माझी तर खात्री आहे की २००४ आणि २००९ मधे देखिल हेच मुद्दे असावेत. अगदी शिवाजी महाराजांनी सुद्धा याच मुद्द्यांवरनं औरंगजेबाशी युद्ध केलं असल्याचं नाकारता येत नाही.
लोकसत्ताचा दर्जा अत्यंत सुमार आहे असं खालिल लिंक वरुन दिसते.
https://scroll.in/article/854242/fact-check-did-india-fall-45-places-in-global-hunger-index-rank-from-2014-to-2017
लोक असले पेपर का वाचतात देव जाणो.
असले हजारो अहवाल आले व त्यात काहीही आकडेवारी असली तरी जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असते हे बांगलादेशीयांना चांगले समजते. म्हणून बांगलादेशी, रोहिंग्या इ. मंडळी लोंढ्यांनी इथे येऊन डेरे टाकत असतात.
मामासाहेब
आकडेवारी म्हणजे काय? तर आपले डोके भट्टीत आणि पाय बर्फात ठेवले तर सरासरी तापमान 23 अंश सेल्सिअस असल्याने आपल्याला आल्हाददायक वाटते असे म्हणणे. त्याबद्दल किती गांभीर्याने विचार करायचा ते आपणच ठरवायचे असते.
जेव्हा आपल्या आवडीचे सरकार ,आपला देव पंतप्रधान असतो तेव्हा तर असल्या गोष्टींचा विचारच करायचाच नसतो. चांगले झाले की उदो उदो, वाईट झाले की दुर्लक्ष करायचे.
भूक निर्देशांकाला जास्त महत्व द्यायची गरज नाही. हा निर्देशांक International Food Policy Research Institute (IFPRI) नावाची संस्था काढते. वर वर पाहता हि सामाजिक काम करणारी नॉन प्रॉफिट संस्था वाटली तर प्रत्यक्षांत ह्यांचे करते करवते वेगळेच आहेत. मोठ्या शेती उद्योगांची ह्यांत गुंतवणूक आहे आणि त्या निर्देशांकाचा वापर करून मोदी सरकारवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न असू शकतो.
भारतात भुकेकंगाल लोक खूप असले तर मागील काही वर्षांत ५५ वरून १०० वर येण्यासारखे काही घडले आहे असे आम्हा भारतीयांना तरी वाटते का ?
कुठल्याच निर्देशांकाला किंमत नको द्यायला आता मग.
the GHI measures hunger not as food deprivation (or lack of access to food) but in terms of nutrition. So the index has four parameters: under-nourishment (insufficient calorie intake, which could be a function of food deprivation), child wasting, child stunting and child mortality.
इथे फक्त जगण्यासाठी आवश्यक अन्न आहे का इतकंच पाहिलं जात नाही तर त्यातून गरजेची घटकद्रवये मिळत आहेत का हे हि पाहिलं जातंय. त्याशिवाय कमी वजनाच्या मुलांची संख्या, कुपोषणाचे प्रमाण इत्यादी अनेक घटक आहेत.
मुलांची उंची आणि वाढ वयानुसार होतेय का हे पण पहिले जाते.
तसेच २०१६ मध्ये टक्केवारी काढण्याचे नियम अधिक कडक केले गेले आहेत! त्यामुळे भारताची हि इतकी मोठ्ठी घसरण दिसत आहे. पण तरीही इतर छोटे छोटे आशियाई देश देखील आपल्या पुढे आहेत.
आपल्या आहारामध्ये पोषकतत्वे कशी वाढवावीत यावर लोकांचे समुपदेशन होण्याची गरज दिसत आहे.
असेही म्हटले जाते कि सामान्य भारतीय माणसाच्या आहारात फळांना जवळपास स्थानच नसते. हे बदलायला हवे.
हि आकडेवारी निश्चितच काळजीची गोष्ट आहे. कृपया त्यात पक्षिय राजकारण आणून कातडी बचाओ चे प्रयोग करू नका.
सरकारला या अहवालाचा फायदाच होईल. कुठल्या घटकांवर भर देऊन कुपोषणाचे प्रमाण कमी करता येईल याचा अंदाज येऊ शकेल. भुकेच्या त्रयस्थ अहवालात मोदी/भाजप/काँग्रेस कशाला शोधायची. (हे वाक्य फक्त भाजपची कोंडी करण्यासाठी अहवाल दाखवणाऱ्यांसाठी पण आहे)
बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात आपण यशस्वी होत आहोत पण तरीही UNICEF ने २ वर्षांपूर्वी भारताने ठरवलेले उद्दिष्ट साध्य होईल का यावर चिंता व्यक्त केली होती.
• There has been a consistent decline in Infant Mortality Rate (IMR) and Under-Five Mortality Rate (U5MR) in India. The rate of decline in current decade is higher than in the previous.
• However, based on robust projections, at the current rate of decline, India is unlikely to meet the targets for Millennium Development Goal (MDG)-4, which aims to reduce by two thirds, between 1990 and 2015, the under-five mortality rate.
ती चिंता काही प्रमाणात खरी ठरली असे म्हणता येईल कारण आपण ते उद्दिष्ट गाठू शकलो नाहीत पण तरीही त्याच्या जवळपास तरी आहोत.
India’s child mortality rate per thousand live births has fallen by 62% from 125 per thousand live births in 1990 to 47 per thousand live births in 2015. This is slightly less than the 2015 Millennium Development Goal of a 66% reduction.
हि आकडेवारी निश्चितच काळजीची गोष्ट आहे. कृपया त्यात पक्षिय राजकारण आणून कातडी बचाओ चे प्रयोग करू नका.
सरकारला या अहवालाचा फायदाच होईल. कुठल्या घटकांवर भर देऊन कुपोषणाचे प्रमाण कमी करता येईल याचा अंदाज येऊ शकेल. भुकेच्या त्रयस्थ अहवालात मोदी/भाजप/काँग्रेस कशाला शोधायची.
+१
अहवालाचा अभ्यास करून काही राष्ट्रीय योजना आखता येते का ते बघायचे नाहीतर असलीच कोणती योजना तर त्यात काही बदल करायचे पोषणमूल्ये वाढण्यासाठी.
ही मोदीविरोधी अवार्ड वापसी गँगच्ची बातमी आहे. वर स्क्रॉलची मी लिंक दिली आहे तिच्यात सगळं स्पष्टीकरण आहे. आपली रँक घटली नसून चांगलीच झाली आहे.
=========================
आपला देश जगात ५५ वरून १०० वर ३ वर्षांत गेला असता तर ते "दिसलं" असतं. त्याला हा रिपोर्ट लागलाच नसता. फक्त एन आर आय लोकांना तो पटला असता.
शब्दबंबाळ यांनी दिलेली माहिती मूळ वेबसाईटवरची आहे, त्रयस्थ बातमीपत्रातील नाही. मूळ वेबसाईटनुसार
१. भारताच्या क्रमवारीमधे २०१४ च्या मानाने फार फरक पडलेला नाही, १ स्थानाची घसरण आहे.
२. क्रमवारीमधे भारताच्या आसपास असलेल्या देशांची नावे आपल्याला कितपत सुधारणांची गरज आहे हे दर्शवतात.
३. इतर वेळेस आपण ज्या देशांशी तुलना करतो (पाकीस्तान नव्हे) त्या देशांचे क्रमवारीतील स्थान आपल्याला गाठायचे आहे. (ब्राझील १८, रशिया २२, चीन २९, दक्षिण आफ्रिका ५५)
निदान ह्या निर्देशांकाला (हा निर्देशांक बालकांचे पोषण यावर भर देतो) तरी आपण गंभीरपणे घ्यायला हवे आणि उगाच राजकारण मधे आणू नये असे वाटत होते, पण सध्या ते शक्य नसावे बहूतेक.
बाकी देशात फक्त मोदीसमर्थक आणि मोदीविरोधीच आहेत वगैरे चालूद्या, आमची हरकत नाही.
२०१४ ला ७६ पैकी ५५ (१२० पैकी ९९) शेवटून २१ वा क्रमांक
२०१७ ला ११९ पैकी १०० शेवटून १९ वा क्रमांक
इतर देशः भारतानंतरचे क्रमांक (भारताचा क्रमांक ९९ धरून)
२०१४/२०१७ देश
१००/८६ काँगो
१०१/८८ बांग्लादेश
१०१/१०६ पाकीस्तान
१०३/१०० दिजीबाऊती
१०४/९२ बुर्कीना फासो
१०५/९१ लाओ
१०६/९८ मोझांबिक
१०७/१११ नायगर
१०८/११९ मध्य आफ्रिका
१०९/११६ मादागास्कर
११०/११७ सिएरा लीओन
परीस्थीती चांगली नाही इतके लक्षात आले तरी खूप झाले. वर लिहील्याप्रमाणे याततरी राजकारण न घुसवता विचार करता आला पाहीजे.
सध्याचा काँग्रेस पक्ष १२५+ वर्षे अजिबात जुना नाही. नेहरूंचा काँग्रेस पक्ष १९६९ साली फूट पडून संपला. त्यावेळेस त्याची निशाणी बैलजोडी होती. १९७० साली इंदिरा गांधींनी आपला पक्षंच खरा असा दावा केला. पण निवडणूक आयोगाने दाद दिली नाही. त्यामुळे इंदिराबाईंनी गायवासरू हे चिन्ह घेतलं. ज्येष्ठ नेत्यांचा बैलजोडीवाला काँग्रेस पक्ष १९७१ सालच्या निवडणुकांत जमीनदोस्त व इतिहासजमा झाला. पुढे १९७८ साली इंदिराबाईंनी हाताचा पंजा म्हणून चिन्ह घेतलं, त्यावेळेस त्या पक्षाचं नाव इंदिरा काँग्रेस होतं. हाच इंदिरा काँग्रेस पक्ष १९९५ साली नरसिंह रावांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय काँग्रेस म्हणून परत एकदा नामांतरित झाला.
या पार्श्वभूमीवर सध्याचा काँग्रेस पक्ष पप्पूच्या बापाचा पक्ष नसला, तरी त्याच्या बापाच्या आईची जहागीर म्हणता येऊ शकतो. त्यामुळे मी सध्याच्या काँग्रेसला घराणेहाहीच्या फूटपट्ट्या लावू इच्छित नाही.
आ.न.,
-गा.पै.
गा पै साहेब
हो काँग्रेस जर इंदिरा काँग्रेस म्हणून स्वतःला म्हणवत असती तर गोष्ट वेगळी. आजही जर सगळे काँग्रेसी महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांचा वारसा सांगतात तर त्यांना इंदिरा काँग्रेस असा पक्ष कसा म्हणता येईल? त्यात फाटाफूट होऊन ते परत एकत्र आले म्हणजे तो काँग्रेसच पक्ष आहे असे मानायला पाहिजे.१९८५ साली काँग्रेस स्थापनेची शताब्दी सुद्धा "याच" पक्षाने साजरी केली होती हे आपल्याला आठवत असेलच.
खरें डॉक्टरांचे हे बरीक खरें दिसतें. सध्याच्या काँग्रेसने गांधीनेहरूंचा वारसा सांगणे म्हणजे जुनी काँग्रेस हायज्याक करणे आहे. सबब अपहृत पक्ष अपहरणकर्त्याच्या पिताश्रींची जहागीर मानायला हरकत नसावी! काय म्हणता?
-गा.पै.
गामा साहेब
आजची काँग्रेस आपल्या अधिकृत स्थळावर आपणच मूळ काँग्रेस आहे हे लिहीत आहे तेंव्हा माझा मुद्दा अधिकृत रित्या अधोरेखित होतो आहे. कृपया नोंद असावी.
http://inc.in/INCSessions.aspx
१८ वर्षे वयापेक्षा कमी वयाच्या पत्नीशी केलेला शरीरसंबंध हा बलात्कारच असल्याचा निकाल काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. कायद्याच्या दृष्टीने मुलींचे विवाहाचे वय १८ वर्षे पूर्ण आवश्यक. पण जर पत्नी १५ ते १८ वयाची असेल तर तिच्याशी शरीरसंबंध म्हणजे बलात्कार नाही अशी तरतूद सध्या भा.द.वि. ३७५ मध्ये आहे. न्यायालयाच्या निर्णयाने हा विरोधाभास नाहीसा होईल. तसेच बालविवाहाचे प्रमाण कमी होण्यास हातभार लागेल.
हा निकाल मुस्लीम पुरुषाशी लग्न होणाऱ्या स्त्रीबद्धल लागू आहे का?
नसावा. भारतीय कायद्यानुसार मुस्लिम मुलींना वयाची १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह करायची परवानगी आहे. त्यामुळे वरील निकाल हा मुस्लिमांना लागू नसावा.
जागतिक भूक निर्देशांकाचा अहवाल आला.
भारताची स्थिती दयनिय आहे.
भ्रष्ट काँग्रेस सरकारच्या काळात २०१४ जागतिक भूक निर्देशांकाच्या अहवालात आपला नंबर ५५ होता. २००३ ला ९६ होता त्यातून मनमोहन सरकारने त्यांतून अनेक भुकेलेल्यांना बाहेर काढले.
पण ३ वर्षातच महान स्वच्छ आणि सतत प्रामाणिक असल्याचा दावा करणारे मोदी सरकारने भारताला पुन्हा १०० व्या स्थानावर ढकलले.
फक्त मोजक्याच उद्योजकांसाठी काम करणारे मोदी सरकार सगळ्या फ्रंटवर देशाला खड्ड्यात घालत आहेत. आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. लोकहितकार धोरण न राबविणारे हे सरकार देशातील गरीबांच्या जिवाशी क्रुर खेळ करीत आहे.
बिफ बॅन आणि नोटाबंदीने गरीबांच्या तोंडातील अन्न हिसकावून घेतले आहे. किती लोकांचा गुपचुप बळी जात आहे याचे आकडे तर आपल्याला मिळणार नाहीत... पण भूकेच आकडे पाहून शहारे आले आहेत.
काँग्रेसने केलेलं गेल्या १० वर्षाच्या चांगल्या कामवर पाणी फेरण्याचे काम मोदींनी केले आहे... लोकांनी त्यांना लवकर वठणीवर आणावे लागणार...
हिंसक राष्ट्रभक्ती पेक्षा भूकेलेल्यांना अन्न मिळवून देण्याची सोय करा, उजव्यांने यातुन थोडातरी धडा घ्या... फालतून आकडेवारीत विकास दाखवून नका...
#कामकीबात
#कामाचेबोला
वर लिहिल्याप्रमाणे २०१४ ला किती लोक होते रँकिंगमध्ये आणि आता किती आहेत हे लपवून सोडलेले हवाबाण.
२०१४ ला ७५पैकी ५५ नंबर होता. यवर्षी १२० पैकी १०० आहे. प्रचार जोर्दार सुरू केला आहे कांग्रेसींनी.
मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला?
प्रत्येकाला ५ कोटी रुपये दिले असं ऐकून आहे. म्हणजे ३० कोटी वाटले गेले. शिवसेनेकडे वाटायला कुठून आले असतील इतके पैसे ? रोख दिले असतील की कॅशलेस व्यवहाराने दिले असतील?
मी ठीकच आहे. २०१४ नंतर तुम्हाला सुरू झालेली जळजळ अजून संपत नाहीये याचे आश्चर्य वाटत आहे.
असो, थोडा जास्त वेळ पोगो बघा किंवा तुमच्या उपाध्यक्षांचे बाळबोध बोल ऐका - एकूण एकच..!
तुमचा प्रश्न म्हणजे तुमच्या काँग्रेसच्या रामराज्यात भ्रष्टाचार होतात याची कबुली आहे का..?
बघा हं, नीट विचार करून बोला. खोटे प्रतिसाद पाडण्याचे पैसे मिळाले नाहीत तर उगाच परत मोदींनाच दोष देऊ नका.
खोटे प्रतिसाद पाडण्याचे पैसे मिळाले नाहीत तर उगाच परत मोदींनाच दोष देऊ नका.
'Moduk operandi' बदला , तुमच्या मर्यादीत ज्ञानामुळे तुम्हाला हे सिध्द करता येणार नाही.
प्रत्येकाला ५ कोटी रुपये दिले असं ऐकून आहे. म्हणजे ३० कोटी वाटले गेले. शिवसेनेकडे वाटायला कुठून आले असतील इतके पैसे ? रोख दिले असतील की कॅशलेस व्यवहाराने दिले असतील?
हे ज्ञान तुम्हाला कुठून झाले याचे पुरावे द्या बघू.
अरेरे.. मी विसरलो होतो की पक्षप्रमुखाचे बोलणे (बाळबोध का असेना) ते जस्से च्या तसे त्रिकालबाधीत सत्य मानण्याची तुमच्यात परंपरा आहे.
प्रत्येकाला ५ कोटी रुपये दिले असं ऐकून आहे. म्हणजे ३० कोटी वाटले गेले - या विधानाचे पुरावे द्या म्हणतोय.
मी सांगितले कुठून ऐकले ते आणि मी कोणावर विश्वास ठेवायचा ते मी ठरवीन, परंतू मला प्रतिसाद पाडायला पैसे मिळतात हे तू कुठून ऐकले ते सांगायला भीती वाटते का?
हा निकाल मुस्लीम पुरुषाशी लग्न होणाऱ्या स्त्रीबद्धल लागू आहे का?नसावा. भारतीय कायद्यानुसार मुस्लिम मुलींना वयाची १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह करायची परवानगी आहे. त्यामुळे वरील निकाल हा मुस्लिमांना लागू नसावा.प्रत्येकाला ५ कोटी रुपये दिले असं ऐकून आहे. म्हणजे ३० कोटी वाटले गेले. शिवसेनेकडे वाटायला कुठून आले असतील इतके पैसे ? रोख दिले असतील की कॅशलेस व्यवहाराने दिले असतील?हे ज्ञान तुम्हाला कुठून झाले याचे पुरावे द्या बघू.