Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी: भाग ६

ग
गॅरी ट्रुमन
Fri, 06/16/2017 - 17:28
🗣 309 प्रतिसाद
यापूर्वीच्या भागात ३०० प्रतिसाद आल्यामुळे नवा भाग काढत आहे. स्विस बँकांमध्ये दडविलेला 'काळा पैसा' हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा चर्चेचा विषय राहिला आहे. स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये पैसे ठेवले तर ठेवीदाराची माहिती गोपनीय ठेवली जात असल्यामुळे 'काळा पैसा' वाल्यांचे स्वित्झर्लंड हे नंदनवन होते असे नेहमीच म्हटले जाते. स्वित्झर्लंडने भारत आणि इतर काही देशांबरोबर आतापर्यंत गोपनीय असलेली माहितीची देवाणघेवाण करायच्या कराराला मान्यता दिली आहे. आणि २०१९ पासून भारताबरोबर या माहितीची देवाणघेवाण सुरू होईल असे म्हटले जात आहे. या माहितीची खरोखरच उपयुक्तता किती असेल हे बघायचे आणि उपयुक्त माहितीच स्वित्झर्लंडकडून दिली जाईल अशी अपेक्षा करू.

प्रतिक्रिया द्या
75991 वाचन

💬 प्रतिसाद (309)
श
शलभ Tue, 06/20/2017 - 06:05 नवीन
+1111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
प
पुंबा Tue, 06/20/2017 - 07:15 नवीन
अतीसहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
म
मोदक Tue, 06/20/2017 - 07:41 नवीन
बेशर्त सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
स
सतिश गावडे Tue, 06/20/2017 - 14:32 नवीन
गापैजी, हिंदू धर्म, भारत देश आणि भारतीय संस्कृती यांच्याबद्दल तुमच्या प्रतिसादांमधून तुम्ही नेहमीच गौरवास्पद उद्गार काढले आहेत. मात्र स्वतः परधर्मीयांची चाकरी करुन, परदेशात पाश्चिमात्य संस्कृतीत राहत आहात. हे विरोधाभासी नाही वाटत का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
न
नावातकायआहे Wed, 06/21/2017 - 10:38 नवीन
स गा जी! नशिब धर्मावरच थांबलात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
विकास Wed, 06/21/2017 - 20:40 नवीन
हा प्रश्न केवळ खालील मुद्या संदर्भात आहे बाकी वादामध्ये स्वारस्य नाही... भारतातलं गोधन भयावह दराने घटंत चाललंय. हे नक्की कुठे वाचले? कारण आपला मुद्दा वाचल्यावर उत्सुकतेपोटी शोधायला लागलो. ३ सप्टेंबर २०१४ चा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो चा खालील दुवा मिळाला: Salient Features of 19th Livestock Census http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=109280 त्यातील या संदर्भातील माहीती अशी: v The number of milch animals (in-milk and dry), cows and buffaloes, has increased from 111.09 million to 118.59 million, an increase of 6.75%. v The number of animals in milk, cows and buffaloes, has increased from 77.04 million to 80.52 million showing a growth of 4.51%. v The Female Cattle (Cows) Population has increased by 6.52% over the previous census (2007) and the total number of female cattle in 2012 is 122.9 million numbers. v The Female Buffalo population has increased by 7.99% over the previous census and the total number of female buffalo is 92.5 million numbers in 2012. धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
A
arunjoshi123 Mon, 06/26/2017 - 08:31 नवीन
त्या टेबलात नक्कि काय वाचलंत आपण? २००७ ते २०१२ मधे साधारणतः मानव ५-६% वाढणे आणि कॅट्ल्स ४% पेक्षा जास्तनी (२००७ च्या लेवलपासून) कमि होणे किंवा पशूधन ३% वा जास्तने भयावह नाही काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
म
मार्मिक गोडसे Tue, 06/20/2017 - 07:47 नवीन
भारतीय दूधदुभतं वाढावं म्हणून इंधनावर अधिभार लावला तर काय बिघडलं? भारतातलं गोधन भयावह दराने घटंत चाललंय. बरोबर आहे, सरकारसाठी इंधन हे 'दुभती गाय' असल्याने त्यावर सरकार कितीही कर लावू शकते. भाकड गोधनलाही ही मागणी ऐकून पाझर फुटला असेल. दिवसेंदिवस कृषी़क्षेत्र व त्यावर अवलंबून असलेली लोकसंख्या घटत असताना गोधनही घटणारच. गरज नसलेली जनावरे वाचवून नक्की काय साधायचे आहे ?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 06/20/2017 - 08:26 नवीन
लोकहो, भाकड गायींना पोसणे शक्य होत नाही म्हणून कापायला पाहिजेत असा काहींचा सूर आहे. तर गायी हा शुद्ध अपप्रचार आहे भाकड गायीला खायला चारा लागतो ही बाब कुणीच लक्षात घेत नाही. खाल्लेला चारापाणी गोमूत्र आणि गोमयातून बाहेर पडतं. आज गोमूत्र आणि गोमयाचे भरपूर उपयोग आहेत. दुभती सोडा, भाकड गायसुद्धा शेतकऱ्याची आत्महत्या थांबवू शकते. हे माझं मत नसून अशोक इंगवले यांचं मत आहे. तस्मात भाकड गायींना ठार मारणे हा बकवास आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 06/20/2017 - 08:40 नवीन
खाल्लेला चारापाणी गोमूत्र आणि गोमयातून बाहेर पडतं. आज गोमूत्र आणि गोमयाचे भरपूर उपयोग आहेत. ---> गाय पाळताना तिच्यापासून मिळणारे दुधाचे उत्पन्न हा मुख्य क्रायटेरिया असतो. गोमूत्र आणि शेण हे बायप्रॉडक्त आहे आणि त्याच्यासाठी गाय पाळणारा गवळी मलातरी अजूनपर्यन्त भेटलेला नाही. दुसरी गोष्ट ज्यांना पाळायच्या असतील त्यांनी खुशाल भाकड गायी पाळाव्यात आणि तुम्ही नमूद केले आहे तसे गोमूत्र किंवा गोमय मिळवून त्याचा कुठे होतोय तिकडे उपयोग करून घ्यावा किंवा ते देखील करू नये. फक्त भाकड गायी पाळायची सक्ती असू नये असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मार्मिक गोडसे Tue, 06/20/2017 - 08:50 नवीन
तस्मात भाकड गायींना ठार मारणे हा बकवास आहे. भाकड गाय कसायाला विकून मिळालेल्या पैशातून दुभती गाय घेतल्यास गोमुत्र, शेणाबरोबर दूधही मिळणारच आहे. मग गोहत्येला विरोध का?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 06/20/2017 - 13:55 नवीन
ओरिसातील सत्ताधारी बिजू जनता दलाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एन.डी.ए चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहिर केला आहे. बिजू जनता दलाचे लोकसभेत २०, राज्यसभेत ८ तर ओरिसा विधानसभेत ११७ आमदार आहेत. कालच वाय.एस.आर काँग्रेस, अण्णा द्रमुक आणि टी.आर.एस ने कोविंद यांना पाठिंबा जाहिर केला आहे. त्यानंतर बिजू जनता दलानेही त्यांना पाठिंबा दिला आहे. http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/bjd-extends-support-to-kovinds-name-for-president/articleshow/59226015.cms त्याचप्रमाणे मुलायमसिंग यादव यांनीही रामनाथ कोविंद यांनाच पाठिंबा जाहिर केला आहे. (http://www.dnaindia.com/india/report-mulayam-backs-nda-presidential-nominee-ram-nath-kovind-2478278) आणि आता नितीश कुमारांनीही रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहिर केला आहे. ( http://indiatoday.intoday.in/story/bihar-chief-minister-nitish-kumar-ram-nath-kovind-bjp-opposition/1/982897.html ) म्हणजे आता विरोधकांमध्ये काँग्रेस, कम्युनिस्ट, तृणमूल आणि कदाचित शिवसेना हे पक्ष असतील. रामनाथ कोविंद हे भारताचे पुढचे राष्ट्रपती असतील हे जवळपास नक्की होताना दिसत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 06/20/2017 - 14:40 नवीन
विरोधी पक्ष राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी संयुक्त उमेदवार उतरवेल असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी.राजा यांनी म्हटले आहे. सध्याचे चित्र असे आहे की जरी विरोधी पक्षांनी उमेदवार उतरवला तरी ती लढत फार तर संकेतात्मक (सिंबॉलिक) असेल. तसेही काहीही झाले तरी कम्युनिस्ट पक्ष (आणि त्यातही भाकप) कितीही जनाधार कमी झाला असला, लोकांनी कितीही नाकारले असले तरी स्वतःचे तुणतुणे कायम सुरू ठेवतच असतात. २००२ मध्ये वाजपेयींनी कलामसाहेबांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले. ही निवडणूक जुलै २००२ मध्ये म्हणजे संसदेवरील हल्ल्याच्या ७ महिने नंतर आणि कालूचक येथील हल्ल्याच्या दोन महिने नंतर झाली होती. त्यावेळी भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव होता आणि युद्धजन्य परिस्थिती होती. कलामसाहेबांना काँग्रेस, समाजवादी पक्षानेही पाठिंबा दिला होता. अशावेळी कम्युनिस्टांनी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेच्या कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा लक्ष्मी सेहगल यांनी "सीमेवर तणाव असताना कलामांसारखा अणुशास्त्रज्ञ राष्ट्रपती झाल्यास चुकीचे संदेश जातील" अशा टिपीकल कम्युनिस्ट वैचारीक दिवाळखोरीचे प्रदर्शन केलेच होते. म्हणजे भारताचा राष्ट्रपती कोण असावे हे भारताचे पाकिस्तानशी संबंध कसे आहेत आणि सीमेवर काय परिस्थिती आहे यावर ठरविले जावे तर. यावेळीही कम्युनिस्ट असलाच कोणीतरी उमेदवार उतरवून टोकन लढत देतील असे दिसते. फक्त त्या उमेदवाराला काँग्रेसचाही पाठिंबा असल्यामुळे लक्ष्मी सेहगल यांच्याइतका वाईट पराभव त्या उमेदवाराचा होणार नाही.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 06/20/2017 - 14:46 नवीन
संयुक्त उमेदवार असं ते म्हणतात, पण काँग्रेस तर ९१ वर्षीय स्वामिनाथन यांना पुढे करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Tue, 06/20/2017 - 15:04 नवीन
हो अशा बातम्याही आल्या आहेत. स्वामीनाथन यांनी भारतीय कृषीक्षेत्रात खूपच काम केले आहे. भारतातील कृषीक्रांतीचे ते पितामह आहेत. त्यांनी केलेले काम, त्यांची ज्येष्ठता आणि त्यांचे वय लक्षात घेता निवडून यायची खात्री नसताना ते अशा लठ्ठालठ्ठीच्या राजकारणात पडतील का? http://indiatoday.intoday.in/story/presidential-election-ram-nath-kovind-bjp-congress-ms-swaminathan/1/983002.html वर म्हटले आहे की काँग्रेसला राजकीय नेता नव्हे तर जनतेचा राष्ट्रपती हवा आहे. मग एक जनतेचा राष्ट्रपती निवृत्त झाल्यावर (कलामसाहेब) हा दुसरा जनतेचा राष्ट्रपती आणायला काँग्रेसला कोणी रोखले होते? हा प्रकार थोडासा 'सौ चुहे खाके बिल्ली.... ' असा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
ग
गॅरी ट्रुमन Tue, 06/20/2017 - 15:29 नवीन
स्वामीनाथन यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यास शिवसेनेची स्थिती मात्र अडचणीची होईल. स्वामीनाथन यांना राष्ट्रपती करा अशी जाहिर मागणी शिवसेनेने यापूर्वीच केली आहे. त्यामुळे काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेला त्यांना पाठिंबा देणे भाग पडेल. तसेही २००२ चा अपवाद वगळता १९९२ पासून प्रत्येक राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजप/एन.डी.ए उमेदवाराला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोध केला आहे. त्याचीच ही पुढची आवृत्ती असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मोदक Tue, 06/20/2017 - 16:33 नवीन
शिवसेना स्वत:च्या भुमीकेचा इतका गांभीर्याने विचार करत असेल असे तुम्हाला खरंच वाटते..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Tue, 06/20/2017 - 15:57 नवीन
शिवसेनेने एन.डी.ए चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहिर केला आहे अशी आताच बातमी आली आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 06/21/2017 - 10:56 नवीन
अमित शहांनी मातोश्रीवर येऊन डोळे वटारल्यावर कागदी वाघांची तंतरली दिसतेय. अगदी परवाच जाहिररित्या म्हणाले होते की कोविंद यांना ते दलित आहेत म्हणून पाठिंबा देणार नाही. ते जर देशाचं भलं करणार असतील तर पाठिंबा देऊ. हे सांगितल्यावर २४ तासात पाठिंबा जाहीर केला. म्हणजे कोविंद देशाचं भलं करणार याची वाघोबांना खात्री पटलेली दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मराठी_माणूस Wed, 06/21/2017 - 11:06 नवीन
......... डोळे वटारल्यावर कागदी वाघांची तंतरली दिसतेय.
पाठींबा मिळवण्याची ह्यांची हीच पध्द्त आहे वाटते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 06/21/2017 - 11:17 नवीन
नाठाळ व मगरूरांबरोबर हीच पद्धत वापरावी लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Wed, 06/21/2017 - 11:40 नवीन
नाठाळ व मगरूरांबरोबर रहाण्याची सक्ती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Wed, 06/21/2017 - 11:46 नवीन
मग खिशातले राजीनामे बाहेर का येत नाहीत म्हणे..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
श
श्रीगुरुजी Wed, 06/21/2017 - 11:51 नवीन
राजीनामे? कसले राजीनामे? कोणाचे राजीनामे? आमच्याबरोबर पटत नसेल तर तुम्हीच सरकारमधून बाहेर पडा. मध्यावधी निवडणुक घेण्याचा तुमचा डाव उधळून लावू. समजलं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
श
श्रीगुरुजी Wed, 06/21/2017 - 11:53 नवीन
नाठाळ व मगरूरांबरोबर रहाण्याची सक्ती नाही. तुमची आम्हाला अजिबात गरज नाही, आमच्याबरोबर रहायचं असेल तर नीट रहा. हेच अमित शहांनी ऐकवलं वाघोबांना. हे ऐकल्यावर लगेच वाघोबांची शेळी झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Wed, 06/21/2017 - 11:56 नवीन
हे सगळे ऐकवण्यापेक्षा युती तोडुन का नाही टाकत स्वतःच्या बाजुने ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 06/21/2017 - 12:03 नवीन
युती आहेच कोठे? ती २०१४ मध्येच तुटली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत व त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले आहे. युती आता इतिहासजमा झाली आहे व भविष्यात परत कधीही युती होणार नाही. अर्थात शिटसेनेने वस्तुस्थिती ओळखून स्वतःच्या ताकदीच्या प्रमाणात जागा मागितल्या (उदा. विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी जास्तीत जास्त ८०-९० जागा व उर्वरीत भाजपला) तर युती होऊ शकेल. अर्थात शिटसेनेचा स्वतःच्या ताकदीच्या बाबतीत अत्यंत भ्रम असल्याने ते इतक्या कमी जागा मान्य करण्याची सुतराम शक्यता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Wed, 06/21/2017 - 12:18 नवीन
मग घरी जायची गरजच काय होती ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Wed, 06/21/2017 - 12:30 नवीन
(तेलकट) बटाटे वडे खायला. हेच अपेक्षित उत्तर असावे. वाघाच्या गुहेत जाऊन डोळे वटाराणे म्हणजे बाबो..!! (आयमाय सॉरी कारण नसताना तुमच्या चर्चेमध्ये आलो क्षमस्व..!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मोदक Wed, 06/21/2017 - 12:31 नवीन
तुमचा नक्की मुद्दा काय आहे..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Wed, 06/21/2017 - 13:08 नवीन
जाहीरपणे बेदखल का करत नाहीत ? अग अग म्हशी ..... सारखा प्रकार वाटतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 06/21/2017 - 14:01 नवीन
सध्या सत्ता आहे, सरकार सुरू आहे.. मग अशा फालतू कारणासाठी कोण नुकसान करून घेईल..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
श
श्रीगुरुजी Wed, 06/21/2017 - 15:02 नवीन
सरकारमध्ये शिटसेनेचे १२ मंत्री असले तरी त्यांच्याकडे दुय्यम खाती आहेत. त्या मंत्र्यांना कोणत्याही निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. आलात तर तुमच्यासह, नाही तर तुमच्याशिवाय या पद्धतीने सरकारचा गाडा फडणवीस हाकत आहेत. सर्व कारभार भाजपचे मंत्रीच चालवित आहेत. शिटसेनेचा सहभाग गृहीत धरलेलाच नाही. निर्णयात सामावून नाही घेतले तर आम्हाला वगळले म्हणून हे आरडाओरडा करणार आणि निर्णयात सामावून घेतले तरी मंत्रीमंडळाच्या बैठकीत कोणताही सकारात्मक सहभाग न देता बैठकीतून बाहेर पडल्यावर सामनातून व सभांमधून निर्णयाला विरोध करणार. त्यांना अधिकृत बेदखल करण्याची गरजच नाही, कारण पहिल्या दिवसापासूनच त्यांनी स्वतःहून स्वतःला बेदखल करून घेतले आहे. यांनी एकतर कायम विरोधात बसायला हवे होते किंवा सरकारमध्ये सामील झाल्यावर एकत्रित टीम या वृत्तीने काम करायला हवे होते. जसे एखाद्या कंपनीत एखाद्या प्रोजेक्टमध्ये काही ओव्हरहेड्स असतात जे कोणाच्या तरी आदेशावरून किंवा बिलिंगचा कोटा पूर्ण करण्ञासाठी प्रोजेक्ट टीममध्ये असतात. ते कामात काहीही सकारात्मक मदत करीत नाहीत. कोणतेही भरीव काम करीत नाहीत. कोणतेही दिलेले काम नीट, वेळेवर पूर्ण न करता विनाकारण खोड्या काढत बसतात. प्रोजेक्ट मॅनेजर अशांना फारसे काम न देता बसवून ठेवतात किंवा दिले तरी अत्यंत फालतू, बिनमहत्त्वाचे काम देतात जे पूर्ण झाले नाही तरी चालण्यासारखे असते. शिटसेना या मंत्रीमंडळात ओव्हरहेडच्याच स्वरूपात आहे. आपल्याला या मंत्रीमंडळात शून्य महत्त्व आहे हे ते ओळखून आहेत. परंतु सत्तेसाठी ते अत्यंत कासावीस असल्याने सत्ता सोडवत नाही. म्हणून लाचारी पत्करून, सर्व अपमान गिळून ते मंत्रीमंडळात आहेत. हा पक्ष इतका लाचार, महत्त्वशून्य व टिंगलीचा विषय होईल असे बाळ ठाकरे असताना कोणाला स्वप्नात तरी वाटले असेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मोदक Wed, 06/21/2017 - 19:49 नवीन
गुरूजी - शिवसेना असा उल्लेख करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 06/21/2017 - 20:14 नवीन
ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 06/22/2017 - 08:42 नवीन
तुमचा वरील शिटसेना हा उल्लेख अतिशय खटकणारा आहे. मतभेद असू शकतात पण हा साधारण वैचारिक पातळी सोडणारा द्वेषयुक्त उल्लेख वाटला. इतर काही द्वेषाने भारलेली लोकं खांग्रेस वगैरे उल्लेख करतात तसलाच प्रकार वाटला. बाकी चालुद्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक गुरुवार, 06/22/2017 - 09:43 नवीन
+१ सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
क
कपिलमुनी Wed, 06/21/2017 - 18:20 नवीन
तुफान विनोदी ! डोळे वटारण्यासाठी मातोश्रीवर जायला लागले यातच सगळे आले. भाजपाने कितीही उड्या मारल्या तरी सध्या राज्यात सेनेची गरज आहे हेच स्टॅटीस्टीक्स सांगते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 06/21/2017 - 19:23 नवीन
चारचौघात डोळे वटारले असते, तर उरलीसुरलीही गेली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मराठी_माणूस गुरुवार, 06/22/2017 - 06:29 नवीन
हेच म्हणतो. कीतीही शाब्दीक कोलांट्या उड्या मारल्या तरी वास्तव बदलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/22/2017 - 10:42 नवीन
नक्की काय वास्तव आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस गुरुवार, 06/22/2017 - 10:47 नवीन
कपिलमुनींच्या प्रतिसादात ते दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/22/2017 - 10:55 नवीन
तो मुनींचा गोड गैरसमज आहे. भाजपला देशात किंवा राज्यात शिवसेनेची अजिबात गरज नाही हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही हे सिद्ध होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
च
चिनार गुरुवार, 06/22/2017 - 10:59 नवीन
भाजपाने कितीही उड्या मारल्या तरी सध्या राज्यात सेनेची गरज आहे हेच स्टॅटीस्टीक्स सांगते
मान्य ! पण भाजप नेतृत्व शिवसेनेला पाहिजे तेंव्हा चुचकारते आणि प्रसंगी दूर सारते. अमित शहा आपल्याला भेटायला मातोश्रीवर आले ह्यात जर उधोजीराव स्वतःची पाठ थोपटून घेत असतील तर धन्य आहे. गरज पडल्यावर अमित शहा सारखा पक्का गुजराती माणूस काहीही करू शकतो. त्या भेटीच्या एक दिवसाआधी फडणवीस मध्यावधीची शक्यता वर्तावतात आणि भेटीनंतर शहा कार्यकर्त्यांना मध्यावधीची तयारी करायला जाहीरपणे सांगतात. उधोजीरावांच्या ऐवजी जर स्व.बाळासाहेब असते तर देशातल्या कोणत्याही नेत्याची हे करण्याची हिम्मत झाली असती का? आणि जर झाली असती तर बाळासाहेबांनी त्याला फटकारले नसते का? बरं एवढं झाल्यावर उधोजीराव एकदा राष्ट्रपतीपदासाठी कोविंद यांना विरोध करतात आणि लगेच पाठिंबा पण देतात. सांगायचं मुद्दा असा की एकतर शिवसेना थिकटँकला आपण खेळवले जातोय हे कळत नाहीये किंवा आपण लय मोठा गेम खेळतोय या समजुतीत ते वावरत आहेत. ह्या सगळ्यामुळे शिवसेनेचं हसू होतंय एवढं नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/22/2017 - 11:03 नवीन
भाजपाने कितीही उड्या मारल्या तरी सध्या राज्यात सेनेची गरज आहे हेच स्टॅटीस्टीक्स सांगते मान्य !
मान्य??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 06/22/2017 - 11:08 नवीन
शिवसेना थिकटँकला आपण खेळवले जातोय हे कळत नाहीये किंवा आपण लय मोठा गेम खेळतोय या समजुतीत ते वावरत आहेत. ह्या सगळ्यामुळे शिवसेनेचं हसू होतंय एवढं नक्की.
आंतरजालावरून साभारः Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/22/2017 - 11:13 नवीन
मस्त! कोणाला कोणाची गरज आहे व कोण हतबल आहे हे अगदी समर्पक व्यंगचित्रातून स्पष्ट केलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मराठी_माणूस Tue, 06/20/2017 - 16:57 नवीन
ह्या इन्सिग्निफिकंट पदासाठी एव्हढा का काथ्याकुट ?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 06/20/2017 - 17:01 नवीन
ह्या इन्सिग्निफिकंट पदासाठी एव्हढा का काथ्याकुट ?
हे पद वाटते तितके इन्सिग्निफिकंट नाही. या पदाच्या मर्यादा आहेत, स्वतःचे अधिकार फार नसले तरी न्युसन्स व्हॅल्यू मात्र नक्कीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Tue, 06/20/2017 - 17:22 नवीन
सामान्या माणसाच्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही त्या अर्थाने म्हणत होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा