Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेतकर्‍यांचा संप

म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 06/01/2017 - 13:53
🗣 349 प्रतिसाद
आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी काय आहेत संपावर जाणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या ? १) शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा. २) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी. ३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा. ४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा. ५) शेतकर्‍यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. ६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा. ७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा. ८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे. का केल्या शेतकर्‍यांनी ह्या मागण्या? शेतकरी सरकारकडे ह्या मागण्या अनेक वर्षांपासून करीत आहे. राज्यातील पूर्वीच्या सरकारने एखादवेळी कृषीकर्ज , कृषीवीजबील माफ करून वेळ मारून नेली होती. परंतू शेतकर्‍यांच्या शेतीमाल संबंधीत समस्या न सोडवल्यामुळे शेतकर्‍याची आर्थिक बाजू कायम कमकुवत राहीली. मग आताच का उचल खाल्ली ह्या मागण्यांनी? राज्याच्या सत्तारुढ महायुतीतील सर्व घटक पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यमान पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या भाषणात शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५०% अधिक भाव देण्याचे आश्वासान दिले होते. शेतकर्‍यांनी त्यावर विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. सत्तेत येउन बराच काळ लोटला परंतू ना केन्द्र सरकारने ना राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावनी केली. शेवटी हताश झालेल्या शेतकर्‍यांना सरकारला आठवण करुन देण्यासाठी संपाचे हत्यार उगारावे लागले. सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघत आहे का? दररोज शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असताना राज्यसरकार ढिम्म आहे. राज्यातील शेतकरी संपावर जाणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्रांनी शेतकर्‍यांशी बोलणी केली नाही. 'ह्या संपाचा काहीही परिणाम होणार नाही, आम्ही माल बाहेरुन मागवू', अशी बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षातील काही जण करू लागले आहेत. त्यातच खरिबाचा हंगाम सुरू झाला तरी शेतकर्‍यांना पिककर्ज मिळालेले नाही. सगळीकडून शेतकर्‍यांन्ची कोंडी केली आहे. शेतकर्‍यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे का? अल्पदरात पिककर्ज, शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी अखंडीत वीजपुरवठा आणि ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान , ह्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे. संप यशस्वी होईल की नाही ह्यापेक्षा शेतकर्‍याने एकजूट दाखवून आपली ताकद दाखवली आहे हे महत्वाचे. हा संप यशस्वी होण्यासाठी आपल्यासारख्या शहरवासीयांनीही ह्या संपाला पाठींबा द्यायला हवा. सरकारने शेतमाल बाहेरुन आणल्यास त्यावर बहिष्कार टाका. जमल्यास सोशल मिडियातून अधिकाधीक लोकांपर्यंत शेतकर्‍याची समस्या पोहचवा व ह्या संपाला पाठींबा देण्याचे आवाहन करा.

प्रतिक्रिया द्या
73407 वाचन

💬 प्रतिसाद (349)
ज
जेम्स वांड Fri, 06/02/2017 - 14:52 नवीन
एक टोक 'फडणीसंसाठी आटापिटा' केल्याचा आरोप करणारं अन दुसरं टोक 'जमिनी गेल्याची' जाहिरात करणारं, एकंदरीत ह्या धाग्यात चर्चा होणार नव्हतीच, विचारलेल्या कळीच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही ते नाहीच. चालायचंच.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 06/02/2017 - 15:26 नवीन
विचारलेल्या कळीच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही मी दिलेले सर्व दुवे एकदा शांत पणे वाचून पहा. यात कोणतंही "माझं मत" नाही. स्वामिनाथन समितीने काय सांगितलं आहे आणि त्याचं सरकार काय करत आहे किंवा हरित क्रांती आणि ऑपरेशन फ्लड बद्दल सर्व दुवे दिले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Fri, 06/02/2017 - 16:07 नवीन
माझा कळीचा प्रश्न हा होय, आता ह्याच्याशी स्वामिनाथन वर्गीस कुरियन वगैरे संबंध कसा हे जमल्यास सांगा, मी फक्त संपाच्या पॉलिटिकल मोटिव्ह बद्दल बोलत होतो, जमल्यास आपणही एकेकदा प्रतिसाद वाचूनच घेत चला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 06/03/2017 - 06:33 नवीन
आय माय स्वारी चुकून तुम्हाला प्रतिसाद गेला दुसरीकडे जायच्या ऐवजी क्षमस्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
स
सुबोध खरे Sat, 06/03/2017 - 06:35 नवीन
पहिलं वाक्य तुमचं टंकल्यावर नंतर दुसऱ्याचा प्रतिसाद चुकून आला क्षमस्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मार्मिक गोडसे Fri, 06/02/2017 - 19:14 नवीन
ह्या संपाच्या निमित्ताने 'स्वामिनाथन आयोग' काय आहे ह्याची लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली हे ही नसे थोडके. आज संपाचा दुसरा दिवस. लोकं संपाबद्दल उलट सुलट चर्चा करत आहेत. एकंदरीत संपाची दखल घेतली जात आहे. ह्या मंथनातून नवनीत निघेल ह्याची आता खात्री वाटू लागली आहे. भारतीय हवामान खातं दरवर्षी हवामानाचा अंदाज वर्तवतं एखादे वर्षी हवामान खातं जेव्हा सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवतं त्या दिवशी शेअर बाजारात उत्साह का निर्माण होतो? कदाचीत ह्याचे उत्तर Dr. M.S. Swaminathan Report मध्ये सापडू शकेल.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Fri, 06/02/2017 - 19:40 नवीन
एकंदरीत महाराष्ट्रात लायक, क्षमतावान शेतकर्‍यांची वानवा आहे असे वाटते. अशा अक्षम लोकांनी दूध ओतले काय, भीका मागितल्या काय किंवा आत्महत्या केल्या काय कोणाचे काय अडणार आहे. खरे सक्षम शेतकरी नविन रस्ते चोखाळत असतील असे वाटते. थोडा भुईवरचा भार कमी होईल इतकेच.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 06/03/2017 - 03:37 नवीन
एकंदरीत महाराष्ट्रात लायक, क्षमतावान शेतकर्‍यांची वानवा आहे असे वाटते. काय वाटेल ते बोलताय का सरजी ? संपाचा राग असणे, त्याच्या राजकीय कार्यकारणभावावर व्यक्त होणे एक गोष्ट, अन कोणाच्या कार्यक्षमतेवर शंका घेणे दुसरे. ह्याला गरळ ओकणे म्हणतात. आकडेवारी ह्याच्या विरुद्ध चित्र देते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
म
मार्मिक गोडसे Fri, 06/02/2017 - 19:47 नवीन
थोडा भुईवरचा भार कमी होईल इतकेच. असा भुईवरचा भार कमी झालेल्या कुटुंबाला कधी भेटलाय का हो तुम्ही कधी?
  • Log in or register to post comments
म
मामाजी Fri, 06/02/2017 - 20:03 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मामाजी Fri, 06/02/2017 - 20:07 नवीन
ही आकडेवारी https://www.facebook.com/photo.php?fbid=765503316955380&set=a.652922268213486.1073741831.100004871568539&type=3
  • Log in or register to post comments
स
साहना Sat, 06/03/2017 - 00:03 नवीन
रस्त्यावर येऊन जाळपोळ करणारा खरोखरच शेतकरी आहे का ?
  • Log in or register to post comments
अ
अमित भोकरकर Sat, 06/03/2017 - 01:15 नवीन
आता नेमकी सुगीच्या काळात शेतकर्याला आंदोलन करायला वेळ असेल का? मला वाटते संपाची वेळ चुकली आहे. मान्सुन लवकर येउ शकतो. मग एवढाच उत्साह शेतकरी दाखवतील का?
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 06/03/2017 - 05:36 नवीन
घेतला संप मागे.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 06/03/2017 - 05:38 नवीन
संप मागे. http://abpmajha.abplive.in/mumbai/maharashtra-farmers-strike-calls-off-413349
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 06/03/2017 - 05:46 नवीन
दुधाचे भाव आणि अल्पभूधारकांचे कर्ज माफ सारख्या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्याचे आभार. लवकरात लवकर दर्जेदार शेतमालाची अन शेतीची खरी किंमत सर्वानाच कळो ही अपेक्षा. __^____
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sat, 06/03/2017 - 05:40 नवीन
आता इथे संपाच्या बाजूने बोलणार्‍यांनी किंवा आपण न्यायाधीश असल्याच्या थाटात फर्स्टहँड निरीक्षणे नोंदवणार्‍यांनी कुठल्या मागण्या मान्य झाल्या याची अभ्यासपूर्ण माहिती द्यावी असे सुचवतो.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 06/03/2017 - 05:51 नवीन
आपण न्यायाधीश असल्याच्या थाटात फर्स्टहँड निरीक्षणे नोंदवणार्‍यांनी कुठल्या मागण्या मान्य झाल्या याची अभ्यासपूर्ण माहिती द्यावी असे सुचवतो.
करा की सुरुवात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
क
कापूसकोन्ड्या Sat, 06/03/2017 - 05:43 नवीन
१.शेतकर्याचा मुलगा मोठे शिक्षण घेउन डॉकटर इन्जिनियर होउ शकतो, पण एखाद्या चांगले शिकलेला एखादा माणूस शेती करू शकत नाही. कायदेशीर मार्गे त्याला शेती करता येत नाही. २. शेती ची जमीन फक्त शेत्कर्‍यालाच विकता येते. ३. शेतकर्‍याला कोणताही इन्कम टॅक्स नाही. खासगी नोकरीत असलेला शिपाई सुद्ध्या पगार घरी नेण्यापुर्वीच टॅक्स भरतो. ४. भारतात शेतकर्‍यांचे अवाजवी लाड झालेले आहेत. ५. हे सर्व जर सरकार्ने करायचे असेल तर हमी भाव कशाला द्यायचा?
  1. कार्पोरेट शेतीला परवानगी द्यावी.
  2. रितसर गुंतवणुक होइल
  3. सरकारला रितसर टॅक्स मिळेल.
  4. शेतकामगारला व्यवस्थित पगार मिळेल
  5. कर्ज रिकवरी चांगली होइल.
  6. नवीन रिसर्च कॉर्पोरेट करू शकेल.
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Sat, 06/03/2017 - 05:43 नवीन
चला संप मिटला तर
  • Log in or register to post comments
श
शेवटचा डाव Sat, 06/03/2017 - 05:59 नवीन
""या संपातुन शेतकरीच संपेल" ---->जाउद्याना संपुद्या शेतकरी ,शेतकरी संपलातर भारतात फक्त 'नौकर'दार /^व्यापारी /^ऊद्योजकमालक शिल्लक राहतील "शेतकऱ्यांना शेती परवडत असेलतर करावि नाहतर सोडुन द्यावी " ---->बरोबर ये आम्हाा नौकराना मालक आसच म्हणत आसतात ,कामावर लेट झालो तर मालक म्हणनार 'काम करायच असेलतर लवकर ये नाहीतर सोडुन जा ,अस प्रत्येक वेळी म्हणत असतो ..आम्ही मुकाट्याने ऐकत असतो कारण मालका कडे वेगळेवेगळे पर्याय असताा ,आम्ही काय तुमच्या मजुराप्रमाणे नाही ..जोपर्यंत आम्हाला सहन होत तोपर्यंत सहन करतो अन मग संपाच हत्यार काढतो आता या संपात जे काम करतील त्यांच्यावर दबाव आणयाचाा अन जे बाहेरून येतील काम करायला त्याना कामापर्यंत पोहचू द्यायचे नाही हे आम्ही करतो .तुला जमणार आहे का हि गोष्ट आपन माल विकायचा नाही कोणाला माल विकु द्यायचा नाही , बाहेरुन येनारा माल शहरापर्यंत पोहचु द्यायचा नाही , शहरात माल वििकु द्यायचा नाही हे जमणार असेल तर संप कर नाहीतर सोडुन दे
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 06/03/2017 - 07:28 नवीन
आज इथे खरे साहेबांप्रमाणेच जरा स्प्ष्टपणे लिहितो. भावणा बिवणा दुखल्या गेल्यास माफी असावी. पहिले च सांगतो माझ्या नजरेत शेतकरी एक इतर व्यावसायिकांप्रमाणे एक आहे. सबब सी ए , होस्पिटल, डोक्टर , ड्रायव्हर या प्रमाणेच तो एक. त्यास अन्नदाता, बळीराजा वगैरे संबोधून सहानुभूति देण्याचे कारण नाही. शेतमजूर व शेतकरी यात शहरी माणसाला काही फरक कळत नाही. तो सहानूभूति द्यायचीच असेल तर समजून घ्यावा लागेल. आजच ही समस्या का उदभवली तर आजचा शेतकरी हा जुगारी बनला आहे. कांदा एके कांदा, तूरडाळ एके तूरडाळ, उस एके उस , कापूस एके कापूस असे करताना काही नैसर्गिक मर्यादा येत असतील तर ठीक आहे पण श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहायचे व अतिरिक्त उत्पादन झाले की हमी भाव मागत सुटायचे हे कसे चालेल. सरकारने खरे तर इतर उद्योगांच्या नियंत्रणात जितका सहभाग घ्यायचा त्यापेक्षा अन्न वस्त्र व निवारा यात थोडासाच जास्त भाग घ्यावा व त्याच तितकीच बरोबर बंधने घालावीत. बाकी या तीनही क्षेत्रातील उद्जोजकाना मुक्त व्यवसाय करू द्यावा व फक्त नैसर्गिक आपत्ती आली तरच मदत करावी. आपल्या भागात पुरेसे सिंचन नसेल तर दरवर्षी पाउस व सरकार यांच्या कृपेवर अबलंबून रहाण्यात शेती व्यवसायिकानाच धोका आहे. ज्याप्रमाणे उद्योजक साम्यवादी असलेल्या भागात कारखाने काढत नाहीत त्याप्रमाणे सिंचना अभावी कोरड्या भागात किती नेटाने व हट्टाने शेती व्यवसाय करायचा ... ? हे गंभीरपणे विचार करायची वेळ आली आहे. उद्या मंदीमुळे कापड उद्योग व गूहनिर्माण उद्योगही सरकारचीच म्हणजे समाजाची उठसूट मदत मागायला पुढे येतील त्यावेळी काय करायचे त्यांच्या साठी शेतकरी त्याग करायला तयार होतील ?
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sat, 06/03/2017 - 07:30 नवीन
सिंचनाचा प्रश्न इतका गंभीर का झालाय ? पाउस अजिबातच पडत नाही की पडलेले पाणी अडवले अन जिरवले जात नाही याचाही विचार व्हावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
म
मार्मिक गोडसे Sat, 06/03/2017 - 07:46 नवीन
सरकारने खरे तर इतर उद्योगांच्या नियंत्रणात जितका सहभाग घ्यायचा त्यापेक्षा अन्न वस्त्र व निवारा यात थोडासाच जास्त भाग घ्यावा व त्याच तितकीच बरोबर बंधने घालावीत हे काही समजलं नाही. ह्याबदल खुलासा केल्यास वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Sat, 06/03/2017 - 11:38 नवीन
अन्न वस्त्र निवारा, आरोग्य , वहातुक, शिक्षण , जल व उर्जा हे आठ अत्यंत महत्वाचे क्षेत्र माणूस सुखी होण्यासाठी आहेत. पुतळे, पर्यटन ,सिनेमे, खेळ, सौंदर्यस्पर्धा, संगीत महोत्सव. सणवार ,रोषणाई, पार्ट्या, सेलेब्रेशन, डान्सबार , गाणे बजावणे हे त्यात मोडत नाही.हे मान्य करण्यात काय अडचण आहे का ? सबब अनावश्यक गोष्टीना कडक नियंत्रण व लवचिक नसलेले धोरण लावता येउ शकेल पण जिथे जगण्याचाच प्रश्न येतो तिथे विशेषतः पाणी व अन्न यात पूर्ण स्वातंत्र्य समाजाला देऊन चालणार नाही. उदा. धरणातून पाणी किती सोडायचे हे लोकानी नाही ठरवायचे ते कसे व किती वापरायचे हे लोकानी ठरवायचे. तसेच अतिरिक्त व अपुरे अन्न निर्माण झाले तर सरकारने मर्यादित प्रमाणात आयात व निर्यातीच्या धोरणात भाग घ्यावा अन्यथा नाही. मग सरकारने अलवचिक धोरण कुठे अन्नाबाबत स्वीकारायचे तर काही नैसर्गिक आपत्ती आली तर शेतकर्याना मदतीचा हात ( करदात्यांचा विरोध डावलून )उदा. पुनः पेरेणीसाठी मोफत बियाणे व खत. तर काही कारणाने उत्पादन कमी होऊन शेतकरी व व्यापारी अवाच्या सवा भाव वाढवू लागले तर किंमत नियंत्रण असे काहीसे उपाय. ( बळीराजाचा विरोध डावलून ) .एक प्रकारचे सर्कीट ब्रेकर .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
द
दीपक११७७ Sat, 06/03/2017 - 08:35 नवीन
शेतक-यांनी संप मागे घेतला आहे
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Sat, 06/03/2017 - 08:37 नवीन
संपाचा आणि लवासा चा काही संबंध आहे का? व्हॉट्स अप आलं म्हणुन विचारलं
  • Log in or register to post comments
च
चिनार Sat, 06/03/2017 - 08:42 नवीन
माझे काही बालिश प्रश्न...(त्याचं काये की आम्ही एक तर जाणत्या राजाच्या गावचे नाही अन याउपर विदर्भाचे आहो त्यामुळे अकार्यक्षम, आळशी आणि शेतीच्या बाबतीत अज्ञानी हे शिक्के बसलेले आहेतच. आणि आम्ही ते मान्य करतो. म्हणून हे बालिश प्रश्न.) १. शेती आणि दूध विकणे हे वेगवेगळे व्यवसाय आहेत की एकचं? अर्थात एक शेतकरी ह्या दोन्ही गोष्टी करू शकतो हे मान्य आणि त्याला आक्षेप नाही. मी तर म्हणतो अजून दोन-तीन व्यवसाय करावे शक्य असेल तर २. जर वेगवेगळे व्यवसाय असतील तर, शेतीत नुकसान झाले म्हणजेच दुग्ध व्यवसायात नुकसान झाले असं असतं का? ४. जर वेगवेगळे व्यवसाय असतील तर, दुधाच्या उत्पन्नावर शेतकऱ्याला किती आणि कोणते कर द्यावे लागतात? ३. जर एकच व्यवसाय असेल तर, दुधाचे भाव वाढवायला हरकत नाही पण ते वाढलेले इन्कम शेतीच्या नुकसानाला काही अंशी तरी कॉम्पेन्सेट करणार नाही का? आता ह्याउपर कर्जमाफी मागणे कितपत योग्य आहे? ४. दूध आणि भाज्या-फळे रस्त्यावर फेकणारे खरे शेतकरी नाहीतच असे वरील काही प्रतिसादात म्हटले आहे. शिवाय जयंत कुलकर्णी यांना २० रु भावाने मेथी विकणारा पण खरा शेतकरी नाही असं म्हटलंय. मग नेमके खरे शेतकरी आहेत तरी कोण? आणि कुठे? आणि जर ते या संपात नाहीयेत मग संप कोण करतंय?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 06/03/2017 - 09:16 नवीन
शेती आणि दूध विकणे हे वेगवेगळे व्यवसाय आहेत की एकचं? शेतकरी जर दुग्धव्यवसाय करत असेल तर दुग्धव्यवसाय हा त्याचा जोडधंदा ठरतो. दुधाच्या उत्पन्नावर त्याला आयकर भरावा लागू शकतो.अर्थात त्याचे उत्पन्न कीती आहे ह्यावर आयकर लागू होईल. शेती उत्पन्न म्हणजे जे थेट जमिनीतून मिळवले जाते ते. शेतकर्‍याने चारा विकून मिळवलेले उत्पन्न आयकरमुक्त असते. परंतू दुग्धव्यवसायात तो हा चारा खर्चाच्या बाजुला दाखवू शकतो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/03/2017 - 09:52 नवीन
संप सुरुच आहे, चर्चा सुरुच ठेवा. आमच्या औरंगाबादच्या जयाजी नावाच्या संघटनेच्या अध्यक्षांनी मा. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन संप मागे घेत असल्याचे जाहीर केले होते पण आत्ताच टीव्ही ९ च्या मुलाखतीत त्यांना सदरील निर्णयाबद्दल पश्चाताप होत असल्याचे सांगितले. आता बाकी पक्ष संघटनेशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे ते म्हणाले. बाकी, माझी सरसकट कर्जमाफी आणि शेतकर्‍यांच्या काही अवाजवी मागणीला विरोध आहे, हे स्पष्ट सांगून थांबतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
न
निष्पक्ष सदस्य Sat, 06/03/2017 - 17:28 नवीन
शेती, ग्रामीण भाग,तसेच तेथील अडीअडचणी आणि जोड व्यवसाय इ. गोष्टींचा काडीचाही अभ्यास नसलेले स्वयंघोषित मिपातज्ञ तसेच इतर अभ्यासू(?) आयडींनी आपले दिव्य ज्ञान पाजळवले आहेच,तसेच शेवटी गाडी रूळावरून घसरून,ही मुख्यमंत्री हटाव मोहिम आहे इथपर्यंत आली आहेच,,,,त्यांच्या दिव्य निष्कर्षाला माझा सलाम_/\_ तसेच बहुतांश शेतकरी मराठा आहेत,या माहितीपूर्ण ज्ञानाला माझा साष्टांग दंडवत_/\_. अहो शेती व्यवसायामध्ये साळी,माळी,धनगर,कोष्टी,जैन,ब्राह्मण,लिंगायत,शिंपी,इ.सगळेच आहेत. असो.
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Sat, 06/03/2017 - 17:40 नवीन
बाकीच्यांचे सोडा हो निष्पक्ष (स्वयंघोषित) साहेब तुमची पाजळा पाजळी झाली असेल तर जरा मुद्द्याचे बोला म्हणजे आम्हाला पण समजेल तुमचा निष्पक्ष (स्वयंघोषित) दृष्टीकोन. बघा त्येव्हढ जमवाच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
न
निष्पक्ष सदस्य Sat, 06/03/2017 - 17:52 नवीन
संप सुरुच आहे, चर्चा सुरुच ठेवा. आमच्या औरंगाबादच्या जयाजी नावाच्या संघटनेच्या अध्यक्षांनी मा. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन संप मागे घेत असल्याचे जाहीर केले होते
बीजेपी माझा या चॅनेलनी घाई केली,संप मागे घेतला वगैरे वगैरे,,,
बाकीच्यांचे सोडा हो निष्पक्ष (स्वयंघोषित) साहेब तुमची पाजळा पाजळी झाली असेल तर जरा मुद्द्याचे बोला म्हणजे आम्हाला पण समजेल तुमचा निष्पक्ष (स्वयंघोषित) दृष्टीकोन. बघा त्येव्हढ जमवाच...
तो अभ्याचा एक प्रतिसाद पुरेसा आहे,,,बाकि मी गल्ली क्रिकेट खेळायचं बंद केलं आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमित भोकरकर Sat, 06/03/2017 - 19:39 नवीन
एक कळत नाही. जिथला शेतकरी संकटात आहे त्या मराठवाडा आणी विदर्भाच्या शेतकर्याना कोणी विचारत नाही. ज्या समस्या पुनतांब्याच्या शेतकर्याच्या आहेत. त्याच विदर्भाच्या आणी मराठवाड्याच्या कशा समजल्या जात आहेत?
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Sun, 06/04/2017 - 03:48 नवीन
काय ठरलं मग संपाचं?
सरकार कर्जमाफी करणारच नाही, अशाच भ्रमात अनेक जण होते. त्यामुळे मी हा निर्णय घेतल्यावर अनेकांना धक्काच बसला आणि पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार किंवा त्यांच्याशी सल्लामसलत न करता हा निर्णय घेतला असल्याचेही नमूद केले - मुख्यमंत्री
दुसरीकडे फेसबुकवर संपवाले अजून संप सुरूच वगैरे पोष्टी टाकतायेत. संप वाल्यांची एखादी वेबसाईट किंवा किमान ऑफिशियल फेसबुक पेज आहे का? त्यात सगळे अपडेट देता येतील आणि वेगवेगळ्या भागात काय होत आहे हे कळेल.
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Sun, 06/04/2017 - 19:16 नवीन
सगळे प्रतिसाद नाही वाचले. वाचवले नाहीत. बाकीच्यांचे जाऊ द्या. डॉ.सुबोध खरे यांचा प्रतिसाद वाचला आणि पुन्हा पुन्हा स्क्रीन पुसून, डोळे चोळून नाव वाचले. शंभर रूपयाने दूध परवडणार नाही. मला डॉक्टरांच्या संपाबाबतच्या त्यांच्या भूमिका मागे जाऊन वाचण्याइतका वेळही नाही आणि हौसही नाही. पण आपल्या उपचारांचे पैसे सरकारने ठरवावे या प्रस्तावाला ते पाठिंबा देतील का ? तुमचा उत्पादन खर्च किती का असेना. औषध कंपन्या याला राजी होतील का ? भाव वाढले की सरकारने चीनमधून औषधे आणून स्वस्तात औषधे उपलब्ध करायची. चीनमधून डॉक्टर्स आणून भाव पाडायचे. कशी वाटते आयडिया ? परदेशी पेशंटसना भारतबंदी करून भाव नियंत्रित ठेवायचे. तसेही शंभर टक्के जनता काही रोजच्या रोज आजारी नसते पडलेली हो. वेन वेळचे जेवायला मात्र लागतेच प्रत्येकाला. आम्ही जीव वाचवतो म्हणून आमचे भाव आम्ही ठरवायचे तर खायला घालून जीव नाही का घालत शेतकरी ? आणि जीवनावश्यक वस्तूंचा बडगा त्यांच्यावर उगारला जातो तर वैद्यकीय क्षेत्राला तोच नियम का नको ? नको असेल तर त्यांचे भाव त्यांना ठरवू देत ना. हार्ट सर्जरी आम्हाला परवडत नाही म्हणून भाव कमी करतात का ? आपल्या व्यवसायात दुस-याने केलेली मल्लिनाथी सुद्धा आपल्याला चालत नाही. मग आपण का दूधाच्या भावाबद्दल बोलायचेय ? ५० रु ने जरी भाव वाढले तरी १५०० रू जास्त होतात फक्त. एका पेशंटला हॉस्पिटलला रिकमंड केले की त्याच्या बिलात २०००० रु सहज लावता येतील की. किंवा गोळ्या औषधे प्रिस्क्राईब करायचे दर वाढवून घ्यायचे. १५०० रू कुठल्या कोप-यात बसतील. अगदी मेडिकल टेस्ट्स साठी लॅबला पाटवले तरी भाज्यांचा वाढीव खर्च निघेल. टेण्शन का घ्यावं ? आखरी रास्ता मधला डायलॉग आठवला बेटे, तुम जहा खडे हो वहासे तुम्हे ये छह दिख रहा होगा, लेकीन मुझे यहासे ये नौ दिख रहा है टीप : मी शेतकरी नाही. मी कर भरतो. मी फुकट्या नाही.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 06/04/2017 - 19:59 नवीन
मी शेतकरी नाही. मी कर भरतो. मी फुकट्या नाही. याची आवश्यकता नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
म
मोदक Sun, 06/04/2017 - 19:59 नवीन
मी शेतकरी नाही. मी कर भरतो. मी फुकट्या नाही. याची आवश्यकता नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट Mon, 06/05/2017 - 02:49 नवीन
असे म्हणता ? ब्वारं ! प्रतिसाद वाचले नाहीत सगळे. एकूण टोन पाहता हे शब्द आले असावेत असे वाटले. आणि नसते सांगितले तर शहरीद्वेषाचा आरोप झाला असता. (ब-याचशा प्रतिसादांची पण अजिबातच आवश्यकता नव्हती).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 06/05/2017 - 08:12 नवीन
ओके. शहरीद्वेषाचा आरोप टाळण्याच्या नादात शेतकर्‍याला फुकट्या म्हणालात म्हणून सुचवले इतकेच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
क
कुंदन Sun, 06/04/2017 - 21:59 नवीन
त्या शंभर मधला योग्य वाटा दुध उत्पादक शेतकर्‍या पर्यंत पोहोचेल याची काय हमी ? टीप : जाउ द्या. सगळेच इथे लिहिता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट Mon, 06/05/2017 - 02:47 नवीन
आज दूध ५३रू लिटरने घरात येतं. त्यातला वाटा शेतक-यापर्यंत जातो यासाठी आपण कधी सजग होतो ? ते जर त्याला मिळत असते तर ५० रु लिटरला भाव मिळावा यासाठी आंदोलन केलेच नसते. शिवाय शेतक-याने स्वतः येऊन दूध घातले तर ते ५३ रू. त्याला देताना आपण म्हणूच कि , मध्यस्थ नाहीत तर स्वस्तात दे म्हणून. म्हणजे जर मधल्या आडत्यांकडून, दलालांकडून शेतमाल २० रु. किलोने मिळाला तर आपण निमूट घेणार. पण विकणारा स्वतः शेतकरी आहे म्हटले की त्याला ५ रू. मिळतात म्हणून त्याने १५ रू. ने द्यावा अशी अपेक्षा धरणार. ते २० रु शेतक-यालाच मिळावेत ही अपेक्षा आपली नसते. आपण म्हणणार तुझ्याकडेही २० रू आणि तिकडेही २० रु. तर मी तिकडेच का घेऊ नको ? तो शेतमाल उत्पादन करून आता विक्रीसाठी पण आला आहे. तर वरचे १५ रू पण त्याला का मिळू नयेत हा आपला दृष्टीकोण नसतो. वर कुणीतरी स्पष्टच बोललेले आहे कि नाही तसे ? त्यामुळे या पैशातले शेतक-याला किती मिळतील ही आपली काळजी काही खरी दिसत नाही. कुठूनही कसाही मुद्दा समजावून सांगितला तरी आपण बौद्धीक हातचलाखी केल्यासारखा प्रकार आहे हा. नाहीतर आहेच शहरी द्वेष, अमूक द्वेष,तमूक द्वेष. शेतकरी द्वेष नावाचा शब्दप्रयोग मात्र इथे दिसत नाही. का बरे ? प्रतिसाद वाचले तर तसंच दिसतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
म
मोदक Mon, 06/05/2017 - 08:04 नवीन
तुमच्या मते आडते व दलाल हाच जर प्रॉब्लेम आहे तर शेतकर्‍यांनी त्यांच्याविरूद्ध संप करून किंवा आपापल्या भागातून पिढ्यापिढ्या एकाच घराण्यातून नेते निवडून देण्याऐवजी योग्य निर्णय घेणार्‍या नेत्यांना निवडून दिले असते तर आजची वेळ आली नसती असे म्हटले तर चुकीचे ठरेल का..? पिझ्झा खाणारे माजोरडे शहरी असंवेदनशील लोक आणि वर्षानुवर्षे शोषित असलेला गरीब बिचारा बळीराजा यांच्या लोकसंख्येचे गुणोत्तर काढले तर बळीराजाकडे एकगठ्ठा निवडणूक जिंकून देण्याची ताकत नक्कीच आहे. शेतकरी द्वेष नावाचा शब्दप्रयोग मात्र इथे दिसत नाही. का बरे ? प्रतिसाद वाचले तर तसंच दिसतेय. बरोबर आहे, इथे वादविवाद घालणार्‍यांचा रोख संपावर आणि शेतकर्‍यांच्या उरावर बसून राजकारण करणार्‍यांवर आहे, शेतकर्‍यांवर नाही. कारण पिझ्झा खात असले तरी त्यांची बुद्धी राजकारणी नेत्यांच्या दावणीला बांधलेली नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट Mon, 06/05/2017 - 10:11 नवीन
किती शब्दच्छल ? किती शब्दच्छल ? किती शब्दच्छल ? मुद्द्यावर कधी येणार ओ भाऊ ? तुम्हाला शेतकरी रात्रभर मोटर चालू ठेवून ऊसाला पाणी लावून आरामात झोपी जातात हे मान्य आहे, प्रत्येक शेतक-याकडे स्कॉर्पिओ, चेन, गॉगल असतो हे मान्य आहे, श्रीमंत होण्यासाठी तो वावरभर वेड्यासारखे पीक घेतो ( म्हणजे तो बेअक्कल आहे) हे सुद्धा मान्य आहे म्हटल्यावर शेतकरीद्वेष कुठून आला नाही का ? शिवाय त्याच्या शेतात आमची अवजारे का ? त्याच्या नुकसानीचं जाऊ द्या, त्याला फायदा झाल्यावर कर भरायला हवा नाहीतर तो फुकट्या हे सगळंच मान्य तर आहे तुम्हाला. तुम्हाला मान्य तर जगन्मान्य !! प्रश्नच मिटला. त्यामुळे त्याने पिझ्झाचे उदाहरण दिले की त्यात माज असतो हे पण तुम्हाला मान्य म्हणजे बरोबरच. आपला निकाल शिरसावंद्य !! इयत्ता तिसरीतून पुढे जायचे असल्यास कळवावे. सक्ती नाही. धन्यवाद आपुले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 06/05/2017 - 10:29 नवीन
कसे असते.. हवेत आरोप केले आणि गळे काढले की सहानुभुती मिळवायला सोपी जाते. स्वत:चे खिसे भरून मग "शोषण झाले हो..." अशी रडारड करणार्‍या ढोंगी लोकांपासून खर्‍याखुर्‍या गरजू बळीराजाची सुटका होईल तो सुदिन. बाकी तुमची इयत्ता आणि शाळाही कळाली. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट Mon, 06/05/2017 - 10:36 नवीन
माफ करा. चुकून तुम्हाला एकदम इयत्ता तिसरीत नेऊन ठेवले होते.... वाढदिवसाच्या शुभेच्छा >> हा पांचट विनोद आहे का ? :हाहा: चालू द्या तुमचे. नाव सार्थ जाहले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सुबोध खरे Mon, 06/05/2017 - 10:00 नवीन
खटासी खट साहेब तुम्ही माझा उल्लेख करून प्रतिसाद लिहिला आहे म्हणून हा त्याला जबाब आहे. अन्यथा अज्ञानातून आलेला प्रतिसाद म्हणून मी सोडून दिले होते. औषध कंपन्या याला राजी होतील का ? सर्वच्या सर्व जीवनावश्यक औषधे किंमत नियंत्रणाखाली आहेत. हे वर दिलेल्या प्रतिसादात आहेच. भाव वाढले की सरकारने चीनमधून औषधे आणून स्वस्तात औषधे उपलब्ध करायची. स्वस्तातील चिनी औषधे हवी तितकी उपलब्ध आहेत तुम्ही घेणार का? चीनमधून डॉक्टर्स आणून भाव पाडायचे. हि तर अतिशय उत्तम सूचना आहे. नाही तरी आपल्याकडे डॉक्टर्स ची कमतरता प्रचंड आहे.कशी वाटते आयडिया ? आणा चिनी डॉक्टर स्वस्तात आणि पाठवा प्रत्येक खेड्यात. काय म्हणता? परदेशी पेशंटसना भारतबंदी करून भाव नियंत्रित ठेवायचे. हा अज्ञानजन्य प्रतिसाद आहे. बहूमुल्य परकीय चलन मिळवण्यासाठी सरकार परदेशी रुग्णांना भारतात उपचारासाठी या म्हणून प्रोत्साहन देत असते दर वर्षी वीस हजार कोटी रुपये मिळवून देणारा व्यवसाय आहे हा. https://en.wikipedia.org/wiki/Medical_tourism_in_India सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मारण्याचा प्रकार आहे आपण सुचवलेला कारण अमेरिकेत ज्या शल्यक्रियेस ६५ लक्ष रुपये पडतात तीच शल्यक्रिया येथे ३-४ लाखात होते. तसेही शंभर टक्के जनता काही रोजच्या रोज आजारी नसते पडलेली हो. वेन वेळचे जेवायला मात्र लागतेच प्रत्येकाला. आम्ही जीव वाचवतो म्हणून आमचे भाव आम्ही ठरवायचे तर खायला घालून जीव नाही का घालत शेतकरी ? आणि जीवनावश्यक वस्तूंचा बडगा त्यांच्यावर उगारला जातो तर वैद्यकीय क्षेत्राला तोच नियम का नको ? नको असेल तर त्यांचे भाव त्यांना ठरवू देत ना. अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गोष्टीनंतर आरोग्य येते परंतु वैद्यकीय क्षेत्रा वर जितकी बंधने आहेत तितकी कुणावरच नाहीत हे मी पुराव्यानिशी सहज सिद्ध करु शकेन. हार्ट सर्जरी आम्हाला परवडत नाही म्हणून भाव कमी करतात का ? सरकारी रुग्णालयात हार्ट सर्जरी फुकट पासून ते सव्वा लाख रुपयात होतात. आपल्याला माहित नसावे. बाकी इतर सुद्धा सर्व सेवा सरकारी रुग्णालयात फुकट मिळतात पण सरकारी अन्न छत्र किंवा रेशनचे दुकान फुकट अन्नधान्य वाटत नाही. उद्या सरकारने शेती सुरु केली आणि गरिबांना फुकट अन्न वाटायला सुरुवात केली(अशक्य गोष्ट आहे तरीही केवळ आपण म्हणालात म्हणून तुलना केली आहे) तर शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मागे लाचार होऊन आहे यापेक्षा कमी भावात माल विकावा लागेल. आपल्या व्यवसायात दुस-याने केलेली मल्लिनाथी सुद्धा आपल्याला चालत नाही. अहो आम्हाला विचारतोय कोण? सगळे डॉक्टर चोर आणि हरामखोर आहेत हे गृहितकच आहे आजकाल. ते गृहीत धरूनच आजकाल नोकरी किंवा व्यवसाय करावा लागतो. मग आपण का दूधाच्या भावाबद्दल बोलायचेय ? ५० रु ने जरी भाव वाढले तरी १५०० रू जास्त होतात फक्त. एका पेशंटला हॉस्पिटलला रिकमंड केले की त्याच्या बिलात २०००० रु सहज लावता येतील की.( हास्यास्पद प्रतिसाद आहे). मी सुरुवातीलाच म्हणालो आहे कि दूध हि गरिबाला सुद्धा जीवनावश्यक गोष्ट आहे. ५० चा भाव १०० झाला तर बऱ्याचशा व्यावसायिकांना तो परवडेल परंतु १ % गरिबाला सुद्धा परवडणार नाही आणि मग सर्वत्र पिठात पाणी मिसळून दूध म्हणून प्यावे लागणारे अश्वत्थमे दिसू लागतील किंवा गोळ्या औषधे प्रिस्क्राईब करायचे दर वाढवून घ्यायचे. १५०० रू कुठल्या कोप-यात बसतील. अगदी मेडिकल टेस्ट्स साठी लॅबला पाटवले तरी भाज्यांचा वाढीव खर्च निघेल. टेण्शन का घ्यावं ? ( आम्ही कुठे टेन्शन घेतोय?)कुळकायद्यात जमीन गेल्यावर शेती सोडून १८ व्य वर्षी नेसत्या वस्त्रानिशी मुंबईत येऊन नोकरी करणाऱ्या आमच्या बापाने आम्हाला दोन वेळेस जेवायला मिळेल एवढे शिकवले आहेच. केवळ द्वेष मूलक आणि अज्ञानजन्य असाच हा प्रतिसाद आहे एवढेच मी म्हणेन त्वेषाने लिहिले असले तरी वस्तुस्थितीशी फारकत नसावी अन्यथा गोष्टी हास्यास्पद होतात टीप : मी शेतकरी आहे( कागदोपत्री असलो तरीही). मी संपूर्ण कर भरतो. मी फुकट्या नाही( पण फुकट्या व्हायला आवडेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट Mon, 06/05/2017 - 10:44 नवीन
आपण शब्दश: वर्ड टू वर्ड प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा होती. आपण अजिबात अपेक्षाभंग केलेला नाही. सुखी रहावे ही अपेक्षा. बाकी सगळे डॉक्टर चोर दरोडेखोर आहे हे सांगतानाची वेदना जाणवली. शक्य झाले तर शेतक-याबदद्लची अज्ञानमूलक गृहीतके आपण का मांडावीत याबद्दलचा एखादा प्रकाशिकरण प्रतिसादात डोकावलाच तर फार फार बरे होईल. पेशंट आयातबंदीमुळे सरकारचे नुकसान होणार आणि डॉक्टरला काहीच फायदा होणार नाही ही नवी माहिती मिळाली. असे पेशंट्स आल्याने देशातले दर वाढत नाहीत ही नवी माहिती मिळाली. म्हणजेच बाहेर दर चढे असताना शेतीमाल बाहेरच्या देशात विकला तर शेतक-याचाही या लॉजिकने काही फायदा नाही हे आपल्या लॉजिकने कळाले. बाकी चालू द्या. कधी आला इकडे आमच्या नसलेल्य़ा शेतात तर हुर्डापार्टी करू. आणखी काय सांगणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
द
दीपक११७७ Tue, 06/06/2017 - 08:08 नवीन
शेतीमाल बाहेरच्या देशात विकला तर
शेती माल आज ही बाहेरच्या देशात विकला जातो. पण कोणाचा हे महत्वाचे आहे? याचं उत्तरं आहे जे सत्ता केंद्राच्या जवळ आहेत पण शेतकरी नेते म्हणुन मिरवतात त्यांचा, काही जिवन आवश्यक वस्तु अरासायनीक शेतीतील माल म्हणुन सुध्दा विकतात. मरतो तो गरीब शेतकरी फक्त. श्रीमंत शेतकरी मजा मारतो सेटींग लावुन. म्हणजे बघा विक्रमी कांदा झाला आता निर्यात बंदी उठवा म्हणुन बोंब ठोकायच्या आधी आडत्या मार्फत सर्व फिल्डींग लावायची. लोकान मध्ये बंदी उठेल की नाही ही शंका निर्मान करायची मग हळुच बंदी उठवायची तो पर्यंत लहान शेतकरी कमी भावात माल विकुन मोकळा झालेला असतो ई ई............ मग पुन्हा बोंब ठोकने सुरु.... मला तर आठवतं एका मंत्र्याने गव्हाचा कसा तुटवडा होणार आहे हे पत्रकारांना संगितल्यावर ताबडतोब गव्हाचे भाव वाढले पण फायदा शेतक-याला नाही झाला, नेहमी असेच होते. शेतक-याने माल विकला की भाव वाढतात. लोकांना वाटतं आपण किती महाग वस्तु-माल घेतो. शेतकरी नेताच अडत व्यापारी नाहीना असा प्रश्न मनात येतो? जाणकार काय ते सांगु शकतील. शेवटी असे वाटते लहान शेतक-यांनी आपण योग्य नेता निवडला आहे का? हे जरा तपासुन पहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ए
एकुलता एक डॉन Mon, 06/05/2017 - 01:10 नवीन
शेतकऱ्यांच्या संपाचा उद्रेक सुरू असताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मात्र गायब आहेत. स्वतःच्या मतदारसंघात सरकारविरोधी आंदोलनाचा भडका उडालेला असताना विखे पाटील कुठेच नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. लाखांचा पोशिंदा शेतकरी राजा निर्वाणीवर आलाय. तो कालपासून संपावर आहे. ज्या पुणतांब्यात या शेतकरी संपाची पहिली ठिणगी पडली त्या पुणतांब्याचे आमदार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मात्र गायब आहेत. शेतकऱ्यांनी जेव्हा संपाची हाक दिली तेव्हा विखे पाटलांनी एका गटाला घेऊन मुंबई गाठली. तिथं वर्षावर शेतकऱ्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण संपकरी शेतकऱ्यांमध्ये विखे पाटील फूट पाडत असल्याचा आरोप झाला. http://www.ibnlokmat.tv/special-story/special-report-on-radhakrushan-vikhe-patil-and-maharashtra-farmers-strike-262094.html VIDEO : राधाकृष्ण विखे-पाटील भाजपचे पपेट - मोठ्या भावाचा आरोप http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=18772508 फडणवीस व विखे यांनी मिळून शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडली, असा आरोप किसान क्रांती आंदोलनाने केला आहे. हा आरोप एकदमच दुर्लक्षितता येत नाही. http://www.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=18879568
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा