दलित हिंदु नाहित का?
नमस्कार मंडळी,
लेख वैगरे लिहणे हे नेहमीच मला माझ्या आवाक्याबाहेरचे वाटते. मनात बरेच विचार असतात एखाद्या विषयावर मत असते पण ते शब्दबध्द करणे जमेलच याची खात्री नसते.वटवट ह्या आयडींचा हिंदच धर्मावर आधारीत एक लेख आहे त्यात ते हिंदच धर्माचे समर्थक का आहेत याची त्यांनी कारणे लिहलित. क्रमांक २चे कारण मला पटले नाही. त्याबद्दल प्रतिक्रिया दिली असता त्यांच्या म्हणण्यानुसार चर्चा करण्यासाठी त्यांनी दुसरा धागा काढावा त्यावर चर्चा करु असे म्हटले म्हणुन हा धागाप्रपंच.मला एकतर निट चर्चा करता येत नाही सखोल अभ्यासाचा अभाव हे त्यामागचे कारण असावे.तरी इतरांनीही ह्या मुद्दयावर प्रतिक्रिया देउन अज्ञान दुर करण्यास सहाय्य करावे.
कारण नं २
मध्ये एका फेसबुकपोस्ट वर वाचलं होतं कि ह्या भारतात फक्त तिघांच्याच मरणाची दाखल घेतली जाते. एक तर दलित, मुस्लिम किंवा जनावरे... हिंदूंच्या मरण्याची दखल कोणीच घेत नाही. आणि तसेच आहे वास्तवात सुद्धा... इतरांच्या मरण्याची दखल घेणाऱ्यांना विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष म्हटलं जातं. आणि हिंदूला जर कोणी मारलं आणि जर कोणी त्याबद्दल आवाज उठवला तर त्याला हिंदुत्ववादी म्हणून हिणवलं जातं, हेतुपुरस्सर.
ह्यावर मी त्यांना दलित हिंदुत येत नाही का?असे विचारले होते.
💬 प्रतिसाद
(253)
अ
अगम्य
गुरुवार, 10/20/2016 - 11:16
नवीन
मी तुमचे लेखन वाचतो आणि त्याचा चाहता आहे.
- Log in or register to post comments
C
chitraa
गुरुवार, 10/20/2016 - 09:54
नवीन
आंबेडकर स्मारक हे केवळ दलितांचे नव्हे तर पूर्ण राष्ट्राचेच असणार आहे... त्यामुळे ते केवळ एका घटकापुरते नाही , त्यामुळे क्षयाचा मनुष्य व धडधाकट मनुष्य ही तुमची तुला पटली नाही... राम म्युझियम जर देशाचेच आहे त्यावर करोडो रु खर्च होऊ शकतात , तर आंबेडकर स्मारक मात्र फक्त दलितांचे ठरवून आधी ' तुमचे ' जीवन सुधारा व मग स्मारक काढा असे सांगणे ही लबाडी नाही का ?
- Log in or register to post comments
अ
अगम्य
गुरुवार, 10/20/2016 - 11:11
नवीन
तुम्ही इतरत्र माहिती दिल्या प्रमाणे "आंबेडकर स्मारक हे नुसताच पुतळा नसेल तर अनेक समाजोपयोगी गोष्टींचे संकुल असणार आहे.". जर असे असेल तर चांगलेच आहे. त्याला विरोध असण्याचे कारण नाही.
राम म्युझिअम हे नक्की काय आहे हे माहित नाही. जर नुसताच पुतळा असेल तर व्यर्थ आहे. न केलेलेच बरे.
आता दुसरा मुद्दा: दलित समाज मागे आहे. त्याला इतर समाजाच्या बरोबरीने आणायचे असेल तर दलितांना जास्तीचे resources दिले पाहिजेत. त्या दृष्टीने देश resources बाजूला काढून ठेवतो. ते योग्यच आहे. आता हे जे resources खास दलित कल्याणासाठी राखीव ठेवले आहेत (जे देशाच्या एकूण resources च्या तुलनेत थोडेच असतात) ते जर केवळ दिखाऊ गोष्टींवर खर्च केले तर हेतू - दलितांचे कल्याण तो साध्य होत नाही. पण नेते दलितांना काय सांगतात तर तुमच्यासाठी आम्ही हे नामांतर केले, हे पुतळे बांधले. त्यावरच बरेच दलित खुश होतात. त्या पैशाच्या योग्य विनिमयामुळे दलितांची स्थिती सुधारली गेले असती ते होत नाही. म्हणजे दलितांच्या स्थितीवर थेट परिणाम होतो.
इतरत्र ही निधीचा गैरवापर अशा दिखाऊ गोष्टींवर होतो पण त्याचा इतका थेट परिणाम दलितांच्या स्थितीवर तितक्या प्रमाणात होत नाही कारण तो निधी खास दलितांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी वापरला गेला नसता. तेही चूकच आणि सर्व भारतीयांच्या कल्याणाच्या (फक्त दलितांच्या नव्हे) दृष्टीने त्याला विरोध करणे योग्यच.
त्यामुळे इतरत्र निधीचा गैरवापर होतो म्हणून जो निधी दलितांसाठीच्या विधायक योजनांवर खर्च व्हायला हवा तो दिखाऊ गोष्टींवर खर्च करणे justify करणे हे शेवटी दलितांसाठी हानिकारक आहे .
पुन्हा एकदा माझा अश्या सर्वच दिखाऊ स्मारकांना विरोध आहे. पण इथे चाललेल्या चर्चेच्या संदर्भात दलितांच्या कल्याणासाठीचे बहुतांशी resources अशा दिखाऊ गोष्टींवर (थोडेफार ठीक आहे) खर्च करून प्रत्यक्षात त्यांच्या परिस्थितीत सुधारणा न घडवणे ह्याला विरोध आहे. असलेल्या resources पैकी किती प्रतिकांवर खर्च करायचे आणि किती उपयोगी गोष्टींवर खर्च करायचे ह्याचे तारतम्य हवे.
- Log in or register to post comments
C
chitraa
गुरुवार, 10/20/2016 - 12:48
नवीन
टिपिकल बुद्धिभेद करणारा प्रतिसाद !
रामाच्या देवळावर पूर्ण देशाचा पैसा खर्च होतो ना ? की फक्त रामभक्तांच्या कोट्यातून पैसा खर्च होतो ?
आंबेडकर स्मारक देशाचे आहे... देशाचा जनरल पैसा खर्च करावा.. दलितांसाठी राखीव पैसा हा दलितांसाठीच खर्च करावा. त्यातला पैसा स्मारकाला का वापरायचा ?
म्हणजे रा. स्व. संघ आंबेडकरांचे फोटु शाखेत लावणार , का तर ते सर्वांचे आहेत , आणि स्मारक बांधताना मात्र दलिताना सांगायचं तुमच्या कोट्याच्या पैशातून बांधा आणि तसे केलेत तर तुमच्याच अन्न शिक्षणावर पैसा कमी पडेल !
सामाजिक समरसता हीच का ?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 10/20/2016 - 12:57
नवीन
"+1"
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 10/20/2016 - 14:21
नवीन
खानसाहेब,
कोणत्या रामाच्या देवळाबद्दल लिहिले आहे ? जिथे पूर्ण देशाचा पैसा खर्च होतो. होत असेल तर विरोधच आहे.
आंबेडकर स्मारक देशाचे आहे.
हे कोणी ठरवले. मला आंबेडकर पूजनीय वाटत नाही. माझ्यासारखे अनेक असतील.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 10/20/2016 - 14:57
नवीन
आपल्या देशात अनेक पुतळे, देवळे, मशिदी, बुद्ध विहार असंख्य चौकात उभे राहिलेले आहेत. आता देवालये(सर्व धर्मांची), पुतळे आणि स्मारकांवर पैसे खर्च करण्यापेक्षा ते विधायक कार्यावर केले तर जास्त चांगले होईल असे वाटते. यात डॉ आंबेडकरांचेच नव्हे तर सरदार पटेल, शिवाजी महाराज किंवा इतर कोणतेही नेते धरा.
शिवाजी महाराजांचा समुद्रात प्रचंड पुतळा उभारण्यात कामी येणारा पैसा जर महाराजांनी बांधलेल्या परंतु विपन्नावस्थेत असणाऱ्या गड किल्ल्यांच्या डागडुजीत वापरून त्यांना उत्तम पर्यटन स्थळे बनविली तर ती महाराजांना खरी श्राद्धांजली होईल.
हीच विचारसरणी अयोध्येच्या राममंदिराबाबत किंवा डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याबाबत माझी आहे.
माझ्या एका सरदार मित्राने सांगितलेली कहाणी -- त्याच्या गावात पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती परंतु वर्गणी( सक्तीची ख़ुशी) काढून गुरुद्वारा मध्ये संगमरवरी फारशी बसविण्याची मोहीम चालू झाली. त्यावर याने "याच पैशात" गावाला कधीही पाण्याची टंचाई होणार नाही अशा व्यवहार्य पाणी योजना मांडून दाखविल्या तर त्याला "जादा शहाणा" आहे म्हणून गप्प बसविण्यात आले. (आर्मी अधीकारी होता म्हणून नाही तर मारच खावा लागला असता.)
- Log in or register to post comments
अ
अगम्य
गुरुवार, 10/20/2016 - 20:04
नवीन
देशाच्या पैश्याने देऊळ बांधावे असे कोण बोलले?
साधा मुद्दा आहे दलितांची बरीचशी शक्ती आणि resources प्रतीकात्मक गोष्टींवर खर्च होतात असे निरीक्षण श्रीगुरुजींनी नोंदवले आहे. खरे साहेबांनी दिलेले संगमरवरी फरशी चे उदाहरण अगदी पुंगवनेत्रभेदक आहे. तर तुम्हाला असे म्हणायचे आहे काय कि दलितांनी प्रतिकांवरच खूप भर द्यावा आणि शिक्षण, जीवनमान उंचावण्यासाठी long term , sustainable कार्यक्रमांकडे दुर्लक्ष करावे?
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 10/19/2016 - 20:30
नवीन
रच्याकने गुर्जी, मी आता टक्याच्या धाग्याची लिंक आणून जोडणार नाही हो इथे ;)
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 10/19/2016 - 20:04
नवीन
अगदी १००% सहमत गुरुजी अतिशय समतोल विवेचन, पण कसंय न प्रतिकांत एकटा दलित समाज गुंतलाय का? अन्य बहुसंख्य अल्पसंख्य समाजाची प्रतिकभक्ती कमी झाली आहे का? तितका आपला समाज प्रबुद्ध झालाय का? उदाहरण देतो, इंदू मीलच्या जागी छोटे स्मारक अन उर्वरित जागा लोकोपयोगी सुविधा ह्या तुमच्या अतिशय स्तुत्य सल्याला मी अंगिकरून म्हणतो की अयोध्येत सुद्धा मंदिर मस्जिद काहीच नको तर एक बारकी देवळी बांधूदेत लल्लाचे जन्मस्थळ म्हणून अन उर्वरित जागेत आपण अनाथाश्रम, महिला कॉलेज, वगैरे काढूयात रुग्णालय वगैरे, म्हणजे कसंय न इंदू मीलवाल्या आंदोलनकरत्या लोकांना आपण एक दैदिप्यमान उदाहरण देऊन एक चांगला पायंडा सच्चे हिंदू म्हणून पाडू शकू
पण
असे केल्यास मला धर्मविरोधी, रामद्वेषी, प्रसंगी देशद्रोही,हिंदू विरोधी अशी हाकाटी लगेच चालू होईल त्याचे काय असा प्रश्न पडतोय मला तूर्तास !!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 10/19/2016 - 20:08
नवीन
हरकत नाही. श्रीराम जन्मस्थानावर प्रभू श्रीरामाचे एक छोटे मंदीर बांधून उर्वरीत जागा चांगल्या कामासाठी उपयोगात आणावी.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 10/19/2016 - 20:18
नवीन
उत्तम!! आपल्या प्रागतिक तरीही धार्मिक पुरोगामीत्वाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन
- Log in or register to post comments
C
chitraa
गुरुवार, 10/20/2016 - 04:22
नवीन
मा मोदीजी १५० कोटी खर्चून रामायण म्युझियम बांधणार.
म्युझियम वही बनायेंगे !
http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4742737340310167037&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20161020&Provider=%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%20'%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A5%80'%20%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87!%20(%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96)
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 10/20/2016 - 07:01
नवीन
प्रतिकासाठी किती पैसे खर्च करावयाला काही तरी मर्यादा असावी का? उत्तर प्रदेश सारख्या मागास राज्याला ४० हजार कोटी रुपये हत्ती मायावती इराणी कांशीराम यांच्या पुटक्यांवर खर्च करणे परवडते का? हि परिस्थिती आपल्या सिंचन घोटाळ्यासारखीच गंभीर नाही का?
http://www.rediff.com/news/slide-show/slide-show-1-mayawati-s-parks-elephants-and-a-rs-40000-crore-scam/20120516.htm
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 10/20/2016 - 07:15
नवीन
हमाम मे सब नंगे सरजी, त्या हिशोबाने तर तो स्टॅच्यू ऑफ युनिटी सुद्धा नकोच नाही का??
- Log in or register to post comments
अ
अगम्य
गुरुवार, 10/20/2016 - 09:36
नवीन
अमेरिकेत प्रत्येक राष्ट्राध्यक्षाला त्याचा कार्यकाळ संपल्यावार एका विद्यापीठाच्या लायब्ररीला देणगी देता येते आणि ती लायब्ररी त्या राष्ट्राध्यक्षांच्या नावाने ओळखली जाते. हे यथोचित स्मारक आहे. ह्याउलट मायावतींनी त्यांच्या पुतळ्यांवर प्रचंड रक्कम खर्च केली. सरदार पटेलांच्या नुसत्या पुतळ्यावर प्रचंड रक्कम खर्च होणार असेल तर तेही अयोग्यच आहे. तसेच गड किल्ले दुर्लक्षित ठेवून शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारक सुद्धा.परंतु त्याबद्दल बोलणे हे विषयांतर ठरेल कारण इथे चर्चा केली जाणारा विषय वेगळा आहे.
- Log in or register to post comments
C
chitraa
गुरुवार, 10/20/2016 - 07:07
नवीन
पूर्वीच्या काळी राज्य स्थापन करताना / ते टिकवताना राजे जनतेला बोलायचे .... हाणा मारा सोडू नका.
पण यदाकदाचित शत्रू आपल्याच घरापर्यंत येऊन ठेपला की राजे तह. करत होते.
जनता आधी राजाला प्रेमाने आक्रमक म्हणायची . मग मुत्सद्दी म्हणायची.
......
राम मंदिराबाबतही भाजपाने हेच अवलंबलेले आहे.. राज्य आपले नव्हते , तेंव्हा कितीका लोक मेले तरी राजाचं नुस्कान नसायचंच ... म्हणून आक्रमकपणे मशीद पाडायच्या व मंदिर बांधायच्या घोषणा झाल्या.
आता प्रत्यक्ष सत्तेत बसल्यावर आता आक्रमक राहिलं आणि चटके बसले तर ते भाजपाला बसणार , म्हणून आता मुत्सद्दीपणाचा यू टर्न घेतला.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 10/21/2016 - 01:13
नवीन
अजीबात नाहि. श्रीराममंदीर स्वतःच जर समाजउपयोगी नसेल तर त्याची एकहे वीट चढवु नये. अन्यथा भव्य श्रीराममंदीर बांधावे आणि ते मंदीराप्रमाणेच वापरावे. तिथे रामकार्य घडावं, घडवावं.
- Log in or register to post comments
C
chitraa
गुरुवार, 10/20/2016 - 08:26
नवीन
आंबेडकर स्मारक हे नुसताच पुतळा नसेल तर अनेक समाजोपयोगी गोष्टींचे संकुल असणार आहे. त्यामुळे त्याला विरोध असायचं कारण नसावं.
भाजपावाल्यानी आधी स्वतःचे राममंदिर / सावरकर स्मारक / शिवस्मारक / ठाकरेस्मारक / सरदार प्टेलांचा चीनला काँट्रॅक्ट दिलेला पुतळा वगैरे प्रकार आधी बासनात गुंडाळावेत.
- Log in or register to post comments
द
दा विन्ची
Fri, 10/21/2016 - 07:21
नवीन
गुरुजी, तुमची इंदु मिलच्या जागी छोटेसे स्मारक बांधून बाकीची जागा समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा मुद्दा पटला. मात्र सरदार पटेलांचा जगात सर्वाधिक मोठा पुतळा उभा करून स्मारक बांधण्याच्या कल्पनेबाबत तुमचे मत जाणुन घ्यायला आवडेल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 10/21/2016 - 11:41
नवीन
हजारो कोटी रूपये खर्चून सरदार पटेलांचा टोलेजंग पुतळा बांधून स्मारक करणे अत्यंत अयोग्य आहे.
जर तो पुतळा अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा या धर्तीवर उभारून निव्वळ पुतळा उभा न करता पुतळ्याच्या अंतर्भागातून डोक्यापर्यंत जायला उद्वाहक, त्याभोवती एखादे उद्यान, संग्रहालय, लेझर शो इ. गोष्टी तिकीट लावून केल्या तर चालू शकेल. म्हणजे पर्यटन स्थळ या धर्तीवर पुतळा, स्मारक वगैरे करून प्रकल्पाचा खर्च पर्यटकांच्या तिकिटाच्या पैशातून वसूल केला तर हरकत नाही. निदान त्या निमित्ताने पर्यटन व्यवसायाला चालना मिळू शकेल.
शिवाजी महाराजांचे अरबी सागरातील संभाव्य स्मारक देखील असेच करावे. ते स्मारक पर्यटन स्थळ म्हणूनच विकसित करावे, तिथे जाण्यासाठी बोटींची किंवा विजेरी पाळण्यांची व्यवस्था करावी (सर्व गोष्टी तिकिट लावून). अर्थात जनतेला तिथे शिवजयंतीला पुतळ्याच्या गळ्यात हारबिर घालायला परवानगी देऊ नये. नाहीतर शिवजयंतीच्या दिवशी फुकटे तिथे येऊन पुतळ्याला हारबिर घालून मिरवणूक काढून स्मारकाचा उद्देशच हरवून टाकतील.
सरदार पटेलांचे स्मारक किंवा शिवाजी महाराजांचे स्मारक हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार असेल तरच करावे. अन्यथा ते करू नये.
- Log in or register to post comments
र
राही
Wed, 10/19/2016 - 19:36
नवीन
प्रतापराव, आपले प्रतिसाद अतिशय आवडत आहेत.
नवबौद्धांविषयी माझेही निरीक्षण आपण लिहिल्याप्रमाणेच आहे. त्यांचे आत्मभान जागृत झाले आहे. गतानुगतिकतेतून ते बाहेर पडत आहेत. अन्यायाचा सामना करण्याची हिंमत त्यांच्यात दिसते. शिक्षणाचे प्रमाण तर वाढते आहेच पण एकंदर अवेअरनेससुद्धा वाढता आहे. त्यांचे वाचनही इतर दलित आणि ओबीसींपेक्षा अधिक असते. बलुतेदारीतून ते स्वेच्छेने बाहेर पडले आहेत आणि आता त्यांना अस्तित्वासाठी जोरदारपणे हातपाय हलवणे भाग आहे. कदाचित या अपरिहार्यतेतून/मुळेच ते प्रवाहासोबत पोहायला शिकत आहेत. लहानपणी वाचलेली शेवग्याचे झाड आणि चार आळशी मुले ही गोष्ट आठवते. शेवग्याचे झाड तोडून उत्पन्नाचा शेवटचा स्रोत नाहीसा केल्याखेरीज ही मुले हालचाल करणार नाहीत हे ओळखून सूज्ञ शेजारी ते झाड तोडून टाकतो. आंबेडकरांनी अन्यायाचा मूळ स्रोतच नाकारून या समाजाला नवी दिशा शोधण्यास भाग पाडले.
शिवाय, बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचे एक नवे रूप त्यांच्यापुढे मांडले. हीनयान, महायान, वज्रयान, नंतर शिरलेली मूर्तिपूजा, तथागताचे अनेक अवतार-पुनर्जन्म, जातककथा ह्या सगळ्याला वळसा घालून त्यांनी जणू एक नवाच धर्म सांगितला. खरोखर, केवळ हिंदू धर्मच नव्हे तर बौद्ध धर्मसुद्धा त्यांनी गदागदा हलवला आहे. भारतात बौद्धधर्म कुंठित झाला होता, त्याला त्यांनी मोकळे वाहाते रूप दिले आहे. परंपरेतून धर्माला बाहेर काढणारा तो एक द्रष्टा युगपुरुष होता. नागार्जुनानंतरचा कदाचित एकमेव बौद्ध विचारवंत.
गेल ऑम्वेट या विदुषींनी यासंदर्भात विपुल लेखन केले आहे. त्यांच्या एका ग्रंथाच्या मराठी अनुवादकर्ताद्वयात आपले मिपाकर बिपिन कार्यकर्तेही आहेत.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 10/20/2016 - 21:24
नवीन
आंबेडकरांसारख्या बुद्धीवाद्याने दलीतोद्धारासाठी धर्मपरिवर्तनाचा मार्ग का निवडला हे कोडं उमगत नव्हतं. एकीकडे धर्माभिमानी टिळक, विवेकानंद, सावरकर वगैरे व्यक्ती जनमानसाला धर्माच्या झापडांतुन मोकळं करुन काळाभिमुख करायला बघत होते (टिळक आणि सावरकर थोडे जास्तच औट ऑफ कॉण्टेक्स्ट आहेत याविषयी...) आणि दुसरीकडे आंबेडकर दलितांना धर्मपरिवर्तनातुन अच्छे दिन दाखवायला बघत होते. हा उफराटा व्यवहार त्यांनी का केला हा प्रश्नच होता.
तुमच्या प्रतिसादात या प्रश्नाचं न्युक्लीअर उत्तर सापडलं. धन्यवाद.
आम्हि उगाच तुमचे फॅन नाहि :)
- Log in or register to post comments
र
राही
Fri, 10/21/2016 - 04:08
नवीन
आभारी आहे.
जाता जाता. टिळक आणि सावरकर यांच्या धर्मसुधारणेच्या इच्छेची, हेतूंची आणि परिणामांची अधिक खोलवर, तपशीलवार चिकित्सा व्हायला पाहिजे असे वाटते. किंबहुना समाजसुधारणांच्या बाबतीत या तिघांनाही जडशीळ आणि सकृतदर्शनी मोनोलिथ भासणार्या हिंदुधर्माने पार गिळून टाकले असेही वाटते.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 10/21/2016 - 08:17
नवीन
हिंदु धर्मातल्या इनर्शीयाने या तिघांना त्रास दिला हे खरच आहे. पण सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवं कि त्यांचे समाजसुधारणेचे प्लॅटफॉर्म्स अप्रत्यक्ष्य होते. टिळकांना भारताच्या स्वातंत्रात समाजसुधारणा दिसायची. स्वामीजींना माणसाचा आध्यात्मीक उत्कर्ष अभिप्रेत होता तर सावरकरांनासमोर स्वराज्य ते सुराज्य असा प्रचंड मोठा पट होता. या सर्वांची परिणीती अल्टीमेटली समाजसुधारणेतच होणार होती. समाजसुधारणेअगोदर या तिघांनाही अगदी स्वतंत्रपणे प्रचंड समाजसमीक्षा करायला लागली. त्यातलं प्रत्यक्ष्य आचरणात आणता येईल तितकं त्यांनी आणलं. समाजसुधारणेच्या बाबतीत आंबेडकरांइतका मूलगामी बदल त्यांना करता आला नाहि हे मात्र खरं.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 10/21/2016 - 10:20
नवीन
समाजसुधारणेच्या बाबतीत आंबेडकरांइतका मूलगामी बदल त्यांना करता आला नाहि हे मात्र खरं.
डॉ. आंबेडकरांनी काही मूलगामी बदल केला असे वाटतच नाही.
त्यांच्या नेतॄत्वाखाली तयार झालेल्या घटनेने जातीपातीच्या विषमतेची बीजे अधिक खोलवर रुजवली.
त्यांनी समाजातल्या एका विशिष्ट घटकाच्या उत्थानाचे काम काही अंशी केले असे म्हणता येईल.
ते उत्थानसुद्धा अत्यंत अल्प आहे.
५८ व्या वर्षी मधुमेह असताना ४० वर्षांच्या बाईशी लग्न करणार्या व्यक्तीला स्त्रिया आणि त्यांचे अधिकार याबद्दल किती कणव असेल याविषयी शंकाच आहे.
भारतीय घटना बनवणार्या टीमचे नेतॄत्व अयोग्य माणसाच्या हाती होते असे म्हणावे लागेल.
डॉ. आंबेडकरपेक्षा महात्मा फुले यांचे कार्य कितीतरी अधिक मूलगामी, परिणामकारक आहे. पण त्यांना तितके म्हत्व दिले जात नाही. कदाचित यामागेदेखील राजकीय हेतू असू शकेल.
बाकी डॉ. आंबेडकरच्या क्षमतेवर नाही पण हेतूंवर शंका आहे. पण ते जाहीरपणे लिहिणे अशक्य आहे.
- Log in or register to post comments
र
राही
Fri, 10/21/2016 - 10:42
नवीन
ज्याचे त्याचे मत ; पण आंबेडकरांच्या खाजगी जीवनाचा तुच्छतापूर्ण उल्लेख आवडला नाही.
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत वर आनि वधूंच्या वयामध्ये बरेच अंतर असे.
शिवाय अनेकांना पूजनीय, प्रातःस्मरणीय अशा अनेक व्यक्तींचे खाजगी जीवन उकरता येण्यासारखे असले तरी ते उकरून काढू नये असे माझे वैयक्तिक मत आहे.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 10/21/2016 - 11:04
नवीन
मॅडम,
यात तुच्छतापूर्ण काय आहे ? सामाजिक सुधारणांचे अग्रणी, घटनाकार, कॅबिनेट मंत्री म्हणवून घेणार्या व्यक्तीचे वर्तन सामान्य माणसाइतके खाजगी असते का ?
हे म्हणजे फडणविसांनी नाणींजला नरेंद्र महाराजला भेट दिली तर काय झाले तो त्यांचा खाजगी प्रश्न आहे असे म्हटल्यासारखे वाटते. शिवाय साधनशुचितेच्या गप्पा आजच्या पेक्षा देखील जास्त प्रमाणात १९४८ साली अधिक लागू होत असत, नाही का.
स्त्रियांच्या मूलभूत अधिकारांविषयी एका स्त्रीनेच इतके उदासीन असावे याचे आश्चर्य वाटते. हे सगळे देव्हार्याचे दुष्परिणाम आहेत.
- Log in or register to post comments
C
chitraa
Fri, 10/21/2016 - 11:07
नवीन
हाच नियम पंतप्रधानानाही लावायचा का ?
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 10/21/2016 - 11:11
नवीन
चालू द्या ट्रोलिंग.
- Log in or register to post comments
र
राही
Fri, 10/21/2016 - 11:48
नवीन
डॉ. आंबेडकरांच्या या लग्नामुळे कुठल्या मूलभूत अधिकारांची गळचेपी झाली? ते लग्न परस्परसंमतीने झाले. कोणतीही बळजबरी नव्हती. वरवधू दोघेही सुविद्य, सज्ञान होते.
देव्हारा काय, दुष्परिणाम काय.. काहीही.
असो. ज्याचे त्याचे मत.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 10/21/2016 - 12:11
नवीन
अपमान वगैरे व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणून थांबतो.
- Log in or register to post comments
C
chitraa
Fri, 10/21/2016 - 11:00
नवीन
५८ व्या वर्षी मधुमेह असताना ४० वर्षांच्या बाईशी लग्न करणार्या व्यक्तीला स्त्रिया आणि त्यांचे अधिकार याबद्दल किती कणव असेल याविषयी शंकाच आहे.
भारतीय घटना बनवणार्या टीमचे नेतॄत्व अयोग्य माणसाच्या हाती होते असे म्हणावे लागेल
तुम्हाला नोकरी देताना कंपनीने तुमचा बायोडेटा पाहिला की तुमच्या व बायकोच्या वयातील अंतर व तुमची ब्लड शुगर पाहून दिला ?
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 10/21/2016 - 11:10
नवीन
खानसाहेब,
तुम्ही सोयीनुसार माझी दोन वाक्ये इथे चिकटवली याचा अर्थ दुसरे वाक्य पहिल्या वाक्याची कॉरोलरी आहे असा होत नाही. या बोटाची थुंकी त्या बोटावर करुन काय मिळणार.
मुद्द्यात दम असेल तर बोला. उगाच ट्रोलभैरव पणा कशाला.
तुम्हाला नोकरी देताना कंपनीने तुमचा बायोडेटा पाहिला की तुमच्या व बायकोच्या वयातील अंतर व तुमची ब्लड शुगर पाहून दिला ?
ल्ग्न झाल्यावर मी नोकरी बदलली नाही. मला ब्लड शुगर नाही आणि कधीही नसेल.
या निमित्ताने माझी अकारण डॉ. आंबेडकर या व्यक्तीशी तुलना करु नका. ते मला अपमानास्पद वाटते.
- Log in or register to post comments
र
राही
Fri, 10/21/2016 - 11:52
नवीन
आपले वरचे काही प्रतिसाद आंबेडकरांच्या चाहत्यांना अपमानास्पद वाटू शकतील. मला वाटले.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 10/21/2016 - 12:10
नवीन
ओके. संपादकांना विनंती आहे की असे प्रतिसाद किंवा संबंधित वाक्ये उडवावीत.
- Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद
Fri, 10/21/2016 - 12:34
नवीन
आंबेडकरांनी स्वतःची बायको हयात असताना दिसरे लग्न केले असे नाही. पत्नीच्या निधनानंतर बर्^याच काळाने त्यांनी हे लग्न केलं, तेही परस्परसंमतीनं.
काय बोलणार?
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 10/21/2016 - 10:36
नवीन
टिळक आणि सावरकर यांच्या धर्मसुधारणेच्या इच्छेची, हेतूंची आणि परिणामांची अधिक खोलवर, तपशीलवार चिकित्सा व्हायला पाहिजे असे वाटते.
हे काहीसे 'एखाद्या क्रिकेट खेळणार्या खेळाडूला बॅडमिंटन चांगले खेळता येत नाही म्हणून हिणवल्यासारखे वाटते'.
सावरकर ही व्यक्ती समाजसुधारणा या परिप्रेक्ष्यात बसू शकेल पण ही व्यक्तीसुद्धा प्रामुख्याने स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काँटेक्स्ट मधे ओळखली जाते.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 10/20/2016 - 06:56
नवीन
प्रतापराव यांच्या ताजमहालाला आमची एक वीट.
महार हा समाज डॉ आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे आणि त्यांनी त्यांचा संदेश "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा बऱ्यापैकी अमलात आणला.
रिपब्लिकन पार्टीतील बरेच नेते हेही महार याच जातीतील आहेत उदा. नामदेव ढसाळ, रा सु गवई, . पहिल्या पिढितील या नेत्यांनी आपल्या अनुयायांना चांगले मार्गदर्शन केले. परंतु नंतर त्या पक्षाचे अनेक गट निर्माण झाले/ सत्ताधारी वर्गाने आपल्या स्वार्थासाठी सर्व तर्हेचे उपाय योजून निर्माण केले. उदा गवई गट , आठवले गट, कांबळे गट, दलित पँथर, खोब्रागडे गट इ. आणि सगळीकडे सवता सुभा निर्माण झाला.
आजही मागासवसर्गीय समाजात याच जातीचे वर्चस्व सर्वात जास्त आहे.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 10/21/2016 - 14:18
नवीन
<<<<<"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा">>>>
--- माझ्या एका वाचनात हा क्रम "शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा." असा आहे दुवा मिळाली की देतो.
- Log in or register to post comments
व
वटवट
गुरुवार, 10/20/2016 - 09:42
नवीन
प्रतापराव.. अगदी सहमत...
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 10/21/2016 - 13:44
नवीन
अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद...!!
<<<<<माझ्या मते धर्मांतरांने बौध्दांत अरे ला कारे आणि समोरच्याच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत आलिय जी दुर्दैवाने इतर दलित जातीत आलेली नाही>>>
-- विशेष आवडले..
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 10/19/2016 - 19:51
नवीन
प्रतापराव तुमचे प्रतिसाद खरेच आवडले, संयत मांडले आहेत तुम्ही, दलित म्हणजे फक्त नवबौद्ध ही एक अतिशय साधारण अज्ञानमूलक अवधारणा आहे, ती तुम्ही नीट समजून उलगडून सांगताय हे बेस्टच, मी भारतीय केंद्र सरकार सेवेत असल्यामुळे मी ह्या बाबतीत तुमच्या मोठ्या कॅनव्हास वर काही रंग भरू इच्छितो, जसे आपल्याकडे दलित म्हणजे नवबौद्ध हा समज प्रचलित आहे तसेच , उत्तरेत जटाव समाज आहे, हे समजण्याची कारणे तुम्ही मुळात सांगितली आहेतच, त्याच कारणांशी सुसंगत अजून एक जात म्हणजे मीणा समाज, ह्या जातीला आजकाल आयएएस आयपीएसचे आगार समजले जाते, एसटी कॅटेगरी मध्ये होणाऱ्या केंद्र सरकार अधिकारी मंडळी मध्ये मीणा समाज अत्याधिक प्रबळ असल्यामुळे उत्तरेत एसटी म्हणजे मीणाच असणार असा समज अगदी राजस्थान आढळतो
- Log in or register to post comments
द
दा विन्ची
Fri, 10/21/2016 - 07:34
नवीन
सोन्याबापुंचे मीना समाजबाबतचे निरीक्षण अचूक. शैक्षणिक व सरकारी नोकरीत आरक्षणाचा त्यांनी उत्तर भारतात अतिशय अचूक फायदा करून घेतला आहे. भारतीय प्रऔद्योगिकी संस्थान रुडकी मध्ये तर सरासरी ६० जणांच्या वर्गात कमीत कमी १०-१२ तरी मीना नावाची मुले आहेत.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 10/19/2016 - 19:53
नवीन
प्रतापराव व राही, दोघांचेही प्रतिसाद माहितीपूर्ण.
शिक्षणाबद्दलची जागृती विशेष आहे हे मान्य करायला हवेच.
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 10/20/2016 - 05:11
नवीन
काहीसे गालबोट लागूनही धाग्यावरील विचारप्रवर्तक अणि विधायक चर्चा आवडली.
अयोध्येमध्ये समाजोपयोगी वास्तु उभारावी असा विचार बाळासाहेब ठाकरे यांनीही मांडला होता असे आठवते,ज्व्हा तिहेरी पेच झाला होता तेंव्हा,कुणाला माहीती असेल तर लिंक द्या..
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 10/19/2016 - 20:20
नवीन
राहीताई आणि प्रतापरावांचे प्रतिसाद आवडले. बौद्ध धम्मीयांबद्दल प्रतापरावांनी माहिती दिलेलीच आहे तेव्हा अधिक काही लिहीत नाही.
- Log in or register to post comments
ह
होकाका
गुरुवार, 10/20/2016 - 23:49
नवीन
या संदर्भात:
काही दिवसांपूर्वी whatsapp वर एक ओशोंच्या भाषणाची एक सुरेख खरड आली होती. आठवली म्हणून जोडत आहे:
⛓⛓⛓जंजीरें⛓⛓⛓
Oshovaani
परतंत्रता से किसी का
भी प्रेम नहीं है। लेकिन
परतंत्रता को हमने स्वतंत्रता के शब्द और वस्त्र ओढ़ा
रखे हैं। एक आदमी अपने को हिंदू
कहने में जरा भी ऐसा अनुभव
नहीं करता कि मैं अपनी
गुलामी की सूचना कर रहा हूं।
एक आदमी अपने को मुसलमान कहने में
जरा भी नहीं सोचता कि मुसलमान
होना मनुष्यता के ऊपर दीवाल
बनानी है। एक आदमी
किसी बात में, किसी संप्रदाय में,
किसी देश में अपने को बांधकर
कभी ऐसा नहीं सोचता कि मैंने
अपना कारागृह अपने हाथों से बना लिया है।
बड़ी चालाकी, बड़ा धोखा
आदमी अपने को देता रहा है। और सबसे
बड़ा धोखा यह है कि हमने कारागृहों को सुंदर नाम दे
दिये हैं, हमने बेड़ियों को फूलों से सजा दिया है; और जो
हमें बांधे हुए हैं, उन्हें हम
मुक्तिदायी समझ रहे हैं!
यह मैं पहली बात आज आपसे कहना
चाहता हूं कि जो लोग भी अपने
जीवन में क्रांति लाना चाहते हैं, सबसे
पहले उन्हें यह समझ लेना होगा कि बंधा हुआ
आदमी कभी भी
जीवन की क्रांति से
नहीं गुजर सकता। और हम सारे
ही लोग बंधे हुए लोग है। यद्यपि
हमारे हाथों में जंजीरें नहीं
हैं, हमारे पैरों में बेड़ियां नहीं हैं;
लेकिन हमारी आत्माओं पर बहुत
जंजीरें हैं, बहुत बेड़ियां हैं। और पैरों में
बेड़ियां पड़ी हों, तो दिखायी
भी पड़ जाती है, पर आत्मा पर
जंजीरें पड़ी हों, तो
दिखायी भी नहीं
पड़ती। अदृश्य बंधन इस बुरी
तरह बांध लेते हैं कि उनका पता भी
नहीं चलता। और जीवन
हमारा एक कैद बन जाता है। और वे अदृश्य बंधन
हैं-सिद्धांतों के, शास्त्रों के और शब्दों के।
एक गांव में एक दिन सुबह-सुबह बुद्ध का प्रवेश
हुआ। गांव के द्वार पर ही एक व्यक्ति ने
बुद्ध को पूछा, ” आप ईश्वर को मानते हैं? मैं नास्तिक
हूं। मैं ईश्वर को नहीं मानता हूं।
आपकी क्या दृष्टि है?’ बुद्ध ने कहा,
‘ईश्वर? ईश्वर है। ईश्वर के अतिरिक्त और कुछ
भी सत्य नहीं है। ”
बुद्ध गांव के भीतर पहुंचे तो एक दूसरे
व्यक्ति ने बुद्ध को कहा, ‘‘मैं आस्तिक हूं। मैं ईश्वर
को मानता हूं। क्या आप भी ईश्वर को मानते
हैं?” बुद्ध ने कहा, ‘‘ईश्वर? ईश्वर है
ही नहीं। मानने का कोई सवाल
ही नहीं उठता। ईश्वर एक
असत्य है! ”
पहले आदमी ने पहला उत्तर सुना था,
दूसरे आदमी ने दूसरा उत्तर सुना। लेकिन बुद्ध
के साथ एक भिक्षु था, आनंद। उसने दोनों उत्तर सुने।
वह बहुत हैरान हो गया कि सुबह बुद्ध ने
कहा ‘ईश्वर है’ और दोपहर बुद्ध ने कहा,
‘ईश्वर नहीं है! ‘आनंद बहुत चिंतित
हो गया कि बुद्ध का प्रयोजन क्या है? उसने सोचा, सांझ
फुरसत होगी, रात सब लोग विदा हो जायेंगे,
तब पूछ लेगा। लेकिन सांझ तो मुश्किल और बढ़
गयी। एक तीसरे
आदमी ने आकर कहा, ‘‘मुझे कुछ
भी पता नहीं है कि ईश्वर
है या नहीं। मैं आपसे पूछता हूं आप
क्या मानते हैं-ईश्वर है, या नहीं?”
बुद्ध उसकी बात सुनकर चुप रह गये और
उन्होंने कोई भी उत्तर नहीं
दिया!
रात जब सारे लोग विदा हो गये, तो आनंद बुद्ध को पूछने
लगा कि मैं बहुत मुश्किल में पड़ गया हूं। मुझे बहुत
झंझट में डाल दिया है आपने। सुबह कहा, ऐँ
‘ईश्वर है; दोपहर कहा, नहीं है;
सांझ चुप रह गये। मैं ‘ समझूं?
बुद्ध ने कहा, ‘‘उन तीनों में कोई उत्तर तेरे
लिये नहीं दिया गया था। तूने वे उत्तर लिये
क्यों? जिनके प्रश्न थे, उनको वे उत्तर दिये गये थे। तुझे
तो कोई उत्तर दिया नहीं गया था। ‘
आनंद ने कहा, ‘‘क्या मैं अपने कान बंद रखता। मैंने
तीनों बातें सुन ली हैं। यद्यपि
उत्तर मुझे नहीं दिये गये लेकिन देने वाले तो
आप एक हैं और आपने तीन दिये ।”
बुद्ध ने कहा, ‘तू नहीं समझा। मैं उन
तीनों की मान्यताएं तोड़ देना
चाहता था। सुबह जो आदमी आया था
वह नास्तिक था। जो नास्तिकता में बंध जाता है, उस
आदमी की आत्मा भी
परतंत्र हो जाती है। मैं चाहता था, वद
अपनी जंजीर से मुक्त हो जाये।
उसकी जंजीरें तोड़
देनी थीं। इसलिये उसे मैंने कहा-
ईश्वर है। ईश्वर है, मैंने सिर्फ इसलिये कहा कि
वह जो यह मानकर बैठा है कि ईश्वर
नहीं है-वह अपनी
जगह से हिल जाये, उसकी जड़ें उखड
जायें, उसकी मान्यता गिर जाये, वह फिर से
सोचने को मजबूर हो जाये। वह रुक गया है। उसने
सोचा है कि यात्रा समाप्त हो गयी है।
और जो भी ऐसा समझ लेता है कि यात्रा
समाप्त हो गयी है, वह कारागृह में
पहुंच जाता है।
जीवन है अनंत यात्रा। वह यात्रा
कभी भी समाप्त
नहीं होती। लेकिन हिंदू
की यात्रा समाप्त हो जाती है,
बौद्ध की यात्रा समाप्त हो जाती
है, जैन की यात्रा समाप्त हो
जाती है, गांधीवादी
की यात्रा समाप्त हो जाती है,
मार्क्सवादी की यात्रा समाप्त हो
जाती है; जिसको भी वाद मिल
जाता है,उसकी यात्रा समाप्त हो
जाती है। वह समझने लगता है कि
उसने सत्य को पा लिया है, कि वह सत्य को उपलब्ध
हो गया है; अब आगे खोज की कोई जरूरत
नहीं है।
सभी संप्रदायों की,
सभी धर्मों की, सभी
पकड़वालों की खोज समाप्त हो
जाती है।
…. बुद्ध ने कहा, मैं उसे अलग कर देना चाहता था
उसकी जंजीरों से, ताकि वह फिर
से पूछे, वह फिर से खोजे वह आगे बढ़ जाये।
”.. दोपहर जो आदमी आया था, वह
आदमी आस्तिक था। वह यह मानकर
बैठ गया था कि ईश्वर है। उसे मुझे कहना पड़ा कि
ईश्वर नहीं है। ईश्वर है
ही नहीं। ताकि
उसकी जंजीरें भी
ढीली हो जायें, उसके मत
भी टूट जायें; क्योंकि सत्य को वे
ही लोग उपलब्ध होते हैं, जिनका कोई
भी मत नहीं होता।
” और सांझ जो आदमी आया था, उसका कोई
मत नहीं था। उसने कहा, मुझे कुछ
भी पता नहीं कि ईश्वर है या
नहीं। इसलिये मैं भी चुप रह
गया। मैंने उससे कहा कि तू चुप रह कर खोज, मत
की तलाश मत कर, सिद्धात की
तलाश मत कर। चुप हो। इतना चुप हो जा कि सारे मत
खो जायें। तो शायद, जो है, उसका तुझे पता चल जाये। ”
बुद्ध के साथ आप भी रहे होते तो
मुश्किल में पड़ गये होते। अगर एक उत्तर सुना होता
तो शायद बहुत मुसीबत न
होती। लेकिन अगर तीनों उत्तर
सुने होते, तो बहुत मुसीबत हो
जाती।
बुद्ध का प्रयोजन क्या है?.. बुद्ध चाहते क्या हैं?
.. बुद्ध आपको कोई सिद्धांत नहीं देना
चाहते हैं; बुद्ध, आपके जो सिद्धात हैं, उनको
भी छीन लेना चाहते हैं। बुद्ध
आपके लिये कोई कारागृह नहीं बनाना
चाहते; आपका जो बना कारागृह है, उसको
भी गिरा देना चाहतें हैं-ताकि वह खुला
आकाश जीवन का, खुली आंख
उसे देखने की-उपलब्ध हो जाये।
इससे भी क्या होता है। बुद्ध लाख चिल्लाते
रहें कि तोड़ दो सिद्धांत, लेकिन बुद्ध के पीछे
लोग इकट्ठे हो जाते हैं और उनके सिद्धांत को. पकड़
लेते हैं।
दुनिया में जिन थोड़े-से लोगों ने मनुष्य को मुक्त करने
की चेष्टा की है-मनुष्य
अजीब पागल है-उन्हीं लोगों
को उसने अपना बंधन बना लिया है! चाहे फिर वह
बुद्ध हों, चाहे महावीर हों, चाहे
मार्क्स हों और चाहे गांधी हों-कोई
भी हो-जो भी मनुष्य को मुक्त
करने की चेष्टा करता है,
आदमी अजीब पागल है, वह
उसी को अपना बंधन बना लेता है!
उसी को अपनी जंजीर
बना लेता है! और जिंदा आदमी तो कोशिश
ही कर सकता है कि वह
किसी के लिये उसकी
जंजीर न बने, वह मुर्दा
आदमी क्या करता है?
मरे हुए नेता, मरे हुए संत बहुत खतरनाक सिद्ध
होते हैं-अपने कारण नहीं,
आदमी की आदत के कारण। दुनिया
के सभी महापुरुष, जो कि मनुष्य को मुक्त
कर सकते थे, लेकिन नहीं कर पाये, क्योंकि
मनुष्य उनको ही अपने बंधन में रूपांतरित
कर लेता है। इसलिये मनुष्य के इतिहास में एक
अजीब घटना घटी है कि जो
भी संदेश लेकर आता है मुक्ति का, हम
उसको ही अपना एक नया काराणृह बना
लेते हैं! इस भांति जितने भी मुक्ति के संदेश
दुनिया में आये, उतने ही ढंग की
जंजीरें दुनिया में निर्मित होती
चली गयीं। आज तक
यही हुआ है-क्या आगे
भी यही होगा? और आगे
भी यही हुआ, तो फिर मनुष्य
के लिये कोई भविष्य दिखायी नहीं
पड़ता।
लेकिन ऐसा मुझे नहीं लगता कि जो आज तक
हुआ है, वह आगे भी होना
जरूरी है। वह आगे होना
जरूरी नहीं है। यह संभव
हो सकता है कि जो आज तक हुआ है, वह
आगे न हो-और न हो, तो मनुष्यता मुक्त हो
सकती है। लेकिन मनुष्यता मुक्त हो या न
हो, एक-एक मनुष्य को भी अगर मुक्त
होना है तो उसे अपने चित्त पर, अपने मन पर,
अपनी आत्मा पर पड़ी हुई
सारी जंजीरों को तोड़ देने
की हिम्मत जुटानी
पड़ती है।
जंजीरें बहुत मधुर हैं, बहुत सुंदर
हैं, सोने की हैं, इसलिये और
भी कठिनाई हो जाती है।
महापुरुषों से मुक्त होना बहुत कठिन मालूम पड़ता
है, सिद्धांतों से मुक्त होना बहुत कठिन मालूम पड़ता
है, शास्त्रों से मुक्त होना बहुत कठिन मालूम पड़ता
है। और अगर कोई मुक्त होने के लिये कहे, तो
वह आदमी दुश्मन मालूम पड़ता है;
क्योंकि हम चीजों को मानकर निशित हो जाते
हैं; खोजने की कोई जरूरत
नहीं रह जाती। और अगर
कोई आदमी कहता है-मुक्त हो जाओ,
तो फिर खोजने की जरूरत शुरू हो
जाती है; फिर मंजिल खो जाती
है; फिर रास्ता काम में आ जाता है। और रास्ते पर
चलने में तकलीफ मालूम पड़ती
है; मंजिल पर पहुंचने के बाद फिर कोई यात्रा
नहीं, कोई श्रम नहीं।
मनुष्य ने अपने आलस्य के कारण झूठी
मंजिलें तय कर ली हैं। और हम सबने
मंजिलें पकड़ रखी हैं। पहली
बात, पहला सूत्र जीवन-क्रांति का मैं आपसे
कहना चाहता हूं : और वह यह कि एक
स्वतंत्र चित्त चाहिये। एक मुक्त चित्त चाहिये।
एक बंधा हुआ, केप्सूल के भीतर बंद,
दीवालों के भीतर बंद, पक्षपातों के
भीतर बंद, वाद और सिद्धांत और शब्दों के
भीतर बंद चित्त कभी
भी जीवन में क्रांति से
नहीं गुजर सकता।
और अभागे हैं वे लोग, जिनका जीवन एक
क्रांति नहीं बन पाता; क्योंकि वे वंचित
ही रह जाते हैं, उस सत्य को जानने से
कि जीवन में क्या छिपा है? क्या था राज, क्या
था आनंद, क्या था सत्य, क्या था संगीत, क्या
था सौंदर्य? उस सबसे ही वे वंचित रह
जाते हैं!
ओशो
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 10/21/2016 - 12:09
नवीन
ओके. संपादकांना विनंती आहे की असे प्रतिसाद किंवा संबंधित वाक्ये उडवावीत.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 10/21/2016 - 12:10
नवीन
आप्पा, आंबेडकरांबद्दल लै खुन्नस?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »