ताज्या घडामोडी : सप्टेंबर '१७
१) राज्याच्या बहुतेक भागाला पावसाने झोडपले असून, विशेषतः मुंबईत परिस्थिती चिंताजनकझाली आहे. पावसाचे पाणी ट्रॅकवर साठून राहिल्याने कित्येक तास लोकलसेवा बँड असल्याने तसेच पाणी साठलेल्या रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतूक कोलमडली होती.
आता पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती हळू हळू सुधारतेय.
२) डोकलाम प्रश्न तूर्तास सुटल्याचे दिसतेय. पंतप्रधानांच्या ब्रिक्स परिषदेसाठी चीन दौऱ्याआधी हे झालेय. मात्र भारत व चीनच्या बाजूने वेगवेगळ्या अर्थाच्या बातम्या आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांतसुद्धा याविषयी मतांतरे आहेत. दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेतल्याचे भारताने म्हटलेय, तर भारताने घुसवलेले सैन्य माघारी घेतल्याचे चीनने म्हटलेय.
अ) भारताने सैन्य मागे घेणे: भारतासहित सर्वजण असेच म्हणतात.
ब) चीनने सैन्य मागे घेणे: असे फक्त भारत म्हणतोय. काही ठिकाणी चीन तिथे गस्त सुरू ठेवणार असल्याच्या बातम्या आहेत.
क) डोकलाम प्रश्नाच्या मुळाशी असलेला चीनने बांधलेला रस्ता: चीन हे काम सोडून देणार की चालू ठेवणार, यावर कुठेच स्पष्टीकरण दिसले नाही.
BBC सहित बऱ्याच ठिकाणी डोकलाम प्रकरणी चीनचा विजय झालाय, अशा अर्थाच्या बातम्या आहेत.
काँग्रेसच्या सत्ताकाळात अतिरेकी भ्रष्टाचार, सेक्युलॅरिझमच्या नावाखाली आपल्या अल्पसंख्यांक व्होट बँकेचे लांगुलचालन इत्यांदीमुळे एका टोकाला गेलेला लंबक भाजपा समर्थक (यांना त्यांचे विरोधक भक्त म्हणतात) "आपल्या" सरकारचे समर्थन करताना दुसर्या टोकाला नेत आहेत.तुम्ही जे काँग्रेसच्या काळाच्या विरुद्ध टोक म्हणताय ते म्हणजे संपुष्टात आलेला भ्रष्टाचार, अल्पसंख्यांक व्होट बँकेचे लांगुलचालन आता होत नाही हेच ना? आता यावर म्हणाल की अजूनही कनिष्ठ सरकारी कर्मचारी, पोलीस ई भ्रष्टाचार करतात. तर तो आपल्याच मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात जसे २जी, कोळसा, संरक्षण सामग्री आणि इतर हजारो लाखो कोटींचे घोटाळे झाले तसे गेल्या ३ वर्षात झाले का? काही लोक नोटबंदी हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याची बोंब ठोकतात पण तो घोटाळा कसा म्हणायचा? सगळे पैसे बँकेत जमा झाले ना? सत्ताधारी पक्षातील लोकांनी आधीच पैसे बदलून घेतल्याचा पण आरोप झाला, पण पुरावा सापडत नाही. बँकांची एनपीए झालेली कर्ज माफ करण्यावरून आरोप होतात पण कर्ज एनपीए काही ३ वर्षात झालेली नाहीत. ही कर्ज आधीच कधीतरी वाटली गेली होती. जी वसूल करण्यासाठी जगातले महान अर्थशात्रज्ञ भारताचे पंतप्रधान असूनही आणि सगळ्यांचे लाडके रघुराम राजन आरबीआयचे गव्हर्नर असूनही काही करू शकले नाहीत. ती एनपीए write-off केली म्हणजेच माफ करून टाकली असा चुकीचा समज सामान्य जनतेचा कोणी करून दिला? अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करण्याचं म्हणाल तर काँग्रेसने त्यांना पण उल्लू बनवलंय. कुठल्या मुस्लिमांची काँग्रेसच्या काळात भरभराट झाली किंवा सुधारणा झाली ते सांगा. तोंडी तीन तलाक सारख्या प्रथा अगदी कट्टर मुस्लिम असलेल्या देशात सुद्धा नाहीत त्या आपल्या देशात रुजू करून घेण्यासाठी राजीव गांधींनी कायदा बदलला. स्त्रियांचं सबलीकरण करणार म्हणून डांगोरा पिटणाऱ्या काँग्रेसने अल्पसंख्यांक महिलांना आयुष्यभर त्रास सहन करायला लागेल याची कायदेशीर व्यवस्था करून ठेवली. त्यातून मुक्तता करायला "मुस्लिमविरोधी" आणि "कट्टर हिंदू" अशी बिरुदावली मिळालेल्या मोदींना प्रयत्न करायला लागले आणि ते यशस्वीसुद्धा झाले. काँग्रेस सत्तेवर असताना बऱ्याच धार्मिक दंगली झाल्या. २००२ च्या एका दंगलीवरून मोदींना एवढं धारेवर धरलं गेलं, पण त्यावेळेला ते नुकतेच सत्तेवर आले होते आणि नंतर १२ वर्षात एकही धार्मिक दंगल झाली नाही हे मात्र सोयीस्करपणे विसरलं जातं. त्यामुळे लंबक जितका तिकडे गेला होता तितका तो इकडे येणारच पण ते टेम्पररी असेल. हिंदू मुळातच एवढे क्रूर आणि दुसऱ्या धर्मातील लोकांच्या कत्तली उगाचच कराव्या या वृत्तीचे नाहीत. मुसलमानांनी कट्टरपणा सोडला आणि हिंदूंच्या कुरापती काढणं बंद केलं तर हिंदू स्वतःहून आपला कट्टरपणा दाखवायला जाणार नाहीत. हिंदू दहशतवाद ही उगाच पसरवलेली अफवा होती, पण अजूनही काही सामान्य (राजकारणी नसलेल्या) हिंदूंचाच त्यावर विश्वास आहे असं वाटतंय. हिंदूंना राहण्यासाठी भारत हाच एक हक्काचा देश आहे, त्यामुळे हिंदूंनी एकत्र येण्यात/ असण्यात काहीच चुकीचं नाहीये. हिंदू असण्याचा अभिमान बाळगायला हवा कारण आपला धर्म प्रार्थना पद्धतीवरून आणि कुठला देव मानता यावरून त्यांच्या कत्तली कराव्या हे सांगत नाही. कट्टर हिंदू फार फार तर रोज मंदिरात जाईल, ३ वेळा पूजा करेल. पण आमच्या धर्मात सांगितलंय म्हणून मशिदी पाडा, मुस्लिमांना मारा आणि मुस्लिम स्त्रियांवर बलात्कार करा हे करणार नाही. पण जर मुस्लिम, त्यांच्या धर्मात सांगितलंय म्हणून, हिंदूंना त्रास द्यायला लागले तर हिंदूंनी का शांत बसावं? आणि प्रॉब्लेम असा आहे की हिंदूंनी प्रतिकार करायला सुरुवात केली की आपल्यातलेच "सेक्युलर" मुस्लिमांनी केलेल्या कुरापती विसरून कट्टर हिंदू कसे धोकादायक आहेत हे सांगत फिरतात.While this is likely a side-effect of demonetisation, more research is needed to unpack how India’s unemployment rate fell in January-April 2017. याचा सरळ अर्थ असा की या लेखातील निष्कर्ष पुरेशा संशोधनावर आधारीत नाहीत.याचा अर्थ असा हि होतो कि आमच्या संशोधनास बळकटी मिळण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे, त्याचवेळी आमचं संशोधन योग्य कारण न देता फेटाळता येणार नाही.याचा असाही अर्थ होऊ शकतो की आमच्या संशोधनास बळकटी मिळण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे आणि ते केलं तर आमचं संशोधन फेटाळता सुद्धा येऊ शकतं. वरील वाक्यातून आपण आपल्याला हवा तसा अर्थ काढू शकतो. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या संस्थेने ज्या संशोधनावर व आकडेवारीवर आपले निष्कर्ष काढले आहेत ते संशोधन व आकडेवारी पुरेशी नाही व त्यामुळे आता या क्षणी अपुर्या संशोधनावर आणि आकडेवारीवर कोणताही ठाम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.याच उत्तर खाली तुम्हाला गणित समजत अशी आशा करतो.While the number of employed persons has dropped, the unemployment rate has also fallen. This is odd and it merits an explanation. The unemployment rate is the ratio of the unemployed to the labour force where the labour force is the sum of the employed and the unemployed.While the number of persons employed fell by 1.5 million, the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. As a result, the labour force fell by 11 million. This substantial fall in the denominator is responsible for the fall in the unemployment rate.वरील लेखातील पहिली आकृती पहा तुम्हाला लेबर पार्टीसिपेशन फोर्स nov -april पर्यंत कमी झालेला दिसेल हा आहे नोटबंदीचा परिणाम. मूळ संशोधन लेखात कुठेही विरोधाभास नाही, असला तर तो आहे समजवून न घेणाऱयांच्या मनात.एखादे गुणोत्तर किंवा टक्केवारी योग्य चित्र उभे करू शकत नाही. उदाहरणार्थ एखादा फलंदाज एका डावात ५ धावांवर बाद झाला व दुसर्या डावात त्याने १० धावा केल्या तर निव्वळ गुणोत्तर किंवा टक्केवारीचा विचार केला तर असे म्हणता येईल की दुसर्या डावात त्याने प्रचंड प्रगती केली असून पहिल्या डावाच्या तुलनेत दुप्पट धावा केल्या आणि त्यावर समाधान मानता येईल. परंतु प्रत्यक्ष धावांचा आकडा पाहिला तर दोन्ही डावात तो अपयशी ठरलेला आहे हे दिसून येईल. म्हणजेच कोणत्याही गोष्टीवर निष्कर्ष काढण्याआधी गुणोत्तर किंवा टक्केवारीपेक्षा प्रत्यक्ष आकडे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. वरील उदाहरणात तसेच आहे. गुणोत्तर किंवा टक्केवारीपेक्षा बेकारीचे प्रत्यक्ष आकडे पाहिले तर जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात बेकारांची संख्या ९६ लाखांनी कमी झाली असे वृत्तांतात लिहिले आहे. आता कसेही गुणोत्तर मांडले किंवा टक्केवारीची तुलना केली तरी बेकारांची संख्या ९६ लाखांनी घटलेली आहे ही वस्तुस्थिती लपत नाही आणि त्यामुळेच या काळात ३५% लोकांनी नोकर्या गमाविल्या अशासारखे निष्कर्ष अविश्वसनीय वाटतात. त्याला अजून एक आधार म्हणजे २०१६-१७ या वर्षात झालेले करसंकलन. केंद्रीय सीमाशुल्क, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, सेवा कर अशा सर्व करांच्या संकलनामध्ये या वर्षात मोठी वाढ झाली आहे. जर भारतात या वर्षात ३५% लोकांनी नोकर्या गमाविलेल्या असतील व कंपन्यांच्या महसूलात ५०% घट झाली असेल तर करसंकलनात मोठ्या प्रमाणात घट व्हायला हवी. त्यामुळे या वृत्तांतात दिलेल्या आकड्यांवर विश्वास ठेवणे अवघड आहे कारण वृत्तांतातील आकडे व निष्कर्ष प्रत्यक्ष वस्तुस्थितीशी विसंगत आहेत. या संस्थेन अंदाजे १,६१,००० कुटुंबांचे सर्वेक्षण करून आपले निष्कर्ष काढले असे लिहिले आहे. भारतात २६ कोटींपेक्षा अधिक कुटुंबे आहेत. त्यापैकी जेमतेम १,६१,००० कुटुंबे म्हणजे हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या जेमतेम ०.०६% लोकसंख्येचे (म्हणजेच प्रत्येक ५००० नागरिकांमागे ३ नागरिक) सर्वेक्षण केलेले आहे. हे सॅम्पल खूपच कमी आहे आणि त्यामुळेच यांचे निष्कर्ष चुकलेले दिसतात.आता शेती कर्ज माफी संधर्भात तुमचं जे मत आहे त्याच्याशी मी सहमत नाही, मुळात नोटबंदी हे शेती कर्ज माफी साठी एकमेव कारण नाही तर एक catalist आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात काही लगेच निवडणूक न्हवती परंतु तरीही राज्य सरकारे झुकली आणि कर्जमाफी दिली, याला अनेक कारणाबरोबर नोटबंदी जबाबदार आहे हे आपण नाकारू शकत नाही.महाराष्ट्रात लगेच निवडणुक नसली तरी उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी जाहीर केल्यामुळे महाराष्ट्राला कर्जमाफी नाकारता आली नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे फडणविसांनी खूपच कठोर निकष लावून कमीतकमी शेतकर्यांना थोडीशी कर्जमाफी मिळेल अशी योजना आणली आहे. कर्नाटकमध्ये कर्जमाफी दिली आहे का नाही हे मला माहिती नाही. परंतु अजून ६ महिन्यांनी कर्नाटक विधानसभेची निवडणुक आहे. जर तिथे कर्जमाफी दिली तर त्यासाठी निवडणुक हे एकमेव कारण असेल. तामिळनाडूत अजून कर्जमाफी दिलेली नाही. ३-४ महिन्यांपूर्वी तिथल्या शेतकर्यांनी दिल्लीत बरेच दिवस आंदोलन केले होते. बर्याच दिवसानंतर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत शेतकर्यांची भेट घेऊन काहीतरी थातुरमातुर आश्वासन दिल्यावर शेतकर्यांनी आंदोलन थांबविले. परंतु तिथे कर्जमाफीचा निर्णय झाल्याचे ऐकिवात नाही. एकंदरीत कर्जमाफीसाठी नोटबंदी, शेतकर्यांची हलाखीची स्थिती इ. कारणे जबाबदार नसून निवडणुक किंवा राजकीय अपरिहार्यता हेच कारण त्यामागे असते. अन्यथा भारतातील यच्चयावत सर्व राज्यांनी कर्जमाफी जाहीर केली असती.सरकारच्या (मग ते भाजप असो नाहीतर काँग्रेस ) निर्णयावर टीका केली कि त्यांचे पाठीराखे मुद्यावर बोलायचं सोडून मग तुम्हीच का नाही सुचवत.... असले निरुपयोगी प्रश्न विचारतात हा अनुभव आहेयावर काही लोक "तुमच्या मताशी सहमत नाही, त्याचा प्रतिवाद करत नाही" किंवा प्रतिवाद करायला मला वेळ नाही हे पण उत्तर देतात असा अनुभव आहे. असो. प्रश्न निरुपयोगी नव्हता कारण तुम्ही म्हणालात की नोटबंदी न करतासुद्धा हे साध्य करता आलं असतं, म्हणून आपलं विचारलं की प्लॅन द्या. अगदी प्लॅन नसेल तर निदान पॉइंटर्स तरी देऊच शकता. पण तुम्ही हा शेवटचा प्रतिसाद आणि वेळ नाही असं म्हणून पळवाट आधीच काढून ठेवली आहे. काँग्रेसच्या काळात बाकी कशाहीपेक्षा भ्रष्टाचार (ते स्वतः करत होते तो) कमी करा हाच सगळ्यात मोठा मुद्दा होता. बाकी त्यांनी फारसं काही केलं असं वाटत नाही. ज्या काही योजना आणल्या त्यात फक्त स्वतःचे खिसे कसे भारत येतील हे बघितलं गेलं. अगदी शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना बघा, त्यातही खऱ्या शेतकऱ्याला भरपाई मिळालीच नाही, पण पैसे मात्र वाटले गेले.येथे विचार मांडायला तुम्हाला जाणकार व्हायायची गरज नाहीबरोब्बर. विचार म्हणजे दुसऱ्या कोणीतरी दाखवलेली आकडेवारी नव्हे. आकडेवारी तर दोन्ही बाजूची लोक दाखवत आहेत. मग दोन्ही बाजू अभ्यासून (जेवढं कळेल तेवढं) आपलं मत तयार करता आलं पाहिजे. तुम्ही म्हणताय की "नोटबंदी चे फक्त तोटेच आहेत आणि काही फायदे नाहीत असे माझे म्हणणे नाही". पण जशी इतरांनी दिलेली आकडेवारी दाखवून नोटबंदी अपयशी आहे म्हणताय, तसेच इतरांनी दिलेले (किंवा तुम्हाला वाटलेले) फायदे कुठे लिहिले नाहीत. हे सर्व फक्त तुम्हाला उद्देशून नाही तर जनरल स्टेटमेंट आहे - मी तटस्थ आहे असं नुसतं म्हणून भागत नाही तर दोन्ही बाजू सुसंगतपणे मांडता यायला पाहिजेत. बहुतांशी लोक आपल्या विचारांशी सुसंगत असेल तेवढेच वाचतात किंवा घेतात.@श्रीगुरुजीवरील उदाहरणात तसेच आहे. गुणोत्तर किंवा टक्केवारीपेक्षा बेकारीचे प्रत्यक्ष आकडे पाहिले तर जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात बेकारांची संख्या ९६ लाखांनी कमी झाली असे वृत्तांतात लिहिले आहे. आता कसेही गुणोत्तर मांडले किंवा टक्केवारीची तुलना केली तरी बेकारांची संख्या ९६ लाखांनी घटलेली आहे ही वस्तुस्थिती लपत नाही.the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. या वाक्याचा अर्थ बेकारी कमी झाली असा होत नाही असे मला वाटते, याचा अर्थशास्त्रात नेमका काय अर्थ होतो हे मी सांगू शकत नाही, परंतु बेकारी जवळजवळ १ कोटी ने ४ महिन्यात कमी झाली असा अर्थ होणार नाही, याच कारण क्र १. हे संशोधन करणारे एवढी साधी/बावळट चूक करतील असे वाटत नाही याचा अर्थ त्यांना वेगळे म्हणणे अभिप्रेत आहे अन्यथा त्यांनी ९६ लाख लोकांना नोकऱ्या लागल्या असे सरळ लिहलं असतं . २. एवढ्या मोठ्या संख्येने बेकारी कमी झाली असती तर मोदी सरकार ने रोजगार निर्मितीचे ढोल बडवले असते.the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. या वाक्याचा अर्थ बेकारी वाढली असा तर नक्कीच होत नाही. मूळ लेखात १५ लाख नोकर्या गेल्या, ३५% कर्मचार्यांनी नोकर्या गमाविल्या असे दावे आहेत. परंतु वरील वाक्य हे त्या दाव्यांशी पूर्णपणे विसंगत आहे. त्यामुळेच निदान या लेखांवर तरी विसंबून निश्चलीकरणामुळे नोकर्या गेल्या, बेकारी वाढली इ. दाव्यांवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. मोदी सरकार ने रोजगार निर्मितीचे ढोल बडवले नाहीत याचा अर्थ असा होत नाही की रोजगार निर्मिती झालेलीच नाही. त्यामुळे मोदी सरकारने ढोल बडविले नाहीत म्हणजेच रोजगार निर्मिती झालेली नाही असा सोयिस्कर निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. एकंदरीत निश्चलीकरणामुळे बेकारी वाढली, नोकर्या गेल्या किंवा बेकारी कमी झाली, रोजगार निर्मिती वाढली असे कोणतेही ठोस निष्कर्ष वरील लेखातून काढता येणार नाही.हे सॅम्पल खूपच कमी आहे आणि त्यामुळेच यांचे निष्कर्ष चुकलेले दिसतात.मला अजिबात असे वाटत नाही, पोलिंग सर्वे येतात किती असते हो सॅम्पल size ? १००००-२०००० इथे सॅम्पल size चांगली मोठी आहे.निवडणुक सर्वेक्षण आणि रोजगार संबंधी सर्वेक्षण यात बराच फरक आहे. अगदी डेटाचा आकार बघितला तरी मतदार हे किमान १८ वर्षांचे असतात तर वरील सर्वेक्षण हे किमान १४ वर्षांवरील व्यक्ती रोजगारक्षम आहे या गृहितकावर आधारीत आहे. म्हणजेच हे सर्वेक्षण जास्त लोकसंख्येसाठी आहे. त्यामुळे अर्थातच या सर्वेक्षणासाठी निवडणुक सर्वेक्षणापेक्षा जास्त सॅम्पल हवे.अन्यथा भारतातील यच्चयावत सर्व राज्यांनी कर्जमाफी जाहीर केली असती.मुळात देशात कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून (कमी/अधिक प्रमाणात ) असणारी राज्ये म्हणजे तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि बिहार. यातील ५ राज्यांनी कर्जमाफी /व्याजमाफी जाहीर केली आहे. नोटबंदी हे यामागचे कॅटॅलीस्ट आहे एकमेवे कारण नाहीये असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तेच मी फक्त मांडतोय.यातील फक्त महाराष्ट्र व उत्तर प्रदेशने कर्जमाफी जाहीर केली आहे. पंजाबचा त्याबाबतीत विचार सुरू आहे. इतर राज्यांनी कर्जमाफी जाहीर केल्याचे वाचनात आले नाही. मी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी ही राजकीय मागणी असते व कर्जमाफी जाहीर करणे हा राजकीय निर्णय असतो. सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्ष कर्जमाफीची मागणी करून ब्राऊनी पॉईंट्स स्कोअर करण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः जेव्हा निवडणुक जवळ आलेली असते तेव्हा मतपेढीची सोय करण्यासाठी ही मागणी केली जाते. सत्ताधारी पक्ष हे ओळखून असतो. त्यामुळे कर्जमाफी देण्याचे श्रेय विरोधकांना मिळू नये यासाठी सत्ताधारी पक्ष वेगवेगळे प्रयत्न करून शेवटी आपल्याला राजकीयदृष्ट्या सोयीच्या वेळी कर्जमाफी जाहीर केली जाते. निश्चलीकरण, दुष्काळ, उत्पादनाला कमी भाव, शेतीत नुकसान, शेतकर्यांची हलाखीची परिस्थिती इ. कोणतेही कारण कर्जमाफी मागण्यामागे व देण्यामागे नसते. अर्थात हे उघडपणे कोणीच सांगत नाही. ही कारणे पुढे केली जातात, परंतु त्यामागचे एकमेव कारण राजकीय फायदा हेच असते.रोहिंग्या मुसलमान हे देशासाठी धोकादायक आहेत. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना भारतात राहू दिलं जाणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारनं घेतली आहे. तसं प्रतिज्ञापत्रच केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सादर केलं आहे.इतकी स्पष्ट व नि:संदिग्ध भूमिका यापूर्वी कोणत्याही सरकारने घेतल्याचे ऐकिवात नाही. http://m.maharashtratimes.com/india-news/some-militant-rohingya-active-in-india-govt-to-sc/articleshow/60730706.cms