Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी व निकाल

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/09/2017 - 15:58
🗣 158 प्रतिसाद
५ राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी ११ मार्च रोजी आहेत. मतमोजणी व निकालांसाठी हा धागा आहे. तत्पूर्वी आज वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष जाहीर होत आहेत. प्रत्यक्ष निकाल व मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष यांची तुलना करण्यासाठी धाग्यातच वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष देत आहे. ________________________________________________________________________________________________

१) उत्तर प्रदेश

अ) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी भाजप+ (१८५), सप+काँग्रेस (१२०), बसप (९०) ब) टाईम्स नाऊ भाजप+ (१९०-२१०), सप+काँग्रेस (११०-१३०), बसप (५७-७४) क) एबीपी न्यूज भाजप+ (१६४-१७६), सप+काँग्रेस (१५६-१६९), बसप (६०-७२) ड) सीएनएन-न्यूज १८ भाजप+ (१६४), सप+काँग्रेस (१२०-१४७), बसप (८१) ई) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप+ (२५१-२७९), सप+काँग्रेस (८८-११२), बसप (२८-४२) ________________________________________________________________________________________________

२) उत्तराखंड

अ) इंडीया टीव्ही-सी व्होटर भाजप+ (२९-३५), काँग्रेस (२९-३५) ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी भाजप+ (३८), काँग्रेस (३०) क) न्यूज-२४ भाजप+ (४६-६०), काँग्रेस (८-२२) ड) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप+ (४६-५३), काँग्रेस (१२-२१) ई) टुडेज चाणक्य भाजप+ (५३), काँग्रेस (१५) फ) सीएनएन-न्यूज १८ भाजप+ (३८), काँग्रेस (२६) ________________________________________________________________________________________________

३) पंजाब

अ) इंडीया टुडे-अ‍ॅक्सिस अकाली दल+भाजप (४-७), काँग्रेस (६२-७१), आआप (४२-५१) ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५५), आआप (५५) क) न्यूज-२४ अकाली दल+भाजप (४-१४), काँग्रेस (४५-६३), आआप (४५-६३) ड) इंडिया टीव्ही-सी व्होटर अकाली दल+भाजप (५-७), काँग्रेस (४१-४९), आआप (५९-६७) ई) सीएनएन-न्यूज १८ अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५३), आआप (५७), इतर (१) ________________________________________________________________________________________________

४) गोवा

अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर भाजप (१५-२१), काँग्रेस (१२-१८), आआप (०-४) ब) इंडिया न्यूज- एमआरसी भाजप (१५), काँग्रेस (१०), आआप (७), इतर (८) क) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप (१८-२२), काँग्रेस (९-१३), आआप (०-२), इतर (४-९) ड) सीएनएन-न्यूज १८ भाजप (१९), काँग्रेस (१४), आआप (६), इतर (१)

५) मणिपूर

अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर भाजप (२५-३१), काँग्रेस (१७-२३), इतर (९-१५) ब) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप (१६-३२), काँग्रेस (३०-३६), इतर (३-५) ________________________________________________________________________________________________ इंडियन एक्स्प्रेसचे सुरजित भल्ला यांनी स्वतःचा वेगळा अंदाज दिला आहे. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भल्ला यांनी भाजप+ (६०) व संजद+ (१७५) असा अंदाज दिला होता. तो अत्यंत अचूक ठरला होता. त्यांच्या अंदाजानुसार खालील चित्र असेल. http://indianexpress.com/article/opinion/columns/uttar-pradesh-assembly-elections-2017-samajwadi-party-bjp-congress-no-proof-required-seeking-redemption-in-up-2017-4560884/
वर्गीकरण
विधानसभा निवडणुक मतमोजणी निकाल २०१७

प्रतिक्रिया द्या
29836 वाचन

💬 प्रतिसाद (158)
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/09/2017 - 16:15 नवीन
एकंदरीत या आकड्यांवरून खालील चित्र दिसते. १) पंजाबमध्ये अकाली दल-भाजप युतीचा सुपडा साफ होण्याची चिन्हे आहेत. कोणत्याही वृत्तसंस्थेने त्यांना ११७ पैकी १४ पेक्षा जास्त जागा दिलेल्या नाहीत. सलग १० वर्षे सत्तेत असल्याने पंजाबमध्ये या युतीविरोधात प्रस्थापित राजवटविरोधात जबरदस्त लाट आहे. दुसरीकडे काँग्रेस व आआपमद्ये जबरदस्त चुरस आहे. या दोघांपैकी नक्की कोणाला बहुमत मिळेल किंवा कोणता पक्ष सर्वाधिक जागा मिळवेल याविषयी सांगता येणे अवघड आहे. भाजप हा पंजाबमध्ये अत्यंत दुय्यम भागीदार आहे. ११७ जागांपैकी भाजप फक्त २३ जागा लढवितो (१९%) तर अकाली दल ९४ जागांवर उमेदवार उभे करतात (८१%). त्यामुळे या युतीचे यशापयश बहुतांशी अकाली दलाच्याच कामगिरीवर अवलंबून आहे. भाजपने विशेषतः राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर अकाली दलाच्या छायेतून बाहेर पडून स्वतंत्र उभारणी करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने भाजपकडे आतापर्यंत दोनच शीख नेते होते (सिधू व अहलुवालिया). आता सिधू काँग्रेसमध्ये आहे तर अहलुवालिया फारसे प्रभावी नाहीत. त्यामुळे पंजाबमध्ये भाजपला शून्यापासून सुरूवात करावी लागेल. तसेच अकाली दल व भाजप यांच्यातील युती तुटली तर पंजाबमध्ये पूर्णपणे काँग्रेस किंवा आआप हे दोनच पक्ष शिल्लक राहतील. त्यामुळे या दोन्ही पक्षांना रोखण्यासाठी युती टिकणे आवश्यक आहे. युती तुटली तर अकाली दल नामशेष होऊन आआप फोफावेल आणि टिकली तर आपली वाढ होणार नाही असे धर्मसंकट भाजपकडे आहे. काहीही असले तरी भाजपने अकाली दलाच्या जोखडातून मुक्त होणे आवश्यक आहे. २) उ. प्र. चे चित्र अस्पष्ट आहे. अ‍ॅक्सिसचे आकडे वगळता इतर सर्वांनी हंग विधानसभेची शक्यता दर्शविली आहे. हे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच अखिलेश यादवने सांगितले की जरूर पडल्यास आपण सरकार बनविण्यासाठी बसपला पाठिंबा देऊ. त्यामुळे निकालानंतर उ. प्र. मध्ये नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. भाजप व बसप एकत्र येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. परंतु भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष असेल यावर सर्वांचे एकमत आहे. ३) गोव्यामध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळता भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असेल असे दिसते. ४) उत्तराखंडमध्ये काही आकड्यांवरून बरोबरीची चुरस वाटते तर काहींच्या निष्कर्षावरून भाजपला स्पष्ट बहुमत किंवा सर्वाधिक जागा अशी परिस्थिती दिसते. ५) मणिपूरमधील आकडे परस्परविरोधी आहेत. या सर्व ५ राज्यात मिळून विधानसभेच्या एकूण ६९० जागा आहेत. २०१२ मध्ये भाजपकडे ६९० पैकी फक्त ११२ जागा होत्या व अकाली दलाकडे अंदाजे ५८ च्या आसपास जागा होत्या. म्हणजे रालोआकडे अंदाजे ६९० पैकी १७० जागा होत्या. २०१७ मध्ये अकाली दलाकडे एक आकडी जागा असण्याची शक्यता आहे तर भाजपचा स्वतःचा आकडा २००+ होईल असे वाटते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपला या वाढीव जागांचा फायदा होईल. तसेच भाजप गोवा राखण्याची व उत्तराखंड, मणिपूर व उत्तरपदेश मध्ये स्वतः सरकार स्थापण्याची बरीचशी शक्यता आहे. पंजाब रालोआ गमावणार असे चित्र दिसत आहे. काँग्रेस पंजाब जिंकू शकते तसेच मणिपूर व कदाचित उत्तराखंड राखू शकते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/09/2017 - 16:27 नवीन
नोव्हेंबर २०१५ मधील बिहार विधानसभा निवडणुकीत व फेब्रुवारी २०१७ मधील मुंबई, ठाणे व नागपूर महापालिका निवडणुकांमध्ये इंडिया टुडे-अ‍ॅक्सिसचे अंदाज प्रत्यक्ष निकालांच्या जवळपास होते. पुणे महापालिकेचे त्यांचे अंदाज काहीसे चुकले. म्हणजे भाजपला ७७-८५ ऐवजी ९८ व राष्ट्रवादीला ६०-६६ ऐवजी ३१ जागा मिळाल्याने त्यांचा अंदाज चुकला. अर्थात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील हा अंदाज बरोबरच होता. पण त्यांच्या अंदाजपेक्षा भाजपचा बर्‍याच जास्त जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीला बर्‍याच कमी जागा मिळाल्या. वरील ५ राज्यांचे अ‍ॅक्सिसचे अंदाज पाहिले तर उ. प्र. व उत्तराखंड मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसते तर गोव्यात भाजप बहुमताच्या अगदी जवळ दिसतो आणि उर्वरीत २ राज्यात काँगेसला बहुमत मिळताना दिसते.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 03/10/2017 - 17:29 नवीन
उत्तर प्रदेशातील इतर काही एक्झिट पोल/अंदाज सुदर्शन न्यूजः भाजप-२५३, सपा+काँग्रेस- ७३, बसपा-५७, रालोद-५, इतर-१४ 5dots.org: भाजप-२४३, सपा+काँग्रेस-५३, बसपा:१०१, इतर-५ डॉ. प्रवीण पाटील : भाजप-२०७, सपा-१२०, बसपा-६४, इतर-१२ उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल. १५ मिनिटात अगदी पहिले कल यायला सुरवात होईल. मी नेहमीप्रमाणे मिपावर ऑनलाईन असणार आहेच आणि मधूनमधून कल/निकाल पोस्ट करणार आहे. उद्या मिपा थोड्या वेळासाठीही गलपाटू नको दे रे म्हाराजा. उद्या थोड्या वेळासाठीही लाईट जाऊ नको देत रे म्हाराजा. उद्या थोड्या वेळासाठीही इंटरनेट बंद पडू नये रे म्हाराजा. उद्या निवडणुकांची मतमोजणी आहे. त्याला या असल्या गोष्टींचे गालबोट नको रे म्हाराजा!!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/10/2017 - 18:24 नवीन
- झी न्यूजने भाजपला २१९ जागांचा अंदाज दिला आहे. - Artificial Intelligence नावाखाली कोणीतरी भाजपला २२० जागांचा अंदाज दिला आहे. - एका वाहिनीने ४ ज्योतिषांना बोलावून त्यांचे भाकित विचारल्यावर ४ पैकी ३ जणांनी भाजपला यश मिळेल असे संदिग्ध भाकित वर्तविले. भाजपच्या बाजूने ज्या तर्‍हेने हवा निर्माण केली जात आहे त्यावरून दिल्ली व बिहार प्रमाणे यावेळीसुद्धा माध्यमांच्या सर्वक्षणाचा फुटेल अशी शक्यता वाटू लागली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 03:31 नवीन
मतमोजणी सुरू होत आहे. १०-१५ मिनिटात पहिले कल हाती येतील.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 03:45 नवीन
पहिला कल उत्तर प्रदेशातून आला आहे. शामली मतदारसंघातून भाजप आघाडीवर आहे. २०१२ मध्ये ही जागा काँग्रेसने जिंकली होती.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 03:47 नवीन
शामली मतदारसंघ उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात आहे. तिथून भाजप आघाडीवर असेल तर ती पक्षासाठी चांगली बातमी आहे. आणखी एक कल आला आहे. मऊ (पूर्वांचल) मतदारसंघातून बसपाचा बाहुबली मुख्तार अन्सारी आघाडीवर आहे. आतापर्यंतः भाजप-१, बसपा-१
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 03:50 नवीन
ओराई (पूर्वांचल) मधून भाजप आघाडीवर, राजाभय्या (अपक्ष) कुंडामधून आघाडीवर, गुन्नौर या सपाच्या बालेकिल्ल्यातून अपेक्षेप्रमाणे सपा आघाडीवर आतापर्यंतः भाजप-३, सपा+काँग्रेस-२, बसपा-१
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 03:51 नवीन
आतापर्यंत पोस्टल मतांची मतमोजणी सुरू झाली असण्याची शक्यता आहे. हे कल बदलू शकतात.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 03:53 नवीन
कुशीनगर आणि ओराई या सपाच्या सेफ जागांमधून भाजप आघाडीवर आहे. आतापर्यंत जितके कल आले आहेत त्यात भाजपने ज्या जागांवर आघाडी मिळवली आहे त्यापैकी एकही जागा भाजपने जिंकली नव्हती. तर सपा मागच्या वेळेपेक्षा जागा गमावत आहे. आतापर्यंतः कल-१०, भाजप-५, सपा+काँग्रेस-३(राजाभय्या धरून) , बसपा-२
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 03:57 नवीन
मणीपूरचे मुख्यमंत्री इबोबी सिंग (काँग्रेस) आघाडीवर. त्यांच्याविरूध्द निवडणुक लढवत असलेल्या इरॉम शर्मिला मागे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:00 नवीन
जसवंतनगरमधून शिवपालसिंग यादव आणि रामपूरमधून आझम खान आघाडीवर.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/11/2017 - 04:28 नवीन
आझमखान पडला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:02 नवीन
पंजाबमधील पहिला कल आला आहे. अमृतसर पश्चिममधून काँग्रेस आघाडीवर आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:04 नवीन
उत्तर प्रदेशात कल-३५ , भाजप-२० , सपा+काँग्रेस-११, बसपा-४ पंजाबः कल-१, काँग्रेस-१ मणीपूरः कल-२, काँग्रेस-१, इतर-१
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:08 नवीन
उत्तर प्रदेशात भाजपने आता थोडी आघाडी घेतली आहे. ४८ पैकी ३० जागांवर भाजप तर सपा+काँग्रेस ११ जागांवर तर बसपा ७ जागांवर आघाडीवर आहे.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Sat, 03/11/2017 - 04:08 नवीन
सपा २१ आता . पंजाबमध्ये काँग्रेस सध्यातरी पुढे आहे .
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:16 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:19 नवीन
आतापर्यंतचे चित्र असे आहे की उत्तर प्रदेशात भाजपने चांगली आघाडी आहे. पंजाबमध्ये कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. अकाली दलाचा धुव्वा उडत आहे (अपेक्षेप्रमाणे) पण आआपला फार ठसा उमटवता आलेला नाही. जलालाबादमधून सुखबीर बादल पिछाडीवर आहेत. तिथे आआपचे भगवंत मान नाही तर काँग्रेस आघाडीवर आहे. हे लिहितालिहिता उत्तर प्रदेशातील ८० पैकी भाजपला ४९, सपा+काँग्रेसला २३ तर बसपाला ६ ठिकाणी आघाडी आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:23 नवीन
उत्तर प्रदेश: ९६ पैकी भाजप ५८ , सपा+काँग्रेस २५ , बसपा-१० पंजाब: २४ पैकी काँग्रेस १७, आआप ४ आणि अकाली+भाजपा ३ उत्तराखंड: ६ पैकी भाजप ४ आणि काँग्रेस २ मणीपूरमध्ये ४ पैकी काँग्रेस २, भाजप १ आणि इतर १ गोव्यातून अजून तरी एकही कल आलेला नाही. सगळे सुशेगाद चालू आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:24 नवीन
उत्तर प्रदेशात भाजप ६२ (+४७) सपा+काँग्रेस २६ (-३८) असा कल आहे. सपा+काँग्रेस २०१२ च्या तुलनेत अर्ध्यापेक्षा जास्त जागा गमावत आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:28 नवीन
उत्तर प्रदेशः १२५ पैकी भाजप ७९ , सपा+काँग्रेस ३१ , बसपा-१२. भाजपने चांगलीच आघाडी घेतली आहे. पंजाब: ३३ पैकी काँग्रेस २१, आआप ७ आणि अकाली+भाजप ४. काँग्रेसने चांगलीच आघाडी घेतली आहे. अमरिंदरसिंग पतियाळातून पिछाडीवर आहेत. उत्तराखंड: १० पैकी भाजप ७, काँग्रेस ३ मणीपूरः ४ पैकी काँग्रेस २, भाजप १, इतर १
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Sat, 03/11/2017 - 04:30 नवीन
शी युती सपा ला महागात पडलीये असं वाटत आहे युपी मध्ये उत्तराखंड भाजप ८ काँग्रेस ३ आता .
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:31 नवीन
आतापर्यंतचे चित्र--- उत्तर प्रदेशात आणि उत्तराखंडमध्ये भाजपने तर पंजाबमध्ये काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. हे कल कायम राहिले तर भाजपचा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तर पंजाबमध्ये काँग्रेसचा स्वीप असेल. गोव्यात वाळपोई आणि सेंट अ‍ॅन्ड्रे या दोन जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/11/2017 - 04:31 नवीन
उ. प्र. - भाजप १०१/१८२ सप - ३४, बसप २३ पजाब - कॉंग्रेस ९/१८, आआप ५, अकाली ३
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:34 नवीन
उत्तर प्रदेशात १४६ पैकी भाजप ९७, सपा+काँग्रेस ३५ तर बसपा १३ पंजाबात ४१ पैकी काँग्रेस २५, आआप १० आणि अकाली+भाजप ६ उत्तराखंडमध्ये १५ पैकी भाजप १२, काँग्रेस ३ गोव्यात ३ पैकी ३ काँग्रेस मणीपूरमध्ये ४ पैकी काँग्रेस २, भाजप १ आणि इतर १
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:38 नवीन
एन.डी.टि.व्ही वर म्हणू लागले आहेत की भाजपने हा स्ट्राईक रेट कायम ठेवल्यास भाजप २६० क्रॉस करेल. सपा+काँग्रेस आघाडीला जोरदार धक्का बसताना दिसत आहे. तसे झाल्यास ल्युटिन्स दिल्लीतील मिडियाला मोठा धक्का बसेल. उत्तराखंडमध्ये भाजपचा स्वीप दिसत आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. मणीपूरमध्ये काँग्रेस पुढे आहे. गोव्यात आतापर्यंत ४ पैकी ३ जागांवर काँग्रेस पुढे आहे. रामपूरमध्ये आझमखान मागे, अपर्णा यादव (मुलायमसिंगाची सून) मागे, आझमखानचा मुलगा मागे. आता उत्तर प्रदेशात भाजप १७१ पैकी ११६ ठिकाणी पुढे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:42 नवीन
गोव्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. ८ पैकी ६ जागांवर काँग्रेस पुढे आहे तर भाजप अवघ्या २ जागांवर पुढे आहे. पंजाबमध्येही काँग्रेस आता बर्‍यापैकी पुढे आहे. काँग्रेसने पंजाब, गोवा आणि मणीपूर जिंकले तर तो विजय काँग्रेससाठी महत्वाचा मॉरल बूस्टर असेल हे नक्कीच. आता उत्तर प्रदेशात १८९ पैकी १२६ जागांवर भाजप, ३८ जागांवर सपा+काँग्रेस तर २३ जागांवर बसपा पुढे. उत्तराखंडमध्ये २५ पैकी २२ ठिकाणी भाजप आणि ३ ठिकाणी काँग्रेस.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:45 नवीन
पंजाबमध्ये काँग्रेस पुढे आहे आणि आआप मागे आहे याचा मला स्वतःला फार आनंद होत आहे. गोव्यात काँग्रेस पुढे असेल तर ते ही एका अर्थी चांगले आहे. गोव्यात दोनच लोकसभेच्या जागा आहेत आणि राष्ट्रीय राजकारणावर या निकालाचा काहीच परिणाम होणार नाही. पण आणखी एक राज्य जिंकले हे समाधान काँग्रेससाठी महत्वाचे आहे. उत्तर प्रदेशात २१० पैकी १४० जागांवर भाजप पुढे आहे. सध्याचा स्ट्राईक रेट दोन-तृतीयांश आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:50 नवीन
उत्तर प्रदेशः २३२ पैकी भाजप १५६ , सपा+काँग्रेस ५० , बसपाला २४ पंजाबः ६६ पैकी काँग्रेस ३९, आअप १६ आणि अकाली-भाजपः १० उत्तराखंडः ३६ पैकी भाजप २९, काँग्रेस ६, बसपा १ गोवा: ११ पैकी काँग्रेस ६, भाजप ३, इतर २
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:53 नवीन
अमेठीमधून भाजपच्या गरीमा सिंग आघाडीवर आहेत तर अयोध्या मतदारसंघातून सपाचा उमेदवार आघाडीवर आहे. हे दोन कल खूपच प्रतिकात्मक आहेत. भाजपने रामनामाचा जप करू नये आणि काँग्रेसने गांधी कुटुंब सोडून इतरांना संधी द्यावी असा मतदारांचा संदेश आहे का?
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sat, 03/11/2017 - 04:57 नवीन
या गरिमासिंगांची बॅक्सोरी फार रोचक आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ज
जेपी Sat, 03/11/2017 - 04:57 नवीन
सर्व वाहिण्यांवर आकडे कमालीचे वेगवेगवेगळे येत आहेत. पण उप्र मध्ये भाजपा आघाडीवर, पंजाबात कॉंग्रेस,गोव्यात कॉंग्रेस,उत्तराखंडात भाजपा,मणीपुरात भाजपा आघाडीवर.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 04:59 नवीन
उत्तराखंडमध्ये आता भाजप ३७ जागांवर आघाडीवर आहे आणि अजून २३ जागांवरील कल यायचे आहेत. भाजप उत्तराखंडमध्ये विजय मिळवला असे ९९% खात्रीने म्हणता येईल. उत्तर प्रदेशात--- २७७ पैकी भाजप १८७, सपा+काँग्रेस ६३ आणि बसपा २४ पंजाबात-- ७९ पैकी काँग्रेस ४७, आआप १९ आणि अकाली+भाजप १२ गोव्यात १६ पैकी काँग्रेस ८, भाजप ५ तर इतर ३
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 05:03 नवीन
पंजाबमध्ये अकाली दल मागे आहे पण पूर्णच व्हाईटवॉश उडालेला दिसत नाही. ८५ पैकी १३ जागांवार अकाली+भाजप पुढे आहे. माझ्या अंदाजात मी अकाली २५ पर्यंत जातील असे म्हणले होते. तसे होईल का हे बघायचे. एन.डी.टी.व्ही वर पंजाबमध्ये भाजपचा धुव्वा उडत आहे असे म्हटले जात आहे. म्हणजे पंजाबमधील हिंदू मतदार अकाली दलाचा पराभव होणार असे चित्र उभे राहिले तर काँग्रेसकडे जातात हा इतिहास कायम राहणार असे दिसते. माझ्यासारख्या कित्येक भाजपच्या मतदारांना आआपपेक्षा काँग्रेस नक्कीच परवडली. कारण आआप अननोन डेव्हिल आहे तर काँग्रेस नोन डेव्हिल आहे. त्याप्रमाणे हिंदू मतदारांनी मते दिलेली दिसत आहेत आणि त्यामुळे काँग्रेस पुढे दिसत आहे तर भाजपचा धुव्वा उडत आहे आणि आआपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Sat, 03/11/2017 - 05:06 नवीन
भाजप विजयीच आहे . मणिपूर आता काँग्रेस ९ आणि भाजप ६
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 05:06 नवीन
उत्तर प्रदेशात ३०४ पैकी २०८ जागांवर भाजप आघाडीवर आहे. ही भाजपची त्सुनामी आहे. आणि भाजप आता बहुमताला लागणार्‍या २०२ पेक्षा जास्त जागांवर पुढे आहे. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये ९८ पैकी ५५ जागांवर काँग्रेस पुढे आहे. बहुमताला ५९ जागा हव्यात. म्हणजे काँग्रेस जवळपास 'तिकडे' आहे--- काँग्रेस इज ऑलमोस्ट देअर.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 05:09 नवीन
पंजाबात आता अकाली+भाजप २४ जागांवर तर आआप २१ जागांवर पुढे आहे. एकूणच आआपसाठी हे निकाल निराशादायक आहेत. एका वेळी जेवढी जमेल तितकीच उडी घ्यावी हा धडा आआपला परत एकदा मिळताना दिसत आहे. मला स्वतःला उत्तर प्रदेशमधील निकालांइतकेच पंजाबमधील निकालांचा आनंद आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 05:12 नवीन
उत्तर प्रदेशात रामलाटेत १९९१ मध्ये भाजपने ४२५ पैकी २२१ जागा जिंकल्या होत्या. आता या क्षणी ३२६ पैकी २२७ जागांवर भाजप पुढे आहे. रामलाटेत मिळाले होते त्यापेक्षा मोठे यश उत्तर प्रदेशात भाजपला मिळताना दिसत आहे. तेव्हा रामनामापेक्षा विकास महत्वाचा आहे हा धडा भाजपलाही मिळावा.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 05:14 नवीन
उत्तर प्रदेशः ३३७ पैकी भाजप २३६ , सपा+काँग्रेस ६८ तर बसपा २९ जागांवर पुढे पंजाबः १०३ पैकी काँग्रेस ५८, अकाली-भाजप २३ तर आआप २१ जागांवर पुढे उत्तराखंडः ६० पैकी भाजप ४८, काँग्रेस १० तर इतर २ जागांवर पुढे मणीपूरः २० पैकी काँग्रेस १२, भाजप ५ तर इतर ३ जागांवर पुढे गोवा: १८ पैकी काँग्रेस ८, भाजप ७ तर इतर ३ जागांवर पुढे
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 05:20 नवीन
या क्षणी उत्तर प्रदेशात ३५३ पैकी २४८ जागांवर भाजप पुढे आहे. अजून ५० जागांवरील कल येणे बाकी आहे. निकाल असेच लागले तर चाणक्य आणि अ‍ॅक्सिसचा इक्झिट पोल बरोबर होता असे म्हणायला हवे. यापुढे इतर संस्थांपेक्षा या संस्थांचा एक्झिट पोल अधिक गांभीर्याने घेतला जाईल. सी.एस.डी.एस, लोकनिती वगैरे सगळ्यांची विश्वासार्हता कमी झाली आहे. ही उत्तर प्रदेशात भाजपची त्सुनामी आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 05:24 नवीन
उत्तर प्रदेश: ३६३ पैकी भाजप २५१, सपा+काँग्रेस ७३ , बसपा ३३ पंजाबः ११० पैकी काँग्रेस ६२, अकाली+भाजप २६ आणि आआप २१ उत्तराखंडः ६६ पैकी भाजप ५४, काँग्रेस १० आणि बसपा १ मणीपूरः २३ पैकी काँग्रेस १२, भाजप ७, इतर ४ गोवा: २० पैकी काँग्रेस ८, भाजप ८, इतर ४
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 05:28 नवीन
पंजाबमध्ये आता अकाली+ भाजप २९ जागांवर पुढे आहे. त्यापैकी २६ जागांवर अकाली दल तर अवघ्या ३ जागांवर भाजप पुढे आहे. अकाली दलाने ग्रामीण भागातील शीख मतदार राखले आहेत. गोव्यात २ मिनिटांपूर्वी काँग्रेस आणि भाजप ८ जागांवर पुढे होते. हे लिहितालिहिता काँग्रेस ९ तर भाजप ७ जागांवर पुढे आहे. गोव्यात चुरस चालू आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 05:32 नवीन
१९८५ मध्ये अविभाजित उत्तर प्रदेशचे नारायणदत्त तिवारी मुख्यमंत्री असताना काँग्रेसने ४२५ पैकी २६९ जागा मिळवल्या होत्या. या क्षणी ३७८ पैकी २६७ जागांवर भाजप पुढे आहे. हा विजय १९८५ मधील काँग्रेसच्या विजयापेक्षाही मोठा विजय आहे. ही नक्कीच भाजपची त्सुनामी आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 05:42 नवीन
आआपला चांगलाच झटका बसलेला दिसत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी आआपने पंजाबमध्ये ३३ विधानसभा मतदारसंघांमधून आघाडी घेतली होती. विधानसभा निवडणुकांमध्ये स्थानिक पक्षांना फायदा होतो हा कल लक्षात घेता लोकसभा निवडणुकांपेक्षा यावेळी आआपची कामगिरी चांगली हवी होती. पण या क्षणी आआप २३ जागांमध्ये आघाडीवर आहे. हिंमतसिंग शेरगील आणि भगवंत मान हे आआपचे नेते पिछाडीवर आहेत. भगवंत मान हा विदूषक हरणार असेल तर ते फारच चांगले असेल. गोव्यात कुंकोळीमध्ये आआपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एल्व्हिस गोम्स पिछाडीवर आहेत.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Sat, 03/11/2017 - 05:44 नवीन
प्रवक्ते पंजाबमधील विजय हा राहुल गांधींचा आहे असं म्हणत आहेत . गोवा-काँग्रेस १० भाजप ८ .
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 03/11/2017 - 06:09 नवीन
आणि युपित काँग्रेसच्या पराभवासाठी पक्ष जबाबदार आहे (collective failure) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 06:12 नवीन
नाही या निवडणुकीत ५ पैकी ३ राज्ये काँग्रेस जिंकत आहे (पंजाब, गोवा आणि मणीपूर) तर भाजप केवळ दोनच राज्ये जिंकत आहे (उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड). म्हणजे हा राहुल गांधींच्याच करिष्म्याचा विजय आहे आणि मोदींना बसलेला जोरदार झटका आहे. सगळे श्रेय राहुलजींचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Sat, 03/11/2017 - 06:24 नवीन
मला वाटते नोटबंदीचा निर्णय मोदींना आणि भाजपाला चांगलाच भोवला आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा