Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दलित हिंदु नाहित का?

प
प्रतापराव
Mon, 10/17/2016 - 16:26
🗣 253 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, लेख वैगरे लिहणे हे नेहमीच मला माझ्या आवाक्याबाहेरचे वाटते. मनात बरेच विचार असतात एखाद्या विषयावर मत असते पण ते शब्दबध्द करणे जमेलच याची खात्री नसते.वटवट ह्या आयडींचा हिंदच धर्मावर आधारीत एक लेख आहे त्यात ते हिंदच धर्माचे समर्थक का आहेत याची त्यांनी कारणे लिहलित. क्रमांक २चे कारण मला पटले नाही. त्याबद्दल प्रतिक्रिया दिली असता त्यांच्या म्हणण्यानुसार चर्चा करण्यासाठी त्यांनी दुसरा धागा काढावा त्यावर चर्चा करु असे म्हटले म्हणुन हा धागाप्रपंच.मला एकतर निट चर्चा करता येत नाही सखोल अभ्यासाचा अभाव हे त्यामागचे कारण असावे.तरी इतरांनीही ह्या मुद्दयावर प्रतिक्रिया देउन अज्ञान दुर करण्यास सहाय्य करावे. कारण नं २ मध्ये एका फेसबुकपोस्ट वर वाचलं होतं कि ह्या भारतात फक्त तिघांच्याच मरणाची दाखल घेतली जाते. एक तर दलित, मुस्लिम किंवा जनावरे... हिंदूंच्या मरण्याची दखल कोणीच घेत नाही. आणि तसेच आहे वास्तवात सुद्धा... इतरांच्या मरण्याची दखल घेणाऱ्यांना विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष म्हटलं जातं. आणि हिंदूला जर कोणी मारलं आणि जर कोणी त्याबद्दल आवाज उठवला तर त्याला हिंदुत्ववादी म्हणून हिणवलं जातं, हेतुपुरस्सर. ह्यावर मी त्यांना दलित हिंदुत येत नाही का?असे विचारले होते.

प्रतिक्रिया द्या
39069 वाचन

💬 प्रतिसाद (253)
अ
अप्पा जोगळेकर Fri, 10/21/2016 - 13:00 नवीन
न्हाय बा. आपल्याच देशाच्या माणसावर खुन्नस वगैरे नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
नाखु Fri, 10/21/2016 - 13:45 नवीन
खुन्नस वगैरे नसावी,पण (श्रद्धास्थानाने) केलेली कुठलीही चूक किंवा घेतलेल्या निर्णयाची नंतर समाजाला/देशाला चुकवावी लागलेली/लागणारी किंमत याविषयी (कुणी) काही बोलूच नये असा पवित्रा, इतरांना भक्त्/रूग्ण म्हणणार्यांकडून होतो आहे हे पाहून त्यांनी थोडी कडक आणि जहाल भाषा वापरली असावी. त्यांचे प्रतिसाद नेटके आणि नेम्के असतात असे माझे तरी मत आहे. अर्थात या विषयात माझ्यापेक्षा गती व मती असलेले दिग्ग्ज फलंदाज आहेत तेंव्हा मी फक्त प्रेक्षकच आहे. नाखु वाचक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
श
शब्दबम्बाळ Fri, 10/21/2016 - 13:58 नवीन
चला मान्य आहे आपली खुन्नस नसेल, पण मग जरा काहीतरी ठोस करणे येउद्यात कि 'वैचारिक मतभेद' असतील तर! कोणी कोणाशी कधी कसे का लग्न केले यावरून लोकांची पात्रता ठरवायची असेल तर वर विचारलेल्या पंतप्रधानाबद्दलच्या वाक्याला बगल देणे हि योग्य नाही... त्यांचे चुकलेले निर्णय, ध्येय धोरणे यावर चर्चा करायला काही हरकत नसावी. अर्थात याचा अर्थ असा होत नाही कि शब्दांचा अनुचित वापर करून एखाद्याला कमी कुवतीचा दाखवणे...त्याने साध्य काहीच होत नाही, परवाच एका धाग्यावर उदाहरण पहिले आहेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा