ताज्या घडामोडी: भाग ६
यापूर्वीच्या भागात ३०० प्रतिसाद आल्यामुळे नवा भाग काढत आहे.
स्विस बँकांमध्ये दडविलेला 'काळा पैसा' हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा चर्चेचा विषय राहिला आहे. स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये पैसे ठेवले तर ठेवीदाराची माहिती गोपनीय ठेवली जात असल्यामुळे 'काळा पैसा' वाल्यांचे स्वित्झर्लंड हे नंदनवन होते असे नेहमीच म्हटले जाते. स्वित्झर्लंडने भारत आणि इतर काही देशांबरोबर आतापर्यंत गोपनीय असलेली माहितीची देवाणघेवाण करायच्या कराराला मान्यता दिली आहे. आणि २०१९ पासून भारताबरोबर या माहितीची देवाणघेवाण सुरू होईल असे म्हटले जात आहे. या माहितीची खरोखरच उपयुक्तता किती असेल हे बघायचे आणि उपयुक्त माहितीच स्वित्झर्लंडकडून दिली जाईल अशी अपेक्षा करू.
यावर उपाय म्हणून हजसाठी मुंबईतून एकही प्रवासी जाता कामा नये.पूर्वी बाळ ठाकरे मातोश्रीवर वातानुकुलीत खोलीत बसून श्वेत वाईनचे घुटके घेत "मुंबईतून एकही प्रवासी हाजला जाऊन देणार नाही" अशा धमक्या 'सामना'तून द्यायचे. आता अशा धमक्या इंग्लंडहूनही यायला लागल्या आहेत असं दिसतंय.