Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - १

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 07/14/2016 - 16:56
🗣 388 प्रतिसाद
मिसळपाव या संकेतस्थळावर आजपर्यंत राजकारण व आजूबाजूला होणार्‍या रोजच्या स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर अनेक धागे निघाले. राजकारणासंबंधी धागे बहुतेक वेळा एका विशिष्ट निवडणुकीच्या निमित्ताने निघाले होते. आजूबाजूला होणार्‍या घडामोडींवरील धागे एखाद्या विशिष्ट घटनेच्या निमित्त निघालेले होते. परंतु रोज होणार्‍या ताज्या घडामोडींसंदर्भात एकही धागा नाही. त्यासाठी 'ताज्या घडामोडी - १' हा धागा सुरु करीत आहे. या धाग्यात अंदाजे ३०० प्रतिसाद झाल्यावर पुढील धागा 'ताज्या घडामोडी - २' सुरू करता येईल.
वर्गीकरण
राजकारण
बातम्या
घडामोडी

प्रतिक्रिया द्या
77242 वाचन

💬 प्रतिसाद (388)
च
चंपाबाई Fri, 07/29/2016 - 19:13 नवीन
आता इथले काउअबॉइज तुम्हाला पाकिस्तानात ढकलतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
श
श्रीगुरुजी Fri, 07/29/2016 - 19:51 नवीन
Hats off to Foreign Minister Sushma Swaraj - http://indianexpress.com/article/opinion/web-edits/gurdip-singh-case-is-sushma-swarajs-another-feather-in-foreign-policy-success/
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 07/30/2016 - 02:43 नवीन
http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5008531681853108817&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20160729&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=
  • Log in or register to post comments
V
viraj thale Sat, 07/30/2016 - 10:49 नवीन
PUTIN ON ISIS TERROR, “I Swear if they Bomb Russia, in Half an Hour Every Muslim Will Die
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 07/30/2016 - 11:07 नवीन
बहुचर्चित, वादग्रस्त व प्रलंबित 'वस्तू व सेवा कर' विधेयक पुढील आठवड्यात राज्यसभेत मंजूर होण्याची शक्यता आहे. या विधेयकाने नक्की काय व किती फरक पडणार आहे खुदा जाने. http://www.thehindu.com/news/national/with-congress-on-board-gst-bill-may-be-passed-next-week/article8918235.ece?utm_source=MostCommented&utm_medium=Homepage&utm_campaign=WidgetPromo
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sat, 07/30/2016 - 11:18 नवीन
जीएसटी संदर्भात लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेले खालील दोन लेख वाचनीय आहेत .. http://www.loksatta.com/lekha-news/parliament-might-pass-gst-bill-in-monsoon-session-1272101/ http://www.loksatta.com/lekha-news/all-about-gst-bill-1272100/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चंपाबाई Sat, 07/30/2016 - 15:40 नवीन
सागरमाला प्रोजेक्ट ! सागरमाला प्रोजेक्टची आखणी झाली बाजपेयी काळात. तेंव्हा भगवी भुतावळ गप्प होती. मग बाजपेयी बुडले व काँग्रेस आले... त्याच प्रोजेक्टला भुतावळीने विरोध केला.... आमच्या रामाच्या सेतूला हे भोक पाडणार म्हणुन. आता पुन्हा तोच प्रोजेक्ट . पुन्हा भाजपा. आता पुन्हा मोदीभक्त गाणी म्हणताहेत ! सेतूला भोक पाडणार नाहीत का ? किती वेळा यू टर्न ?
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sat, 07/30/2016 - 19:28 नवीन
जरी हा धागा ताज्या घडामोडी साठी असला तरी ज्यांना कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्यकथा वाचायच्या असतील त्यांच्यासाठी खालील लिंका.... http://www.thebetterindia.com/62903/kargil-hero-neikezhakuo-kenguruse/ http://www.thebetterindia.com/62995/kargil-hero-sonam-wangchuk/ http://www.thebetterindia.com/62850/kargil-hero-kambampati-nachiketa/
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Sat, 07/30/2016 - 20:48 नवीन
आ. न,, शांताराम कागाळे .
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Sun, 07/31/2016 - 06:07 नवीन
Image removed. स्थळ : जे डब्ल्यु मेरियट हॉटेल, एअरपोर्ट रोड .... २८ जुलै २०१६ .... जागतिक हेपॅटायटिस दिन ... दिवसभर हेपॅटायटिस , त्याचे प्रकार , लक्षणे, प्रतिबंध , उपचार , त्याची किंमत , शासनाने लक्ष द्यायची गरज , इजिप्तसारख्या देशात राबवले गेलेले नॅशनल प्रॉग्रॅम इ इ इ चर्चासत्रे झडली. संध्याकाळच्या सेशनमध्ये खास अतिथींचे आगमन झाले. त्यांनी दहा मिनिटाचे भाषण दिले. एका सिनेमाच्या शुटिंगदरम्यान पोटाला इजा झाल्याने इमर्जेन्सी सर्जरी करावी लागली. त्यादरम्यान पन्नासपेक्षाही जास्त बाटल्या रक्त व प्लेटलेट्स ट्रान्स्फुज करावे लागले. त्याना त्याद्यावारे हेपॅटायटिस बी चे संक्रमण झाले. पुढे बराच काळ तो रोग सुप्तावस्थेतच राहिला. नंतर जेंव्हा त्याचे आस्तित्व समजले , तेंव्हा जवळजवळ ७० % लिव्हर , सिर्होसिस होऊन खराब झाले असल्याचे समजले. पण माणुस १० % लिव्हर टिशुवर जगू शकतो, त्यामुळे आजही ते व्यवस्थीत आहेत. Image removed. Image removed. ________________________________________________________________________________ दुसर्‍या दिवशी पेप्रात आले होते. http://indianexpress.com/article/india/india-news-india/amitabh-bachchan-hepatitis-b-for-higher-public-spending-to-prevent-hepatitis-b-2941401-2941401/ Megastar Amitabh Bachchan, who is surviving only on 25 per cent of his liver as the rest has been damaged by the deadly Hepatitis B virus, on Thursday called for higher budget spend to prevent the fatal disease. “Hepatitis B hit me accidentally. After the accident on the sets of ‘Coolie’ (1983), I was infused with the blood of about 200 donors and 60 bottles of blood were injected into my system,” Bachchan told an event on the World Hepatitis Day here this evening. कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य मंत्रालय व महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी यानी केले होते.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 09/02/2016 - 10:48 नवीन
तुम्ही घेतलेल्या पहिल्या फोटोमधे उजव्या कोपर्यात कावलेला दिसणारा उपट सुंभ कोण आहे? निदान फोटोच्या बेळेस तरी बाजुला करावा ना ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
स
सुबोध खरे Fri, 09/02/2016 - 10:55 नवीन
ती सेल्फी असेल तर )))--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
इ
इरसाल Sat, 09/03/2016 - 08:36 नवीन
नाव चंपाबाई आणी सेल्फी बाप्याचा ?????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 09/03/2016 - 10:04 नवीन
त्या चंपाबाईं नाहीत ते भम्पकबुवा आहेत. एका ठिकाणी मी "करतो" "जातो" असे प्रतिसाद दिले आहेत. केदार दीक्षित साहेबांच्या एका धाग्यावर आमच्या "बायकोने" पदार्थ छान केला अशी तारीफ. आता चंपा"बाई" असतील अन त्यांची बायको असेल तर ते LGBT का काय मध्ये जातील ना? म्हणून म्हणतो ते भंपक बुवा आहेत ( जामोप्या, हितेश, मोगा अशा अनेक डू आय डी घेऊन झाल्या). परत नवीन नाव घेऊन लोचटासारखे येतातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
त
तर्राट जोकर Sat, 09/03/2016 - 10:38 नवीन
Hello Doctor, are you in race with MOGA of getting lower and lower every day?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
L
lakhu risbud Sat, 09/03/2016 - 11:00 नवीन
हेच "ते" सुप्रसिद्ध जामोप्या/दादा दरेकर/हीतेस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Sat, 09/03/2016 - 11:08 नवीन
परत नवीन नाव घेऊन लोचटासारखे येतातच.
जसे मनोजकुमार, भारतभूषण, प्रदीपकुमार इ.चे सुद्धा फॅन असायचे, तसा मिपावर यांचा सुद्धा फॅन क्लब आहे बरकां.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
त
तर्राट जोकर Sat, 09/03/2016 - 11:14 नवीन
उगी उगी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 09/03/2016 - 11:15 नवीन
बरं. उगी उगी तर उगी उगी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ब
बोका Sun, 07/31/2016 - 08:09 नवीन
आतिवास ताईंचे पुस्तक प्रकाशित होतेय. आजच्या लोकसत्तेत त्यातील एक प्रकरण आले आहे. http://www.loksatta.com/lekha-news/ativas-savita-book-on-taliban-terrorism-1276138/ ... Image removed.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sun, 07/31/2016 - 12:16 नवीन
काल पर्रिकर पुण्यातल्या एका कार्यक्रमात म्हणटले की देशविरोधी बोलणाऱ्याना धडा शिकवायला पाहिजे तर या गोष्टीवर सुध्दा राहुल गांधीना आक्षेप, नक्की यात आक्षेप घेण्यासारख काय आहे?
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Sun, 07/31/2016 - 14:57 नवीन
आमीर खानच्या बायकोला हा देश सुरक्षित वाटत नव्हता, तर ते दोघे देशद्रोही ठरले. अंबानीच्या बायकोला सुरक्षितता वाटत नव्हती, तर तिला मात्र झेड सिक्युरिटी मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे
ग
गामा पैलवान Sun, 07/31/2016 - 21:23 नवीन
चंपाबाई, शासनाकडे अर्ज केला असता तर अमीरखानच्या बायकोस पोलीस संरक्षण मिळालं असतं की. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की अमीरखान आणि त्याची बायको देशद्रोही आहेत असं भारत शासनाचं वा न्यायालयाचं अधिकृत मत नाहीये. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Mon, 08/01/2016 - 04:48 नवीन
ते देशद्रोही नाहीत, असे शासनाचे वा न्यायालयाचे अधिकृत मत नाही, तर 'त्याना' धडा शिकवण्याचा प्रश्न येतोच कुठे? बरं, समजा कुणी देशद्रोही असेलच, तर त्याला धडा शिकवायचा कायदेशीर अधिकार कुणाला आहे? बीजेपीला / पर्रिकर्राना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ध
धनावडे Mon, 08/01/2016 - 08:22 नवीन
तुमच्याशी वाद घालणे निर्थक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
अ
अनुप ढेरे Mon, 08/01/2016 - 08:34 नवीन
पर्रिकरांचं अत्यंत बेजबाबदार वक्तव्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
ब
बोका-ए-आझम Mon, 08/01/2016 - 09:09 नवीन
बेजबाबदार वक्तव्य आमीरने केलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ब
बोका-ए-आझम Mon, 08/01/2016 - 10:22 नवीन
देशविरोधी विधानं केली आहेत असं म्हटलंय. याचा अर्थ देशद्रोह केला असा होत नाही. मजा म्हणजे आमीरला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि पर्रीकरांना नाही? बरं, आमीरच्या चांगल्या कामाबद्दल (पाणी फाउंडेशन) त्याचा सत्कार भाजपच्याच सरकारने केला. तेव्हा नव्हतं वाटतं असुरक्षित वातावरण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
अ
अनुप ढेरे Mon, 08/01/2016 - 11:35 नवीन
उच्च-पदस्थ नेत्यांकडून अशी बेजबाबदार वक्तव्य विजिलँटे हिंसेला प्रोत्साहन देत असतात. या वक्तव्याचा परिणाम म्हणून चित्रपट हिंसेने बंद पाडणे, काळे फासणे हे प्रकार होणार. याची जबाबदारी कोणाची? वर परत म्हणणार की आमिरने जे वक्तव्य केलं त्याचं काय? अमिर खानची जबाबदारी पर्रिकरांइतकीच आहे काय? बर समजा त्याने तारतम्य सोडून वक्तव्य केलं तर संरक्षण मंत्र्यांनीपण जबाबदारी सोडून बोलायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ध
धनावडे Mon, 08/01/2016 - 13:37 नवीन
पण देशात राहुन देश विरोधी बोलणाऱ्याना शिक्षा/धडा दिला पाहिजे यात चुकिच काय आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Mon, 08/01/2016 - 14:00 नवीन
धडा देणारे कोण नक्की? एवढं धोकादायक बोलला असेल अमिर खान तर करावा सरकारने खटला दाखल. रितसर कोर्टात प्रूव करावं तसं? उगाच विजिलँते लोकांना का प्रोत्साहन द्यायचं? आत्ता स्वघोषित गौ-रक्षक काय धुमाकूळ घालतायत ते दिसतं आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे
अ
अमितदादा Mon, 08/01/2016 - 14:33 नवीन
सहमत। आमिर खान बोलला ते चूक पण जे पर्रीकर बोलले ते गरजेचं न्हवत. हिंसक गो रक्षक लोकांकडून होणाऱ्या हल्याबाबत मात्र पर्रीकर किंवा इतर मंत्री नेमकेपणानं बोलत नाहीत हे खटकत. हि लोकांवर भाजपाचा किंवा मोदींचा वचक आहे की नाही याबाबत शंका यायला लागलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ब
बोका-ए-आझम Mon, 08/01/2016 - 17:50 नवीन
असं अजिबात नाही. मुळात Intolerance हे काही असंतुष्ट लोकांनी चालू केलेलं fad होतं. त्यात मुळातच विरोधाभास होता. जे लोक intolerance म्हणून आरडाओरडा करत होते (आमीरसकट) ते हे सोयीस्कररीत्या विसरले होते की जर देशात खरंच intolerance असता तर त्यांना असं स्पष्टपणे आणि उघडपणे बोलता आलं असतं का? आज जम्मू आणि काश्मीरमध्ये ' मुलींनो, सायकल चालवलीत तर सायकलसकट जाळून टाकू ' अशी पत्रकं अतिरेक्यांनी लावलेली आहेत. हा intolerance आहे, पण याबद्दल कुठल्याही स्वघोषित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्याने आवाज उठवलेला नाही. (संदर्भ: एबीपी माझा). त्यामुळे असा selective आवाज उठवणं हा दांभिकपणा आहे, आणि तो उघडकीस आणला पाहिजे. पर्रीकरांनी तो आणला. त्यात काहीही बेजबाबदारपणा नाही. जसं सरकारच्या चुकीचं माप सरकारच्या पदरात घातलंच पाहिजे तसं सरकारमधल्या एका मंत्र्यानं केलं. शिवाय आमीरचे चित्रपट वगैरे बंद पाडणं असले प्रकार पूर्वी झाले होते, नाही असं नाही. पण पर्रीकरांच्या या अशा वक्तव्यामुळे असं होईल हे speculation आहे. पी.के. वर लोकांनी टीका केली, पण तो बंद वगैरे पाडला नाही. तेव्हा intolerance असल्याचं आमीरला जाणवलं नाही. हा दांभिकपणा आहे आणि तो उघडकीला आणला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Mon, 08/01/2016 - 18:30 नवीन
मुळात हा intollerance आपल्या देशात फार पूर्वीपासून ह्या ना त्या रुपात अस्तित्वात आहे हि वास्तुस्तिथी आहे, फक्त मोदी सत्तेत आल्यानंतर हे intollerance अचानक सुरु झालं हा खोटा अप्रचार आहे. मात्र मोदी सत्तेत आल्यापासून हिंदू radical लोकांची दांभिकता वाढत चालीय हि दुखरी बाजू आहे। आता याला लोक असा प्रत्यिउत्तर देतील कि मुस्लिम radical लोक काय बोलतात हे का पाहत नाही, पण आपण हे विचारत घ्यायला हवं कि मुस्लिम radical लोकामुळं त्या धर्माची हि अवस्था आहे तशी अवस्था हिंदू धर्माची होऊन द्यायची आहे का हा मूळ प्रश्न आहे. हिंदू लोकामध्ये खूप लोक tollerant आहेत पण साध्याच सरकार हे त्यांना पूरक अशी भूमिका घेताना दिसत नाही. बर फक्त एका चुकी मुळे आमिर खान देशद्रोही कसा ठरतो हे कळत नाही. कालच काश्मीर च्या मुख्यमंत्री मुफ्ती अशा बोल्या कि आतंकवादी वाणी ला सेकंड चान्स दिला असता तो जर तेथे आहे हे माहित असत तर, मग का नाही भाजप न त्याना सुनावलं किंवा पाठिंबा काडून घेतला. हे सेलेक्टिव्ह outrage नाही का. पर्रीकारांनी आमिर ऐवजी गो राक्षकाकडून होणाऱ्या हत्या बद्दल मत व्यक्त केलं असत तर बरं झालं असत कारण ते काही साधे सुधे मंत्री नाहीत मोदी सरकार मधील ज्या ठराविक लोकांबद्दल जनसामान्यांना आदर आहेत त्यातील ते एक आहेत. आमिर खान कडून चूक झाली,चुका होऊ शकतात कायदा त्याच काम करेल, आणि चुकीला माफी नसायला भारत काय दगडी चाळ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
च
चंपाबाई Mon, 08/01/2016 - 19:30 नवीन
“(Wife) Kiran and I have lived all our lives in India. For the first time, she said, should we move out of India? That’s a disastrous and big statement for Kiran to make to me. She fears for her child. She fears about what the atmosphere around us will be. She feels scared to open the newspapers everyday. That does indicate that there is a sense of growing disquiet,” he said.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
च
चंपाबाई Mon, 08/01/2016 - 19:32 नवीन
हा प्रतिसाद बोकाला होता. चुकून अमितच्या पोस्टखाली पडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
श
शाम भागवत Tue, 08/02/2016 - 10:43 नवीन
चंपाबाई पण चुकतात? ;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
ब
बोका-ए-आझम Mon, 08/01/2016 - 19:48 नवीन
याच्याशी सहमत. साक्षी महाराज, साध्वी प्राची आणि भाजपमधले इतर गणंग एकेकाळी वाट्टेल ते बडबडत होते आणि बिहारमध्ये पराभव झाल्यावर त्यांच्या वाचाळपणाला चाप बसलेला आहे. अशा लोकांचं वाचाळत्व अजिबात क्षम्य नाही पण असले वाचाळवीर प्रत्येक पक्षात आहेत. मीडिया भाजपचे वाचाळवीर असतील तर जे आकांडतांडव करते ते इतर पक्षांच्या बाबतीत करत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि याचा भाजप सत्तेवर येण्याशी काहीही संबंध नाही. आधीही भाजप नेत्यांच्या विधानांचा विपर्यास केला गेलेला आहे. पर्रीकरांनी आमीरच्या विधानाचा समाचार घेतला हे माझ्या मते योग्यच केलं. आमीरसाठी देशद्रोही असा शब्द त्यांनी वापरलेला नाही पण intolerance वर त्याने selective मत दिलं आणि तो दांभिकपणा होता. मुळात liberals आणि डावे हे विरोधी मतांच्या बाबतीत जितके intolerant असतात तितकं intolerant कुणीही नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Mon, 08/01/2016 - 20:00 नवीन
अमीर ची चूक होती हे मान्यच आहे. बाकी लिबरल आणि डाव्यांच्याबाबत तुमचं मत शत प्रतिशत बरोबर आहे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
च
चंपाबाई Tue, 08/02/2016 - 05:00 नवीन
स्टेटमेंट बायकोचे होते तर तिला दोष द्यायचा की आमीरला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Tue, 08/02/2016 - 08:08 नवीन
बरोबर आहे चंपाबाई. परंतु एक वैयक्तिक संवाद सार्वजनिक करण हा आमिरचा दोष आहे। तसेच बायकोच्या आडून त्याने निशाणा साधला अस हि वाटत. आणि किरण वर हि लोकांनी टीका केली होती परंतु तिचा प्रोफेशनल आणि सार्वजनिक जीवनात वावर कमी असल्याने लोकांनी अमीर वर तोफ डागली. बाकी हे माझे वैयक्तिक मत आहे तुमचे वेगळे असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Tue, 08/02/2016 - 08:34 नवीन
बायकोचे स्टेटमेंट त्याने जसेच्या तसे सांगितले. समजा त्याची बायको बोल्ली असती ... खाविंद , हिंदुस्तान बहोत प्यारा देश है ! आणि हे स्टेटमेंट त्याने सार्वजनिक केले असते , तर तुम्ही बोलला असता की वैयक्तिक वाक्य सार्वजनिक का केले म्हणुन ? वाक्य सार्वजनिक करताना ते भाजपा सेना पर्रिकर आठवले यांच्या आवडीनुसार करायचे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
ग
गामा पैलवान Tue, 08/02/2016 - 09:39 नवीन
चंपाबाई, पप्पू चावलाय का तुम्हाला? काय उघड करावं आणि काय झाकून ठेवावं एव्हढंही तुम्हाला कळंत नाही! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
अ
अमितदादा Tue, 08/02/2016 - 10:16 नवीन
हा हा. गामाजी हेच मी सांगत होतो की चांगली वैयक्तिक गोष्ट उघड केली तर कुणाला बोचनार नाही हीच जर वाईट गोष्ट असेल तर लोकांना बोचनारच एव्हडा कॉमन सेन्स आमिर ला हवा होता. चंपाबाई आमिर का चुकीचा वाटतो याची खालील करणे 1. ह्या देशात दंगलीत मेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना, आतंकी हल्ल्यात मेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना तसेच इतर अन्यायग्रस्त लोकांना हा देश सोडून जावं वाटत नाही, ते कायद्यावर विश्वास ठेवून जगातयात आणि लडतायत. आणि मग ह्या खाविंदांच्या केसाला हि धक्का लागला नाही आणि भविष्यात लागणार हि नाही त्यांनी देश सोडून जायची भाषा का करायची। हे अमीर ने बायकोला समजून सांगाय हवे होते किंवा नंतर मीडिया पुढे सांगाय हवे होते. हे चुकल. 2. आमिर चे हि ह्या देशावर प्रेम आहे आणि त्याला सुपरस्टार ह्याच देशाने केला आहे तेंव्हा टोकाची भूमिका घेऊन देश सोडून जावे ह्या बायकोच्या वाक्याला प्रतिवाद न करणे हे चुकीचेच. चंपाबाई तुम्हाला ह्या विषयावर प्रतिवाद करत बसणार नाही कारण ना त्यानं तुमचं मत बदलणार आहे ना माझं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अमितदादा Tue, 08/02/2016 - 10:16 नवीन
हा हा. गामाजी हेच मी सांगत होतो की चांगली वैयक्तिक गोष्ट उघड केली तर कुणाला बोचनार नाही हीच जर वाईट गोष्ट असेल तर लोकांना बोचनारच एव्हडा कॉमन सेन्स आमिर ला हवा होता. चंपाबाई आमिर का चुकीचा वाटतो याची खालील करणे 1. ह्या देशात दंगलीत मेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना, आतंकी हल्ल्यात मेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना तसेच इतर अन्यायग्रस्त लोकांना हा देश सोडून जावं वाटत नाही, ते कायद्यावर विश्वास ठेवून जगातयात आणि लडतायत. आणि मग ह्या खाविंदांच्या केसाला हि धक्का लागला नाही आणि भविष्यात लागणार हि नाही त्यांनी देश सोडून जायची भाषा का करायची। हे अमीर ने बायकोला समजून सांगाय हवे होते किंवा नंतर मीडिया पुढे सांगाय हवे होते. हे चुकल. 2. आमिर चे हि ह्या देशावर प्रेम आहे आणि त्याला सुपरस्टार ह्याच देशाने केला आहे तेंव्हा टोकाची भूमिका घेऊन देश सोडून जावे ह्या बायकोच्या वाक्याला प्रतिवाद न करणे हे चुकीचेच. चंपाबाई तुम्हाला ह्या विषयावर प्रतिवाद करत बसणार नाही कारण ना त्यानं तुमचं मत बदलणार आहे ना माझं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चंपाबाई Tue, 08/02/2016 - 15:44 नवीन
टिर्रीकरानी शेपूट घातले. आता बोलतात की मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं. गुर्जींच्या स्टुडंटचं अजुन नावच नाय ठरलं तर ते कसला धडा शिकवणार यावर आपण का काथ्याकूट करायचा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
म
मुक्त विहारि Tue, 08/02/2016 - 17:14 नवीन
हे टिर्रीकर कोण? ह्या आडनावाचे गृहस्थ काय करतात? अर्थात, वरील प्रतिसाद "चंपाबाई" ह्यांनाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Tue, 08/02/2016 - 19:25 नवीन
ती कविता आठवली. आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. ..... टिर्री काय अन पर्री काय .... नावात काय आहे ? लोकं नाव न घेताच धडा शिकवतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 08/03/2016 - 07:40 नवीन
आम्हाला आडनांव कळले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Fri, 08/05/2016 - 04:32 नवीन
http://newsd.in/tag/sleeping/ पर्रीकर संसदेत झोपले. वा ! संरक्षणमंत्री !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा