Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - १

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 07/14/2016 - 16:56
🗣 388 प्रतिसाद
मिसळपाव या संकेतस्थळावर आजपर्यंत राजकारण व आजूबाजूला होणार्‍या रोजच्या स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर अनेक धागे निघाले. राजकारणासंबंधी धागे बहुतेक वेळा एका विशिष्ट निवडणुकीच्या निमित्ताने निघाले होते. आजूबाजूला होणार्‍या घडामोडींवरील धागे एखाद्या विशिष्ट घटनेच्या निमित्त निघालेले होते. परंतु रोज होणार्‍या ताज्या घडामोडींसंदर्भात एकही धागा नाही. त्यासाठी 'ताज्या घडामोडी - १' हा धागा सुरु करीत आहे. या धाग्यात अंदाजे ३०० प्रतिसाद झाल्यावर पुढील धागा 'ताज्या घडामोडी - २' सुरू करता येईल.
वर्गीकरण
राजकारण
बातम्या
घडामोडी

प्रतिक्रिया द्या
77242 वाचन

💬 प्रतिसाद (388)
श
श्रीगुरुजी Fri, 08/05/2016 - 11:22 नवीन
एखादी घटना घडल्यानंतर दोन गोष्टी घडतात. घडलेली घटना वेगवेगळ्या माध्यमात छापून येते. छापलेल्या बातमीत बातमी लिहिणार्‍याने आपल्या विचारसरणीनुसार मालमसाला टाकलेला असतो. उदा. ९/११ घडल्यानंतर ती घटना बातमी म्हणून छापून आली व त्याचबरोबर त्या घटनेमागे कोण असावे याचे आकलन विविध माध्यमांनी आपापल्या विचारसरणीनुसार केले होते. काही जणांना त्यात लादेनचा हात दिसला, काही जणांना या घटनेसाठी अमेरिकाच जबाबदार वाटली, काही जणांना स्थानिक लोकांचा हात दिसला, काही जणांना त्यात इस्राएल चा हात दिसला. परंतु घटना घडली हे कोणीच नाकारले नाही वा लपविले नाही. नित्यानंद जर खरोखरच बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटला असेल तर ही घटना बातमी या स्वरूपात कोठे ना कोठे तरी यायला हवी होती. ही बातमी फक्त सनातन प्रभातच्याच ब्लॉगवर आहे. इतरत्र कोठेही ही बातमी आढळत नाही. इतकी मोठी बातमी यच्चयावत सर्व माध्यमांनी लपवून ठेवली व फक्त सनातन प्रभातकडेच ही बातमी आहे या दाव्यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. काही महिन्यांपूर्वी कोणीतरी आपल्या प्रतिसादात असे लिहिले होते की दिल्लीतल्या गोयल नावाच्या एका शिवसेनेच्या माणसाने एम एफ हुसेनचे हातपाय तोडण्याची जाहीर धमकी दिली होती. प्रतिसादात बातमीची कोणतीही लिंक दिली नव्हती. अनेकवेळा लिंक मागूनसुद्धा त्यांनी लिंक द्यायची टाळाटाळ केली. गुगलवर वेगवेगळ्या पद्धतीने शोधून सुद्धा या बातमीचा संदर्भ मिळाला नाही. शेवटी त्या सदस्याने गोयलचा उल्लेख असलेली एक लिंक दिली. ते संकेतस्थळ वर्ल्ड सोशालिस्ट फोरम अशा कोणत्यातरी समाजवाद्यांच्या ग्रुपचे होते. समाजवाद्यांचे व सेनेचे हाडवैर सर्वश्रुत आहे. दिल्लीत घडलेल्या या तथाकथित घटनेची ही बातमी फक्त त्यांच्याच संकेतस्थळावर असावी व इतर कोणत्याही माध्यमातून ही बातमी दिसू नये हे आश्चर्यच होते. ती बातमी खोटीच होती. तसेच नित्यानंदच्या बाबतीतली ही बातमी सुद्धा खोटीच आहे. बातमी खरी असेल तर सनातनच्या ब्लॉगव्यतिरिक्त इतरत्र छापून आलेल्या पेजेसच्या लिंक्स द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सचु कुळकर्णी Fri, 08/05/2016 - 00:35 नवीन
काहि गोष्टी खरच आकलना पलिकडे (माझ्या) घडतायत खर. १) गोहत्ये ला कायद्याने बंदि आहे. ह्याचाच अर्थ ह्यासाठी कायदा अस्तित्वात आहे आणि आपल्याकडे कायदा सुव्यवस्थे साठी जबाबदार असणारी यंत्रणा असताना ह्या सो कॉल्ड गौरक्षानी कायदा हातात का घ्यावा ? त्यांच्याकडे जर ह्या कायद्याच कुठे उलंघन होतय अशी माहिति असेल तर ति त्यांनि पोलिसांना कळवावी. गा.पै. (आ.न.) हे म्हणतायत कि ""राहुल यादवचं वासरू हरवलं होतं. ते अखलकने चोरून कापलं या संशयावरून दोघांची वादावादी झाली. त्यात अखलकने राहुलवर प्राणघातक आक्रमण केलं. म्हणून जमावाने अखलकला जन्नतवासी केलं"" माझ्या मते तरी ह्या मागे काहि तरी वेगळच धुमसत होत जे अजुनही समोर आल नाहिय, तरी पण एका वेळेस गा.पै. ह्यानी दिलेल कारण खर मानल तरी हा मामला राहुल आणि अखलाख ह्या दोघांमधला होता आणि तो कायदेशिर रित्या सुटु शकत होता. पण ह्या जमावाला एका व्यक्ति चे प्राण हिरावुन घेण्याचा अधिकार कोणि दिला? २)उना गुजरात येथे झालेलि अमानुष मारहाण. इथे तर गोहत्ये चा प्रश्नच नव्हता. नैसर्गिक रित्या मृत्यु पावलेल्या जनावरांपासुन कातड कमावुन हे लोक गुजराण करतात. ३) उत्तर प्रदेश गँगरेप आणि सुविद्य पुढार्‍यांच्या राजकिय प्रतिक्रिया ''बलात्कार'' हा एकच शब्द किळ्सवाण्या अत्याचाराचि मोठि आणि बोलकी परिभाषा कॅरी करतो. बोलकि ह्यासाठि म्हणालो कि हा शब्द उच्चारताच जे दृष्य डोळ्यासमोर येत त्याने कुठल्याहि संवेदनाक्षम व्यक्तिच्या अंगावर काटा उभा राहिल. इथे एक परिवार जगावे का पुर्ण कुटुंबाने आत्महत्या करावी ह्या विवंचनेत असताना तिन पैसल्ड्याचिहि अक्कल नसलेल्या आझम खान ह्या कॅबिनेट दर्जा च्या मंत्र्याला ह्या मागे राजकिय कारस्थान असल्याचा दृष्टांत झाला. उत्तर प्रदेशात निवडणुका असल्या मुळे सगळ्याच राजकिय पक्षाच्या भांडानी पिडित कुटंबाला भेटायची चढाओढ लावलिय. हरकत नाही त्यांनि जरुर भेटाव पिडित व्यक्ति ला धिर द्यावा पण त्याबरोबरच त्यांना न्याय सुद्धा मिळवुन द्यावा आणि तो हि लवकर. पण नाही हे फक्त भेट द्यायला, न्युज चॅनेल च्या कॅमेरासमोर येवुन आम्हिच कसे धुतल्या तांदळासारखे आहोत हे सांगायलाच येतात नंतर विसरतात. आज किति राजकिय पक्षाच्या नेत्यांना रोहित वेमुला किंवा जंतर-मंतर येथे फाशी घेतलेला (कि गेलेला) शेतकरी आठवत असेल. इथे तर राज्याचे मुख्यमंत्रिच आज बोलले " परिवार को अगर सि.बि.आय. से ईनक्वायरी चाहिये तो मै तय्यार हु" " उन्हे अगर किसि भि प्रकार कि मदत चाहिये तो मै तय्यार हु'' चाहिये तो म्हणजे काय बॉस त्यांचा अधिकार आणि मुख्यमंत्री म्हणुन तुमचे ते कर्तव्य आहे असे नाहि वाटत. ३) महाड पुल दुर्घटना आणि असंवेदनशिल पालकमंत्रि ईश्वर मृतात्म्यांना शांति देवो......... आणि सत्त्ताधार्‍याना एकमेकावंर कुरघोडी करण्यापेक्षा अशी दुर्दैवि घटना ह्यापुढे कशी टाळता येईल ह्याचि सुबुद्धि देवो... खरेतर हि दुर्दैवि नाहि तर मानविय चुकि मुळे घडलेला अपघात आहे. ह्या पुलाला १०० वर्षे कसे झाले होते, त्यात झाडे उगवुन फटी कशा पडल्या होत्या, त्याला फीट असल्याचे सर्टीफिकेट कसे मिळाले ब्ला ब्ला ब्ला ह्या चर्चा न्युज चॅनेल वर काहि दिवस होतिल आणि नंतर सरकार आणि जनता हे विसरुन जाईल कि महाड सारखे कितितरी पुल आजहि महाराष्ट्रात वापरात आहेत आणि त्यामुळे कितितरी जिव अजुनहि धोक्यात आहेत. त्यातल्या त्यात रायगड चे पालकमंत्रि असलेल्या प्रकाश मेहता हे आज सकाळपर्यंत अनरिचेबल होते, नंतर मुख्यमंत्रि घटनास्थळी पत्रकारांशि बोलत असतांना हे सेल्फि काढ्ण्यात मग्न होते त्यानंर ह्यांचि माजोरडी प्रतिक्रिया बरेच काहि सांगुन गेलि. ४)बुर्‍हान वाणि सारख्या आतंकवाद्याचा खात्मा आणि काश्मिर च्या मुख्यमंत्र्यांचि राजकिय लाचारी बुर्‍हान वाणि सारख्या खतरनाक आतंकवाद्याचा खात्मा आप्ल्या सुरक्षा बलांनी केला, त्यानंतर पाक समर्थित नंगा नाच तिथल्या काहि तरुणांनि करत पुर्ण राज्याला अजुनहि वेठिस धरले आहे. पण राजकिय नेत्यांनि सैन्याचे मनोधैर्य खच्चि करत पहिले तर म्हटले कि सैन्याने बुर्‍हान वाणि ला जिवंत पकडायचे होते आणि आज तर कहरच केलाय बुर्‍हान वाणि ला मारल्या बद्दल खुद्द मेहबुबा मुफ्ति ह्यानि पोलिसांना म्हटल्य कि त्यानि माफि मागावि.
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Fri, 08/05/2016 - 00:54 नवीन
एखाद्या पक्षाचा, नेत्याचा किंवा विचारधारेचा फॉलोअर असणे समजु शकतो पण हे फॉलो करताना इतके थराला जाण कि आपण कशाचे समर्थन करतोय ह्याचे सुद्धा भान न ठेवणे म्हणजे तर मग अंधभक्ति झालि. मग ते झाकिर नाईक असो कि सनातन ह्याचे बोलके उदाहरण म्हणजे वर आलेलि एक अशिच प्रतिक्रिया कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, स्वामी नित्यानंद यांच्यावर टाकलेला बलात्काराचा गुन्हा खोटा असल्याचा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. गा.पै. ह्या भामट्या स्वामिच्या किति क्लिप दाखवु तुम्हाला ते हि एका फेमस दाक्षिणात्य नटिबरोबर न बघणेबल अवस्थेतल्या ? मलातरी असे वाटतेय कि पुर्वि राजकिय ध्रुविकरण व्हायचे पण आता त्याचे रुप / जागा सामजिक, जातिय ध्रुविकरणाने घेतलिय आणि ते प्रचंड स्पिड ने एका महाचुंबकिय शक्ति प्रमाणे घडतय.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 08/05/2016 - 04:37 नवीन
सच्चु भाई, दिल जित्ता तुस्सी, दोन्ही प्रतिसाद आवडेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
द
दिगोचि Fri, 08/05/2016 - 05:57 नवीन
एके४७ हे विपश्शना करायला गेल्यामुळे सनसनाटी बातम्या ऐकायला मिळत नाहीत. ते असते तर त्यानी आणखी कोण त्यान्ना मारायला टपले आहे ते समजले असते. विपश्शनेमुळे त्याना जास्त ताकद मिळो ही प्रार्थना.
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Fri, 08/05/2016 - 08:52 नवीन
राष्ट्रभाभी नीता अंबानी ऑलिपिंक समितीच्या सदस्यपदी. ( पिंक पिंक वाचून वाचून ऑलिपिंक असे टाइप झाले)
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 08/05/2016 - 09:25 नवीन
चंपाबाई, हे खरोखरंच हास्यास्पद आणि म्हणूनच दयनीय आहे. दुसरं कोणी सापडलं नाही का! तुम्हाला (चक्क) अनुमोदन! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
ग
गामा पैलवान Fri, 08/05/2016 - 09:23 नवीन
सचु कुळकर्णी,
>> गा.पै. ह्या भामट्या स्वामिच्या किति क्लिप दाखवु तुम्हाला ते हि एका फेमस दाक्षिणात्य नटिबरोबर न >> बघणेबल अवस्थेतल्या ?
त्याची आजिबात गरज नाही. कारणे सांगतो : १. तुम्ही जी दाखवू पहाताहत ती चलचित्रे खरी कशावरून? २. जरी खरी म्हणून गृहीत धरली तरी त्यास गुन्हा म्हणंत नाहीत. त्यास सहमतीचा संभोग अशी संज्ञा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Sat, 08/06/2016 - 13:52 नवीन
सहमतीचा संभोग ! वाचून आनंदाने चरमसीमा गाठली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 08/05/2016 - 14:14 नवीन
सचु कुळकर्णी,
>> पण ह्या जमावाला एका व्यक्ति चे प्राण हिरावुन घेण्याचा अधिकार कोणि दिला?
अखलकने राहुलवर प्राणघातक आक्रमण केलं हे विसरलांत तुम्ही. तो राहुल तिथे रुग्णालयात मरायला टेकलाय आणि अखलक कायदा धाब्यावर बसवून राजरोसपणे मोकळा फिरतोय. पोलीस तर दखल घ्यायलाही तयार नाहीत. मग काय करायचं हिंदूंनी? आरत्या ओवाळायच्या अखलकभोवती? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Sat, 08/06/2016 - 00:19 नवीन
गा.पै. मग काय करायचं हिंदूंनी? अहो इथे धर्माचा प्रश्न येतोच आहे कुठे ? असो आय रेस्ट माय केस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 08/06/2016 - 07:28 नवीन
सचु कुळकर्णी, बरोबरे तुमचं. ज्याप्रमाणे इथे बीफ्चा संबंध नाही, त्याप्रमाणे इथे धर्माचाही संबंध नाही. वृत्तपत्रे उगीच बोंबलताहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
च
चंपाबाई Sat, 08/06/2016 - 13:48 नवीन
अखलाक राहूल केसबद्दल कुठेच काही संदर्भ नाहीत. तुम्हाला कसे कळले ? राहुलच्या इंजुरीज , डॉक्टरची साक्ष , एफ आय आर .... कायदेशीर मार्गाने जाणे इतके अवघड होते का ? की जमाव घेउन ते आर्मीचे लोक त्वरीत न्यायनिवाडा करतात , त्याच मार्गाने जायचे होते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
क
कपिलमुनी Fri, 08/05/2016 - 19:39 नवीन
केजरीवाल सरकारने दिल्ली मधे आमदारांचे पगार वाढवल्यावर रडणारे लोक महाराष्ट्रामधे आमदार , मंत्र्यांचा पगार पेंशंन वाढून सुद्धा मूग गिळून आहेत. दुटप्पीपणाचा कहर आहे
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Fri, 08/05/2016 - 20:12 नवीन
आमदार खासदार यांचे पगार तसेच निवृत्ती वेतन वाढवायची गरजच आहे. त्याना त्यांच्या वर्तमानातील आणि भविष्यातील खर्चाची तरतूद नाही केली तर प्रामाणिक लोक राजकारणात येणार नाहीत आणि आले तर ते प्रामाणिक राहणार नाहीत. त्यात आक्षेप घेण्यासाठी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
च
चंपाबाई Sat, 08/06/2016 - 03:42 नवीन
डॉक्टर सिस्टर यांचे पगार तसेच निवृत्ती वेतन वाढवायची गरजच आहे. त्याना त्यांच्या वर्तमानातील आणि भविष्यातील खर्चाची तरतूद नाही केली तर प्रामाणिक लोक सरकारी वैद्यकीय सेवेत येणार नाहीत आणि आले तर ते प्रामाणिक राहणार नाहीत. त्यात आक्षेप घेण्यासाठी काही नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Fri, 08/05/2016 - 20:49 नवीन
इंडस (सिंधू ) खोरे पाणी करार संदर्भात चांगले विश्लेषण आजच्या बातमी मध्ये http://www.thehindu.com/opinion/op-ed/brahma-chellaney-on-indus-treaty-securing-the-indus-treaty/article8943790.ece?homepage=true 1960 साली झालेल्या करारानुसार भारतातून पाकिस्तान मध्ये वाहणाऱ्या नद्यांपैकी बियास, रवी आणि सतलज ह्या नद्या वरती भारतास कंट्रोल भेटले तर इंडस, चिनाब, झेलम ह्या नद्या वरती पाकिस्तान ला कंट्रोल भेटले. पाकिस्तान ला कंट्रोल भेटलेल्या सगळ्या नद्या ह्या जम्मू आणि काश्मीर मधून वाहतात, त्यामुळे काश्मीर हा जमिनीबरोबर पाण्याचा हि प्रश्न आहे. भारत ह्या नद्यावरती run-of-the-river projects बांधू शकतो आणि ते आपण करत आहोत. पण पाकिस्तान ला सतत भीती आहे की ह्या प्रोजेक्ट च्या साह्याने आपले पाणी अडवू शकतो त्यामुळं सतत भारताच्या प्रोजेक्ट ना पाकिस्तान चा आक्षेप राहिला आहे. आणखी माहिती खालील लिंक वर http://thediplomat.com/2016/06/kashmir-a-water-war-in-the-making/
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 08/05/2016 - 23:00 नवीन
श्रीगुरुजी, >> तसेच नित्यानंदच्या बाबतीतली ही बातमी सुद्धा खोटीच आहे. इथे एक प्रतिज्ञापत्र आहे : http://www.dhyanapeetam.org/news/fbi-academy-infectious-disease-expert-says-rape-charge-sri-nithyananda-swami-false-and-not या प्रतिज्ञापत्राच्या आधारे अमेरिकी एफबीआय ने नित्यानंदांवरील आरोप साफ फेटाळून लावले आहेत. उपरोक्त दुवा नित्यानंदांच्या आश्रमाचा आहे. तुमची सनातन प्रभातशी कसली दुष्मनी आहे ते माहीत नाही. पण ते लोकं मुद्दाम खोट्या बातम्या छापणार नाहीत हे नक्की. वरील बातम्यांना दुजोरा देणारी एक बातमी इथे आहे : http://hinduismnow.org/blog/2016/07/22/false-case-against-nithyanandas-one-step-away-from-being-dismissed/ हे सुद्धा हिंदुत्ववादी संकेतस्थळच आहे. हिंदूंच्या निरपराधित्वाच्या बातम्या हिंदुद्वेष्ट्या ठिकाणी शोधणे व्यर्थ आहे हे आपणांस पटेल अशी आशा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 08/06/2016 - 04:38 नवीन
>>> दुवा नित्यानंदांच्या आश्रमाचा आहे. >>> हे सुद्धा हिंदुत्ववादी संकेतस्थळच आहे. या बाबतीत अजून काही बोलण्याची गरज आहे का? >>> हिंदूंच्या निरपराधित्वाच्या बातम्या हिंदुद्वेष्ट्या ठिकाणी शोधणे व्यर्थ आहे. असं काही नाही. पणजी स्फोटात मुद्दाम अडकविलेल्या सनातनच्या साधकांची न्यायालयाने निर्दोष सुटका केल्याची बातमी सर्वत्र प्रसिद्ध झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Sat, 08/06/2016 - 11:38 नवीन
तुमची सनातन प्रभातशी कसली दुष्मनी आहे ते माहीत नाही.
सनातनच्या मूर्खपणाची ४-५ उदाहरणे मी पूर्वीच दिलेली आहेत. सनातन, मंगलोरमधील मुतालिकची संघटना 'श्रीराम सेने' इ. संस्थांचा संघ, भाजप इ. शी अजिबात संबंध नसताना त्यांच्या मूर्खपणाच्या कृत्यामुळे संघ, भाजप इ. बदनाम होत आहेत. सनातन, श्रीराम सेने इ. संस्थांचा उल्लेख सर्रास संघपरिवारातील हिंदुत्ववादी संघटना असा उल्लेख करून हिंदुत्ववादी संघटनांना विनाकारण बदनामी सहन करावी लागत आहे. सनातनमधील वर्तक, पुनाळेकर यांच्या मूर्खपणाच्या कृत्यांमुळे सनाततच्या साधकांवर संशयाचे जाळे निर्माण झाले असून त्यांच्या मागे तपाससंस्थांचा ससेमिरा लागलेला आहे. यांच्या मूर्खपणाचे बळी त्यांचेच साधक होत आहेत हे यांच्या का लक्षात येत नाही हे एक गूढच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 08/06/2016 - 18:35 नवीन
श्रीगुरुजी, >> .... त्यांच्या मूर्खपणाच्या कृत्यामुळे संघ, भाजप इ. बदनाम होत आहेत. तुम्ही बदनामीला खरोखर एव्हढे घाबरता? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 09/03/2016 - 12:18 नवीन
तुमच्यासारखा निर्लज्ज प्रत्येक मनुष्य नसतो, अन तसंही ते फक्त बीजेपी अन संघाचेच पेड कार्यकर्ते आहेत! बाकी लोकांची वकिली करणे त्यांचा कार्यभाग नव्हे =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 09/03/2016 - 21:10 नवीन
सोन्याबापु, मी निर्लज्ज असल्याचं तुमचं निरीक्षण अगदी अचूक आहे! म्हणूनच मी सदा सुखी आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
श
श्रीगुरुजी Sun, 09/04/2016 - 04:40 नवीन
>>> तसंही ते फक्त बीजेपी अन संघाचेच पेड कार्यकर्ते आहेत! अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 09/04/2016 - 05:00 नवीन
चेष्टा हो गुर्जी थोडीशी ! सॉरी जर भावना दुखावल्या असतील तर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ज
जयन्त बा शिम्पि Sat, 08/06/2016 - 00:01 नवीन
सध्या अमेरिकेत प्रेसिडेंट निवड प्रक्रिया जोरात सुरु आहे, त्या संदर्भात जाणकारांनी ह्या साईट्वर भेट देण्यास हरकत नाही. http://www.upvibes.com/22-trump-scandals-you-wont-believe/24
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Sat, 08/06/2016 - 11:33 नवीन
गुटखामंत्र्यांवर कारवाई झालीज पाहिजे.
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Sat, 08/06/2016 - 19:15 नवीन
आज मोदींनी समाजकंटक गोरक्शकांवर सडकून टिका केली. म्हटले ८०% गोरक्शक रात्री समाज विघातक क्रूत्य करतात व दिवसा गोरक्शकाचा मुखवटा घालतात.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sun, 08/07/2016 - 01:13 नवीन
हेच लिहायला आलो होतो. निवडणुकांच्या निमित्ताने का होईना, पण या तथाकथित गोरक्षकांच्या मोकाट सुटलेल्या टोळ्यांना आवरण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मोदींचं अभिनंदन. त्यांनी योग्य पाऊल उचललेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
च
चंपाबाई Sun, 08/07/2016 - 02:49 नवीन
हा मोदींचाही मुखवटाच वाटतो. मी मारल्याचं नाटक करतो. तू रडल्याचं नाटक कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
च
चंपाबाई Sun, 08/07/2016 - 06:48 नवीन
मिड डे मील प्रोग्रॅममध्ये इस्कॉनकडुन प्रचंड भ्रष्टाचार . सहा कोटीच्या अन्नासाठी २३ कोटी घेतले. शिवाय याच कामासाठी त्यानी अतिरिक्त देणग्याही घेतल्या. http://www.loksatta.com/mumbai-news/mid-day-meal-food-samples-fail-1280429/ अरेरे ! कृष्णाचं नाव घेउन लहान मुलाम्चं अन्न पळवलं
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 08/07/2016 - 09:31 नवीन
राष्ट्रगीत म्हणणे धर्मविरोधी आहे. http://m.indiatoday.in/story/principal-teachers-quite-after-denied-permission-to-sing-national-anthem/1/734202.html या विरोधामुळे पुरस्कार-वापसी गँगच्या हातात आयतंच कोलीत मिळालंय. आता या विरोधाच्या निषेधार्थ पुरस्कार परत करणा-यांची रीघ लागेल.
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी Sun, 08/07/2016 - 10:24 नवीन
गुरुजी राष्ट्र्गिताच कुठे गेउन बसलायत, आता मदरस्यां मधुन मिड डे मील वापस पाठवल जातय कारण कि ते हिंदु आचार्‍याने बनवलय. ह्यांच्या धर्मांधतेपायी लहान मुल बिचारी उपाशीच राहतात.
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Sun, 08/07/2016 - 10:50 नवीन
मदरशांचे सोडा. दलितानी मिड डे मिलचे अन्न शिजवले म्हणुन उच्चवर्णीय मुलानी / पालकानी ते नाकारले , असेही होत आहे. http://www.ucanews.com/news/caste-discrimination-mars-midday-meal-scheme/69040
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी
च
चंपाबाई Sun, 08/07/2016 - 15:59 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Sun, 08/07/2016 - 17:46 नवीन
मोबाईल फोन की रेडिएशन के नकारत्मक प्रभाव से बचने के लिए संघ विचारक ने अनौखा तर्क दिया है । मोबाईल रेसिएशन से बचने के लिए संघ विचारक शंकर लाल अपने मोबाईल फोन पर गाय का ताज़ा गोबर लगाते हैं । उन्होंने कहा कि गाय हमारी माता है। इसका गोबर और मूत्र अमृत के समान है और इससे सभी बीमारियों से बचा जा सकता है। अंग्रेजी अख़बार इंडियन एक्सप्रेस की खबर के मुताबिक, शंकर लाल ने कहा कि यह ताजा गोबर है। फोन से निकलने वाली नुकसानदायक रेडिएशन से खुद को बचाने के लिए वह इसका प्रयोग करते हैं। उन्होंने कहा कि गाय हमारी माता है। इसका गोबर और मूत्र अमृत के समान है और इससे सभी बीमारियों से बचा जा सकता है। उन्होंने कहा कि पेंडुलम आरएसएस कार्यकर्ता के हाथ पर रखने से वह हिलने लगता है। वह दिखाता है कि आदमी के शरीर में कितनी उर्जा है, जिससे पेंडुलम हिल रहा है। जब ये आदमी अपने हाथ में फोन ले लेगा तो पेंडुलम हिलना बंद हो जाएगा क्योंकि फोन की हानिकारक तरंगों शरीर की ऊर्जा सोख लेती हैं। अब इसके हाथ में गोबर लगा फोन दीजिए और फिर से उसके हाथ के ऊपर पेंडुलम ले जाइए। देखा, ये फिर से हिलने लगा। इसकी ऊर्जा बच गई। उन्होंने कहा कि गाय के गोबर से कैंसर ठीक हो सकता है तो यह माइक्रोवेव से क्यों नहीं बचा सकता। गुजरात के जूनागढ़ के वैज्ञानिकों को गोमूत्र में सोने के अवशेष मिले हैं। इसी को देखते हुए वह हर हफ्ते ताजा गोबर लगाते हैं। उन्होंने कहा कि उनकी टीम के सभी मेंबर उसमें पुरुष, महिला या बच्चे सभी फोन पर गोबर लगाते हैं।
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Mon, 08/08/2016 - 04:45 नवीन
दलिताना ' शूट ' करु नका, मला करा ... मोदी पत्रकाराना बोलले ! ...... देशाचे तुकडे झाले तर माझ्या शरीराचे आधी तुकडे होतील. गांधीजीच्या त्या वाक्याला हिंदुत्वे आजही फिदीफिदी हसतात. आता मोदीही तसेच बोलले.... दलिताना मारण्याआधी मला मारा. अस्सल ते अस्सल. कॉपी ते कॉपी
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 08/08/2016 - 19:58 नवीन
काहीही हं चंपाबाई. गांधींनी दिलेलं ते वचन होतं, तर मोदींनी केलेलं ते आवाहन आहे. वडाची साल पिंपळाला लावण्यात तुम्ही एकदम तरबेज! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
ब
बोलबोलेरो Mon, 08/08/2016 - 06:32 नवीन
Prime Minister Narendra Modi spoke at length about anti-social elements donning the role of "gau rakshaks" during the day and committing crimes at night पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी असामाजिक तत्वांबद्दल सखोल भाष्य करताना असे समाजकंटक रात्री गुन्हे करून, दिवसा 'गौरक्षक' म्हणून वावरत असल्याचे प्रतिपादन केले.
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Mon, 08/08/2016 - 14:58 नवीन
बलोचिस्तान - क्वेट्टा येथे इस्पितळात शक्तिशालि आत्मघाति बॉम्बस्फोट ६५ ठार १५० जखमि.
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Mon, 08/08/2016 - 15:05 नवीन
काश्मिर च्या मुख्यमंत्रिण बाई दिल्लित गृहमंत्र्यांच्या भेटिस आल्या होत्या. प्रसारमाध्यमांशि बोलतांना त्यांचा एकुण सुर असा जाणवला कि गेला एक महिना काश्मिर मध्ये जो तणाव आहे तो सुरक्षा बलांमुळे निर्माण झाला आहे. "यंहा के प्रधानमंत्रि वंहा के प्रधान मंत्रि से बात करे तो " असच काहि तरि बोललि बाई "यंहा के प्रधानमंत्रि " बोललि हे कनफर्म. म्हणजे हे आजहि भारताच्या पंतप्र्धानाना आपला पंतप्रधान मानत नाहित. बाई आणखि असे बोललि कि भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या मध्ये काश्मिर चिरडला जातोय, जबकि काश्मिर खुद एक मुल्क बन सकत है.
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Mon, 08/08/2016 - 15:52 नवीन
काश्मिरच्या राजालाही स्वतंत्रच रहायचं होतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
स
सुबोध खरे Tue, 08/09/2016 - 07:15 नवीन
हो ना "पाकी" घुसल्यावर हवा टाईट झाली आणि भारताकडे शरण आला. उद्या काश्मीर स्वतंत्र केले तर याचीच पुनरावृत्ती होईल यात शंका नाही. राहिली गोष्ट काश्मीर तीन भागात आहे जम्मू काश्मीर आणि लडाख. यात काश्मीर खोरे फक्त अशांत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
ब
बोलबोलेरो Wed, 08/10/2016 - 06:42 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विप्लव Tue, 08/09/2016 - 05:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 08/09/2016 - 10:40 नवीन
पुन्हा एकदा सुषमा स्वराज http://m.rediff.com/news/report/your-wife-will-be-there-sushmas-vow-to-man-forced-to-travel-solo-on-honeymoon/20160809.htm
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Fri, 08/12/2016 - 04:15 नवीन
Union sports minister Vijay Goel, who is currently in Rio de Janeiro to cheer for the Indian contingent, found himself in the midst of a controversy on Thursday after Rio Olympic organisers threatened to cancel his accreditation if unaccredited people accompanying him do not end their "aggressive and rude" behaviour. We have had multiple reports of your Minister for Sports trying to enter accredited areas at venues with unaccredited individuals. When the staff try to explain that this is not allowed, they report that the people with the Minister have become aggressive and rude and sometimes push past our staff," Sarah Peterson, who is Continental Manager for Rio 2016 Organising Committee, said in a letter to Indian Chef-de-Mission Rakesh Gupta. "As you can understand, this type of behaviour is not acceptable. Despite previous warnings, it would seem that even today the same incident occurred at the Rio Olympic Arena (Gymnastics venue) and Carioca Arena 3," she added. Peterson said the Minister's accreditation could be cancelled because of this.
  • Log in or register to post comments
ब
बोलबोलेरो Fri, 08/12/2016 - 05:47 नवीन
http://timesofindia.indiatimes.com/india/Shah-Rukh-Khan-detained-at-Los-Angeles-airport/articleshow/53662583.cms Shah Rukh Khan was detained at Los Angeles airport To be detained at US immigration every damn time 'really really sucks', he tweeted The actor was detained in 2009 and 2012 by US immigration officials
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 08/12/2016 - 16:38 नवीन
धन्यवाद चंपाबाई. विजय गोयल घुसू पहात होते तसाच आजून एक प्रकार उघडकीस आला आहे. जॉन आंझरा हा प्रशिक्षक असूनही खेळाडूच्या नवी घुसू पहात होता. एव्हढंच नव्हे तर आंझराने मूत्राचा नमुनाही दिला. बातमी इथे आहे : http://www.bbc.co.uk/sport/olympics/37053928 विजय गोयल काय किंवा जॉन आंझरा काय अनधिकृत घुसखोर क्रीडानगरीत कशाला घुसू पाहताहेत? काहीतरी झोल करायचा बेत दिसतो आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
द
देव मासा Sat, 08/13/2016 - 21:38 नवीन
३०० प्रतिसाद झाले हो ... पार्ट टु युउ द्या आता
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा