दलित हिंदु नाहित का?
नमस्कार मंडळी,
लेख वैगरे लिहणे हे नेहमीच मला माझ्या आवाक्याबाहेरचे वाटते. मनात बरेच विचार असतात एखाद्या विषयावर मत असते पण ते शब्दबध्द करणे जमेलच याची खात्री नसते.वटवट ह्या आयडींचा हिंदच धर्मावर आधारीत एक लेख आहे त्यात ते हिंदच धर्माचे समर्थक का आहेत याची त्यांनी कारणे लिहलित. क्रमांक २चे कारण मला पटले नाही. त्याबद्दल प्रतिक्रिया दिली असता त्यांच्या म्हणण्यानुसार चर्चा करण्यासाठी त्यांनी दुसरा धागा काढावा त्यावर चर्चा करु असे म्हटले म्हणुन हा धागाप्रपंच.मला एकतर निट चर्चा करता येत नाही सखोल अभ्यासाचा अभाव हे त्यामागचे कारण असावे.तरी इतरांनीही ह्या मुद्दयावर प्रतिक्रिया देउन अज्ञान दुर करण्यास सहाय्य करावे.
कारण नं २
मध्ये एका फेसबुकपोस्ट वर वाचलं होतं कि ह्या भारतात फक्त तिघांच्याच मरणाची दाखल घेतली जाते. एक तर दलित, मुस्लिम किंवा जनावरे... हिंदूंच्या मरण्याची दखल कोणीच घेत नाही. आणि तसेच आहे वास्तवात सुद्धा... इतरांच्या मरण्याची दखल घेणाऱ्यांना विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष म्हटलं जातं. आणि हिंदूला जर कोणी मारलं आणि जर कोणी त्याबद्दल आवाज उठवला तर त्याला हिंदुत्ववादी म्हणून हिणवलं जातं, हेतुपुरस्सर.
ह्यावर मी त्यांना दलित हिंदुत येत नाही का?असे विचारले होते.
💬 प्रतिसाद
(253)
स
सुबोध खरे
Wed, 10/19/2016 - 08:21
नवीन
मग घर वापसी झाली तर बोम्बा का मारता?
- Log in or register to post comments
C
chitraa
Wed, 10/19/2016 - 08:38
नवीन
आँ ! आम्ही कधी बोंब मारली ?
ज्याने त्याने खुशाल आवडेल तो धर्म स्वीकारावा.
- Log in or register to post comments
C
chitraa
Tue, 10/18/2016 - 16:12
नवीन
जेंव्हा विषय करियरचा असतो तेंव्हा परदेशातली मोठाल्या पगाराची नोकरी लाथाडून कोणीही भारतात कमी पगाराची नोकरी करणार नाही (
म्हणजे जाणारे पैशासाठीच जातात. मग विनाकारण आरक्षणाला का नावे ठेवायची?
- Log in or register to post comments
C
chitraa
Tue, 10/18/2016 - 16:46
नवीन
विश्व हिंदु परिषद दलित वस्त्यांजवळ आश्रम स्थापन करणार. !
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/saints-will-start-ashram-to-stop-conversion/articleshow/54913927.cms
एकेकाळी ज्यांची सावलीही अपवित्र वाटत होती, आता विहिंप त्यांच्याजवळ हिंदु आश्रम स्थापन करणार !! .
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 10/18/2016 - 20:00
नवीन
काही झालं तरी मोगाखानची मात्र जळणारच. =))
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Tue, 10/18/2016 - 20:03
नवीन
फक्त दोजख मधे जाणारेच जळतात ना ? म्हणजे अपवित्र आत्मे ? तुम्ही पुण्यात्मांवर असा आरोप नका हो करु !
- Log in or register to post comments
C
chitraa
Wed, 10/19/2016 - 01:50
नवीन
यात माझी कशाला जळेल ?
तो कसलातरी समाजपुरुष असतो म्हणे ... अमके डोक्यापासुन तयार झाले ... तमके पायापासून झाले.
आरक्षणाच्या काठीचे दोन दणके देउन आता तो पुरुष झाडाला उरपाटा टांगलाय ... आता खालचे वर गेले व वरचे खाली आले ... म्हणुन धर्ममार्तंर्ड आता दलित वस्तीकडे पळू लागलेत , असे चित्र माझ्या मनचक्षूसमोर आले .. माझं काय चुकलं ?
बायदिवे , हिंदूंच्या वर्णव्यवथेत जे कुठेच नव्हते त्या मुस्लिम ख्र्स्चनानी आरक्षणाशिवायच या देशावर राज्य केले.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 10/19/2016 - 05:11
नवीन
तलाकबद्दल तुमचे विचार काय आहेत? हिंदू स्त्रीला जे हक्क आहेत ते मुस्लिम स्त्रियांना मिळावेत असं तुम्हाला वाटत नसावं बहुतेक, कारण तुमच्या सगळ्या अवतारांत तुम्ही हिंदू धर्मावर बोट दाखवताय, पण तलाक या मुद्द्यावर तुम्ही काहीही बोलत नाही. स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणल्याशिवाय दुस-याबद्दल बोलणं हा दांभिकपणा आहे हे तुम्हाला ज्यादिवशी कळेल तो सुदिन!
- Log in or register to post comments
C
chitraa
Wed, 10/19/2016 - 05:35
नवीन
समस्त स्त्री पुरुषाना घटस्फोट / तलाक सोप्या पद्धतीने मिळावा असे आम्हाला वाटते.
पोटगीबाबत हिंदु कायदाही फक्त अक्षम स्त्रीलाच पोटगी देतो... तोही सर्वांना लागू करावा..
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 10/19/2016 - 06:24
नवीन
म्हणजे फोनवर? फोनवर दिलेला तलाकही ग्राह्य धरला जातो म्हणे. WhatsApp वर दिलेला तलाकही चालेल असा फतवा आला नाही का अजून?
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 10/19/2016 - 07:13
नवीन
स्टेटमेंट आले की देवा
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 10/19/2016 - 09:11
नवीन
आता तर काय जिओमुळे ३१ डिसेंबरपर्यंत व्हिडिओ काॅलिंग फुकट आहे. मग काय? शांतताप्रेमी धर्माचे किती नेक बंदे हक्क बजावणार तलाकचा?
- Log in or register to post comments
व
वटवट
Wed, 10/19/2016 - 09:03
नवीन
आता काही मुस्लिम बायकापण विरोधात जात आहेत ट्रिपल तलाक मेल डॉमिनेटेड असण्याच्या...
https://www.scoopwhoop.com/This-19-Year-Old-Muslim-Bride-Gave-Her-Husband-Talaq-Over-The-Phone-After-He-Asked-Her-For-Dowry/#.2x449gzm7
अर्थात हे प्रमाण अपवादातच..
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 10/19/2016 - 06:58
नवीन
आणि स्त्रियांनी तीन वेळा "तलाक तलाक तलाक" म्हणून नवऱ्याला फुटवायला तुमची हरकत नसावी.
शिवाय स्त्रीला पण चार नवरे "ठेवायला" हि हरकत नसेलच.
म्हणजे समानता आणायची तर ती त्या धर्मातही असावी नाही का?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 10/19/2016 - 08:03
नवीन
पण "खुला" होण्यासाठी स्त्रीला काझी कडे जावे लागते आणि माणूस मात्र नुसता तलाक तलाक तलाक फोन वर बोलून तिला फुटवतो.
"बहुत नाइन्साफी है रे "
- Log in or register to post comments
C
chitraa
Wed, 10/19/2016 - 08:28
नवीन
तुमच्यात उलट आहे.
बाई तशीच जाऊ शकते. पुरुषाला कोर्टात जावे लागते.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 10/19/2016 - 08:34
नवीन
निखालस असत्य.
तोंडाला येईल ते बोलू नका.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 10/19/2016 - 09:14
नवीन
हे ज्ञान नक्कीच तुम्हाला बांद्रा कोर्टाबाहेर काळा कोट घालून उभ्या असणाऱ्या लोकांनी दिलं असणार, हो ना?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 10/19/2016 - 08:35
नवीन
स्त्रीधन हा प्रकारच नाही "तुमच्या"त.
"खुला" घेतला तर नवऱ्याने दिलेले परत द्यावे लागते हे वर वाईट.
- Log in or register to post comments
व
वटवट
Wed, 10/19/2016 - 09:00
नवीन
खुल्यामध्ये नवऱ्याची परवानगी लागते बरं.... अशीच बायको नाही जाऊ शकत...
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Wed, 10/19/2016 - 04:37
नवीन
तुम्ही कपिलाषष्ठीला मिपावर लिहीणार आणि ते मोगाखानाला प्रतिसाद देण्यावर वाया जाणार हे वाईट वाटतं. स्वतंत्र लेख नसला तरी प्रतिसाद सुद्धा जरा तुमच्या तोलामोलाचा विचार करून द्या ही विनंती.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 10/19/2016 - 06:59
नवीन
हायला
तुम्ही तर मोगा खानच्या चड्डीलाच हात घातलात.
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Wed, 10/19/2016 - 19:03
नवीन
आम्हाला असा हात घालण्यात वगैरे अजिबात रस नाही. फक्त चर्चा माहितीपूर्ण किंवा विचारप्रवर्तक असावी असे वाटते. त्यामुळे त्याच त्याच प्रकारच्या frivolous प्रतिसादांना दुर्लक्षित करणेच योग्य असे वाटते.
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Wed, 10/19/2016 - 03:49
नवीन
असे बदल स्वीकरतो म्हणुन मला हिन्दु धर्म चान्गला वाटतो.
हिन्दु धर्मात अतिरेकी विचार सरणीला वेसण घालणारे खुप जण आहेत त्यामुळे हिन्दु धर्म नेहमीच चान्गल्या मार्गावर चालेल. उदाहरण द्यायचे झाले तर देसाई बाइ व भुमाता ब्रिगेड यान्चे आन्दोलन हिन्दु देवळातुन यशस्वी झाले हाजी अलिला सपशेल फसले...
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Wed, 10/19/2016 - 13:53
नवीन
तुमचा प्रतिसाद (फक्त २,३,४ नंबरच्या ओळी हं).....
फक्त आपल्या ज्याच्यावर राग खुन्नस आहे त्याबद्द्ल काहीही बोलायचे आणी स्वताचे झाकुन ठेवायचे अश्या लोकांसाठी नसावा असे समजतो.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 10/19/2016 - 14:20
नवीन
मी राहीजींच्या प्रतिसादाशी सहमत आहे, इरसालजी, तूर्तास तुम्ही वाघे साहेबांनी जी घाण केली आहे त्यावर काही मत मांडू शकाल का?
अवांतर - स्वतःचे झाकून ठेवणे वगैरे तुम्ही एका स्त्री आयडीला म्हणत आहात ह्याची तुम्हाला जाण असेलच त्याशिवाय, आवडते अन नावडते प्रश्न नाही तर प्रश्न आहे भाषेचा, मोगांनी हिंदू धर्म त्यातल्या चालीरीती ह्यावर वाटेल तसे तोंडसुख घेतले आहे/घेतील त्या करता त्यांचा निषेध करा मीही करेल (मला जिथे वाजवी वाटेल तिथे, कोणासमोर काही सिद्ध करायला नाहीच) पण त्यांनी धार्मिक बाबीवर बोलले म्हणून त्यांना त्यांच्या बहिणीला "सेक्स स्लेव्ह" परत वाचा "सेक्स स्लेव्ह" करावेत अश्या किंवा त्यांच्या आईला त्यांनी मारून टाकावे अश्या सूचक लिंक्स देणे ही कुठली धर्मसेवा म्हणायची ?
- Log in or register to post comments
इ
इरसाल
गुरुवार, 10/20/2016 - 13:26
नवीन
तुम्हाला त्यांचा प्रतिसाद (वाघे) दखल घेवुन त्यावर चर्चा किंवा काही मत मांडण्याइतका महत्वाचा वाटतो का?
अवांतरा बाबत म्हणाल तर ती म्हण चित्रा या आयडीने सरळ सरळ चालवलेल्या हिंदुद्वेषमुलक प्रतिसादांबद्द्ल आहे, राही यांच्या बद्द्ल नाही, कृपया पुन्हा एकदा वाचुन खात्री करावी.
- Log in or register to post comments
प
प्रतापराव
Wed, 10/19/2016 - 15:48
नवीन
धाग्याला वेगळै वळण लागले असे व्हायला नव्हते.सध्या वाचनमात्र.संदिप डांगे यांचे आंतरजातिय विवाहाबाबतचे मत पटले.बौध्दधम्मियांबाबत थोडे लिहायचे होते ते नंतर लिहतो.
- Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद
Wed, 10/19/2016 - 17:12
नवीन
जरूर लिहा. वाचायला आवडेल. तुम्ही मुद्देसुद आणि व्यवस्थित लिहीता आहात. अश्या धाग्याला वेगळे वळण लागणं अपरिहार्य आहे.
- Log in or register to post comments
प
प्रतापराव
Wed, 10/19/2016 - 18:37
नवीन
मि दलित असलो तरी हिंदुधर्मिय आहे.म्हणजे माझ्या जातीच्या सर्टिफिकेटच्या पुढे हिंदु लागते.दलित म्हणजे बौध्दधर्मियच हा गैरसमज आहे. आंबेडकर साहेबांची जात ही हिंदु महार होती धर्मांतरानंतर त्या जातीच्या बहुतांश लोकांनी बौध्दधर्म स्विकारला.इतर जाती ह्या हिंदच धर्मातच राहिल्या.परंतु घटनेने जे आरक्षण दिले त्यात हिंदु धर्मिय दलित आणि बौध्दधर्मिय यांना आरक्षण मिळाले.इतर दलित जाती ह्या हिंदु धर
मातच राहिल्याने ते सर्व हिंदु सण साजरे करतात.घरी गणपती बसवतात. त्यात बहुतांश आडनावे ही समान असल्याने सांगितल्याशिवाय जात कळत नाही.बहुतांश जण आपण दलित असल्याचे सांगत नाहित मात्र आरक्षण उपभोगतात.आपल्या दलितपणाचा त्यांना न्युनगंड असतो.माझ्या लहान बहिणीचे एका बौध्द समाजातील तरुणाशी लग्न झालेले असल्याने ह्या समाजाशी स्नेहबंध जुळले. अनेक मित्र बौध्दधर्मिय असल्याने त्या समाजाशी निकटचा संबंध आहे. बौध्दधर्मियांत दोन प्रकार पडतात एकाप्रकारच्या बौध्दांनी सर्व हिंदु धर्माच्या देवांचा त्याग केलाय. सणवार करत नाहित आंबेडकर जयंती आणि बौध्दपोर्णिमा हे आपले सण मानतात. सहा डिसेंबर हा बाबासाहेबांचा महापरिनिर्वान त्यांच्यासाठी दुःखाचा दिवस असतो.दुसर्या प्रकारचे बौध्द हे धर्माने बौध्द.झाले तरी पुर्वीच्या महार जातिप्रमाणे सर्व हिंदु देवदेवता मानतात. मात्र ह्या दोन्ही प्रकारातल्या बौध्दांना जोडणारा एकमेव धागा असतो बाबासाहेब आंबेडकर.मरणानंतरही इतके अनुयायांचे प्रेम आंबेडकरांना लाभले ही फार मोठी गोष्ट आहे. पहिल्या प्रकारचे जे बौध्द असतात त्यांना आपल्याला दलित समजले जाते ह्याचा अजिबात न्युनगंड नसतो. जयभिम असे ते घरी आलेल्या, वाटेत भेटलेल्या मित्रपरिवाराला अभिवादन करतखत. आपल्या समाजात नमस्कार बोलतात तर बौध्द हे जयभिम म्हणुन अभिवादन करतात. शिक्षणाचे प्रमाण लक्षणियरीत्या प्रभावी आहे.बौध्द हे राजकियद्रुष्ट्या मागासलेले वाटले तरी राजकारणाचे, समाजकारणाचे त्यांचे ज्ञान हे इतर दलित जातिंपेक्षा चांगले आहे.आरक्षण कशासाठी आहे, अँट्रोसिटी कायदा काय आहे हे त्यांच्याइतके चांगले माहित असलेला समाज माझ्या तरी पहाण्यात नाही.शिक्षणाचे महत्व ते चांगलेच जाणतात.देव नाकारायचे धाडस भल्याभल्यांना होत नाही पण बहुतांश बौध्दांनी ते धाडस केलेय.आम्ही हिंदुतील दलित जाती फक्त आरक्षण भोगतो पण आरक्षणाबाबत रस्त्यावर उतरण्याची हिंमत फक्त बौध्द समाज करतो. दलित अत्याचारांच्या घटनांविरोधात आवाज उठवायचे कामही हाच समाज करतो.खर म्हणायच झाल तर काही अन्याय झाला तर इतर दलित जातींचे लक्ष बौध्द समाज काय भुमिका घेतो ह्याकडेच असते. कोणी मानो न मानो दलित जातींचे राजकिय नसले तरी सामाजिक नेत्रुत्व बौध्द समाजच करतो.धर्मांतराने बौध्दांना काय मिळाले ह्या प्रश्नावर बरेच चर्वितचर्वण होते. माझ्या मते धर्मांतरांने बौध्दांत अरे ला कारे आणि समोरच्याच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत आलिय जी दुर्दैवाने इतर दलित जातीत आलेली नाही.इतर दलित जाती आणि बौध्दधर्मिय यातला मुय फरक म्हणजे त्यांना भेटलेले आंबेडकर नावाचे रत्न आणि त्यांची त्यांच्यावर असलेली निष्ठा.आंबेडकरांच्या नावाने एकत्र होण्याची त्यांच्यात तखकत निर्माण झालिय. बौध्दधर्मियांना धर्माबद्दल जास्त माहित नाही ह्यात तथ्य आहे. पण हेच हिंदुधर्माबाबतही म्हणता येउ शकते.मला वाचनाची आवड असल्याने रामायण हे मला रामाच्या निधनापर्यत महाभारत हे क्रुष्णाच्या निधनापर्यत माहित आहे. माझ्या बर्याच उच्चवर्णिय गणल्या जाणार्या मित्रांनाही त्याबाबत माहिती नाही. गणेशभक्त असणार्या मित्राला गणेशाच्या पत्नि आणि मुलांची नावे माहित नाहित.माझ्या घरी बनलेला दिवाळीचा फराळ शेजार्याला दिला तो त्याने नंतर मोलकरणिला देउन टाकला. तर बौध्दाच्या घरी दिलेला फराळ माझ्यासमोरच खाणारे बौध्द मित्रही आहेत. बौध्द लोक हे खाण्या पिण्याच्या बाबतीत भेदभाव करत नाहित मग ते कुणीही दिलेले का असेना. दलित समाजाचे सामाजिक नेत्रुत्व हे बौध्दाकडे आल्याने बहुतांश हिंदुंना तेच दलित वाटतात.
- Log in or register to post comments
C
chitraa
Wed, 10/19/2016 - 18:55
नवीन
छान
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 10/19/2016 - 19:22
नवीन
उत्तम प्रतिसाद! बरीच चांगली माहिती मिळाली.
दलित अजूनही प्रतीकांमध्येच अडकून पडले आहेत असे माझे मत आहे. आंबेडकर जयंती, आंबेडकर पुण्यतिथी, इंदू मिलमध्ये आंबेडकरांचे स्मारक, आंबेडकरांचे विद्यापीठाला नाव, आंबेडकरांचे पुतळे, लंडनमधील आंबेडकर ज्या घरात राहत होते त्या घराचे स्मारक इ. प्रतीकात्मक गोष्टीतच ते एकत्र येतात व त्यातच ते आपली शक्ती खर्च करतात असे वाटते. सर्व स्वरूपाची प्रतीके एका मर्यादेपर्यंत ठीक आहेत. परंतु जीवनमान उंचावण्यासाठी, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी प्रतीकांचा उपयोग नाही. विद्यापीठाला नाव देऊन किंवा कोणत्यातरी जागेत पुतळा उभारून स्मारक केल्यावर काही दिवस आनंद नक्की होईल. परंतु भौतिक प्रगतीसाठी अशा प्रतीकांचा काहीच उपयोग नाही. परंतु अशा प्रतीकांना कोणी विरोध केल्यास दलित अस्मितेचा अपमान, दलित जनतेच्या भावना दुखावल्या अशी हाकाटी सुरू होत असल्याने कोणताच पक्ष प्रतीकांना विरोध करीत नाही. याउलट स्मारक, पुतळे इ. गोष्टीतून मते मिळविण्याची बेगमी होत असल्याने सर्वच पक्ष दलितांच्या भौतिक विकासाऐवजी त्यांना प्रतीकेच पुरवित राहतात.
जाता जाता, इंदू मिलच्या १८-१९ एकर जागेवर फक्त स्मारक करणे व्यवहार्य नाही. या जागेवर स्मारक म्हणून पुतळा, एखादी छोटी बाग करायला हरकत नाही. परंतु उर्वरीत जागेत एखादी शिक्षणसंस्था किंवा मुंबईतील कापड गिरण्यांच्या संपामुळे उद्ध्वस्त झालेल्या गिरणी कामगारांसाठी स्वस्त घरे किंवा एखादे रूग्णालय अशा कोणत्यातरी विधायक कामासाठी त्या जागेचा उपयोग केल्यास तेच खरे स्मारक ठरेल. पाहिजे तर शिक्षणसंस्थेला किंवा रूग्णालयाला आंबेडकरांचे नाव द्या. अन्यथा हजारो कोटी रूपयांच्या या जागेत फक्त स्मारक करणे हे योग्य ठरणार नाही. अर्थात असा प्रस्ताव जर एखाद्या पक्षाने मांडला तर तो पक्ष दलितविरोधी, आंबेडकरविरोधी आहे अशी हाकाटी सुरू होईल. त्यामुळे कोणताच पक्ष याला विरोध करू शकणार नाही.
- Log in or register to post comments
C
chitraa
Wed, 10/19/2016 - 19:32
नवीन
अगागागा ! अयोध्या सोडून गुर्जी साबरमतीकडं निघाले.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 10/19/2016 - 19:36
नवीन
=)) =))
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 10/19/2016 - 19:58
नवीन
http://www.misalpav.com/node/37674
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 10/19/2016 - 20:11
नवीन
गुरुजींचे असे आहे आमच्या, सुचेनासे झाले की ते समोरच्याला उचकवायला असे संभावित ऍड होमिनिस्टिक खडे टाकतात, ह्या प्रसंगी गुर्जींस ही लिंक टाकून काय दर्शवायचे आहे हे प्रभू रामचंद्र अन गुर्जीच जाणोत
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 10/19/2016 - 19:58
नवीन
खी खी खी, जबरा
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 10/19/2016 - 19:58
नवीन
कडक प्रतिसाद! =))
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 10/19/2016 - 20:03
नवीन
http://www.misalpav.com/node/37674
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 10/19/2016 - 20:06
नवीन
उगी उगी!!
बाकी मोगाच्या पॉइंटमध्ये मुद्दा आहे, जमत असेल तर करा प्रतिवाद! असले लिंका चिकटवत बसत व्यर्थ वेळ वाया घालवणे तुमच्यासारख्या अभ्यासू सदस्याला शोभत नाही हो!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 10/19/2016 - 20:10
नवीन
हहपुवा
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 10/19/2016 - 20:15
नवीन
=)) =))
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Wed, 10/19/2016 - 19:56
नवीन
उत्तम प्रतिसाद प्रतापराव आणि श्रीगुरुजी.
पण त्याचबरोबर 'दलित अजूनही प्रतीकांमध्येच अडकून पडले आहेत असे माझे मत आहे' ह्या श्रीगुरुजी ह्यांच्या वाक्याबद्दल .
--- मला वाटते की फक्त दलित नाही तर पूर्ण भारतीय समाज फक्त प्रतिकांमध्ये अडकून पडलेला आहे. कुणाला शिवाजी महारांजांचे स्मारक हवे असते, कुणाला कुठल्या तरी विद्यापीठाला कुणा युगपुरुषाचे नाव देणे मह्त्वाचे वाटते (नाव बदलल्याने शिक्षणाचा दर्जा उंचावत असावा). त्यामुळे जशी न्यायदेवता डोळ्यावर पट्टी बांधलेल्या अवस्थेत आहे तसेच बहुतेक भारतीय जाती धर्मातील माणसे मोठ्या प्रमाणात डोळ्यावर पट्टी बांधलेल्या अवस्थेत आहेत. नक्की काय केल्याने आपण एक समाज म्हणून, देश म्हणून पुढे जाऊ हे कुणी समजून घ्यायला तयार नाही.
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Wed, 10/19/2016 - 20:17
नवीन
श्रीगुरुजींच्या प्रतिसादाशी सहमत. खूपच मुद्देसूद प्रतिसाद. समस्येवर नेमके बोट ठेवले आहे. अभिजित अवलिया ह्यांच्याशी सुद्धा अंशतः सहमत. काय आहे की सारा भारतीय समाजात प्रतिकांमध्ये अडकला आहे पण इतरांची स्थिती थोडी तरी बरी आहे. दलितांची स्थिती मुळातच वाईट आहे आणि त्यांना राजकारणी (ह्यात दलित राजकारणी सुद्धा आले) लोक फक्त प्रतिकांमध्ये अडकवून भुलवत आहेत. प्रत्यक्ष स्थिती सुधारण्यासाठी शिक्षण, नोकरी धंदा ह्यासाठी मदत ह्या स्तरावर तळागाळातल्यांसाठी फार काही काम होत नाही. त्यामुळे त्यांचे प्रत्यक्षात जास्त नुकसान होते. मला तर वाटते कि दलितांमधला जो creamy layer आहे तो स्वतः प्रॅक्टिकल फायदे घेतो आणि स्वतःच्या समाजातल्या खऱ्या गरजवंतांना प्रतीकांच्या अफूमध्ये गुंग ठेवतो. म्हणजे स्वतःच्या फायद्यांसाठी स्पर्धा नको.
इंदू मिलच्या जागेत पुतळा वगैरेंवर फार खर्च न करता एखादे सुसज्ज महाविद्यालय (भले ते फक्त दलितांसाठी असेल तरी चालेल), दलितांसाठी उद्योग मार्गदर्शन संस्था, सामाजिक अन्यायाचे निवारण करण्यासाठी संशोधन आणि साहाय्य करणारी एखादी संस्था असे काही केले तर ते यथोचित स्मारक ठरेल. पण हे काम कठीण आहे. त्यासाठी चिकाटी लागते. वर्षानुवर्षांची मेहनत आणि निधी लागतो. सारखे हार तुरे घेऊन मिरवता येत नाही. त्यामुळे असे काही होईल ह्याची शक्यता फारच कमी.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 10/19/2016 - 20:25
नवीन
कितीही म्हणले तरी प्रतीके मानवी गरज आहे, ती शाश्वत आहे, विकासाच्या वेगवेगळ्या पायऱ्यांवर वेगवेगळी प्रतीके लागतात पण ती असतात कायम, सद्ध्या अमेरिकन निवडणूक घोडा मैदान सुरु आहे जोशात कधी प्रेसिडेन्शियल डिबेट बघा, किंवा अजूनही कुठले कार्यक्रम बघा, अमेरिकन झेंड्यांचा ओव्हरडोस असतो तिथे, त्यांनी ते प्रतीक तूर्तास आपल्या गरजेनुसार धरलेले आहे, उर्वरित ५० अमेरिकन राज्यांनी सुद्धा आपापली प्रतीके घट्ट धरलेली आहेत, त्यामुळे जर मानवी सभ्यतेतील एका सर्वाधिक विकसित अन मुक्त व्यवस्थेला सुद्धा प्रतिकांची गरज पडत असेल तर आत्ता कुठे रांगू लागलेल्या भारत देशाची कथा वेगळी असेल अशी अपेक्षा धरणेच मुळात अव्यवहार्य वाटते, अश्यातच अश्या प्रतिकप्रेमी समाजातील एका घटकाने दुसऱ्या घटकाला प्रतिकात्मकतेवर चार शब्द सांगणे म्हणजे एक प्रकारचा जोकच होय.
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Wed, 10/19/2016 - 20:52
नवीन
पण फक्त प्रतिकांवर इतका भर आणि प्रत्यक्ष काम काही नाही ह्यामुळे नुकसान होते. आधी काही काम केले, शाळा काढली, त्या शाळेत शिकून उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला, त्यांचे नाव, फोटो बोर्डावर लावले, तर ते प्रतीक, प्रेरणा सयुक्तिक आहे. एखाद्या सैनिकाला खूप जखमा झाल्या आहेत, अगदी मरणासन्न आहे, हातात अगदी थोडा वेळ आहे, तर तो वेळ त्याच्यावर उपचार करण्यावर घालवायचा की त्याला मेडल देण्याचा समारंभ करण्यावर घालवायचा अशा तर्हेचा हा प्रश्न आहे . ज्या सैनिकाला किरकोळ खरचटले आहे त्याला लगेच मेडल देण्याच्या समारंभावर वेळ देणे परवडेल. पण गंभीर जखमींसाठी priority वेगळी असेल. अमेरिकेशी तुलना अस्थानी आहे. अमेरिकेची परिस्थिती बरीच चांगली आहे. भरल्या पोटी प्रतीकात्मक गोष्टीवर खर्च केला तर ठीक आहे. तरीही स्वानुभवाने सांगतो अमेरिकेतही जागोजागी एखाद्या व्यक्तीचे पुतळे वगैरेंवर खर्च फारसा केला जात नाही. झेंडे वगैरेंवेर फार खर्च होत नाही. आणि जे करतात त्यामागे बजेट ची काळजी घेतली जाते. उदाहरणार्थ एखाद्या सेनापतीचा पुतळा उभारण्या ऐवजी युद्धनौकेचे माहितीपूर्ण म्युझिअम बनवतात आणि त्याला तिकीट लावून त्याच्या मेंटेनन्स ची व्यवस्था केली जाते. प्रतीके नको असे नाही पण असलेल्या resources पैकी किती प्रतिकांवर खर्च करायचे आणि किती उपयोगी गोष्टींवर खर्च करायचे ह्याचे तारतम्य हवे.
- Log in or register to post comments
C
chitraa
गुरुवार, 10/20/2016 - 04:03
नवीन
प्रतिकप्रेमी समाजातील एका घटकाने दुसऱ्या घटकाला प्रतिकात्मकतेवर चार शब्द सांगणे म्हणजे एक प्रकारचा जोकच होय
हेच लिहिणार होतो.
- Log in or register to post comments
अ
अगम्य
गुरुवार, 10/20/2016 - 09:22
नवीन
ह्यात तत्त्वतः काही चूक आहे असे वाटत नाही. अवाजवी प्रतीकप्रियता एकंदर भारतीय समाजाला हानिकारक आहेच. इथे दलितांचा विषय चालू आहे म्हणून प्रतिकांवर अवाजवी भर दलित समाजाला कसा अपकारक आहे ह्यावर दलित किंवा दलितेतर कोणीही टिप्पणी केली तर ती अस्थानी नाही. समजा जर कोणीही क्षयाने खंगलेल्या व्यक्तीला सिगारेट ओढू नको म्हणून सांगितले आणि जर तो आजारी व्यक्ती एखाद्या सुदृढ सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवून "मग त्याचे काय?" असे विचारेल तर शेवटी त्याचे स्वतःचे नुकसान होण्याचे राहणार नाही. उलट सुदृढ माणसाला फारसे नुकसान न होता सिगारेट झेपेल सुद्धा पण आजारी माणसाची तब्बेत खूपच ढासळेल. whataboutery मुळे ज्याला समस्या आहे ती दूर होत नाही.
एक घटक/दुसरा घटक जर हे मला उद्देशून असेल तर मी दलित समाज घटकातील नाही असे गृहीतक दिसते. तसेही हे ad hominem होत चालले आहे म्हणून ह्या बाबतीत माझा पास.
- Log in or register to post comments
अ
अगम्य
गुरुवार, 10/20/2016 - 09:25
नवीन
सोन्याबापू ह्यांना होता. प्रतिसाद पोस्ट करण्यात चूक झाली.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 10/20/2016 - 09:50
नवीन
अगम्य, आपल्यावर ऍड होमिनेम करायचा माझा कधीही विचार नसेल, मी स्वतः वाद/चर्चा चर्चेपुरताच मर्यादित ठेऊन सभाशास्त्राचे नियम कसोशीने पाळायचा प्रयत्न करतो, तरीही कधीतरी शब्द संयोजनात गडबड होतेच, ती हेतुपरस्पर नसते हे मी तुम्हाला खात्रीलायक सांगू इच्छितो,
तेही, तुमच्याशी सकस अन नियमपूर्ण चर्चा होऊ शकते ह्या विश्वासाने हे स्पष्टीकरण मी देतो आहे, तरीही मला चर्चा चालवायला आवडेल, काही मुद्दे आहेत मला अजून मांडायचे पण कार्यालयीन कार्यबहुल्य सद्ध्या थोडे जास्त असल्याने थोडा विलंब होतोय, तरीही गैरसमज नसावा हि कळकळीची विनंती करतो
बाप्या
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »