Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दलित हिंदु नाहित का?

प
प्रतापराव
Mon, 10/17/2016 - 16:26
🗣 253 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, लेख वैगरे लिहणे हे नेहमीच मला माझ्या आवाक्याबाहेरचे वाटते. मनात बरेच विचार असतात एखाद्या विषयावर मत असते पण ते शब्दबध्द करणे जमेलच याची खात्री नसते.वटवट ह्या आयडींचा हिंदच धर्मावर आधारीत एक लेख आहे त्यात ते हिंदच धर्माचे समर्थक का आहेत याची त्यांनी कारणे लिहलित. क्रमांक २चे कारण मला पटले नाही. त्याबद्दल प्रतिक्रिया दिली असता त्यांच्या म्हणण्यानुसार चर्चा करण्यासाठी त्यांनी दुसरा धागा काढावा त्यावर चर्चा करु असे म्हटले म्हणुन हा धागाप्रपंच.मला एकतर निट चर्चा करता येत नाही सखोल अभ्यासाचा अभाव हे त्यामागचे कारण असावे.तरी इतरांनीही ह्या मुद्दयावर प्रतिक्रिया देउन अज्ञान दुर करण्यास सहाय्य करावे. कारण नं २ मध्ये एका फेसबुकपोस्ट वर वाचलं होतं कि ह्या भारतात फक्त तिघांच्याच मरणाची दाखल घेतली जाते. एक तर दलित, मुस्लिम किंवा जनावरे... हिंदूंच्या मरण्याची दखल कोणीच घेत नाही. आणि तसेच आहे वास्तवात सुद्धा... इतरांच्या मरण्याची दखल घेणाऱ्यांना विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष म्हटलं जातं. आणि हिंदूला जर कोणी मारलं आणि जर कोणी त्याबद्दल आवाज उठवला तर त्याला हिंदुत्ववादी म्हणून हिणवलं जातं, हेतुपुरस्सर. ह्यावर मी त्यांना दलित हिंदुत येत नाही का?असे विचारले होते.

प्रतिक्रिया द्या
39069 वाचन

💬 प्रतिसाद (253)
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 10/20/2016 - 13:26 नवीन
या काळात लग्न हा निव्वळ वैयक्तीक व्यवहार नाही हे म्हणणे धाडसाचे वाटते. अजूनतरी भारतात लग्न ही वैयक्तिक बाब झाली आहे असे दिसत नाही. म्हणजे स्वतःच्या बापाला 'इट इज नॉट कप ऑफ युअर टी. माईंड युअर ओन बिजनेस' असे म्हणणारे अजून मायनॉरिटी पर्सेंटेजमधे आहेत. की रोटीबेटी हा एकमेव मार्ग माझ्यासाठी बंद झाल्याने मी आता आयुष्यभर दलितविरोधी म्हणून शिक्का मारुन घ्यायचा ? गैरसमज होतो आहे. तुम्ही म्हणत आहात तो मायक्रो लेव्हल वरचा विचार आहे. जे जातीपाती मानणारे आहेत ते अपरिवर्तनीय मानले तरी त्यांच्या अपत्यांना मातुल आणि पितॄल असे दोन्ही बाजूंचे सगेसोयरे असतात. अशा २-३ पिढ्या गेल्या तर परिवर्तनाची शक्यता निर्माण होते. ही एक लांब प्रक्रिया आहे. मी संपुर्ण शाकाहारी आहे तर मी माझे आहार स्वातंत्र्य जपायचे की समोरच्याला प्रसन्न करण्यासाठी तो जे देईल ते खावे ? तुम्ही तुमच्या आवडीनुसार खावे. पण कोणत्या स्वयंपाकघरात पदार्थ बनला यावर शाकाहारी की मांसाहारी हे ठरवू नये. तुम्ही सजातीय विवाहास दखलपात्र गुन्हा मानावयास सांगता आहात मग एखाद्याला पुरुषाला / स्त्रीला गे-लेस्बियन राहायचे आहे तर त्याला देखील दुसर्‍या जातीतील पुरुष / स्त्री शोधणे कंपल्सरी करावे काय ? हा वेगळा मुद्दा आहे. विषयाशी संबंधित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 10/20/2016 - 14:17 नवीन
आंतरजातीय लग्न हा जातीअंताचा मार्ग कसा, हे समजले नाही. लग्न झाल्यावर नवर्‍याची जात लागणार नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 10/20/2016 - 14:37 नवीन
लग्न झाल्यावर नवर्‍याची जात लागणार नाही का? त्याच्या पिढीत अपत्य्/नातवंडे/पतवंडे/ खापर पतवंडे कोणीतरी स्त्री असेलच ना. तिची जात नाही का बदलणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अंतरा आनंद गुरुवार, 10/20/2016 - 15:26 नवीन
नाही लागत. तसंही जात जन्माने ठरते असं म्हट्लं तर लागयं संयुक्तिकही नाही. काही बळे बळे लावतात ते वेगळं. काही वर्षांपूर्वी ( माझ्या आठवणीप्रमाणे ९७-९८ च्या सुमारास) कोर्टाने आरक्षण-पात्र जात नसलेल्या स्त्रियांनी आरक्षण-पात्र जातीत लग्न केले तरी नवर्^याच्या जातीचे फायदे घेता येणार नाही असा निकाल दिला होता. त्यांच्या अपत्यास मात्र वडिलांची जात लागेल. अर्थात माझा कायद्याच्या अभ्यास नाही परंतू ही बातमी लक्षात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 10/21/2016 - 05:51 नवीन
लागणार असेल अपत्यास तर काय फायदा आंतरजातिय विवाह जातिअंताचा मार्ग म्हणुन? जात्यांतर होईल फार्फारतर! त्याव्यतिरिक्त काहीही नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
C
chitraa Fri, 10/21/2016 - 06:14 नवीन
आई वडील यातले कुणीही एक जरी आरक्षित जातीतील असेल तरीही अपत्याला आरक्षणाचा लाभ मिळू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
स
सुबोध खरे Fri, 10/21/2016 - 07:37 नवीन
आईच्या जातीचा फायदा होतो हे कुठे आहे? विदा द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 10/21/2016 - 08:14 नवीन
ह्याबद्दल बोलत असावेत ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 10/21/2016 - 08:23 नवीन
एवढे सोपे नाही ते बापूसाहेब. मुलाला आईच्या जातीचा फायदा मिळण्यासाठी हे सिद्ध करावे लागते कि त्याला आईने वाढवले आणि पालनपोषण केले आणि वडिलांच्या उच्च जातीचा कोणताही फायदा मिळालेला नाही. बहुसंख्य बाबतीत राज्याचे कायदे हे वडिलांच्या जातीवर आधारितच आहेत. त्यामुळे या तर्हेच्या केसेस या अपवादात्मक आहेत. आणि ते सुद्धा मागासवर्गीय म्हणून फायदा मिळवण्यासाठी न्यायालयात जाऊन सिद्ध करावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
C
chitraa Fri, 10/21/2016 - 10:00 नवीन
म्हणजे तुमचाही धर्म पुरुष्धार्जिणाच आहे. बाप आरक्षितत असेल तर त्याच्या नुसत्या सर्टिफिकेटवर मुलाला आरक्षण मिळते. आईला मात्र तिच्या जातीमुळे मुलाला त्रास्दायक जीवन जगावे लागते हे सिद्ध करावे लागते ( असे तुम्ही म्हणताय... माझ्या माहितीनुसार तरी आईच्या जातीवरही मुलाला रिजर्वेशन बेनेफिट हवे असेल तर मिळू शकते. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 10/20/2016 - 14:42 नवीन
सजातीय विवाह हा दखलपात्र गुन्हा मानला जावा. लग्न हा "मूलभूत अधिकार" असल्याने आपले वरील विधान घटनेच्या विरोधात असल्याने ते कायद्यात बसवता येणार नाही. कदाचित आंतरजातीय विवाह केलेल्यांच्या मुलांना आरक्षण देता येईल तेसुद्धा आई मागास वर्गीय असेल तर( वडील मागासवर्गीय असतील तर आरक्षण आहेच.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
प
पुंबा Tue, 10/18/2016 - 10:25 नवीन
बाडिस.. दीर्घ लिहा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
C
chitraa Tue, 10/18/2016 - 09:50 नवीन
...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
C
chitraa Tue, 10/18/2016 - 09:50 नवीन
...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
अ
अंतरा आनंद Tue, 10/18/2016 - 10:14 नवीन
खरय. "द्लितांना मुख्य प्रवाहात आणणे" असा काहिसा मुद्दा चर्चेत असताना समोर पडलेला लोकसत्ताचा वास्तुरंग उचलून एक मित्र म्हणालेला "यातली घरांची वर्णनं वाचता ना? कधी प्रश्न पडतो का की हे लिहीणारा कोणी दलित कसा काय नाही?कुठून लिहीणार आम्ही. आमचे मायबाप- आजा पणजा सगळे गलीच्छ झोपड्यात राहणारे आणि आता कुठे दोन खोल्यांची घरं मेहनतीवर घेतली तर तुमच्या डोळ्यावर यायला लागली का?"
थोडक्यात एखादा दलित शहरात राहतो नोकरी करतो तो जेव्हा गावी जातो तेव्हा त्याच्या राहणीमानात फरक पडलेला गाव पाहते. तो शहरात नेमका कुठल्या खुराड्यात राहतो त्याच्याशी त्यांचा संबंध नसतो. हे आपल्याकडून मागून खाणारे लोक आज श्रीमंत बनत आहेत आपले पोर मात्र शेतात राबत आहे हि सल असते. आणि ह्याला कारणीभूत ते आरक्षणाला धरतात.आर्थिक आधारावर आरक्षण मागणाऱ्यांच्या मनात स्वतःला आरक्षण मिळण्यापेक्षा ह्यांचे आरक्षण कसे काढून घेता येईल हि चिंता असते
खरय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
श
शाम भागवत Tue, 10/18/2016 - 10:36 नवीन
सहमत. तुम्ही जरूर लिहा. तुम्ही मुद्देसूद लिहू शकताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
प
प्रतापराव Tue, 10/18/2016 - 10:01 नवीन
जास्त टक्के घेणाऱ्या मुलांवर आरक्षणाने अन्याय होतो असे म्हंटले जाते परंतु आय आय टी, आय आय एम सारख्या संस्थांवर भारत सरकार करोडो रुपये खर्च करते त्यातील पास झालेली मुले हि भारतातच राहून नोकऱ्या करतात कि अमेरिकेकडे व युरोपकडे जाण्यासाठी हे शिक्षण घेतात हा डेटा काढला तर बराच रोचक ठरेल.या उलट होमिओपॅथी, आयुर्वेदिक वाली मुले खेड्यापाड्यात जाऊन जास्त आरोग्यसेवा देतात असे माझे निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रतापराव Tue, 10/18/2016 - 10:43 नवीन
ह्या धाग्याचा विषय वेगळा आहे वटवट ह्यांनी त्यांच्या विधानामागची भूमिका सांगितली विषय संपला. परंतु प्रतिसादात आर्थिक आरक्षण बाबत काहींची प्रतिक्रिया आली आहे त्याला अनुसरून थोडे लिहितो. जर आपल्या इथली जातीव्यवस्था हि फक्त आर्थिक असती तर आरक्षणाचा आधार हा आर्थिक असायला हरकत नव्हती परंतु जातीव्यवस्था हि आर्थिक शोषण तर करतेच त्यासोबत सामाजिक, मानसिक, शैक्षणिक आणि राजकीय शोषणही करते. फक्त आर्थिक आधारावर आरक्षण दिले तरी ह्या सापाची इतर चार तोंडे हि जिवंतच राहतायत. जातीमुळे हजारो वर्षे झालेल्या मानवी समूहाच्या नुकसानीची भरपाई हि जातीच्याय आधारावर करायला लागेल .आणि जातीव्यवस्था हि एक शोषण व्यवस्था असल्याने तिच्या उतरत्या क्रमात शोषणाची तीव्रता वाढत जाते . त्यामुळेच विशिष्ट जातींचा मागासलेपणाशी सरळ संबंध प्रस्थापित होतो.आरक्षणामुळे कामाचा दर्जा घसरतो कमी गुणवत्तावान कर्मचारी मिळतात हा हि एक गैरसमज आहे. आपल्या संरक्षण विभागात आरक्षण नाही तरी बोफोर्स,तहेलका सारखे मामले ह्याच विभागातून बाहेर आलेले आहेत. देशातील वर्णव्यवस्थेने आमच्यावर हजारो वर्षे शस्त्रबंदी,शिक्षशिक्षण बंदी केली. स्वतः 100 % रिझर्व्हशन घेतले त्या मंडळींना अवघ्या 65 वर्षात तेही 50% आरक्षण दलितांना मिळाले त्यातही शेकडो जाती तरी लोक वैतागतात म्हणजे काय? आणि दलित हिंदूच आहेत ना तर मग आपल्या गरीब बांधवांना घटनेने आरक्षण देऊन पोटापाण्याचा लावले, शिक्षणाची सोय केली तर श्रीमंत भावाच्या पोटात का दुखावे? ह्यालाच बंधुभाव हम सब एक है म्हणतात का ?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 10/19/2016 - 08:27 नवीन
मोठ्या भावांनी कृपया प्रतिउत्तर द्यावे...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
म
मराठी कथालेखक Tue, 10/18/2016 - 10:49 नवीन
OBC आरक्षण आधी हटवावे OBC आरक्षणामुळे नंतर सबळ /संपन्न आणि सामाजिकदृष्ट्या उच्चस्तरात मोडणार्‍या सर्वच जातींना आरक्षण हवे हवेसे वाटू लागले (उदा: पटेल, जाट, मराठा). OBC मधल्या कोणत्या जातींवर भूतकाळात अन्याय झाला म्हणून त्यांना आज आरक्षणाची गरज असावी. दलितांचे आरक्षण असू द्यावे पण त्याचे निकष हळूहळू बदलावेत (अर्थिक निकष , अधिवास -शहर्/ग्रामीण) आणि नंतर टप्प्या टप्प्याने सगळेच आरक्षण बंद करावे. दलितांवर जातीमुळे अन्याय होणार नाही याकरिता कायद्याची कडक अंमलबजावणी असावी, अन्याय करु पहाणार्‍यांपासून संरक्षण असावे
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 10/18/2016 - 10:51 नवीन
मंडल पर्यंत आरक्षण प्रकार उत्तम चालू होता. त्यानंतर प्रत्येकाला आपण मागास असल्याची भावना आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
प
पुंबा Tue, 10/18/2016 - 10:57 नवीन
मुळात आरक्षण आहे म्हणून दलितांना जसं हिणवलं जातं तसं ओबीसींना जात नसल्याने, मराठा आदी जातींना आपला उच्चतेचा डौल कायम राखून आरक्षणाचे फायदे मिळावे असं वाटू लागलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
स
स्वधर्म Tue, 10/18/2016 - 15:06 नवीन
अोबीसी मध्ये ३४६ जाती अाहेत. लोकसंख्या किती अाहे, ते बहुधा (जनगणनेनुसार) जाहीर केलेले नाही. मिपावरच अालेल्या एका धाग्यात ती लोकसंख्या ५१% असावी असे वाचल्याचे अाठवते. तसे असेल, तर ५१% अोबीसींना १९% जागा राखीव अाहेत. युपीएससी व इंजिनिअरींगचे कट अॅाफ गुण पाहिले, तर अोबीसी व अोपन मध्ये काही फरक नाही, तर एससी एनटी चे गुण काही नाममात्र कमी अाहेत. एवढी मोठी अोबीसी लोकसंख्या केवळ १९%त सामावल्याने तिकडेही प्रचंड स्पर्धा अाहे. नक्कीच रूढ अर्थाने फायदेशीर अारक्षण वाटत नाहीये. खुल्या जातसमूहांची लोकसंख्या किती व त्यांना मिळणार्या जागा ४८% असतील तर, खरंच अोबीसींच्या अारक्षणाने नक्की कुणाचा फायदा होत अाहे, हे तपासावे लागेल. अर्थात यावर, अोबीसी उमेदवार खुल्या जागांवर अर्ज करू शकतात, पण खुले अोबीसी गटात नाही असे म्हणाता येते, पण खरोखरच कुणी अोबीसी खुल्या जागेवर अर्ज करेल का? जर राखीव जागा अाहेत, तर का खुल्या जागांसाठी अर्ज करा अशी मानसिकता अाहे. नक्की लोकसंख्या प्रवर्गनिहाय जाहीर केल्यावरच काही ठोस सत्ये समोर येतील, पण हे करणार कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Tue, 10/18/2016 - 15:27 नवीन
तुम्ही म्हणता ते (OBC मधली स्पर्धा) हा मुद्दा खरा आहेच. पण मग म्हणूनच OBC ना आरक्षण का हवय हा प्रश्न आहे ना ? मग open मध्येच स्पर्धा करु देत ना, आणि मुख्य म्हणजे माझ्या लिहण्याचा मुद्दा आरक्षण गुणवत्तेला मारक वगैरे नाहीच. पण OBC ना आरक्षण दिल्यानंतर हळूहळु अनेक मागास नसलेल्या जाती आरक्षण मागू लागल्या आहेत. थोडक्यात आरक्षण मागण्याचे लोण वाढत चालले आहे पण त्याचे मूळ OBC आरक्षणात आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म Tue, 10/18/2016 - 16:13 नवीन
पण मग म्हणूनच OBC ना आरक्षण का हवय हा प्रश्न आहे ना ?
याचं उत्तर अज्ञान, असंही असू शकेल. कारण जास्त लोकसंख्येला कमी प्रमाणात जागा असतील, तर अारक्षणामुळे तोटाच होणार हे स्पष्ट अाहे.
…मग open मध्येच स्पर्धा करु देत ना,
बरोबर, कदाचित ते अोबीसींच्या फायद्याचंही असू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
स्वधर्म Tue, 10/18/2016 - 16:22 नवीन
सध्या खुल्या गटासाठी ४८% जागा राखीच अाहेत, तर भारताची खुल्या गटात येणारी लोकसंख्या किती? ती ४८% असेल असे वाटत नाही. मग अारक्षणाचा फायदा खुल्या गटालाच होत असू शकातो. हे सगळं नीट स्पष्ट व्हायचं असेल, तर जनगणनेतील प्रवर्गानुसार लोकसंख्या जाहीर व्हावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
S
sagarpdy Tue, 10/18/2016 - 16:31 नवीन
खुल्या वर्गातील जागांवर आरक्षणास पात्र उमेदवाराला प्रवेश घेता येत नाही असे तुम्हाला वाटते का? संसदेत 33% आरक्षण हा महिलांवर अन्याय / पुरुषांस लाभदायक असा प्रकार आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
N
NiluMP Tue, 10/18/2016 - 19:54 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
अ
अंतरा आनंद Wed, 10/19/2016 - 06:37 नवीन
अगदी सहमत. त्याच बरोबर टप्प्या ट्प्प्याने द्लित आरक्षण हटवण्यासाठी मुळात जातीं दिसतात ते बंद व्हायला हवे. ज्यांना आरक्षण नाही त्यांची जात सरकारदरबारी नोंदविण्याची गरज काय? दलित आरक्षणसुद्धा एका कुटुंबात एका पिढीला शिक्षण+ नोकरी, पुढील पिढीला फकत शिक्षणात आणि नंतरच्या पिढीला आरक्षण नाही + जातीचा उल्लेख नाही, अश्या स्वरूपाचा कार्यक्रम आखायला हवा. कठीण आणि अश्यक्य कोटीतले वाटले तरी तीच गरज आहे. आपल्याला भारतीय म्हणून एकसंध रहायचे असेल तर जाती समाजव्यवस्थेतूनच जायलाच हव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ग
गंम्बा Wed, 10/19/2016 - 08:56 नवीन
दलित आरक्षणसुद्धा एका कुटुंबात एका पिढीला शिक्षण+ नोकरी, पुढील पिढीला फकत शिक्षणात आणि नंतरच्या पिढीला आरक्षण नाही + जातीचा उल्लेख नाही, अश्या स्वरूपाचा कार्यक्रम आखायला हवा.
हे असेच करायला हवे होते. असे केले असते तर सध्या इतका आरक्षणाला विरोध दिसला नसता. मु़ख्य म्हणजे आरक्षणाचे फायदे अनेक पटीने जास्त दिसुन आले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
अ
अनुप ढेरे Wed, 10/19/2016 - 08:59 नवीन
आरक्षणाची गरज अनेकांना पटते. इतकी वर्ष एवढा राग दिसला नाही. पण आरक्षण संपणार केव्हा याबद्द्ल कधीच कोणीच काहीही विचार मांडलेला दिसला नाही म्हणून राग जास्तं दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
अ
अजया Wed, 10/19/2016 - 19:16 नवीन
अंतराच्या प्रतिसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
प
पुंबा गुरुवार, 10/20/2016 - 09:31 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
द
दा विन्ची Fri, 10/21/2016 - 07:11 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
न
नगरीनिरंजन Tue, 10/18/2016 - 11:01 नवीन
आर्थिक निकषावर आरक्षण हे शब्द वाचले की हसूच फुटतं राव. खूप गरीब मंडळी पाहिलेली आहेत. आमच्या नगरमध्ये वडील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असलेला, स्वतःचे मंगल कार्यालय असलेला आणि मोक्याच्या जागी फक्त तीनच मजली इमारत असलेला एक गरीब मित्र होता. वार्षिक उत्पन्न रुपये फक्त सोळाहजारच असल्याने बिचार्‍याने सरकारी शिष्यवृत्ती मिळवून बारावी नंतरचे व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले. आरक्षणाअभावी गेल्या दहा वर्षात तीन मजल्यांवर फक्त दोनच मजले चढले आहेत बिचार्‍याचे. पुण्याच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजातही अशीच गरीब मुलगी होती. जळ्गावला फक्त काहीशे एकर जमिनीवर बिचारीची उपजिविका कशीबशी चालत होती. सरकारी योजनेतून फुकट पुस्तके घेऊन शिकली बिचारी. फार गरिबी.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Tue, 10/18/2016 - 11:13 नवीन
सध्याच्या मोर्चा संबंधात जातीचे आम्ही . पण गावात काय परिस्थिती आहे आम्हाला माहित आहे. कोल्हापूर ला आमच्याकडे काय काय झालंय सांगता येणार नाही. दलितांशी काय वागतात ते हि सांगता येणार नाही.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 10/18/2016 - 11:17 नवीन
दलित हिंदू आहेत की नाहीत हे तेच जास्त अधिकाराने सांगू शकतील. आंबेडकरांनी बौद्धधर्म स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातल्या बर्‍याचशा अस्पृश्य मानल्या जाणार्‍या लोकांनी बौद्ध धर्म अंगिकारला. अशाच एका नवबौद्ध लग्नात नवरा-नवरीला दिल्या जाणार्‍या शपथांपैकी 'मी हिंदू धर्मातील गणेशादि देवतांची पूजा करणार नाही' ही एक शपथ होती. सदर जातीव्यवस्था मानणार्‍यांनी काही बोलणं योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 10/18/2016 - 11:53 नवीन
MTNL च्या एका ऑफिसात एक अधिकारी बौद्ध होता आणि त्याच्या हाताखालच्या स्टाफमधले काही बौद्ध होते...नुकतेच त्यांनी ऑफिसातले गणपती आणि इतर देवतांचे फोटो काढून टाकले...या कृतीला काय म्हणावे? आधीच्या पिढ्यांवर अन्याय झाले हे मान्य पण आता त्या ऑफिसातले बाकी लोक समानतेने वागत असताना असे करणे हा मुर्खपणा नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
C
chitraa Tue, 10/18/2016 - 12:09 नवीन
इतर धर्माचे लोक त्यांचे फोटू लावतात का ? मुसलमानानी अन्याय केला म्हणुन त्यांची मशीद पाडणे , औरंगजेब रस्त्याचे नाव बदलणे हे हिंदुनी केले तर चालते. मग हिंदुंचे देव बौद्धानी काढले तर ते चुकीचे कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सूड Tue, 10/18/2016 - 14:57 नवीन
ट्रोलांना भीक घालायची नाही असं मत असल्याने पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 10/20/2016 - 12:03 नवीन
सार्वजनिक कार्यालयात सर्व प्रकारच्या धर्मांची / जातींची माणसे काम करत असली तर कोणा एका धर्माच्या देवाचे फोटो काढणे योग्य ठरणार नाही. मुळात सरकारी / सार्वजनिक कार्यालयात देवांचे फोटो लावूच नयेत असे माझे मत आहे. आपला देव आपल्या देवघरात आणि हवेच असतील तर आपल्या टेबलावर / डेस्कटॉप वॉलपेपरवर ठेवावा असे मला वाटते. अर्थात कार्यालयतील कोणाला आक्षेप नसेल तर देवांचेच काय, नटनट्यांचे फोटो लावले तरी हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
अ
अंतरा आनंद Fri, 10/21/2016 - 11:32 नवीन
+१ सरकारी कार्यालयातल्या पुजा वैगेरेही बंद झाल्या पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
म
मार्मिक गोडसे Fri, 10/21/2016 - 12:26 नवीन
सरकारी कर्मचार्‍यांच्या धार्मिक सुट्ट्याही बंद केल्या पाहीजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
त
तुषार काळभोर Fri, 10/21/2016 - 13:39 नवीन
साप्ताहिक सुट्ट्या (५२ किंवा ७८ किंवा १०४) स्वातंत्र्यदिन प्रजासत्ताक दिन आणि अजून ७-१० सुट्ट्या ज्या धर्म-जाती-पंथविरहित आहेत, अशा असाव्यात. (खाजगी कंपन्यांमध्ये गणपती विसर्जन-दसरा-दिवाळी या हिंदू सणांच्या सुट्ट्या असतात व इतर धर्मिय सणांच्या शक्यतो नसतात. पण सरकारी कार्यालयांमध्ये असा दुजाभाव करता येणार नाही.) बाकी रजा असतातच, ज्या सणांना वापरता येतील. (आताही इतर धर्मिय कर्मचारी खाजगी संस्थांमध्ये रजा घेऊनच त्यांचे सण साजरे करतात.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
व
वटवट Tue, 10/18/2016 - 12:15 नवीन
कोणी कितीही कसल्याही कांड्या पिकवोत... जोपर्यंत आरक्षण आहे. समाजात समानता नांदत नसते... उच्चंशिक्षित लोकं संधी मिळताच परदेशात स्थायिक होतील. कोणी कितीही देशप्रेमाच्या गाथा ऐकवोत, जेंव्हा विषय करियरचा असतो तेंव्हा परदेशातली मोठाल्या पगाराची नोकरी लाथाडून कोणीही भारतात कमी पगाराची नोकरी करणार नाही (अपवाद हे अपवादातच असता) ब्रेन ड्रेन दणक्यात चालूच आहे.. नुकत्याच लॉच्या पहिल्या वर्षाच्या ऍडमिशन्स संपल्या. माझी बहीण वैतागून म्हणत होती... इतकी आरक्षणाने बजबजपुरी माजलीये वाटतं कि देश सोडून जावं... (तिच्या मुलीला खूपच चांगले मार्क्स होते म्हणून तिला आयएल्स मिळालं, आणि तिच्यासोबत तिच्यापेक्षा अर्धे मार्क्स असणारी होती, अर्थातच प्रिव्हिलेज्ड क्लासची) अर्थात तिची ऐपत आहे. ती जाईलपण कदाचित काही वर्षात.... मीपण तोच विचार करत होतो... पण काय करणार पैसे नाहीत ना भाऊ... अजून आरक्षण वाढवा... जाणारे बाहेर जातील... वाद घालणारे वाद घालतील... आणि बाहेर जाणाऱयांच्या देश्प्रेमावर प्रश्न उठवत राहतील...
  • Log in or register to post comments
C
chitraa Tue, 10/18/2016 - 13:15 नवीन
कायच्या काय लॉजिक ! आय आय टी तून बाहेर पडलेले हुशार असतातच व कितीही आरक्षण असले तरी ते भारतात नोकरी मिळवू शकतीलच की! पण तरीही भारतात आरक्षण आहे हे कारण सांगून ते पळ काढतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
स
सुखीमाणूस Wed, 10/19/2016 - 04:19 नवीन
इथे जी बजबजपुरी माजली आहे कोन्ग्रेसच्या चुकिच्या धोरणान्मुळे त्यावर हा उपाय शोधला आहे. परदेशी ते परकिय असतिल त्यामुळे तिथे कधिही धोका सम्भवु शकतो आणि भारतात कायमच गळचेपी आहे मग परदेश निवडलेला काय वाइट आणि ते डौलर पाठवतात त्याचा फायदाच होतो बान्गलादेशी एथे येउन घाण वाढवतात भारतिय मात्र परदेशात शान वाढवतात (काही अपवाद वगळता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
C
chitraa Wed, 10/19/2016 - 05:32 नवीन
भाजपेयीचे १३ दिवस + ५ वर्षे + मोदींची ३ वर्षे .... यात हुशार लोकानी घरवापसी का केली नाही? आणि गुजरातेत तर मोदी पंधरा वर्षापासून आहेत.. खुद्द मुंबैतही मनपात सेना भाजपाच आहे. तिथे का नाही हुश्शाअर लोक गेले? डायरेक्ट अम्रीकेतच ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
स
सुखीमाणूस Wed, 10/19/2016 - 06:16 नवीन
बजबजपुरी साफ करायला १०० वर्ष लागणार आहेत मग येतील ह NRI भारतात परत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
C
chitraa Wed, 10/19/2016 - 08:11 नवीन
देशात बजबजपुरी माजली हे सांगून देश सोडला तर चालते. धर्मात बजबजपुरी माजली हे सांगून कुणी धर्म सोडला , तर तेही चालायला हवे ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा