Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी व निकाल

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/09/2017 - 15:58
🗣 158 प्रतिसाद
५ राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी ११ मार्च रोजी आहेत. मतमोजणी व निकालांसाठी हा धागा आहे. तत्पूर्वी आज वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष जाहीर होत आहेत. प्रत्यक्ष निकाल व मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष यांची तुलना करण्यासाठी धाग्यातच वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष देत आहे. ________________________________________________________________________________________________

१) उत्तर प्रदेश

अ) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी भाजप+ (१८५), सप+काँग्रेस (१२०), बसप (९०) ब) टाईम्स नाऊ भाजप+ (१९०-२१०), सप+काँग्रेस (११०-१३०), बसप (५७-७४) क) एबीपी न्यूज भाजप+ (१६४-१७६), सप+काँग्रेस (१५६-१६९), बसप (६०-७२) ड) सीएनएन-न्यूज १८ भाजप+ (१६४), सप+काँग्रेस (१२०-१४७), बसप (८१) ई) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप+ (२५१-२७९), सप+काँग्रेस (८८-११२), बसप (२८-४२) ________________________________________________________________________________________________

२) उत्तराखंड

अ) इंडीया टीव्ही-सी व्होटर भाजप+ (२९-३५), काँग्रेस (२९-३५) ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी भाजप+ (३८), काँग्रेस (३०) क) न्यूज-२४ भाजप+ (४६-६०), काँग्रेस (८-२२) ड) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप+ (४६-५३), काँग्रेस (१२-२१) ई) टुडेज चाणक्य भाजप+ (५३), काँग्रेस (१५) फ) सीएनएन-न्यूज १८ भाजप+ (३८), काँग्रेस (२६) ________________________________________________________________________________________________

३) पंजाब

अ) इंडीया टुडे-अ‍ॅक्सिस अकाली दल+भाजप (४-७), काँग्रेस (६२-७१), आआप (४२-५१) ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५५), आआप (५५) क) न्यूज-२४ अकाली दल+भाजप (४-१४), काँग्रेस (४५-६३), आआप (४५-६३) ड) इंडिया टीव्ही-सी व्होटर अकाली दल+भाजप (५-७), काँग्रेस (४१-४९), आआप (५९-६७) ई) सीएनएन-न्यूज १८ अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५३), आआप (५७), इतर (१) ________________________________________________________________________________________________

४) गोवा

अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर भाजप (१५-२१), काँग्रेस (१२-१८), आआप (०-४) ब) इंडिया न्यूज- एमआरसी भाजप (१५), काँग्रेस (१०), आआप (७), इतर (८) क) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप (१८-२२), काँग्रेस (९-१३), आआप (०-२), इतर (४-९) ड) सीएनएन-न्यूज १८ भाजप (१९), काँग्रेस (१४), आआप (६), इतर (१)

५) मणिपूर

अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर भाजप (२५-३१), काँग्रेस (१७-२३), इतर (९-१५) ब) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप (१६-३२), काँग्रेस (३०-३६), इतर (३-५) ________________________________________________________________________________________________ इंडियन एक्स्प्रेसचे सुरजित भल्ला यांनी स्वतःचा वेगळा अंदाज दिला आहे. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भल्ला यांनी भाजप+ (६०) व संजद+ (१७५) असा अंदाज दिला होता. तो अत्यंत अचूक ठरला होता. त्यांच्या अंदाजानुसार खालील चित्र असेल. http://indianexpress.com/article/opinion/columns/uttar-pradesh-assembly-elections-2017-samajwadi-party-bjp-congress-no-proof-required-seeking-redemption-in-up-2017-4560884/
वर्गीकरण
विधानसभा निवडणुक मतमोजणी निकाल २०१७

प्रतिक्रिया द्या
29836 वाचन

💬 प्रतिसाद (158)
म
मोदक Sat, 03/11/2017 - 07:33 नवीन
राहुल गांधींच्या शिरपेचात मानाचा तुरा.. वगैरे वगैरे..! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ए
एस Sat, 03/11/2017 - 05:49 नवीन
भाजपची जोरदार मुसंडी उत्तर प्रदेशात. जबरदस्त. पंजाब काँग्रेसकडे परत जातोय. गोव्याचंच अजून चित्र स्पष्ट नाहीये.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 05:50 नवीन
गोव्यात आतापर्यंत ४० पैकी २१ जागांचेच कल उपलब्ध आहेत. मणीपूरपेक्षाही गोव्यातील कल कमी वेगाने येत आहेत. गोव्याच्या सुशेगाद परंपरेप्रमाणे सगळे चालू आहे असे दिसते. मांद्रेमधून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर पिछाडीवर आहेत हा भाजपला नक्कीच मोठा धक्का आहे. प्रियोळमध्ये भाजपने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. प्रियोळ हा म.गो.पक्षाचा बालेकिल्ला आहे. हा म.गो.पक्षालाही बसलेला झटका आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 05:53 नवीन
उत्तर प्रदेश: ३९८ पैकी भाजप २८६, सपा+काँग्रेस ७९ , बसपा २७ पंजाबः ११७ पैकी काँग्रेस ६५, अकाली+भाजप २८, आआप २४ उत्तराखंडः ७० पैकी भाजप ५३, काँग्रेस १, बसपा १ मणीपूरः ३२ पैकी काँग्रेस १६, भाजप ११ गोवा: २१ पैकी काँग्रेस ९, भाजप ८, इतर ४
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 05:58 नवीन
या क्षणी ४०१ पैकी २९० जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्रिशतक ठोकणे शक्य आहे का?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 06:02 नवीन
गोव्यात आता काँग्रेसने आघाडी घेतलेली दिसत आहे. २३ पैकी ११ जागांवर काँग्रेस पुढे आहे. देशात बर्‍यापैकी समर्थ विरोधी पक्ष हवा. मोदीलाटेत इतर राज्यात विरोधी पक्ष वाहून जात असताना गोव्यात काँग्रेसला विजय मिळाला तर ते थोड्या प्रमाणात तरी मनोबल उंचावणारे असेल.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 06:06 नवीन
गोव्यात म.गो.पक्षाने भाजपची सोडलेली साथ महागात पडलेली दिसते. म.गो.पक्षाला स्वबळावर फार काही करता आले नाही तरी अनेक मतदारसंघांमध्ये म.गो.पक्षाची ३% ते ५% मते आहेत. गोव्यासारख्या लहान राज्यात ही मते निकाल फिरवू शकतात. तसेच आआपने अपेक्षेइतकी ख्रिश्चन मते खाल्लेली दिसत नाहीत आणि दक्षिण गोव्यात ही मते काँग्रेसकडे जाताना दिसत आहेत. सुभाष वेलिंगकरांच्या आघाडीने किती मते घेतली हे बघायला हवे.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sat, 03/11/2017 - 06:08 नवीन
उत्तर प्रदेशात भाजप आला तर मुख्यमन्त्री कोण असेल ?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 06:27 नवीन
नोटबंदीचा भाजपला जोरदार फटका बसेल असे ल्युटिन्स दिल्लीमधील अनेक मिडियावाल्यांचे म्हणणे होते. तसे काही होताना दिसलेले नाही. भाजपने १९८५ मधील नारायणदत्त तिवारींचा विक्रम मोडलाच आहे. १९८० मध्ये काँग्रेसने अविभाजित उत्तर प्रदेशात ३०९ जागा जिंकल्या होत्या.त्यापैकी ११ जागा सध्या उत्तराखंड आहे त्या भागातून आल्या होत्या. म्हणजे सध्या उत्तर प्रदेश आहे त्यातून काँग्रेसने २९८ जागा जिंकल्या होत्या. या क्षणी भाजप २९६ जागांवर पुढे आहे. काँग्रेसचा २९८ चा विक्रमही मोडणार का हे बघायचे. बागपत आणि छपरौली विधानसभा मतदारसंघांमधूनही भाजप आघाडीवर आहे. हा चरणसिंग-अजितसिंग यांचा बालेकिल्ला होता. स्वतः चरणसिंग छपरौलीमधून निवडून जायचे. तिथेही भाजप आघाडीवर असेल तर ते नक्कीच महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 06:30 नवीन
पंजाबमध्ये आता आआप अकाली दलापेक्षा पुढे गेला आहे. या क्षणी आआपला २७ आणि अकाली-भाजपला २२ जागांवर आघाडी आहे. हे लिहिता क्षणी भाजपने ३०० जागांवर आघाडी मिळवली आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 06:39 नवीन
मागच्या १५-२० मिनिटात दोन महत्वाचे बदल झाले आहेत. बसपा अजून खाली आली आहे. याच चर्चेत वर लिहिल्याप्रमाणे काहीकाळ बसपा ३० च्या आसपास जागांवर पुढे होती. पण आता तो आकडा १७ पर्यंत खाली आला आहे. भाजप या १०-१२ जागांवर आघाडी घेतलेली दिसते. भाजप आता २९०-२९२ पासून ३०५ पर्यंत पुढे गेला आहे. पंजाबमध्ये आआप आता दुसर्‍या क्रमांकावर स्थिरावताना दिसत आहे. आआप २६ जागांवर तर अकाली-भाजप २० जागांवर पुढे आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sat, 03/11/2017 - 06:44 नवीन
इरोम शर्मिलाला ला फक्त ५१ मतं पडली आहेत. डिपॉझिट जप्त :(
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 06:48 नवीन
इरोम शर्मिलाला ला फक्त ५१ मतं पडली आहेत. डिपॉझिट जप्त :(
याचाच अर्थ ल्युटिन्स दिल्लीमधील मिडियावाले ज्यांना डोक्यावर घेतात ते तितके लोकप्रिय असतात असे नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Sat, 03/11/2017 - 07:17 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 06:53 नवीन
केजरीवालांनी इरॉम शर्मिलाच्या पक्षाला ५० हजाराची देणगी दिली होती. पनवती लागली म्हणायचे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
व
वरुण मोहिते Sat, 03/11/2017 - 06:45 नवीन
भाजप पुढे भाजप १३ काँग्रेस १२ गोव्यामध्ये मतविभागणी बरीच झाली आहे . सध्याच्या अंदाजांवरून कॅथलिक पट्ट्यात भाजप ला मतं कमी मिळत आहेत .
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 03/11/2017 - 07:01 नवीन
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये भाजपाचा जबरदस्त विजय. पंजाब मध्ये केजरिवाल सारख्या विदुषकाच्या हाती सत्ता न देता, लोकांनी कॉंग्रेसकडे दिली हे एक चांगले झाले.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 07:06 नवीन
पंजाब मध्ये केजरिवाल सारख्या विदुषकाच्या हाती सत्ता न देता, लोकांनी कॉंग्रेसकडे दिली हे एक चांगले झाले.
अगणितवेळा सहमत. केजरीवालसारख्या विदूषकाच्या कंपनीत राहिल्यामुळे की काय हरविंदरसिंग फुलका हा चांगला माणूसही सध्या पिछाडीवर आहे. भगवंत मान केजरीवालांची दुसरी कॉपी शोभावा असा आहे. त्यामुळे तो मनुष्य मागे आहे हे चांगलेच आहे. पण फुलका तरी जिंकायला हवेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 07:17 नवीन
गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मांद्रे विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. नितीन गडकरींनी कोणालाही मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहिर करणार नाही आणि पुढचा मुख्यमंत्री दिल्लीहून यायची शक्यता आहे असे संकेत दिले तोच पार्सेकर यांच्यासाठी धक्का होता. विद्यमान मुख्यमंत्री असताना निवडणुकांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर न करणे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर पक्षाने प्रकट केलेली नाराजीच असे म्हणायला हरकत नसावी. मतदारांनीही तोच निकाल दिलेला दिसतो.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Sat, 03/11/2017 - 07:36 नवीन
यांना पूर्ण यश आलंय . मतदारसंघात . गोरखपूरला . तसेच वाराणसी मध्ये पूर्ण यश आहे भाजपाला . दावेदार कोण होणार भाजप कडून हि उत्सुकता आहे . आज पंजाब मध्ये सिद्धू ची शेरोशायरी आवर्जून पहा :))
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 07:40 नवीन
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष याक्षणी ५८ जागांवर आघाडीवर आहे. पक्षाचा हा फार मोठा पराभव झाला आहे. यापूर्वी सपा एकदाच १०० पेक्षा खाली गेला होता-- २००७ मध्ये ९७ जागा. त्यापेक्षाही प्रचंड मोठा पराभव झालेला दिसत आहे. ल्युटिन्स दिल्लीमधील मिडियामध्ये अखिलेख यादव कसे 'विकासपुरूष' आहेत, कसे लोकप्रिय आहेत इत्यादी इत्यादी लिहिले जात होते. आणि कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही तर सपा-काँग्रेस युती पहिल्या क्रमांकावर असेल असे वातावरण निर्माण केले जात होते. या मिडियाचा लोकांबरोबरचा कनेक्ट किती तुटला आहे हेच या निमित्ताने समजून येत आहे. भाजप ३०० ते ३१० च्या मध्ये स्थिरावेल असे दिसते. दुपारी १२ नंतर आकड्यांमध्ये बहुतेक वेळा फार बदल होत नाहीत. हा अभूतपूर्व विजय आहे, त्सुनामी आहे वगैरे म्हणणेही अंडरस्टेटमेन्ट ठरेल.
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 03/11/2017 - 07:44 नवीन
उत्तर प्रदेशात काँग्रेसला किती आणि सपला किती जागा मिळाल्या?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/11/2017 - 07:52 नवीन
भाजप ३०८, सप ५८, कॉंग्रेस ११, बसप १८
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
श
श्रीगुरुजी Sat, 03/11/2017 - 07:50 नवीन
वेलिंगकरांमुळे गोव्यात भाजपचा पराभव होतोय. त्यांना मगोप व शिवसेनेने साथ दिली. शिवसेना या सापाला कितीही दूध पाजलं तरी तो भाजपला डसणारच हे भाजपच्या अजूनही लक्षात आलेलं दिसत नाही.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 03/11/2017 - 10:08 नवीन
गोव्यातले गणित वेगळे आहे. मगो आणि भाजपाची युती तुटली तेव्हाच काँग्रेस फायद्यात असणार हे स्पष्ट झाले होते. त्यातच ८०% हून जास्त मतदान होते तेव्हा ते प्रस्थापित सरकारच्या बहुधा विरोधात जाते. गोव्यात भाजपाची पीछेहाट होण्याची आणखी काही कारणे म्हणजे पार्सेकर हे पर्रीकरांसारखे अजिबात लोकप्रिय नाहीत. एखादेवीळी श्रीपाद नाईकांचे नाव पुढे आले असते तरी चित्र वेगळे दिसले असते. माध्यम प्रश्नावरून भाजपाला वेगळा निर्णय घेणे शक्य नव्हते मात्र त्या निर्णयाचा जोरदार फटका भाजपाला बसला आहे. आणि यापुढच्या सर्व सरकाराना हा प्रश्न सतावणार आहे. आताचे आकडे आणि नावे पाहता भाजपा अजूनही कडबोळे बांधून सरकार बनवू शकेल असे वाटते आहे. मात्र ते सरकार खूप अस्थिर असेल आणि इतर लहान पक्षांच्या ब्लॅकमेलला किती प्रमाणात तोंड देऊ शकेल सांगता येणार नाही. कदाचित ५ वर्षात पाच पन्नास सरकारेही बघायला मिळतील! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 10:32 नवीन
एखादेवीळी श्रीपाद नाईकांचे नाव पुढे आले असते तरी चित्र वेगळे दिसले असते.
हो ना. जर मिपावरील माझा हा प्रतिसाद भाजपच्या नेतृत्वाने वाचला असता तर आज ही वेळ आली नसती :) :) :) जोक्स अपार्ट. मला वाटले होते की आआप भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडेल आणि भाजपला निवडणुक त्यामानाने सोपी जाईल. अन्यथा या निवडणुका भाजपसाठी हरायच्याच निवडणुका ठरल्या असत्या. पण आआपने भाजपविरोधी मते फार खाल्लेली दिसत नाहीत.
कदाचित ५ वर्षात पाच पन्नास सरकारेही बघायला मिळतील! =))
१९९० च्या दशकात गोव्यात जी प्रचंड राजकीय अस्थिरता होती त्याची पुनरावृत्ती बघायला मिळणार का? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sun, 03/12/2017 - 15:32 नवीन
पर्रीकर गोव्यात परत यावेत असे मात्र मला अजिबात वाटत नव्हते. कदाचित एखादे वर्ष दिले असेल. नंतर पुन्हा निवडणुका होतील. बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मोहन Sat, 03/11/2017 - 07:51 नवीन
ट्रुमन साहेब - काँग्रेस करता प्रशांत किशोर पण चालले नाही म्हणावे काय ? पण पंजाबात तर चाललेले दिसतात यूपी मधे मात्र सफाया.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 07:58 नवीन
ट्रुमन साहेब - काँग्रेस करता प्रशांत किशोर पण चालले नाही म्हणावे काय ? पण पंजाबात तर चाललेले दिसतात यूपी मधे मात्र सफाया.
याचे कारण या पूर्वी प्रशांत किशोरने मुळातली चांगली प्रॉडक्ट मार्केट केली होती-- २०१४ मध्ये मोदी आणि २०१५ मध्ये नितीश कुमार. त्यामुळे अनेकांना प्रशांत किशोरमुळे मोदींनी आणि नितीश कुमारांनी निवडणुक जिंकली असे वाटू लागले होते. अर्थातच सत्य परिस्थिती नक्कीच तशी नव्हती. असे वाटणार्‍यांना मी नेहमीच म्हटले होते-- २०१४ मध्ये मोदी लाट होती. ती प्रशांत किशोर लाट नव्हती. त्यामुळे प्रशांत किशोर या फॅक्टरला प्रमाणाबाहेर महत्व दिले जाऊ नये. चांगले प्रॉडक्ट कोणीही मार्केट करू शकेल. खरे आव्हान होते राहुल गांधी हे प्रॉडक्ट कसे मार्केट करायचे हे. त्यातल्या त्यात पंजाबमध्ये अमरिंदरसिंग लोकप्रिय होतेच. २०१४ मध्ये त्यांनी मोदीलाटेत अरूण जेटलींचा स्वतःच्या पारंपारीक नसलेल्या मतदारसंघातून (अमृतसर) पराभव केला होता. त्यामुळे प्रशांत किशोरचा उपयोग पंजाबात झाला. पण मुळातले प्रॉडक्टच बोगस असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही :) त्यामुळे उत्तर प्रदेशात मार खावा लागला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहन
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 08:08 नवीन
गोव्यात कासवाच्या गतीने निकाल/कल येत आहेत. आता २८ जागांचे निकाल/कल उपलब्ध आहेत. त्यापैकी काँग्रेस १३ जागांवर तर भाजप ९ जागांवर पुढे आहे. इतर ६ जागांवर पुढे आहेत. या चार इतरांमध्ये बाणावलीमधून चर्चिल आलेमाव (यावेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुक लढवत आहे) चा समावेश आहे. उत्तर गोव्यातील बरेच कल आले आहेत तर दक्षिण गोव्यातील बरेच कल यायचे आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (मडगाव) यांच्या जागेचाही समावेश आहे. एकूणच भाजपला दक्षिण गोव्यात फार अपेक्षा ठेवता येणार नाहीत. तेव्हा गोव्यात काँग्रेस जिंकणार असे वाटते. आआपने नेहमीप्रमाणे फेसबुक आणि ट्विटरवर जोरदार आघाडी उघडली होती. नुसते तेवढे फॉलो केले तर कोणाला वाटू शकेल की आआपमध्ये गोव्याची लाट होती. अर्थातच तसे काही नव्हते. नेहमीप्रमाणे मोदींच्या सभेला रिकाम्या खुर्च्या कशा आहेत हे दाखवून द्यायला सभा सुरू होण्यापूर्वी २-४ तास आधीचे फोटो ट्विटरवर पोस्टही करून झाले. पण अर्थातच अशा गोष्टींचा प्रभाव मतदारांवर पडत नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 08:11 नवीन
नुसते तेवढे फॉलो केले तर कोणाला वाटू शकेल की आआपमध्ये गोव्याची लाट होती.
हे गोव्यामध्ये आआपची लाट होती असे एखाद्याला वाटेल असे वाचावे. गलतीसे मिश्टेक हो गया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
वरुण मोहिते Sat, 03/11/2017 - 08:09 नवीन
निवडणूक लढवली नसती तर पंजाब मध्ये फार फरक पडला असता भाजप ला . उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक जिंकणं खायचं काम नाही आहे . अनेक जातीय समीकरण जुळवावी लागतात . कारणं काहीही असो पण आज क्लीन स्वाईप भाजप कडून . तेही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित न करता . हे महत्वाचं (व्यक्तिशः मला आज मणिपूर मध्ये भाजप जिंकावी असे वाटत आहे . )
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 08:40 नवीन
याक्षणी पंजाबमध्ये आआप २५ जागांवर आघाडीवर आहे. या पराभवानंतर तरी केजरीवालांचे विमान जमिनीवर येईल का हा पण प्रश्नच आहे. दिल्लीत अभूतपूर्व विजय मिळाल्यानंतर सगळीकडे आपल्याला तसाच विजय मिळेल अशी अपेक्षा केजरीवालांची असावी. पण अर्थातच तसे काही झालेले नाही. एन.डी.टि.व्ही वर थोड्या वेळापूर्वी आआपच्या एका नेत्याने म्हटले: "Virat Kohli can't hit a double century in every match he plays. If he fails to hit a double century, that doesn't mean that he is a bad batsman." त्यावर विक्रम चंद्राने म्हटले: "If someone hits a century in one match , we can't really call him Virat Kohli" त्यावर त्या आआपच्या नेत्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. ल्युटिन्स दिल्लीमधील मिडिया अशी 'विटी' वक्तव्ये हजरजबाबीपणे देऊ शकतो :) केजरीवालांपुढे आता पंजाबात पक्ष एकत्र ठेवायचे आव्हान आहे. इतकेच नाही तर पुढच्या महिन्यात दिल्ली महापालिकांच्या निवडणुकांचे मोठे आव्हान आहे. दिल्ली महापालिकांमध्ये भाजप गेल्या १० वर्षांपासून सत्तेत आहे आणि इतर कुठल्याही महापालिकेप्रमाणे दिल्लीतील महापालिकांचा कारभारही अकार्यक्षम आणि भ्रष्ट आहे. काँग्रेसची अवस्था दयनीयच आहे. अशा परिस्थितीत या तिनही महापालिका जिंकायची चांगली संधी आहे. या निवडणुका २०१५ प्रमाणे आआपने स्वीप केल्या नाहीत (आणि थोडक्यात विजय मिळवला) तरी तो एका अर्थी आआपचा पराभवच समजला जाईल. आणि समजा आआपला या निवडणुका जिंकता आल्या नाहीत तर मात्र तो फारच मोठा धक्का असेल. एकूणच २०१५ नंतर केजरीवालांचे विमान उंचच उंच उडत होते. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे काम सोडून इतर सगळ्या गोष्टींमध्ये विनाकारण नाक खुपसणे त्यांनी सतत चालूच ठेवले होते. कधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे माग, कधी पंतप्रधान मोदींना सायकोपाथ म्हण, सतत मोदीनामाचा जप कर हे प्रकार केजरीवालांचे चालूच होते. कधीकधी वाटते की मोदीजी हे जर कुठल्या धर्मात देवाचे नाव असते तर तो देव सगळे कामधंदे सोडून केजरीवालांना दर्शन द्यायला धावत आला असता इतके मोदीजी या नावाचे नामस्मरण केजरीवालांनी केले असेल!! परवा महिलादिना निमित्तही ट्विटरवर शुभेच्छा देताना "मोदींनी स्त्रियांना आदर न देणार्‍या सगळ्यांना ट्विटरवर अनफॉलो करावे" असा अनाहूत सल्ला देऊन टाकला. अरे लेका, तुला कोणी विचारले आहे? तुझे काम सोडून इतर गोष्टींमध्ये कशाला नाक खुपसायला जातोस? मतदारांना हे सगळे समजत नव्हते असे अजिबात नाही. त्यामुळे आपण विश्वासार्ह नाही हे चित्र स्वतः केजरीवालांनीच उभे करायला मदत केली. पंजाबच्या मतदारांनी त्याला अनुसरूनच मत दिलेले दिसते. यातून केजरीवाल काही धडा घेतात का हेच बघायचे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 08:48 नवीन
गोव्यात आता ३१ जागांचे कल आले आहेत. काँग्रेस आणि भाजप दोघेही प्रत्येकी १२ जागांवर पुढे आहेत. तर अपक्ष आणि इतर ७ जागांवर पुढे आहेत. काँग्रेसचे गोव्यातील मोमेन्टम थोडे कमी झालेले दिसते. पोरिएममधून माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, वाळपोईमधून त्यांचे पुत्र विश्वजित राणे, फोंड्यामधून माजी मुख्यमंत्री रवी नाईक, मडगावमधून माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे सगळे काँग्रेसचे नेते आघाडीवर आहेत किंवा विजयी झाले आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 08:54 नवीन
उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी दोन जागांवरून निवडणुक लढवली होती आणि दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Sat, 03/11/2017 - 08:54 नवीन
पार्सेकर हरल्याने दिल गार्डन गार्डन हो गयेला हय. खांग्रेस गोवा फोरवर्ड आणि अपक्ष मिळून सरकार स्थापन करू शकतात मगो उड्या मारण्यात एक्षपर्ट आहे
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 10:35 नवीन
दिल गार्डन गार्डन हो गयेला हय.
वा वाक्प्रचार आवडला. वापरायला पाहिजे कधीतरी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर
प
प्रीत-मोहर Sat, 03/11/2017 - 09:03 नवीन
सध्या ९ ठिकाणी भाजप ९ ठिकाणी खांग्रेस १ मगो ३ गोवा फोरवर्ड जिंकलेत. बाकी काउंटिंग जारी हय
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 03/11/2017 - 09:12 नवीन
मायावतीने, स्वत:च्या पराभवाचे खापर EVM मशीन वर फोडले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे EVM वरिल कोणतेही बटन दाबले तरी मत भाजपाला जात होते.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 09:27 नवीन
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आल्यानंतरही असे आरोप झाले आहेत. फेसबुकवर पुरोगाम्यांनी ते शेअरही केले होते. कसे असते की दिल्लीमध्ये, बिहारमध्ये भाजपचा सपाटून पराभव झाला तर ई.व्ही.एम एकदम परफेक्ट असतात.महाराष्ट्रातही ठाण्यातील ई.व्ही.एम परफेक्ट असतात. पण उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने जोरदार विजय मिळवला तर मात्र मशीनमध्ये काहीतरी झोल असतो. ठाणे सोडून इतर शहरांमधील मशीनमध्येही झोल असतो. याला म्हणतात गिरा तो भी टांग उपर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
म
मोदक Sat, 03/11/2017 - 11:44 नवीन
>>> महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आल्यानंतरही असे आरोप झाले आहेत. फेसबुकवर पुरोगाम्यांनी ते शेअरही केले होते. मिपावरही असले आरोप तिथूनच आले असावेत, पुरावे मागितल्यावर मात्र "चौकशी सुरु आहे" छाप उत्तरे मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
वामन देशमुख Sat, 03/11/2017 - 09:24 नवीन
(निकालापुर्वी) पंजाबात आपची सत्ता आल्यास केजरीवाल, उप्र मध्ये अमित शहा मुख्यमंत्री होऊ शकतील असे वाचण्यात आले. एका राज्याचा रहिवासी असलेला नागरीक दुसर्‍या राज्याचा मुख्यमंत्री होण्याची प्रोसेस काय असते?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 09:33 नवीन
एका राज्याचा रहिवासी असलेला नागरीक दुसर्‍या राज्याचा मुख्यमंत्री होण्याची प्रोसेस काय असते?
भारतात नागरिकत्व केवळ देशाचे नागरिकत्व असते. राज्यांचे नागरिकत्व नसते. त्यामुळे कोणीही २५ वर्षापेक्षा जास्त वय असणे वगैरे अटी पूर्ण करणारा भारतीय नागरिक कुठूनही निवडणुक लढवू शकतो. दुसर्‍या राज्यातून विधानसभेत निवडून गेल्यास इतर कोणत्याही आमदाराप्रमाणे मुख्यमंत्री/मंत्री व्हायचा अधिकार अशा आमदारांनाही असतो. आणि समजा मुख्यमंत्री होताना आमदार नसल्यास सहा महिन्यात निवडून यावे लागते. सुषमा स्वराज १९७७ आणि १९८७ मध्ये हरियाणात देवीलाल यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होत्या. त्या १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या. एकेकाळी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री असलेल्या उमा भारतींनी २०१२ मध्ये उत्तर प्रदेशातील चरखारी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवून उत्तर प्रदेश विधानसभेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून जाहिर केले होते. १९९३ मध्ये हरियाणात माजी मंत्री असलेल्या एकाचा विजय राजस्थान विधानसभेवर झाला होता (त्या विजयी उमेदवाराचे नाव आणि मतदारसंघ विसरलो). याव्यतिरिक्त इतर उदाहरणेही असतील ही शक्यता आहेच पण मला ती माहित नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 09:48 नवीन
गोव्यात आता ३६ जागांचे कल आले आहेत. त्यात १६ जागांवर काँग्रेस, १२ जागांवर भाजप आणि ८ जागांवर इतर आघाडीवर/विजयी झाले आहेत. या ८ मध्ये विजय सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष ३, भाजपने पाठिंबा दिलेला अपक्ष १ , राष्ट्रवादी काँग्रेस १ (चर्चिल आलेमावची बाणावली) तर ३ जागांवर म.गो.पक्ष पुढे आहे. गोव्यात परत एकदा घोडेबाजाराचा काळ येणार असे दिसते. भाजपला १ अपक्षाचा पाठिंबा मिळेल तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाच्या ३ आमदारांचा पाठिंबा मिळाला तर हा आकडा १६ वर जाईल. तर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन काँग्रेस १७ वर जाईल. म.गो.पक्ष कुठल्या बाजूला जातो हे बघायचे. मणीपूरमध्ये आता ५७ जागांपैकी भाजप २५ वर, काँग्रेस २४ वर तर इतर ८ जागांवर पुढे आहे. भाजपने काँग्रेसला मणीपूरमध्ये मागे टाकले आहे असे आताचे चित्र आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 03/11/2017 - 10:03 नवीन
उत्तर प्रदेश मध्ये 'राष्ट्रीय' पक्ष असलेल्या कॉंग्रेजची अवस्था, गठबधंन करुनही अतिशय दारुण आहे, १०० + जागा लढवून हि अवघ्या ७ जागा निवडणुन आल्यात त्यांच्या. कॉंग्रेजच्या ह्या पराभवाने एक गोष्ट सिध्द झाली की कॉंग्रेज ज्याही पार्टी बरोबर जाईल ती पार्टी बुडतेच.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/11/2017 - 10:09 नवीन
गोवा - भाजप (१३), काँग्रेस (१३), मगोप+ (३), इतर (७) मणिपूर - भाजप (२६), काँग्रेस (२१), इतर (९)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/11/2017 - 10:36 नवीन
गोव्यात आता भाजप पुढे आहे. भाजप १४ व काँग्रेस १३ अशी स्थिती आहे.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Sat, 03/11/2017 - 11:00 नवीन
पण पक्षाचा खरा अंदाज पाहायचा असेल तर आज मणिपूर मध्ये भाजप जिंकावी . काहीच नसताना अंदाज असा होता कि भाजप जिंकेल .
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 13:28 नवीन
हो ना मणीपूर जिंकण्यात अपयश आले आहे. त्यामुळे मोदींची लाट वगैरे असे काहीच नाही आणि ती लाट केवळ मिडियामध्ये आणि कॉर्पोरेटमध्ये आलेली आहे हे त्यातून सिध्द होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
श
श्रीगुरुजी Sat, 03/11/2017 - 11:10 नवीन
पंजाबमध्ये आता काँग्रेस ७६, आआप २३ आणि अकाली दल-भाजप १८ अशी स्थिती आहे. बहुतेक सर्व सर्वक्षणांनी अकाली दल-भाजप युतीला जास्तीत जास्त ७ जागांचा अंदाज दिला होता. परंतु प्रत्यक्षात या युतीला थोड्याशा जास्त जागा आहेत. एका वृत्तसंस्थेने काँग्रेस व आआप यांना प्रत्येकी ५५ व दुसर्‍या वृत्तसंस्थेने दोन्ही पक्षांना प्रत्येकी ५४ जागा मिळतील असा अंदाज दिला होता. सुरजित भल्लांनी काँग्रेस ५६ व आआप ४८ असा अंदाज दिला होता. अजून काही अंदाजानुसार काँग्रेस (६२-७१) व आआप (४२-५१) आणि काँग्रेस (४१-४९) व आआप (५९-६७) असे अंदाज होते. हे सर्व अंदाज बर्‍याच प्रमाणात चुकले. काँगेसला अंदाजापेक्षा बर्‍याच जास्त जागा मिळत आहेत तर आआपला खूपच कमी जागा मिळत आहेत. आपल्याला किमान ९०-१०० जागा मिळतील असा प्रचार मागील वर्षभर केजरीवाल करीत होते. गोव्यात सुद्धा आपल्या पक्षाला किमान ३० जागा मिळतील असा त्यांचा दावा होता. गोव्यासाठी अत्यंत जातीयवादी भूमिका घेऊन त्यांनी मुद्दाम जाहीररित्या आपण ख्रिश्चन मुख्यमंत्री देत आहोत असे सांगितले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री असताना सुद्धा विशेषतः मागील ७-८ महिन्यात ते फार थोडा काळ दिल्लीत होते. त्यांनी पंजाब, गोवा व गुजरात मध्ये बरेच दौरे केले. सुवर्णमंदीरात पहाटे ४ वाजता जाऊन आधीच घासून ठेवलेली ताटे विसळण्याची नौटंकी केली. पंजाबला नशामुक्त करण्याचे आश्वासन देताना भगवंत मान सारख्या दारूड्याला प्रमुख प्रचारक म्हणून नेमले याच्यात त्यांना काहीही विसंगती वाटली नाही. रोज ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर व्यक्तिगत हल्ले करणे, सिनेमांबद्दल अभिप्राय लिहिणे, मोदींचे कपडे मोजणे, पुराव्याशिवाय वाटेल ते बेछूट आरोप करणे, मोदींनी आपल्या पत्नीला व आईला आपल्या घरी आणून ठेवावे असे अनाहूत व्यक्तिगत सल्ले देणे आणि हे करताना दिल्लीकडे पूर्ण दुर्लक्ष करणे अशा त्यांच्या उचापत्या सुरू होत्या. आपल्या पक्षाला एखाद्या टॅब्लॉईडच्या पातळीला त्यांनी आणले आहे. जेटलींविरूद्ध भ्रष्टाचाराचे आरोप (अर्थातच बिनबुडाचे) केल्यानंतर जेटलींनी बदनामीचा खटला दाखल केल्यानंतर केजरीवालांनी न्यायालयात आधी भूमिका घेतली की जेटली निवडणुक हरल्यामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठाच नाही आणि त्यामुळे माझ्या आरोपांमुळे त्यांची बदनामी होऊच शकत नाही. इतका विचित्र बचाव आजवर कोणीही केल्याचे ऐकिवात नाही. हा बचाव न्यायालयात चालत नाही हे समजल्यावर त्यांनी एक नवीनच मागणी केली. जेटलींनी १९९९ पासून आजतगायत भरलेले आयकर रिटर्न्स, त्यांच्या सर्व बँक खात्याची माहिती व त्यात किती शिल्लक आहे ही माहिती, त्यांनी बॅक खात्यातून केलेल्या मागील १५ वर्षातील सर्व व्यवहारांची माहिती मला हवी आहे अशी मागणी त्यांनी सत्र न्यायालयात केली. ही माहिती अत्यंत व्यक्तिगत असून ती तुम्हाला मिळणार नाही हे सांगतानाच 'तुम्ही मुद्दाम वेळकाढूपणा करून खटल्याला विलंब करीत आहात' असा न्यायालयाने शेरा मारला. या निर्णयाविरूद्ध केजरीवाल उच्च न्यायालयात गेल्यावर उच्च न्यायालयाने देखील ही मागणी नाकारली. आता ते बहुतेक सर्वोच्च न्यायालयात जातील व खटल्याला अजून विलंब करण्याचा प्रयत्न करतील. ज्या आधारावर तुम्ही जेटलींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते आधी पुढे आणा ना. परंतु अत्यंत सडकी मनोवृत्ती आणि जन्मजात नौटंकी अंगात असलेला हा माणूस या जन्मात सुधारेल असे वाटत नाही. अशा माणसाच्या पक्षाचा पंजाब व गोवा या दोन्ही ठिकाणी पराभव होत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पंजाबमध्ये आआपला बहुमत मिळाले तर केजरीवाल दिल्लीच्या गादीवर मनीष सिसोदियांना बसवून आपल्याला पंजाब मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवतील असे देखील बोलले जात होते. पंजाबी लोकांना शीख नसलेला मुख्यमंत्री अजिबात मान्य झाला नसता. पंजाब व हरयानामध्ये सतलज-यमुना कालवा पाणीवाटप हा अत्यंत वादाचा मुद्दा आहे. केजरीवाल पंजाबमध्ये जाऊन पंजाबची हरयानाला पाणी न देण्याची भूमिका योग्य आहे असे प्रमाणपत्र द्यायचे तर हरयानात जाऊन कालव्याचे पाणी हरयानाला मिळालेच पाहिजे अशी पूर्णपणे विरूद्ध भूमिका घ्यायचे. यांच्या या परस्परविरोधी भूमिका जनता पाहत होती. आआपला ज्या २३ जागांवर आघाडी आहे त्यातील २१ जागा माळव्यातील आहेत. पंजाबमधील ११७ जागांपैकी माळव्यात ६९ जागा असून उर्वरीत दोन भागात ४८ जागा आहेत. उर्वरीत ४८ जागांपैकी फक्त २ जागांवर आआपला आघाडी आहे. म्हणजे माळवा वगळता पंजाबमध्ये आआपला स्थान मिळालेले नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा