Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - १

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 07/14/2016 - 16:56
🗣 388 प्रतिसाद
मिसळपाव या संकेतस्थळावर आजपर्यंत राजकारण व आजूबाजूला होणार्‍या रोजच्या स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर अनेक धागे निघाले. राजकारणासंबंधी धागे बहुतेक वेळा एका विशिष्ट निवडणुकीच्या निमित्ताने निघाले होते. आजूबाजूला होणार्‍या घडामोडींवरील धागे एखाद्या विशिष्ट घटनेच्या निमित्त निघालेले होते. परंतु रोज होणार्‍या ताज्या घडामोडींसंदर्भात एकही धागा नाही. त्यासाठी 'ताज्या घडामोडी - १' हा धागा सुरु करीत आहे. या धाग्यात अंदाजे ३०० प्रतिसाद झाल्यावर पुढील धागा 'ताज्या घडामोडी - २' सुरू करता येईल.
वर्गीकरण
राजकारण
बातम्या
घडामोडी

प्रतिक्रिया द्या
77242 वाचन

💬 प्रतिसाद (388)
अ
अनुप ढेरे Wed, 08/03/2016 - 15:05 नवीन
नकाच करू, फक्त सगळ्यांकडे बघा. आपणच म्हणतो कि मोदी आल्यापासून हिंदू एक्सट्रीमीसम वाढला. योगी, भोगी यांची बडबड वाढली. तसेच हेदेखील. पण मोदी येण्याआधीपासून चालू असलेला धार्मिक हिंसाचार का दिसू नये तुम्हाला. तेव्हा दहशतवादाला धर्म एक नसतो? एक्सट्रॅमिस्ट फक्त हिंदूच असतो का?
धार्मिक हिंसाचार चालू आहे हे तरी मान्य केलत हे थोडकं नाही. आधी चालू होता हिंसाचार म्हणून आता बोलायचं नाही हे काय लॉजिक आहे? का दर वेळेला बोलताना इंझमाम जशी सुरुवात करायचा ''बिस्मिल्ला उल रहमान रहीम, बॉयज प्लेड वेल" तसं "धार्मिक हिंसाचार अरबस्तानात चालू आहे, काँग्रेच्या राज्यात होता, आज गौरक्षकांनी उच्छाद मांडलेला आहे" असं बोलायचं? जे चूक आहे त्याला चूक न म्हणता आधीही हे होतं म आता चूक म्हणू नका ही कसली आर्ग्युमेंट?
मी हे बुर्हाण वाणी समर्थक लोकांवर पेलेट गनच्या वापराबद्दल पुरोगामी जे बोलतात, त्या संदर्भात बोललो.
अजिबात नाही. वरील चर्चेत वाणीचं नाव कोणी घेतलं? वाणी निर्दोष बिचारा आहे हे कोण म्हणालं? विषय नसताना उगाच सैनिकांची नावं घेऊन आपला भांडखोर/घातक अजेंडा पुढे करणं याला काय म्हणायचं? हे सैनिकांच्या नावावर आपली पोळी भाजणं आहे. एकदा सैनिक हा शब्द पुढे केला की भावनिक मुद्दा सुरू करून लॉजिकल चर्चा होणार नाही हे बघायचं हाच अजेंडा असतो यामागे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोलबोलेरो
स
संदीप डांगे Tue, 08/02/2016 - 19:14 नवीन
गपै, ते हिंदूंच्याच बाबतीत "बेंबीच्या देठापासून किंचाळणारे" तुम्हाला सापडलेत का?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 08/02/2016 - 23:18 नवीन
हो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
च
चंपाबाई Wed, 08/03/2016 - 09:16 नवीन
भाजप गुजरातेत लोकप्रियता गमवत आहे... आजचा पेपर
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 08/03/2016 - 09:28 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Fri, 08/05/2016 - 00:57 नवीन
म्हणतातच ना कि एक चित्र / फोटो निशब्द अस्तो पण एक पुर्ण कहाणि सांगुन जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 09/02/2016 - 18:22 नवीन
गोळ्या घालून ठार करायला हवी ही कीड!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 09/02/2016 - 18:25 नवीन
सॉरी हल्लीच झालेल्या काही वैयक्तिक नुकसानासंबंधित गोष्टी आठवल्या, त्या इथे अश्या प्रकारे बाहेर पडायला नको होत्या, पण काय करणार आम्हीपण माणसेच आहोत. :( :'(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
श
श्रीगुरुजी Sat, 09/03/2016 - 10:44 नवीन
काश्मीर मधील सद्यपरीस्थिती दर्शवणारा दुर्दैवी फोटो
हा फोटो तो मुलगा खेळत असताना घेतलेला फोटो आहे. तो मुलगा काही सैनिकांवर दगड मारत नाहीय्ये. असल्या फोटोला गांभीर्याने घेण्याची गरज नाही व या फोटोवरून काश्मीरमधील सद्यस्थिती दिसते वगैरे गैरसमजूत करून घ्यायची गरज नाही. या फोटोतला एक सैनिक घाबरल्याचा अभिनय करतोय तर दुसरा मागे हात बांधून निवांत उभा आहे. हाच फोटो दुसर्‍या कोनातून बघा आणि हसणारे सैनिक बघा. Image removed. अजून एक Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सुबोध खरे Sun, 09/04/2016 - 08:14 नवीन
बापूसाहेब हे खालचे दोन्ही फोटो न पाह्तासुद्धा मी एक गोष्ट विचारेन या मुलाचे वय किती असेल? ४-५ वर्षे ? अशा मुलाला संरक्षक दलांच्या जवानांवर गलोलीने दगड मारावे हे स्वतःच्या डोक्यात येईल का? मग अशा बाल्काला "कीड" म्हणावे असे तुम्हाला का वाट्ले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 09/04/2016 - 10:02 नवीन
त्या फोटो खालची दुसरी कॉमेंट वाचा, काही गोपनीय गोष्टी मी इथे बोलू शकत नाही, हे ध्यानी घेऊनही जर आपल्याला विषय ताणण्यात रस असेल तर माझा निरुपाय आहे डॉक्टर, रच्याकने, कॉमेंट क्र 2 मधील दिलगिरी आपण वाचलेली दिसत नाही, असो, हल्लीच मिळालेल्या ज्ञानामृतानुसार People believe what they want to believe :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे Sun, 09/04/2016 - 10:07 नवीन
सांगून टाका बापू, बात निकली तो दूर तक जाने दो, :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 09/04/2016 - 10:31 नवीन
नाही, त्रिवार नाही, मी एक शपथ घेतलेली आहे, ती निभवायची आहे, रिटायरमेंट पर्यंत नाही मरेपर्यंत, हे पित्त पोटात घेऊनच मी लाकडाच्या राशीवर जाणार आहे, ह्याचा ज्याला जो अर्थ काढायचा तो काढो, मी पहिले इमान माझ्या देशाला अन दुसरे माझ्या फोर्सला वाहिलेले आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुबोध खरे Sun, 09/04/2016 - 10:50 नवीन
बापूसाहेब काश्मीरची परिस्थिती किती वाईट आहे हे मलाही माहिती आहे ? माझ्या हाताखाली माझ्या बरोबर काम केलेला क्षकिरण तंत्रज्ञ याला ११ वर्षाच्या मुलीने बुरख्यातून पिस्तुल काढून गोळी मारली. तेंव्हा तेथे काम करणाऱ्या इतर सैनिकांची मनोवृत्ती काय आहे हे मी बऱ्यापैकी जाणून आहे. म्हणूनच हा प्रश्न मी उपस्थित केला. डांगे अण्णांची भाषा वापरायची असती तर चार वर्षाच्या मुलाला कीड म्हणता याचा अर्थ तुमची विचारसरणी किडकी आहे किंवा तुमचा मेन्दु सडला आहे असे म्हणालो असतो. सक्रुत दर्शनि ते बरोबर वाटते पण ते तसे नाही हे मीही जाणतो. तुम्ही माफी मागितली तरी विचारसरणी समजून येतेच अशाही टिप्पणी येतात. हे मी अनुभवलेले आहे. परंतु माझी पातळी मी सहसा खाली येऊ दिली नव्हती. आपलीही भाषा संयत आणि विनम्र होती त्यात अलिकड़े झालेला बदल काही पटला नव्हता. पटत असेल तर पहा अन्यथा सोडून द्या आणि माफ करा मज पामरासी काय थोरपण पायींची वहाण पायी बरी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
V
viraj thale Wed, 08/03/2016 - 10:01 नवीन
रायगडमध्ये मोठी दुर्घटना, सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन पूल वाहून गेला, 2 एसटी बससह छोटी वाहनं बुडाली, 22 जण बुडाल्याची भीती .
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 08/03/2016 - 10:05 नवीन
महाडजवळ सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे झालेल्या भीषण अपघाताची बातमी : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=PABBTA Image removed. पुलाची पाहणीबिह्णी करायची काही पद्धत आहे का? -गा.पै.
  • Log in or register to post comments
V
viraj thale Wed, 08/03/2016 - 10:40 नवीन
पुलाची पाहणी मे महीन्यात करण्यात आलेली होती ,त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पुल व्यवस्थित असल्याचा निर्वाळा देण्यात आला होता .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चंपाबाई Wed, 08/03/2016 - 12:34 नवीन
शेजारीच काँग्रेसकाळात बांधलेला नवा पूल आहे. जुन्या पुलाची तपासणी नव्या सरकारच्या काळात मे २०१६ ला झालीहोती व पूल वापरण्यायोग्य आहे असे सर्टिफिकेट दिले होते. तरीही मोदीभक्त लोक ६० वर्षात काँग्रेसने दुर्लक्ष केले म्हणुन पूल पडला असे कोकलत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: viraj thale
श
श्री गावसेना प्रमुख Wed, 08/03/2016 - 13:23 नवीन
चम्पा बाइ कसल्या आजाराने पिडित आहे रे तु ,नाही डोक्यावर पडल्यासारखे काय लिहितो ना तु म्हणुन चवकशी करतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
अ
अमितदादा Wed, 08/03/2016 - 10:30 नवीन
गो हत्या विधेयकच मुळात अपूर्ण आणि अर्धवट असून यात सामान्य शेतकऱ्यांचा कोणताही विचार केलेला नाही. गो पालक हे बहुसंख्य हिंदू शेतकरीच आहेत, इथं दुष्काळा मुळे शेतकऱ्यांना त्यांचा कुटुंबीयांचा सांभाळ करण मुश्किल होत असताना हि भेकड आणि म्हातारी जनावरे कुणी सांभाळायची, मग किती तरी शेतकरी आशा गाई सोडून देतात किंवा बेकायदेशीर रित्या विकून टाकतात. जालावर ह्या संदर्भात बातम्या उपलब्द आहेत, तसेच ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या लोकांना यातील वस्थूस्थिती कळू शकेल. महाराष्ट्र सरकारने गाई साठी आश्रम खोलनार म्हणून जाहीर केलेलं, कुठे आहेत आश्रम? का 2,3 आश्रम स्थापन केले की काम झालं. शेतीची किंवा पशुपालनाची काही हि जाणीव नसणाऱ्या लोकांचे हे खेळ आहेत. या गो रक्षकानी कधीही गाई च्या शेणाला किंवा मुताला हात लावला नसेल आणि जर ऐवडाच प्रेम असेल तर लोकांचे जीव घेण्यापेक्षा का नाहीत हे ग्रामीण भागात जाऊन म्हाताऱ्या गाई पाळत. म्हातारी गाई खाटीकास विकणे जरी क्रूर वाटत असले तरी त्यास पर्याय नाही आजच्या परिस्थितीत शेतकरी हेच करू शकतो, बाकी ज्यांना प्रेम असेल त्यांनी शेतकऱ्याकडून गाई घेऊन सांभाळ करावा. बर एकवेळ गाई बद्दल चे प्रेम समजू शकतो पण गो वंश बंदी कायदा कशा साठी? म्हातारे बैल यांचं काय करायचं याचा सरकार ने विचार केला नाही. मध्यंतरी आस ऐकलेलं कि फडवणीस यांनी एक गाई आणून वर्षा वर बांधली होती आणि 4 दिवस नाटक करून ती तिथून हलवली. बर गो रक्षकांना गाई ची वाहतूक दिसते पण त्या गाई खाटीकास विकणारे हिंदू शेतकरीच आहेत हे कोण लक्षात घेत नाही. सरकार आणि गो रक्षकांनी हि भेकड जनावरे पाळावीत आणि हिंदू धर्म वाचवावा हि विनंती.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 08/03/2016 - 10:37 नवीन
अमितदादा, ह्यावर बारीक चर्चा झालेली आहे इकडे, तेव्हा फ्याक्टस समोर सो कॉल्ड गौरक्षकांचं पितळ उघडं पडतं असा अनुभव आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Wed, 08/03/2016 - 10:42 नवीन
ठीक आहे मला माहित नव्हतं. धन्यवाद डांगे साहेब .मग ह्या धाग्यावर मी चर्चा थांबवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 08/03/2016 - 10:46 नवीन
चर्चा थांबवा असे सुचवायचे नव्हते हो, जेव्हा जेव्हा गौरक्षक डोके बाहेर काढतील तेव्हा तेव्हा चर्चा झालीच पाहिजे... शहरी भिडू उगाच सॉफ्ट कॉर्नर ठेऊन असतात ते बदलले पाहिजेच ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Wed, 08/03/2016 - 15:04 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अर्धवटराव Wed, 08/03/2016 - 23:26 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
स
संदीप डांगे Wed, 08/03/2016 - 10:51 नवीन
नाशिकमध्ये काल नारोशंकर मंदिराची घंटा बुडाली... बुजुर्गांच्या मते ही भयंकर पूर परिस्थिती आहे... हवामान खाते किमान २४ तासाचे तरी परफेक्ट भाकीत करू शकते असे वाचले होते, जलसंधारण आणि हवामान खात्यात समन्वय नसल्याने ही वेळ आज नाशिककरांवर आली, अन्यथा २४ तास आधीच थोडे थोडे पाणी सोडता येणे शक्य होते...
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 08/03/2016 - 15:49 नवीन
चंपाबाई, >> शेजारीच काँग्रेसकाळात बांधलेला नवा पूल आहे. हे बरोबर बोललात पहा. ब्रिटीश म्हणजेच काँग्रेस. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई गुरुवार, 08/04/2016 - 13:59 नवीन
म्हणुन तर तुम्ही लंडनात बsun ब्रिटिशांची सेवा करताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 08/04/2016 - 16:46 नवीन
चंपाबाई, अहो, तुम्हाला कितीदा सांगितलंय की मी हिंदुहितासाठी इंग्लंडमध्ये आलोय ते. सारखं कसं विसरता तुम्ही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 09/03/2016 - 08:51 नवीन
मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात हिंदू असल्याचा विलक्षण गर्व आहे, अन त्याचे कुठलेही हित व्हावे म्हणून मी तुम्हाला ठेकेदारी/मुखत्यारपत्र दिलेले नाहीये, त्यामुळे , जरा हिशेबात बोला, वैयक्तिक द्रव्यलोभाला हिंदूहित वगैरे मुलामे देण्याचे कारण नाही, अर्थात द्रव्यलोभ वाईट नसतो, किंवा चांगल्या जीवनाची आस सुद्धा वाईट नसते, फक्त ते मान्य करायचा दम लागतो, तो छपरी फॅनटीक लोकांत नसतो. सारांश :- लंब्याचवड्या फेकायच्या असल्या तर फेका, त्याच्यासाठी धर्म वेठीस धरायचे कारण नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 09/03/2016 - 21:26 नवीन
सोन्याबापु, हिशोबात बोलायचा नियम तुम्हालाही लागू पडतो ना? चंपाबाई आणि मी काय ते बघून घेऊ. तुम्ही माझ्या हेतूंची काळजी करू नये. तसंही पाहता तुम्हाला काय माहीत की मी द्रव्यलोभापायीच इथे इंग्लंडमध्ये असतो म्हणून? जी गोष्ट अस्तित्वात नाही ती का म्हणून मान्य करावी मी? हां, मी छपरी फ्यान्याटिक आहे आणि माझ्या अंगात जराही दम नाही. या बाबी मान्य करायला मला आजिबात लाज वाटंत नाही. तसंही पाहता तुमच्या मते मी निर्लज्ज आहेच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 09/04/2016 - 04:34 नवीन
तुम्ही अन ती चंपी मेलात तरी मला शष्प फरक पडत नाही, तुम्ही हिंदू धर्माचे नाव घेतले अन खास त्याच्या हिता करता वगैरे लंडनला तंबू ठोकल्याचे काहीतरी बडबडला आहात, मी त्यासंबंधी हिशेब म्हणतो आहे, तुम्हाला धर्महीतकरता पदवी मी (स्वतः एक हिंदू म्हणून) दिलेली नाही, त्या संबंधात पुन्हा एकदा सांगतोय, हिशेबात राहा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मोदक Sun, 09/04/2016 - 05:26 नवीन
बापू,कंट्रोल करा हो. कशाला असे बोलताय? वाद असेल तर प्रतिसाद देऊ नका पण असे काहितरी कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
आ
आतिवास Fri, 09/09/2016 - 07:01 नवीन
सोन्याबापू, हल्ली तुमचे अनेक प्रतिसाद पाहता चिंता वाटते. काळजी घ्या. वैयक्तिक झाले आहे मी, असं वाटल्यास कृपया माफ करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 09/09/2016 - 08:54 नवीन
@मोदक अँड सविता ताई, बरोबर आहे तुमचे! जरा संयम परत मिळवायला हवाय खरा. :/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
ग
गामा पैलवान Sun, 09/04/2016 - 08:23 नवीन
सोन्याबापु, १. >> तुम्ही अन ती चंपी मेलात तरी मला शष्प फरक पडत नाही, मी मेल्याने तुम्हाला फरक पडणार नसेल तर मला हिशेबात ठेवण्याविषयी आपण इतके आग्रही का? २. >> तुम्ही हिंदू धर्माचे नाव घेतले अन खास त्याच्या हिता करता वगैरे लंडनला तंबू ठोकल्याचे काहीतरी >> बडबडला आहात, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की मी हिंदूधर्माचं नाव कुठेही घेतलं नाहीये. धर्मरक्षण हा पार वेगळा प्रांत आहे. हिंदू धर्म आणि हिंदू लोकं या माझ्या दृष्टीने दोन वेगळ्या बाबी आहेत. तुम्ही ज्याला भारतीय म्हणता त्यास मी हिंदू म्हणतो. शिवाय, जरी इंग्लंडमध्ये तंबू ठोकून बसण्यामागे हिंदूधर्महित गृहीत धरलं तरी त्यात गैर ते काय? ३. >> तुम्हाला धर्महीतकरता पदवी मी (स्वतः एक हिंदू म्हणून) दिलेली नाही, त्या संबंधात पुन्हा एकदा सांगतोय, >> हिशेबात राहा!! न मागितलेली पदवी न दिल्याबद्दल आपले नाभार! असंच हिशोबात रहायचं असतं का हो? म्हंजे, ही हिशोबाची भानगड तुम्ही सुरू केलीये. म्हणून तुम्हालाच विचारून घेतोय. बाकी, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की मी स्वयंघोषित धर्ममार्तंड आहे. असो. एकंदरीत तुमच्या प्रतिमाचौकटीत मी बसत नसल्याने तुमची चिडचिड झालेली दिसते आहे. नागरी आणि सैनिकी चौकटी वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. उर्वरित अर्थ जाणून घेण्यास तुम्ही समर्थ आहात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ग
गामा पैलवान Wed, 08/03/2016 - 15:56 नवीन
अनुप ढेरे, १. >> गौ रक्षक दिसत नाहीत काय? उना येथे दलितांना झालेल्या मारहाणीचा गोरक्षणाशी काडीमात्र संबंध नाही. २. >> बीफच्या संशयावरून ठेचून मारणारे माहिती नाहीत काय? हे हिंदू एक्ष्ट्रिमिस्ट नाहीत तर कोण आहेत? अखलाखची हत्या बीफवरून झालेली नाही. त्याने राहुल नावाच्या युवकावर प्राणघातक आक्रमण केलं होतं. त्याचा बदला म्हणून अखलाख अल्लास प्यारा करण्यात आला. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Wed, 08/03/2016 - 16:38 नवीन
मग केस बीफ बाबत का आहे ? राहूल हल्ल्याबाबत एफ आय आर वगैरे आहेत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 08/03/2016 - 23:00 नवीन
चंपाबाई, कोण म्हणतो केस बीफबद्दल आहे? जो म्हणतो त्यालाच जाऊन विचारा. उ.प्र. पोलिसांच्या मते बीफची केस कधीच नव्हती. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई गुरुवार, 08/04/2016 - 02:13 नवीन
बीफची केस नव्हती तर घरातले अन्न चेकिंगला का दिले ? एकदा बीफ नाही व एकदा बीफ आहे , असे दोन भिन्न रिपोर्ट का आलेत ? राहुलला धमकी दिली त्याची पोलिस केस आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 08/04/2016 - 09:50 नवीन
चंपाबाई, राहुल यादवचं वासरू हरवलं होतं. ते अखलकने चोरून कापलं या संशयावरून दोघांची वादावादी झाली. त्यात अखलकने राहुलवर प्राणघातक आक्रमण केलं. म्हणून जमावाने अखलकला जन्नतवासी केलं. बीफचा संबंध आलाच कुठे? अगदी पोलिसांनी अन्नाची चाचणी घेऊन ते बीफ असल्याचं प्रमाणपत्र दिलं, तरीही या केसचा बीफशी संबंध नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
ब
बोलबोलेरो गुरुवार, 08/04/2016 - 07:18 नवीन
जे चूक आहे त्याला चूक न म्हणता आधीही हे होतं म आता चूक म्हणू नका ही कसली आर्ग्युमेंट?
चुकीला चूक म्हणायला कोणाची परवानगी नको. पण, चुका फक्त बहू संख्याकांच्या शोधून काढून साप म्हणून भुई धोपटायचा प्रकार जो चालू आहे, तो मान्य होणार नाहीच. एखाद्या मूर्खाची बाष्कळ बडबड, आणि एखाद्या हत्यारबंद माणसाने नियोतीपणे केलेली हिंसा यात फरक आहे. भाजपचे वाचाळवीर जसे आहेत, तसेच इतरही अनेक आहेत, प्रतेय्क पक्षात आहेत. परंतु , देशाविरुद्ध सशस्त्र युद्ध पुकारणारे कोण आहेत हे आपण जाणतोच. वर मी विचारले कि पुरोगामी, दहशतवादासाठी सामाजिक मागासलेपणाचे कारण देताना, त्यात सामाजिक पुढारलेले लोकही सापडू लागल्यानंतर, 'आमचा अभ्यास कमी पडला, यामागे काही वेगळे कारण आहे', अशी प्रांजळ कबुली का देताना दिसत नाहीत? त्यावर कोणीही बोलले नाही. असो. ताजे उदाहरण घ्यावे, तृप्ती देसाई बाईंनी 5-6 देवळात हवेतसे वागून घेतले, प्रवेश मिळाला, कायदा झाला. पण तृप्ती देसाईंचा आवेश, आणि त्यावर चालणारी पुरोगामी समर्थने हाजीअलीशी मुद्दा अडकलयनंतर बंद पडली, हा केवळ योगायोग मानावा काय? अजून एक, चर्चा चालू असताना, कोण बोलते आहे यावर घसरून गौरक्षक, समर्थक वैगेरे व्यक्तिगत पातळीवर विशेषणे लावून हल्ले करण्याची गरज नाही. मुद्द्यावर आधारित चर्चा होउ शकते, जर विचारलेल्या शंकांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला तर. परंतु, रिवाजाप्रमाणे कोणीही मला पडलेल्या पुरोगामी प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत. असो.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 08/04/2016 - 07:32 नवीन
एखाद्या मूर्खाची बाष्कळ बडबड,
गुजरातेत जे झालं, उ.प्र. मध्ये जे झालं, झारखंडात जे झालं, कर्नाटकात जे झालं ही केवळ बाष्कळ बडबड नाही. प्रत्यक्ष, टीमने, केलेली हिंसा आहे.
रिवाजाप्रमाणे कोणीही मला पडलेल्या पुरोगामी प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत. असो.
तुम्हाला केवळ 'त्यांना का नाही सांगत' हाच प्रश्न पडलाय. पण मुद्दा तो नाहीच. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोलबोलेरो
श
श्रीगुरुजी गुरुवार, 08/04/2016 - 09:11 नवीन
ताजे उदाहरण घ्यावे, तृप्ती देसाई बाईंनी 5-6 देवळात हवेतसे वागून घेतले, प्रवेश मिळाला, कायदा झाला. पण तृप्ती देसाईंचा आवेश, आणि त्यावर चालणारी पुरोगामी समर्थने हाजीअलीशी मुद्दा अडकलयनंतर बंद पडली, हा केवळ योगायोग मानावा काय?
फेब्रुवारी २०१७ मध्ये पुणे महापालिकेची निवडणुक आहे. तृप्ती बाईंनी २०१२ ची निवडणुक काँग्रेसच्या तिकिटावर लढविली होती. आता २०१७ मध्ये पुन्हा संधी आहे. याच तृप्ती बाईंनी ५-६ दिवसांपूर्वी एका तरूणाला भर चौकात चपलेने मारहाण केली होती. http://www.loksatta.com/pune-news/youth-beaten-up-by-trupti-desai-1274545/ या प्रकरणात या वकील बाईंनी स्वतःच्या हातात कायदा घेऊन मारहाण केली असली तरी ही सेक्युलर व पुरोगामी मारहाण असल्याने याचा माध्यमातून फारसा गवगवा झाला नाही. हीच मारहाण एखाद्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्याने केली असती तर एव्हाना सर्व वाहिन्यांवरून यावर जोरदार चर्चासत्रे होऊन त्यात भारतातील हिंदुत्ववाद्यांच्या वाढत्या फॅसिझमबद्दल, कायदा हातात घेण्याच्या प्रवॄत्तीबद्दल व असहिष्णुतेबद्दल निधर्मांधांनी गंभीर चिंता व्यक्त केली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोलबोलेरो
ब
बोलबोलेरो गुरुवार, 08/04/2016 - 10:40 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चंपाबाई गुरुवार, 08/04/2016 - 13:34 नवीन
तुमचे हिंदुत्ववादी लोक निष्पाप घोड्यालाही ठार मारतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 08/04/2016 - 10:56 नवीन
गुजरातमध्ये पटेल व इतर उच्चवर्णियांना आर्थिक आधारावर राखीव जागा देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. यापूर्वी जाट, मराठा, मुस्लिम इ. घटकांना राखीव जागा देण्याचे वेगवेगळ्या राज्यांचे निर्णय देखील स्थानिक उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. राखीव जागांसाठी हिंसक आंदोलन करून फक्त मालमत्तेची नासधूस होते व त्यात काही जणांचे प्राण जातात व एवढे करून राखीव जागा मिळत नाहीत हे अनेकवेळा दिसून आले आहे. तरी सुद्धा निव्वळ राजकीय स्वार्थासाठी समाजाला वेठीस धरून दंगली करूस, नासधूस करून समाजात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न थांबतील असे वाटत नाही. गुजरातमधील उच्चवर्णियांचे आरक्षण रद्द
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 08/04/2016 - 13:55 नवीन
कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, स्वामी नित्यानंद यांच्यावर टाकलेला बलात्काराचा गुन्हा खोटा असल्याचा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. बातमी : http://dainiksanatanprabhat.blogspot.co.uk/2016/08/blog-post_638.html -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 08/04/2016 - 16:58 नवीन
सनातन प्रभातच्या प्रचारकी वृत्तावर विश्वास ठेवणे शक्य नाही. हीच बातमी इतर माध्यमातून (इंडियन एक्स्प्रेस, द हिंदू, टाइम्स ऑफ इंडिया, मटा, लोकसत्ता, सकाळ, वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या इ.) आली असेल तर त्याचा संदर्भ द्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 08/04/2016 - 21:11 नवीन
श्रीगुरुजी, बातमी खरी की खोटी हे बघायचं का वृत्तपत्राची भूमिका बघायची? त्यातूनही तुम्ही सनातन प्रभातमधली बातमी वाचली असेल तर तिच्यात लिहिलंय की इतर वृत्तपत्रांनी ही बातमी दाबून ठेवली आहे. विश्वासार्हता नामक काही चीज अस्तित्वात आहे का नाही? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा