Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुकाराम मुंढे अविश्वास प्रस्ताव आणि अभद्र युती

म
महासंग्राम
Tue, 10/25/2016 - 08:09
🗣 205 प्रतिसाद
आज राज्यात पुन्हा एकदा एका कार्यक्षम अधिकाऱ्याला हटवण्यासाठी अभद्र युती तयार झाली आहे. एखादा अधिकारी अकार्यक्षम आहे तर त्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यास समजू शकतो. पण मुंढेसारखा कार्यक्षम अधिकारी जेव्हा नवीमुंबईत प्रस्थापितांच्या धोतरालाच हात घालून त्यांच्या पायाखालची वाळू सरकवतो, तेव्हा त्यांना हटवणे हे साऱ्या लोकप्रतिनिधींच आद्य कर्तव्य होवून बसते हि या देशाची शोकांतिका आहे. 'तुकाराम मुंढे' हे पहिलंच उदाहरण नाही ज्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला गेला. या आधी अकोल्यात 'एकनाथ डवले', पिंपरीत अत्यंत कल्पक असे 'श्रीकर परदेशी' यांना सुद्धा राजकारण्यांनी विरोध केला होता. पण अधिकारी योग्य असेल तर त्यांना जनतेची साथ लाभते हे निश्चितच. अगदी याच प्रमाणे प्रत्येक वेळी मुंढे, परदेशी यांना सामान्य जनतेची साथ लाभली आणी राजकारण्यांचे दात घशात गेले. आता कसोटी आहे ती सरकारची. मुंढे यांच्या विरोधात असलेला प्रस्ताव रद्द करून मुख्यमंत्री आपली ताकद नोकरशाहीच्या मागे उभी करतात कि मांडवली मुख्यमंत्री म्हणून बसलेला शिक्का अजून गडद करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.. आज पुन्हा वेळ आली आहे चांगल्या अधिकाऱ्यांना पाठबळ देण्याची. मी पाठिंबा देतोय, आपण देणार का ?? #I_Support_Tukaram_Mundhe
वर्गीकरण
राजकारण नोकरशाही

प्रतिक्रिया द्या
47935 वाचन

💬 प्रतिसाद (205)
व
विशुमित गुरुवार, 02/08/2018 - 07:38 नवीन
विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मुद्दे मिळवून आणि पुन्हा पुढच्या टर्म मध्ये सत्ता मिळवण्यासाठी मुंडेंच्या कार्यशैलीचा खळ खट्याक पार्टीला उपयोग होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ए
एकुलता एक डॉन गुरुवार, 02/08/2018 - 09:55 नवीन
बातमी शनिवारीच फुटली होती पण मुंडे हे मुख्य मंत्र्यांच्या जवळचे असे कळले होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
स्वधर्म गुरुवार, 02/08/2018 - 08:21 नवीन
एकदा माणसाची प्रतिमा बनली, की माणूस तीच दृढ करतो, हा सामान्य नियम असावा. गाजलेल्या कडक अाधिकार्यांना अापण एका बरबटलेल्या व्यवस्थेचे भाग अाहोत, तरीही अापल्याला चांगलं काम करायचंय, त्यासाठी सगळ्यांचा पाठींबा मिळवणं, व्यवस्थेतच टिकून रहाणं महत्वाचं का वाटत नाही? अशा वेळी नरसिंह राव यांची अाठवण येते. त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन, अात्ताच्या राजकारण्यांपेक्षा एक शतांश पटही गाजावाजा न करता, कॉंग्रेससारख्या मेंढरांच्या पक्षातच राहून देशाला फार पुढं नेलं असं वाटतं.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 02/09/2018 - 08:08 नवीन
दे दणका... झाले पुन्हा चालू... इथून पुढे हा माणूस ३ वर्ष टिकला पाहिजे एका जागेवर, पाण्याचा थेंब देखील वाया जाऊन देणार नाही. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/tukaram-mundhe-takes-charge-nashik-muncipal-corporation-commissioner/articleshow/62847688.cms
  • Log in or register to post comments
श
शलभ Fri, 02/09/2018 - 08:32 नवीन
हा माणूस इतक्या इमानदारीने काम करतो कि सगळ्यांना ह्याची अडचणच होते. राज ठाकरे नी सपोर्ट केलं तरच टिकेल नाहीतर नाही. फडणवीस यांनी अपेक्षाभंग केला. प्रामाणिक अधिकाऱ्यांना सपोर्ट करणार म्हणाले होते. मुंढेंच्या बाबतीत तर ते खरं होताना दिसत नाही, बाकी माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
S
sagarpdy Mon, 02/12/2018 - 06:42 नवीन
+१००० बोलने मी बढाई ... प्रकार सुरु आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
क
केंट Fri, 02/09/2018 - 10:05 नवीन
नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. आज झालेल्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत साध्या ड्रेसवर आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला मुंढे यांनी बैठकीतून बाहेर काढले आणि त्यांना युनिफॉर्म घालून यायला सांगितले. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/tukaram-mundhe-takes-charge-nashik-muncipal-corporation-commissioner/articleshow/62847688.cms
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 02/11/2018 - 09:02 नवीन
वा मुंढे साहेब, वा! तुमच्या सारखा तुकाराम हवाच आहे असल्या नाठाळांच्या माथी काठी हाणायला ! असे छोटे छोटे वचक बसले तरी मनपा कर्मचार्‍यांची कार्यक्षमता १५-२०% ने वाढेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केंट
ब
बिटाकाका Sun, 02/11/2018 - 09:08 नवीन
हे काहीच्या काही वाटत नाही का? घरी पाठवायची काय आवश्यकता? जे काही नोटीस, मेमो किंवा पहिल्यांदा आहे म्हणून ताकीद वगैरे न देता घरी पाठवून देण्यात काय हशील ? हे नियमात बसतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केंट
श
शलभ Sun, 02/11/2018 - 09:40 नवीन
पहिल्यांदा आहे म्हणून ताकीद. कशाला सवय लावायची पहिल्यांदा आहे म्हणून सोडून द्यायची. आख्खी महापालिका बसलीय जाऊंद्या साहेब पहिली वेळ आहे म्हणायला. आणि मेमो देण्यापेक्षा घरी जाऊन युनिफोर्म घालून येणं चांगलंच आहे. आणि शुक्रवारी फैलावर घेतलं म्हणून शनिवार रविवार स्वच्छता करायला घेतलीय कर्मचाऱ्यांनी आपापल्या विभागांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sun, 02/11/2018 - 09:46 नवीन
ते ठिकाय हो, पण त्या अधिकाऱ्याला बैठकीतून घालवणे कितपत योग्य आहे? शिस्तीचे अधिकारी असण्याचा अर्थ तो नाही. आणि माफ करायला कोण सांगतंय, पण नियमाने जी काही कारवाई करायचीय ती करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
च
चौथा कोनाडा Sun, 02/11/2018 - 12:06 नवीन
बातमीत म्हटलंय :
महाजन यांचं साध्या ड्रेसवर येणं मुंढे यांना खटकलं. त्यांनी महाजन यांना ड्रेस घालूनच बैठकीला यायला सांगितलं. त्यामुळे महाजन घरी गेले आणि अग्निशमन दलाचा ड्रेस परिधान करून आले.
पहिल्यांदा आहे म्हणून ताकिद देणं हा एक पर्याय होता, पण कश्याला असा पायंडा पाडा अन असली सवलत इतरांनाही द्या असा विचार मुंढे यांनी केला असावा. उलटं हे बरोबर झाले. मेमो, वार्निंग लेटर अथवा इतर कारवाई पेक्षा त्यांनी घरी जाऊन ते गणवेष बदलून आले. अगदी योग्य ! यात काय मान-अपमान ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
शलभ Sun, 02/11/2018 - 12:53 नवीन
+1 माझे कष्ट वाचवले जे मी करणारच नव्हतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ब
बिटाकाका Sun, 02/11/2018 - 16:36 नवीन
हो, खूप मोठे काम केले त्यांनी फायर ब्रिगेड च्या चिफ ला मिटिंग मधून बाहेर काढून. मिटींगला ड्रेस घालूनच या म्हणून मिटिंगला बसण्यास मज्जाव करणे म्हणजेच मिटिंगमधून बाहेर काढले असे नाही का? ज्या गोष्टी असल्या शिस्तीने होत नाहीत त्या प्रेमाने व्यवस्थित सांगितल्याने होतात. कर्मचाऱ्यांवर त्यांच्या अधिकाराची जरब असण्यापेक्षा आदरयुक्त भीती असण्याची जास्त आवश्यकता सध्याच्या व्यवस्थेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
स
सुबोध खरे Mon, 02/12/2018 - 07:50 नवीन
बिटा काका अग्निशमन दल हि एक गणवेशधारी सेवा आहे आणि त्यातील अधिकाऱ्यानी कोणत्याही अधिकारीक बैठकीला गणवेशातच हजर राहणे आवश्यक आहे. उद्या लष्करी अधिकारी गणवेशाऐवजी साध्या कपड्यात आले तर चालेल का? शिवाय असे शिस्तभंग केल्याबद्दल कार्यवाही हि सार्वजनिकच व्हायला हवी. अशा मुळे इतर लोकांवरही वचक बसण्यास नक्कीच मदत होते. मी कडक अधिकारी आहे( I MEAN BUSINESS) हे लोकांपर्यंत पोहोचवणे याचा हा उत्तम मार्ग आहे. लष्करात गणवेश नीट नसेल तर सर्वांसमोर ताबडतोब घरी पाठवून गणवेश नीट घालून यायला लावतात आणि वर दुसऱ्या दिवशी "हजेरी"ही घेतली जाते. असे एकदा झाले कि माणूस शिस्त भंग करण्यापूर्वी चार वेळेस विचार करतो. काय झालंय कि अति अनुनय करणाऱ्या लोकशाही मुळे "आदरयुक्त भीती" ला सरकारी कर्मचारी भीक घालत नाहीत त्यामुळे जरब बसवणेच आवश्यक झाले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
शलभ Mon, 02/12/2018 - 08:47 नवीन
+१ धन्यवाद डॉक. तुम्ही बोललात यावर ते बरं झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/12/2018 - 08:59 नवीन
+१००० गणवेश घालणे कोठे आवश्यक आहे आणि कोठे नाही याचे सामान्य नियम जिला माहित नाहीत आणि/किंवा ते जी पाळत नाही, अशी व्यक्ती गणवेशधारी अधिकारी बनण्यास सर्वस्वी नालायक असते. पूर्णविराम. चूक करणारा "आपला माणूस" असला किंवा कडक कारवाई आपल्या "राजकिय प्रतिस्पर्ध्या"ने केलेली असली तर, काही लोकांची मने मानवतेच्या आणि विचास्वातंत्र्याच्या विचाराने भरभरून ओसंडू लागतात... हल्ली (केवळ विरोधासाठी विरोध) हा भारतिय राजकारणाचा दंडक बनत चालला आहे ! :( आणि हेच लोक परत "लोकशाही आणि सुव्यवस्थेचे" कैवारी असल्याचा आव आणून तावातावाने भांडू लागतात तेव्हा तर ते शिसारी आणणारे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बिटाकाका Mon, 02/12/2018 - 17:10 नवीन
तुमच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पॅराचा काय अर्थ आहे? तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? यापैकी काही मला उद्देशून आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/12/2018 - 18:55 नवीन
तो प्रतिसाद कोणा एकाला उद्देशून नाही तर गणवेशधारी सेवेत सर्वसामान्य दंडक काय असतो व सद्यस्थिती काय आहे याबद्दलची ती विधाने आहेत. गणवेशधारी नसलेल्या इतर मुलकी सेवेचे नियम-कायदे-कारवाई इथे चर्चेला नाहीत. गणवेशधारी सेवेत कामावर असताना गणवेश घालणे हा पर्याय नसून आवश्यक कर्तव्य (इसेंशियल पार्ट ऑफ ड्युटी) असते. गणवेशधारी सेवेत आपल्या गणवेशासंबंधीचे नियम माहित असणे हे कनिष्ठातल्या कनिष्ट कर्मचार्‍याचे कनिष्ठातले कनिष्ठ कर्तव्य असते. इथे तर ज्या अधिकार्‍याबद्दल चर्चा चालू आहे तो फायर ब्रिगेडचा मुख्याधिकारी आहे ! हे तर कुंपणाने शेत खाल्ल्यासारखे झाले. कोणाही मुख्याधिकार्‍याला त्याच्या विभागाचे नियम केवळ माहित असणेच आवश्यक असते असे नाही तर त्याने ते आत्मसात केलेले असणे अपेक्षित असते. त्याचबरोबर, त्याच्या अधिकारातील सर्व अधिकारी-कर्मचारी गणवेशासकट सर्व नियमांचे पालन करतात की नाही, हे पाहणे (सुपरव्हिजन/ओव्हरसाईट) त्याची महत्वाची जबाबदारी असते. ते नियम तो स्वतःच धाब्यावर बसवत असेल तर तो आपल्या पदावर राहण्याचा नैतिक व कायदेशीर हक्क गमावतो. "तुम्ही आपल्याच विभागाचे नियम पाळत नाही" हे मुख्याधिकार्‍याला दुसर्‍याने त्याला सांगायची पाळी येणे ही तर अत्यंत लाजिरवाणी परिस्थिती आहे... आणि जर तो हे बेपर्वाईमुळे करत असेल तर ती अजूनच जास्त गंभीर बाब आहे. कारण गणवेश न घालणे हे बेशिस्त वर्तन झाले; आणि हे बेशिस्त वर्तन वरिष्ठ अधिकार्‍यासमोर करणे हा त्याचा उपमर्द करणे होते... ही डबल व्हॅम्मी झाली. "माझ्या मते त्या अधिकार्‍याला गणवेश घालून ये" असे सांगितले गेले ही फार मवाळ कारवाई झाली... त्याचसोबत त्याच्यावर संबंधित गणवेशसेवा (युनिफॉर्म्ड सर्विस) कायद्याप्रमाणे कारवाई करणे जास्त योग्य होईल. बेशिस्त कृती जर गणवेशधारी सेवेत गंभीरपणे घ्यायची नाही तर मग अन्य कोठे घ्यायची ?! हे मान्य नसले तर कोणत्याही गणवेशधारी सेवेचे मूलभूत नियम-कायदे तपासून पहावे असे सुचवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Tue, 02/13/2018 - 03:24 नवीन
हे तुम्ही तुमच्या पहिल्या पॅराबद्दल सांगत आहात, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. गणवेश घालणे आवश्यक आहे याबाबत आपले मतभेद नाहीयेत हे नम्रपणे नमूद करतो. परंतु, दुसऱ्या आणि तिसऱ्या पॅरामध्ये तुम्ही काही तरी आपला माणूस, व्यक्तिस्वातंत्र्य, राजकीय, हेच लोक- असं काहीसं लिहिलं आहे. ते कळलं नाही, ते माझ्यासाठी होतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बिटाकाका Mon, 02/12/2018 - 17:07 नवीन
मी गणवेश घालायला नकोय किंवा नाही घातला तरी चालतो असे म्हणल्याचं दिसलं काय कुठे?? माझा मुद्दा निराळा आहे. ते त्यांनी ज्या पद्धतीने केले, किंवा याआधी ते ज्या पद्धतीने करत आले आहेत ते मला योग्य वाटत नाही. उगाच धाक आहे धाक आहे म्हणायचं आणि पुढे काय? कुठला पॉजिटिव्ह बदल घडलाय किंवा घडण्याची अपेक्षा आहे? त्यापेक्षा अतिशय योग्य पद्धतीने सन्मानपूर्वक घडवलेला बदल कायमस्वरूपी असत नाही का? लक्षात घ्या, इथे असेही सनदी होऊन गेले आहेत आणि अजूनही आहेत ज्यांना त्यांच्या कार्यालयातील लहानात लहान कर्मचाऱ्यांची नवे माहीत असतात आणि ते त्यांच्याशी सन्मानाने वागतात. आधीच मस्तावलेल्या विद्यार्थ्यांना छड्या मारून सुधारता येत नाही यासारखेच आहे काहीसे सरकारी कर्मचाऱ्यांचे! कडक शिस्त बदल घडविण्यास कामाला येत नसेल तर अशी शिस्त कामाची नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 02/12/2018 - 18:24 नवीन
कडक शिस्त बदल घडविण्यास कामाला येत नसेल हे आपण कसे ठरवले? नाशिक मध्ये हा प्रयोग फसला होता का? जाता जाता-- आणीबाणी च्या कालावधीत सरकारी अधिकारी वेळेवर कामावर येत असत आणि सहसा लाचही मागायला धजत नसत. नंतर शिस्तीचा अतिरेक झाला ही गोष्ट अलाहिदा. परंतु मर्यादित प्रमाणात शिस्त असली तर त्याने अत्यंत नतद्रष्ट माणसाला सरळ करता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Mon, 02/12/2018 - 18:34 नवीन
पुण्यात तरी फेलच झालेला दिसला. नवी मुंबईत काही विशेष नाही, सोलापुरात सुद्धा उल्लेखनीय नाही. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मराठी_माणूस Tue, 02/13/2018 - 07:24 नवीन
सहमत. कर्मचार्‍यांशी सन्मानाने वागणार्‍या साहेबाच्या काळात आपणहुन जास्त काम केल्याची तसेच शिस्तीच्या नावाखाली येता जाता बडगा उगारणार्‍या साहेबच्या काळात फक्त त्याच्या समोर काम केल्याचा देखावा करणारी सुध्दा उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 07:30 नवीन
सहमत.. मुंडेंबाबत माझेही असेच मत आहे. कडक शिस्तीमुळे कामचुकार लोकांचे काही जास्त बिघडत नाही पण जे इमानदारीने/ दिलेले काम करत असतात त्यांच्या परफॉर्मन्सला उतरती कळा लागते. मग ते पण म्हणते नेमात तर नेमात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
शलभ Tue, 02/13/2018 - 08:15 नवीन
-१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सुबोध खरे Tue, 02/13/2018 - 15:01 नवीन
परंतु मर्यादित प्रमाणात शिस्त असली तर त्याने अत्यंत नतद्रष्ट माणसाला सरळ करता येते. वरचे मी लिहिलेले वाक्य परत उद्धृत करतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ब
बिटाकाका Tue, 02/13/2018 - 12:35 नवीन
अजून एक कर्तव्यदक्षपणा! माझ्यामते, पहिल्या दिवशी शहराला चक्कर मारली असती आणि कुठे कुठे काय कचरा पडलाय पाहिला असता आणि सर्व कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशी कामाला लावून साफसफाई करून घेतली असती तर जनतेने जास्त दुवा नसता का दिला? प्राधान्य नेमके कशाला असायला हवे? https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/remove-photos-of-gods-and-goddesses/articleshow/62889617.cms
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 13:17 नवीन
सुट्टीच्या दिवशी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Tue, 02/13/2018 - 13:57 नवीन
त्या बातमीत लिहिलं आहे कि त्यांनी आल्या आल्या सुटीच्या दोन दिवशी सर्व कर्मचाऱ्यांकडून महापालिकेची सफाई करून घेतली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ब
बिटाकाका Tue, 02/13/2018 - 19:13 नवीन
पहिल्या नाही पण चौथ्या-पाचव्या दिवशी गोदावरीला भेट देऊन तिथल्या प्रदूषणाची चौकशी साहेबांनी केली. हेच जनतेला अपेक्षित असावं! वेल-डन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
क
केंट Wed, 02/14/2018 - 04:40 नवीन
मुंढे यांनी आल्या-आल्या अधिकारी-कर्मचा-यांना फैलावर घेण्यास सुरूवात करतानाच माध्यमांमध्ये सतत चर्चेत राहण्याचा फंडा आरंभल्याने आता महापालिका वर्तुळात तो रंजनाचा विषय ठरू लागला आहे. कामचुकार अधिका-यांवर कारवाईचा बडगा उगारलाच पाहिजे. त्याविषयी नाशिककर आयुक्तांच्या पाठिशीच राहतील. परंतु, ज्येष्ठत्वाला पोहोचलेल्या काही अधिका-यांचाही क्षुल्लक गोष्टींवरून उपमर्द करण्याचा प्रकार सुरू झाल्याने महापालिकेतील कर्मचारी-अधिकारी वर्गातील वातावरण गढूळ बनले आहे. दोन दिवसांपूर्वी आयोजित बैठकीत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले काही अधिकारी उशिराने आल्याने त्यांना समज देण्यात आली परंतु, महापालिकेचे असलेल्या एका अधिका-याला उशिर झाला म्हणून त्याचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे हा दुजाभाव कशासाठी असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. http://www.lokmat.com/nashik/tukaram-mundhe-saheb-do-cleaning-thoughts-yourself/
  • Log in or register to post comments
श
शलभ Wed, 02/14/2018 - 06:01 नवीन
माध्यमांमध्ये सतत चर्चेत राहण्याचा फंडा आरंभल्याने
हे मुंढेंच्या हातात आहे का? ते नियमाप्रमाणे काम करतात ही त्यांची चूक आहे असं वागतायत काही लोकं तर. रच्याकने मुंढेंच्या बदनामीची मोहीम चालू झालीय असं दिसतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केंट
ब
बिटाकाका Wed, 02/14/2018 - 06:10 नवीन
रच्याकने मुंढेंच्या बदनामीची मोहीम चालू झालीय असं दिसतय.
हे कसं जरा सांगाल का? फक्त नियमांना धरून राहणे हीच सध्याच्या व्यवस्थेची गरज आहे असे कोणाला वाटत असेल तर वाटोत बापडे! जोपर्यंत असे नियमांना धरून राहणे, कडक शिस्त ठेवणे लोकांच्या फायद्यात रूपांतरित होत नाही ना तोपर्यंत तो कर्तव्यदक्षपण फोल ठरतो असे माझे मत आहे. आता याविरुद्ध बोलणे म्हणजे बदनामी? ती कशी काय बरं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
स
स्वधर्म Wed, 02/14/2018 - 07:22 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
शलभ Wed, 02/14/2018 - 08:24 नवीन
मी तरी बातमी बद्दल बोलत होतो. तुम्ही स्वतावर का घेताय.
जोपर्यंत असे नियमांना धरून राहणे, कडक शिस्त ठेवणे लोकांच्या फायद्यात रूपांतरित होत नाही ना तोपर्यंत तो कर्तव्यदक्षपण फोल ठरतो असे माझे मत आहे
हे सिद्ध करु शकता का? उगाच ज्याला येऊन आठवडा पण नाही झाला त्याच्या प्रत्येक कामात छिद्रान्वेशीपणा करायचा. आतापर्यंत किती ठिकाणी मुंढेंना पूर्ण कार्यकाळ मिळालाय. मी मागे त्यांच्या एका मुलाखतीत वाचल होतं. नियमात असेल आणि लोकांच्या फायद्याचं असेल तर तो निर्णय अमलात आणायला ते परिणामांची पर्वा करत नाहीत. आणि त्यामुळे त्यांची बदली होते. ते म्हणतात कि सुरुवातीचे वर्ष जे बिघडलेलं आहे ते मार्गी लावायला जातं आणि एक पुरेपूर system जी ते गेल्यावरही नीट काम करेल ती बनवायच्या आत बदली. आता तुम्ही म्हणाल कि त्यापेक्षा लोकांना बाबापुता करून कामे करून घ्या आणि system बनवा. पण प्रत्येकाची कार्यशैली वेगळी असते. ते मान्य न करताच हे चुकीचं आहे असं बोलत फिरायचं. नवी मुंबईत असताना त्यानी किती काम केलं ते आम्हाला व्यवस्थित माहितेय. जेवढी केली ती लोकांच्या फायद्याचीच होती. आता नवीन कोण आयुक्त आहे ते पण लोकांना माहित नाहीय. परत अनधिकृत बांधकामं उभी राहिलीत. परत कुठे पाहिजे तिथे खाण्याचे stall चालू झालेत. कचरा वेगळा करायला सुरुवात झालेली ते परत आहे तसा झालं. आजकाल लोकांना नियम तोडायची, वाकवायची एवढी सवय झालीय कि कुणी नियमात राहून काम करत असेल तर लगेच कठोर वाटू लागतो. अजून परत परत तेच बोलायला वेळ नाहीय माझ्याकडे सो परत काही बोलण्यासारखं असेल तरच प्रतिक्रिया देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
म
मेघपाल Wed, 02/14/2018 - 09:20 नवीन
+१०००००० हे बिटाकाका नामक सदस्य मुंढेंवर इतके का उखडलेले आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
ब
बिटाकाका Wed, 02/14/2018 - 09:24 नवीन
हे बिटाकाका नामक सदस्य मुंढेंवर इतके का उखडलेले आहेत
या वैयक्तिक टिप्पणीचे कारण काय ? तुमचे काही मुद्दे असतील तर त्याबद्दल बोला की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघपाल
म
मेघपाल Wed, 02/14/2018 - 15:05 नवीन
वैयक्तिक टिप्पणी कुठे आहे? काय वेड लागलंय का काहीही लिहित सुटलात? इतके का उखडलाय म्हटलं? विचारले आहे. टिप्पणी नाय ती. प्रश्न आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Wed, 02/14/2018 - 18:29 नवीन
मला तर वेड लागलेलं नाहीये, पण तुमचा प्रश्न वाचून बघा वर! एकतर वाह्यात प्रश्न विचारलात आणि वरून मलाच वेड लागलाय का विचारत आहात! यावरून तुमचंच काहीतरी बिघडलेले आहे की काय अशी शंका आली. मी उखडलोय की काय झालोय याच्याशी तुमचा काही संबंध आहे का? मुद्द्याशी मुद्दा ठेवलात तर चर्चेच्या दृष्टीने बरं होईल. नाहीतर, प्रतिसाद नाही दिलात तरी चालेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघपाल
म
मेघपाल Wed, 02/14/2018 - 18:47 नवीन
सोशल साईटवर व्यक्त होतोय ना? मग कुणीही कोणताही प्रश्न विचारु शकतो. (संपादित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
स
सुबोध खरे गुरुवार, 02/15/2018 - 05:59 नवीन
हा जोकर बुवांचा डू आय डी दिसतो. सभ्य आणि सुसंस्कृत भाषा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघपाल
ब
बिटाकाका गुरुवार, 02/15/2018 - 06:24 नवीन
अरे हो, मी कोणीतरी व्यवस्थित बोलणारा आयडी समजून बोलत होतो! वरची भाषा बघून कळले कि इथे तोंडी लागायचे नसते. धन्यवाद, आणि किप इट अप!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघपाल
ब
बिटाकाका Wed, 02/14/2018 - 09:37 नवीन
हे सिद्ध करु शकता का? उगाच ज्याला येऊन आठवडा पण नाही झाला त्याच्या प्रत्येक कामात छिद्रान्वेशीपणा करायचा.
काय सिद्ध करायला सांगत आहात? ज्याला येऊन आठवडा झाला नाही त्याने चांगले काम केले तर त्याचे कौतुक वर दिसले नाही का तुम्हाला? त्यांच्या एक आठवड्याच्या कार्यकाळाबद्द्दल चर्चा चालू आहे का इथे? नवी मुंबईत त्यांना सॅप्पोर्ट करावा वाटला, पुण्यात आले तेव्हा अपेक्षा तयार झाल्या, पुण्यात येऊन धडाधड निलंबन झाले, गणवेश चेंज करून झाले, पण पुढे काय? पीएमटीचं काय? त्यात काय बदल झाला? भंगारातल्या गाड्या रस्त्यावर जायला नकोत एवढे जरी केले असते तरी पुरेसे होते. एका आदर्श वातावरणात असा आदर्श अधिकारी नेहमीच नावाजला जातो. पण मुळात आदर्श वातावरणच नसताना, मी आदर्श वागतो मग कामे नाही झालीत तरी चालेल हे मला पटत नाही. मी वर उदाहरण दिले होते, कि एखाद्या दांडगट मुलांनी भरलेल्या शाळेत एखादे शिस्तीचे मास्तर आल्याने बदल घडतोच असं नाही. त्याउलट जर काळजीपूर्वक बदल घडवला गेला तर तो कायमस्वरूपी होईल. एक लक्षात घ्या, ते वाईट अधिकारी आहेत असे माझे मत अजिबात नाही. पण ते जे करतात तोच एकमेव व्यवस्था बदलण्याचा मार्ग आहे म्हणणे खटकते. गेडाम यांचे उदाहरण बघून घ्या. तुम्ही परत प्रतिक्रिया द्यावी अशी अजिबात माझी अपेक्षा नाही, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
व
विशुमित Wed, 02/14/2018 - 09:50 नवीन
<<<आतापर्यंत किती ठिकाणी मुंढेंना पूर्ण कार्यकाळ मिळालाय. मी मागे त्यांच्या एका मुलाखतीत वाचल होतं. नियमात असेल आणि लोकांच्या फायद्याचं असेल तर तो निर्णय अमलात आणायला ते परिणामांची पर्वा करत नाहीत. आणि त्यामुळे त्यांची बदली होते. ते म्हणतात कि सुरुवातीचे वर्ष जे बिघडलेलं आहे ते मार्गी लावायला जातं आणि एक पुरेपूर system जी ते गेल्यावरही नीट काम करेल ती बनवायच्या आत बदली.>>> ==>> ह्या बद्दल सहमत आहे. फक्त त्यांनी त्यांचा कामाचा क्रम बदलावा असे वाटते. पूर्वीची बिघडलेली सिस्टिम मार्गी लावण्याच्या फंदात न पडता, नियमानुसार स्वतःची फुल्ल प्रूफ सिस्टिम डे १ पासून राबवली पाहिजे. त्याची अंमलबजावणी करणे त्यांच्या सारख्या तडफदार अधिकाऱ्याला अवघड नाही आहे. काय होतंय पूर्वीचे बिघडलेले मार्गी लावण्यात वेळ आणि ऊर्जा खर्चून जाते आणि बदली झाली की पुन्हा जैसे थे होते. मी वरती काही प्रतिसादात म्हंटले प्रमाणे त्यांच्या कडक शिस्त आणि नियम एके नियम बदलच माझे मत शिथिल करतो. कडक शिस्त आणि नियमानुसार काम हे झालेच पाहिजे याबद्दल माझे दुमत नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
ब
बिटाकाका Wed, 02/14/2018 - 10:05 नवीन
यु सेड इट! दॅट इज मय पॉईंट टू! त्यांच्यासारख्या अधिकाऱयाने ठरवले तर बघता बघता गोष्टी बदलू शकतात फक्त प्राधान्ये ठरवण्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
शलभ Wed, 02/14/2018 - 10:36 नवीन
पूर्वीची बिघडलेली सिस्टिम मार्गी लावण्याच्या फंदात न पडता, नियमानुसार स्वतःची फुल्ल प्रूफ सिस्टिम डे १ पासून राबवली पाहिजे.
थोडसं contradict होतंय असं नाही वाटत का? मला वाटतं मुंढे तेवढे समजदार असतीलच कि त्यांना एवढे कळत नसेल. ते त्यांच्या विवेकाने, नियमाने आणि परिस्थितीनुसार निर्णय घेत असणार. आपण आता म्हणतोय तसं आपण सुद्धा त्या परिस्थितीत वागूच असं नाहीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 02/14/2018 - 11:18 नवीन
हि समज नसावी म्हणूनच तर प्रॉब्लेम जैसे थे आहेत. माझे मुंडेंना समज नसणे हे लिहणे थोडे धाडसाचे ठरेल, पण वस्तुस्थिती तर हीच दिसते आहे. अगदी लेटेस्ट उदाहरण घ्या .. पीएमपीएमएल 158 निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार, तुकाराम मुंढेंची बदली होताच निर्णय--- इति इसकाळ ताज्या बातम्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
च
चौथा कोनाडा Wed, 02/14/2018 - 11:51 नवीन
पीएमपीएमएल या १५८ कर्मचाऱ्यांना का निलंबित केले होते याचे तपशिल कुठं वाचण्यात आले नाहीत. कोण होते ते १५८ ? नगरसेवक / सत्ताधारी / प्रशासन / बिल्डर-प्रमोटर यांचे नातेवाईक ? की सामान्य कर्मचारी ? संचालक मंडळाला मुंढेसाहेब जाण्याची का वाट पहावी लागली ? जर मुंढेसाहेबांचा निलंबन करण्याचा निर्णय योग्य असेल तर हा संचालक मंडळाचा निर्णय नामंजूर करण्याचे धाडस नवनियुक्त पीएमपीएमएल चेअरवुमन व मॅनेजिंग डायरेक्टर नयना गुंडे दाखवणार का ? मुंढे साहेब असा जाणून बुजून कर्मचाऱ्यांवर असा अन्याय करतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ब
बबन ताम्बे Wed, 02/14/2018 - 11:57 नवीन
सिस्टीमच सडलेली आहे त्याला एकटे मुंडे काय करणार? कधीकधी पीएमटीने प्रवास करतो. अत्यंत अस्वच्छ बस, बंपर तुटलेल्या, पत्रे बाहेर आलेल्या बी आर टी बस, ज्या गाड्यांना कायम गर्दी असते त्यांची फ्रिक्वेंसी कमी, उदा. नगर रोडवरुन (वाघोली, चंदननगर, विमाननगर, येरवडा इथून ) कोथरुड, कात्रज या गाड्यांना कायम गर्दी, पण बस तासाने) , गर्दीप्रमाणे कधी स्टडी नाही कुठे किती गड्या सोडायच्या, कंडक्टर अजुनही तिकिटांना भोके पाडतोय (मशीन बिघडली की त्याच्याकडे नेहमीचा भोके पाडायचा तिकिटांचा डबा देतात), बीआरटी मार्ग असल्यामुळे सुसाट गाडी मारणारे पीएमटीचे ड्रायव्हर, त्यामुळे अचानक ब्रेक मारला की एकमेकांच्या अंगावर हेलपाटणारे कंडक्टर आणि प्रवासी ... काय विचारु नका. आणि म्हणे पुणे स्मार्ट सिटी करणारेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा