बलुचिस्तानचा स्वातन्त्र्यलढा अन पाकिस्तानचे भविष्य
पाकिस्तान विषयी चर्चा करताना काही मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
१. पूर्वीच्या हिन्दुस्थानातील (ब्रिटिश इन्डिया) वायव्य सरहद्द प्रान्त आणि पूर्व बंगाल हे प्रान्त मागण्याचा मुस्लिम लीग ला तसा काहीच अधिकार नव्हता . वस्तुतः हे बहुतांश मुस्लिम आक्रमकांच्या छळबळाने कन्व्हर्ट झालेले मूळचे हिन्दूच होते. परंतु हिन्दु धर्ममार्तंडांच्या कपाळकरंटे पणामुळे या हिन्दु धर्मपासून विलग झालेल्या मोठ्या जनसंख्येचे पुन्हा हिन्दु धर्मान्तर करून घेतले असते तर काश्मिर, पाकिस्तान , अतिरेकी इत्यादि विसाव्या आणि एकविसाव्या शतकात भेडसावणार्या डोकेदुखीचा समूळ नाश कित्येक शतके आधीच झाला असता. त्यातच ब्रिटिशान्च्या "फोडा झोडा आणि गुलाम बनवून राज्य करा" या कुटिल नीतीमुळे मुस्लिम समाजातील फुटीर अणि मूलतत्त्वावादी संघटना वाढत गेल्या ... त्यातूनच पुढे दार-उल-इस्लाम "पाक"स्तान ची मागणी पुढे आली.
२. आज कोणीही कितीही शान्ती आणि मैत्रीच्या गप्पा मारल्या तरी पाकिस्तान हा विषारी साप आहे. आणि त्याला कितीही दूध पाजले तरी तो आपला विषारी डन्ख मारणे सोडणार नाही हे भाजपच्या पहिल्या राजवटीत वाजपेयीना आणि दुसर्या राजवटीत मोदीजीना पहिल्या दोन वर्षात चांगलेच समजून चुकले आहे. यास्तव चर्चा /शान्तिप्रक्रिया हे पारम्पारिक गुर्हाळ बन्द करून डिफेन्सिव्ह च्या ऐवजी ऑफेन्सिव्ह अॅक्शन वर भर देण्याच्या मनस्थितीत सध्या मोदी सरकार दिसत आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभल आणि खुद्द प्रधानमन्त्री नरेन्द्रजी मोदींच्या अलिकडच्या भाषणे/ वक्तव्यावरुन तसे प्रतिबिम्बित होत आहे.
३. नजिकच्या भविष्यकाळात भारत आर्थिक दॄष्ट्या सुपरपॉवर बनण्याकडे वाटचाल करीत असताना अन्तरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणून पाकिस्तानला एकटे पाडणे आणि त्याबरोबरच बलुचिस्तान/ गिलगिट -बाल्टिस्तान आणि पाक-अधिकॄत काश्मिर मधल्या पाक सैन्याच्या अत्याचाराना हायलाइट करणे तसेच बलुचिस्तानच्या स्वातन्त्र्यलढ्यास नैतिक आर्थिक/ लष्करी मदत पुरवून पाकिस्तानचे तुकडे पाडून सम्पवणे हाच पाकिस्तानच्या समस्येवरचा जालिम अन रामबाण इलाज आहे ,असे माझे स्पष्ट अन प्रामाणिक मत आहे . येणार्या काळात पाकिस्तानात निर्नायकी माजून जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नाहीसा झाला,तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही!
जय हिन्द ! जय भारत!
💬 प्रतिसाद
(160)
अ
अभिजीत अवलिया
गुरुवार, 09/01/2016 - 14:54
नवीन
सहमत ...
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 09/02/2016 - 06:32
नवीन
अर्थात सहम्त
- Log in or register to post comments
N
nashik chivda
गुरुवार, 09/01/2016 - 12:17
नवीन
:)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 09/02/2016 - 09:14
नवीन
मोदींच्या भाषणातील बलुचिस्तानच्या उल्लेखामागील हेतूमागचे उत्तम व अचूक विश्लेषण -
http://m.rediff.com/news/interview/modi-and-the-indians-just-discovered-the-b-bomb/20160902.htm
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 09/02/2016 - 11:19
नवीन
अजून एक चांगले पाऊल -
http://indiaarising.com/breaking-modi-govts-strongest-decision-ever-no-air-tickets-hotel-services-kashmir-separatist-leaders-soon/
Srinagar: In a major development, the Modi government is readying to stop all the government facilities meted out to separatist leaders in Jammu and Kashmir. This is one of the masterstroke decision of Modi government as the terror apologists and separatists are taking India for granted on Kashmir issue. This will stop their propaganda travels in and outside India and Modi government may revoke the passport of all these anti-indian people.
A report published in Amar Ujala said the Centre plans to stop providing air tickets, hotel and taxi services to the separatist leaders Syed Ali Shah Geelani, Mirwaiz Farooq and Yasin Malik during foreign tours.
The Bharatiya Janata Party-led regime has also asked J&K government-led by Chief Minister Mehbooba Mufti to stop the same provided by the state government, the report stated.
The decision to remove remove the security cover provided to the separatist leaders has to be taken by the state government. At present, 950 cops are on duty to guard the leaders.
For the last 55 days, life has remained totally paralysed in Kashmir due to curfew and protest shutdown called by the separatists, ever since Hizbul Mujahideen terrorist Burhan Wani’s encounter.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 09/02/2016 - 11:37
नवीन
गुरुजी, मूळ बातमीची लिन्क कोण्या चांगल्या मोठ्या वृत्तपत्रात मिळेल काय?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 09/04/2016 - 11:20
नवीन
या बातमीच्या बर्याच लिंक्स आहेत (झी न्यूजची सुद्धा आहे), परंतु मोठ्या वृत्तपत्राच्या बातमीची लिंक सापडली नाही. ज्या लिंक्स सापडल्या त्यात 'अमर उजाला'चाच संदर्भ दिलेला आहे. त्यांनी स्वतःचे संदर्भ दिलेले नाहीत. त्यामुळे ही बातमी खरी नसावी असा माझा अंदाज आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 09/04/2016 - 12:02
नवीन
वाटले होतेच, मीही शोधलं पण मिळालं नाही म्हणून तुम्हाला विचारलं, एनिवे धन्यवाद!
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Fri, 09/02/2016 - 12:32
नवीन
सय्यद शाह अलि गिलानीला तर भारताने पासपोर्ट सुद्धा नाकारलेला आहे.
त्याच कारण अस की ज्या माणसाला भारताचा पासपोर्ट मागायचा असतो त्याला त्या पासपोर्ट फॉर्म वर मी भारतीय नागरीक आहे अस लिहुन द्यायला लागत. ते गिलानीला मान्य नाही, आणी अश्या फॉर्म शिवाय भारत सरकार पासपोर्ट देत नाही !!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 09/04/2016 - 11:29
नवीन
गिलानीने शेवटी पारपत्राच्या अर्जावर आपण भारताचा नागरिक असल्याचे (नाईलाजाने) लिहिल्यामुळे त्याला तात्पुरते ९ महिने मुदतीचे पारपत्र दिले आहे. सौदी अरेबियातील आपल्या वृद्ध बहिणीला भेटण्यासाठी त्याने पारपत्राची मागणी केली होती. आपल्या पहिल्या अर्जात त्याने राष्ट्रीयत्व/देशाचे नाव या रकान्यात भारत हे नाव न लिहिता काश्मिर हे चुकीचे नाव मुद्दाम लिहिल्यामुळे त्याचा पारपत्र अर्ज नामंजूर झाला होता. आपण देशाचे नाव भारत असे लिहिल्याशिवाय आपल्याला पारपत्र मिळणारच नाही याची जाणीव झाल्यानंतरच नाईलाजाने त्याने देशाचे नाव भारत असे लिहिले व नंतरच त्याला पारपत्र मिळाले. अर्थात अर्ज भरल्यानंतर 'आपल्याला अत्यंत नाईलाजाने देशाचे नाव भारत लिहावे लागले. प्रत्यक्षात मी भारत हा माझा देश मानत नाही. काश्मिर हाच माझा देश आहे' असे तो पत्रकारांसमोर बरळला होता.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4