलं तरी खातो. मग वाघुरड्या का म्हणू नये? ७. >> दाभोळकरांच्या मृत्युनंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्यांची निंदानालस्ती करणारा लेख लिहिणे व त्यांच्या फोटोवर >> लाल फुली मारणे यात कसली आली आहे डोंबलाची साधना? ही तर निव्वळ मनातील मळमळ. फुल्लीचं चित्रं अगोदरपासून होतं. आणि ज्याला तुम्ही निंदानालस्ती म्हणताय ती केवळ एक ओळ होती. 'दाभोलकरांना विकलांग मृत्यू न येत सत्वर मृत्यू आला हे वाईटातले चांगले आहे' अशा काहीशा अर्थाची ती ओळ होती. असेच उद्गार सरोजिनी नायडूंनी गांधीहत्येनंतर काढले होते. 'He died a king's death' असं काहीसं वाक्य होतं. त्याबद्दल सरोजिनींना कोणी दोष देत नाहीत. ८. >> पोलिस अक्कलशून्य आहेत हे माहित असताना कशाला त्यांच्या हातात कोलीत द्यायचं? त्यातून त्रास होणार तो >> तुम्हालाच होणार ना? माकडाच्या हातात कोलीत दिलं व त्याने घराला आग लावली तर नुकसान माकडाचं का तुमचं? पोलिसांच्या डोक्यावर जो कोणी बसलाय त्याला सरळ करायला पाहिजे. उलट गप्प बसलं तर अनिष्ट वृत्ती फोफावणार नाही का? ९. >> दाभोळकर हे फ्रॉड आहेत हे केवळ सनातन प्रभात मध्ये आरोप करून सिद्ध होत नाही. हे आरोप न्यायालयात >> सिद्ध व्हावे लागतात. नुसते शाब्दिक आरोप करत बसला तर तुमचा केजरीवाल होतो. दाभोलकरांच्या न्यासाने हिशेब सादर केलेले नाहीत. याला आरोप नाही, तर वस्तुस्थिती म्हणतात. दाभोलकरांच्या न्यासांच्या मालमत्तेवर टाच आणली पाहिजे. दाभोलकरांच्या फ्रॉडचे काही पुरावे इथे आहेत : http://shankhnaad.net/india/corruption/item/18-article-126 तसेच इथेही अधिक पुरावे मिळतील : https://www.scribd.com/document/172674025/Narendra-Dabholkar-s-financial-frauds-and-Naxal-links १०. >> सनातन ही मूर्खांची संस्था आहे याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आपल्या वर्तनाने सनातनच्या >> लोकांनी ते अनेकवेळा सिद्ध केलेलं आहे. गेल्या १८ वर्षांत सुमारे १७५ ग्रंथ छापून ५० - ६० लाख प्रती विकणारी संस्था मूर्खांची असल्यास शहाणे कोण हा प्रश्नंच आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 07/15/2016 - 06:59 नवीन
नग्नपूजा हिंदूंच्या कुठल्याही भक्तीग्रंथांत नाही. हां, तांत्रिक विधी असू शकतो. पण भक्तीमार्गाने जाणाऱ्याने तांत्रिक साधना करायची नसते. नग्नपूजेस शास्त्राधार नाही
१) (अगदी भक्तीपंथीयांची) एखादी पूजापद्धती अमूक किंवा तमूक ग्रंथात असलीच पाहीजे हा नियम हिंदू धर्मात कधी पासून लागू झाला. अप्रत्यक्षपणे ग्रंथबद्द्ध न झालेल्या सर्व पूजा बंद केल्या जाव्यात असे तुम्हाला म्हणायचे नसावे. हिंदू कुलाचारातील असंख्य पूजा पद्धती एखाद्या कोणतीही व्यक्ति ते ज्यात्या काळातील ज्यांच्या त्यांच्या गुरुंनी सांगीतलेल्या असू शकतात ते घरातील /समुदायातील एखाद्या व्यक्तीला अमुक तमुक स्वप्नपडले आणि पूजा चालू झाली अश्याही असंख्य पूजा आहेत. २) आपले "असू शकतो" हे कयासात्मक विधान वास्तवास धरून असण्याबद्दल सॉल्लीड साशंकता आहे. चंद्रेगुत्तीची पूजा बहूधा केवळ अमुक तमूकला स्वप्नपडले किंवा काय सर्वसामान्य अंधश्रद्धेतून हनुमानाची झालेली भक्तीमय उपासना -तेही हनुमानाचे वैराग्य शुकासारखे आहे या विश्वासाने- होती त्याचा बहुतेक तांत्रिक विधीशी संबंध लावणे बहुतेक वाजवी नसावे (चुभूदेघे कदाचित श्रीगुरुजींना माहित असेल तर सांगू शकतील) ३) आजच्या काळात पुर्वीप्रमाणे तांत्रिक साधना तेवढ्या प्रमाणावर होत नसाव्यात, तथाकथीत तांत्रिकसाधनाही भारतातच विकसीत झाल्या आहेत त्यातील काही तांत्रिकसाधना भक्तीमार्गीही असू शकतात. अर्थात यात बर्‍याचदा अघोरी अंधश्रद्धा तांत्रिकतेत असत आणि तशा अघोरी अंधश्रद्धांच्या निराकरण करु इच्छिणार्‍या सुधारणावाद्यांना हिंदू द्वेष्टे ठरवले जाते आहे? काही भक्तीसांप्रदायिकांना नको असलेतरीही तांत्रिकसाधनाही एका अर्थाने हिंदूधर्माच्या भाग ठरतात तांत्रिकसाधना करणार्‍यांनी विरोधकांना हिंदूद्वेष्टे म्हणावे का ? मी तांत्रिकसाधनांचा समर्थक नाही केवळ उपरोक्त प्रतिसादातील विरोधाभास दर्शवण्याचा प्रयत्न करतो आहे. ४) नग्नच काय कोणत्याही झाना म्हणतात तसे कोणत्याही सगूणसाकार पूजेचे हिंदूधर्मात आधार बर्‍यापैकी ढिसाळ असावेत. वेदा आणि अमुकतमूक ग्रंथशास्त्रात नसलेल्या अनेक पूजा विधींचा शोध भारतीयांनी आपापल्या मर्जीने लावले सर्वपूजा पद्धती एकाच परमेश्वरापाशी पोहोचतात या विश्वासाने हिंदू धर्मात सर्वपूजा पद्धती सामावून घेतल्या गेल्या त्यात नग्नपूजेचा समावेश न होण्याचेही कारण नसावे. तुमची आमची मने भ्रष्ट झाली म्हणून नग्नपूजक दिगंबरांना भ्रष्ट का म्हणावे ? अनेक साधू संत दिगंबरावस्थेत इश्वरभक्ती करत. कुणी दिगंबरावस्थेत भक्तीकरत म्हणजे ते तांत्रिक साधना करत हे खरे मानायचे तर गजानन महाराज ते स्वामीसमर्थ अशा असंख्यांची वर्णी जबरदस्तीने तांत्रिकात लावायची किंवा कसे ? शूकासारखा आदर्श कितीही कठीण असला तरी शूकमुनी हाच भारतीय तत्वज्ञानानुसार आदर्श नव्हे काय ? आणि जर तो तसा असेल तर स्त्री असो वा पुरुष दिगंबरावस्थेत दिसले तरी आपापल्या मनावर काबू ठेवणे ज्याची त्याची जबाबदारी होत नाही का ? ५) चंद्रगुत्तेला स्त्रीयांनी अगदी नग्नपूजा करुनही देव त्यांना कोपत नसे देव प्रसन्न होतो अशी भावना असेल तर इतरत्र देवळांमध्ये स्त्रीयांना त्यांच्या त्यांच्या आवडीचे कपडे घालून प्रवेश देण्यात अडथळे निर्माण करणे समजणे कठीण नाही का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
प्रचेतस Fri, 07/15/2016 - 07:14 नवीन
स. रा. गाडगीळ ह्यांच्या 'लोकायत' पुस्तकात तंत्रसाधनेचा सविस्तर परामर्श घेतलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 07/15/2016 - 07:17 नवीन
गामाजींस पुस्तक रेफेरेन्स इत्यादी चे धार्जिणे नसावे वल्ली जी, त्यांस फक्त आपल्या कट्टरपणाची जाहिरात करायची असते असा वहीम आहे आम्हांस, असो, ज्याचे त्याच्यापाशी म्हणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 07/15/2016 - 07:20 नवीन
अर्थातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ग
गामा पैलवान Fri, 07/15/2016 - 08:54 नवीन
सोन्याबापू, जी काही आक्षेपार्ह रूढी आहे तिच्यामागे अध्यात्मिक लाभ आहे का याचा धांडोळा घ्यायची इच्छा आहे. जेणेकरून ती बंद पडल्यास पर्यायी मार्गाने तसाच लाभ मिळवता येईल. जर अध्यात्मिक लाभ मिळंत नसेल तर आक्षेपार्ह रूढी ताबडतोब बंद करण्यात काही अडचण असू नये. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ब
बोका-ए-आझम Fri, 07/15/2016 - 09:34 नवीन
असं काहीही नसतं हो. हे सगळे मनाचे खेळ आहेत. तसं म्हटलं तर स्वतःला उडवून लोकांना ठार मारणाऱ्या आत्मघातकी बाँबरलाही तुला स्वर्गात जायला मिळेल आणि ७२ सुंद-यांचा सहवास मिळेल असं सांगितलं जातंच की. मग त्याची कृतीही आध्यात्मिक लाभ या लेबलाखाली justify करता येईल. मुळात अध्यात्ममध्ये जो आत्म शब्द आहे त्याचा अर्थ मला तरी असा वाटतो की अध्यात्म हे स्वतःपुरतं असावं. इतरांना त्याचा त्रास का? आणि तान्ह्या मुलांना त्रास देऊन आध्यात्मिक लाभ मिळवण्याची अपेक्षा ठेवणं ही आत्यंतिक विकृत गोष्ट आहे. एकीकडे लहान मुलं हे देवाचं स्वरूप असं म्हणणं आणि दुसरीकडे त्यांना आध्यात्मिक लाभासाठी छळणं - हा अव्वल दर्जाचा दुटप्पीपणा अाणि ढोंगीपणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 07/15/2016 - 12:13 नवीन
अध्यात्मिक लाभ! क्लासच!! चालू देत, गापै, एक प्रश्न तुम्ही शाकाहारी की मांसाहारी म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
माहितगार Fri, 07/15/2016 - 12:14 नवीन
म्हणजे पाळण्याऐवजी सुपात बाळ ठेवायचं. आणि विहिरीऐवजी घरच्या उथळ रांजणात सोडायचं. एव्हढा साधा तोडगाही असू शकतो ना?
परंपरेतील अघोरी, सक्ती, शोषण भाग काढून प्रथा परंपरा केवळ प्रतिकात्मक स्वरूपात जपण्यास काहीच हरकत नाही. विहीरीतले पाणि पवित्र समजून त्याला वैज्ञानिक पद्धतीने शुद्धकरुन बाळाची त्याने नजर काढली किंवा तांब्याभर पाण्याने प्रतिकत्मकतेसाठी ओवाळून घेतले तर त्या अंधश्रद्धा सुधारीत स्वरुपात चालवल्यास काहीच हरकत नाही. बगाडच्या दक्षिणभारतीय परंपरेत सुधारणाकरून बगाडला व्यवस्थीत खूर्ची जोडली आहे, खुर्चीत आरामात बसून मंदिराला प्रदक्षीणा करून घ्या काहीच हरकत नाही, पण उगीच पाठी अणकुचीदार वस्तू खुपसून व्यक्तिस्वातंत्र्य असले तरी स्पृहणीय ठरत नाही. बाकी गुरुजी आणि बोका यांनी उत्तर दिलेच आहे
अध्यात्मिक लाभ मिळंत नसेल तर...
नवसासायासाच्या रुढी परंपरांमध्ये अध्यात्माचा वस्तुतः काही संबंध नाही. -अध्यात्म हे अपेक्षे शिवाय केलेली भक्ती आहे. भौतीक अपेक्षांनी केलेले विधी हे अंधविश्वास असलेले नवसच असतात. - भौतिक अपेक्षांनी केलेले नवसासायास संत एकनाथ आणि भक्ती मार्गातील इतर काही संतांनीही नाकारलेले दिसून येतात- अंध-विश्वासांमध्ये जोपर्यंत अनिष्ट काही नाही -किंवा सुधारणाकरून त्यातील अनिष्ट भाग काढून टाकला तर आपापले अंध-विश्वास एंजॉय करत रहाण्याचे स्वातंत्र्य हवेच. मुलाचे आयुष्य वाढावे म्हणून नवस केला ओवाळले नजर काढली पण आजारी पडू नये म्हणूनची लस दिली नाही अंधश्रद्देह्तून आंगावर बाळाला पाजले नाही असे होऊ नये ह्याची अंध-विश्वास बाळगताना दक्षता घेतली जावयास हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
माहितगार Fri, 07/15/2016 - 14:11 नवीन
चंद्रगुत्ते बाबत मी स्त्रीवादी दृष्टीकोणातून बाजू घेण्याचा प्रयत्न केला. चंद्रगुत्तेच्या नाण्याला कदाचित अधिक बाजू असाव्यात हे स्विकारत शर्मीला रेगे संपादीत पूस्तकाचा दूवा देत आहे. अर्थात कर्नाटकातल्याच अक्कामहादेवी यांचे स्त्रीवादी दिगंबर शैवभक्तीचे ठळक उदाहरण उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
श्रीगुरुजी Fri, 07/15/2016 - 11:52 नवीन
१. >> अघोरी प्रथा पद्धतशीरपणे बंद करायची म्हणजे काय करायचं? म्हणजे पाळण्याऐवजी सुपात बाळ ठेवायचं. आणि विहिरीऐवजी घरच्या उथळ रांजणात सोडायचं. एव्हढा साधा तोडगाही असू शकतो ना?
अरे पण कशासाठी करायचा हा गाढवपणा? कशासाठी इतका आटापिटा? कशासाठी त्या कोवळ्या जीवाचा इतका क्रूर छळ? कशाला सुपात ठेवून रांजणात सोडायचं? कसला डोंबलाचा तोडगा? मूर्खपणाला काही सीमा असते का नाही? खेड्यातले अडाणी मूर्खपणा करतात ते समजू शकते, पण शहरातले/परदेशातले सुशिक्षित जो मूर्खपणा करतात त्याला काय म्हणायचं? उपहास मोड ऑन - तान्ह्या बाळाला पाळण्यात घालून खोल, अंधार्‍या विहिरीत सोडण्याऐवजी सुपात ठेवून घरच्या उथळ रांजणात सोडणे आम्हाला अजिबात मान्य नाही. त्यासाठी आधी सूप आणावं लागेल, नंतर घरी सूप तरंगत राहील एवढा मोठा व खोल रांजण आणावा लागेल. एवढे करूनसुद्धा अंधार्‍या खोल विहिरीतल्या पाण्यात तरंगत ठेवल्यावर बाळाला जी मजा येईल ती मजा सूप उथळ रांजणात तरंगत ठेवून कशी येणार? उपहास मोड ऑफ -
३. >> शनी चौथर्‍यावर महिलांना प्रवेश हवा का नको याविषयी शंकराचार्यांची मते काहीही असोत, >> तिथे महिलांना पुरूषांच्या बरोबरीने प्रवेश हवाच असे माझे मत आहे. परंतु वर्तक मात्र याबाबतीत >> शंकराचार्यांचा सल्ला घ्यावा असा आग्रह धरीत होते. मूर्खपणा तो हाच. कशाला हवाय महिलांना पुरुषांबरोबर प्रवेश तिथे? काय थोर समता साधली जाणार आहे? नियम पाळायचे नसतील तर सार्वजनिक जागी जाऊ नये.
का? महिलांना प्रवेश न देण्यासाठी महिलांनी काय घोडं मारलंय? कसले डोंबलाचे नियम? कोणी ठरविले हे पक्षपाती नियम?
४. >> तृप्ती देसाई पाखंडी असो वा अजून काही असो, तिने पुढे आणलेला मुद्दा योग्यच होता मुद्दा आजिबात योग्य नाही. महिलांवर अन्याय करायच्या उद्देशाने प्रथा सुरू झाली नाही. महिलांना जिथे प्रवेश वर्ज्य आहे तिथे त्यांनी जाऊ नये. तरीही ज्या बायकांना स्पर्श करून दर्शन घ्यायचंच आहे त्यांनी खुशाल घरी शनीचा पाषाण बसवून त्याची दैनंदिन पूजा करावी.
कोणी ठरविला महिलांना प्रवेश वर्ज्य? त्यांना हे ठरविण्याचा अधिकार कोणी दिला? महिलांनी कशी व कोठे पूजा करायची हे तुम्ही कोण ठरविणार? पाहिजे तर तुम्ही घरी शनीचा पाषाण बसवून पूजा करा.
६. >> खून झाला त्याच दिवशी लगेचच सनातनवर संशयाची सुई वळलेली होती. पृथ्वीराज चव्हाण काहीबाही बरळले म्हणून सनातन संस्थेने गप्प बसायचं का? वाघ म्हंटलं तरी खातो, वाघोबा म्हंटलं तरी खातो. मग वाघुरड्या का म्हणू नये?
गप्प बसा असं कोण म्हणतंय? जेव्हा संस्थेवर संशय येऊन संस्थेची व साधकांची चौकशी सुरू झालेली असते तेव्हा अजून मूर्खपणा करून संशय वाढेल असे करू नये हा साधा कॉमनसेन्स आहे. कारण शेवटी जो त्रास होणार तो वर्तक किंवा आठवल्यांना होणार नसून तो सर्वसामान्य साधकांनाच होणार होता.
७. >> दाभोळकरांच्या मृत्युनंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्यांची निंदानालस्ती करणारा लेख लिहिणे व त्यांच्या फोटोवर >> लाल फुली मारणे यात कसली आली आहे डोंबलाची साधना? ही तर निव्वळ मनातील मळमळ. फुल्लीचं चित्रं अगोदरपासून होतं. आणि ज्याला तुम्ही निंदानालस्ती म्हणताय ती केवळ एक ओळ होती. 'दाभोलकरांना विकलांग मृत्यू न येत सत्वर मृत्यू आला हे वाईटातले चांगले आहे' अशा काहीशा अर्थाची ती ओळ होती. असेच उद्गार सरोजिनी नायडूंनी गांधीहत्येनंतर काढले होते. 'He died a king's death' असं काहीसं वाक्य होतं. त्याबद्दल सरोजिनींना कोणी दोष देत नाहीत.
ती केवळ एक ओळ नसून अनेक वाक्यांतून मनातील मळमळ ओकलेली होती. दाभोळकरांच्या मृत्युनंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्यांचा लाल फुली मारलेला फोटो वेबसाईटवर प्रसिद्ध करणे ही विकृती होती.
८. >> पोलिस अक्कलशून्य आहेत हे माहित असताना कशाला त्यांच्या हातात कोलीत द्यायचं? त्यातून त्रास होणार तो >> तुम्हालाच होणार ना? माकडाच्या हातात कोलीत दिलं व त्याने घराला आग लावली तर नुकसान माकडाचं का तुमचं? पोलिसांच्या डोक्यावर जो कोणी बसलाय त्याला सरळ करायला पाहिजे. उलट गप्प बसलं तर अनिष्ट वृत्ती फोफावणार नाही का?
मूर्खपणा केल्यामुळे पोलिसांच्या डोक्यावर बसलेला झाला का सरळ?
९. >> दाभोळकर हे फ्रॉड आहेत हे केवळ सनातन प्रभात मध्ये आरोप करून सिद्ध होत नाही. हे आरोप न्यायालयात >> सिद्ध व्हावे लागतात. नुसते शाब्दिक आरोप करत बसला तर तुमचा केजरीवाल होतो. दाभोलकरांच्या न्यासाने हिशेब सादर केलेले नाहीत. याला आरोप नाही, तर वस्तुस्थिती म्हणतात. दाभोलकरांच्या न्यासांच्या मालमत्तेवर टाच आणली पाहिजे. दाभोलकरांच्या फ्रॉडचे काही पुरावे इथे आहेत : http://shankhnaad.net/india/corruption/item/18-article-126 तसेच इथेही अधिक पुरावे मिळतील : https://www.scribd.com/document/172674025/Narendra-Dabholkar-s-financial...
इथे पुरावे देऊन काहीही उपयोग नाही. हे न्यायालय नाही व इथे कोणीही न्यायाधीश नाही. त्यासाठी न्यायालय ही एकमेव योग्य जागा आहे.
१०. >> सनातन ही मूर्खांची संस्था आहे याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आपल्या वर्तनाने सनातनच्या >> लोकांनी ते अनेकवेळा सिद्ध केलेलं आहे. गेल्या १८ वर्षांत सुमारे १७५ ग्रंथ छापून ५० - ६० लाख प्रती विकणारी संस्था मूर्खांची असल्यास शहाणे कोण हा प्रश्नंच आहे. आ.न., -गा.पै.
पूर्वी 'श्री' नावाचे एक साप्ताहिक निघायचे. ते प्रचंड लोकप्रिय होते. ते मराठीतले टॅब्लॉईड होते. संध्यानंद नावाचे वृत्तपत्रही भरपूर खपते. खपच बघायचा झाला तर 'श्री' वाले प्रचंड शहाणे समजावे लागतील. अमेरिकेतही अत्यंत टुकार मासिके/साप्ताहिके निघतात व त्यांचा खप प्रचंड असतो. ते सुद्धा शहाणेच म्हणायचे. कितीही ग्रंथ छापले व कितीही प्रती विकल्या गेल्या तरी वर्तन मूर्खपणाचे असल्यास त्यांना मूर्खच म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/14/2016 - 23:22 नवीन
माहितगार आणि बोका-ए-आझम, बोकोबांचं हे विधान वाचलं : >> सनातनकडून जाब विचारण्याबद्दल पैसे मिळणार असतील तर जाब विचारु. फुकटात काहीही काम करु नये. >> तुम्हीही सनातनची ही भलावण पैसे मिळाल्याशिवाय करत नका जाऊ. ही अत्यंत घातक विचारसरणी आहे. का ते सांगतो. ऑगस्ट २००८ मध्ये सुशीलकुमार शिंदे नामे एक थुंकीझेल्या हिंदू दहशतवाद म्हणून काहीबाही बरळत होता. सनातन संस्थेवर बंदी घालायला उतावीळ झाला होता. सोबत दिग्विजय सिंग नामे हुजऱ्याही भगवा दहशतवाद म्हणून छाती बडवत होता. या दोघांच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी अस्तित्वात नसलेल्या हिंदू दहशतवादावर लक्ष केंद्रित केलं. यातून पुढे कसाबच्या टोळीला घुसखोरी करता आली. पुढे काय घडलं ते सांगायला नको. जर चोर सोडून संन्याशाला सुळी देण्यात येत असेल तर शासनाला जाब विचारलाच पाहिजे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Fri, 07/15/2016 - 03:41 नवीन
अरे पैलवाना, तुमच्यासारखे शूर वीर हुशार धर्माभिमानी लोक देशात राहून काँग्रेसशी व सीमेवर जाउन पाकिस्तानशी लढायचे सोडुन परागंदा होउन लंडनमध्ये किरिस्ताव लोकांची सेवा करत पाउंड मिळवत बसले. म्हणुन कसाबचे फावले. असं आमच्या ह्यांचं मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ब
बोका-ए-आझम Fri, 07/15/2016 - 07:46 नवीन
तुम्हाला नक्की कोण देतं? मला तर असं वाटतं की तुम्ही conspiracy theorist आहात. सुशीलकुमार शिंदे आणि दिग्विजय सिंग हे बरळसम्राट आहेत यात शंका नाही पण त्यांची गादी मिपावर तुम्ही का चालवताय? मुंबई हल्ला हे गुप्तचर यंत्रणा, तटरक्षक दल आणि पोलिस यांचं एकत्रित अपयश होतं. सुशीलकुमार शिंदे आणि दिग्विजय सिंग यांनी भगवा दहशतवाद म्हणून जो आरडाओरडा चालू केला तो मालेगाव स्फोटानंतर. त्यानंतर नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबई हल्ला झाला. या दोन गोष्टींचा काय संबंध? माझ्या विधानामागचा हेतू हाच होता की सनातनकडे सनातनचे वकील आहेत, जे सनातनची बाजू यथाशक्ति मांडत आहेत. ते तसं फुकट करत नाहीयेत. त्यांना त्याचा मोबदला मिळत असलाच पाहिजे. तसंच जर आम्हाला सनातनची बाजू मांडण्याबद्दल काही मिळत असेल तरच सनातनची बाजू मांडू. फुकटात काही काम का करायचं? आणि या विचारसरणीमागे धोकादायक काय आहे? जो कुणी पैसे देईल त्याची बाजू वकील नेहमीच मांडतात. आणि कुठल्याही खटल्यात किंवा प्रकरणात किमान दोन बाजू असतातच. त्या मांडल्या गेल्याच पाहिजेत असं कायदा सांगतो. चोर सोडून संन्याशाला सुळी देण्यात येत असेल >>> बरोबर. पण संन्यासी निर्दोष आहे हे संन्याशाला सिद्ध करावं लागेल, किंवा चोर कोण आहे हे शोधून काढावं लागेल. पुरावा ही एकमेव गोष्ट कायदा ओळखतो. त्यामुळे सनातनवाले निर्दोष असतील तर ते सुटतील - त्यांच्यावर कितीही आरोप असले तरी. जर दोषी असतील तर शिक्षा होईल. आता तुमचा जर कायद्यावरच विश्वास नसेल (तुम्ही मागे दिलेल्या एका प्रतिसादावरुन) तर मग गोष्टच संपली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 07/15/2016 - 07:54 नवीन
तुमचे प्रतिवाद इथे व्यर्थ आहे बोक्याभाऊ इतके नोंदवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Fri, 07/15/2016 - 08:12 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ग
गामा पैलवान Fri, 07/15/2016 - 09:01 नवीन
बोका-ए-आझम, >> त्यामुळे सनातनवाले निर्दोष असतील तर ते सुटतील प्रश्न खटल्याचा नाहीये. कारण की सनातन संस्था कुठल्याही खटल्यात आरोप नाहीच्चे मुळी. न्यायालयाने संस्थेस आरोपी मानण्यास स्वच्छ नकार दिलेला असतांना प्रसारमाध्यमांतून संस्थेविरुद्ध जनमत कलुषित करायचे धंदे चाललेत. ही खरी समस्या आहे. या कृष्णकृत्यांमध्ये हमीद आणि मुक्ता हे दाभोलकरांचे नातेवाईक आघाडीवर आहेत. त्यांना सनातन संस्थेवर बंदी आणायची आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 07/15/2016 - 09:15 नवीन
बोका-ए-आझम, >> भगवा दहशतवाद म्हणून जो आरडाओरडा चालू केला तो मालेगाव स्फोटानंतर. त्यानंतर नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबई >> हल्ला झाला. या दोन गोष्टींचा काय संबंध? माझं जुनं विधान दुरुस्त करायला हवंय. तिथे दिग्विजय सिंग आणि सुशीलकुमार शिंदे यांच्याऐवजी हेमंत करकरे यांचं नाव हवं होतं. इथे एक लेख आहे. कृपया त्यातला दुसरा परिच्छेद पाहावा : http://www.misalpav.com/comment/857736#comment-857736 चोर सोडून संन्याशाच्या मागे पोलीस लागले की गुन्हेगार बळजोर होतात. उपरोक्त लेखात सनातन संस्थेचं नाव नाही. पण माझ्या आठवणीनुसार त्याच सुमारास सनातन संस्थेवर बंदीची मागणी जोरात होती. २६/११ मुळे ती मागे पडली. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Fri, 07/15/2016 - 12:07 नवीन
गा.पैं चे प्रतिसाद वाचून हिंदू मूलतत्ववादी, थोड्या का संख्येने, अस्तिवात आहेत हे मान्य असायला हरकत नसावी राईट?
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 07/15/2016 - 12:17 नवीन
म्हणजे काय आहेतच!! किंबहुना, "पृथ्वी सपाट आहे" अथवा "अल्लाच्या कृपेने जेव्हा 2 हैड्रोजन अन एक ऑक्सिजनचा अणु एकत्र येतो तेव्हा पाणी नावाचे दैवी गिफ्ट तयार होते" ह्या धाटणीची वाक्य (भगव्या परस्पेक्टिव्ह मध्ये) खूप सापडतील गापै ह्यांच्या लेखनात (लेखन म्हणजे फक्त लंब्या लंब्या कॉमेंट्स बरंका)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ब
बोका-ए-आझम Fri, 07/15/2016 - 12:56 नवीन
गा.पै. यांचे प्रतिसाद हा शुद्ध आचरटपणा आहे. त्याला हिंदू मूलतत्ववाद म्हणणं म्हणजे लय मोठा गैरसमज असेल. मला तर वाटतं त्यांना उचकवायला मजा येते. ते सध्या मोगा/चंपाबै यांना एकटं वाटू नये म्हणून असली मारडाला विधानं करत असावेत. जर त्यांचा त्यांनी केलेल्या विधानांवर १% जरी विश्वास असेल तर मात्र केस गंभीर आहे. मग तुम्ही जे म्हणताय त्याच्याशी सहमत व्हावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 07/15/2016 - 13:12 नवीन
भाऊ जर आपण सकल मोगा गटार सकल मुसलमान धर्माशी संलग्न करून पाहत असू (नाही म्हणू नका तुमच्या माझ्यासहित ९९% ऍक्टिव्ह मिपाकर ते मानतात) तर सकल गामावाणी कश्यात मोजावी हे अध्याहृत असावे, त्यात सेलेक्टिव्ह असू नये,असे मनःपूर्वक वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
संदीप डांगे Fri, 07/15/2016 - 13:25 नवीन
गापै = झाना... ??
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 07/15/2016 - 14:41 नवीन
गेल्या १८ वर्षांत सुमारे १७५ ग्रंथ छापून ५० - ६० लाख प्रती विकणारी संस्था.....
ज्ञानाच्या क्षेत्रात लोकप्रीयता हा माहितीचीच्या अचूकतेचा अथवा ज्ञानवंत असल्याचा परिमाण असू शकतो का ? बाकी युरोप आणि ख्रिश्चन जग पृथी सपाट आहे अस बहूमताने आणि लोकप्रीय विश्वासाने सांगत असताना पृथ्वी सपाट आहे असे सांगणारा त्याक्षणी अल्प मतात होता त्याने बायबल एवढ्या कॉपी विकल्या नसतील, बायबलच्या कॉपी अधिक विकल्या जातात म्हणून पृथ्वी सपाट आहे हे सिद्ध होऊ शकते का ? (अनुषंगिक अवांतर : याचसाठी विकिपीडिया ज्ञानकोश असल्यामुळे विकिपीडिया हि लोकशाही नाही आणि असूही नये) झाना आणि गापैच्या एका तार्कीक उणीवेत साम्य नक्कीच आहे. वरील प्रतिसादांमधून कुणीतरी झाना संबंधीत विवादा संदर्भाने दुवा दिला आहे त्यात झाना / त्यांची संस्था अथवा त्यांची भलावण करणारे एका आंतरजालीय ब्लॉगरला आंतरजालीय विवादाला नकार देताना कारण काय देतात तर झाना स्वतः अमूक इतके लोकप्रीय आहेत म्हणून त्यांचे ज्ञान अद्वितीय का कायसे आहे आणि म्हणून त्याम्च्या पेक्षा कमी लोकप्रीयता असलेल्या व्यक्तिशी ते विवादात/चर्चेत सहभागी होणार नाहीत. मी श्रीगुरुजींनी वापरलेली विशेषणे वापरताना हात आखडता घेईन तरीही "गेल्या १८ वर्षांत सुमारे १७५ ग्रंथ छापून ५० - ६० लाख प्रती विकणारी संस्था...." किंवा याच्या हजारपट विकणारी अजून वेगळी असणारी संस्था असू द्यात केवळ लोकप्रीयता हे ज्ञानवंत असल्याचे लक्षण होऊ शकत नाही, सचिन तेंडूलकर पेक्षा कमी लोकप्रीय असलेल्या एखाद्या क्रिकेटरचा क्रिकेटबद्दलचा एखादा तर्क सचिन तेंडूलकरपेक्षा उजवा नसेलच असे सांगता येत नाही, मग सचिन तेंडूलकर कितीही लोकप्रीय असला तरीही. लोकप्रीय म्हणजे बरोबर या गृहीतकातील तार्कीक उणीवेला तर्कशास्त्रात Argumentum ad populum असे नाव आहे.
In argumentation theory, an argumentum ad populum (Latin for "appeal to the people") is a fallacious argument that concludes that a proposition is true because many or most people believe it: "If many believe so, it is so."
The bandwagon effect is a phenomenon whereby the rate of uptake of beliefs, ideas, fads and trends increases the more that they have already been adopted by others. In other words, the bandwagon effect is characterized by the probability of individual adoption increasing with respect to the proportion who have already done so.[1] As more people come to believe in something, others also "hop on the bandwagon" regardless of the underlying evidence. Argumentum ad populum ची उदाहरणे * Nine out of ten people in the United States claim this bill is a bad idea, therefore this bill is bad for the people. * Fifty million Elvis fans can't be wrong. * Everyone's doing it, therefore it must be good. * In a court of law, the jury vote by majority; therefore they will always make the correct decision. * Many people buy extended warranties, therefore it is wise to buy them. * Millions of people agree with my viewpoint, therefore it must be right. * The majority of this country voted for this president, therefore this president must, objectively, be a good President.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 07/15/2016 - 15:37 नवीन
श्रीगुरुजी, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १. >> अरे पण कशासाठी करायचा हा गाढवपणा? एकदम मान्य. पण लोकांना जे सांगायचंय ते त्यांच्या कलाने सांगायला हवं. भारतीय लोकांना धर्माच्या भाषेत सांगितलेलं चटकन कळतं. २. >> महिलांना प्रवेश न देण्यासाठी महिलांनी काय घोडं मारलंय? कसले डोंबलाचे नियम? कोणी ठरविले हे पक्षपाती नियम? ज्याने दृष्टांत देऊन मंदिर उभारायला सांगितलं त्याने हे नियम ठरवले आहेत. ३. >> कोणी ठरविला महिलांना प्रवेश वर्ज्य? त्यांना हे ठरविण्याचा अधिकार कोणी दिला? महिलांनी कशी व कोठे >> पूजा करायची हे तुम्ही कोण ठरविणार? पाहिजे तर तुम्ही घरी शनीचा पाषाण बसवून पूजा करा. ज्याने दृष्टांत देऊन मंदिर उभारायला सांगितलं त्याने हे नियम ठरवले आहेत. ज्यांना ते पाळायचे नसतील त्यांनी तिथे न जाणंच इष्ट. तसंही पाहता शनी शिंगणापूर हे खाजगी मंदिर आहे. ४. >> जेव्हा संस्थेवर संशय येऊन संस्थेची व साधकांची चौकशी सुरू झालेली असते तेव्हा अजून मूर्खपणा करून >> संशय वाढेल असे करू नये हा साधा कॉमनसेन्स आहे. समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करावंच लागतं. त्यात कोणी जर अपमान शोधू पहात असेल तर सनातन संस्था काहीही करू शकत नाही. ५. >> ती केवळ एक ओळ नसून अनेक वाक्यांतून मनातील मळमळ ओकलेली होती. दाभोळकरांच्या मृत्युनंतर लगेच >> दुसर्‍या दिवशी त्यांचा लाल फुली मारलेला फोटो वेबसाईटवर प्रसिद्ध करणे ही विकृती होती. माझ्या आठवणीप्रमाणे त्या लेखात मळमळ वगैरे काहीही नव्हती. माझ्याकडे मूळ लेख नसल्यामुळे याबाबत चूकभूल देणेघेणे. तुमच्याकडे तो असल्यास कृपया दुवा द्यावा. फुल्ली मारलेला फोटो पार जुनाच होता. कोणी फ्रॉडस्टर मेला तर त्याच्या फोटोवरही फुल्ली दाखवायची नाही का? ६. >> मूर्खपणा केल्यामुळे पोलिसांच्या डोक्यावर बसलेला झाला का सरळ? पण शिरजोर तर होऊ द्यायचा नाही ना त्याला? ७. >> इथे पुरावे देऊन काहीही उपयोग नाही. हे न्यायालय नाही व इथे कोणीही न्यायाधीश नाही. त्यासाठी न्यायालय >> ही एकमेव योग्य जागा आहे. तुम्ही म्हणालात की सनातन संस्थेने कायदेशीर पाठपुरावा करायला हवा. मी तो होतोय हे दाखवून दिलं. ८. >> कितीही ग्रंथ छापले व कितीही प्रती विकल्या गेल्या तरी वर्तन मूर्खपणाचे असल्यास त्यांना मूर्खच म्हणावे लागेल. म्हणूनच तर शहाणे कोणास म्हणावे हा प्रश्न पडलाय. कोणी शहाणा दाखवून देता का? ९. >> पूर्वी 'श्री' नावाचे एक साप्ताहिक निघायचे. ते प्रचंड लोकप्रिय होते. ते मराठीतले टॅब्लॉईड होते. संध्यानंद >> नावाचे वृत्तपत्रही भरपूर खपते. खपच बघायचा झाला तर 'श्री' वाले प्रचंड शहाणे समजावे लागतील. >> अमेरिकेतही अत्यंत टुकार मासिके/साप्ताहिके निघतात व त्यांचा खप प्रचंड असतो. ते सुद्धा शहाणेच म्हणायचे. साप्ताहिक श्री, संध्यानंद आणि अमेरिकेतली टुकार नियतकालिके यांच्यातला मजकूर आणि सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथातला मजकूर यांत गुणात्मक फरक आहे. याउपर तुम्ही आता स्वत:ला आवरा म्हणून सुचवणार होतो. पण उपरोक्त गुणात्मक भेद तुमच्याकडून दुर्लक्षिल्याने मी स्वत:स आवरायचं ठरवलं आहे. या विषयाबाबत पुढे चर्चा करता येईलसं वाटंत नाही. म्हणून तुमच्याशी चालू असलेल्या चर्चेस माझ्याकडून पूर्णविराम. आ.न., -गा.पै. तळटीप : सनातन प्रभातमधला दाभोलकरांच्या हत्येनंतरचा लेख मिळाला तर तेव्हढ्यापुरती मर्यादित चर्चा करता येईल.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 07/15/2016 - 22:11 नवीन
१. तद्दन मूर्खपणा आहे हा, भारतात लोकांना फक्त धर्माच्या कलाने सांगितलेले पटकन कळते हा अतिशय भंपक डायलॉग आहे, असे खरेच असल्यास ते पूजा कर्मकांड, सनातन, पानसरे-दाभोळकर, प्रागतिक-कर्मठ, सगळे घाला गाढव/गाढवीच्या नेमक्या अवयवात, पहिला आसाराम ते झाना सगळी कोकरे पकडून आणा अन त्यांस, जनतेला पार लोकसंख्या नियंत्रण ते गावात संडास बांधणे सगळे समजवायला सांगा, बघू धर्माच्या कलाने किती लोक ऐकतात ते, अन बघू किती धर्म हे सगळे सांगतात ते करायला २. & ३. दृष्टांत तुम्हाला दिलाय का त्या देवाने?? नाही इतके ठामेठोक सांगताय म्हणून विचारले हो, बरं, दृष्टांत देणारा इतका कनवाळू होता/आहे अन त्याचेच नियम आहेत तर त्याने त्याच्या चौथऱ्यावर जायला लाठ्या खायला तयार असलेल्या पोरीच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत द्यावा की बाळे नको येऊ वरती शिळेपाशी तुझ्या ह्या आकाशातल्या बापाला त्रास होतोय,दिलाय का असा काही? दिला असेल तर बोला, किंवा मूळ दृष्टांत तुम्हाला तरी दिलाय का बोला? ४. सनातनला ही अवघडजागची दुखणी निस्तरायचा ठेका कोणी दिलाय म्हणे? मी हिंदू आहे अन मी असा कुठलाही हक्क सनातनला दिलेला नाहीये, त्यामुळे उगाच तोंड उघडावे लागते वगैरे मखलाशी सोडा ५.लेख वाचलाय तरी का? की आपलं उगा शनिदेवाच्या दृष्टांतासारखेच मजा मजा ?? ६.कोण कधी शिरजोर झालाय? जगभरातल्या गाढवांचा हा छंद झालाय नुसता कोणी एक राज्यकर्ता शिरजोर झाल्याचे धर्माच्या मागे लपून बोंबलत सुटायचे! अन त्याला शिरजोर न होऊ देण्याच्या नावाखाली कायदे हातात घेऊन स्वैर वागायचे! हाड तिच्येयला त्या धर्मांच्या ७.नो कॉमेंट्स ८.असोच ९.आहे तर गुणात्मक फरक आहे की! संध्यानंद मध्ये किमान काहीतरी कामाचे असते हो! नाही काही तर कोडीच! अमेरिकन टुकार प्रकाशनांबद्दल इथे बोलत नाही , अगदीच अनभिज्ञ असाल तर तुम्ही आयुष्यातल्या एका आनंदाला मुकला आहात असे म्हणेल सनातनवर मी मेसचा डबाही ठेवत नसे/ ठेवणार नाही! आधीच भातात कचकून सोडा त्यात ह्यांचा आचरटपणा, काय तर म्हणे नमस्कार करताना अमुक अँगल असावा अन तमुक मुहूर्ताला कुठली ती सुब्रह्मण्यम किरणे शोषली जातात, साधकाच्या घरात इतक्या किरण शलाका असतात का लेकाचं 450 स्क्वे फु चा हॉल किचन आहे का अँड्रॉमेडा अभ्रिकेतला एखादा सुपरनोव्हा तेच कळत नाही आयुष्यात कधी हे तोंडून निघेल असे वाटले नव्हते तारीही मी गुरुजींशी सहमत आहे ह्या बाबतीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 07/15/2016 - 16:18 नवीन
माहितगार, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. सनातनचे ग्रंथ किती लोकप्रिय आहेत हे सांगायचा हेतू नाहीच्चे मुळी. वर श्रीगुरुजी सनातनवाल्यांना मूर्ख म्हणंत होते, त्यासंदर्भात ही ग्रंथविक्री बघायला हवी. सुमारे पावणेदोनशे ग्रंथांच्या पन्नासेक लाख प्रति विकल्या गेल्या. म्हणजे प्रत्येक ग्रंथाच्या पंचवीसहजार ते तीसहजार प्रती झाल्या. धार्मिक विषय पाहता हा आकडा जरा जास्तच वाटंत नाही का? शिवाय हे सगळे ग्रंथ गेल्या वीसेक वर्षांत कोणीतरी लिहिलेले आहेत. बायबल वा वैदिक संहितांसारखे अगोदरपासून अस्तित्वात नाहीत. सांगण्याचा मुद्दा काये की एव्हढे ग्रंथ आणि एव्हढ्या प्रती निर्माण करून छापून विकण्यासाठी आणि वाचकांना विकत घ्यावेसे वाटण्यामागे केवळ मूर्खपणाच आहे का? की इतर काही पद्धती कार्यरत आहे? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 07/15/2016 - 16:24 नवीन
एव्हढे ग्रंथ आणि एव्हढ्या प्रती निर्माण करून छापून विकण्यासाठी आणि वाचकांना विकत घ्यावेसे वाटण्यामागे केवळ मूर्खपणाच आहे का?
म्हणजे मूर्खपणाही आहे हे तुम्ही कबुल करताय तर... ;) असो. 'मूर्खपणा हा संसर्गजन्य आजार आहे'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
माहितगार Fri, 07/15/2016 - 16:53 नवीन
गापै वर ब्यांडवॅगन इफेक्टची मिहिती जोडली आहेच. आता कम्यूनल रि-इन्फोर्समेंट वाचा. Communal reinforcement is a social phenomenon in which a concept or idea is repeatedly asserted in a community, regardless of whether sufficient empirical evidence has been presented to support it.[1] Over time, the concept or idea is reinforced to become a strong belief in many people's minds, and may be regarded by the members of the community as fact. Often, the concept or idea may be further reinforced by publications in the mass media, books, or other means of communication. The phrase "millions of people can't all be wrong" is indicative of the common tendency to accept a communally reinforced idea without question, which often aids in the widespread acceptance of factoids. factoids = The term factoid can in common usage mean either a false or spurious statement presented as a fact
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 07/15/2016 - 22:27 नवीन
माहितगार, सनातन संस्थेच्या संदर्भात (तुमच्या मते) फ्याक्टॉईड काय आहे? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
च
चंपाबाई Sat, 07/16/2016 - 05:32 नवीन
ग्रंथाच्या किती कॉपी विकया गेल्या यावर शहाणपण ठरते. .... बायबल व कुराणांच्याच कॉपी जास्त विकलया गेल्या आहेत ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ब
बोका-ए-आझम Sat, 07/16/2016 - 05:52 नवीन
१. तसं म्हटलं तर जगात कोकेन आणि हेराॅईनचा खप हा भरपूर जास्त आहे. या अंमली पदार्थांचं सेवन करणारे सगळेच तुमच्या मताप्रमाणे हुशार म्हणायला हवेत. नाही का? २. सनातनविषयी म्हणायचं तर एवढी पुस्तकं विकली गेली हे सिद्ध करणारा एखादा third party, neutral पुरावा आहे का? सनातनवाले काहीही म्हणतील. आपल्या न विकलेल्या वर्तमानपत्राच्या प्रती रद्दीवाल्यांकडे देऊन आपल्या circulation चे आकडे फुगवून सांगण्याबद्दल अनेक प्रतिष्ठित वृत्तपत्रे बदनाम आहेत. सनातन असं काही करणारच नाही असं कशावरून? ३. ही पुस्तकं कोण घेतंय? त्यांच्यावर ही पुस्तकं विकत घेण्याची सक्ती केली जात नाहीये कशावरून? ४. एवढे ग्रंथ विकून कमावलेल्या उत्पन्नाचा सनातनने हिशोब दिला आहे का? एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी जे पैसे लागतील ते सनातनकडे कुठून आले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा