Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी : सप्टेंबर '१७

त
तुषार काळभोर
Wed, 08/30/2017 - 04:44
🗣 168 प्रतिसाद
१) राज्याच्या बहुतेक भागाला पावसाने झोडपले असून, विशेषतः मुंबईत परिस्थिती चिंताजनकझाली आहे. पावसाचे पाणी ट्रॅकवर साठून राहिल्याने कित्येक तास लोकलसेवा बँड असल्याने तसेच पाणी साठलेल्या रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतूक कोलमडली होती. आता पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती हळू हळू सुधारतेय. २) डोकलाम प्रश्न तूर्तास सुटल्याचे दिसतेय. पंतप्रधानांच्या ब्रिक्स परिषदेसाठी चीन दौऱ्याआधी हे झालेय. मात्र भारत व चीनच्या बाजूने वेगवेगळ्या अर्थाच्या बातम्या आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांतसुद्धा याविषयी मतांतरे आहेत. दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेतल्याचे भारताने म्हटलेय, तर भारताने घुसवलेले सैन्य माघारी घेतल्याचे चीनने म्हटलेय. अ) भारताने सैन्य मागे घेणे: भारतासहित सर्वजण असेच म्हणतात. ब) चीनने सैन्य मागे घेणे: असे फक्त भारत म्हणतोय. काही ठिकाणी चीन तिथे गस्त सुरू ठेवणार असल्याच्या बातम्या आहेत. क) डोकलाम प्रश्नाच्या मुळाशी असलेला चीनने बांधलेला रस्ता: चीन हे काम सोडून देणार की चालू ठेवणार, यावर कुठेच स्पष्टीकरण दिसले नाही. BBC सहित बऱ्याच ठिकाणी डोकलाम प्रकरणी चीनचा विजय झालाय, अशा अर्थाच्या बातम्या आहेत.
वर्गीकरण
घडामोडी

प्रतिक्रिया द्या
49380 वाचन

💬 प्रतिसाद (168)
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 09/07/2017 - 17:02 नवीन
अधिक बातमी इथे ! कुणाचा जीव गेला नाही नशिब ! नाहितर पुन्हा नवीन रेल्वेमंत्री शोधावा लागला असता. प्रभुंनी राम बनण्याचा नादात उगाच स्वतःची विकेट टाकली.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 09/08/2017 - 10:55 नवीन
काल मोदींविरूद्ध ही मोहीम सुरू झाली आणि आज त्या मोहीमेचा हा परीणाम झाला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 09/08/2017 - 11:01 नवीन
वाचाळ दिग्विजयची टिवटिव Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 09/10/2017 - 06:07 नवीन
बायकोबरोबर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
त
तेजस आठवले Fri, 09/08/2017 - 13:36 नवीन
गोरखपूर दुर्घटनेनंतर २/४ दिवस आरडाओरडा झाला आणि प्रकरण फार पुढे ताणले नाही. मोर्चे, मेणबत्ती घेऊन श्रद्धांजली, पुरस्कार वापसी, असहिष्णुतावाढ, अल्पसंख्यांक कसे असुरक्षित आहेत, हुकूमशाही आणि फॅसिस्ट राजवट चालू आहे असा काहीही ओरडा आणि प्रचंड गदारोळ झाला नाही त्यावरून ह्या दुर्दैवी घटनातली मुले नक्कीच एका विशिष्ट धर्माची असावीत. नाहीतर आत्तापर्यंत ...
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sat, 09/09/2017 - 12:53 नवीन
गेल्या काही दिवसात नोटबंदी वर काही लेख वाचनात आले, बहुतांश लेख हे नोटबंदी एक आर्थिक अरिष्ट आहे हे सांगणारेच आहेत (जे माझे सुद्धा मत आहे), त्यातील काही लेखाचा सारांश आणि माझी मते कंसामध्ये . लेख क्रमांक १. Calling black white लेख क्रमांक २. (या लेखाचं वैशिष्ट्य असे कि यामध्ये नोटबंदी चे समर्थक, विरोधक आणि neutral या सगळ्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. ) Demonetisation: now a proven failure? १. ५०० आणि १००० च्या जवळजवळ ९९% नोटा परत आल्या आहेत याचा अर्थ ज्या लोकांच्याकडे काळा पैसा होता व त्यांनी बँकिंग सिस्टिम मध्ये परत आणला आहे. (आता भाजप चे प्रवक्ते असे म्हणतात कि काळा पैसा बँकिंग सिस्टिम मध्ये आला म्हणून तो पांढरा होत नाही IT वाले त्यांची चौकशी करणार आहेत, पण आपण एक गोष्ट लक्ष्यात घयायला हवी कि हेच भाजप चे प्रवक्ते आधी ३ ते ४ लाख कोटी रुपये बँकेत परत येणार नाहीत असे अंदाज वर्तवित होते, आता काय झालं त्या अंदाजच ? हे अपयश नाही का? म्हणजे काळ्या पैशे वाल्यानी सरकारचा पहिला आणि मोठा अडथळा मोडून काढला. बरं आता ह्या IT डिपार्टमेंट कडे ह्या लाखो संशयास्पद लोकांचं चौकशी करण्याचं मनुष्यबळ आहे का ? लाखो केसेस उभ्या करण्याचे आणि सोडवण्याचे अधिकार आणि ताकत आहे का ?) २. बरं RBI ला जवळजवळ १४,००० कोटींचा जास्त खर्च करावा लागला (नवीन नोटा छापणे (४००० कोटी )+ नोटा वितरण ), तसेच बाजारातील कॅश बँकेत आल्यामुळे RBI ती तरलता शोषून घ्यावी लागली आणि त्याच कित्येक हजार कोटींचं व्याज द्यावं लागलं काही कारण नसताना. (याचा आकडा अजून जाहीर व्हायचंय) ३. GDP २ टक्यांनी गडगडला, एका इकॉनॉमिक सर्वे नुसार गेल्या ४ कि ६ महिन्यात १५ लाख जॉब गेलेत, शेती आणि असंघटित क्षेत्राला मोठा तोटा झाला. याच श्रेय कोणाचं ? ४. अनेक राज्यांनी कृषी क्षेत्रासाठी २ लाख कोटींची कर्जमाफी जाहीर केलीय, यामध्ये नोटबंदी चा थोडाफार हातभार आहेच (संधर्भ: लोकसत्तातील एक लेख बहुदा मंगेश सोमण ) ५. सरकार असे म्हणताय कि ९१ लाख , मोदी म्हणतायत ५६ लाख , तर सरकारचा एक इकॉनॉमिक सर्वे म्हणतोय कि ५.४ लाख नवीन लोक इनकम टॅक्स च्या जाळ्यात आलेत. आता महत्वाचा प्रश्न यातील किती लोक टॅक्स देणार आहेत ? सरकारच्या एका इकॉनॉमिक सर्वे नुसार (लेख क्रमांक १) declared income १०००० करोड म्हणजे यातून जास्तीत जास्त टॅक्स ३००० करोड गोळा होईल. (हि चांगली गोष्ट असली तरी डोंगर पोखरून उंदीर काडल्यासारखी आहे. बरं आता दुसरा प्रश्न नवीन गोळा झालेले टॅक्स payer मध्ये GST मुळे समाविष्ट झालेल्या लोकांचा चा वाटा किती ? ) ६. म्हणजे digitization, cash less economy, आधार कार्ड संलग्नता, लोकांची बँक अकाउंट ह्या गोष्टी होणे अत्यंत महत्वाच्या आहेत पण यासाठी नोटबंदी ची अजिबात आवश्यकता नाही , जगातील अनेक देशांनी ह्या गोष्टी नोटबंदी सारखा निर्णय न घेता केलेला आहे. आता दुसऱ्या लेखातील नोटबंदी च्या समर्थनार्थ मांडलेल्या बाजू ७. बँकेत जमा झालेला ४-५ लाख कोटींचा पैसा हा संशयास्पद आहे, यातील बहुतांश पैसा काळा पैसा म्हणून उघड होणार आहे.(असे झाले तर चांगलंच आहे पण असे होणे खूप अवघड आहे. याच कारण हा प्रचंड पैसा खोटा आहे हे सरकार ला सिध्द करायचं आहे ह्या लोकांना न्हवे, तसेच सरकारचे आकडे हे अंदाज आहेत , proven फॅक्ट नाहीत. आणि सरकारचे जुने अंदाज पाहता माझा यावर विश्वास नाही. ) ८. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना हि काळ्या पैशाबाबत यशस्वी झाली आहे. (परंतु ह्या योजनेचा आणि नोटबंदी चा डायरेक्ट संबंध नाही, आणि मुळात यातून सरकार ला ४००० कोटींचं मिळाले आहेत. मुळात हि योजनाच नोटबंदी¨च्या अगोदर आलीय ) ९. कॅशलेस इकॉनॉमी ला मदत झाली. (यासाठी नोटबंदी करण्याची मुळात गरजच न्हवती असे अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे. तसेच नोटबंदी नंतर वाढलेले ऑनलाईन transaction परत एकदा कमी झालेत हि वस्तुस्थिती आहे.) १०. खोट्या नोटा चलनातून बाद झाल्या. (मुळात RBI च्या अवहलानुसार सापडलेल्या काळ्या नोटा ४०-१०० कोटींच्या आसपास आहेत, म्हणजे हे एक प्रकारचं अपयश च) म्हणजे थोडक्यात काय तर तळ्यात जास्त मासे पकडण्यासाठी तळे आठवायची गरज न्हवती, चांगल्या पद्धतीचे जाळे वापरणे किंवा योग्य ठिकाणी मासे मारणे हे यावरचे उपाय होते. भविष्यात जरी नोटबंदीचे फायदे होणार असतील तरी आत्ता झालेले नुकसान खूप आहे ते भविष्यातील फायद्यातून भरून निघणार नाही. जाता जाता, नोटबंदी सारख्या अनेक गोष्टींचा ओव्हरऑल विचार करून मोदी समर्थक किंवा विरोधक असणे, आणि नोटबंदी सारख्या आर्थिक निर्णयाची कारणमिमीनसा करणे ह्या वेगळ्या गोष्टी आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 09/09/2017 - 13:53 नवीन
अमितदादा, जर नोटाबंदी केली नसती तर आजूनही काळा पैसा खेळताच राहिला असता ना? आजवर जो लपवलेला पैसा होता तो उघड्यावर येऊन नोंदबद्ध झाला आहे. याकडे कोणाचंच लक्ष नाही. शिवाय काळ्या पैशाने फुगलेल्या अर्थव्यवस्थेपेक्षा कृश पण धवल अर्थव्यवस्था जनतेस फायदेशीर नाही का? या प्रश्नात जनतेस हा प्रमुख शब्द आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
श
श्रीगुरुजी Sat, 09/09/2017 - 19:32 नवीन
३. GDP २ टक्यांनी गडगडला, एका इकॉनॉमिक सर्वे नुसार गेल्या ४ कि ६ महिन्यात १५ लाख जॉब गेलेत, शेती आणि असंघटित क्षेत्राला मोठा तोटा झाला. याच श्रेय कोणाचं ? GDP २ टक्क्यांनी गडगडलेला नसून एका तिमाहीकरता १.४ टक्क्यांनी कमी झाला आहे. कोणत्या इकॉनॉमिक सर्वे नुसार गेल्या ४ कि ६ महिन्यात १५ लाख जॉब गेलेत व शेती आणि असंघटित क्षेत्राला मोठा तोटा झाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sat, 09/09/2017 - 21:05 नवीन
India lost 1.5 million jobs in the aftermath of demonetisation 1.5 Million Jobs Lost During First Four Months of 2017, Says CMIE Demonetisation: 35 per cent job losses, 50 per cent revenue dip, says study by largest organisation of manufacturers आता यावर तुमचा विश्वास बसणार नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गामा पैलवान Sat, 09/09/2017 - 22:25 नवीन
अमितदादा, तुमचं बरोबर आहे. माझा विश्वास नाहीच बसणार. वरील पहिल्या दुव्याच्या सुरुवातीचं वाक्य आहे :
While this is likely a side-effect of demonetisation, more research is needed to unpack how India’s unemployment rate fell in January-April 2017.
अधिक खोदाईची गरज असतांना मी कसा विश्वास ठेवावा ! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
श
श्रीगुरुजी Sun, 09/10/2017 - 11:26 नवीन
पहिल्या लेखानुसार -
The Centre for Monitoring Indian Economy, a think-tank that tracks business and economic data, believes that 1.5 million jobs were lost in January-April 2017, a likely result of demonetisation.
believes that म्हणजे हे त्यांचे गृहितक/समजूत आहे. गृहितक/समजूत सत्य असेलच असे नाही. त्यापुढे असेही वाक्य आहे - This slide is believed to be an after-effect of demonetisation. नंतर त्याच लेखात labour participation rate घसरला असे लिहून एक आलेख दिला आहे. त्या आलेखानुसार नोव्हेंबरपूर्वीच यात मोठी घसरण झाली होती. नंतर नोव्हेंबरमध्ये यात घसरण न होता वाढ झाली व डिसेंबर हा रेट स्थिर होता आणि नंतर जानेवारीनंतर परत घसरला. म्हणजे या चढउताराशी निश्चलीकरणाचा संबंध दिसत नाही. आलेखानंतर लगेचच एक परस्परविरोधी टिप्पणी आहे. Demonetisation’s effect kicked in with a lag, as the period from September-December is a busy season for agrarian India and that could have had kept the employment levels high, explains the report. एकंदरीत या लेखातील निष्कर्षांना कोणताही ठोस आधार दिसत नाही. स्वतःच्या समजूतीनुसार निष्कर्ष काढले आहेत. ______________________________________________________________________________________________ लेख क्रमांक २ - लेखाच्या सुरवातीलाच एक टीप आहे. While this is likely a side-effect of demonetisation, more research is needed to unpack how India’s unemployment rate fell in January-April 2017. याचा सरळ अर्थ असा की या लेखातील निष्कर्ष पुरेशा संशोधनावर आधारीत नाहीत. या लेखातही परस्परविरोधी दावे आहेत. While India’s employed force grew from 401 million in April 2016 to 406.5 million in December 2016, it fell to 405 million in the four-month survey period of January through April 2017. “The workforce (persons greater than 14 years of age) swelled by 9.7 million to 960 million during January-April 2017. But, the number of employed did not grow, it shrank. This implies that the stock of persons to be provided with employment has increased, केवळ ४ महिन्यात १४ वर्षे पूर्ण केलेल्यांची संख्या तब्बल ९७ लाखांनी वाढली यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. कारण याच दराने १२ महिन्यात हीच संख्या जवळपास ३ कोटींनी वाढायला हवी. लोकसंख्या वाढीचा दर थोड्याफार फरकाने प्रतिवर्ष स्थिर धरला तर वरील दाव्यानुसार भारतात २००३ पर्यंत दरवर्षी ३ कोटींहून अधिक बालके जन्म घेत होती आणि एकूण लोकसंख्या व लोकसंख्यावाढीचे अधिकृत आकडे पाहिले तर हा आकडा खूपच अवास्तव वाटतो. पुढे असे लिहिले आहे की The unemployment rate during September-December 2016 was 6.8% (29.6 million unemployed out of a labour force of 436 million). in January-April the rate fell to 4.7% (20 million unemployed out of a labour force of 425 million). म्हणजे जानेवारी-एप्रिल २०१७ या काळात बेकारांची संख्या २ कोटी ९६ लाखांवरून कमी होऊन २ कोटींवर आली. एकीकडे म्हणतात की या काळात बेकारी वाढून १५ लाख नोकर्‍या गेल्या आणि दुसरीकडे लिहितात की बेकारी ९६ लाखांनी कमी झाली. Note that the 9.6 million fall in the unemployed count is close to the addition to the workforce. This is like saying that almost the entire new workforce of January-April 2017 did not offer themselves for employment. This is odd. Is this a seasonal phenomenon? म्हणजे असे का झाले हे यांना माहिती नाही. म्हणूनच यामागे निश्चलीकरण आहे असा निष्कर्ष काढला असावा. The second issue is that the India’s employed labour force went up during the September-December 2016 period – demonetisation occurred on November 8, 2016. आता म्हणतात की सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ या काळात काम असणार्‍यांची संख्या वाढली. यांच्या आधीच्या निष्कर्षानुसार ही संख्या ८ नोव्हेंबरनंतर कमी व्हायला हवी. परंतु या वाक्यानुसार ही संख्या वाढलेली दिसते. परंतु जानेवारीनंतर काम करणार्‍यांची संख्या का कमी झाली यामागचे कारणही त्यांनीच दिले आहे. “September-December is a busy season as the kharif crop is harvested during this period and most festivals fall during these months. 2016 was a good kharif crop and this could have kept employment levels high. January-April is a relatively lean season. Further, demonetisation could have had its full impact during these months while its impact during September-December was partial,” he notes. _____________________________________________________________________ तिसरा लेख - या लेखाचे शीर्षकातील अवास्तव आकडे वाचूनच (३५% नोकर्‍या गेल्या, महसूलात ५०% घट) त्यातील भंपकपणा लक्षात आला. निश्चलीकरणामुळे उद्योगधंद्यांवर इतका मोठा वाईट परीणाम झाला असेल तर डिसेंबर २०१६ मध्ये केद्रीय सीमाशुल्क संकलन, अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष करसंकलन यात मोठ्या प्रमाणात वाढ कशी झाली असती. डिसेंबर २०१५ च्या तुलनेत डिसेंबर २०१६ मध्ये केंद्रीय सीमाशुल्क संकलनात ३१.६% व अप्रत्यक्ष करात १२.८% इतकी वाढ झाली. संपूर्ण वर्षाचा विचार केला तर २०१६-१७ या वर्षात केंद्रीय सीमाशुल्क संकलनात ३३.९%, सेवाकर संकलनात २०.२%, प्रत्यक्ष कर संकलनात १४.२% व अप्रत्यक्ष कर संकलनात २२% वाढ झाली आहे. जर निश्चलीकरणामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात फटका बसला असेल तर इतक्या प्रमाणात वाढ कशी झाली असती? Image removed. http://www.livemint.com/Politics/cH5gNYLvx0V4wjPxPsbRzK/Govt-exceeds-201617-tax-collection-target-collects-Rs1710.html मी इंडियन एक्सप्रेसमध्ये डिसेंबर २०-२१ तारखेच्या आसपास एक वृत्तांत वाचला होता. नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये २०१५ च्या तुलनेत वाहन खरेदीत घट झाली असे त्यात लिहिले होते. त्यात जवळपास २० कंपन्यांची आकडेवारी दिली होती. त्या आकडेवारीनुसार २० पैकी फक्त ६ कंपन्यांच्या खपात घट झाली होती. उर्वरीत १४ कंपन्यांच्या खपात वाढ झाली होती. म्हणजेच वृत्तांताचे शीर्षक फसवे होते. त्यामागे अजून एक कारण होते जे त्यांनी लक्षात घेतले नव्हते. भारतात वाहने, ग्राहकोपयोगी वस्तू साधारणपणे मुहूर्तावर घेतल्या जातात. गुढी पाडवा, दसरा, दिवाळी पाडवा अशा सणांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. २०१५ मध्ये दसरा ऑक्टोबरमध्ये व दिवाळी नोव्हेंबर मध्ये होती. त्यामुळे त्यावर्षीच्या खपाचे आकडे दोन महिन्यात विभागले गेले. २०१६ मध्ये दोन्ही सण ऑक्टोबरमध्येच आले होते. त्यामुळे २०१६ ची त्या काळातील विक्री ऑक्टोबरमध्येच झाली. साहजिकच नोव्हेंबरमध्ये तुलनेने कमी खरेदी झाली व नोव्हेंबर २०१६ चे आकडे २०१५ च्या तुलनेत कमी दिसले. हा मुद्दा वृत्तांत लिहिताना लक्षात घेतलेला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
च
चिनार Mon, 09/11/2017 - 10:52 नवीन
कृपया खालील शंकेचे निरसन करावे... एका आकडेवारीनुसार नोटबंदी आधी साधारण सतरा लाख कोटी रुपये पाचशे आणि हजाराच्या स्वरूपात होते. (काही लोक हा आकडा पंधरा लाख कोटी आहे असं सांगतात). तुमचं नाही-माझं नाही, आपण सोळा लाख कोटी पकडू. हे सर्व रक्कम ८ नोव्हेंबरला बाद झाली. पण सरकारने नवीन पाचशे आणि दोन हजाराच्या स्वरूपात फक्त बारा लाख कोटी बाजारात आणले असं सांगण्यात येते. हे जर खरे असेल तर, बँकेत कितीही पैसा वापस आला तरी चार लाख कोटींचे चलन सरळ सरळ बाद झाले असं म्हणता येऊ शकतं का? या चार लाख कोटींपैकी अर्धा जरी काळा पैसा असेल तरी चांगलेच नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
ग
गामा पैलवान Sat, 09/09/2017 - 15:30 नवीन
मेल्या म्हशीला मणभर दूध : http://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/my-friend-and-f... तर अर्धमेल्या म्हशीला वीस शेरांपर्यंत न्यायला हरकत नाही : http://www.lokmat.com/national/security-protection-sonia-gandhis-securit... -गा.पै.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 09/09/2017 - 16:23 नवीन
माजी पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी ठपका ठेवला आहे. हे चांगले झाले. आधीचे पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी खरोखरच चांगली पावले उचलली होती. परंतु त्यांचा हा पवित्रा खुपणाऱ्या लॉबीने दबाव आणून त्यांची उचलबांगडी करवली होती. त्यांच्यानंतर आलेल्या नटराजन यांनी तर भ्रष्टाचाराचा धडाका लावला होता अशी कुजबूज बरीच ऐकू येत होती. त्यांना त्याचे योग्य फळ मिळेल अशी आशा.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 09/09/2017 - 16:24 नवीन
वीरपत्नी स्वाती महाडिक या लष्करात रुजू होत आहेत. फार अभिमान वाटला! _/\_
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 09/11/2017 - 13:31 नवीन
पतिकेंद्रित आयुष्य जगत असल्यामुळे स्त्रीवादी लोकांचा स्वाती यांस विरोध असेल काय? =================== स्त्रीचं आयुष्य पतीशी केंद्रित नसावं असा स्त्रीवादी सुर अनेकदा ऐकला आहे. स्वाती महाडिक यांनी पतीचे काम पुढे चालू ठेवणे, इ इ आपल्या प्रेरणेचे स्रोत सांगीतले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
त
तेजस आठवले Sat, 09/09/2017 - 16:43 नवीन
१. ५०० आणि १००० च्या जवळजवळ ९९% नोटा परत आल्या आहेत याचा अर्थ ज्या लोकांच्याकडे काळा पैसा होता व त्यांनी बँकिंग सिस्टिम मध्ये परत आणला आहे. (आता भाजप चे प्रवक्ते असे म्हणतात कि काळा पैसा बँकिंग सिस्टिम मध्ये आला म्हणून तो पांढरा होत नाही IT वाले त्यांची चौकशी करणार आहेत, पण आपण एक गोष्ट लक्ष्यात घयायला हवी कि हेच भाजप चे प्रवक्ते आधी ३ ते ४ लाख कोटी रुपये बँकेत परत येणार नाहीत असे अंदाज वर्तवित होते, आता काय झालं त्या अंदाजच ? हे अपयश नाही का? म्हणजे काळ्या पैशे वाल्यानी सरकारचा पहिला आणि मोठा अडथळा मोडून काढला.
पण हा अंदाज जर चुकला तर त्यात वाईट काय आहे ? अंदाज चुकला हे अपयश कसे ? दडवून ठेवलेला काळा पैसा उजेडात आला, परत बँकेत जमा झाला आणि जर सगळ्याच लोकांना वापरायला मिळाला तर त्यात चुकीचे काय आहे? आणि राहिलेल्या १% नोटा जर परत सिस्टिम मध्ये आल्या नाहीयेत ह्याचा अर्थ ज्यांनी काळा पैसा रोखीत ठेवलेला होता ते पकडले जाण्याच्या भीतीने तो बाहेर काढत नाहीयेत आणि त्यावर त्यांनी पाणी सोडले आहे असा होऊ शकत नाही का ? अजून एक महत्वाची गोष्ट, बनावट नोटा ज्याकोणाकडे असतील(कळत/नकळत) ते त्या बँकेत भरायला जाणारच नाहीत / गेले तर पकडले जातील की नाही? त्यामुळे नोटाबंदीमुळे ज्या ५००/१००० च्या नोटा बनावट होत्या त्या आता अवैध झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा गैरवापर आता होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती नाही का ?
बरं आता ह्या IT डिपार्टमेंट कडे ह्या लाखो संशयास्पद लोकांचं चौकशी करण्याचं मनुष्यबळ आहे का ? लाखो केसेस उभ्या करण्याचे आणि सोडवण्याचे अधिकार आणि ताकत आहे का ?)
हा एक वेगळा मुद्दा आहे. मनुष्यबळ असणे/ नसणे, ते कुशल/अकुशल असणे ह्याचा नोटाबंदीशी काहीही संबंध नाही. तश्यापण भारतात सगळ्याच क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध नाही. पोलीस आणि न्यायालये अपुरी आहेत म्हणून काय गुन्हेच दाखल करू नयेत की काय? लागतील तेव्हा लागतील निकाल.
६. म्हणजे digitization, cash less economy, आधार कार्ड संलग्नता, लोकांची बँक अकाउंट ह्या गोष्टी होणे अत्यंत महत्वाच्या आहेत पण यासाठी नोटबंदी ची अजिबात आवश्यकता नाही , जगातील अनेक देशांनी ह्या गोष्टी नोटबंदी सारखा निर्णय न घेता केलेला आहे.
भारतात रोख रकमेचे प्रमाण अतिशय जास्त आहे. त्यामुळे रोख स्वरूपात पैसा कुठे कुठे फिरतो हे शोधून काढणे अवघड आहे. आपल्याकडे काही महाभाग असेही आहेत त्यांच्या नावावर २ पेक्षा जास्त पॅनकार्ड आहेत आणि त्यांनी त्या नावे व्यवहार केले आहेत. ह्याशिवाय बेनामी संपत्ती आहेच की. मेलेल्या व्यक्तीच्या नवे वर्षानुवर्षे पेन्शन जमा होत असल्याच्या केसेस आहेतच की.घरगुती वापराचे गॅस सिलिंडर व्यावसायिक वापरासाठी वापरले जायचे की नाही? त्यामुळे आता गॅस बुक करताना पण KYC सक्तीची झाली.कुठून तरी सुरुवात व्हायलाच हवी की नाही?
७. बँकेत जमा झालेला ४-५ लाख कोटींचा पैसा हा संशयास्पद आहे, यातील बहुतांश पैसा काळा पैसा म्हणून उघड होणार आहे.(असे झाले तर चांगलंच आहे पण असे होणे खूप अवघड आहे. याच कारण हा प्रचंड पैसा खोटा आहे हे सरकार ला सिध्द करायचं आहे ह्या लोकांना न्हवे,
हे कसे काय बुआ ? माझ्या अकाउंट मध्ये भरलेला पैसा कुठून आला ते सरकार मलाच विचारणार ना? मी वैध स्रोत दाखवू शकलो नाही तर तो पैसा काळा पैसाच की. माझ्या जवळच्या नात्यातला एक माणूस वाहने खरेदी विक्री क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांच्या शोरूम मध्ये १५-१५ लाख कॅश देऊन गाड्या विकत घेणारी माणसे येत असत. (आता येतात की नाही ते माहित नाही). नोटबंदी आणि इतर उपायांमुळे आता अश्या स्वरूपाचे व्यवहार होण्याचे प्रमाण कमी होईल की नाही तुम्हीच सांगा. ज्यांच्या कडे काळे पैसे आहेत त्यांनी ते रोखीत न ठेवता मालमत्ता,जमीन, उद्योग, कंपन्या, सोने इ. स्वरूपात दडवून ठेवलेले आहेत त्यामुळे ही नोटबंदी फेल गेली असे म्हणणार्यांनी हे लक्षात घ्यावे की ज्यांना बेहिशोबी संपत्ती निर्माण करायचीच आहे ते त्यासाठी काहीही करतील.भ्रष्टाचार करणारा कसाही करू शकेल.पैशांची लाच देता/घेता येत नसेल तर धान्य देईल, सोने देईल, गुपचूप एखादे दुसरे काम करून दिले जाईल. ह्या लोकांना संपत्ती इतकी प्रिय असते कि त्यासाठी पोटच्या अपत्यांचाही ही लोक व्यवहार करतील. पण म्हणून काहीच प्रयत्न करू नयेत का ?
भविष्यात जरी नोटबंदीचे फायदे होणार असतील तरी आत्ता झालेले नुकसान खूप आहे ते भविष्यातील फायद्यातून भरून निघणार नाही.
हे जरा समजावून सांगा.माझ्या मते कोणीच ह्याचे सर्वाना पटेल असे उत्तर देऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 09/09/2017 - 17:10 नवीन
असं कसं? असं कसं? एकदा ठरलंय ना डिमॉनेटायझेशन फेल गेलंय? मग परत परत शिळ्या कढीला ऊत का आणताय? एक फायदा नक्की झालाय यामुळे. सामान्य लोकांना जी डी पी, रोकडरहित अर्थव्यवस्था, आपली गंगाजळी इ बद्दल थोडं फार ज्ञानही झालं. एवढंच नव्हे तर बरेच "असामान्य" लोक एकदम अर्थतज्ज्ञ झाले आहेत आणि डिमॉनेटायझेशन फेल का झालं याबाबत माझं आणि रघुरामन राजन किंवा डॉ मनमोहन सिंह / अमर्त्य सेन यांचे एकमत कसं आहे याबद्दल व्याख्यानेही देऊ लागले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
अ
अमितदादा Sat, 09/09/2017 - 17:49 नवीन
पण हा अंदाज जर चुकला तर त्यात वाईट काय आहे ? अंदाज चुकला हे अपयश कसे ? दडवून ठेवलेला काळा पैसा उजेडात आला, परत बँकेत जमा झाला आणि जर सगळ्याच लोकांना वापरायला मिळाला तर त्यात चुकीचे काय आहे? आणि राहिलेल्या १% नोटा जर परत सिस्टिम मध्ये आल्या नाहीयेत ह्याचा अर्थ ज्यांनी काळा पैसा रोखीत ठेवलेला होता ते पकडले जाण्याच्या भीतीने तो बाहेर काढत नाहीयेत आणि त्यावर त्यांनी पाणी सोडले आहे असा होऊ शकत नाही का ?
मुळात मूळ प्रतिसादात एक गोष्ट लिहायची राहून गेली, कि ३-४ लाख कोटींचा काळा पैसा कॅश मध्ये आहे हे आधीच गृहीतक आणि आता तो पैसा बँकेत आला आहे हे दोन्ही गृहीतक (काळा पैसा बँकेत आला हे सत्य आहे परंतु त्याचा आकडा किती हे विवादित आहे ) आकड्याबाबत चुकीची आहेत, याबाबत सरकार ची किंवा RBI ची कोणतीही आकडेवारी उपलब्द नाही . लेख क्रमांक एक किंवा दोन वाचा त्यात लिहलंय कि काळा पैसा कॅश च्या स्वरूपात फक्त १०-१५ % आहे काळ धन हे जमीन, स्थावर मालमत्ता आणि सोने ह्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात आहे (हे आपल्यालाही माहित आहे ), त्यामुळे काळा पक्षाच्या स्वरूपातील लढाईसाठी जालीम उपाय म्हणून नोटबंदी आणली गेली तो मूळ उद्देशच चुकीच्या आकड्यावर अवलंबून होता. लक्ष्यात घ्या काळा पैसा बँकेत येणारच नाही हे गृहीतक होत ज्याच्यावर हा निर्णय घेतला होता, जर हे गृहीतक /अंदाज मोठ्या प्रमाणात चुकला तर हा निर्णय अयशस्वी ना. आता बँकेत आलेला काळा पैसा आम्ही शोधून काढू हे नंतरच शहाणपण आहे हे लक्ष्यात घ्या.
हे जरा समजावून सांगा.माझ्या मते कोणीच ह्याचे सर्वाना पटेल असे उत्तर देऊ शकत नाही.
हे वाक्य लिहंण्यामागचा उद्देश. समजा सरकार ने बँकेत जमा झालेला सगळा काळा पैसा जप्त केला (हे तुम्हाला आणि आम्हाला भविष्यात दिसूनच येईल) तरीही जेवढा फायदा सरकार ला होईल त्यापेक्षा जास्त तोटा आता झाला आहे, वेस्ट manhours, गेलेल्या नोकऱ्या, घटलेली GDP, शेती आणि असंघटित क्षेत्राची झालेली हानी.
अजून एक महत्वाची गोष्ट, बनावट नोटा ज्याकोणाकडे असतील(कळत/नकळत) ते त्या बँकेत भरायला जाणारच नाहीत / गेले तर पकडले जातील की नाही? त्यामुळे नोटाबंदीमुळे ज्या ५००/१००० च्या नोटा बनावट होत्या त्या आता अवैध झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा गैरवापर आता होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती नाही का ?
Fake notes amounting to Rs28 crore recovered till September: Kiren Rijiju चुकीचा समज. लोकांनी खोट्या नोटा छापून घरात ठेवलेल्या काय ? सरकार ने स्वतः सांगितलेलं कि खोट्या नोटा अर्थव्यवस्थेत फिरतायत. तसेच सामान्य लोकांना सुद्धा माहिती न्हाई कि नोटा खोट्या आहेत कि खऱ्या, त्या बँकेत आल्यानंतर च त्याची बहुतांश लोकांना खबर लागते कि नोटा खोट्या आहेत म्हणून. बरं वर दिलेली बातमी वाचा नोटबंदीच्या आधीची आहे, दरवर्षी ५० करोड हि न्हवत खोट्या नोटांचं प्रमाण. मग खोट्या नोटा निकालात काढणं कसं असू शकत नोटबंदी सारख्या क्लिष्ट आणि तापदायी प्रक्रियेचं उद्दिष्ट ? काश्मीर मधले हल्ले थांबले काय ?
भारतात रोख रकमेचे प्रमाण अतिशय जास्त आहे. त्यामुळे रोख स्वरूपात पैसा कुठे कुठे फिरतो हे शोधून काढणे अवघड आहे. आपल्याकडे काही महाभाग असेही आहेत त्यांच्या नावावर २ पेक्षा जास्त पॅनकार्ड आहेत आणि त्यांनी त्या नावे व्यवहार केले आहेत. ह्याशिवाय बेनामी संपत्ती आहेच की. मेलेल्या व्यक्तीच्या नवे वर्षानुवर्षे पेन्शन जमा होत असल्याच्या केसेस आहेतच की.घरगुती वापराचे गॅस सिलिंडर व्यावसायिक वापरासाठी वापरले जायचे की नाही? त्यामुळे आता गॅस बुक करताना पण KYC सक्तीची झाली.कुठून तरी सुरुवात व्हायलाच हवी की नाही?
हेच सांगतोय ह्या कारणासाठी नोटबंदी करायची आवश्यकता नाही. तुम्हाला यासाठी नोटबंदी हवी होती काय ?
माझ्या जवळच्या नात्यातला एक माणूस वाहने खरेदी विक्री क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांच्या शोरूम मध्ये १५-१५ लाख कॅश देऊन गाड्या विकत घेणारी माणसे येत असत. (आता येतात की नाही ते माहित नाही). नोटबंदी आणि इतर उपायांमुळे आता अश्या स्वरूपाचे व्यवहार होण्याचे प्रमाण कमी होईल की नाही तुम्हीच सांगा
अत्यंत नगण्य प्रमाणात कमी होईल. एक उदाहरण आता कर्नाटक मध्ये एका काँग्रेस च्या आमदारावर IT विभागाने छापे टाकून २०-४० कोटी काळे रुपये रोख पकडले, म्हणजे थोडक्यात काय ह्या आमदाराने त्याचा काळा पैसा बदलून नवीन नोटा मध्ये साठवला होता ना, मग का नाही हा सापडला आधी ? का हा राज्यसभेच्या निवडणुकी वेळीच सापडला ? भविष्यात तुम्हाला आणि आम्हाला दिसेलच कि किती काळा पैसा बाहेर आला ते.
ज्यांच्या कडे काळे पैसे आहेत त्यांनी ते रोखीत न ठेवता मालमत्ता,जमीन, उद्योग, कंपन्या, सोने इ. स्वरूपात दडवून ठेवलेले आहेत त्यामुळे ही नोटबंदी फेल गेली असे म्हणणार्यांनी हे लक्षात घ्यावे की ज्यांना बेहिशोबी संपत्ती निर्माण करायचीच आहे ते त्यासाठी काहीही करतील.
अगदी अगदी आमचं सुद्धा हेच म्हणणं आहे. कि नोटबंदी हा काळ्या धनावरचा जालीम उपाय म्हणून सामान्य लोकांवर लादणारयांना एव्हडी गोष्ट लक्ष्यात अली नाही कि यातून काळे धन बाहेर निघेल याची कोणतीही गॅरंटी नाही पंरतु अर्थव्यवस्थेस किंवा प्रामाणिक लोकांना आपण फार मोठं नुकसान पोहचवू शकतो म्हणून. @गामा पैलवान अर्थव्यवस्थेतील साधे तत्व आहे कि निर्णय असा घ्यावा कि ज्याने फायदा होईल. इथे होणारे फायदे आणि तोटे यांचे गणित काढल्यास अर्थव्यवस्थेस झालेलं मोठं नुकसान दिसून येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
A
arunjoshi123 Mon, 09/11/2017 - 14:38 नवीन
लक्ष्यात घ्या काळा पैसा बँकेत येणारच नाही हे गृहीतक होत ज्याच्यावर हा निर्णय घेतला होता, जर हे गृहीतक /अंदाज मोठ्या प्रमाणात चुकला तर हा निर्णय अयशस्वी ना.
अंदाज चुकला हे १००% बरोबर आहे. याबद्दल खाली* मात्र निर्णय चुकला हे कसं? साध्य काय होतं? काळा पैसा नष्ट करणे. ते साध्य झालं का? तर हो. ============================================ सरकारचा अंदाज चुकला आणि वाईड मार्जिनने चुकला. लोकांना "झाकल्या मुठितली प्रतिष्ठा" आणि पैसा यांतील काय अधिक प्रिय असेल याबद्दलचा सरकारचा अंदाज चुकला. http://economictimes.indiatimes.com/wealth/tax/demonetisation-row-penalties-prosecution-that-tax-department-can-slap-on-black-money-holders/articleshow/55349571.cms इथे पाहता येईल कि आयकराबाबत पेनाल्टी कराच्या अर्धी असेल. म्हणजे १०० रु मधून एरवी ० रु द्यावे लागतात (काळापैसा), कायद्याने ३३ द्यावे लागतात, आणि नोटबंदीच्या इमर्जन्सीमुळे ५० द्यावे लागतात. मग उरलेल्या ५० वर पाणि का फेरायचं? त्याला एकच कारण असू शकतं ते म्हणजे पब्लिकली प्रतिष्ठा न जाणे. त्याची फार चाड नसेल तर प्रश्न येत नाही. ========================= आज भारताचं सबंध सिविल इंजिनिअरिंग क्षेत्र (सरकारी) ठप्प आहे. का? "तुम्ही" अगोदर व्हॅट नाही भरायचे? मिनिमम वेज नाही द्यायचे? इन्कम टॅक्स नाही द्यायचे? मग फरक काय आहे? याचं उत्तर असं आहे कि काळा पैसा वापरून चालवत असलेला धंदा पांढरा पैसा करून तसाच चालवता येत नाही. त्याची सगळी गणितं गडगडतात. वेफर थिन मार्जिन्स आणि ह्यूज बार्गेनिंग असतं त्याकरिता पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sat, 09/09/2017 - 17:58 नवीन
आणि राहिलेल्या १% नोटा जर परत सिस्टिम मध्ये आल्या नाहीयेत ह्याचा अर्थ ज्यांनी काळा पैसा रोखीत ठेवलेला होता ते पकडले जाण्याच्या भीतीने तो बाहेर काढत नाहीयेत आणि त्यावर त्यांनी पाणी सोडले आहे असा होऊ शकत नाही का ?
हे बरोबर नाहीये. उरलेली १ % सगळी लोक काळे पैसेवाली नाहीत, अनेक परदेशी भारतीय लोक ज्यांना २५ हजारपर्यंतची रक्कम कायदेशीर रित्या भारताबाहेर नेता येते त्यांना पैसा बदलता आला नाही (भारतात आल्यावर टॅक्सी हॉटेल इत्यादी साठी उपयोगी पडते) , अनेक दुर्गम भागात राहणारी लोक त्यांना पैसा बदलता आला नाही, नेपाळ आणि भूतान मध्ये असणारा भारतीय पैसा बदला गेला नाही (जालावर याची पूर्ण माहिती आहे ).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
ट
ट्रेड मार्क Sat, 09/09/2017 - 18:37 नवीन
सगळ्यात एक मुद्दा सोयीस्करपणे विसरला जातोय की फक्त नोटबंदी हे एकच पाऊल सगळ्या समस्या सोडवणार नाहीये हे सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं. हे बाकी अनेक पावलांपैकी एक पाऊल आहे. तसंही नोटबंदी "असफल" व्हावी म्हणून प्रयत्न करणारे लोक सफल व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या लोकांपेक्षा बरेच जास्त होते आणि आहेत. स्वतःच्या थोड्या फायद्यासाठी किती लोकांनी काळाबाजारवाल्यांच्या नोटा लायनीत परत परत उभं राहून बदलून दिल्या? काही बँकेतल्या लोकांनी आणि काही सीए मंडळींनी या लोकांना कशी मदत केली? हे होऊ नये म्हणून तिथेच असणाऱ्या इतर लोकांनी काय केलं? जिथे लोकांचीच सुधारायची इच्छा नाहीये किंवा इच्छा असून "मी कशाला प्रयत्न करू, करेल दुसरं कोणीतरी" अशी वृत्ती असेल तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला तरी काही होणार नाही. नोटबंदीमुळे काही उद्योग बंद कसे पडले हे मात्र मला कळलं नाही. ते कायदेशीर उद्योग नव्हते का? जर कायदेशीर होते तर त्यांची बँकेत खाती नव्हती का? बँकांनी खाती उघडायला नकार दिला होता का? जरी तिथे काम करणाऱ्या लोकांची खाती आधी नव्हती म्हणलं तरी नंतर उघडायला काय अडचण होती? व्यवहार करीन तर रोखीनेच नाहीतर करणार नाही असे काही तत्व होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
त
तेजस आठवले Sat, 09/09/2017 - 18:50 नवीन
हो. मी पण माझ्या प्रतिसादात असेच सांगायचं प्रयत्न करतोय की कुठून तरी सुरवात केली गेली आहे. पावत्या द्यायचा आग्रह मी पण पूर्वी धरत नसे पण आता शक्यतो सगळीकडे पावती मागतो. व्यापारी लोक सुद्धा पावत्या द्यायला काकु करत असत किंवा सरळ नकार देत असत. नोटाच दुर्मिळ झाल्यावर सगळ्यांनाच पांढरे व्यवहार करणे भाग पडतंय. मी सुद्धा पूर्वी ज्या गोष्टी रोखीने करत असे त्या आता रोखीने करत नाही (वीज/फोन ची बिले भरणे, ऑनलाईन गॅस बुक करणे इ.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
अ
अमितदादा Sat, 09/09/2017 - 18:58 नवीन
नोटबंदीमुळे काही उद्योग बंद कसे पडले हे मात्र मला कळलं नाही. ते कायदेशीर उद्योग नव्हते का? जर कायदेशीर होते तर त्यांची बँकेत खाती नव्हती का? बँकांनी खाती उघडायला नकार दिला होता का? जरी तिथे काम करणाऱ्या लोकांची खाती आधी नव्हती म्हणलं तरी नंतर उघडायला काय अडचण होती? व्यवहार करीन तर रोखीनेच नाहीतर करणार नाही असे काही तत्व होते का?
ट्रेडमार्क साहेब आपल्यास माहित असेलच कि ग्रामीण भागात शेती व्यवहार हे ९०%टक्के रोखीत च होतात ते. जेंव्हा अर्थव्यवस्थेतील पैसा काढून घेण्यात आला त्याचा शेतीच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला, कोणताही दुष्काळ नसताना शेत मालाचे भाव कसे पडले हे काही तज्ज्ञांनी दाखवून दिल आहे, यातूनच पुढं शेती कर्ज माफीला बळ मिळालं. कन्स्ट्रक्शन तसेच इतर असंघटित क्षेत्र जे पूर्ण रोखीवर अवलंबून होत ते एकाचवेळी ठप्प झाले (मी जालावरच्या अनेक बातम्या काडून इथे चिटकवू शकतो). व्यवहार हे रोखीने कमी व्हायला हवे मान्य परंतु हा बदल एका क्षणात नाही घडू शकत आणि असे करायला गेल्यास मोठा तोटा होऊ शकतो, जे इथे दिसून येते.
जिथे लोकांचीच सुधारायची इच्छा नाहीये किंवा इच्छा असून "मी कशाला प्रयत्न करू, करेल दुसरं कोणीतरी" अशी वृत्ती असेल तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला तरी काही होणार नाही.
याबाबत दुमत नाही, म्हणूनच कोणताही निर्णय घेताना प्रामाणिक लोकांना नुकसान होणार नाही ना याची काळजी घेतली पाहिजे, जर प्रामाणिक लोकांचं नुकसान होणार असेल आणि अप्रामाणिक लोकांना काही होणार नसेल किंवा कमी प्रमाणात नुकसान होणार असेल तर हे चुकीचे आहे.
सगळ्यात एक मुद्दा सोयीस्करपणे विसरला जातोय की फक्त नोटबंदी हे एकच पाऊल सगळ्या समस्या सोडवणार नाहीये हे सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं.
सरकारचा टोन आत्ता बदलाय, हे चूक समजल्यानंतर च शहाणपण आहे. मोदींची जुनी भाषणं पहा ते म्हणाले होते मला ५० दिवस द्या आणि मी चुकलो कि मला हवी ती शिक्षा द्या. त्यावेळी सरकारने हा निर्णय "हर एक दुःख एक हि दवा " म्हणून प्रेसेंट केलेला. हा निर्णय घेतला तेंव्हा मला हि वाटलं होत कि काही तरी क्रांतिकारी बदल घडेल परंतु हळूहळू यातील फोलपणा लक्ष्यात आला. मी काही तज्ञ् नाही, परंतु आता आलेल्या आकडेवारी नुसार आणि तज्ज्ञांच्या लेखानुसार माझे मत बदलले आहे, खरी वस्तूथिती दिसत आहे. नोटबंदी चे फक्त तोटेच आहेत आणि काही फायदे नाहीत असे माझे म्हणणे नाही, माझे असे म्हणणे आहे कि जे फायदे सांगितले जातायत त्यासाठी नोटबंदी करायची आवश्यकता न्हवती आणि नोटबंदीचे मूळ उद्देश असफल झालेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
श
श्रीगुरुजी Sat, 09/09/2017 - 19:28 नवीन
कोणताही दुष्काळ नसताना शेत मालाचे भाव कसे पडले हे काही तज्ज्ञांनी दाखवून दिल आहे याच्याशी नोटाबंदीचा संबंध नाही. भूतकाळात नोटाबंदी नसतानाही व दुष्काळही नसताना अनेकदा भाव पडलेले आहेत. भाव कमीजास्त होण्याचा संबंध फक्त मागणी व पुरवठा यांच्याशीच असतो. मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढला की भाव पडतातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sat, 09/09/2017 - 19:52 नवीन
भाव कमीजास्त होण्याचा संबंध फक्त मागणी व पुरवठा यांच्याशीच असतो. मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढला की भाव पडतातच.
अगदी बरोबर. मुळात नोटबंदी च्या काळात बाजारातील पैसा काढून घेतल्यामुळे ग्राहकांना आपल्या दैनंदिन गरजावरती नियंत्रण आणावं लागलं विशेतः रोखीने होणाऱ्या व्यहवारावरती, व्यापाऱ्यांनी आपली खरेदी थंडावली यातून कृत्रिमरीत्या मागणी कमी झाली पुरवठा मात्र तेवढाच राहिला यातून भाव पडले. विदर्भात व्यापाऱ्यांनी बहुतेक कापूस हमीभावापेक्षा कमी किमतीत खरेदी केल्याची उदाहराणे आहेत. माझ्या कुटुंबास आलेला अनुभव: नोटबंदीच्या काळात सोयाबीन विकण्यास काढलेलं होत, व्यापाऱ्यांनी भाव पडून सांगितला, कारण बाजारात पैसेच नाहीत. आमच्या कुटुंबाने विकले नाही हि गोष्ट वेगळी परंतु फक्त शेतीवर अवलंबून असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना पर्याय न्हवता. बरं नोटबंदी चा परिणाम नाही तर गेल्यावर्षी दुष्काळ न पडता विविध राज्यातील शेतकरी एकाचवेळी कर्जमाफी साठी का मागे लागलेत? त्यांच्यातील सुप्त मागणीला कशामुळे बळ मिळाले. मला सध्या नोटबंदी आणि शेतमालाच्या घसरलेल्या किंमती यावर आकडेवारी सहित प्रसिद्ध झालेला इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता मधील लेख सापडत नाही सापडल्यास चिटकवतो इथे. तोपर्यंत कुणाला सापडल्यास कृपया इथे चिटकवावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 09/09/2017 - 19:59 नवीन
मुळात नोटबंदी च्या काळात बाजारातील पैसा काढून घेतल्यामुळे ग्राहकांना आपल्या दैनंदिन गरजावरती नियंत्रण आणावं लागलं विशेतः रोखीने होणाऱ्या व्यहवारावरती म्हणजे नोटाबंदीच्या काळात लोकांनी खाणंपिणं कमी केलं होतं आणि ते अर्धपोटी रहात होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
श
श्रीगुरुजी Sat, 09/09/2017 - 20:03 नवीन
बरं नोटबंदी चा परिणाम नाही तर गेल्यावर्षी दुष्काळ न पडता विविध राज्यातील शेतकरी एकाचवेळी कर्जमाफी साठी का मागे लागलेत? त्यांच्यातील सुप्त मागणीला कशामुळे बळ मिळाले. शेतकरी कायमच कर्जमाफी मागतात व पुढेही मागत राहतील. कर्जमाफीच्या मागणीचा व नोटाबंदीचा संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sat, 09/09/2017 - 20:17 नवीन
The crops of wrath वरील लेख वाचा मग नोटबंदी चा शेती मालाच्या भावाशी असलेला संबंध कळेल. अजून एक चांगला लेख आहे तो सापडल्यास देतो इथे. मुळात ग्राहकांनी नियंत्रण आणणे याचा अर्थ ते अर्धपोटी होते असे होत नाही आणि मी बोललेलो नाही, तुम्ही उगाच काहीही conclusion काढू नका ते तुम्हाला शोभत नाही, चर्चेत रस नसेल तर बाजूला व्हा. नोटबंदी मुळे कापड व्यवसायास तोटा झाला हे सर्वश्रुत आहे कारण कमी झालेली मागणी म्हणून लोक काय उघडी राहत होती का ? शेतकरी कर्जमाफीची मागणी दरवर्षी करत नाही, बर समजा जरी केली तर शासन ते मान्य करत नाही मग का अनेक राज्य सरकारांनी मागण्या मान्य केल्या कोणतीही आपत्ती नसताना याच कारण त्यांना माहित होत कि शेतकऱयांना फटका बसलेला आहे ते भलेही ते मान्य न करोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 09/10/2017 - 11:51 नवीन
नोटबंदीच्या काळात ग्राहकांनी नियंत्रण आणले याचा अर्थ नक्की काय होतो? कोणताही ग्राहक अन्नधान्यावरील खर्च कमी करणार नाही. तशीच वेळ आली तर वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू इ. वस्तूंची खरेदी पुढे ढकलेल. या वस्तूंच्या विक्रीत घट झाल्यास त्याचा परीणाम शेतकर्‍यांवर कसा होईल कारण शेतकर्‍यांची उत्पादने वेगळी आहेत. वरील संपूर्ण लेखात टोमॅटो, कांदे, बटाटे इ. चे भाव कमी झाले याचा उहापोह आहे व त्याचा संबंध निश्चलीकरणाशी जोडला आहे. या उत्पादनांच्या २०१६ मधील भावाची तुलना २०१५ मधील भावाशी केली आहे. परंतु मागणी-पुरवठा या तत्वावरच भावात चढउतार होते याचा लेखकाने उल्लेख केलेला नाही. २ वेगवेगळ्या वर्षातील किंमतीची तुलना करताना दोन्ही वर्षातील भाव, मागणी व पुरवठा या तिन्हीची आकडेवारी दिली तरच ती तुलना वस्तुनिष्ठ होते. या दोन वर्षात वरील उत्पादनांचे एकूण उत्पादन किती झाले याची आकडेवारी दिलीच नाही. ती दिली असती तर नक्कीच लक्षात आले असते की २०१५ च्य तुलनेत २०१६ मध्ये मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने आपोआपच भाव घसरले. याबाबतीत तूर व इतर डाळींचे उदाहरण बोलके आहे. २०१५ मध्ये दुष्काळामुळे डाळींच्या उत्पादनात घट झाल्यामुळे पुरवठा कमी होऊन भाव खूप वाढले होते. परंतु २०१६ मध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डाळींच्या भावात घट झाली. हेच तत्व भाजीपाला, फळे किंवा इतर कोणत्याही उत्पादनाला लागू होते. धान्य वगळता बराचसा शेतमाल नाशवंत असल्याने हे त्यात हे चढउतार खूपच मोठे असतात. बाकी कर्जमाफीचं म्हणाल तर शेतकरी कायमच कर्जमाफी मागतात, परंतु सत्ताधारी दरवर्षी ही मागणी मान्य न करता राजकीय सोय बघूनच तो निर्णय घेतात. हे निर्णय फक्त राजकीयच असतात. शेतकर्‍यांना फटका बसला आहे, दुष्काळ इ. कारणे त्यासाठी विचारात घेतली जात नाहीत. २००८ ची कर्जमाफी २००९ ची निवडणुक डोळ्यांसमोर ठेवून झाली होती. २०१७ मधील उ. प्र. मधील कर्जमाफीमागे विधानसभा निवडणुक हे कारण होते. उत्तर प्रदेशात भाजपला सत्ता मिळाल्याने व सत्ता मिळाल्यावर तिथे लगेचच कर्जमाफीचा निर्णय केल्याने, महाराष्ट्राला कर्जमाफी नाकारण्यासाठी कोणतेही सबळ कारण उरले नव्हते. त्यामुळेच कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. निश्चलीकरणामुळे शेतकर्‍यांना फटका बसला आणि म्हणून कर्जमाफी केली हा दावा असत्य आहे. उत्तर प्रदेशाने कर्जमाफी केली नसती तर ती महाराष्ट्रातही झाली नसती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
प
पिजा Mon, 09/11/2017 - 16:26 नवीन
श्रीगुरुजी म्हणतात तसं तुम्ही शेअर केलेल्या हरीश दामोदरण यांच्या लेखात मागच्या वर्षीच्या उत्पादनाचे आकडे नाहीत. ते ह्या लेखात मिळतील. लेख वाचल्यास हेच दिसून येतं की भाव हे उत्पादन वाढ आणि आयातीवर जे निर्बंध घालण्यात सरकारने दाखवलेली अनास्था यामुळे घसरले, त्यात नोटबंदीचा फारसा हात नाही. पण सरकारी अनास्था हाच मोठा गंभीर मुद्दा आहे (तो यावर्षी सरकारने करेक्ट केल्याच्या बातम्या आहेत). आधीच भाव गडगडलेले त्यात नोटबंदीमुळे व्यवहार ठप्प, त्यामुळे खरंतर लोक वैतागलेले होते. तो वैताग यावर्षी online विमा आणि कर्जमाफीचे अर्ज भरताना अजून वाढलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sat, 09/09/2017 - 22:06 नवीन
Modi’s DeMo Gambit Failed: Costs Exceed Gains And Farm Anger Is The Final Piece Of Evidence गुरुजी स्वराज ह्या मासिकामध्ये आलेला आणखी एक लेख वाचा हि विनंती आणि नंतर आपले मत बनवा. पूर्ण लेख नसेल वाचायचा तर खालील मुद्दे वाचा. त्या लेखातील काही मुद्दे १. It is time for a mea culpa on demonetisation. This writer has been largely positive on the medium-to-long-term benefits of notebandi, as opposed to its short-term downsides, including a fall in gross domestic product (GDP) growth rates for one or two quarters. Now, and especially after the farmer agitations for loan waivers, I believe that the negative side of the ledger on demonetisation (DeMo) is larger than the positive. It has failed. २. The bottom line on DeMo, seven months after Modi announced that he was withdrawing the legal tender status of Rs 500 and Rs 1,000 notes from 8 November, is that the costs are outweighing the benefits. And the rising demand for fiscally ruinous farm loan waivers surely has a direct link to DeMo. Maybe loan waivers would have happened anyway in the run-up to 2019, but it is equally clear that DeMo has emptied many mandis of cash, and the demand for ready harvested crops has collapsed in many parts of the country, as Harish Damodaran notes in his column in The Indian Express. ३. Even if we assume that only half the waivers are directly due to the DeMo impact, we are talking of a tripling of the figure first put out by CMIE – at the very least, with most costs yet to show up. This means the DeMo damage could be in the region of Rs 3.5-4 lakh crore at the minimum. Since the wildest estimate of gains from black money not coming back to the banking system do not exceed this latest ballpark estimate of loss, it is clear why DeMo has failed its cost-benefits test.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 Mon, 09/11/2017 - 14:49 नवीन
ग्रामीण भागात शेती व्यवहार हे ९०%टक्के रोखीत च होतात.
जन धन खातं खोलावं नि व्यवहार रोखीत टाळावेत. शेतकरी झाले म्हणून काय झालं? त्यांना देखिल झटका देणं आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
ट
ट्रेड मार्क Mon, 09/11/2017 - 22:51 नवीन
ग्रामीण भागात शेती व्यवहार हे ९०%टक्के रोखीत च होतात जनधन खात्यांचा आग्रह धरून आता बराच काळ लोटला. सरकारने प्रयत्न करून आणि सोय उपलब्ध करून देऊनसुद्धा जर त्याचा फायदा लोक घेऊ शकत नसतील तर काय करावे? त्यापुढे जाऊनही, नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, प्रत्येक अडचणीत स्वतःची तुंबडी भरून घ्यायची वृत्ती कधी जाणार? शेतकऱ्यांचे बँक खाते नाही हे एकवेळ मानले तरी दलालांचे पण नव्हते? मला फारशी कल्पना नाही पण छोटे शेतकरी रोजच्या रोज असा किती हजारांचा माल विकतात? दलालांनी ही संधी समजून शेतकऱ्यांना नाडलेच ना? हा निर्णय घेतला तेंव्हा मला हि वाटलं होत कि काही तरी क्रांतिकारी बदल घडेल परंतु हळूहळू यातील फोलपणा लक्ष्यात आला. खरंच हे खेदाने म्हणावं लागतंय की नोटबंदी "सफल" व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्यांपेक्षा ती "असफल" कशी होईल हे बघणारे बरेच जास्त होते/ आहेत. असफल होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये मुद्दामून करणारे होते तसेच अनावधानाने किंवा स्वतःच्या तात्कालिक फायद्यासाठी करणारे लोकही होते. साध्या १० लोकांच्या प्रोजेक्टमध्ये अगदी १ जरी मेम्बर प्रोजेक्ट सफल होऊ नये यासाठी प्रयत्न करणारा असेल आणि २/३ लोक चुकार असतील तर प्रोजेक्ट फेल होतो. इथे तर जवळपास १ कोटी लोकांचा प्रोजेक्ट होता. बदल घडवून आणायला सगळ्यांचा सपोर्ट आवश्यक असतो जो कदाचित कमी पडला. परंतु आता आलेल्या आकडेवारी नुसार आणि तज्ज्ञांच्या लेखानुसार माझे मत बदलले आहे आकडेवारीचं म्हणाल तर ती दोन्ही प्रकारे दाखवता येते. तज्ज्ञांचं म्हणाल तर नोटबंदी सफल आणि असफल दोन्ही म्हणणारे तज्ज्ञ आहेत. नोटबंदी चे फक्त तोटेच आहेत आणि काही फायदे नाहीत असे माझे म्हणणे नाही, माझे असे म्हणणे आहे कि जे फायदे सांगितले जातायत त्यासाठी नोटबंदी करायची आवश्यकता न्हवती नोटबंदी कशी चांगल्या पद्धतीने राबवता आली असती याचा प्लॅन काही मिपाकर जानेवारी २०१७ च्या आधी देणार होते, तो काही अजून मिळाला नाही. तुम्ही पण सांगा काय उपाय करता आले असते ते. आणि हो जे सांगाल ते सर्वच्या सर्व लोकांना फायद्याचे आणि फुलप्रूफ असावे. म्हणजे एक प्लॅन द्यायचा, जो इतका फुलप्रूफ असेल की ज्याने फक्त सर्वच्या सर्व अप्रामाणिक भारतीयांना तास झाला पाहिजे पण एकाही प्रामाणिक भारतीयास त्रास व्हायला नको. तसेच प्लॅन/ नियम एकदा केले की परत बदलता येणार नाहीत. बोला कधी देताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
म
मार्मिक गोडसे Wed, 09/13/2017 - 04:47 नवीन
नोटबंदी कशी चांगल्या पद्धतीने राबवता आली असती याचा प्लॅन काही मिपाकर जानेवारी २०१७ च्या आधी देणार होते, तो काही अजून मिळाला नाही. प्लॅन दिला होता की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
A
arunjoshi123 Mon, 09/11/2017 - 14:02 नवीन
नोटबंदीमुळे काही उद्योग बंद कसे पडले हे मात्र मला कळलं नाही.
सरकार असं उघड म्हणू शकत नाही, पण हे उद्योग बंद पाडणे हे एक उद्दिष्ट आहेच. ======================== असंघटित क्षेत्रनोटबंदिमुळं बंद पडलं असं म्हणणारे ते बंद पडायचा मेकॅनिझम्/कारण सांगत नाहित. नोटबंदीच्या दरम्यान जे व्यवसायाचे नुकसान झाले त्याच्या दशपट व्यवसायाच्या तेजिमंदिच्या लाटा ते नेहमी पाहत असतात. नेमके एका बार्कुश्या लाटेने कसे बंद पडले? बरं डिमांड तिथल्या तिथं आहे. मंजे बंद जरी पडले तरी पुन्हा दुसरे उभे राहिले पाहिजे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
A
arunjoshi123 Mon, 09/11/2017 - 13:50 नवीन
अमितदादा, भारतात काळा पैसा नव्हताच वाटतं. भारतीय लोकांना केवळ न्यूनगंड असावा कि आपले देशवासी अप्रामाणिक आहेत, भ्रष्ट आहेत आणि सगळं स्वच्छ चालत असावं. एन आर आय, नेपाळ आणि भूतानमधले पैसे धरून १००% पैसे पांढरे आहेत. कदाचित आर बी आय चे रेकॉर्ड्स (सरकारी असल्याने) चूक असावेत आणि लोकांकडे याच्यावर चार पैसे पांढरेच निघावेत. किंबहुना मला वाटतं ते तथाकथित काळे पैसे सरकारकडेच असावेत. उगाच लोकांवर शंका. पहा ना, चलनाचे आपण चार भाग करू - आर बी आय, बॅकिंग सिस्टिम, सरकार आणि लोक. यातले तिन भाग तर सिस्टिमचेच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
भ
भंकस बाबा Sun, 09/10/2017 - 06:19 नवीन
बनावट नोटा सिस्टीममध्ये आल्या नाहीत, हास्यस्पद बनावट नोटा बनवणं हे काय रॉकेट सायन्स आहे? दोन हजारच्या बनावट नोटा बाजारात फिरत आहेत, इतकी बेमालूम नक्कल आहे की सुशिक्षित माणूस फसेल, अगदी अशक्य आहे नक्कल मारणे हे ठोठो बोंबलून सांगत होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
A
arunjoshi123 Mon, 09/11/2017 - 14:07 नवीन
एकिकडे १. जुन्या बनावट नोटा सिस्टिममधून गेल्या नाहीत सिस्तिममधून नोटबंदीमुळे - कारण त्या नव्हत्याच, खूप कमी होत्या. बनवायला खूप वेळ होता तरी दुसरीकडे २. नव्या प्रचंड प्रमाणात बनावट नोटा बाजारात आहेत, सुशिक्षितांनाही फसवत. काही महिन्यांत. आणि तिसरीकडे ३. नोटबंदी फेल गेली आहे (या फ्रंटवर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
त
तेजस आठवले Sat, 09/09/2017 - 18:52 नवीन
जिथे लोकांचीच सुधारायची इच्छा नाहीये किंवा इच्छा असून "मी कशाला प्रयत्न करू, करेल दुसरं कोणीतरी" अशी वृत्ती असेल तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला तरी काही होणार नाही.
हे सत्य आहे. बऱ्याच गोष्टी इथेच अडतात.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 09/09/2017 - 19:58 नवीन
अमितदादा,
इथे होणारे फायदे आणि तोटे यांचे गणित काढल्यास अर्थव्यवस्थेस झालेलं मोठं नुकसान दिसून येईल.
शेतकऱ्यांचं नुकसान झालंय असं एकवेळ म्हणता येईल. पण पूर्ण अर्थव्यवस्थाच ठप्प झालीये असं नाही म्हणवंत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 09/09/2017 - 20:45 नवीन
बनावट नोटा , दहशतवाद आणि काळा पैसा नष्ट करणे हा नोटाबंदीचा मुख्य उद्देश होता, दुर्देवाने सरकारला हयात अपयश आल्याने नोटाबंदी नंतर झालेले अनुषंगिक फायद्याचेच ढोल पिटले जात आहेत. ह्यातील बरेचसे फायदे कायमस्वरूपी नाहीत (उदा: करसंकलन) किंवा नोटाबंदी न करताही ते करता आले असते. २००० हजाराच्या बनावट नोटा छापायचा उद्योग सुरू झाला आहे. भ्रष्टाचार बंद झालेला नाही, काळा पैसा निर्मिती परत चालू झाली आहे. आता राहिला प्रश्न दहशतवादाचा तो ही नष्ट झालेला नाही,मग नोटाबंदी यशस्वी झाली असं कसं म्हणता येईल? नोटाबंदी दरम्यान सामान्य जनतेची काहीही चूक नसताना आर्थिक नुकसान झाले, व अद्याप होत आहे. राज्यातील १२ जि.म.बँका अद्याप खातेदारांना त्यांचे हक्काचे पैसे देऊ शकत नाही. शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळू शकत नाही. नोटाबंदी नंतर १० महिन्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. दीर्घकालीन तोटेही समोर आले पाहिजेत.
  • Log in or register to post comments
म
मामाजी Sun, 09/10/2017 - 05:26 नवीन
"२००० हजाराच्या बनावट नोटा छापायचा उद्योग सुरू झाला आहे. भ्रष्टाचार बंद झालेला नाही, काळा पैसा निर्मिती परत चालू झाली आहे. आता राहिला प्रश्न दहशतवादाचा तो ही नष्ट झालेला नाही,मग नोटाबंदी यशस्वी झाली असं कसं म्हणता येईल?" मी स्वच्छ धूतलेले कपडे वापरले ते परत मळले. माझी कपडे धूवायची मेहेनत अयशस्वी झाली? मी घरातले पंखे पुसले त्यावर परत धूळ जमा झाली. माझी धूळ पुसायची मेहनत अयशस्वी झाली? मी घासलेली भांडी वापरली ती परत खरकटी झाली. माझी भांडी घासायची मेहनत अयशस्वी झाली? चार पाच वर्षां पूर्वी मी घराला रंग लावला तो खराब झाला. माझा रंग लावण्यावर केलेला खर्च वाया गेला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Sun, 09/10/2017 - 05:38 नवीन
चुकीची तुलना असली तरी नोटाबंदी हा जालीम इलाज नाही हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद! आता पुन्हा मळलेले कपडे, भांडी कधी धुणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी
भ
भंकस बाबा Sun, 09/10/2017 - 06:24 नवीन
स्वच्छ धुवून कपडे वापरले, ते मळले, मेहनत बेकार झाली . अहो साहेब धुवायचा खर्च कपड्यापेक्षा जास्त झाला, आयला गिरा तो भी टांग उपर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी
म
मामाजी Mon, 09/11/2017 - 03:50 नवीन
भंकस बाबा, धन्यवाद प्रथम मी स्पष्ट शब्दात सांगतो की मी नोटाबंदि चा पूर्ण समर्थक आहे व माझ्या दृष्टीकोनातून ही चाल यशस्वी झालेली आहे. माझ्या मते “गिरा तो भी टांग उपर ही” ही अवस्था आपल्या सारख्यांची झाली आहे. नोटाबंदि यशस्वी झाली हे सत्य स्वीकाराता येत नसल्याने वेगवेगळे तर्क देउन ही अयशस्वी कशी झाली आहे हे सिद्ध करण्याची सध्या चढाओढ सुरू आहे. “अहो साहेब धुवायचा खर्च कपड्यापेक्षा जास्त झाला” ह्या वाक्यातून आपल्याला काय सूचित करायचे आहे ते मला समजले नाही. तेंव्हा कृपा करून थोड विस्तारानी समजाउन द्यावे ही आपणास विनंती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
त
तुषार काळभोर Sun, 09/10/2017 - 05:08 नवीन
????? विद्यार्थ्यांनो, पर्यावरणपूरक गणेश विसर्जनात सहभागी होऊ नका, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा पुण्यातील उच्च शिक्षण विभाग हिंदू जनजागृती समितीच्या सांगण्यावरुन काम करते काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पर्यावरणपूरक गणपती विसर्जनात सहभागी न होण्याचा फतवा काढल्याचं उघड झालं आहे. महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्यास मनाई करावी असे आदेश उच्च शिक्षण विभागाकडून सावित्रीबाई फुले पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. सोबत शिक्षण विभागाने महाविद्यालयांना मार्गदर्शनासाठी हिंदू जनजागृती समितीचं पत्रही जोडलं आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 09/10/2017 - 06:12 नवीन
द ग्रेट मुंबई युनिव्हर्सिटीच्या एम ए सोशलॉजि पेपरमध्ये 72 मुलांना शून्य मार्क दिलेत. 80% मुले नापास डिक्लेअर केलीत. शेवट या विषयाचे मुलांचे पेपर गहाळ झाल्याचे कबुल केले म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ज
जेम्स वांड Sun, 09/10/2017 - 05:47 नवीन
अन तरी अजून मेधा खोले सोवळा स्वयंपाक प्रकरणाचा उल्लेखही नाही म्हणजे गमंतच वाटली एकंदरीत.
  • Log in or register to post comments
व
वेशीवरचा म्हसोबा Sun, 09/10/2017 - 08:32 नवीन
ते "आपलं" प्रकरण असल्याने सोयिस्कर कानाडोळा करत असावेत काही बिनिचे शिलेदार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा