Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी : सप्टेंबर '१७

त
तुषार काळभोर
Wed, 08/30/2017 - 04:44
🗣 168 प्रतिसाद
१) राज्याच्या बहुतेक भागाला पावसाने झोडपले असून, विशेषतः मुंबईत परिस्थिती चिंताजनकझाली आहे. पावसाचे पाणी ट्रॅकवर साठून राहिल्याने कित्येक तास लोकलसेवा बँड असल्याने तसेच पाणी साठलेल्या रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतूक कोलमडली होती. आता पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती हळू हळू सुधारतेय. २) डोकलाम प्रश्न तूर्तास सुटल्याचे दिसतेय. पंतप्रधानांच्या ब्रिक्स परिषदेसाठी चीन दौऱ्याआधी हे झालेय. मात्र भारत व चीनच्या बाजूने वेगवेगळ्या अर्थाच्या बातम्या आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांतसुद्धा याविषयी मतांतरे आहेत. दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेतल्याचे भारताने म्हटलेय, तर भारताने घुसवलेले सैन्य माघारी घेतल्याचे चीनने म्हटलेय. अ) भारताने सैन्य मागे घेणे: भारतासहित सर्वजण असेच म्हणतात. ब) चीनने सैन्य मागे घेणे: असे फक्त भारत म्हणतोय. काही ठिकाणी चीन तिथे गस्त सुरू ठेवणार असल्याच्या बातम्या आहेत. क) डोकलाम प्रश्नाच्या मुळाशी असलेला चीनने बांधलेला रस्ता: चीन हे काम सोडून देणार की चालू ठेवणार, यावर कुठेच स्पष्टीकरण दिसले नाही. BBC सहित बऱ्याच ठिकाणी डोकलाम प्रकरणी चीनचा विजय झालाय, अशा अर्थाच्या बातम्या आहेत.
वर्गीकरण
घडामोडी

प्रतिक्रिया द्या
49380 वाचन

💬 प्रतिसाद (168)
आ
आनंदयात्री Tue, 09/19/2017 - 20:49 नवीन
धन्यवाद राघव. सरकार पेट्रोल पंपांचे जाळे वापरून चार्जिंग ग्रीड बनवणार किंवा कसे ते जाणण्याची उत्सुकता आहे. त्याबाबत काही वाचनात आले तर इथे नक्की येऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
प
पैसा Wed, 09/20/2017 - 06:30 नवीन
सगळे पेट्रोल डिझेल रिप्लेस करायला किती प्रमाणात वीज लागेल? इतकी वीज उपलब्ध होऊ शकेल का? बॅटरी हा खूप धोकादायक कचरा असेल. त्याची विल्हेवाट लावणे किती सोपे असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
र
राघव Wed, 09/20/2017 - 07:02 नवीन
जालावर जेवढं शोधलं त्यातून याचं उत्तर सध्यातरी नकारात्मकच आहे. अर्थात् हे सरकारलाही समजत असणारच. पेट्रोल/डिझेल वर चालणारी वाहने आली तेव्हा त्यासाठीचे इन्फ्रा सर्वत्र नव्हतेच. जसजसा वापर वाढत गेला तसतसे इन्फ्रा तयार होत गेले. असेच आत्ताही व्हावे असे म्हणणे नसले तरी, साधारण दृष्टीकोन सकारात्मक ठेवून प्रयत्न झाले तर उत्तमच. वीज उत्पादनात वाढ होतेच आहे. काही वर्षात परिस्थिती बर्‍यापैकी सुधारेल असे म्हणण्यास वाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मार्मिक गोडसे Wed, 09/20/2017 - 07:08 नवीन
भारताचा पेट्रोलियम इम्पोर्ट वर होणार खर्च ६० बिलियन डॉलर्सने कमी होईल. बॅटरीवर चालणाऱ्या कार आणून इतका खर्च कमी होईल ह पटत नाही, कारण डिजेल व पेट्रोलच्या च्या एकूण वापरात कारचा हिस्सा अनुक्रमे अंदाजे 25% व 35%इतका आहे. 100% बॅटरी कार रस्त्यावर आल्या तरी दावा केली इतकी बचत होऊ शकत नाही. बॅटरी तंत्रज्ञानाचा खर्च जोडला तर नोटाबंदी सारखी अवस्था होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
र
राघव Wed, 09/20/2017 - 08:18 नवीन
खरंय, पण ते फक्त कार नाही तर सर्व २, ३ व ४ व्हीलर वाहनांसाठी प्रयत्नरत आहेत. सध्या ट्रांसपोर्ट सेक्टर मधे एकूण साठ्यापैकी ७०% डीझेल आणि ९९.६% पेट्रोल वापर होतो. त्यामुळे जर सर्वांसाठी बॅटरी तयार होऊ शकल्यात तर फायदा नक्कीच आहे. अर्थात् या सध्यातरी जर-तर च्या गोष्टी आहेत. आत्ताचे हे पहिले पाऊल म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
र
राघव Wed, 09/20/2017 - 08:19 नवीन
खरंय, पण ते फक्त कार नाही तर सर्व २, ३ व ४ व्हीलर वाहनांसाठी प्रयत्नरत आहेत. सध्या ट्रांसपोर्ट सेक्टर मधे एकूण साठ्यापैकी ७०% डीझेल आणि ९९.६% पेट्रोल वापर होतो. त्यामुळे जर सर्वांसाठी बॅटरी तयार होऊ शकल्यात तर फायदा नक्कीच आहे. अर्थात् या सध्यातरी जर-तर च्या गोष्टी आहेत. आत्ताचे हे पहिले पाऊल म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
अ
अभिजीत अवलिया Fri, 09/22/2017 - 07:51 नवीन
माजी मुख्यमंत्री नारायण राणे ह्यांनी अपेक्षेप्रमाणे काल काँग्रेसला रामराम केला. मुळात ते काँग्रेस सारख्या दरबारी राजकारण असणाऱ्या पक्षात १२ वर्षे कसे राहू शकले ह्याचेच मला जास्त आश्चर्य वाटते. राजीनामा देताना नेहमीप्रमाणे मी काँग्रेस आणि शिवसेना रिकामी करणार अशी दर्पोक्ती केलीच आहे. शिवसेना सोडताना मी शिवसेना संपवणार असे विधान त्यांनी केले होते. पण प्रत्यक्षात तसे न होता उलट सेनेनेच रत्नागिरी जिल्ह्यात राणेंना धोबीपछाड देऊन आपले बस्तान पुन्हा बसवले आहे. तर २०१४ च्या निवडणुकीत राणेंना कुडाळ विधान सभा मतदार संघात आणि त्यांच्या ज्येष्ठ चिरंजीवांना रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात अस्मान दाखवले (लोकसभा निवडणुकीत मोदी फॅक्टर ची मदत झाली हे देखील खरे). आपल्याबरोबर शिवसेनेचे २५ आणि काँग्रेसचे १७ आमदार असून बऱ्याच जिल्यातील काँग्रेस पक्ष संघटना आपल्याबरोबर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इतकी ताकद राणे विरोधी पक्षनेते असताना देखील त्यांची होती असे वाटत नाही. काल पक्ष सोडताना देखील त्यांचे पुत्र निलेश राणे (कणकवलीचे आमदार) आणि समर्थक कालिदास कोळंबकर (वडाळाचे आमदार) त्यांच्या बरोबर न्हवते. ह्याचे कारण म्हणजे नारायण राणेंबरोबर उपस्थित राहिल्यास पक्षाने ह्या दोघांवर कारवाई केली असती. ती टाळण्यासाठी हे दोघेही अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्यासोबत किती जण येतील ह्याची शंका आहे. कालिदास कोळंबकर देखील येतील असे वाटत नाही. राणेंची पुढची वाटचाल काय असणार ते लवकरच स्पष्ट होईल. पण समजा भाजपने त्यांना नाकारले तर त्यांचे आणि त्यांच्या पुत्रांचे राजकीय करियर संपल्यात जमा आहे.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 09/22/2017 - 08:03 नवीन
http://www.thehindu.com/news/international/deranged-trump-will-pay-dearly-for-threat-says-kim-jong-un/article19733271.ece?homepage=true
किम जॉंग पिसाळला..
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sat, 09/23/2017 - 11:39 नवीन
नक्सलवादाचा इतिहास आणि सध्य परिस्थिती यावर उत्तम भाष्य करणारा एक लेख.... Half a Century of India’s Maoist Insurgency अनेक नवीन गोष्टी लेखातून कळल्या... उदारणार्थ The first Communist Party of India (CPI) was formed in 1920 under the aegis of the Soviet regime at a meeting in Tashkent. Following India’s independence in 1947, when the Soviet apparatus supported the centrist Indian National Congress, the CPI followed suit. This led eventually to an acrimonious split, from which the Communist Party of India (Marxist) was formed 1964. The CPI(M) – now the largest overground communist party in India that pursues a more or less social democratic agenda – split over Soviet hegemony, but declared its distance from the Chinese Communist Party (CPC) as well and followed what it called “Communism with Indian characteristics. But within three years of that split, the CPC managed to engineer another. Led by a man named Charu Majumdar, this new group rejected elections and opted for Mao Zedong’s “protracted people’s war” doctrine. For example, in 2007, the Maoists played a key role in bringing down the 34-year run of the Communist Party of India (Marxist) as the ruling party of West Bengal. Involving themselves over a land acquisition dispute in Nandigram, Maoist guerrillas declared war on the Marxists and killed and drove members out of their homes in large numbers. This led to a landslide win for the opposition leader, Mamata Banerjee. The operation was led by famed guerrilla leader Mallojula Koteswara Rao a.k.a Kishenji. तसेच लेखामध्ये माओइस्ट ने ग्रस्त भागाचा सध्य स्थितीचा नकाशा आणि गेल्या १० वर्षातील मनुष्यहानी हि दिलेली आहे. हळूहळू हिंसाचार कमी होत चालला आहे आणि माओवादी च्या अधिपत्याखालील भाग कमी होत आहे हि आनंदाची बाब आहे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 09/23/2017 - 17:41 नवीन
तुम्ही टाकलेला परिच्छेद रोचक आहे, लेख वाचून पाहायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
ब
बांवरे Sat, 09/23/2017 - 19:29 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
म
मार्मिक गोडसे Sun, 09/24/2017 - 08:39 नवीन
मागील सरकारने गेल्या ७० वर्षात काहीच कामं केली नाही, तर मग ह्या मॅडम कशाच्या जोरावर शेजारील देशाला आत्मपरीक्षण करायला सांगत आहेत? http://m.economictimes.com/news/politics-and-nation/india-creating-it-network-all-across-the-world-pakistan-haqqani-network-sushma-swaraj-at-unga/amp_articleshow/60809284.cms
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 09/24/2017 - 09:22 नवीन
बिनबुडाची टिका करण्याआधी, त्यांचे युएनच्या महासभेत केलेले संपूर्ण भाषण तरी एकदा ऐकुन घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Sun, 09/24/2017 - 10:08 नवीन
हे मी उगाच म्हणत नाही. हे देशाच्या पंतप्रधानांना समजत नाही, मग येतात असे घरचे आहेर. आता हा विडिओ पंतप्रधान, त्याचे अंधभक्त अणि त्यांच्या पक्षाच्या आयटी सेलवाल्यांना दाखवा. उच्छाद मांडलाय त्यांनी खोटेपणाचा.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 09/24/2017 - 11:44 नवीन
मा.गो. गेले ७० वर्षं देशात काँग्रेसचं देशविरोधी शासन असूनही देशाने इतकी प्रगती केली. तरीही मनमोहनसिंग म्हणतात की देशाच्या संपत्तीवर मुसलमानांचा पहिला हक्क आहे. यापेक्षा खरेपणाचा उच्छाद परवडला. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
त
तुषार काळभोर Mon, 09/25/2017 - 03:37 नवीन
ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे निधन Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 09/25/2017 - 09:10 नवीन
श्रद्धांजली ! :-( -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
त
तुषार काळभोर Tue, 09/26/2017 - 10:06 नवीन
With limited options to save bleeding economy, Modi is fighting a tough battle with his hands tied अर्थशास्त्रातील आपल्याला काही कळत नाही, पण हे वाचून सद्य परिस्थिती व आगामी काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कठीण आहे. श्री गॅरी ट्रुमन / श्री मिल्टन: तुमच्या insightsच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा