Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुकाराम मुंढे अविश्वास प्रस्ताव आणि अभद्र युती

म
महासंग्राम
Tue, 10/25/2016 - 08:09
🗣 205 प्रतिसाद
आज राज्यात पुन्हा एकदा एका कार्यक्षम अधिकाऱ्याला हटवण्यासाठी अभद्र युती तयार झाली आहे. एखादा अधिकारी अकार्यक्षम आहे तर त्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यास समजू शकतो. पण मुंढेसारखा कार्यक्षम अधिकारी जेव्हा नवीमुंबईत प्रस्थापितांच्या धोतरालाच हात घालून त्यांच्या पायाखालची वाळू सरकवतो, तेव्हा त्यांना हटवणे हे साऱ्या लोकप्रतिनिधींच आद्य कर्तव्य होवून बसते हि या देशाची शोकांतिका आहे. 'तुकाराम मुंढे' हे पहिलंच उदाहरण नाही ज्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला गेला. या आधी अकोल्यात 'एकनाथ डवले', पिंपरीत अत्यंत कल्पक असे 'श्रीकर परदेशी' यांना सुद्धा राजकारण्यांनी विरोध केला होता. पण अधिकारी योग्य असेल तर त्यांना जनतेची साथ लाभते हे निश्चितच. अगदी याच प्रमाणे प्रत्येक वेळी मुंढे, परदेशी यांना सामान्य जनतेची साथ लाभली आणी राजकारण्यांचे दात घशात गेले. आता कसोटी आहे ती सरकारची. मुंढे यांच्या विरोधात असलेला प्रस्ताव रद्द करून मुख्यमंत्री आपली ताकद नोकरशाहीच्या मागे उभी करतात कि मांडवली मुख्यमंत्री म्हणून बसलेला शिक्का अजून गडद करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.. आज पुन्हा वेळ आली आहे चांगल्या अधिकाऱ्यांना पाठबळ देण्याची. मी पाठिंबा देतोय, आपण देणार का ?? #I_Support_Tukaram_Mundhe
वर्गीकरण
राजकारण नोकरशाही

प्रतिक्रिया द्या
47935 वाचन

💬 प्रतिसाद (205)
च
चौथा कोनाडा गुरुवार, 02/15/2018 - 08:29 नवीन
अगदी खरंय. वाईट अवस्था आहे. तुम्ही लिहिलेले सेम प्रॉब्लेम मी नेहमीच अनुभवतो. इच्छा नसताना कित्येक वेळा स्वःतचे वाहन वापरावे लागते. आमच्या इथंतर ग्रेड सेपरेटर, रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली आहेत ते बस स्टॉप उखडून टाकलेत, बिचारे प्रवासी ऊन, पाऊसाचा त्रास सहन करत बस पकडायची कसरत करत असतात. बीआरटीचा बट्याबोळ झाला आहे. सुरूच होत नाहीय. दर दोन महिन्यांनी अफवा पसरवतात की सरू होईल म्हणून. त्यात मेट्रोचे बांधकाम. खरं तर मेट्रो आधीच करायला हवी होती, बीआरटीची गरजच नव्हती. पण आपापली कमिशन्स सुटली पाहिजेत ना. या पार्श्वभूमीवर मुंढेसाहेबांची नेमणुक हा एक सुखद टप्पा होता. वेगाने सुधारणा दिसू लागल्या होत्या ! आता पहिले पाढे पंचाव्वन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ए
एकुलता एक डॉन Sat, 02/17/2018 - 20:18 नवीन
brt ने खरा फायदा होतो का पण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ब
बबन ताम्बे Sun, 02/18/2018 - 09:32 नवीन
पीएमटीला होतोय कारण सर्वसामान्य प्रवाशांना दुसरा सोयीचा पर्याय नाही. पण दोन लेन कायमच्या अडवून ठेवल्यामुळे रोज संध्याकाळी नगर रोड वर ट्रॅफिकची बोंब असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
व
विशुमित गुरुवार, 11/22/2018 - 12:53 नवीन
Performance-12 वर्षात 11 बदल्या.!! https://www.loksatta.com/mumbai-news/repeated-transfer-negative-results-on-family-says-tukaram-mundhe-1793577/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 11/22/2018 - 17:12 नवीन
''ना खाउंगा, ना खाने दूंगा'' इति :- नमो या देशात प्रामाणिकपणे काम करणे हे मोठे पाप असले पाहिजे ! नाहीतर इतक्या प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकार्‍याची इतक्या बदल्या होण्या मागे दुसरे कारण काय असु शकते ? याच महाराष्ट्रात वाळू माफिया मात्र मोकाट सुटलेत :- https://bit.ly/2Sac955

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Na Ja (Official Video) :- Pav Dharia
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा