Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेतकर्‍यांचा संप

म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 06/01/2017 - 13:53
🗣 349 प्रतिसाद
आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी काय आहेत संपावर जाणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या ? १) शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा. २) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी. ३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा. ४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा. ५) शेतकर्‍यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. ६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा. ७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा. ८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे. का केल्या शेतकर्‍यांनी ह्या मागण्या? शेतकरी सरकारकडे ह्या मागण्या अनेक वर्षांपासून करीत आहे. राज्यातील पूर्वीच्या सरकारने एखादवेळी कृषीकर्ज , कृषीवीजबील माफ करून वेळ मारून नेली होती. परंतू शेतकर्‍यांच्या शेतीमाल संबंधीत समस्या न सोडवल्यामुळे शेतकर्‍याची आर्थिक बाजू कायम कमकुवत राहीली. मग आताच का उचल खाल्ली ह्या मागण्यांनी? राज्याच्या सत्तारुढ महायुतीतील सर्व घटक पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यमान पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या भाषणात शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५०% अधिक भाव देण्याचे आश्वासान दिले होते. शेतकर्‍यांनी त्यावर विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. सत्तेत येउन बराच काळ लोटला परंतू ना केन्द्र सरकारने ना राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावनी केली. शेवटी हताश झालेल्या शेतकर्‍यांना सरकारला आठवण करुन देण्यासाठी संपाचे हत्यार उगारावे लागले. सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघत आहे का? दररोज शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असताना राज्यसरकार ढिम्म आहे. राज्यातील शेतकरी संपावर जाणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्रांनी शेतकर्‍यांशी बोलणी केली नाही. 'ह्या संपाचा काहीही परिणाम होणार नाही, आम्ही माल बाहेरुन मागवू', अशी बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षातील काही जण करू लागले आहेत. त्यातच खरिबाचा हंगाम सुरू झाला तरी शेतकर्‍यांना पिककर्ज मिळालेले नाही. सगळीकडून शेतकर्‍यांन्ची कोंडी केली आहे. शेतकर्‍यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे का? अल्पदरात पिककर्ज, शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी अखंडीत वीजपुरवठा आणि ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान , ह्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे. संप यशस्वी होईल की नाही ह्यापेक्षा शेतकर्‍याने एकजूट दाखवून आपली ताकद दाखवली आहे हे महत्वाचे. हा संप यशस्वी होण्यासाठी आपल्यासारख्या शहरवासीयांनीही ह्या संपाला पाठींबा द्यायला हवा. सरकारने शेतमाल बाहेरुन आणल्यास त्यावर बहिष्कार टाका. जमल्यास सोशल मिडियातून अधिकाधीक लोकांपर्यंत शेतकर्‍याची समस्या पोहचवा व ह्या संपाला पाठींबा देण्याचे आवाहन करा.

प्रतिक्रिया द्या
73407 वाचन

💬 प्रतिसाद (349)
ख
खटासि खट Mon, 06/05/2017 - 03:08 नवीन
कोअर कमिटीचे सर्वात सिनिअर सदस्य उत्तमराव पाटील यांना सोलापूरला सायं. ७ वा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर असाल तसे निघून या असा मा. खोत यांचा निरोप आला. सोलापूर मुंबई अंतर पाहता त्यांनी बैठक पुढे ढकलण्याची विनंती केली. पण खोतसाहेब ऐकत नव्हते. पाटील ७.३० वा, निघाले. पुण्यात साडेदहाच्या दरम्यान पोहोचल्यानंतर त्यांनी अपडेट केलं. पण एक्स्प्रेस हायवेला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुख्यमंत्र्यांनी बोलावले आहे असे सांगूनही त्यांना देहूरोड पोलीस चौकीत डांबून ठेवले. दरम्यान त्यांनी सदाभाऊ खोत आणि जयाजी यांना फोन लावले असता त्यांनी ते उचलले नाहीत. बैठक संपल्यानंतर पाटील यांना सोडून देण्यात आले. दुसरे एक सदस्य प्रा. नवले यांना खोतभाऊंनी त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यांनी ते फेटाळले. इतरांनाही तिकडे जाऊ नये म्हणून फोनवरून सांगितले. पण जयाजी आणि संदीप गिड्डे यांनी इतर सदस्यांना तिकडे नेले. तिथेच सगळे ठरले. बैठक उपचारासाठी पार पडली. प्रा. नवले या अटी मान्य नको करायला असे सांगत होते. पण जयाजी आणि गिड्डे ऐकण्याच्या मूडमधे नव्हते. चार वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती. नवले म्हणाले आपण पुनतांब्याला जाऊ. ग्रामस्थांशी चर्चा करू आणि नंतर आपला निर्णय जाहीर करू. यावर जयाजी म्हणाले की आपण जर निर्णय जाहीर नाही केला तर मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील आणि मग श्रेय त्यांना मिळेल. यानंतर नवले निषेध करत बाहेर पडले. विविध वाहीन्यांवरून जयाजी यांच्या उपस्थितीत पाटील आणि नवले यांनी हे आरोप केले आहेत. जयाजी यांना ते मान्य आहेत. त्यांनी संप मागे घेण्याचे पाऊल रद्द करण्याविषयी सुचवले आहे. मला माफ करा असे ते म्हणत आहेत. दरम्यान जयाजी यांचे संघ स्वयंसेवकाच्या वेषातील एक छायाचित्र (पुण्याच्या कार्यक्रमातील) सर्वत्र व्हायरल झालेले आहे. संदीप गिड्डे हे कराडचे आहेत, ते पुणतांब्याला कसे पोहोचले यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कोल्हापूर येथे एका बैठकीत ते माधव भंडारी यांचे कार्यकर्ते आहेत असे उघड झाले असल्याने त्यांना हाकलून देण्यात आले होते. तशा प्रकारच्या बातम्या छापून आलेल्या होत्या. या दोघांनीच बैठकीत सर्व अटी मान्य केल्या. महाराष्ट्र १ या वाहिनीवर ही माहिती स्पष्ट झाली. इतरही एका वाहीनीवर ही माहिती उघड झालेली आहे. त्यामुळे संप चालूच आहे. जास्त चिघळला आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला बरोबर न घेतल्याने ही वेळ आली असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. झी आणि एबीपी माझा या जवळपास सरकारी वाहीन्या आहेत ही भावना सर्वत्र आहे. संपाचे दुष्परिणाम जाणवणार असल्याने अनुल्लेख झालेला नाही. नाहीतर आतापर्यंत या वाहीन्यांवरून पाकिस्तान किंवा चीनमधे खोलवर आतपर्यंत सैन्य घुसवले गेले असते. इथेच थांबतो. भेटूयात पुन्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ख
खटासि खट Mon, 06/05/2017 - 04:19 नवीन
आपला तो बाब्या तसं या आंदोलनाकडे पाहीले जातेय. जनलोकपाल आंदोलनादरम्यान हिंसक भाषेचा प्रयोग झाला होता. लोकप्रतिनिधींना अडवून फटके द्या असे जाहीररित्या सांगितले गेले होते. त्याचा निषेध झाल्याचे आठवत नाही. अनेक जणांना त्या दरम्यान वीरश्री चढली होती हे स्मरते. हे आंदोलन जनतेचे आंदोलन नाही असे म्हणणारे राष्ट्रद्रोही ठरत होते. अण्णांना विरोध हा देशद्रोह होता. अण्णांचे आणि केजरीवालांचे वाजले आणि अण्णा अज्ञातवासात गेले हे ही आठवणीत आहे. आज मोदीभक्त म्हणून वावरणारे त्या वेळी एकदिलाने आंदोलनात होते. ते आंदोलन काँग्रेसविरोधात होते असे म्हटले तर ? ( हा फोलपणा आहे ). दूध फेकून दिले म्हणून तळतळाट करताना संपाचा आमच्यावर परिणाम होत नाही असेही म्हणताना दिसतात. विरोधाभास नाही का ? त्यांचे दूध आहे ते काहीही करतील. तुम्ही पिकवा ना भाजीपाला. तुम्ही तुमच्यापुरते दूध काढा. नाही कोण म्हणतेय ? मला शेतक-यांची बाजू पूर्णपणे पटलेली आहे. भाव पडल्यावर उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही म्हणून शेतात भाजीपाला सडतो तेव्हां कुणाकुणाला दु:ख झाले ? भाव पडले की आपण उदासीन. तेव्हां ज्याच्याकडून हा माल आला आहे ति किती श्रीमंत झाला हा विचार का येत नाही मनात ? आपण नेमके कुठल्या ग्रहावर राहतो ? मोदक यांनी आवश्यकता नाही असे एका ठिकाणी म्हटले आहे. पण फुकटेपणाचा उल्लेख इथेही झालाच अहे तर प्रकाश झावरे पाटील या सीएंची प्रतिक्रिया इथे चिकटवतो.
हा संप केवळ फडणवीस या इसमाविरुद्ध आहे अशी समजूत करून घेऊन समाजातील एक घटक शेतकऱ्याच्या संपाला विरोध करीत आहे. त्यांना एवढंच सांगणं आहे की फडणवीस असो की कुणीही... हा लढा सरकारच्या धोरणाविरुद्ध आहे. मुख्यमंत्री पाटील किंवा दानवे असता तरी असाच संप झाला असता... महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी या जाती बघून नेतृत्व मानणाऱ्या नाहीत रे राजेहो... शरद जोशी त्यांची परदेशातील लठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्वतः ची इंचभर जमीन नसताना उन्हात उभे राहिले.... केवळ अभ्यासाच्या जोरावर बघता बघता उभ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते झाले... शरद जोशी हे "जोशी" असूनही महाराष्ट्रातील शेतकऱ्याने त्यांना काय उपाधी दिली होती माहीत आहे का? ... "शेतकऱ्यांचे पंचप्राण"!! ऐंशी च्या दशकात त्यांच्या एका निरोपावर घरातून भाकरी बांधून घेऊन लाखोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरायचे... राजू शेट्टी ला एक एक रुपया वर्गणी देऊन निवडून देताना जात बघितली नाही शेतकऱ्यांनी... तर एक विनम्र आवाहन आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न आणि व्यथा पटत असतील तर केवळ फडणवीस विरोधी आहे असा समज करून संपावर टीका करू नका... बरोबर आलात तर संपाला अजून बळ येईल आणि शेतकऱ्यांना होईल तेवढाच फायदा तुमच्या सारख्या ग्राहकांना पण होईल अशाच मागण्या आहेत... विचार करून बघा...आपल्यासारखीच माणसं आहेत संपात
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 06/05/2017 - 08:20 नवीन
ते आंदोलन काँग्रेसविरोधात होते असे म्हटले तर ? ( हा फोलपणा आहे ). जनलोकपाल आंदोलन हे काँग्रेसविरोधातच होत. तत्कालीन सरकार निर्णय घेत नाही म्हणून आंदोलन झाले होते. असा माझा समज आहे. चुकीचे असल्यास जरूर प्रतिसादावे. माझ्यामते जे संपाला विरोध करत आहेत ते शेतकर्‍यांना विरोध करत नसून अवास्तव मागण्यांना विरोध करत आहेत याचमुळे तुमचे सर्वांनी बरोबर येण्याचे आवाहन सरसकट कोणीच मान्य करणार नाही - आणि जे बरोबर नाहीत ते शेतकरीविरोधी आहेत अशी सोयीस्कर विभागणी झालेली आहेच. बाकी इतरांचे विचार इथे आणून चिकटवत असलात तर त्याच्याशी तुम्ही १००% सहमत आहात असा अर्थ निघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट Mon, 06/05/2017 - 04:21 नवीन
शेतकरी कर भरत नाही??? दरडोई करमुक्त उत्पन्न तीन लाख रुपये आहे. सर्व खर्च जाऊन व्यवसायात तीन लाख रुपये राहिले तर कर भरायचा असतो. शेतकऱ्याच्या घरातली कमीत कमी चार पाच माणस शेतात काम करतात. म्हणजे त्या कुटुंबाचे निव्वळ उत्पन्न वर्षाला दहा बारा लाखाच्या वर गेले तर कर बसेल... किती असतं माहीत आहे का? प्राप्तिकर कायद्याच्या नियमाप्रमाणे एकदा व्यवसायात तोटा झाला की आठ वर्षे पुढे नेता येतो. म्हणजे तो तोटा संपेपर्यंत पुढच्या वर्षात फायदा जरी झाला तरी कर भरायचा नसतो. शेतकऱ्याला आयुष्यात सलग किती सीझन ला फायदा होतो? आणि किती सिझन ला तोटा? माहीत आहे का? आपल्याच शेतजमिनीवर उत्पादन घेत राहण्याचा घसारा आणि घरातल्या माणसांचा चोवीस तास बाय मरेपर्यंत पगार मोजला तर कोटी रुपये मिळाले तरी तोटा दिसलं...आत्ताच्या प्राप्तिकर नियमाप्रमाणे... बाकी सगळे कर व्हॅट, एकसाईज, पट्ट्या शेतकरी भरतोच आणि कुणाला माहीत नसलेला ऊस खरेदी कर पण साखर कारखाने भरतात.. कोण कुठं चोऱ्या करतो आणि कशा करतो हे आम्हाला माहीत नाही का? बापाला कर कायदा शिकवता का?
प्रसाद झावरे पाटील , सीए
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Mon, 06/05/2017 - 10:29 नवीन
// दरडोई करमुक्त उत्पन्न तीन लाख रुपये आहे. सर्व खर्च जाऊन व्यवसायात तीन लाख रुपये राहिले तर कर भरायचा असतो. शेतकऱ्याच्या घरातली कमीत कमी चार पाच माणसं शेतात काम करतात. म्हणजे त्या कुटुंबाचे निव्वळ उत्पन्न वर्षाला दहा बारा लाखाच्या वर गेले तर कर बसेल.../// हे जरा त्या सिएंना विचारुन समजावून सांगता का? यात प्रत्येक माणसाला ३ लाखाची सूट आहे म्हणजे त्या शेतीच्या उत्पन्नातून ४ गुणिले ३ = १२ लाख असे एक्झंप्शन) अशी सूट मिळते का ? मा. श्री. झावरे बापाला .... अशी भाषा वापरतात का? धन्य आहे. म्हणजे समजा एका कारखान्याचे १०० शेअर होल्डर आहेत तर त्या कारखान्याचे करमुक्त उत्पन्न हे १०० गुणिले ३ लाख एवढे राहील का? (त्यांचे इतर कुठलेही उत्पन्न नाही हे गृहीत धरले आहे.) खरंच समजले नाही म्हणून विचारले आहे. कदाचित संक्षी सांगू शकतील. बाकीच्या कराबद्द्ल लिहावे लागेल. त्या अगोदर विजेच्या बिलाची थकबाकी शेतकर्‍यांकडे किती आहे हा आकडा पाहिलात तर बरं होईल. आणि त्यांनी विचारलेल्या फालतू प्रश्नांची उत्तरे कर बसविल्याशिवाय मिळणार नाहीत. तो बसवला तर सगळा डाटाबेस तयार होईल. शेतकरी ज्या अडचणींतून जात आहेत त्या अडचणींतून थोड्याफार फरकाने सगळेच जण केव्हा ना केव्हातरी जात असतात. त्यामुळे आता कोणालाच कोणाविषयी सहानुभूती वाटेनाशी झाली आहे... हे लक्षात घेऊन सगळ्यांनीच रडगाणे थांबविण्याची आता वेळ आली आहे. शेतकर्‍यांना जर शेतीमालावरील बंधने उठवायची असतील तर प्रथम आधार भाव काढून जरूर प्रयोग करावा व इतरही बंधने काढून टाकावीत. पण मग त्यावेळी त्यांना आंतरराष्ट्रीय मालाबरोबर स्पर्धा करावी लागेल. त्या संकटात कोणी शेतकर्‍याला लोटू नये असे मला वाटते.... शिवाय या सगळ्यात गरीब शेतकरी मरेल हे निश्चित आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट Mon, 06/05/2017 - 11:03 नवीन
अहो साहेब जरा मोठ्या उद्योगांना झालेली करमाफी, राईट ऑफ, त्यांनी केलेली वीजचोरी याचीही माहिती घ्या. अभ्यास वाढवा. कधी टाटाच्या गाड्यांचे भाव उत्पादनखर्चापेक्षा कमी जाऊन वाहतुकीचाही खर्च निघत नाही असे ऐकले आहे का ? अजूनही तुम्ही नाही त्या मुद्यावर फिरत आहात. शेतक-याचे काय दुखणे आहे हे जेव्हां समजेल तेव्हां बोलू. त्याला वेड लागले आहे म्हणून तो संप करतो अशा निष्कर्षाप्रत तुम्ही आलात तरी मला काय किंवा शेतक-याला काय काही एक फरक पडत नाही. बाकी तुमचे टेक्नीकल मुद्दे जाऊन झावरे पाटलांनाच विचारा. मी काही करविषयक हुषार माणूस नाही. ढ च आहे. पण झावरे पाटलांनी दिलेलं उदाहरण आणि तुम्ही भरकटलेले दिलेले उदाहरण याचा ताळमेळ तुम्हीच त्यांना नीट सांगू शकाल. माझ्या आवाक्यात नाही ते. अ म्हटले की ज्ञ म्हणायचे अशा प्रतिसादांना उत्तर देण्याचा उत्साह माझ्याकडे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ज
जयंत कुलकर्णी Mon, 06/05/2017 - 13:28 नवीन
आपल्या प्रचंड अभ्यासाबद्दल आम्हाला नितांत आदर आहेच. आम्हीही वाढवायचा प्रयत्न करूच. तुम्हाला काही फरक पडत नाही मग इथे कशाला वेळ वाया घालवताय. मला वाटले तुम्ही चर्चेचा एक भाग म्हणून झावरे का चावरे पाटलांचा लेख टाकलाय. तसे नसेल तर सोडा.... // कधी टाटाच्या गाड्यांचे भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी जाऊन वाहतुकीचा खर्च निघत नाही असे ऐकले आहे का///// तुम्हाला काय म्हणावे हेच कळत नाही. असे काही वर्षापूर्वी झाले होते आणि इंडिका बंद करायची वेळ आली होती. माहीत नसेल तर कशाला उदाहरणे देताय फुकाफुकी... आख्खी प्रिमियर बंद पडली....आता जनरल मोटर्स उत्पादन थांबवणार आहेत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
अ
अप्पा जोगळेकर Mon, 06/05/2017 - 13:34 नवीन
काका, काही नविन शोध तुम्हाला माहीती नाहीत असे दिसते. १. शहरात फक्त श्रीमंत माणसे राहतात. २. उद्योगधंदे उभे करणे अतिशय सोपे आहे. उद्योगधंदे फक्त नफ्यात चालतात. ३. सगळे उद्योजक कर्ज बुडवतात. ४. पिझ्झा खाणारा भांडवलदारांचा हस्तक असतो. ५. तुम्ही शेती करत नसाल तर शेतीबद्दल काही बोलायचे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
व
विशुमित Mon, 06/05/2017 - 19:21 नवीन
उद्योगधंदे उभे करणे अतिशय सोपे आहे. उद्योगधंदे फक्त नफ्यात चालतात. ==>> अन्न प्रक्रिया दुग्ध प्रक्रिया उद्योग , भुकटी आणि सप्लाय चेन उभी करणे अतिशय सोपे आहे. आणि ते पण फक्त नफ्यात चालतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
ख
खटासि खट Mon, 06/05/2017 - 04:23 नवीन
सर्वाना माहीत असावेत असे अत्यंत महत्वाचे मुद्दे...... मित्र Sachin Atkare यांच्या भिंतीवरून... १. केंद्र सरकारला देशातल्या ३५-३६ राज्याकडून एकूण जेवढं कर उत्पन्न मिळत -त्यातील ५० टक्क्यापेक्षा जास्त कर देशातील फक्त ४ राज्ये देतात. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक. म्हणजे ४ राज्ये ५० टक्के कर देतात आणि उरलेली ३० राज्ये ५० टक्के. तफावत प्रचंड आहे. २. पंतप्रधान जेव्हा डिजिटल इंडिया चे उद्घाटन करत होते तेव्हा दिल्लीत तामिळनाडूतले शेतकरी तिथल्या दुष्काळाकडे मोदीजींचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन करत होते. आत्महत्या केलेल्या आपल्या सहकारी शेतकऱयांच्या कवट्या त्यांच्या हातात होत्या. ते स्वतः:च मूत्र प्राशन करत होते. मेलेले उंदीर त्यांनी तोंडात धरले होते.... ३. मोदिजीनी या आंदोलनाकडे सपशेल दुर्लक्ष केलं. त्याचवेळी उत्तर प्रदेश जिथले शेतकरी अजिबात कर्जमाफीसाठी कोणतंही आंदोलन करत नव्हते त्यांना मात्र योगी आणि मोदी सरकारने कर्जमाफी दिली. ४. उत्तर प्रदेश सरकार ऑलरेडी ५० हजार कोटी रुपये तोट्यात आहे. कर्जमाफी द्यायला त्यांना लागणार होते ३६ हजार कोटी. तेव्हा केंद्राने त्यांना मदत केली आणि तिथल्या दीड कोटी शेतकऱ्यांची ३६ हजार कोटी रुपयांची शेतीकर्जे माफ केली. त्यासाठी त्यांना कोणताही संघर्ष करावा लागला नाही. ५ . सगळ्या राज्यांकडून जमा झालेल्या १०० टक्के करापैकी 42 टक्के कर केंद्र सरकार- राज्यांना परत वाटप करते. पण हे वाटप खूप अन्यायी असतं. म्हणजे ज्याने जास्त कर भरला त्याला कमी पैशे देणार आणि ज्याने कमी कर भरला त्याला जास्त... (चिखलाच्या रस्त्यावर फेरारी चालवण्यासारख असतं हे. तुम्ही देशापेक्षा श्रीमंत झाला कि अशी बक्षिसे तुम्हाला मिळतात आणि घोडा लागतो......) ६. आता -- हे सांगायला अभिमान वाटतो कि एकटा माझा महाराष्ट्र या देशाला २५ टक्के कर उत्पन्न मिळवून देतो. ७. पण त्याबदल्यात महाराष्ट्राला काय मिळतं? एखादा बिहारी नागरिक जेव्हा केंद्राला १०० रुपये देतो, तेव्हा त्या प्रत्येक १०० रुपयाच्या बदल्यात त्याला ४२० रुपये परत मिळतात. उत्तर प्रदेशला १०० दिले कि - २०० रुपये. महाराष्ट्राच्या नागरिकाला हाच परतावा मिळतो फक्त १५ रुपये... म्हणजे उत्तर प्रदेशाचं कर्ज माफ एकटुअल्ली आणि इन्डायरेकटली महाराष्ट्राच्या जनतेनं केलंय,, तुम्ही मी केलंय...... इथले आपले शेतकरी मरत असताना...!!! /// आता महत्वाचा मुदा हा कि इतकी वर्ष महाराष्ट्र केंद्र सरकारच्या तिजोरीत एवढी भरभरून रक्कम देत आला... हो इथला शेतकरी सुद्धा भरपूर कर देतो... कसा ते अतिशय छान पद्धतीने आमचे मित्र Prasad Prakash Zaware (CA) यांनी त्यांच्या या लेखात सांगितले आहे (लिंक पहिल्या कमेन्ट मध्ये.) मग आता जर एवढा कर भरून आज माझ्या राज्यातलाच शेतकरी मरत असताना त्याला --केंद्र आणि राज्य सरकारने इथल्या शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या सर्व पिकांना -भाज्यांना "हमीभाव" देऊन आधार का देऊ नये??? हा सगळा घाणेरडा प्रकार म्हणजे डोक्याला मुंग्या आणणारा आणि रक्त उसळायवायला लावणारा अन्याय नाही काय ?? (Ref : लोकसत्ता ४/६/१७) आणि सर्वात महत्त्वाचे: GST आल्यावर याच चार उत्पादक राज्यांना (महाराष्ट, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात) सर्वात जास्त तोटा होणार आहे.
- प्रसाद झावरे पाटील , सीए
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 06/05/2017 - 10:19 नवीन
केंद्र सरकारला देशातल्या ३५-३६ राज्याकडून एकूण जेवढं कर उत्पन्न मिळत -त्यातील ५० टक्क्यापेक्षा जास्त कर देशातील फक्त ४ राज्ये देतात. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक.
हे आकडे खरे आहेत हे गृहित धरले तरी त्यात एक खोट आहे. मुंबईत (म्हणजेच महाराष्ट्रात) जवळपास सर्व मोठ्या कंपन्यांची मुख्यालये आहेत. अगदी ब्रिटिश काळापासूनच मुंबई हे नैसर्गिक बंदर असल्यामुळे रस्ते, रेल्वे इत्यादींचा विकास केला गेला याचा फायदा मुंबईला मिळालाच. कलकत्त्यालाही सुरवातीला असाच फायदा मिळाला होता पण स्वातंत्र्यानंतर दिर्घ काळ बंगालमध्ये अगदी गुडघ्यातले राज्यकर्ते होते आणि अजूनही आहेत. नशीबाने महाराष्ट्रात तसे झाले नाही त्यामुळे महाराष्ट्र बंगालपेक्षा बराच पुढे गेला. असो. तर सांगायचा मुद्दा म्हणजे बर्‍याचशा कंपन्यांनी मुख्यालये मुंबईत असल्यामुळे कॉर्पोरेट टॅक्स मुंबईत (म्हणजे महाराष्ट्रातून) भरला गेला आणि त्यामुळे महाराष्ट्राचा करात वाटा मोठा दिसत आहे असे होत नाही का? आणि तसे असेल तर त्याचा अर्थ महाराष्ट्रात इकॉनॉमिक अ‍ॅक्टिव्हिटी इतर राज्यांपेक्षा त्याच प्रमाणात जास्त चालते असे नाही. बी.पी.सी.एल, एच.पी.सी.एल ची मुख्यालये मुंबईत आहेत पण त्या कंपन्या पेट्रोल-डिझेल पूर्ण देशात विकतात. या कंपन्या कर नक्की कुठे भरतात याविषयी कोणाला माहिती आहे का? माझ्या माहितीप्रमाणे कॉर्पोरेट टॅक्स मुंबईतून (मुख्यालयाच्या ठिकाणाहून) भरला जाईल. ही माहिती चुकीची असल्यास ती सुधारावी ही विनंती.
पंतप्रधान जेव्हा डिजिटल इंडिया चे उद्घाटन करत होते तेव्हा दिल्लीत तामिळनाडूतले शेतकरी तिथल्या दुष्काळाकडे मोदीजींचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन करत होते. आत्महत्या केलेल्या आपल्या सहकारी शेतकऱयांच्या कवट्या त्यांच्या हातात होत्या. ते स्वतः:च मूत्र प्राशन करत होते. मेलेले उंदीर त्यांनी तोंडात धरले होते.... ३. मोदिजीनी या आंदोलनाकडे सपशेल दुर्लक्ष केलं. त्याचवेळी उत्तर प्रदेश जिथले शेतकरी अजिबात कर्जमाफीसाठी कोणतंही आंदोलन करत नव्हते त्यांना मात्र योगी आणि मोदी सरकारने कर्जमाफी दिली.
मोदींनी या आंदोलनाकडे सपशेल दुर्लक्ष केले याचे कारण त्या आंदोलनात शेतकर्‍यांच्या नावावर वेगळेच लोक आले होते हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. बाकी उत्तर प्रदेशात १ लाखापर्यंतची कर्जमाफी का दिली हा प्रश्न मलाही आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट Mon, 06/05/2017 - 04:29 नवीन
कर्जमाफी हआ चुकीचा पायंडा आहे असे ज्यांना वाटते त्यांनी मोदींनी १,७५,००० कोटी रूपयांची बँकेची बुडीतकर्जे राईट ऑफ झाली यावर बोलायला हवे. एक कंपनी बुडाली तर संचालकांना दुस-या कंपनीसाठी कर्ज मिळते ते ही रीतसर. अजून काही कंपन्या रांगेत आहेत. व्हिडीओकॉन कंपनीच्या धूत यांचे ४२००० कोटींचे कर्ज राईट ऑफ होणार आहे. एकूण मिळून तीन लाख कोटी बुडीत कर्जे राईट ऑफ होतील असा अंदाज ज्येष्ठ पत्रकार हेमंत टकले यांनी व्यक्त केला आहे. राईट ऑफ केलेली कर्जे वसूल झाल्याची उदाहरणे देऊनच राईट ऑफ आणि माफ यातला फरक कळवण्याची तसदी घ्यावी ही नम्र विनंती. महाराष्ट्रातल्या शेतक-यांना ३१००० कोटी रूपये लागणार आहेत. एका ठिकाणी गंमतीशीर प्रतिक्रिया पाहिली. योगी सरकारने १ लाख कोटींचे कर्ज माफ केले - भाजप सरकार शेतकरीहिताचे निर्णय घेते. महाराष्ट्रात कर्जमाफी कधी होणार ? - कर्जमाफी हा चुकीचा पायंडा आहे. त्याने फुकटेपणाची सवय लागते. आता खरंच बास. बाकी आपले चालू द्या.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 06/05/2017 - 06:25 नवीन
CA झावरे जी यांच्या माध्यमातून तुमच्या अभ्यासपूर्ण प्रतिक्रियासाठी आणि शेतकरी समस्यांची दुसरी बाजू प्रभावीपणे मांडल्याबद्दल शतशः आभार..!! आज महाराष्ट्र बंद च्या हाकेला विविध जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाकी जयाजी, गिड्डे आणि अण्णा या सरकारी दलालांना शेतकऱ्यांनी चोप दिला आहे आणि संपाची धार आणखी वाढली आहे. पण त्याची झळ सामान्य जनतेला बसत आहे याचा खूप खेद वाटतोय. कारण किती तान्ही बाळ असतील जी दुधावाचून रडत असतील. त्यांची जास्त काळजी वाटते. सरकारने फसवा फसवीच्या खेळ थांबवावा आणि लवकरात लवकर यावर तोडगा काढावा ही या सरकारकडून अपेक्षा आहे. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातल्या इतिहासामधील फितुरांच्या यादी मध्ये खोतांचे स्थान आता अग्रगण्य होईल यात शंका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
अ
अप्पा जोगळेकर Mon, 06/05/2017 - 07:43 नवीन
कारण किती तान्ही बाळ असतील जी दुधावाचून रडत असतील. त्यांची जास्त काळजी वाटते. तुम्ही उगाच काळजी करु नका. सगळीकडे व्यवस्थित दूध, भाजीपाला वगैरे मिळते आहे. मराठवाडा, विदर्भ वगैरे भागात तर संप अगदीच थंड दिसतो. ओपेक ही तेल विक्री संघटना तेलाचे उत्पादन वेळोवेळी कमी जास्त करुन तेलाचे भाव कमीजास्त करते. कारण आखाती देशांची अक्खी इकॉनॉमीच यावर अवलंबून आहे. त्यापासून शेतकर्‍यांनी काही शिकले पाहिजे. अर्थात त्यासाठी शेतीमाल प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती , विपणन वगैरे क्षेत्रात शेतकरी लोकांना उतरावे लागेल. म्हणजे माझी इच्छा आहे म्हणून मी सगळे दूध प्रक्रिया केंद्रा, भुकटी केंद्राला पाठवले असे सांगू शकतो. त्यात काही चूक नाही. ही वैध अड्वणूक आहे. पण त्यासाठी हमीभावाचा आग्रह सोडावा लागेल, ओपन मार्केटचा आग्रह धरावा लागेल. नाहीतर काय फुटकळ संप होत राहतील, सरकारे येतील जातील गंडवतील, राजू शेट्टी गब्बर होतील, शेतकरी आहे तिथेच राहतील. त्यांचीसुद्धा बहुधा तशीच इच्छा दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मोदक Mon, 06/05/2017 - 08:22 नवीन
ओपेकचे उदाहरण गैरलागू आहे. त्यासाठी एकी लागते आणि योग्य निर्णय घेणारा नेता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
व
विशुमित Mon, 06/05/2017 - 08:34 नवीन
<<<तुम्ही उगाच काळजी करु नका.>>> ==>> आता काळजी पण तुमच्या सल्ल्याने करायची का ? <<<ओपेक ही तेल विक्री संघटना तेलाचे उत्पादन वेळोवेळी कमी जास्त करुन तेलाचे भाव कमीजास्त करते. कारण आखाती देशांची अक्खी इकॉनॉमीच यावर अवलंबून आहे. त्यापासून शेतकर्‍यांनी काही शिकले पाहिजे.>>> ==>> मुळातच तुम्ही तेल आणि शेती यांची चुकीची तुलना करत आहात तरी सुद्धा उत्पादन कमी जास्त करण्यासाठी डिमांड सप्लाय ची अधिकृत माहिती शेतकऱ्याला मिळण्याचे सोया आपल्या देशात आहे का? (msamb वर अजून अवलंबून नाही राहू शकत.) <<<अर्थात त्यासाठी शेतीमाल प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती , विपणन वगैरे क्षेत्रात शेतकरी लोकांना उतरावे लागेल.>>> ==>> कसे? <<<पण त्यासाठी हमीभावाचा आग्रह सोडावा लागेल, ओपन मार्केटचा आग्रह धरावा लागेल.>>> ==> मी तर तेच ठरवले आहे आणि माझ्या संपर्कात येणाऱ्या शेतकऱ्यांना पण तेच सांगत आहे. सरकारी msp वर अवलंबून न राहता स्वतःच्या खर्च अधिक नफ्यावर आधारित समांतर भावानेच शेतीमाल विकणार. तो ही शेताच्या बांधावर. नाही कोणी घेतलं तर त्याचे सेंद्रिय खत करणार. ४ एकर ऊस लावणार आणि वर्षाचे ठोक पैसे घेणार. <<<नाहीतर काय फुटकळ संप होत राहतील, सरकारे येतील जातील गंडवतील, राजू शेट्टी गब्बर होतील, शेतकरी आहे तिथेच राहतील. त्यांचीसुद्धा बहुधा तशीच इच्छा दिसते.>>> ==>> तुम्ही तरी कशाला जास्त काळजी करता. तुम्ही भरत असणाऱ्या करा इतके सरकारने तुमची सोय केली आहे का तेवढाच विचार करा. जगाची काळजी सोडा. बाकी ज्याच्या त्याच्या वर सोडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
स
सुबोध खरे Mon, 06/05/2017 - 09:34 नवीन
विशुमित साहेब तुमचे आमचे "साहेब" श्री. शरद पवार हे २३ मे २००४ पासून ते २६ मे २०१४ पर्यंत म्हणजे संपूर्ण १० वर्षे कृषी आणि शेतकी कल्याण मंत्री होते. https://en.wikipedia.org/wiki/Ministry_of_Agriculture_%26_Farmers_Welfare स्वामिनाथन आयोगाचा अहवाल २००६ साली यांनीच बासनात गुंडाळून ठेवला. दहा वर्षे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यांना दिसल्या नाही का? २००९ च्या निवडणूक समोर ठेवून कर्जमाफी दिली पण पुढच्या पाच वर्षात शेतकऱ्यांचे काय हाल होत आहेत हे दिसले नाही का? सर्वत्र बाजार उत्पन्न समित्या यांच्याच पक्षाकडे होत्या. सगळ्या सहकारी सोसायट्या साखर कारखाने यांच्याच कडे होते. मावळात शेतकर्याच्या आंदोलनावर गोळीबार करणारे हेच लोक होते ना? http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Four-killed-in-police-firing-on-protesting-farmers-in-Pune/articleshow/9541795.cms धरणात पाणी आले नाही तर मी काय मुतु काय हा सवाल यांच्याच पुतण्याने केला होता. सत्तर हजार कोटी रुपये सिंचन घोटाळ्यात जिरवणारे हेच लोक तेंव्हाच कर्जमाफी का देऊ शकले नाही. मागच्या आणि या पावसाळ्यात चांगला पाऊस पडतो आहे तरी आपल्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या तोंडावर शेत जमीन कसण्या ऐवजी आंदोलनात उभे करत आहेत याची जराही खंत किंवा खेद नाही. महाराष्ट्र विकला गेला आणि शेतकरी मत दिले नाही तर पाणी तोडूहीच भाषा बोलणारे हे लोक आता सत्ता गेली म्हणून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. याबद्दल आपले काय मत आहे. स्वामिनाथन आयोगाबद्दल केंद्र सरकार काय काम करीत आहे हे मी दुव्यांसकट दिले आहे. हे काम दोन तीन वर्षात होणारे नाही. दोन दशकांचे काम याना दोन वर्षात करून हवे आहे. तुम्ही १० वर्षे कृषी मंत्री होता तेंव्हा काय करत होता हा सवाल त्यांना सार्वजनिक मंचावर विचारला पाहिजे? (तेंव्हा कुठे गेला होता तुझा धर्म राधा सुता) मराठा समाजाला वेठीस धरून आंदोलन केले त्यातून काही निष्पन्न झाले नाही. स्वतःचे सरकार १० वर्षे सत्तेवर असताना मराठा समाजाचे प्रश्न दिसले नाहीत. आता त्यांना वाऱ्यावर सोडून दिले. आता सिंचन घोटाळा आणि इतर भ्र्रष्टाचार बाहेर येणार असे दिसल्यावर सत्तेसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. जनाची नाही तर मनाची तरी लाज असायला हवी होती. हे लोक उद्या शेतकऱ्यांना तसेच वाऱ्यावर सोडून देणार याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या मागे हि परिस्थिती दिसते आहे. पण उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही म्हणून लिहितो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ख
खटासि खट Mon, 06/05/2017 - 10:20 नवीन
आता त्यांना नाकारून या सरकारला निवडून दिले ही पण त्या मठ्ठ, बेअक्कल, मतीमंद शेतक-याचीच चूक असेल ना ? या शेतक-याने मागच्या सरकारांविरुद्ध कांदाफेक, टोमॅटोफेक , दूधफेक आंदोलने केलेलीच नाहीत. शरद जोशी नावाचे व्यक्तीमत्व आंदोलने करीतच नव्हते बहुधा. आजच शेतक-यांनी का आंदोलन करावे ? फडणविसांविरुध्द्ध का करायचे ? त्यांना अभ्यास करायला वेळ द्याल कि नाही. साठ वर्षे अभ्यास करतील ते. ते काय सत्तेत आहेत का ? ते सत्तेत आले की सोडवतील शेतक-यांचे प्रश्न. विरोधात असताना बिचा-यांनी कधीही कर्जमाफी हा शब्द काढला नाही तोंडातून कि कधी यात्रा काढल्या नाहीत कुठल्या. शेतक-यांचीच चूक की आता कुठले तरी सरकार निवडून दिले. किमान संप करण्यासाठी तरी मागचेच सरकार निवडून द्यायचे होते. नाहीतरी फडणवीस बिचारे मागच्याच कारभारावर टीका करताहेत. सत्ताधारी कोण आहेत हे एकदा नक्की झाले की शेतक-यांनी त्यांच्याविरुद्ध संप करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित Mon, 06/05/2017 - 12:24 नवीन
माझ्या वरच्या प्रतिसादाचा आणि शरद पवारांचा संबंध जोडण्याचं प्रयोजन नाही समजलं. तरी ही माझ्या पुरते सांगतो... २००८ च्या कर्ज माफी मुळे आम्हाला वयक्तिक फायदा झाला आणि गेली ८ वर्ष दर वर्षी शेती उत्पन्नातूनच (नोकरीचा पैसा शेतीत लावायचा नाही हा नियम पाळला आहे) काटेकोर पद्धतीने पीक कर्ज फेडतोय. आम्हाला फायदा झाला म्हणून शरद पवारांचं मी उदो उदो करतो म्हणा, काही हरकत नाही. ज्यांना करता नाही आले त्याची खंत वाटते. ज्या वर्षी पासून उसाला रु. २५०० भाव मिळाला, आमची शेतीतली दारिंद्रि हटली. स्वतःची विहीर आहे पाणी मुबलक आहे. जिथे गरज आहे तिथे ठिबक वापरले. घरात ४ जण कारखानचे सभासद आहेत. दर महा २० किलो रु,१५ दराने साखर मिळते. कारखान्याच्या निवडणुकीत मान आहे, पतपेढी-सोसायटी मध्ये पत आहे. कारखानच्या शाळेत मोफत (बिलातून काही रक्कम कट केली जाते) शिक्षण झाले आहे आणि मुलीला पण त्याच शाळेत टाकणार आहे. म्हणून मी उसाचं समर्थन करतो. बाकी धान्य गरजे पुरते पिकवतो. ६-७ वर्ष झाले टोमॅटो लावतोय. सुरवातीला बार्शी-सोलापूर ला विकायला पाठवायचो. कॅरेट भरणारे, गाडी-ड्राइवर, हमाल, अडती सगळे डल्ला मारायचे. काही बोलता येत नव्हते. बरोबर जावं तर वेळचे नुकसान, तो खतरनाक सोलापूर highway (आता मस्त झालाय) ते जमनासे झाले. शेतकरी वैतागले. एक वर्ष आमच्या एरियात टोमॅटो उत्पादन कमी झाले. त्यानंतर व्यापारीच माल शोधत गावात येऊ लागले. आता गावात येऊन माल घेऊन जातात. त्या व्यापारांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित झाले आहे. २ वर्ष कमिशन एजन्टची कीड लागली होती पण या हंगामात लोकांनी त्यांना भीक घातली नाही (मार्केट्च कुठे होते म्हणा) मावळ गोळीबार- काय झाले पुढे त्या प्रकरणाचे माहित नाही. दोषींवर कारवाई झाली का? खरंच माहित नाही मला. मूत प्रकरण- म्हणायला नव्हतं पाहिजे अजित दादांनी. चूक केली त्यांनी. आत्मक्लेश केला. माफी पण मागितली हजार वेळा. अजून पण मागत असतात कधी कधी. ज्यांना माफ करायचं होते त्यांनी केले ज्यांनी नाही केले अजून ते त्यांना कोसत आहे. लोकांची काय तोंडे धरू शकतो का आपण. बाकी गोष्टीत आपला पास. या धाग्यावर उगाळून त्याचा फायदा नाही. या संपात लय लांडगे पाहायला मिळाले. त्यामुळे यांच्या पासून सावध राहण्याचे मनाशी खूनगाठ बांधली आहे. एकच निर्धार केला आहे बांधावर शेतीमाल विकायचा. बघू किती यश मिळतंय त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मोदक Mon, 06/05/2017 - 12:42 नवीन
एकच निर्धार केला आहे बांधावर शेतीमाल विकायचा. बघू किती यश मिळतंय त्याला. स्त्युत्य निर्णय. पत्ता द्या. (हे पत्त्याचे सिरीयसली लिहिले आहे. त्या ठिकाणी येणे जाणे होत असेल तर चांगल्या गुणवत्तेचा माल मार्केटरेटनेच घेईन. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 06/05/2017 - 13:08 नवीन
पत्ता व्यनि करतो. आता खपली गहू शिल्लक आहे. फक्त मार्केट रेट ने विकणार नाही. पण काळजी करू नका तुम्हाला परवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अप्पा जोगळेकर Mon, 06/05/2017 - 13:13 नवीन
माझ्या एका मित्राने पंढरपूर-पुणे-मुंबई अशी सप्लाय चेन उभी करुन फळे, धान्य इत्यादी थेट घरपोच विक्री सुरु केली. गेल्या महिन्यात २०० मेट्रिक टन डाळिंबे निव्वळ स्प्लाय चेनच्या माध्यमातून कोणतेही शीतगॄह हाताशी नसताना त्याने विकली. आता ड्रॅगन फ्रूट पण येतील. त्याची स्वतःची शेती निव्वळ २ एकर इतकीच आहे. असे काही करता आले तर पहा. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 06/05/2017 - 19:41 नवीन
मुद्दा १ सध्य परिस्थिती मध्ये मला माझा बांध सोडून कोणाच्या दारात भाजी घेऊन जायचे नाही. मुद्दा २ ह्या सप्लाय चेन मध्ये खूप झंझट आहेत आणि मला नोकरी सांभाळून ते शक्य नाही. तुमच्या २ एकर शेती वाल्या मित्राचा माझ्या अंदाजानुसार शेती पेक्षा तो व्यापारातच जास्त हात दिसतोय . त्याच्या भावी वाटचालीला शुभेच्छा...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
स
सुखीमाणूस Tue, 06/06/2017 - 04:32 नवीन
वर एका प्रतिसादात म्हणालात की। Supply chain उभारणे सोपे व कमी खर्चाचे आहे खर म्हणजे शेती ही उद्योगधन्दयासारखी चालवायला हवी• Budgeting, planning, यासकट Analysis करायला हवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 06/06/2017 - 07:41 नवीन
वरची उपरोधिक प्रतिक्रिया होती. Budgeting, planning, यासकट Analysis सगळे चालू केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
अ
अप्पा जोगळेकर Tue, 06/06/2017 - 07:47 नवीन
तुमच्या २ एकर शेती वाल्या मित्राचा माझ्या अंदाजानुसार शेती पेक्षा तो व्यापारातच जास्त हात दिसतोय . ओह येस. त्याला व्यापारातच अधिक रस आहे. त्यामुळे त्याचा वडिलोपार्जित शेती हा व्यवसाय तो उत्पादन कमी आणि विपणन अधिक अशा प्रकारे रुपांतरित करु पाहात आहे. हे चांगलेच आहे. शेतकर्‍यांकडून अशीच उद्यमशीलता अपेक्षित आहे. तुमचा खालील एक प्रतिसाद वाचला आणि तुमची देखील शेती गरगरीत उत्पन्न देते आणि जोड नोकरीदेखील करता येते हे वाचून बरे वाटले. म्हणजे तुमचा कर्जमाफीचा आग्रह स्वतःकरता नसून अन्य शेतकरी बांधवांसाठी असावा असे वाटते. ही एकी चांगलीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ज
जयंत कुलकर्णी Mon, 06/05/2017 - 13:39 नवीन
विशुमितसाहेब, हे जर तुम्हाला जमते तर इतरांना का जमत नाही हा खरा अभ्यासाचा विषय आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 06/05/2017 - 14:09 नवीन
कारण नोकरीमुळे माझी होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे. आणि उसामुळे पीक कर्ज एक झटक्यात फिटते. टोमॅटो मुळे खेळता भांडवल मिळते, सोयाबीन ने दिवाळी गरगरीत होते आणि गहू घरी ठेऊन शिल्लक विकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ज
जयंत कुलकर्णी Tue, 06/06/2017 - 09:49 नवीन
त्या चावरे पाटलांना सांगा जरा समजावून.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ग
गॅरी ट्रुमन Mon, 06/05/2017 - 09:51 नवीन
ओपेक ही तेल विक्री संघटना तेलाचे उत्पादन वेळोवेळी कमी जास्त करुन तेलाचे भाव कमीजास्त करते. कारण आखाती देशांची अक्खी इकॉनॉमीच यावर अवलंबून आहे. त्यापासून शेतकर्‍यांनी काही शिकले पाहिजे. .....ओपन मार्केटचा आग्रह धरावा लागेल.
एकाचवेळी ओपेककडे बघून काहीतरी शिकायचे आणि ओपन मार्केटचाही आग्रह धरायचा? हे कसे शक्य आहे? ओपेक मक्तेदारी (मोनोपॉली) आहे तेव्हा तिथे ओपन मार्केटचा आग्रह कसा धरता येईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर Mon, 06/05/2017 - 10:59 नवीन
समजले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Mon, 06/05/2017 - 11:24 नवीन
ओपन मार्केट हे स्पर्धात्मक (कॉम्पिटिटिव्ह) असते. बाजारात जी किंमत मागणी-पुरवठा तत्वानुसार ठरवली जाईल ती कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये राहते. जगातील तेलाचा बाजार कॉम्पिटिटिव्ह नक्कीच नाही. त्यातून ओपेक म्हणजे काही भिडू एकत्र येऊन तयार केलेले 'कार्टेल' आहे. हे कार्टेल बाजारातील भाव प्रभावित करू शकते. भाव वाढावेत म्हणून ओपेकने उत्पादन कमी केले अशा प्रकारच्या बातम्या अनेकदा येत असतात. ओपन मार्केटमध्ये त्याप्रकारे बाजारभाव प्रभावित करायची ताकद कोणामध्येच नसते. तेव्हा ओपेक हे कार्टेल आणि ओपन मार्केट या दोन गोष्टी परस्परविरोधी आहेत. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा अंमलात आणता येतील? एकतर ओपेकसारखे कार्टेल तरी मिळेल नाहीतर ओपन मार्केट तरी. त्यातही शेतकर्‍यांचे एवढे सगळे नेते, त्यांच्या संघटना (शेतकरी संघटनेतही राजू शेट्टी विरूध्द सदाभाऊ खोत ही दुफळी आहेच) असताना संपूर्ण देशात ओपेक सारखे कार्टेल करायचे म्हटले तरी एकवाक्यता होणे कठिणच. आणि उघडउघड कार्टेल करणे कायद्याविरूध्द असल्यामुळे तसे कितपत करता येईल हा पण प्रश्नच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
व
विशुमित Mon, 06/05/2017 - 12:35 नवीन
धन्यवाद ओपेक प्रकरण समजावल्याबद्दल...!! तज्ज्ञ "शेतकऱ्यांनो काहीतरी शिका" असा सल्ला द्याचे आणि ते कायद्या विरोधात असायचे म्हणजे होईल ना पंचाईत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अप्पा जोगळेकर Mon, 06/05/2017 - 13:00 नवीन
धन्यवाद. हमीभाव, मालाची आयात निर्यात यावर नियंत्रण नसलेले, सरकारी ह्स्तक्षेप नसलेले या अर्थाने ओपन मार्केट असे म्हणायचे होते. निदान दुधासारख्या नाशवंत मालाच्या बाबतीत स्थानिक पातळीवर ओपेक सारखा दबावगट निर्माण करता येणे शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अप्पा जोगळेकर Mon, 06/05/2017 - 13:01 नवीन
निदान दुधासारख्या नाशवंत मालाच्या बाबतीत ओपन मार्केट असताना देखील स्थानिक पातळीवर ओपेक सारखा दबावगट निर्माण करता येणे शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
ट
ट्रेड मार्क Mon, 06/05/2017 - 22:13 नवीन
लोकांना कसं उल्लू बनवलं जातं याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. तुम्ही इतर उद्योगांची आणि शेतीची तुलना करताय म्हणून हा प्रतिसाद देत आहे. १,७५,००० कोटी रूपयांची बँकेची बुडीतकर्जे राईट ऑफ झाली यावर बोलायला हवे. सर्वप्रथम बुडीत कर्जे म्हणजे काय हे किती संपकरी आणि समर्थकांनी समजून घेतले आहे? कर्ज देण्यापासून ते बुडीत खाती जमा होण्यासाठी बराच मोठा कालावधी लागतो. तुम्हाला जर का हे कसे होते आणि हे करणे का गरजेचे असते हे माहित नसेल तर सांगा, मी संपूर्ण प्रोसेस सांगतो. तसेच यात एखाद्या संपूर्ण उद्योगक्षेत्राची कर्जे माफ केलेली नाहीत. म्हणजे शेती हे जर एक उद्योगक्षेत्र समजले आणि सगळ्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी ही मागणी असेल तर बुडीतकर्जे राईट ऑफ हे कुठल्याही संपूर्ण उद्योगक्षेत्रासाठी (उदा. सर्व मेकॅनिकल उद्योगांसाठी) झालेले नाही. राईट ऑफ केलेली कर्जे वसूल झाल्याची उदाहरणे देऊनच राईट ऑफ आणि माफ यातला फरक कळवण्याची तसदी घ्यावी ही नम्र विनंती. कर्ज राईट ऑफ केले म्हणजे वसुली थांबली असा पण प्रकार नसतो. सध्याचे ताजे उदा. घेऊ (यात कोणाचीही बाजू घ्यायचा उद्देश नाही). मल्ल्याने ९००० कोटीचे कर्ज काढून पळून गेला, म्हणजे सगळे पैसे बुडाले आणि ९००० कोटी मल्ल्याच्या खिश्यात पडले अशी सरसकट समजूत आहे. पण खरंच तसे आहे का? तर मल्ल्याला जे कर्ज दिलेले असेल त्यात व्याज मिळून ती रक्कम ९००० कोटी पर्यंत पोचली. ही रक्कम वेळोवेळी वेगवेगळ्या बँकांकडून मल्ल्याला कर्जाऊ मिळाली जी त्याने त्याच्या कंपनीत गुंतवली. म्हणजे लोकांचे पगार, ऑफिस घेणे, विमानं लीजवर घेणे वगैरे साठी हे पैसे वापरले गेले. कंपनी (२००३ साली) उभारताना, ती १०-१२ वर्षानंतर बुडवायची आणि सगळे पैसे घेऊन फरार व्हायचे हा मल्ल्याचा प्लॅन नसावा. आपण तग धरू शकत नाही म्हणल्यावर किंगफिशरने आपले ४८% समभाग इतिहाद एअरवेजला विकायचं नक्की केलं होतं. त्यावेळच्या सरकारातील काही मंत्र्यांनी ते डील जेट एअरवेजला मिळावं म्हणून प्रयत्न करून ते डील जेटला मिळवून दिलं. मूळ ६००० कोटीच्या आसपास असलेले कर्ज व्याजामुळे वाढत वाढत गेले. याची वसुली करण्यासाठी मल्ल्याची जी प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेली आहे त्याची किंमत ६००० कोटींपेक्षा जास्त आहे. ही प्रॉपर्टी विकून ही थकीत रक्कम वसूल केली जाईल. आता यात व्याजामुळे जी रक्कम वाढलेली आहे त्याचा प्रश्न उरतो. तर ते कदाचित राईट ऑफ केलं जाईल, म्हणजेच बँकेच्या नेहमीच्या येणे पुस्तकातून (receivables) व प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मध्ये दाखवलं जाणार नाही. परंतु म्हणून ते पैसे सोडून दिले असं नाही. हे पैसे मिळवण्यासाठी शक्य ते मार्ग वापरून शक्य तेवढी रक्कम मिळवली जाईल. हे प्रकरण उच्चन्यायालयात आहे त्यामुळे ते तिथेच चालेल, पण इतर अनुत्पादित व बुडीत कर्ज प्रकरणांसाठी वेगळी कोर्ट्स (लवाद) असतात त्यात ते प्रकरण चालून एक सेटलमेंट प्लॅन तयार होतो. अशी रक्कम, अगदी पै न पै नाही तरी बऱ्याच अंशी वसूल होते. त्यामुळे राईट ऑफ म्हणजे बँकेच्या रोजच्या येणे पुस्तकातून (receivables) आणि प्रॉफिट लॉस मधून काढून टाकून त्याच्या वसुलीसाठी वेगळ्याप्रकारे प्रयत्न केले जातात. अधिक माहिती इथे वाचा. आता माफी म्हणजे काय हे तुम्हाला सांगायची गरज नसावी. पण विचारलंय तर सांगून टाकतो - माफी म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज म्हणून दिलेले पैसे विसरून जा. बँकेने समजा शेतकऱ्याला ५०००० रुपये कर्ज दिलं असेल आणि व्याज (असलंच तर) मिळून ५५००० झालं असेल तर सगळे ५५००० रुपये सरकारने बँकेला द्यायचे. म्हणजेच शेतकरी ५५००० रुपयातील एकही पैसा देण्यास बांधील नाही. सरकार आणि बँक काय ते बघून घेईल. महाराष्ट्रातल्या शेतक-यांना ३१००० कोटी रूपये लागणार आहेत. हा या वर्षीचा आकडा झाला. हे एकदा दिले की सगळे प्रश्न सुटणार आहेत का? परत यापुढे कर्जमाफीची गरज लागणार नाही का? याउप्पर या शेतकऱ्यांना परत मोफत हव्या असलेल्या वस्तू आणि सेवा पण पाहिजेतच. लक्षात घ्या, शेती जशी हवामानावर आणि मालाच्या मागणीवर अवलंबून आहे त्याचप्रमाणे इतर उद्योगधंदे स्थानिक ते जागतिक परिस्थितीवर अवलंबून आहेत. या परिस्थितीमध्ये स्थानिक ते जागतिक सरकारी नियमांपासून ते कमी जास्त होणारी मागणी आणि अटीतटीची स्पर्धा आहे. उदा. द्यायचं झालं तर अमेरिकेत झालेल्या सरकारबदलामुळे आणि नवीन धोरणांमुळे कित्येक IT कंपन्या अडचणीत आलेल्या आहेत. नेहमीप्रमाणेच सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे कर्मचारी कपात करणे हा अमलात आणणे चालू आहे. मग आता या कर्मचाऱ्यांचे वाली कोण? कित्येक नोकरीपेशा लोकांकडे जमीन, घर ई ऍसेट नसतात. घर असलंच तर कर्जाचे हप्ते चालू असतात. शिक्षणासाठी भरपूर पैसे, श्रम आणि आयुष्यातली २२-२५ वर्षे घातलेली असतात. वयाच्या चाळीशीत असलेला एखादा कर्मचारी या बदलांमुळे कंपनीला नकोसा झाला तर त्याने काय करायचं? इमानदारीत १५-१८ वर्ष नोकरी करून व मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरून एक दिवस जर बेकार होणार असेल तर सरकारी मदत मिळायला पाहिजे ना? कारण ना त्याच्याकडे शेतकऱ्याकडे असते तशी जमीन असते ना या वयात एकदम दुसरं क्षेत्र निवडण्याची संधी असते. कंपनी मोठ्या शहरात असल्याने त्या शहरात नाईलाजाने राहायला लागतं व खर्च तसेच वाढलेले असतात. याला सांगा बघू उपाय! मग या कर्मचाऱ्यांनी पण कर्जमाफीची मागणी करावी का? निषेध म्हणून विविध आस्थापनातल्या संगणक प्रणालींमध्ये व्हायरस सोडावा का? बाजारातील अनिश्चिचिततेमुळे व सरकारी धोरणबदलांमुळे कित्येक छोटे कारखानदार व उद्योगधंदे करणारे अडचणीत येतात. त्यातले जे बदलाला सामावून घेऊ शकत नाहीत ते देशोधडीला लागतात. मग या सर्वांना सरकारने मदत का करू नये? तुमचे माननीय CA साहेब शेतकऱ्यांची आणि कंपन्यांची तुलना करत आहेत म्हणून हा प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं चक्क दिशाभूल करणारं आणि चिथावणीखोर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
स
संदीप डांगे Mon, 06/05/2017 - 23:26 नवीन
अमेरिकेत कशी शेती होते व त्या सरकारची शेतीविषयक धोरणे, बाजार वगैरे याबद्दल तुम्ही तिकडेच राहत असल्याने चांगली माहिती देऊ शकाल अशी अपेक्षा आहे. द्याल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Wed, 06/07/2017 - 22:19 नवीन
मला माहित आहे आणि जे समोर बघितलंय ते सांगीन. पण उगाच अमेरिका विरुद्ध भारत वाद, भारत सोडून पळून गेलेले लोक आणि अमेरिकेत राहणारे कसे स्वतःला शहाणे समजतात हे परत ऐकायला लागू नये अशी आशा आहे. परत एकदा सांगतो लिहिलं आहे ते केवळ मला समोर जे दिसलंय आणि अनुभवलंय त्यावरून सांगतोय. इतरांचे अनुभव वेगळे असू शकतात. माझा या विषयावर काही अभ्यास नाही. तर इथल्या सुपरमार्केट्स मध्ये येणारा बहुतांशी फळे व भाजीपाला हा दक्षिण अमेरिकेतून, म्हणजेच मेक्सिको/ पेरू ई देशांतून येतो. उत्तर अमेरिका म्हणजेच ज्याला आपण सगळे अमेरिका म्हणून ओळखतो तिथे मुख्य पीक मका आहे. हजारो हेक्टर्स जमिनीवर मक्याचे उत्पादन घेतले जाते. शहराच्या थोडं बाहेर गेलं की विविध प्रकारची शेतं दिसायला लागतात. मी जे बघितलेत त्यात मका, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरीज, सफरचंद ई आहेत. आपल्याकडे जशी उसाची कारखानदारी आहे तशी इथे मक्याची आहे. झाडून सगळ्या फास्ट फूड्स, फ्रोझन फूड्स, ब्रेड्स मध्ये कॉर्न सिरप घालतातच. जे शरीराला अपायकारक आहे असं म्हणतात, कारण खाल्ल्यावर त्याचे साखरेत रूपांतर होते. कॉर्न सिरप नसलेले पदार्थ महाग असतात. शहरात व गावात आठवड्यातला एक दिवस काही ठिकाणी फार्मर्स मार्केट्स भरतात. जिथे स्थानिक शेतकरी त्यांची फळे व भाजी विकायला येतात. "ऑरगॅनिक" असल्याने जरा महागच असतात. काही फूड मार्केट्स मध्ये स्थानिक उत्पादनांसाठी वेगळा विभाग असतो. बाकी तिथेही "ऑरगॅनिक लेबल लागलं की वस्तू महागच होतात. फळं विकण्यासाठी व थोडे पैसे मिळवण्यासाठी स्थानिक शेतकरी बेरी पिकिंग, ऍपल पिकिंग, कॉर्न मेझ असे कार्यक्रम ठेवतात. पण हे फक्त उन्हाळ्याचे २ महिनेच चालतं. उर्वरित फळांचा जॅम, पल्प वगैरे करून विकतात. शेतकरी मोस्टली यंत्र वापरून शेती करतात. इथे पावसाळा असा वेगळा ऋतू नसल्याने त्यांना बऱ्यापैकी प्लॅनिंग करायला लागत असावं. सिंचनावर बराच जोर असतो. तसेच जवळपास ५-६ महिने थंडीमुळे त्या कालावधीत शेतीतून उत्पन्न शक्य नसतं. जोडधंदा म्हणून कोंबडी, टर्की, डुक्कर, गाय/ म्हैस पालन वगैरे करतात. फ्री रेंज पक्ष्यांच्या अंड्यांना आणि मांसाला बरीच किंमत व मागणी असते. काही शेतकरी एकत्र येऊन एका पोर्टलच्या आधारे ऑनलाईन ऑर्डर घेतात. यामध्ये ते आठवड्यातून एकदा घरपोच भाज्या आणि फळे पोचवतात. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या फळे व भाज्यांमधून तुम्ही निवड करून ऑर्डर द्यायची. यात बरेचदा अंड्यांचा आणि विविध प्रकारच्या मांसाचा पण समावेश असतो. साध्या दुधाचे भाव कदाचित सरकारद्वारे नियंत्रित केले जात असावेत. कारण कधी फार वाढल्याचे बघितले नाही. पण जर हार्मोन विरहित किंवा ऑरगॅनिक दूध हवे असेल तर ते जवळपास दुपटीपेक्षा जास्त महाग आहे. मी राहतो तिथे साधं दूध $२.२५-२.५० व ऑरगॅनिक $६ प्रति गॅलन आहे. याव्यतिरिक्त सोया, बदाम व नारळाचे दूध सर्रास वापरले जाते, ज्याची किंमत साधारण $४ वगैरे असते. शेतीसाठी सबसिडी वगैरे असते पण सरकारने आपल्याला सगळंच फुकट द्यावं अशी या लोकांची धारणा नसावी. शेतकऱ्यांना पण उत्पन्नावर कर भरायला लागतो पण कदाचित दर वेगळा असावा, मला यासंबंधी माहिती नाही. इथे काही प्रोटेस्ट मी बघितले आहेत पण ते इतके शांतपणे असतात की आपल्याला नुसतीच हातात बॅनर घेतलेली गर्दी दिसते, ना घोषणा ना रस्ता रोको. अजून पर्यंत तरी मी कोणाला सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करताना बघितलं नाहीये. गावांमध्ये राहणारे शेतकरी वगैरे जनतेचे, बाहेरून घर आणि गाड्या बघताना तरी फार श्रीमंत वगैरे वाटत नाहीत. काम करण्यासाठी माणसे ठेवणे फारच महाग असल्याने शेतीची अवजारे घ्यावीच लागतात. त्यासाठी कर्ज वगैरे मिळते. बी-बियाणं आणि खत पण सहज उपलब्ध असतं. पण यावर्षी पाऊस नीट झाला नाही किंवा इतर कुठल्या कारणाने शेतकऱ्यांनी कर्जमाफी केल्याचं कधी वाचनात/ बघण्यात आलं नाही. काही डॉक्युमेंटरीज बघताना जाणवतं की इथल्याही शेतकऱ्यांना मोठ्या कंपन्यांनी दावणीला बांधलेलं आहे. शेतकऱ्यांना बळजबरीने माल कमी किमतीत विकायला भाग पाडणे ई प्रकार आहेतच. पर्ड्यू (Perdue) सारख्या अजस्त्र कंपन्या, फक्त पक्षी/ जनावरांवर अत्याचार न करता, स्थानिक फार्म्सच्या मालकांवर पण मानसिक आणि आर्थिक अत्याचार करतात. काही राज्यांमध्ये तर बेकायदेशीररित्या राहणाऱ्या मेक्सिकन व इतर देशातील लोकांना वेठबिगारासारखं अतिशय कमी पैसे (तासाला $१ वगैरे) देऊन शेतावर कामाला ठेवतात. भारतात जशी पावसाची अनिश्चितता आहे तशीच इथे पण आहे. २४ तासांच्या कालावधीत उन्हाळा, पाऊस आणि थंडी अनुभवायला मिळते. मधेच वसन्त ऋतु मध्ये झाडाची पाने गळायला लागतात, त्यामुळे या गोष्टींचा शेतीवर पण परिणाम होतच असेल. वसन्त ऋतु व उन्हाळ्यात मध्ये बरीच टोर्नाडोज, थंडरस्टोर्म्स येतात, गारपीट सुद्धा होते. चांगल्या इंचभर व्यासाच्या गारा पडतात. गाड्यांचं नुकसान होतं तर शेताचं होतच असेल. पण इथे बहुतेक सगळ्याचा इन्शुरन्स घेतला जातो, त्यात नुकसानभरपाई मिळत असावी. जाता जाता: तुम्ही विषय काढल्यामुळे जरा गुगलून पहिलं तर या लिंक्स बऱ्या वाटल्या. https://www.fsa.usda.gov/programs-and-services/disaster-assistance-program/index https://www.irs.gov/uac/newsroom/10-things-to-know-about-farm-income-and-deductions http://www.heritage.org/agriculture/report/how-farm-subsidies-harm-taxpayers-consumers-and-farmers-too https://www.downsizinggovernment.org/agriculture/subsidies अवांतरः इथे शालेय शिक्षण फुकट असल्याने हायस्कूल पर्यंत मुलं शिकतात. पण त्यापुढे शिकण्यासाठी लागणारे पैसे बहुतांशी लोकांकडे नाहीत. त्यामुळे सर्वसाधारण अमेरिकन १२ पर्यंत किंवा त्यावर थोडे शिकलेले असतात. अश्या लोकांचे उत्पन्न इथे असलेल्या भारतीयांच्या तुलनेत निम्मे असते. पण सगळे मिळून जो कर भरतात त्यावर या शाळा चालतात. त्यामुळे शिक्षकांना पण पगार कमीच असतो. पण लोक खाऊन पिउन मजेत असतात. पोलिसांना $४०,०००-५०,००० वार्षिक पगार मिळतो. सुपरमार्केट वा तत्सम काम करणाऱ्यांना तासावर किमान $८.५० मिळतात (यात बरेच भारतीय आहेत). दुसरीकडे वर्षाला $१००,०००-२००,००० मिळवणारे खूप लोक आहेत (यात पण भारतीय बरेच आहेत). अगदी क्रिमी लेअर सोडून दिला तरी थोडक्यात सांगायचं तर गरीब श्रीमंत ही दरी इथे पण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 06/08/2017 - 09:13 नवीन
सविस्तर प्रतिसादासाठी व माहितीसाठी धन्यवाद. आपल्याकडून निष्पक्ष माहितीची अपेक्षा आहे. जसा आणि जेव्हा वेळ मिळेल कृपया नक्की माहिती मिळवा व इथे एखादा धागा काढा. मी बर्‍याच लोकांना विचारतो पण कोणीही तिकडची सरकारी धोरणे, शेतकर्‍यांचे जीवन, बाजारपद्धत याबद्दल लिहित नाही. केवळ हजारो एकर मक्याची शेती आणि सर्व कामे यंत्राने यापुढे ही माहिती गेलेली नाही. प्रत्यक्ष तिथे राहणारे याबद्दल शेतकर्‍यांशी भेटून चर्चा करुन माहिती काढू शकतात. फक्त ती तुलना करायची गरज नव्हती. मला तुलनात्मक माहिती नव्हे तर निव्वळ माहिती हवी होती. तिकडे नासधुस नसतात, आंदोलनं नसतात, कर्जमाफी होत नाही ह्याला सरकारी धोरणंही कारणीभूत असावीत. त्याबद्दल जर काही माहिती काढता आली तर नक्की बघा. इथल्या शेतकर्‍यांच्या प्रश्नांची तिथल्या शेतकर्‍यांच्या प्रश्नांशी तुलना करु नका. कारण त्यासाठी दोन्हीकडची बर्‍यापैकी माहिती हवी. आंदोलन टू आंदोलन तुलना नको. कुठलेही आंदोलन थेट जाळपोळ नासधूशीच्या पातळीवर सुरु होत नसते. त्याआधी अनेक्वेळा सरकारदरबारी खेटे घातले असतात, तिथे काम होत नसेल तर आंदोलनाचा बडगा उगारावा लागतो. अमेरिकेत सरकार अशी वेळ येऊ देत नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 06/08/2017 - 19:35 नवीन
भारतातही शेतीतले बारकावे सांगेल असं माझ्या ओळखीचं कोणी नाही आणि इथे असे कोणी असण्याचा तर प्रश्नच येत नाही. त्यामुळे एक सामान्य त्रयस्थ व्यक्ती या दृष्टिकोनातून मी जे दिसलं/ दिसतंय ते मांडलय. बाकी मका आणि यंत्र यापलीकडेही थोडंफार लिहिलं आहे. स्थानिक शेतकरी जास्त पैसे मिळवण्यासाठी काय करतात ते लिहिलं आहे, ते वाचलं असेलच. दोन्ही ठिकाणी माझी भूमिका सारखीच (निष्पक्ष आणि त्रयस्थ) असल्याने आणि दोन्हीकडे राहिल्यामुळे बहुतेक स्वाभाविकपणे दोन्ही ठिकाणी जे समोर दिसतंय ते लिहिलं. काही गोष्टी तर खरंच मला अजूनही नीटश्या उलगडलेल्या नाहीयेत. उदा. पावसाची अनियमितता भारतात आहे आणि इतर देशातही आहे. अमेरिकेत शेतीला विमा संरक्षण आहे तसेच भारतातही गेली २ वर्षे चालू केले आहे. भारतात कदाचित इतर थंड प्रदेशांपेक्षा जास्त महिने शेती करता येईल असे वातावरण असते (असं मला वाटतं, चूक असेल तर सांगा). वातावरणातले बदल तर बहुतेक अमेरिकेत जास्त होतात - परवा माझ्या इथे कमाल तापमान ३५ डिग्री सेल्सियस होते ते आज २२ आहे. परवा रात्री तुफान पाऊस झाला. काल कडक ऊन होतं, आज ढगाळ हवा आहे. बाकी सरकारी गोष्टींबद्दल म्हणाल तर गूगल वर नुसतं Loan waiver for farmers in US असं टाकल्यावर भारताशिवाय एकही बातमी दिसत नाहीये. जनतेने काहीही मागणी करावी आणि सरकारने लगेच बिनशर्त मान्य करावी हे कुठेच होत नाही. संप आणि दंग्यांबद्दल इथले सरकारी धोरण स्पष्ट असावे. सार्वजनिक मालमत्तेला आणि सरकारी लोकांना (पोलीस वगैरे) जर का धोका असेल तर सरळ अटक करायचा प्रयत्न करतात. जास्तच धोका वाटला तर जागीच गोळ्या घालतात. असो. शेतीत असणाऱ्या अडचणी कदाचित दोन्हीकडे थोड्याफार सारख्याच असतील, पण संप फक्त भारतातच आहे. त्यामुळे परत भारत वि. अमेरिका वाद नको करायला. उगाच बाहेर राहणाऱ्यांवर नसते आरोप होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ज
जयंत कुलकर्णी Tue, 06/06/2017 - 09:57 नवीन
शिवाय कर्ज देणे व त्याचे व्याज कमावणे हा बँकेचा उद्योग आहे. त्यात कधी तोटा तर कधी फायदा हाही धंदाच झाला. म्हणून चुकीची कर्जे दिली तर लोकांच्या नोकर्‍या जातात , त्यांच्या घरावर धाडी पडतात. अगदी विजय मल्ल्याचे उदा. घ्यायचे तर बँकेने त्यात पैसे मिळतील म्हणूनच पैसे गुंतवले होते हे नाकारुन चालणार नाही. बँकांच्या दृष्टिकोनातून शेतकर्‍यांची कर्जे माफ म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार झाला. एका कडून पैसे घेऊन दुसर्‍याची कर्जे माफ करायची असे झाले तर सर्व प्रकारचे कर का भरायचे हाही प्रश्न उभा राहू शकतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ज
जयंत कुलकर्णी Tue, 06/06/2017 - 10:12 नवीन
बँका जर सरकारे नसत्या तर त्यांनी ही कर्जे दिली असती का व दिल्यानंतर माफ केली असती का? हाही एक प्रश्नच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
अ
अप्पा जोगळेकर Mon, 06/05/2017 - 07:27 नवीन
असे आहे का ? हे झावरे पाटील नाव अलीकडे ऐकू येते आहे. राजू शेट्टींची नविन आयात आहे वाटते.
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Mon, 06/05/2017 - 10:12 नवीन
अप्पा जोगळेकर हे नाव देखील ऐकल्यासारखे वाटतेय... का स क .. जाऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अनुप ढेरे Mon, 06/05/2017 - 07:32 नवीन
माझ्या माहीतीप्रमाणे राईट ऑफ म्हणजे माफी नाही.
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Mon, 06/05/2017 - 10:14 नवीन
आपल्या माहितीप्रमाणे राईट ऑफ केलेल्या कर्जवसुलीची पाच उदाहरणे सांगावीत (तसे आधीच लिहीलेले होते ). शेतक-यांची कर्जे राईट ऑफ केली तरी चालतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
उ
उपेक्षित Mon, 06/05/2017 - 08:30 नवीन
४ दिवस झाले मी इथे सर्व प्रतिक्रिया वाचत आहे शांतपणे आणि त्यावरून थोडे मत बनवायचा प्रयत्न करत आहे अजून. वरील सर्व प्रतिक्रियांमध्ये खरे साहेब, विशुमित, खटासि खट, अभ्या भाऊ, बिरुटे सर यांच्या प्रतिक्रिया खरच अभ्यासपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या आहेत. पण गफलत काय होतेय कि विनाकारण यात पक्षीय राजकारण मध्ये येत आहे चर्चा मूळ विषयाला धरून चालली आहे असे म्हणे पर्यंत कुणीतरी येऊन काडी सारून जात आहे अथवा उगाच करायचा म्हणून प्रतिवाद करत आहेत (sorry to say but अभ्या आणि मोदक तसेच अमर विश्वास आणि विशुमित यांचे एकमेकांचे प्रतिसादांची काही ठिकाणी खरच गरज नव्हती त्याचप्रमाणे जोगळेकर म्हणून जे कोणी आहेत ते तर स्पष्ट काडी सारत आहेत आणि वाट्टेल ती विधाने करीत आहेत.) खरे तर माझे अजूनही असे स्पष्ट मत आहे कि आत्महत्या करणारा विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी इथे आंदोलनात कुठेच दिसत नाहीये माझ्या सारख्या सामान्य माणसांना, दिसत आहेत ती त्यांच्या नावावर आपापली राजकीय पोळी भाजून घेणारी बांडगुळे.(मी कदाचित चूक असेल) मग हा खरा झळ पोचलेला शेतकरी कुठाय ? नि:संधीग्ध पणे मी सांगू शकतो कि मोदक, खरे, अमर विश्वास अथवा अजून कुणी (मी पण) यांचा शेतकऱ्यांना पाठींबा असेलच (100% आहेच) पण त्या आडून काही जण शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जो गलिच्छ खेळ करत आहे त्यांना पण सोडता कामा नये, किती दिवस या साल्यांच्या खेळीला आपण आणि बाकीचे बळी पडत राहणार ? किती दिवस आपण आपल्यातच भांडत बसणार ? याचा फायदा बाहेरील लोक घेत आहेत साला. त्यामुळे मला खरच मनापासून असे वाटते कि आपापसातील जुने मतभेद विसरून या विषयावर एक चांगली चर्चा अजूनही होऊ शकते, जिथे मतभेद असतील ते तिथेच सोडा आणि पुढे व्हा. अहो २ भावात मतभेद असतात तिथे हम कीस झाड कि पट्टी ? बाकी काही ठिकाणी स्पष्टपणे नावे घेतली आहेत याचा अर्थ माझ्या मनात काही किल्मिष आहे असा नाही तर ती हक्काने घेतली आहेत कारण त्या ID मागचा चेहरा थोडा तरी मी ओळखला आहे अशी मला खात्री आहे. असो तूर्तास इतके बास...
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Mon, 06/05/2017 - 10:29 नवीन
दुसरी बाजू ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत कुणी असेल तर हे सरकार आणि ते सरकार, ब्राह्मण मराठा, पवार फडणवीस हे बाजूला ठेवून बोलूयात. फडणवीस ज्यांचे सख्खे मेहुणे असतील त्यांनी या संपात राजकारण पाहिले तर हरकत नाही. आणि पवार ज्यांचे सासरे आहेत त्यांनी ही सत्तेची स्वप्ने पाहिली तरी चालतील. ज्यांना अशा काही समस्या नाहीत अशांनी पुढे बोलूयात. १. अमेरिकेत शेतमालावर सबसिडी आहे. भारतात का देऊ नये ? २. शेतक-यांना कर बसवा हवा तेव्हढा. पण त्यांना इन्फ्रास्ट्रकचर द्यायला हवे. शहरासाठी किती इन्फ्रास्ट्रकचर असते, किती सोयी असतात त्या प्रमाणात आपण किती कर भरतो हे ही पहायला हवे ३. शीतगृहे अल्प दरात उपलब्ध केली तर शेतमालाची नासाडी टळेल. ४. भाव चढल्यावर आयातीचा निर्णय सरकारने घेण्याची आवश्यकता नाही. घरांच्या किंमती गगनाला भिडल्या तरी सरकार हस्तक्षेप करायला तयार नाही. ५. भाव पडल्यावर निर्यातबंदीचा निर्णय सरकारने घेण्याची आवश्यकता नाही. ६. मार्केट यार्डात व्यापा-यांचे वर्चस्व आहे. बाजार समितीत व्यापा-यांचे वर्चस्व आहे. त्यांच्यावर नियंत्रण आणावे. ७. भाव पडले असताना देखील कमिशन मिळते म्हणून परदेशातून अन्नधान्य आयात करणा-यांविरुद्ध कारवाई व्हावी. ८. शेतक-यांचे भाव ठरवण्यासाठी कायमस्वरूपी लवाद असावा. त्यास घटनात्मक दर्जा असावा. सरकारी लुडबूड होणार नाही ही दक्षता घ्यावी. ९. शहरी लोकांनी किमान त्यांचे प्रश्न समजून घेऊन प्रतिक्रिया द्याव्यात. सोशल मीडीयावरच्या प्रतिक्रिया कलल्यावर भावनाविवश झालेले शेतकरी पाहण्यात आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Mon, 06/05/2017 - 11:04 नवीन
या मागण्या सेन्सिबल आहेत खूपच. आम्ही लोकांनी संपाच्या अटींमधे सरसकट कर्जमाफी, फुकट वीज,शेतकर्‍यांना पेन्शन असे काय काय वाचले होते. नक्की काय खरे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट Mon, 06/05/2017 - 11:10 नवीन
खरे इथेच आहेत. नक्की नाहीत. डॉ, स्वामिनाथन नावाचे एक गृहस्थ आहेत. त्यांचे एक सोबोध कथांचे पुस्तक आहे. वेळ मिळाला तर नक्की वाचा सर. छान वेळ जईल. तुम्ही वाचलेल्या मागण्यांमधे ते पुस्तक शेतक-यांना मोफत वाटण्याची मागणी दिसली नाही. कुशेवातेवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा