बलुचिस्तानचा स्वातन्त्र्यलढा अन पाकिस्तानचे भविष्य
पाकिस्तान विषयी चर्चा करताना काही मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
१. पूर्वीच्या हिन्दुस्थानातील (ब्रिटिश इन्डिया) वायव्य सरहद्द प्रान्त आणि पूर्व बंगाल हे प्रान्त मागण्याचा मुस्लिम लीग ला तसा काहीच अधिकार नव्हता . वस्तुतः हे बहुतांश मुस्लिम आक्रमकांच्या छळबळाने कन्व्हर्ट झालेले मूळचे हिन्दूच होते. परंतु हिन्दु धर्ममार्तंडांच्या कपाळकरंटे पणामुळे या हिन्दु धर्मपासून विलग झालेल्या मोठ्या जनसंख्येचे पुन्हा हिन्दु धर्मान्तर करून घेतले असते तर काश्मिर, पाकिस्तान , अतिरेकी इत्यादि विसाव्या आणि एकविसाव्या शतकात भेडसावणार्या डोकेदुखीचा समूळ नाश कित्येक शतके आधीच झाला असता. त्यातच ब्रिटिशान्च्या "फोडा झोडा आणि गुलाम बनवून राज्य करा" या कुटिल नीतीमुळे मुस्लिम समाजातील फुटीर अणि मूलतत्त्वावादी संघटना वाढत गेल्या ... त्यातूनच पुढे दार-उल-इस्लाम "पाक"स्तान ची मागणी पुढे आली.
२. आज कोणीही कितीही शान्ती आणि मैत्रीच्या गप्पा मारल्या तरी पाकिस्तान हा विषारी साप आहे. आणि त्याला कितीही दूध पाजले तरी तो आपला विषारी डन्ख मारणे सोडणार नाही हे भाजपच्या पहिल्या राजवटीत वाजपेयीना आणि दुसर्या राजवटीत मोदीजीना पहिल्या दोन वर्षात चांगलेच समजून चुकले आहे. यास्तव चर्चा /शान्तिप्रक्रिया हे पारम्पारिक गुर्हाळ बन्द करून डिफेन्सिव्ह च्या ऐवजी ऑफेन्सिव्ह अॅक्शन वर भर देण्याच्या मनस्थितीत सध्या मोदी सरकार दिसत आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभल आणि खुद्द प्रधानमन्त्री नरेन्द्रजी मोदींच्या अलिकडच्या भाषणे/ वक्तव्यावरुन तसे प्रतिबिम्बित होत आहे.
३. नजिकच्या भविष्यकाळात भारत आर्थिक दॄष्ट्या सुपरपॉवर बनण्याकडे वाटचाल करीत असताना अन्तरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणून पाकिस्तानला एकटे पाडणे आणि त्याबरोबरच बलुचिस्तान/ गिलगिट -बाल्टिस्तान आणि पाक-अधिकॄत काश्मिर मधल्या पाक सैन्याच्या अत्याचाराना हायलाइट करणे तसेच बलुचिस्तानच्या स्वातन्त्र्यलढ्यास नैतिक आर्थिक/ लष्करी मदत पुरवून पाकिस्तानचे तुकडे पाडून सम्पवणे हाच पाकिस्तानच्या समस्येवरचा जालिम अन रामबाण इलाज आहे ,असे माझे स्पष्ट अन प्रामाणिक मत आहे . येणार्या काळात पाकिस्तानात निर्नायकी माजून जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नाहीसा झाला,तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही!
जय हिन्द ! जय भारत!
💬 प्रतिसाद
(160)
इ
इल्यूमिनाटस
Sun, 08/21/2016 - 16:50
नवीन
आवं , निरणाएकी माजूण कसं चालन? शेजारी हायेत ते आपले. अनुब्वाम्ब बाळगून हेत, उगी लागला कोनाच्या हातात अनुब्वाम्ब तर आपली पंचाईत व्हयची!
जय महाराष्ट्र
- Log in or register to post comments
क
किंबहुना
Mon, 08/22/2016 - 07:25
नवीन
माझे पर्सनल मत, उद्या जरी सर्वंकश युद्ध झाले तेरी देखील अणुबाँब वापरण्याचे धाडस पाकिस्तान करणार नाही. तेव्हढा शहाणपणा त्यांच्याकडे नक्कीच आहे.
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Mon, 08/22/2016 - 09:16
नवीन
हरण्यापेक्षा ते अणू बॉम्ब फोडू शकतात
- Log in or register to post comments
इ
इल्यूमिनाटस
Mon, 08/22/2016 - 16:24
नवीन
पाकिस्तान मध्ये अंतर्गत निर्नायकी माजणे आणि पाकिस्तानचे आपल्याशी युद्ध होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Mon, 08/22/2016 - 16:45
नवीन
पाकिस्तान कडे असणारी अण्वस्त्रे भारतासाठी नेहमीच धोक्याची घंटा राहिली आहेत. त्यामुळं पाकिस्तान ला धडा शिकवण्यासाठी भारताने cold start doctorine विकसित केली, ज्यामध्ये भारत आपल्या conventional मिलिटरी शक्तीचा वेगात वापर करेल आणि पाकिस्तान ला मोठा धक्का देईल. याची रचना अशी केली आहे की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त नुकसान, तसेच युद्धय जास्त न लांबवल्यामुळे पाकिस्तान ला अणूहल्ला करता येणार नाही.
https://en.m.wikipedia.org/wiki/Cold_Start_(military_doctrine)
भारताच्या ह्या युद्धनीती ला प्रत्यिउत्तर देण्यासाठी मग पाकिस्तान ने छोटी, कमी क्षमतेची, tactical नुक्लीअर अण्वस्त्रे विकसित केली, ज्याचा वापर ते भारतीय शहरावर नाही तर हल्ला करणाऱ्या भारतीय सैन्यावर, त्यांच्या मुख्यालयावर करणार. जेणे करून भारताला full fledged nuclear war सुरु करता येऊ नये
http://thediplomat.com/2015/10/pakistan-clarifies-conditions-for-tactical-nuclear-weapon-use-against-india/
थोडक्यात काय जरी पाकिस्तान ने भारतीय शहरावर आण्विक हल्ला नाही केला तरी ते भारतीय सैन्यावर करणार नाहीत याची काही खात्री नाही, तसेच भारत त्याला प्रत्यिउत्तर देईल का नाही, ते कसे देईल हे फक्त काळच सांगू शकतो. पण जे होईल ते भयानक होईल, आणि युद्धात पाकिस्तान च्या सद्सद विवेक बुद्धी वर विश्वास ठेवणे अवघड काम आहे.
- Log in or register to post comments
क
किंबहुना
Wed, 08/24/2016 - 05:57
नवीन
याच्याशी सहमत आहे. पण भारताच्या अण्वस्त्रसज्जतेचा तसेच लष्करी क्षमतेचा विचार करता भारतावर अणुहल्ला करणे हा आत्मघात ठरेल याची पण त्यांना कल्पना असावी. नाहीतर त्यांनी सर्वंकष युद्ध टाळण्याचे इतके प्रयत्न केले नसते.
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sun, 08/21/2016 - 17:27
नवीन
त्यातच ब्रिटिशान्च्या "फोडा झोडा आणि गुलाम बनवून राज्य करा" या कुटिल नीतीमुळे मुस्लिम समाजातील फुटीर अणि मूलतत्त्वावादी संघटना वाढत गेल्या..
...
कै च्या कै ! काश्मीरात दुराणीची सत्ता संपल्यावर तिथल्या मुस्लिमानी शीख राजाना आपली घरवापसी घडवून आणा अशी विनंती केली होती... पण राजकीय्दृष्ट्या तेंव्हा वजनदार असलेल्या पंडितानी तेंव्हा त्याना विरोध केला होता ना ?
नेताजी पालकरला पुन्हा हिंदु धर्मात घ्यायला कुणाचा विरोध होता ?
बाजीरावाचा मुलगा मुसलमानच का राहिला ?
....
या सगळ्यांना इंग्रज जबाबदार होते का ?
उगाच इंग्रज / मोघलांवर खापर फोडू नये.
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Mon, 08/22/2016 - 17:29
नवीन
एरंडेलाचा स्टॉक संपला नाय का अजून? फ्लाजिल घ्या अन बूच मारा एकदाचं.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 08/22/2016 - 19:30
नवीन
.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/21/2016 - 17:28
नवीन
>>>>> येणार्या काळात पाकिस्तानात निर्नायकी माजून जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नाहीसा झाला,तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही!¡
कळला अभ्यास. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
Sun, 08/21/2016 - 18:40
नवीन
सर, मी कधी कधी स्वतः शी देखील सहमत नसतो त्यामुळे तुम्ही आपलं मत मांडा.
- Log in or register to post comments
म
मुक्त
Fri, 08/26/2016 - 15:01
नवीन
सर थेट थोतरीतच =)))
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
Sun, 08/28/2016 - 16:31
नवीन
तुझ्या पायजे का बे चुऱ्या????
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sun, 08/21/2016 - 17:41
नवीन
हेच भाजपावाले पूर्वी काँग्रेसच्या याच धोरणाना विरोध करत होते ना ?
आणि आता ... ?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 08/22/2016 - 17:09
नवीन
चंपाबाई
आंतरराष्ट्रीय, लष्करी आणि आर्थिक धोरणे भारतात (सुदैवाने) पक्ष निरपेक्ष राहिली आहेत आणि ती तशीच असावीत इतके राजकीय पक्ष सुद्धा सुजाण आहेत.( कम्युनिस्टांचा अपवाद वगळता).
डॉ. मनमोहन सिंग यांचे उदारीकरणाचे आर्थिक धोरण मोदी साहेबानी "पुढे" चालविले
जि एस टी वर सर्व संमती झाली हे हि याचेच उदाहरण आहे.
कोल्ड स्टार्ट हे धोरणही पक्ष निरपेक्ष चालविले जाते.
जरी अण्वस्त्रांचा प्रथम वापर करणार नाही असे म्हटले तरीही जर प्रत्युत्तर असे सज्जड दिले जाईल कि पाकिस्तान जगाच्या नकाशावरून नष्ट होईल. अरिहंत आणि अरिदमन या अणूपाणबुड्या वर अण्वस्त्रे याचसाठी ठेवलेली आहेत/ ठेवली जातील. http://www.huffingtonpost.in/chirayu-thakkar/3-reasons-why-paks-growing-nuclear-arsenal-is-not-giving-india/ हे एकदा वाचून घ्या
तरीही तुम्हाला त्यात काळेबेरेच दिसते.
याला कारण तुम्हाला काविळही झाली आहे आणि काळा चष्माही घातला आहे.
राजकारण कशाशी खातात हे आपल्याला माहीतही नाही म्हणून अशी वक्तव्ये करीत आहेत.
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Mon, 08/22/2016 - 19:52
नवीन
काँग्रेसचीच धोरणे भाजपे पुढे चालू ठेवत आहेत , हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 08/22/2016 - 20:11
नवीन
धोरणं भारत सरकारची होती.कॉग्रेस ची नव्हती. आपलीच लाल कशाला?
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Sun, 08/21/2016 - 18:01
नवीन
लेखात फक्त बलुचिस्तान हा विषय घेऊन मुद्यांची मांडणी केली असती तर सविस्तर चर्चा झाली असती. परंतु बलुचिस्तान च्या विषयात हिंदू-मुस्लिम, भाजप सरकार हे विषय घुसडायला नको होते असो.
ले.जनरल हुडा च आत्ताच स्टेटमेंट वाचा त्याच्यामध्ये ते फुटीरवाद्यांशी बातचीत करण्याचे सूतोवाच करतात. आता मोदी सरकार काय करणार ? आर्मी कमांडर वर कारवाई ?
http://indianexpress.com/article/india/india-news-india/army-commanders-plea-on-talks-with-all-reflects-urgency-says-kashmir-separatist-leader-mirwaiz-2988144/
नजीकच्या काळात पाकिस्तान नाहीसा व्हायचं सोडून द्या साधा बलुचिस्तान स्वतंत्र सुद्धा होणार नाही, भारत फक्त तो अस्थिर करू शकतो अस माझं मत आहे.
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Mon, 08/22/2016 - 08:45
नवीन
शेजारच्या उनामधे काय सुरू आहे, किंवा काश्मिराची परिस्थिती काय आहे याची काडीमात्र कल्पना नसलेले लोक अचानक बलुचिस्तानाचे जिओपोलिटिकल एक्स्पर्ट्स कसे काय होतात, हे मला पडलेले मोठ्ठ्व कोडे आहे. ;)
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Mon, 08/22/2016 - 11:47
नवीन
दुसर्याच पहावं वाकुन, ह्यात आपण भारतीय लैच एक्स्पर्ट आहोत.
:)
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Mon, 08/22/2016 - 16:08
नवीन
उना मधला प्रायोजित अत्याचार होता. ६०० किमी दुरून दमण गुंड मागवले. स्थानिक एका अल्पसंख्याक तरुणाला मोबाईलवर चित्रीकरण करण्यास भाग पडले. नंतर ते सोशल मिडीयावर टाकले. असा प्रयोग पहिल्यांदाच झाला. कुणाचा हात यात आहे. सांगण्याची गरज नाही.
बाकी काश्मीरची स्थिती,तिथल्या ९० टक्के लोक भारतातच राहण्याला पसंदी देतात. कुणाला हि पाकिस्तानला जायचे नाही आहे. राजनीतिक पोळ्या शेकण्याचा हि काश्मिरी पद्धत आहे.
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Mon, 08/22/2016 - 16:58
नवीन
मी म्हटलो ना? या ↑ लोकांना काश्मिर किंवा उनाच्या परिस्थितीची काडीमात्र कल्पना नाही. थापांवर मात्र संपूर्ण विश्वास आहे.
नमो नमो.
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
Mon, 08/22/2016 - 17:00
नवीन
आपण वस्तुस्थिती समजावून सांगू शकता.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 08/22/2016 - 17:15
नवीन
http://www.firstpost.com/politics/real-story-of-rahul-gandhis-dalit-outreach-fake-mom-and-a-readmitted-patient-2916762.html
Ahmedabad: Congress vice president Rahul Gandhi on Thursday travelled to Rajkot in Gujarat to meet the victims of the assault on Dalits by members of a 'gau raksha samiti'.
However, hours before the Congress leader arrived in Rajkot, one of the victims of the public flogging was admitted to the Pandit Deendayal Upadhyay (PDU) General Hospital there.
Interestingly, on July 18 the victim had been discharged from the Junagadh civil hospital.
Reports said all this was done “political pressure”.
http://zeenews.india.com/news/gujarat/una-incident-dalit-victim-back-in-hospital-ahead-of-rahul-gandhi-s-visit-under-political-pressure_1910215.html
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 08/22/2016 - 17:19
नवीन
गोपाळराव
पाकिस्तानशी युद्ध झाले तर बलुचिस्तान पर्यंत मुसंडी मारून पाकिस्तानचे पंजाब आणि सिंध हे दोन भाग अलग करायचे हे भारताचे लष्करी धोरण १९७१ पासून होते. ते काही आताच ठरवले असे नाही.अण्वस्त्र निर्मिती नंतर त्या धोरणाची दिशा थोडी बदलली आहे
वर म्हटल्याप्रमाणे लष्करी आर्थिक आणि परराष्ट्रीय धोरणे हि पक्ष निरपेक्ष असतात(आणि असावीत)
हेही वाचून घ्या http://timesofindia.indiatimes.com/india/Why-Congress-is-backing-PM-Modis-bold-strategy-in-Balochistan/articleshow/53716552.cms
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 08/22/2016 - 11:05
नवीन
बलुचिस्तान मधे सार्वमताच्या जोरावर विभाजनाची मागणी केली तर काश्मीरमधे काय भुमिका असेल ? ( जागतिक स्तरावर) , पाक ने ती मागणी केली तर भारत काय भुमिका मांडतो ? जाणकारांनी प्रकाश टाकावा
कारण काश्मिरमधल बहुसंख्य हिंदू निर्वासित झाले आहेत . तिथे १९४८ ची परीस्थिती आणने अवघड आहे .
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Mon, 08/22/2016 - 11:49
नवीन
त्यातल्या त्यात, सामंजस्य करार करुन, तुम्ही काश्मिरात हस्तक्षेप करु नका, आम्ही इतरत्र् लक्ष देणार नाही, ही मध्यम वाट निघु शकेल.
बाकी तोपर्यंत काश्मिर अन बलुची जनतेच जगणं मुश्किल.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Mon, 08/22/2016 - 17:15
नवीन
भारत स्वतंत्र झाल्या झाल्या जे कबाली (त्यांना कबालीच म्हणत असत बहूतेक) काश्मीरमधे घुसले ते परत गेल्यावर आणि परीस्थीती मुळपदावर आल्यावर काश्मीरमधे सार्वमत घ्यावे असे नेहरुंनी तेव्हा रेडीओवरच्या भाषणात सांगीतले आहे. नंतर मुद्दा युनोमधे गेल्यावर दोन्ही देशांनी आपापले सैन्य काश्मीरमधून काढून घ्यावे आणि त्यानंतर सार्वमत घ्यावे असे ठरले. भारताला मात्र काश्मीरात थोड्याप्रमाणात काश्मीरमधे सैन्य ठेवण्यास मुभा होती. पाकव्याप्त काश्मीरमधून जर पाकीस्तानने आपले सैने काढून घेतले तर आजही आपल्याला सार्वमत घ्यावे लागेल.
हा ठराव युनोच्या साइटवर आहे. मिळाला की लींक देतो.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 08/25/2016 - 17:14
नवीन
पण परिस्थीती मुळ पदावर येणे हा ही एक महत्वाचा क्लॉज आहे त्यात. आज सैन्य मागे घेतले की उद्या सार्वमत असं नाही.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
गुरुवार, 08/25/2016 - 17:27
नवीन
मान्य,
रच्याकने - तुमच्याकडे त्या ठरावाची लींक आहे का?
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Fri, 08/26/2016 - 07:47
नवीन
http://www.un.org/en/ga/search/view_doc.asp?symbol=s/res/47(1948)
ह्याचं पालन आता करायचं म्हण्ट्लं तर गेलं काश्मीर ;)
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Fri, 08/26/2016 - 07:49
नवीन
घ्याल. कंसातले १९४८ सुद्धा युआरेलचा भाग आहे. क्लिक करुन ति लिन्क उघडत नाहिये. तर पुर्ण लाईन कॉपी न पेस्ट करावी लागेल.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sun, 08/28/2016 - 20:31
नवीन
याचं पालन आता नाही करायचं म्हटलं तर यानंतर झालेला एखादा करार असावा लागेल जो या कराराला सुपरसीड करेल...
मुळात मुद्दा युनोमधे गेला हेच चुकीचे झाले. असो.
- Log in or register to post comments
व
विद्यार्थी
Mon, 08/22/2016 - 16:51
नवीन
मागे मी या विषयावर धागा टाकला होता.
बलुचिस्तान - १९७१ ची पुनरावृत्ती?
पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्टच्या भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख केल्यानंतरची बलूच नेत्यांची वक्तव्ये पहिली तर आपणास कल्पना येईल की त्यांना भारताकडून सैनिकी मदतीची अपेक्षा नसून त्यांना फक्त त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी नैतिक पाठबळ आणि जागतिक व्यासपीठ (पब्लिसिटी) हवे आहे. भारतीय पंतप्रधानांनी आपल्या भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख करून त्यांना ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे असे मला वाटते.
याशिवाय काश्मीरच्या मुद्द्यावर यानिमित्ताने भारत बलुचिस्तानच्या मुद्द्याचा "Bargaining Chip" म्हणून वापर करणार असे दिसत आहे.
नजीकच्या काळात पाकिस्तान जगाच्या नकाशावरून नाहीसा होईल असे म्हणणे फारच धाडसी होईल. पाकिस्तानचे काय होणार हे पाश्चिमात्य देशांच्या (अमेरिकेच्या) दीर्घकालीन सामरिक आणि राजकीय योजनेवर अवलंबून आहे.
- Log in or register to post comments
ए
एनिग्मा
Mon, 08/22/2016 - 17:42
नवीन
आपल्याला आठवते का नाही ते माहित नाही पण २०११-१२ चा सुमारास पाकिस्तान नाहीसा होण्याच्या जवळ आला होता. कट्टरपंथी आणि तालिबानी सैन्य पेशावर जवळ ३० कि.मी. वर येऊन थबकले होते आणि पाक सैन्याला सळोकीपळो करून सोडले होते. तेव्हा अमेरिकेने विमानं पाठवली नसती तर तालिबानने वर्षाचा आत पाक खाल्ला असता.
सध्या आपल्या हिताच राजकारण हेच आहे कि पाक मध्ये फुटीर वाडी तयार करा. त्यांना हवे ते पुरवा. पण त्यांना स्वातंत्र्य मिळेल इतका करू नका. कारण आपल्याला अजून एक बांगलादेश पोसायचे नाही. शत्रूचा पोटात गाठ होईल आणि ती सतत दुखत रहित इतकाच पाहायचं.
- Log in or register to post comments
झ
झपाटलेला फिलॉसॉफर
Mon, 08/22/2016 - 19:40
नवीन
*मोदीनिती*
( मोदी विमानातून जगभर फिरत मौजमजा करताहेत असे चित्र निर्माण करण्यासाठी मोबाईल झिजवणा-या कान्ग्रेसी आणि सत्तेत राहून विटंबना करणाऱ्या विचारवंतान्साठीही प्रेमपुर्वक सादर)
*मा. नरेन्द्र मोदी यांची जबरदस्त चाणक्यनीति !!
चीनचा ग्वादर बंदराकडे जाणारा रस्ता बलूचिस्तानमधुन जातो आणि चीनने तिथे पाकीस्तानी सैन्याच्या मदतीने बलुची नागरीकाना संपवण्याचे आणि अनन्वित अत्याचाराचे सत्र चालवले आहे. आणि त्याचवेळी जवळजवळ 2 अब्ज डॉलर्सची गुन्तवणुक तेथे विशिष्ट हेतूने करत आहे.
आता चीनला कळून चुकतय कि NSG च्या मुद्द्यावर चीनने भारताशी पंगा घेऊन केवढी मोठी चुक केली आहे ती!
एकीकडे चीन दक्षिण चीनी समुद्रावरील आपल्या हक्कासाठीची प्रतिष्ठेची लढाई लढण्यात चांगलाच अडकून पडला आहे.
मागील दोन वर्षांच्या चुप्पीनंतर मोदीजीनी सगळ्याच राजकीय पक्षांना विश्वासात घेतले आणि मग बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर सणसणीत विधान केले. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग असल्याचे ठणकावून सांगितले.
पंतप्रधान पदाची सुत्रे स्विकारल्यापासुन मागील दोन वर्षे मोदीजी सातत्याने UNO (संयुक्त राष्ट्र संघ) आणि NSG च्या स्थायी सदस्यत्वासाठी प्रयत्न करत आहेत. पण प्रत्येक वेळी चीन खोडा घालत आला आहे
त्यातच भरीस भर म्हणून भारताला कमजोर करण्यासाठी पाकिस्तानला अनेक क्षेत्रांत चीन सहकार्य करत आला आहे. तसेच POK आणि बलूचिस्तानमध्ये आपल्या फायद्यासाठी आणि भारताला घेरण्यासाठी चीन तेथे काही बान्धकामेही करत आहे.
आन्तरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानुसार आशिया क्षेत्रांत दक्षिण चीनी समुद्रावरील आपला अधिकार सुद्धा चीन गमावून बसला आहे. त्यामुळे आता त्याला भारताच्या मदतीची गरज वाटू लागली आहे. म्हणूनच चीन ने आपले परदेश व्यवहार मंत्री वांग यी याना तातडीने दिल्लीला पाठवले, आणि त्यान्च्यासोबत संदेशही पाठवला कि NSG प्रवेशाचे मार्ग अजुन बंद झालेले नाहीत!
मोदीजीनी याच संधीचा फायदा उठवला, आणि पाकव्याप्त काश्मीर(POK)ला भारताचा अविभाज्य भाग म्हणून जाहीर करून टाकले, आणि बलुचिस्तानच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बलुचिस्तान पाकिस्तानपासुन स्वतंत्र करण्याची गरज असल्याचे जगाच्या निदर्शनास आणून दिले.
इकडे, चीनी परदेशमंत्री भारत दौ-यावर ग्वादर बंदर प्रकरणी भारताचे समर्थन मागण्यासाठी पोहोचले, त्याचवेळी मोदीजीनी थेट POK चा मुद्दा उठवून चीनला सांगितले की NSG राहू द्या बाजूला, POK च्या मुद्द्यावर आधी आम्हाला समर्थन द्या.
मोदीजीन्च्या या कुटनीतीपुर्ण निर्णयाने सगळ्या जगाला अचंबित करून सोडले , चीन तर सगळ्या बाजुने पुरता फसला !
चीन NSG चे गाजर दाखवत आपल्या बंदराच्या मुद्द्याला समर्थनाची अपेक्षा करत होता. पण मोदीजीनी टाकलेल्या डावामुळे चीनच्या गळ्यातच हाडूक अडकून बसले.
POK ला समर्थन द्यायचे म्हणजे ग्वादर बंदराला मुकायचे!
आणि भारताची नाराजी ओढवून घ्यायची म्हणजे व्हिएतनाम, जपान यासारख्या अन्य देशांना भारताचा पाठिंबा मिळणार, आणि परीणामी दक्षिण चीनी समुद्रावरचा अधिकार पाण्यात बुडालाच म्हणून समजा ...! चीनच्या हातातूनच पाकिस्तानचा झेंडा उखडून टाकण्याची ही रणनीति!!
चाणक्यनीति : शत्रू कमजोर असतानाच त्याच्यावर वार करा.
मोदीजी नी आचरणात आणली हीच रणनीति।
आता चीन चक्रव्यूहात अडकला कि करावे तर काय करावे???
POK ला पाकिस्तानचा भाग जाहीर करून पाकिस्तानला मदत करायची नि आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायचा कि NSG मध्ये भारतला स्थायी सदस्यता देऊन आधी आपला दक्षिण चीनी समुद्राचा वाद सोडवून घ्यायचा! मग भविष्यात काय होईल ते होवो!
चाणक्यनीति भारतात फार प्राचीन काळापासून आहे, पण वापर करू शकणारे तल्लख मेन्दु आणि समर्थ हात आताच दिसु लागलेत, नाही का?.....
त्या सर्वांचा समर्थपणे देशहितासाठी वापर करणारे सरकारी आहे, *मोदी सरकार*
आता आपणच ठरवायचे आहे कि साथ देऊन समर्थ देश घडवायचा कि खोटेपणाने टिका करत अपशकुनी घुबडे व्हायचे?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 08/22/2016 - 20:48
नवीन
शत्रुशी व्य्वहार करताना सगळ्यात फायद्याची डील म्हणजे "आम्हि तुम्हाला त्रास देणार नाहि, त्याबदल्यात तुम्ही आम्हाला काहि रियल मटेरीअल फायदा कमवण्यात मदत करा". चीन भारताशी असाच व्यवहार करतो आहे. अरुणाचल, तिबेट, काश्मिर, एन.एस.जी वगैरे प्रकरणात भारताला शक्य तेव्हढा त्रास द्यायचा. आणि हा त्रास कमि करायच्या मोबदल्यात दक्षीण चीनी समुद्राविषयी सहमतीची डील करायची, काश्मीर वाटुन घ्यायची बोलणी करायची (पुढील ५ दशकांत काश्मीरच्या भुमीवर दावा सांगणारा ड्रॅगनच्या रुपातला तिसरा भिडु अवतरलेला असेल. त्याला पाकची संमती अगोदरच आहे)
चीनला बलुची लोकांविषयी आत्मियता असण्याचे काहिच कारण नाहि. पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने ग्वादार बंदर आणि प्रपोस्ड इकोनॉमीक रूट डेव्हलप करायला आणि चीन आपलं बळ पणाला लावेल, आणि भारताने फार वेगाने हालचाली केल्या नाहि तर त्यात तो सफल देखील होईल. थ्री गॉर्जस डॅम विक्रमी वेळात उभा करणारा देश आहे चीन. त्यांच्या कल्पकतेला, महत्वाकांक्षेला आणि सगळ्यात म्हत्वाचं म्हणजे अत्यंत निष्ठुर अशा इंप्लीमेंटेशन पॉवरला सध्यातरी जगात तोड नाहि.
वैयक्तीक रित्या मोदि कितीही कल्पक, महत्वाकांक्षी असले तरी एक देश म्हणुन भारत आणि चीनची तुलना सध्यातरी तुल्यबळ नाहि. बट वी आर ऑन राइट ट्रॅक एव्हढं खरं.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Mon, 08/22/2016 - 20:59
नवीन
अतिशय झपाटलेला प्रतिसाद. मोदींच्या आक्रमक परदेश नीती मुळे आपल्याला भरपूर ठिकाणी यश मिळाले पण काही महत्वाच्या ठिकाणी अपयश सुद्धा मिळाले हे नाकारून चालणार नाही. मोदी ची बलुचिस्तान आणि POK संदर्भातील स्टेटमेंट जरी योग्य असली तरी त्यासंदर्भात तुमि मांडलेली मते कायच्या काय आहेत
चीन ची CPEC मधील गुंतुवणुक ४६ बिलियन डॉलर कंची आहे २ अब्ज डॉलर ची नव्हे आणि चीन सारखा देश जर पाकिस्तान मध्ये एव्हडी मोठी गुंतुवणुक करत असेल तर तो भारतचे प्रयत्न सहजासहजी यशस्वी करू देणार नाही. बर ज्या इराण शी आपण मैत्रीचा हात पुढं केलेला आहे त्या इराण चा सुद्धा स्वतंत्र बलुचिस्तान ला पाठिंबा नाही आहे कारण इराण मधील काही प्रांतातील बालुच लोक पण स्वतंत्र बलुचिस्तान चा आग्रह धरतील. तेंव्हा बलुचिस्तान हे आपल्यासाठी फक्त काश्मीर विरुद्ध वापरायचा pressure पॉईंट आहे आपण तो जास्तीत जास्त अस्थिर करू शकतो.
भारत गेली ६० वर्ष हेच सांगतोय, त्यात काही वेगळं नाही
चीन असल्या आंतरराष्ट्रीय नियमांना भीक सुद्धा घालत नाही, चीन ने दक्षिण चीन समुद्रात naval excersize सुरु सुद्धा केल्या. मात्र आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या बाजूने वळवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्याच अनुषंगाने चीन चे परराष्ट्र मंत्री भारतात येऊन गेले.
काहीही, पाकिस्तान विषयी चर्चा कराय चीन चे पररष्ट्र मंत्री कशाला येतील, दोन परराष्ट्र मंत्रामध्ये भरपूर विषय चर्चिले जातात पण बैठकीच्या शेवटी जे स्टेटमेंट निघते ते महत्वाचं असत. तुम्ही बोलताय असं कोनत स्टेटमेंट भारताने जरी केलाय जेंव्हा चीन चे परराष्ट्र मंत्री आलेले तेंव्हा_? भारत आणि चीन मध्ये हजारो मुद्दे आहेत . मुळात जो चीन भारताने दहशतवादी ठरवलेल्या व्यक्तीला दहशतवादी म्हणत नाही तो POK ला भारताचा भाग मानणार नाही. बर मोदींनि aksai chin हा काश्मीर चा चीन च्या ताब्यात असणारा भाग का नाही मागितला?
अत्यंत चूक. अमेरिकेला भीक न घालणारा चीन भारताला ग्वादार साठी परवानगी मागेल काय ? तिकडं ग्वादार बंदर तयार पण झालं. आणि दक्षिण चीन समुद्राशी जपान चा काडीचा हि संबंध नाही. जपान आणि चीन च वैयमनस्य खूप जून आहे तसेच सध्याचा त्यांचा वाद हा एका बेटावरून आहे.
मोदी सरकारच्या कामगीरी कडे डोळस पने पहा त्यांची काही धोरणे चांगली आहेत तसेच काही वाईट हि आहेत. आणि हे प्रत्येक सरकार बाबतीत सत्य असत अगदी काँग्रेस च्या हि. तुम्ही मोदी सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण म्हणणार असाल तर मग चर्चेत अर्थ नाही.
- Log in or register to post comments
स
सतोश ताइतवाले
Fri, 08/26/2016 - 11:43
नवीन
पाकिस्तान नामक विषय आता संपवून टाकावा एकदाचा
कारण हे लोक जरा जास्तच माजलेत काडीही येतात
काहीही करतात
त्यात हे आपले नालायक राजकारणी
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Fri, 08/26/2016 - 12:08
नवीन
कसा संपवायचा तुम्हीच सांगा ?
- Log in or register to post comments
र
रॉजरमूर
Wed, 08/24/2016 - 18:20
नवीन
@ झपाटलेला फिलॉसॉफर
व्हाट्स अप फॉरवर्ड ची पोस्ट जशीच्या तशी इथे डकवलीत तुम्ही ?
गेले काही दिवसापासून ही अजब पोस्ट फिरत आहे .
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 08/22/2016 - 20:05
नवीन
हे पण वाचून घ्या
http://m.thehindu.com/news/national/india-to-develop-irans-chahbahar-port/article8637558.ece
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 08/24/2016 - 05:47
नवीन
आपणच इतर एका धाग्यावर म्हणल्याप्रमाणे, ही धोरणे अन कार्ये "एका पार्टीची नसून" भारत सरकारची आहेत, असे मानायला हरकत नसावी न सर?
- Log in or register to post comments
क
किंबहुना
Wed, 08/24/2016 - 06:06
नवीन
अर्थात. पण एखादे धोरण चांगले निघाले, किंवा ते वेगाने पुढे रेटले, आणि त्यामुळे फायदे दिसून आले तर त्याचे श्रेय मॅनेजमेंटला द्याल की नाही?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 08/24/2016 - 06:26
नवीन
=)) हेच लॉजिक कॉन्ग्रेसला लावायला कचरतात लोक असं निरिक्षण आहे.
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
Wed, 08/24/2016 - 06:32
नवीन
ज्या गतीने प्रगती व्हायला हवी होती त्या गतीने झाली का काँग्रेस च्या काळात?
काँग्रेस ला घोंगडी भिजत ठेवायला आवडतं असं निरीक्षण आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 08/24/2016 - 06:45
नवीन
एखादे धोरण चांगले निघाले, किंवा ते वेगाने पुढे रेटले, आणि त्यामुळे फायदे दिसून आले तर त्याचे श्रेय मॅनेजमेंटला द्याल की नाही?
मुद्दा फक्त एवढाच आहे. एवढ्याबद्दल बोला.
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
गुरुवार, 08/25/2016 - 16:49
नवीन
I am talking about the speed only sir. In congress governence, things moved very slow. How we can give credit about something which took double time than required?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 08/25/2016 - 22:17
नवीन
Do you believe in theory of relativity?
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
गुरुवार, 08/25/2016 - 22:23
नवीन
हा हा लय भारी प्रतिसाद. बहुतेक हा धागा हिंदू-मुस्लीम, बलुचिस्तान, भाजप सरकार मार्गे आईन्स्टाईन वर पोहचला. शेवटी देव आहेत हे मान्य करून धाग्याचा समारोप होईल. सगळ्यांनी ह.घ्या.हि.वि.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »