Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुकाराम मुंढे अविश्वास प्रस्ताव आणि अभद्र युती

म
महासंग्राम
Tue, 10/25/2016 - 08:09
🗣 205 प्रतिसाद
आज राज्यात पुन्हा एकदा एका कार्यक्षम अधिकाऱ्याला हटवण्यासाठी अभद्र युती तयार झाली आहे. एखादा अधिकारी अकार्यक्षम आहे तर त्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यास समजू शकतो. पण मुंढेसारखा कार्यक्षम अधिकारी जेव्हा नवीमुंबईत प्रस्थापितांच्या धोतरालाच हात घालून त्यांच्या पायाखालची वाळू सरकवतो, तेव्हा त्यांना हटवणे हे साऱ्या लोकप्रतिनिधींच आद्य कर्तव्य होवून बसते हि या देशाची शोकांतिका आहे. 'तुकाराम मुंढे' हे पहिलंच उदाहरण नाही ज्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला गेला. या आधी अकोल्यात 'एकनाथ डवले', पिंपरीत अत्यंत कल्पक असे 'श्रीकर परदेशी' यांना सुद्धा राजकारण्यांनी विरोध केला होता. पण अधिकारी योग्य असेल तर त्यांना जनतेची साथ लाभते हे निश्चितच. अगदी याच प्रमाणे प्रत्येक वेळी मुंढे, परदेशी यांना सामान्य जनतेची साथ लाभली आणी राजकारण्यांचे दात घशात गेले. आता कसोटी आहे ती सरकारची. मुंढे यांच्या विरोधात असलेला प्रस्ताव रद्द करून मुख्यमंत्री आपली ताकद नोकरशाहीच्या मागे उभी करतात कि मांडवली मुख्यमंत्री म्हणून बसलेला शिक्का अजून गडद करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.. आज पुन्हा वेळ आली आहे चांगल्या अधिकाऱ्यांना पाठबळ देण्याची. मी पाठिंबा देतोय, आपण देणार का ?? #I_Support_Tukaram_Mundhe
वर्गीकरण
राजकारण नोकरशाही

प्रतिक्रिया द्या
47935 वाचन

💬 प्रतिसाद (205)
म
महासंग्राम Fri, 10/28/2016 - 07:12 नवीन
नितीन पालकर षंढ आपण असाल किमान मी तरी नाही... कृपया विषयाशी संबंधीत टिप्पणी केलीत तर बरे होईल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar
स
संदीप डांगे Fri, 10/28/2016 - 10:33 नवीन
फायदा होतो, नक्कीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar
A
amit१२३ Fri, 10/28/2016 - 13:47 नवीन
नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव 105 विरुद्ध 6 मतांनी पास झाला. यामध्ये राष्ट्रवादी , शिवसेना यांचा समावेश आहे. भाजपच्या 6 नगरसेवकांनी मुंढे यांच्या बाजूने मतदान केले पण या सगळ्या धामधुमीत काही दिवसांपूर्वी याच आयुक्तांच्या विरोधात बोलणाऱ्या म्हात्रे ताई कुठे दिसल्या नाहीत ते ? राजकारण म्हणतात ते हेच बहुतेक
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 11/03/2016 - 06:15 नवीन
फड्णवीसांनी तुकाराम मुंढे विरोधकांना ठेगा दाखवला आहे. अभिनंदन सीएम साहेब.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/03/2016 - 16:44 नवीन
एवढे होऊनही शिवसेनेला अक्कल आलेली नाही (तशीही अक्कल कधी नव्हतीच). अजूनही निर्लज्जपणे फडणविसांवर टीका सुरूच आहे. भाजपने एका दगडात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसला घायाळ केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
ल
लिओ Sat, 03/25/2017 - 03:23 नवीन
नवी मुंबई महानगरपालिकेचे वादग्रस्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली करण्यात आली.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 03/25/2017 - 06:11 नवीन
फडणवीस सरकार "ठंडा करके खाओ" नीती अवलंबत आहे का..? असे असेल तर चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिओ
व
विशुमित Sat, 03/25/2017 - 06:16 नवीन
असं काही नाही हो... PMO मध्ये अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची जास्त आवशकता आहे. परदेशींसारखी त्यांची तिकडेच बदली होईल कदाचित. समस्त देशाला त्याचा फायदा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
वरुण मोहिते Sat, 03/25/2017 - 17:13 नवीन
लेख लिहा ह्यावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sat, 03/25/2017 - 20:09 नवीन
मिपाकरांनी विचार मांडावे / मत व्यक्त करावे असे मी येथे म्हटले नाही. सरळ एका वाक्यात माझे स्वतःचे मत व्यक्त केले आहे. यावर काय लेख लिहू शकतो कळाले नाही. बाकी इतर कोणत्या धाग्याचा संदर्भ असल्यास, इथे तुम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता आहे का याचा विचार तुम्ही करा. तुम्हाला यापूर्वी एका धाग्यात लेख लिहायला सतत सुचवले होते कारण "तुम्ही स्वतःची मते न मांडता, दुसर्‍याने अभ्यास करून मते मांडावीत मग मी बोलतो"** अशी काहीतरी भूमीका घेतली होती. तरीही इथे मी तुम्हाला उत्तर देणे आवश्यक असल्यास तसे सांगा - मात्र त्यातून कटूताच वाढेल कारण तुम्ही दुसर्‍या धाग्यावरचे संदर्भ 'विनाकारण' चिकटवत आहात. (**अशी भूमीका मी घेतल्यास हाच न्याय तुम्ही माझ्या प्रतिसादाला लावून मला "लेख लिहा" असे सुचवू शकता.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
वरुण मोहिते Wed, 04/05/2017 - 12:32 नवीन
माझ्या मनात कटुता कधीच नसते . पण फडणवीसांनी अगदी पाठीशी घातलं बाजू घेतली त्याच वेळी मी भाजप च्या आमदारांवर मत व्यक्त केलं होतं. त्यावेळी साधा सरळ पक्ष आहे भाजप असा सूर होता . बाकी काही कटुता वैगरे नाही हो ...राग आला कि द्या चार शिव्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 04/05/2017 - 19:41 नवीन
बाकी काही कटुता वैगरे नाही हो ...राग आला कि द्या चार शिव्या मग ठीक आहे. :) __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
श
श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 12:11 नवीन
फडणवीस सरकार "ठंडा करके खाओ" नीती अवलंबत आहे का..? असे असेल तर चुकीचे आहे. ठंडा करके खाओ ही नीति बर्‍याच वेळा यशस्वी ठरते. मराठ्यांची राखीव जागांची मागणी व शेतकर्‍यांना कर्जमाफी या दोन्ही वादग्रस्त मुद्द्यांच्या बाबतीत ही नीति चांगलीच यशस्वी ठरत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मार्मिक गोडसे Mon, 03/27/2017 - 12:26 नवीन
मराठ्यांची राखीव जागांची मागणी व शेतकर्‍यांना कर्जमाफी या दोन्ही वादग्रस्त मुद्द्यांच्या बाबतीत ही नीति चांगलीच यशस्वी ठरत आहे.
राखीव जागांच्या मागणीबाबत योग्य तेच केले. परंतू, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीला हीच नीती वापरत असतील तर हे संवेदना बोथट झाल्याचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 12:33 नवीन
अव्यवहार्य मागणीसाठी हीच पद्धत योग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Mon, 03/27/2017 - 12:59 नवीन
येणारा काळंच ठरवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 03/25/2017 - 19:18 नवीन
यांची बदली नक्की कोणत्या कारणावरून केली याविषयी अजून अधिकृत घोषणा नाही. दिघ्यातील बेकायदशीर बांधकामांबद्दल महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या भूमिकेविरूद्ध भूमिका घेतल्याने त्यांची बदली केली असेल तर हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. तसे झाले असेल तर फडणवीस दबावाला बळी पडले असे म्हणावे लागेल. दुर्दैवाने त्यांची नवी मुंबईतून बदली झाली असली तरी सुदैवाने त्यांना पुण्यात पीएमपीएमएल च्या प्रमुखपदावर आणले ही चांगली गोष्ट आहे. पूर्वी पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावरून अरूण भाटियांना हटवून त्यांना थेट पुरातत्व खात्यात ढकलून निष्क्रीय करून टाकण्यात आले होते. तुकाराम मुंढ्यांची नवी मुंबईतून दुर्दैवीरित्या बदली केली असली तरी पुण्यामध्ये वेगळ्या क्षेत्रातले आव्हानात्मक काम त्यांना दिले ही चांगली गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिओ
आ
आदूबाळ Sat, 03/25/2017 - 06:30 नवीन
अरे पण 'अभय' दिलं होतं ना!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 03/25/2017 - 10:06 नवीन
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती- इति लोकसत्ता ताज्या बातम्या. छान झाले..!!
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 03/25/2017 - 12:32 नवीन
तिथे ते राजकारणी कृपेने किती दिवस टिकतात ते देवच जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 03/27/2017 - 05:53 नवीन
अशा अधिकाऱ्यांचा जनतेला दीर्घकाळ फायदा होताना दिसत नाही. अशा कर्तबदार अधिकाऱ्यांनी थेट संघर्ष न करता डिप्लोमॅटिकली कामे तडीस नेली पाहिजेत. अशी मेक मारून ठेवली पाहिजे की कोणी ही सोम्या गोम्या राजकारणी येऊ देत त्याला सिस्टिम ब्रेक करता आली नाही पाहिजे. हेच त्यांच्या कामाचे कौशल्य आणि फलित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
अ
अत्रे Mon, 03/27/2017 - 07:04 नवीन
कशी करणार? अशी एखादी युक्ती असली असती तर एवढ्या हुशार upsc पास लोकांना हि आयडिया सुचली नसेल का? कोणाचे उदाहरण आहे का तुमच्यापुढे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अप्पा जोगळेकर Mon, 03/27/2017 - 06:52 नवीन
फडण्वीसांनी फालतूपणा केला आहे. त्यांची जनतेच्या मनातली विश्वासार्हता ह्या मूर्ख निर्णयाने त्यांनी स्वतःच कमी करुन घेतली आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Mon, 03/27/2017 - 07:05 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
आ
आदूबाळ Mon, 03/27/2017 - 11:19 नवीन
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
र
रांचो Mon, 03/27/2017 - 14:15 नवीन
+१११ सगळे राजकारणी म्हणजे इतुन तिथुन सारखेच. सब घोडे बारा टक्के ... कोणताही पक्ष असो ह्यांना भ्रष्टाचार संपवण्यात काडी इतकेही स्वारस्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अत्रे Tue, 03/28/2017 - 03:07 नवीन
एक टेक्निकल प्रश्न आहे - या लेखानुसार
Officers of the three premier services — IAS, IPS and IFoS — will now spend a minimum of two years in each posting, according to new rules aimed at checking political interference
असे असताना मुंढे यांची एका वर्षाच्या आत बदली कोणत्या नियमाखाली झाली? मुख्यमंत्री असले तरी नियमांचे पालन केलेच असेल असे वाटते - तर ते नियम कोणते?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/28/2017 - 05:20 नवीन
मुंढेसारखा कार्यक्षम अधिकारी जेव्हा नवीमुंबईत प्रस्थापितांच्या धोतरालाच हात घालून त्यांच्या पायाखालची वाळू सरकवतो, तेव्हा त्यांना हटवणे हे साऱ्या लोकप्रतिनिधींच आद्य कर्तव्य होवून बसते आद्य कर्तव्य पार पडलचं शेवटी... नाही का ? मुख्यमंत्री दबावाखाली झुकले ? कि कुठली तरी मांडवली झाली ? या दोन पैकी ३ री शक्यता कोणाला जाणवली आहे काय ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Home! :- [ Anoushka Shankar ]
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Tue, 03/28/2017 - 08:43 नवीन
जाता जाता मुंढेंचा तडाखा हा खरा वाघ! बाकी उरले घोषणा/भाषणा पुरते ;)
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 04/05/2017 - 11:32 नवीन
असल्या चुटूर फ़ुटूर कारवाई करून PMPL च कसं भलं होईल ? http://www.loksatta.com/pune-news/pmpml-cmd-tukaram-mundhe-will-suspend-10-employee-who-sleeps-on-duty-1446561/
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 04/05/2017 - 12:02 नवीन
१. नव्या गाड्या विकत घेणे २. जुन्या गाड्यांची दुरूस्ती/ निकामी गाड्या भंगारात काढणे ३. प्रत्येक मार्गावर निदान १५ मिनिटात एक गाडी असेल इतकी वारंवारीता ४. सर्व गाड्यांमध्ये मशीन्सद्वारे टिकेटींग ५. ऑनलाईन टिकेट्स काढण्यासाठी अ‍ॅप ६. ब्रेकडाऊन्ची समस्या सोडवणे ७. जाहिरातींच्या व्यवसायातून येणारा महसूल वाढवणे ८. आरटी मार्ग वाढवणे ९. नवीन एसी बसेस सुरू करणे हे सारे दीर्घकालीन उपाय आहेत. मुंडेंसारख्या अधिकार्‍याकडून निश्चितच अशा उपायांची आणि पारदर्शक कारभाराची अपेक्षा करू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 04/05/2017 - 12:21 नवीन
हे सारे दीर्घकालीन उपाय आहेत. ==>> असल्या लोकप्रिय कारवाया करून प्रकाश झोतात राहिल्याने हे सारे दीर्घ कालीन उपाय होण्या अगोदर त्यांची उचल बांगडी होम गार्ड मध्ये होऊ नये एवढीच इच्छा. म्हणून मला असले बेधडक अधिकारी आवडत नाहीत. कारण दीर्घ कालीन उपायोजना राबवण्यासाठी डिप्लोमॅटिक राहून राजकारण्यांची गोची करून लोकहिताचे निर्णय घेतले पाहिजे. PMPL च्या भंगार सेवेला लोक नेहमी कंडक्टर- ड्राइवर-मेकॅनिकल यांनाच दोष देत असतात पण वरचे बडे मासे निवांत तरंगत असतात. त्यांच्या बद्दल बातम्या यायला सुरवात झाली तर मुंडेंना मानेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 04/05/2017 - 12:51 नवीन
म्हणून मला असले बेधडक अधिकारी आवडत नाहीत. कारण दीर्घ कालीन उपायोजना राबवण्यासाठी डिप्लोमॅटिक राहून राजकारण्यांची गोची करून लोकहिताचे निर्णय घेतले पाहिजे.
यासाठी +१११११.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मोदक Wed, 04/12/2017 - 09:51 नवीन
पुणे - मार्गावर धावताना बस नादुरुस्त झाल्यास खासगी ठेकेदारांना प्रतिबस पाच हजार रुपये दंड करण्याचा निर्णय पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी घेतला. येत्या रविवार (ता. १६) पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. http://beta1.esakal.com/pune/fine-rs-five-thousand-bus-fail-39652
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 04/12/2017 - 10:52 नवीन
मुंडेंनी आता खरा ट्रॅक पकडला आहे. बघू पुढे काय होतंय ते. त्यांच्या प्रयत्नाला शुभेच्छा...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
विशुमित Wed, 06/21/2017 - 12:16 नवीन
आमच्या गावातील एक PMT वाहक याच्या शी पर्वा गप्पा झाल्या; त्याच्या नुसार मुंडे आल्या पासून वाहक आणि चालक यांची चांगलीच तंतरली आहे. प्रवाशांना उध्दट बोलण्यापूर्वी १०० वेळा विचार करावा लागतो. काही प्रवासी तर स्मार्ट फोन वरून स्टॉप येई पर्यंत तक्रार करून मोकळे होतात आणि चालक-वाहकाची ड्युटी संपेपर्यंत तक्रारीचा सोक्षमोक्ष पण लागलेला असतो. परदेशी साहेबानी कॅश च्या पटीत चालू केले भत्ते बंद केल्यापासून तो बस वेळेवर हलवून, तोंडाला कुलूप लावून ८ तास काटेकोर पद्धतीने नोकरी करतो. बस जरी मोकळ्या गेल्या तरी जास्त टेन्शन घेत नाही. तोंड बंद ठेवल्यामुळे रात्रीचे चावळने बंद झाले आहे आणि झोप ही चांगली लागेते म्हणतो आता. मेन्टेनन्स वाल्याचे तर काही खरे नाही. त्यातल्या त्यात रात्र पाळी असणाऱ्यांचे. पापणी सुद्धा लवून देत नाही. कधी हा बाबा येईल आणि २-४ दिवसांचा पगार काटेल. रिपेरिंग पेक्षा लॉग बुके भरण्यात जास्त वेळ लावतात. चालाय गाडा त्यांचा. युनियन वाल्यांचे (अगोदर राष्ट्रवादी च्या बॅनर खाली वावरत होते) स्वारगेट येथील कुटाळक्या करण्यासाठी वापरात असलेल्या अड्ड्याला टाळे लावून टाकले आहे. डांगरी घालून नीट मन लावून काम करतात. त्यांची सुटलेली पोटं लेवल होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यांचा गॅस चा प्रॉब्लेम कमी झालेला आहे आणि त्यांना पण चांगली झोप लागते. लोकप्रतिनिधींना तर उभेच करत नाही. एक सातारचा वाहक सस्पेंड केले म्हणून सातारच्या राजांकडे गेला. राजांनी मुंडेंना फोन केला. मी राजे बोलतोय सस्पेंड केलेला माणूस पाठवतोय म्हणे पर्यंत फोन कट. आणि सगळ्यात जास्त गोची पार्टी विथ डिफरेन्सच्या शिलेदारांची झाली आहे. बाबा जुमानतच नाही कोणाला. टिळक मॅडम पण ???? खालची बातमी वाचू शकता. http://www.esakal.com/pune/pune-news-pmp-pune-mayor-54138 (वरचे लेखन सत्य घटनेवर आधारित आहे. कृपया कोणी विदा मागू नका. मुंडे आल्यापासून कोणाला आणखी काही बदल जाणवले असतील PMPL बाबत तर जरूर लिहा)
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 06/21/2017 - 12:27 नवीन
भारी आहे. एका पत्रकार बाईंचा असाच अनुभव वाचला होता. त्यांनी अ‍ॅपवरून तक्रार केली आणि थोड्याच वेळात ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर कारवाईचे काजवे दिसू लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 06/21/2017 - 12:33 नवीन
बातमी वाचली होते मागच्या आठवड्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अभिजीत अवलिया Wed, 06/21/2017 - 12:32 नवीन
सिग्नल तोडून गाडी चालवल्याबद्दल मी हेल्पलाईन वर तक्रार करत राहतो. चालकास अमुकतमुक दंड केला आणि ताकीद दिली असा sms काही दिवसांनी येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 06/21/2017 - 12:43 नवीन
मी फक्त फुकाचा दम भरतो, " सांगू काय मुंडे साहेबाना फोन करून ". बिचारे स्मित हास्य करतात पण तोंड उघडत नाहीत आता. आधीच वैतागले आहेत ह्या चेंगराचेंगरीच्या नोकरीला. ( रूट वरच्या बहुतांशी वाहक चालकांशी माझे सौदार्ह्याचे संबंध आहेत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
प
पुंबा Wed, 06/21/2017 - 13:47 नवीन
कोणते अ‍ॅप?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ध
धर्मराजमुटके Tue, 06/27/2017 - 12:30 नवीन
चांगला धागा !
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 06/29/2017 - 07:21 नवीन
मीडिया आणि राजकारण्यांच्या साटेलोटेपायी "अंदर की बात" सामान्य जनते पर्यंत पोहचतच नाही. http://www.esakal.com/pune/pune-news-tukaram-mundhe-56066
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 06/29/2017 - 07:30 नवीन
सत्ताधारी भाजपच्या सुसंस्कृत महापौरांना पण मुंडेंना हटवण्याची घाई झाली आहे. मुंडे यांच्या अशा हटवादीपणामुळे ते कितीही चांगले काम करीत असतील तरीही त्यांचा उपयोग नाही, असे त्या म्हणाल्या. मुंढे यांना परत बोलवावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=18895488
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/29/2017 - 11:10 नवीन
सर्वपक्षीयांच्या दडपणाला बळी न पडता फडणविसांनी मुंडे यांना अजिबात हटवू नये. अर्थात मागील काही महिन्यात असे दिसून आले आहे की फडणवीस इतरांच्या दबावाला बळी पडत आहेत. त्यामुळे मुंडे यांच्याबाबतीतही ते बोटचेपी भूमिका घेण्याची शक्यता वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
च
चौथा कोनाडा गुरुवार, 06/29/2017 - 19:25 नवीन
या राजकारणी लोकांचे जे काही आक्षेप आहेत, त्या वर आज मुंडे यांनी स्पष्टीकरण देलेले आहे त्यामुळे राजकारणी लोकांचे चांगलेच पितळ उघडे पडत आहे. http://www.esakal.com/pune/pune-news-tukaram-mundhe-56066 त्यांच्या उत्तरातले काही महत्वाचे मुद्दे : तुकाराम मुंढे म्हणाले.... - माझ्याकडून "इगो'चा प्रश्‍न नाही; मला लक्ष्य केले जात आहे. - पीएमपीच्या हितासाठी, या संस्थेला फायद्यात आणण्याचे माझे प्रयत्न आहेत. - पीएमपीला अनुदान देण्याचा ठराव रद्द करण्यासाठी महापालिकेनेच राज्य सरकारकडे पाठविला. - दोन्ही महापालिकांना हवी असलेली माहिती दिली आहे, अनुदान द्यायचे की नाही, हा निर्णय आता त्यांचा आहे. - महापालिकांमधील बैठकांना अध्यक्ष नव्हे, तर पूर्वीही पीएमपीचे अधिकारीच जात होते. - संघर्ष नको; मला प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने काम करायचे आहे. एकंदरीत बीआरटीचा घाणेरडा अनुभव बघता, स्मार्ट सिटी सारखे फालतू प्रकल्प नकोच. आपल्याला विकून खातील हे लोक !
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 02/07/2018 - 13:30 नवीन
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाली आहे. नाशिक महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यापुढे कार्यरत असतील. ही बातमी
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 02/08/2018 - 05:56 नवीन
दुर्दैवाने ... हे तर होणारच होते ! त्यांच्या अल्पकारकिर्दीत पुणे शहर परिसर मधील सामन्य प्रवाश्यांसाठी जे काही अफाट प्रयत्न केले त्याला तोड नाही. मुंडे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा ! श्रीकर परदेशी ( सारथी सिस्टिम फेम) यांची पिंचिं मधुन बदली झाल्यावर बर्‍याच प्रणाली थंड झाल्या, तेच इथं होईल, दुसरं काय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
व
विशुमित गुरुवार, 02/08/2018 - 07:17 नवीन
फक्त प्रयत्न होऊन उपयोगाचे नाही. रिजल्ट्स हवे होते. सुरवातीच्या काळातच मुंडेंची हवा होती, नंतर सगळे जैसे थे झाले होते. आता यापुढे काय होणार आहे माहित नाही. आंतरिक माहिती नुसार पुणेच्या विद्यमान खासदारांच्या सुपुत्राचा हट्ट पुरवण्यासाठी मुंडेंची उचलबांगडी केले अशी वदंता आहे. कारण स्वारगेट येथील PMPML चे आलिशान ऑफिसला त्यांनी खर्चाबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. (सूत्र: युनियन मधला एक वाहक) महापौर आणि भाजपचे आणखी हेवीवेट नगरसेवकांची सुद्धा हीच इच्छा होती आणि त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांचा अदृश्य (पारदर्शक) पाठिंबा असणार यात कोणाचे दुमत नसावे. माननीय चिट मिनिस्टरांनी सर्वांची इच्छा पुरी केली त्याबद्दल आमच्यासारख्या प्रवाशांकडून त्यांचे कोटी कोटी आभार. गेली १० वर्ष मी PMPML चा प्रवासी आहे, १ % सुद्धा सुधारणा झालेली दिसली नाही. नाशिककर आणि राज ठाकरेंची मनसे यांनी मुंडेंच्या कार्यशैलीचा इष्टतम उपयोग करून घेतलेला आवडेल. परदेशी साहेब डिरेट PMO मध्ये जाऊन धडाडीने काम करत आहेत, तसेच मुंडेंनी नाशिक मध्ये करावे. त्यांच्या पुढील कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ब
बिटाकाका गुरुवार, 02/08/2018 - 07:20 नवीन
राज ठाकरेंची मनसे यांनी मुंडेंच्या कार्यशैलीचा इष्टतम उपयोग करून घेतलेला आवडेल.
हे कस्काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा