विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे फार कठीण
एखाद्या भ्रष्टाचारात बुडालेल्या देशांत, विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे, हे फार कठीण आहे. उदाहरणे देऊनच ह्या वाक्याचे स्पष्टीकरण देतो.
समजा, तुम्हाला तातडीने दुसर्या गांवी जायचे आहे. वाटेत अनेक पूल आहेत. ते सरकारी यंत्रणांनी तपासून वाहतुकीला खुले ठेवले आहेत. सामान्यतः तुम्ही ठरवल्याप्रमाणे इच्छित स्थळी पोचणारच. पण भ्रष्टाचारी देशात अनेक प्रश्न उदभवतात. आता ते तपासणार्या यंत्रणांमधील इंजिनियर्स हे खरोखरच ज्ञानी आहेत की कुठल्यातरी कोट्यातून अॅडमिशन मिळून पास झालेले आहेत ? तसेच ते ज्ञानी असले तरी कामाशी प्रामाणिक आहेत का नाही ? त्यांच्यावर वरुन दबाव आला आहे का ? या सर्व शक्यतांवर तुमचा प्रवास सुरक्षित आहे का नाही हे ठरते. पावलोपावली भ्र्ष्टाचाराचा अनुभव असल्यामुळे, तुम्ही जास्तीतजास्त काय काळजी घेणार ? म्हणजे शेवटी देवावर्/दैवावर भरवसा ठेवूनच तुम्ही प्रवासाला निघणार! हाच प्रवास रेल्वेने करायचा झाला तरी वरीलप्रमाणेच प्रश्न उदभवतात.
आरोग्यासाठी हिरव्या भाज्या, ताजी फळे खावी असे सांगतात. त्याप्रमाणे तुम्ही आहारात बदल केलेत. तुमच्या खाण्यात शुद्धच भाज्या फळे येतील की रंगवलेली, मेण लावलेली येतील याची काय खात्री ? म्हणजे पुन्हा देवावर, नशिबावर भरवसा ठेवणे आले.
तुम्हाला चर्चगेटहून बांद्रयाला जायचे आहे, वेळ कमी आहे म्हणून तुम्ही विरार फास्ट पकडली आहे. पण दरवाज्यातल्या टोळक्याने तुम्हाला उतरुनच दिले नाही किंवा वाद घातल्याबद्दल चालत्या गाडीतून ढकलून दिले तर तुम्ही इच्छित स्थळी, वेळेत पोचाल याची खात्री काय ? पुन्हा नशिबावर भरवसा.
अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ?
तुलनाच करायची तर ती, आपण राहतो तो प्रदेश दिवसेंदिवस उत्तम होत चालला आहे की अधिकाधिक बकाल, ह्याची केली तर उत्तम.मान्य. पण एखाद्या प्रदेशाची एकाच दिशेने वाटचाल होत नाही. ज्या चांगल्या गोष्टी येतात त्याबरोबर कांही वाईट गोष्टीही येतातच.पुर्वीचे पुणेच नाही तर पुर्वीची कुठलीच शहरे, आज तरी आधीच्या १०-१२ वर्षांपेक्षा उत्तम म्हणता येतील अशी झालेली नाहीत.सरसकटीकरण वाटत असल्याने पास.पण एखाद्या देशा बाबत असे म्हणणे योग्य नाही.किंबहूना अशी विचारसरणी एखाद्या देशाबाबतीत योग्य पण नाही.नाही हो मुवि, फक्त दु:खाची तुलना करून थांबायचे नाही. सुखाची तुलना करताना आपल्यापेक्षा वरच्या लोकांशी तुलना करून कुठे प्रगती करायची आहे त्याचे मूल्यमापन करायचे. खूपच भाबडे विचार वाटत आहेत का?मुवि आणि तिमा यांनीही रस्त्यांची स्थिती, बेभान चालक यामुळे असुरक्षितता वाटते असेच म्हटले आहे. आमीरच्या बायकोने मुलांसाठी देश सोडावा असे वाटते असे म्हटले होते...१. अ) मुवि आणि तिमा यांनी त्यांचा प्रामाणिक उद्वेग व्यक्त केला आहे असे वाटते. आ) शिवाय, त्या दोघांनी कधी दोन पैसे घेऊन अथवा न घेऊन देशप्रेम आणि नैतिकता यांचे व्यावसायिक प्रदर्शन केले असे माहितीत नाही. २. अ) आमीरच्या देश सोडण्याच्या विधानासंबंधी त्याने त्याच्या बायकोच्या खांद्याचा आधार घेत दुसरीकडे शरसंधान केले असा सर्वसाधारण समज आहे (खखो आमीर आणि त्याची पत्नी जाणो). आ) कमीत कमी, समतोल विचार करणार्याला, "इन्क्रेडिबल इंडिया" ची जाहिरात करत असलेल्या व्यक्तीने केलेले "इन्टॉलरंट इंडिया" हे विधान विरोधाभासी व अगम्य वाटायला हरकत नसावी ! शिवाय, पैसे घेऊन (अथवा न घेऊनही) देशप्रेम आणि नैतिकता यांचे व्यावसायिक प्रदर्शन करणार्याने असे विधान सार्वजनिक व्यासपिठावर केले तर त्याचे काय परिणाम असू शकतात याचा विचार आमीरने केला नसेल असे म्हणणे म्हणजे बहुश्रुत असलेल्या त्याच्या बुद्धीमत्तेचा अपमान होईल... तेव्हा, प्रत्यक्षातला परिणाम आमीरला अपेक्षित असलेल्या परिणामापेक्षा वेगळा झाला हा विचार जास्त संयुक्तिक वाटतो. वरचे मुद्दे ध्यानात घेतले तर मुवि/तिमा आणि आमीर यांच्या विधानांमागचे वेगवेगळे अर्थ स्पष्ट व्हायला मदत होईल असे वाटते. जरा अजून इस्काटून... "(बर्याचदा फक्त सोयीच्या वाटणार्या का होईना, पण) अनेक सामाजिक विचारांना सार्वजनिक माध्यमांतून नैतीक विरोध करणार्या" आणि ते करताना "सामाजीक-राजकीय मते परखडपणे मांडणारी, समतोल, विचारवंत व्यक्ती अशी आपली छबी निर्माण करणार्या" व्यक्तीने आपण (कमीत कमी सार्वजनिक पटलावर तरी, आणि कांगावाखोर नसल्यास खाजगीतही) आपल्या वागण्या-बोलण्यावर ताबा ठेवणे आणि त्यांत विरोधाभास होऊ नये, ही काळजी घ्यावीच... जनांसाठी नाही तर मनासाठी तरी :) आपले म्हणणे तार्किकरित्या सुस्पष्टपणे मांडणे कठीण असले आणि/किंवा लोकप्रिय सार्वजनिक व्यासपिठावर व्यक्त होण्याची संधी मिळणे कठीण असले तरी; "दालमे कुछ काला है।" हे चटकन समजण्याइतकी बुद्धी सर्वसामान्यपणे जनतेत जरूर असते. ;)