Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी : सप्टेंबर '१७

त
तुषार काळभोर
Wed, 08/30/2017 - 04:44
🗣 168 प्रतिसाद
१) राज्याच्या बहुतेक भागाला पावसाने झोडपले असून, विशेषतः मुंबईत परिस्थिती चिंताजनकझाली आहे. पावसाचे पाणी ट्रॅकवर साठून राहिल्याने कित्येक तास लोकलसेवा बँड असल्याने तसेच पाणी साठलेल्या रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतूक कोलमडली होती. आता पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती हळू हळू सुधारतेय. २) डोकलाम प्रश्न तूर्तास सुटल्याचे दिसतेय. पंतप्रधानांच्या ब्रिक्स परिषदेसाठी चीन दौऱ्याआधी हे झालेय. मात्र भारत व चीनच्या बाजूने वेगवेगळ्या अर्थाच्या बातम्या आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांतसुद्धा याविषयी मतांतरे आहेत. दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेतल्याचे भारताने म्हटलेय, तर भारताने घुसवलेले सैन्य माघारी घेतल्याचे चीनने म्हटलेय. अ) भारताने सैन्य मागे घेणे: भारतासहित सर्वजण असेच म्हणतात. ब) चीनने सैन्य मागे घेणे: असे फक्त भारत म्हणतोय. काही ठिकाणी चीन तिथे गस्त सुरू ठेवणार असल्याच्या बातम्या आहेत. क) डोकलाम प्रश्नाच्या मुळाशी असलेला चीनने बांधलेला रस्ता: चीन हे काम सोडून देणार की चालू ठेवणार, यावर कुठेच स्पष्टीकरण दिसले नाही. BBC सहित बऱ्याच ठिकाणी डोकलाम प्रकरणी चीनचा विजय झालाय, अशा अर्थाच्या बातम्या आहेत.
वर्गीकरण
घडामोडी

प्रतिक्रिया द्या
49380 वाचन

💬 प्रतिसाद (168)
प
प्रसाद_१९८२ Wed, 08/30/2017 - 07:55 नवीन
मुंबईचा सध्याचा महापौर अगदिच मंदबुद्धीचा माणुस आहे असे दिसते. काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने, सर्व मुंबई पाण्याखाली गेली होती. यावर पत्रकारांनी या महापौरांना विचारले की 'पावसाळ्यात मुंबईच्या कोणत्याही भागात पाणी भरणार नाही हा तुमचा दावा आजच्या पावसाने फोल ठरवला आहे' ह्या प्रश्नावर हे महापौर उलट पत्रकारांवरच उखडले की तुम्ही मुंबई बाहेरचे पाण्याचे फुटेज दाखवून शिवसेनेला उगाचच बदनाम करत आहात व मुंबईत आमचे सहाच्या सहा पंपिग स्टेशन आज सुरु आहेत म्हणुन नशिब समजा. नाहितर मुंबईकर जनतेचे ह्याहून वाईट हाल झाले असते.
  • Log in or register to post comments
आ
आर्य Wed, 08/30/2017 - 09:10 नवीन
मुंबईचा (सेनेचा) महापौर कायमच बोलका भावला ठरला आहे, त्याचा बोलवता धनी कोण हे सर्व श्रुत आहेच. भ्रष्टाचार, पदाचा-गैरवापर आणि वितंडवाद हा ठरलेलाच, त्यात दुसरे साहेब अधुन मधुन शिळ्याकढीला उत आणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ज
जेम्स वांड गुरुवार, 08/31/2017 - 03:43 नवीन
पैलवानजी, -भारताला 'गस्त घालण्यावर' काहीच आक्षेप नव्हता, आक्षेप होता तो विवादित पट्ट्यात इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात - चीन अजून तिथं गस्त घालणार आहेच, त्यात नवाई नाही, पण चीन ने तिथून कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट , अर्थ मूव्हर्स, वगैरे काढून मागे घेतलेत, अर्थात चीन सपाटून नाकावर आपटला आहे. - हे बांधकाम साहित्य, मशिनरी वगैरे मागे घ्यायचं कारण चीन नुसार 'खराब वातावरण' आहे, पुढे त्यांचे अधिकृत वक्तव्य म्हणते की 'वातावरण' साफ झाले तर 'पुढे बांधकाम सुरू ठेवायचा विचार' करता येईल. करूच वगैरे काही बोललेले नाहीत ते अद्याप तरी इतपत माझी माहिती आहे
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 08/31/2017 - 06:18 नवीन
नोटबंदीनंतर रु. १००० च्या जवळपास ९९% नोटा बँकेत जमा झाल्या आहेत. १५.४४ लाख कोटी नोटांपैकी १५.२८ लाख कोटीच्या नोटा परत बँकेत जमा झाल्या आहेत. विरोधक म्हणतात हे अपयश आहे तर जेटली म्हणतात काहींना नोटाबंदी काय हे समजलंच नाही ! एवढ्या मोठ्या डोंगराएवढया मोहिमेचे फलित हे एवढे छोटे ? टेरर फंडींग ला आळा बसलाय, टॅक्स कलेक्शन वाढलेय असे आता मंत्री सांगतात मात्र हे या मोहिमेचे मुख्य उद्देश होते काय ? खरंच मलाही समजत नाहीये !
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 08/31/2017 - 07:16 नवीन
++१११ बहुतांश काळा पैसा परत माघारी येणार नाही असेच उद्दिष्ट्य सांगितले गेले होते ना. आता म्हणतात आम्हाला अपेक्षा होती की सगळा पैसा माघारी येईल म्हणून. आता आलेल्या पैशावर डेटा अ‍ॅनालिसिस करून यातला काळा पैसा हुडकला जाईल असे म्हणत आहेत. पण हा टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचा खर्च आहेच ना अजून. पण प्रश्न विचारले की अंगावर धावून येतात भाजपवाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 08/31/2017 - 08:57 नवीन
जेटली म्हणतात तेच बरोबर आहे. लोकांना नोटाबंदी काय आहे हे समजलं असतं तर नोटाबंदी नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये ह्यांच्या पक्षाला निवडून दिलेच नसते.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य गुरुवार, 08/31/2017 - 09:05 नवीन
@ डोकला / डोकलाम आता पुन्हा पुढच्या वर्षी बर्फ वितळायला सुरवात झाली की एप्रिल-मे मध्ये ह्या नाट्याचा पुढचा अंक सुरु होईल. :-) भारत-चीन या दोन दादा लोकांनी दंड थोपटले आणि नूरा कुस्तीचा प्रयोग केला, त्यात खरा कस लागला तो भूतान ह्या पिटुकल्या राष्ट्राचा. त्यांच्या हुशार विदेश विभागाने नाजूक हातांनी गुंता सोडवण्याचे काम केले आहे - पण तसे कोणीच मान्य करणार नाही. वाद सुरु झाला, म्हणजे ह्यावर्षी जुलै पासून आजवर दिल्लीतील चिनी दूतावासातील डझनावारी अधिकारी, अनेक चिनी विद्वान आणि महनीय व्यक्ती 'पर्यटनासाठी' भूतानमध्ये गेल्या. त्यांनी काय कमी दबाव टाकला असेल? सोबतीला चीनची 'चेकबुक डिप्लोमसी' पण असेलच. पण ह्या देशाचे सरकार चीनला फार न फाटकारताही भारताच्या बाजूने ठाम राहिले. अर्थात हे भारतीय विदेश मंत्रालयाचेही यश आहे. भूतानच्या तिसऱ्या लोकसभेसाठी पुढीलवर्षी मतदान आहे. सध्या भूतान-चीनमध्ये थेट राजनयिक संबंध नाहीत. ते स्थापित व्हावेत अशी 'जनतेची इच्छा' असल्याची कुजबुज सुरु झाली आहे - मतदानावर प्रभाव टाकू शकणारा हा मोठा मुद्दा आहे. तरीही भारत आणि चीनप्रमाणे कोठल्याही स्व-स्तुतीच्या प्रतिक्रिया तेथिल मीडियात नाहीत. माझ्या मते हे तेथील सरकार आणि जनतेच्या परिपक्व्तेचे लक्षण आहे. - अनिंद्य
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sun, 09/03/2017 - 11:54 नवीन
तुम्ही म्हणताय ते पटतंय. त्याच आशयावरील एक उत्तम लेख वाचला खाली त्याची लिंक देतोय Giving Bhutan its due खालील लेखातील एक वाक्य In Doklam stand-off, the Himalayan kingdom once again came to the rescue of India’s interests, with costs to itself.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य
अ
अनिंद्य Sun, 09/03/2017 - 14:01 नवीन
@ अमितदादा, ज्या तेनसिंग नावाच्या भूतानी वृत्तपत्राच्या संपादकांनी हे लिहिलंय त्यांनी डोकलाम वादानंतर थिम्पूत घडलेल्या घटना जवळून बघितल्या आहेत ह्याबद्दल मला शंका नाही. म्हणूनच - "खरा कस लागला तो भूतान ह्या पिटुकल्या राष्ट्राचा. त्यांच्या हुशार विदेश विभागाने नाजूक हातांनी गुंता सोडवण्याचे काम केले आहे - पण तसे कोणीच मान्य करणार नाही." असे लिहिले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
ज
जेम्स वांड Sun, 09/03/2017 - 12:06 नवीन
तरीही भारत आणि चीनप्रमाणे कोठल्याही स्व-स्तुतीच्या प्रतिक्रिया तेथिल मीडियात नाहीत. माझ्या मते हे तेथील सरकार आणि जनतेच्या परिपक्व्तेचे लक्षण आहे. माझं मत ह्यावर थोडं वेगळं पडतंय, भारत चीनने जे 'तथाकथित' चेस्ट थांपिंग केलंय, ते नेमकं निर्बुध्द अपरिपक्व चेस्ट थंपिंग होतं का ते हिशेबी 'सॉफ्टपॉवर प्रोजेक्शन' होतं, हे एकदा परत पाहायला हवंय. भूतानला सॉफ्ट पॉवर प्रोजेक्शन करण्याची गरजही नाही अन त्यांना शक्यही नाही, भारत चीनचं वेगळं पडतं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य
अ
अनिंद्य Sun, 09/03/2017 - 14:13 नवीन
@ जेम्स वांड, मी अन्यत्र लिहिल्याप्रमाणे स्वतःच्या शेजाऱ्यांशी वाद घालण्याचा चीनला दांडगा अनुभव आहे. पण डोकलामच्या ह्या नूरा कुस्तीत चीनचा रोल आजपर्यंतच्या इतिहासातील वेगळा रोल होता, a little different flavour. म्हणून ही कुस्ती जरा जास्त रंगली :-) आता वाट पुढच्या जत्रेची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
स
सतिश गावडे गुरुवार, 08/31/2017 - 10:37 नवीन
अगदीच सपक आणि मिळमिळीत धागा. यात कुठेच राजकीय पक्षांची लाल केलेली नाही. याला ताज्या घडामोडीचा धागा का म्हणावे हा प्रश्न आहे. मात्र अजूनही नेहमीचे यशस्वी प्रतिसादकर्ते ही उणीव भरुन काढतील अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 09/01/2017 - 09:52 नवीन
नोटाबन्दी आणि जीएस्टी हे दोन मसाले आहेत , धागा सुपर हिट्ट होनारच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ज
जेम्स वांड Fri, 09/01/2017 - 09:58 नवीन
फॅक्ट आर स्टबर्न, स्टॅट्स आर मोर प्लायेबल असं हरहुन्नरी मार्क ट्वेन म्हणून गेला होता बुआ, आपल्याला सोयीचा पडेल असा गुंडाळला जाणारा आकड्यांचा पुंजका म्हणजे सांख्यिकी ही सगळ्यात मोठी दुर्दैवी बाब होय ह्या सुंदर विषयाची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
संग्राम गुरुवार, 08/31/2017 - 12:46 नवीन
वित्तमंत्री अरुण जेटली यांनी घोषणा केली आहे की जुलै मध्ये ६४ टक्के जी एस टी जमा झाला आहे ... http://economictimes.indiatimes.com/small-biz/policy-trends/gst-collections-for-july-exceeded-target-finance-minister-arun-jaitley/articleshow/60289845.cms इथे काही धाग्यांवर प्रतिसादकर्ते त्यांचे जी एस टी बद्द्ल अनुभव सांगणार होते .. पण अजून वाचण्यात आले नाही म्हणून विचारत आहे ...
  • Log in or register to post comments
अ
अभिदेश गुरुवार, 08/31/2017 - 17:02 नवीन
भारताचा ह्या तिमाहीचा GDP growth हा अतिशय निराशाजनक. ह्या वर्षी केवळ ५.७% , तुलनेने मागच्या वर्षी हा ७.९% होता. हा चीनपेक्षाही कमी झालेला आहे. म्हणजेच नुसती हवेतली आश्वासने , कृती शून्य असा प्रकार आहे. रोजगार निर्मिती सुद्धा ठप्प.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 09/03/2017 - 05:05 नवीन
नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल आज होत आहे. Cabinet reshuffle: 9 new ministers to take oath today. All you need to know about them मंत्रिमंडळ विस्तारात 9 नव्या चेहऱ्यांना संधी : सूत्र या सगळ्या घडामोडींमध्ये एनडीएच्या कुठल्याही मित्रपक्षाला मोदींनी फेरबदलात स्थान दिलेलं नाही. त्यामुळे शिवसेना आणि जेडीयूचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे. दुसऱ्या एका बातमी नुसार महत्वाच्या संरक्षण खात्यासाठी सुषमा स्वराज, नितीन गडकरी व सुरेश प्रभू यांनी नवे चर्चेत आहेत. सहा जुन्या व अपेक्षित कार्यक्षमता नसलेल्या मंत्र्यांना जावं लागलंय. त्यात पंचाहत्तरी पूर्ण करणाऱ्या कलराज मिश्रा यांचा समावेश आहे. त्यांना बहुतेक कुठेतरी राज्यपाल बनवून पाठवले जाईल. (अवांतर: बरीच राज्यपाल पदे रिक्त आहेत व त्यामुळे त्या राज्यांचा राज्यपालपद दुसऱ्या राज्याच्या राज्यपालांकडे अतिरिक्त दिलेले आहे.) नवे ९ चेहरे हे आपापल्या क्षेत्रातील मातब्बर आहेत शिवाय सर्व जण उच्च शिक्षित आहेत. उच्चशिक्षित असणं हे चांगल्या कामगिरीचं लक्षण नसलं, तरी कमी/अर्ध/अशिक्षित चेहऱ्यांपेक्षा असे लोक मंत्रिमंडळात असणं जास्त चांगलं. पुणे/मुंबई/नागपूरचे माजी पोलीस आयुक्तसत्यपाल सिंग यांचीमंत्रिमंडळात वर्णी लागलीये.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 09/03/2017 - 07:09 नवीन
Warned government about cost of demonetisation, former RBI governor Raghuram Rajan says रिजर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी (त्यांचा कार्यकाळ सप्टेंबर'१६ मध्ये संपायच्या सुमारे सहा महिने आधी फेब्रुवारी'१६ मध्ये) केंद्राला इशारा दिला होता की नोटबंदीचे अल्पकालीन तोटे हे दीर्घकालीन फायद्यांपेक्षा खूप जास्त असतील. शिवाय काळ्या पैशाविषयी कारवाई करायचे पर्यायी मार्गही सुचवले होते. केंद्राने रिजर्व बँकेला नोटबंदीविषयी विचारणा केल्यावर, राजन यांनी केंद्राकडे हे मत व्यक्त केले होते. मात्र रिजर्व बँकेतर्फे नोटबंदी प्रक्रियेची आवश्यक ती माहितीसुद्धा केंद्राला देण्यात आली होती.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sun, 09/03/2017 - 11:16 नवीन
नोटबंदी बाबत लिहण्यासारखं आता काही राहील नाही. रघुराम राजन यांचं ताज वाक्य "Certainly at this point, one cannot in anyway say it has been an economic success" पण अर्थतज्ञाना विचारता कोण म्हणा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ज
जेम्स वांड Sun, 09/03/2017 - 10:35 नवीन
माझ्यालेखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्मला सीतारामन ह्यांना संरक्षण मंत्रिपद देण्यात आले आहे. मूळच्या तामिळनाडूच्या असणाऱ्या सीतारामन जेएनयू मधून अर्थशास्त्रात पीएचडी असून त्यांनी प्राईजवॉटरहाऊस कूपर्स सारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम केलं आहे तसंच त्यांनी बीबीसी वर्ल्ड मध्ये पण काम केलं आहे. त्यांना पुढील कामाकरिता शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sun, 09/03/2017 - 11:07 नवीन
निर्मला सीतारामन ह्या अत्यंत हुशार आहेत पण संरक्षण मंत्रालय सारख डेलिकेट मंत्रालय कसे संभाळतायत हे भविष्यात दिसेलच. थोडीशी आश्चर्यकारक निवड. तसेच त्या अर्थशास्त्रात phd नसून व्यापार (कॉमर्स/ट्रेड) ह्या विषयात phd आहेत. पियुष गोयल यांना रेल्वे आणि प्रभू यांना व्यापार/कॉमर्स ही खाती देऊन उचित निवड आहे असे वाटते. बाकी माजी IFS आणि IAS अधिकाऱयांना योग्य ती खाती मिळावी ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Sun, 09/03/2017 - 11:35 नवीन
सॉरी बरंका ! ते आचार्य पदवी विषयाचा थोडा गोंधळच उडाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
म
मराठी_माणूस Mon, 09/04/2017 - 08:17 नवीन
http://www.loksatta.com/kathaaklechya-news/us-pressure-on-indian-patent-law-1163697/ ह्या लेखात लेखीकेने व्यक्त केलेले मत खुप मह्त्वाचे आहे.(शेवटुन दुसरा परीच्छेद)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ग
गामा पैलवान Sun, 09/03/2017 - 13:44 नवीन
अमितदादा, खालील लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद! :-)
In Doklam stand-off, the Himalayan kingdom once again came to the rescue of India’s interests, with costs to itself.
साधारणत: लेख पटला. भूतानचीन सीमांच्या डोकलाम वगळता इतर बाबी भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या नसल्याने भारताने फारसं लक्ष घातलं नाही. या बाबतीत भूतानला हानी सोसावी लागली आहे असा लेखाचा एकंदरीत सूर आहे. तो बरोबरही आहे. मात्र एक गोष्ट इथे ध्यानी घ्यायला हवी. ती म्हणजे भूतानपुढे तिबेटचं लखलखीत चक्ष्वैसत्यं उदाहरण खडं आहे. चिन्यांनी तिबेट वन त्याची जी काही वाट लावली आहे ती भूतानला फारंच ढळढळीतपणे दिसते आहे. त्या वाटेने जायचं नसेल आणि भूतानची स्वत:ची संस्कृती टिकवायची असेल तर भारतासोबत राहणेच हिताचे आहे. यामुळे इतरत्र थोडी झळ सोसावी लागली तरी भूतान भारतास झुकतं माप देण्यास राजी आहे. नेमकी हीच बाब चीनला खटकते आहे. म्हणून की काय चीनने भूतांनी जनतेच्या इच्छेची कुजबूज प्रजोजित केलेली वाटते. अरुणाचलातही भारताबद्दल आत्मीयता याच कारणामुळे आहे. चिन्यांचा कोणालाही अगदी दस्तुरखुद्द चीनच्या नागरिकांनाही भरंवसा वाटंत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भारताने जनरल सुंदरजींच्या नेतृत्वाखाली १९८७ साली चीनला जबर मार दिला होता. त्यानंतरच चीनने बोलणी करण्याची भूमिका घेतली. म्हणून जेव्हा चीन राजनैतिक विजय मिळवल्याची बढाई मारतो तेव्हा खरंतर तो भारताच्या रणनीतीचा विजय असतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 09/03/2017 - 13:56 नवीन
चिन्यांनी तिबेट वन = चिन्यांनी तिबेट व्यापून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ल
लिओ Mon, 09/04/2017 - 17:26 नवीन
उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथेही ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने गेल्या महिन्याभरात ४९ मुलं दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळेच या मुलांचा मृत्यू झाल्याचं तपास अहवालात निष्पन्न झाल्यावर स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. http://www.hindustantimes.com/india-news/49-infants-die-in-up-s-farrukhabad-hospital-probe-blames-lack-of-oxygen-dm-and-senior-doctors-transferred/story-JGNxpubfXzCRnluVVUE79I.html
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 09/05/2017 - 22:47 नवीन
राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यात Artificial Intelligence वर बोलणार आहे!
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 09/05/2017 - 22:48 नवीन
राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यात Artificial Intelligence वर बोलणार आहे!
  • Log in or register to post comments
थ
थिटे मास्तर Tue, 09/05/2017 - 23:19 नवीन
सुप्रसिद्ध जेष्ठ पुरोगामि पत्रकार गौरी लंकेश ह्यांची बंगलोर मध्ये निर्घुण हत्या. RIP.
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 09/06/2017 - 21:28 नवीन
गौरी लंकेश यांना श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थिटे मास्तर
ज
जेम्स वांड गुरुवार, 09/07/2017 - 05:47 नवीन
असं मला माझा धर्म शिकवतो, केवळ म्हणूनच गौरी लंकेश ह्यांना श्रद्धांजली असं म्हणून मी गप बसतो ____/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
पुंबा Wed, 09/06/2017 - 08:24 नवीन
लंकेश यांना आदरांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. एवढ्या लिंका लागूनदेखिल ४ ही केसमधील मारेकर्‍यांचा पत्ता कसा लागत नाही ही मोठी गूढ बाब आहे आणि स्टेट म्हणून भारतासाठी शरमेची बाबसुद्धा..
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 09/07/2017 - 13:15 नवीन
४ नव्हे ७० प्रेस रिलेटेड किलिंग्ज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
श
श्रीगुरुजी Wed, 09/06/2017 - 14:15 नवीन
गौरी लंकेश यांना श्रद्धांजली. त्यांच्या मारेकर्‍यांना लवकरात लवकर पकडून जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. त्यांची हत्या अत्यंत निंदनीय आहे. अशा हत्यांचा व लगेचच त्याबद्दल हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरून तपासाची सुई एका विशिष्ट दिशेने वळविण्याचा एक पॅटर्न दिसत आहे. सप्टेंबर २००८ मध्ये मालेगाव मध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर सुरवातीला काही मुस्लिमांची चौकशी सुरू होती. एक दिवस पवारांनी सांगितले की "मशिदीत बाँबस्फोट करणारा मुस्लिंम असूच शकत नाही. यामागे मुस्लिम नसून दुसरेच कोणतरी आहेत.". असे सांगून त्यांनी तपासाच्या सुईची दिशा १८० अंशाने वळविली. त्यानंतर काही दिवसांतच साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल श्रीकांत पुरोहित, दयानंद पांडे, असीमानंद इ. १०-११ हिंदूंना बाँबस्फोटासाठी अटक केली. नंतर त्यांना मोक्का लावण्यात येऊन तब्बल ९ वर्षे विनाखटला, विनाआरोपपत्र, विनाजामीन तुरूंगात डांबण्यात आले. मागील ९ वर्षांत त्यांच्याविरूद्ध पुरावा जमविता आलेला नाही. त्यामुळे २-३ महिन्यांपूर्वी साध्वी प्रज्ञासिंहला व काही दिवसांपूर्वी कर्नल पुरोहितांना तब्बल ९ वर्षानंतर जामीनावर सोडण्यात आले. परंतु यामागे वेगळीच योजना होती. बाँबस्फोटासाठी हिंदू संघटनांना जबाबदार धरण्यात आले. त्याचवेळी २६/११ च्या हल्ल्यात कसाब व त्याच्या साथीदारांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यात या बाँबस्फोटाचा तपास करणारे हेमंत करकरे शहीद झाले. त्यांच्या मृत्युबद्दलसुद्धा संशय निर्माण करण्यात आला व असे पसरविले गेले की त्यांनी बाँफस्फोटात हिंदू संघटनांना अडकविल्यामुळे हिंदू संघटनांनीच त्यांना मारले. एप्रिल-मे २००९ मध्ये लोकसभेची निवडणुक होती. या निवडणुकीत भाजपला बॅकफुटवर नेण्यासाठी या अटकांचा भरपूर उपयोग करण्यात आला. याचा फायदा काँग्रेसला २००९ मध्ये झाला. काँग्रेसला २००४ च्या तुलनेत लोकसभेत व विधानसभेत जास्त जागा मिळाल्या. आता काँग्रेसला यशाचा एक नवीन फॉर्म्युला सापडला होता. २०१४ मध्ये लोकसभा व महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक होती. ऑगस्ट २०१३ मध्ये दाभोळ्करांना मारण्यात आले व त्यांच्या खुनानंतर काही क्षणातच तपासाची सुई पुन्हा एकदा सनातन या हिंदू संघटनेकडे वळविण्यात आली. सुरवातीचे २-३ आठवडे पोलिस या दिशेनुसार सनातनचा तपास करीत होते. त्यामुळे खर्‍या खुन्यांना निसटून जायला, पुरावे नष्ट करायला भरपूर वेळ मिळाला. खुनाच्या स्थळाच्या आसपास असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून जे चित्रण मिळाले त्यातून खून करणार्‍या दोघांची चित्रे तयार करण्यात आली. परंतु ते आजतगायत सापडलेले नाहीत. सनातनच्या तपासातून काहीच निष्पन्न न झाल्याने काही महिन्यांनंतर नागोरी व खंडेलवाल या बेकायदा शस्त्रे विक्री करणार्‍यांना खुनाच्या आरोपाखाली पकडण्यात आले. त्यांच्या तपासातूनही काहीच निष्पन्न न झाल्याने त्यांना सोडावे लागले. नंतर जवळपास ३ वर्षानंतर सनातनच्या वीरेंद्र तावडेला पकडण्यात आले. तो मागील १५ महिने तुरूंगात आहे. त्याच्याविरूद्धसुद्धा काहीही पुरावा मिळाला नाही. आता विनय पवार व सारंग अकोलकर यांची नावे पुढे आणली आहेत. खुनींची आधी प्रसिद्ध केलेली चित्रे व विनय पवार आणि सारंग अकोलकर यांच्यात काहीही साम्य नाही. एकंदरीत मागील ४ वर्षात खरे खुनी सापडलेले नाहीत. परंतु सनातनला झोडपणे सुरू आहे. दाभोळकरांच्या खुनानंतर जाणूनबुजून तपासाची दिशा भरकटविण्यात आली हे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसने या खुनाचाही वापर २०१४ च्या निवडणुकीवर डोळा ठेवून केला होता. दाभोळकरांच्या खुनामागे एखादी वेगळी थिअरी असू शकते. माझे व्यक्तिगत मत असे आहे की या खुनामागे तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमधील कोणतरी तगडा नेता असावा कारण २००९ प्रमाणे खुनाचे बालंट हिंदुत्ववादी संघटनांवर ढकलून त्याचा फायदा २०१४ च्या निवडणुकीत मिळविण्याचा डाव असण्याची शक्यता आहे. काल गौरी लंकेश यांचा झालेला खून हा याच योजनेचा भाग असावा. अजून ८ महिन्यांनी एप्रिल-मे २०१८ मध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणुक आहे. त्याआधी गुजरात व हिमाचल प्रदेशची निवडणुक आहे. काल हा खून झाल्यावर लगेचच त्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरणे सुरू झाले आहे. २००८ व २०१३ मध्ये अगदी असेच झाले होते. कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकार अत्यंत अकार्यक्षम सिद्ध झाले आहे. त्यामुळेच त्यांनी टिपू जयंती साजरी करण्यासारखे कार्यक्रम सुरू करून राज्यात जातीय विष पेरण्याचे काम सुरू केले आहे. मागील १-२ महिन्यांपासून कर्नाटकमध्ये कन्नड विरूद्ध हिंदी हा वाद भडकविला जात आहे. एकंदरीत २०१८ मधील निवडणुक जिंकण्यासाठी लोकांमध्ये फूट पाडणे व लोकभावना भडकावणे अश्या सोप्या युक्त्या सिद्धरामय्याने वापरायला सुरूवात केली आहे. कालच्या खुनाने त्यांना हिंदुत्ववादी संघटनांना झोडपायला नवीन संधी मिळाली आहे. यापूर्वी झालेल्या दाभोळकर, पानसरे व कलबुर्गींच्या खुनातील एकही आरोपी सापडलेला नाही. त्या खुनांमागचे हेतू समजलेले नाहीत. खुनातील शस्त्रे व वाहने सापडलेली नाहीत. तपासात आजवर कोणतीही माहित मिळालेली नसताना अजूनपर्यंत खुनासाठी हिंदू संघटनांना जबाबदार धरणे सुरू आहे. या तिघांनी धर्मचिकित्सा केल्यानेच त्यांना हिंदुत्ववादी संघटनांनी मारले हा निष्कर्ष निधर्मांधांनी केव्हाच काढला आहे आणि तोसुद्धा अजूनपर्यंत कणभरही पुरावा मिळालेला नसताना. माझ्या मते गौरी लंकेश यांच्या खुनामागे २-३ कारणे संभवितात. त्या सातत्याने हिंदू संघटना, भाजप यांच्यावर टीका करीत होत्या. खुनामागे हे एक कारण असू शकते. परंतु भारतात अनेकजण हिंदू संघटना व भाजप यांच्यावर अत्यंत जहरी टीका करतात. त्यातील कोणाचेही खून या संघटनांनी केल्याचे आजवर सिद्ध झालेले नाही. त्यामुळे ही शक्यता अत्यल्प आहे. खुनामागील दुसरे कारण म्हणजे वर नमूद केल्याप्रमाणे निवडणुकीत फायदा मिळविण्यासाठी त्यांचा खून करून त्याचे बालंट हिंदू संघटनांवर ढकलायचे. यामागे कर्नाटकातील सत्ताधारी पक्ष असू शकतो. मागील वर्षी कर्नाटकातील गणपती नावाच्या एका एसीपीच्या आत्महत्येसाठी कर्नाटक सरकारमधील एक मंत्री जॉर्ज व त्याचे दोन मुलगे जबाबदार होते. खुनामागे अजून एक कारण असू शकते. गौरी लंकेश एक टॅब्लॉईड चालवायच्या. त्या भाजप व हिंदू संघटनांवर कठोर टीका करायच्या. केजरीवालांप्रमाणे त्या अनेकांवर बेलगाम आरोप करायच्या. मागील वर्षी भाजपचे खासदार प्रल्हाद जोशी यांच्यावर केलेल्या बेलगाम आरोपांमुळे प्रल्हाद जोशींनी त्यांच्यावर बदनामीचा खटला भरला होता. त्या खटल्याचा निकाल लागून गौरी लंकेश यांना ६ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली होती. सध्या त्या जामीनावर बाहेर होत्या. टॅब्लॉईड चालविणारे काही जण ब्लॅकमेलिंगमध्ये गुंतलेले सापडले आहे. आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून समाजातील प्रभावशाली व्यक्तींविरूद्ध स्टिंग ऑपरेशन किंवा इतर तत्सम साधने वापरून पुरावी गोळा करायचे व पुराव्यांची भीति दाखवून त्या व्यक्तींना ब्लॅकमेल करण्याची काही प्रकरणे पूर्वी उघडकीला आली आहेत. तहलका, कोब्रापोस्ट इ. टॅब्लॉईड्स बदनाम आहेत. गौरी लंकेश सुद्धा अशाच प्रकरणात असल्या तर खुनामागे तेसुद्धा कारण असू शकते. काही काळापूर्वी त्यांचा स्वत:च्या भावाशी प्रेसच्या मालकीवरून वाद झाला होता व भावाने त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिली होती. तसेच त्यांचे नक्षलींशीही संबंध होते. या अंगाने सुद्धा तपास होणे जरूर आहे. एकंदरीत या खुनामागे अनेक कारणे असू शकतात. असे असताना व खुन्यांबद्दल कोणतीही माहिती व पुरावे नसताना खुनानंतर काही वेळातच लगेच त्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरणे हे अत्यंत निषेधार्ह आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 09/06/2017 - 14:38 नवीन
१. प्रज्ञा सिंग आणि श्रीकांत पुरोहित फक्त जामिन्यावर सुटले आहेत. दोघांची निर्दोष मुक्तता झालेली नाही आहे. त्यामुळे निकर्षांपर्यंत पोहचण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागेल. २. भले दाभोलकरांची हत्या आघाडी सरकारच्या काळात झाली होती आणि पानसरेंची युती सरकारच्या काळात. आताचे सरकार खरे मारेकरी शोधण्यात कोठे कमी पडत आहेत? ३. गौरी लंकेश: एकंदरीत या खुनामागे अनेक कारणे असू शकतात. असे असताना व खुन्यांबद्दल कोणतीही माहिती व पुरावे नसताना खुनानंतर काही वेळातच लगेच त्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरणे हे अत्यंत निषेधार्ह आहे....याबद्दल सहमत.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 09/06/2017 - 15:19 नवीन
विशुमित,
दोघांची निर्दोष मुक्तता झालेली नाही आहे.
दोघांवर आरोप कसले आहेत? त्याचीपण चिकित्सा करावी म्हणतो मी. आरोप नसतांना तुरुंगात डांबून ठेवणं कितपत योग्य? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ट
ट्रेड मार्क Wed, 09/06/2017 - 17:00 नवीन
१. नऊ वर्ष झाली तरी अजून आरोपपत्र सुद्धा दाखल करू शकले नाहीत. विना आरोपपत्र अटक करता यावी म्हणून मोक्का लावला. आता मोक्का संघटित गुन्हेगारी साठी बनवलेला कायदा आहे. मालेगाव बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला मानायचा का संघटित गुन्हेगारीचा प्रकार? बोभाटा झाला हिंदू दहशतवादाचा पण ते सिद्ध करण्यासाठी कुठलेच पुरावे सापडले नाहीत, त्यामुळे मोक्का लावावा लागला. मोक्का कायद्याप्रमाणे एकाच गुन्ह्यात सहभाग असेल तर मोक्का लावता येत नाही. म्हणून आधीच्या मुंबई लोकल बॉम्बस्फोटाच्या खटल्यात या दोघांचे नाव घुसडले गेले. पण दोन्ही खटल्यात या दोघांविरुद्ध कुठलाच पुरावा अजून गोळा करता आला नाहीये. एक हिंदू साध्वी तथाकथित पुरोगाम्यांच्या रडारवर असू शकते पण आर्मीतला कर्नल का यात गोवण्यात आला असावा? देशांतर्गत दहशतवादी कारवायांची माहिती हल्ले होण्याआधीच काढून ते हल्ले अयशस्वी करण्यात कर्नल पुरोहित यांचा सहभाग होता असं म्हणतात. मग त्यांना टारगेट करण्याचं हे कारण असावं का? दहशतवादी आणि भारत विरोधी कारवाया करणाऱ्यांच्या मानवी हक्कांसाठी गळे काढणाऱ्या कोणालाच ९ वर्ष विनापुरावे आणि विना आरोप जेल मध्ये टाकल्या गेलेल्या या दोघांसाठी आवाज उठवावासा वाटलं नाही. याच दुटप्पीपणासाठी ही तथाकथित पुरोगामी जमात मला आवडत नाही. २. तेव्हाची सरकारे कुठे कमी पडली? का त्यांनी तटस्थपणे शोध न घेता उगाच सनातन व इतर हिंदू संस्थांकडे लक्ष वळवलं? कदाचित पुरावे नष्ट करायचे असावेत का? CCTV वर मारेकऱ्यांची छबी सापडून सुद्धा तत्कालीन सरकारला मारेकरी सापडले नाहीत, ना हत्यारे सापडली ना कुठले पुरावे. मग या परिस्थितीत नंतर आलेल्या सरकारने काय करणं अपेक्षित आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सुबोध खरे Wed, 09/06/2017 - 16:32 नवीन
@विशुमित आताचे सरकार खरे मारेकरी शोधण्यात कोठे कमी पडत आहेत? डॉ दाभोळ्करांची हत्या ऑगस्ट २०१३ मध्ये झाली ( महाराष्ट्रात) आणि श्री कलबुर्गी यांची हत्या ऑगस्ट २०१५ मध्ये कर्नाटकात झाली. तरी बरं त्या वेळेस दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे सरकारच होते. मग आताचे सरकार मारेकरी शोधण्यात कमी पडत आहेत हे विचारणे आपला पूर्वग्रह दाखवतो आहे. मग तेथे भाजपचे सरकार असते तर काय म्हणाला असतात?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 09/06/2017 - 17:13 नवीन
अजून घडामोडी मध्ये भाऊ कदम आला नाही की अस्ट्रोसिटीमुळे सगळे शांत आहे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/07/2017 - 07:44 नवीन
आजचा विनोद - हिंदुस्थानच्या भररस्त्यावर एका महिला पत्रकाराची हत्या व्हावी हे कसले लक्षण समजायचे? तिचे विचार व भूमिका कदाचित कुणाला पटत नसतील. तिच्या लिखाणाने व भूमिकेने कुणी अस्वस्थ झाले असतील, म्हणून त्या निःशस्त्र महिलेवर अशाप्रकारे निर्घृण हल्ला करणे हे अमानुष आहे. मानवता व देशाच्या इभ्रतीस कलंक लावणारे आहे. हे शौर्य नाही व मर्दानगीचा जयही नाही. - शूर वाघोबा उद्धट ठाकरे हे वाचल्यानंतर का कोणास ठाऊक, पण मलिष्का, पालघरच्या मुली, नगरसेविका घोसाळकर इ. आठविले. http://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-attacks-on-bjp-over-gauri-lankesh-murder/articleshow/60401978
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 09/07/2017 - 08:17 नवीन
गेल्या तीन वर्षात २३ पत्रकारांची हत्या झाली आहे परंतु केवळ इंग्रजी भाषेत लिहीणार्या डाव्या विचारसरणीच्या पत्रकार गौरी लँकेश यांची हत्या झाल्यावर प्रेस्टिट्यूट्सनी( राजदीप सरदेसाई, सागरिका घोष, बरखा दत्त, शेखर गुप्ता आणि वीर संघवी) यांनी ट्विटरवरून "पत्रकारांच्या विचार स्वातंत्र्याची" कोल्हेकुई सुरु केली आहे. केवळ हलकट आणि दांभिक लोक आहेत. कारण बाकी २२ पत्रकार हे भारतीय भाषेत लिखाण करणारे होते आणि ते बुबुडविपुमाधवि( विचारवंत, बुद्धिवादी पुरोगामी इ इ )नव्हते पण ते लोकल गुंडांच्या विरुध्द्व लिहीत होते. त्या सर्व पत्रकारांची हत्येवरील चर्चेला "टी आर पी" मिळणार नव्हता https://twitter.com/aranganathan72?lang=en https://twitter.com/aranganathan72?lang=en
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 09/07/2017 - 10:37 नवीन
Some men are more equal ! चालायचंच !! -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गामा पैलवान गुरुवार, 09/07/2017 - 10:40 नवीन
तक्ता : Image removed. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
A
arunjoshi123 गुरुवार, 09/07/2017 - 13:32 नवीन
गौरींबद्दल त्यांनी जास्त ट्वीट करावं हे योग्य असेल, पण बाकी शांतता भयावह आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 09/07/2017 - 19:26 नवीन
वरील तक्त्यामधे महाराष्ट्रातील एकही पत्रकार नाहिये म्हणजे इथले सगळे पत्रकार, निर्भिड, निष्पक्ष, ताटाखालची मांजरे आहेत की इथले गुंड हे पत्रकारांचा आदर ठेवतात ? भाई तु तेरा काम कर मै मेरा ! अवांतर : २०१३ मधे शेखर चे ट्वीटर अकाऊंट नव्हते का ? तिकडे डॅश मारलाय म्हणून विचारले. आणि हे कोणी कोणत्या विषयावर किती ट्वीटस केले हे कसे मोजतात ? म्हणजे काही फॉर्मुला आहे की रोज लक्ष ठेवावे लागते की अमुक बाबाने अमुक विषयावर ट्वीट केले म्हणून ? कुतुहल म्हणून बरखा बाईंच्या ट्वीटर हँडलवर गेलो तर १,१३.००० इतके ट्वीटस दिसतात. केवढी एनर्जी लागत असेल ? शेवटचे ट्वीट कधी केले हे शोधायला स्र्कोल डाऊन करायला गेलो तर हात दुखायला लागला. वरचा तक्ता बनवणार्‍याला मानले पाहिजे. एवढी आकडेवारी तोंडावर फेकून मारायची ते पण असा प्रसंग घडल्यावर लगोलग तर केवढा अभ्यास करावा लागत असेल. की निव्वळ रँडम आकडे पकडून टेबल बनवितात ? मी अडाणीच राहिलो जगापेक्षा असे वाटतेय खरे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/07/2017 - 20:01 नवीन
वरील तक्त्यामधे महाराष्ट्रातील एकही पत्रकार नाहिये २-३ वर्षांपूर्वी मुंबईत पत्रकार जे डे यांचा खून झाला होता. काही पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत. हत्यांची अजून काही प्रकरणे सुद्धा असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
र
रानरेडा गुरुवार, 09/07/2017 - 20:26 नवीन
जे डे यांचा खून २०११ साली झाला होता . वरील आकडे २०१३ पासून चे आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
र
रानरेडा गुरुवार, 09/07/2017 - 20:34 नवीन
गुगल नावाची एक साईट आहे हे बहुदा आपल्याला माहित असावे , त्यात बऱ्याच गोष्टी शोधता येतात ... https://twitter.com/search-advanced?lang=en अजूनही बरीच तुका असावीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
थ
थिटे मास्तर गुरुवार, 09/07/2017 - 16:36 नवीन
रेल्वे मेक ईन ईंडीया. आज खंडाला आणखि कुठेतरी उत्तर भारतात.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 09/07/2017 - 17:02 नवीन
अधिक बातमी इथे ! कुणाचा जीव गेला नाही नशिब ! नाहितर पुन्हा नवीन रेल्वेमंत्री शोधावा लागला असता. प्रभुंनी राम बनण्याचा नादात उकाच स्वतःची विकेट टाकली.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा