ताज्या घडामोडी : सप्टेंबर '१७
१) राज्याच्या बहुतेक भागाला पावसाने झोडपले असून, विशेषतः मुंबईत परिस्थिती चिंताजनकझाली आहे. पावसाचे पाणी ट्रॅकवर साठून राहिल्याने कित्येक तास लोकलसेवा बँड असल्याने तसेच पाणी साठलेल्या रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतूक कोलमडली होती.
आता पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती हळू हळू सुधारतेय.
२) डोकलाम प्रश्न तूर्तास सुटल्याचे दिसतेय. पंतप्रधानांच्या ब्रिक्स परिषदेसाठी चीन दौऱ्याआधी हे झालेय. मात्र भारत व चीनच्या बाजूने वेगवेगळ्या अर्थाच्या बातम्या आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांतसुद्धा याविषयी मतांतरे आहेत. दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेतल्याचे भारताने म्हटलेय, तर भारताने घुसवलेले सैन्य माघारी घेतल्याचे चीनने म्हटलेय.
अ) भारताने सैन्य मागे घेणे: भारतासहित सर्वजण असेच म्हणतात.
ब) चीनने सैन्य मागे घेणे: असे फक्त भारत म्हणतोय. काही ठिकाणी चीन तिथे गस्त सुरू ठेवणार असल्याच्या बातम्या आहेत.
क) डोकलाम प्रश्नाच्या मुळाशी असलेला चीनने बांधलेला रस्ता: चीन हे काम सोडून देणार की चालू ठेवणार, यावर कुठेच स्पष्टीकरण दिसले नाही.
BBC सहित बऱ्याच ठिकाणी डोकलाम प्रकरणी चीनचा विजय झालाय, अशा अर्थाच्या बातम्या आहेत.
हिंदुस्थानच्या भररस्त्यावर एका महिला पत्रकाराची हत्या व्हावी हे कसले लक्षण समजायचे? तिचे विचार व भूमिका कदाचित कुणाला पटत नसतील. तिच्या लिखाणाने व भूमिकेने कुणी अस्वस्थ झाले असतील, म्हणून त्या निःशस्त्र महिलेवर अशाप्रकारे निर्घृण हल्ला करणे हे अमानुष आहे. मानवता व देशाच्या इभ्रतीस कलंक लावणारे आहे. हे शौर्य नाही व मर्दानगीचा जयही नाही.- शूर वाघोबा उद्धट ठाकरे हे वाचल्यानंतर का कोणास ठाऊक, पण मलिष्का, पालघरच्या मुली, नगरसेविका घोसाळकर इ. आठविले. http://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-attacks-on-bjp-over-gauri-lankesh-murder/articleshow/60401978वरील तक्त्यामधे महाराष्ट्रातील एकही पत्रकार नाहिये२-३ वर्षांपूर्वी मुंबईत पत्रकार जे डे यांचा खून झाला होता. काही पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत. हत्यांची अजून काही प्रकरणे सुद्धा असतील.