Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग १५

ग
गॅरी ट्रुमन
Fri, 11/03/2017 - 16:34
🗣 212 प्रतिसाद
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा. तृणमूल काँग्रेसचे संस्थापक मुकूल रॉय यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच असंतुष्ट होते अशा बातम्या होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने उत्तर भारत अगदी पूर्ण स्वीप केला होता. अनेक राज्यांपैकी सगळ्या जागा पक्षाने जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये त्यात वाढ होणे नाही आणि होईल ते नुकसानच होईल. त्यामुळे पूर्वापार कधीच शिरकाव करता न आलेल्या राज्यांमध्ये (बंगाल, ओरिसा, तामिळनाडू इत्यादी) बर्‍यापैकी जागा जिंकून इतरत्र पडझड झाल्यास ती भरून काढण्याकडे भाजपचा कल असेलच. त्या दृष्टीने मुकूल रॉय यांचा भाजप प्रवेश ही पक्षासाठी उत्साहवर्धक घडामोड आहे.
वर्गीकरण
ताज्या घडामोडी

प्रतिक्रिया द्या
44836 वाचन

💬 प्रतिसाद (212)
M
mayu4u Fri, 11/03/2017 - 16:45 नवीन
भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास रॉय यांना भाजपात घेणार नाही असे म्हटले जात होते. क्लीन चिट मिळाली का? ज्यांच्यावर आरोप करायचे त्यांनाच पक्षात किंवा रालोआत प्रवेश द्यायचा असा चुकीचा पायंडा पडल्याचे दिसत आहे. भाजप मतदारांना गृहीत धरत आहे असं वाटू लागलंय.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 11/03/2017 - 17:16 नवीन
भाजप मतदारांना गृहीत धरत आहे असं वाटू लागलंय.
हे तर होतच आहे. म्हणूनच मध्याच्या उजवीकडे भाजपला एखादा पर्याय असावा असे नेहमी वाटत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
M
mayu4u Fri, 11/03/2017 - 17:42 नवीन
भाजप खेरीज कुणीच नाहीये:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मार्मिक गोडसे Fri, 11/03/2017 - 18:07 नवीन
AIMIM आहे की.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 11/03/2017 - 18:33 नवीन
धन्य आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Sat, 11/04/2017 - 03:47 नवीन
अच्छा 'कांगारू ' पर्याय हवाय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 11/04/2017 - 05:07 नवीन
कांगारू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
त
तर्राट जोकर Fri, 11/03/2017 - 20:26 नवीन
ते दोन्ही एकाच बाजूला आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ग
गॅरी ट्रुमन Sat, 11/04/2017 - 05:40 नवीन
२०१३ पासूनच राहुल गांधी लवकरच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार अशा प्रकारच्या बातम्या कित्येक वेळा आल्या होत्या. यावेळी मात्र दिवाळीनंतर लवकरच काँग्रेस पक्षात हे स्थित्यंतर होणार असे म्हटले जात होते. दिवाळी संपून १५ दिवस झाले तरी त्या दृष्टीने काहीही हालचाल अजून तरी झालेली दिसत नाही. एक गोष्ट समजत नाही. जर गुजरातमध्ये निवडणुक जिंकायची बर्‍यापैकी खात्री असती तर राहुल गांधींना अध्यक्ष बनवून गुजरातमधील विजय हा त्यांचे नेतृत्व लोकांनी मान्य केले असा संदेश पसरवायची संधी काँग्रेसने नक्कीच व्यर्थ दवडली नसती. पण अजून तरी असे कोणतेही स्थित्यंतर काँग्रेसमध्ये झालेले नाही. याचा काय अर्थ घ्यावा? काँग्रेसला गुजरातमध्ये विजय मिळायची खात्री दिसत नाही हा का? कारण आता गुजरात निवडणुकांच्या तोंडावर असे स्थित्यंतर केले आणि पराभव झाला तर मात्र तो अगदीच प्रथमग्रासे मक्षिकापातः होईल. तसे काँग्रेसला नक्कीच होऊ द्यायचे नसणार असे वाटते. अजून गुजरात निवडणुकांना एक महिना आहे. तोपर्यंत राहुल गांधींना पदोन्नत्ती मिळते का हे बघू.
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Sat, 11/04/2017 - 16:15 नवीन
भाजपाला एखादा दणका मिळाला तरच ते जमिनीवर येतील. सध्या पाय हवेत आहेत. घोडचूक टाळण्यासाठी आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करावे लागण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे. गुजरात निवडणुकीत आपटले तर पुढे अधिक जोमाने २०१९ साठी उतरतील. देशाचे चांगले व्हायला पाहिजे, सरकार कोणाचेही असो. २०१९ मध्ये निसटता विजय भाजपाला मिळेल कदाचित, पण मग निर्णय घेण्याची धडाडी दाखवता येणार नाही कारण बहुमत नसेल. त्यामुळे ज्याला कोणाला २०१९ सत्ता मिळेल, ती भरपूर बहुमताने मिळावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
इ
इरसाल Mon, 11/06/2017 - 07:57 नवीन
त्यांनी कोणती दिवाळी हे नमुद केलेले नाही. कदाचित २०१८/२०१९ चीही असु शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
T
tusharmk Sat, 11/04/2017 - 07:10 नवीन
जाहिरातींवर उधळपट्टी संतापजनक राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारकडून कोट्यवधींच्या जाहिराती सुरू आहेत. मंत्रालयाच्या तळमजल्यावर लावलेल्या अशाच एका जाहिरातीत चक्क बॅंकॉकमधील छायाचित्र वापरण्यात आले आहे विकासकामांना कात्री लावून न केलेल्या कामांच्या जाहिरातीवर सरकार कोट्यवधींचा खर्च करत आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांना कोट्यवधींची कंत्राटे दिली जात आहेत. राज्य कर्जाच्या ओझ्याखाली बदलेले असताना अशा तऱ्हेची उधळपट्टी संतापजनक आहे, अमेरिकेतल्या रस्त्यापेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते चांगले आहेत, असा जावईशोध मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लावलाच आहे, त्यामुळे भाजपच्या नेत्यांना खोटे बोलण्याचा आजार जडला असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही आपले काय मत आहे गुजरात निवडणुकी बद्दल ? कोण बाजुने बाजी मारणार गुजरात मध्ये ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 11/04/2017 - 08:10 नवीन
आपले काय मत आहे गुजरात निवडणुकी बद्दल ? कोण बाजुने बाजी मारणार गुजरात मध्ये ? भाजप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: tusharmk
T
tusharmk Sat, 11/04/2017 - 13:27 नवीन
@ गुरुजी : किती फरक असेल जागा मध्ये २०१२ च्या तुलनेने ? Gujarat Legislative Assembly Election in 2012 Party Wise Party Name Seats Bharatiya Janta Party (BJP) 119 (८०) Gujartat Parivartan Party (GPP) 2 Independent (IND) 1 Indian National Congress (INC) 57 ( ८०)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 11/04/2017 - 16:17 नवीन
भाजपला २०१२ च्या तुलनेत जास्त जागा मिळतील (१२५+).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: tusharmk
म
मिल्टन Sat, 11/04/2017 - 15:08 नवीन
इथे दिलेल्या बातमीमध्ये एका सर्वेक्षणाची माहिती आली आहे. सध्या तरूण आणि मध्यम वयात असलेल्या (मिलेनिअल्स) अमेरिकन लोकांपैकी ५०% जण समाजवादी किंवा कम्युनिस्ट व्यवस्थेत राहणे पसंत करतील. हे सर्वेक्षण कितपत प्रातिनिधिक आहे याची कल्पना नाही पण जर का ही गोष्ट खरी असेल तर ती खूपच धक्कादायक आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष रॉनाल्ड रेगन यांनी एकदा एका भाषणात ते अध्यक्ष होण्यापूर्वीची एक गोष्ट सांगितली होती. त्यांना क्युबातील कॅस्ट्रोशाहीला कंटाळून अमेरिकेत पळून आलेला एक क्युबन शरणार्थी भेटला. तो शरणार्थी रेगनना म्हणाला--"ज्या देशात नागरिकांना त्यांना पाहिजे ते करायचे स्वातंत्र्य आहे अशा देशात जन्माला आलात आणि अशा देशात तुम्हाला राहायला मिळत आहे याबद्दल मला तुमचा हेवा वाटतो." त्यावर रेगन त्या क्युबन माणसाला म्हणाले,"तुला तुझा देश सोडून पळून जाण्यासाठी निदान कुठलातरी दुसरा देश होता याबद्दल मला तुझा हेवा वाटतो. नागरिकांची गळचेपी करणारी एखादी राजवट माझ्या देशात आली तर मला पळून जायला दुसरे कुठचे ठिकाणही नसेल". रॉनाल्ड रेगन खाली दिलेली गोष्ट नेहमी म्हणायचे. तसे काही निदान आपल्या जीवनकाळात तरी होणार नाही अशी अपेक्षा करू या. Image removed.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 11/04/2017 - 15:43 नवीन
स्वातंत्र्य एका पिढीत नष्ट होऊ शकतं. आपण ते वारसाहक्काने पुढे देऊ शकत नाही. ते लढून मिळवावं लागतं, जपावं लागतं आणि तेच करण्यासाठी पुढच्या पिढीला द्यावं लागतं. नाहीतर एक दिवस असा येईल की आयुष्याच्या संध्याकाळी आपण आपल्या मुला-नातवंडांना सांगू, की कोणे एके काळी भारतात कशी स्थिती होती, जिथे सर्वजण स्वतंत्र होते! देव करो आणि आपल्या, आपल्या मुला-नातवंडांच्या आयुष्यात अशी संध्याकाळ न येवो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
त
तुषार काळभोर Sat, 11/04/2017 - 15:44 नवीन
स्वातंत्र्य एका पिढीत नष्ट होऊ शकतं. आपण ते वारसाहक्काने पुढे देऊ शकत नाही. ते लढून मिळवावं लागतं, जपावं लागतं आणि तेच करण्यासाठी पुढच्या पिढीला द्यावं लागतं. नाहीतर एक दिवस असा येईल की आयुष्याच्या संध्याकाळी आपण आपल्या मुला-नातवंडांना सांगू, की कोणे एके काळी भारतात कशी स्थिती होती, जिथे सर्वजण स्वतंत्र होते! देव करो आणि आपल्या, आपल्या मुला-नातवंडांच्या आयुष्यात अशी संध्याकाळ न येवो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन
त
तुषार काळभोर Sat, 11/04/2017 - 18:07 नवीन
देशात सत्तेत आल्यास ‘जीएसटी’च्या रचनेत बदल करणार : राहुल गांधी हे चांगलं वाईट माहिती नाही. आश्वासन असल्याने पूर्ण होईल की नाही माहिती नाही. पण कित्येक वर्षांनी असं पाहायला मिळालं की विरोधी पक्ष केवळ 'तुमचं हे चुकतंय' एवढंच न सांगता 'आम्ही काय करू' हे सांगतोय.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 11/04/2017 - 18:08 नवीन
देशात सत्तेत आल्यावर काय करणार ते विधानसभेच्या प्रचारात सांगून काय उपयोग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
र
राघव Mon, 11/06/2017 - 15:14 नवीन
त्यात काय बदल करू ह्याबद्दल एक अवाक्षर देखिल नाही. हुशार आहेत! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
र
रामदास२९ Tue, 11/07/2017 - 06:48 नवीन
काही नाही कळत त्यान्ना .. जी.एस.टी मधला .. गुजरातची जनता हुशार आहे .. त्यान्ना माहित आहे, चुकून सत्तेवर आले तर विरोधाला विरोध म्हणून सगळे प्रक्लप मोडीत काढतील हे साहेब ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
स
सचिन Sun, 11/05/2017 - 15:50 नवीन
भा ज प जिंकणार हे निश्चित ! गुजरात मधे कोंग्रेस अजिबात इफेक्टिव नाही. कोणताही मुद्दा नाही ... म्हणून पटेल, दलित वगैरेंना पटवणे चालू आहे. राहूल गान्धी हा माणूस पक्षाच्या सम्पूर्ण विनाशासाठी सक्षम आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Sun, 11/05/2017 - 17:48 नवीन
इतकी का काळजी काँग्रेसची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन
त
तर्राट जोकर Sun, 11/05/2017 - 17:51 नवीन
मुकूल रॉय च्या भाजपप्रवेशावर भजनीमंडळ मूग गिळून बसलंय? पवार, सेना बद्दल जरा काही झाले की गटारगंगा वाहणारे कुठे गेले?
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud Sun, 11/05/2017 - 18:28 नवीन
गटारगंगा वाहती ठेवण्याचे कात तुम्ही अगदी मन लाऊन,प्रामाणिकपणे कष्ट करुन साध्य करत आहात....तेंव्हा बाकीच्यांनी या ताजमहालासारख्या होणाऱ्या कामात ढवळाढवळ खपणार आहे का तुम्हाला ?तुम्ही तेवढ्या मनस्वी नक्कीच आहात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
L
lakhu risbud Sun, 11/05/2017 - 18:29 नवीन
काम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
श
श्रीगुरुजी Sun, 11/05/2017 - 18:48 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
म
मार्मिक गोडसे Sun, 11/05/2017 - 18:41 नवीन
गोमूत्र घेऊन उभे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 11/05/2017 - 19:04 नवीन
सारे भ्रष्टाचारी भाजपमध्ये येऊन पवित्र होत आहेत. ह्या पेक्षा काय महान काम असेल, तेव्हा कोण भक्त ह्या पवित्र कामात ढवळाढवल करणार? राणे, रॉय वगैरे प्रांतोप्रांतीचे अट्टल गुन्हेगार आले भाजपात आणि त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचे वरुन आले आदेश की इथलं भजनीमंडळ लाजकाज सोडून तेही करणार आहेतच. यावर तोंडं शिवलीत बघा भजनीमंडळींची. सेनेच्या आमदाराने चप्पल काय मारली तर कसे भडाभडा ओकत सुटले होते इथले वीर.... आता थोबाडीत खाल्ल्यासारखे गप्प बसून आहेत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय, पण आरतीचं ताट काही सोडवत नाही. आता बोलणार काय? मग ह्याला चोर म्हण त्याला भाडोत्री म्हण, त्याचा पगार विचार, हुल्लडबाजी करा, कंपुबाजी करा. हा हा हा हा. मिपावर भगतमंडळींची सर्कस जबराट सुरु आहे. विनातिकिट फुल्ल धम्माल आहे. तिकडे नेते मांडिला मांडी लावून मदिरा रिचवतात, पोरी नाचवतात, इथे हे भगत त्यांच्यासाठी रात्रंदिवस आपली बोटं झिजवतात. हा हा हा. लाईट चालू रखो, रात खतम नही हुई अबतक. तमाशा जारी है, हम सोये नही है अबतक.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 11/05/2017 - 19:20 नवीन
उगी उगी. इनो घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
M
mayu4u Mon, 11/06/2017 - 04:39 नवीन
राणे रालोआत आलेत, भाजपात नाही. आणि तरीही, दरेकर, राणे, रॉय वगैरे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंडळींना भाजपने दूरच ठेवावं असं मी मिपावर आणि अन्यत्रही म्हणत असतो. - (अभिमानी नमोभक्त) मयुरेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
म
मार्मिक गोडसे Mon, 11/06/2017 - 05:28 नवीन
असं कसं , मग " सबका साथ, सबका विकास" कसा होणार? गोबर नको , गोबर गॅस चालेल..
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 11/06/2017 - 06:16 नवीन
अमेरिकेत टेक्सस राज्यात सॅन अ‍ॅन्टोनियोपासून जवळ असलेल्या सदरलंड स्प्रिंग्ज्स या ठिकाणी एका चर्चमध्ये एका माथेफिरूने गोळीबार केला आणि त्यात २५ पेक्षा जास्त लोकांचा बळी पडला आहे. सी.एन.एन वर बघितले त्यावरून वाटत आहे की तो टेक्ससचा अगदी ग्रामीण भाग आहे. अशा ठिकाणीसुध्दा अशी भयंकर घटना होणे खरोखरच धक्कादायक आहे. पूर्वी अमेरिका हा खूप सुरक्षित वगैरे देश वाटायचा. पण गेल्या काही वर्षात बेछूट गोळीबाराच्या झालेल्या कित्येक घटना लक्षात घेता प्रत्यक्षात परिस्थिती तशी नक्कीच नाही असे दिसते.
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Mon, 11/06/2017 - 06:38 नवीन
पॅराडाईज पेपर्स : जगभरातील अनेक बड्या नावांचा समावेश - राणी एलिझाबेथ, डोनाल्ड ट्रम्प, जस्टिन ट्रुडो अडचणीत http://www.loksatta.com/desh-videsh-news/paradise-papers-biggest-data-leak-us-president-donald-trump-wilbur-ross-queen-elizabeth-justin-trudeau-1581229/ http://www.loksatta.com/desh-videsh-news/paradise-papers-biggest-data-leak-reveals-trails-of-714-indian-corporates-secret-tax-havens-bermuda-law-firm-appleby-1581184/ http://indianexpress.com/article/india/paradise-papers-indian-corporates-black-money-4923999/
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 11/06/2017 - 06:46 नवीन
भारतातील लोकाम्मध्ये केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा, सचीन पायलट, चिदंबरम लिंक्ड कंपन्या, अमिताभ बच्चन आदी लोकांची नावे आहेत. एक गंमतः जयंत सिन्हा ओमिद्यार नामक संस्थेत कामाला होते त्या कंपनीचं पण नाव आहे. स्क्रोल.इन ही (भारतीय लिब्रलांची आवडती साईट )साईट ओम्दियारने फंड केलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९
व
विशुमित Mon, 11/06/2017 - 07:37 नवीन
काहीजण गमतीने काही पण बडबडत सुटतात. या बातमीची तुलना धरणातील मुताशी होणार ही भविष्यवाणी सत्य ठरते की नाय बघा..!! पण म्हणार नाहीत हे चुकीचे बोलले गेले आहे. http://www.lokmat.com/maharashtra/advice-give-names-women-alcohol-mahajans-remarks-protest-across-state/
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 11/06/2017 - 08:34 नवीन
असं विधान विनापुरावा केलं होतं तुम्ही. त्याचं काय? शिवाय "XX मध्ये दगड" वगैरे भाषा तुम्ही वापरली होती, त्याचं काय? आणि ते नवीन इतिहास संशोध चालू आहे म्हणालेलात, ते कुठवर आलंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ग
गॅरी ट्रुमन Mon, 11/06/2017 - 08:46 नवीन
"समर्थ रामदास आदिलशाहाचे हेर होते"
आदिलशहाचे की औरंगजेबाचे? मला वाटते की रामदास स्वामी औरंगजेबाचे हेर होते. पण ते हेरगिरीच्या कामात इतकी कमालीची गुप्तता पाळायचे की आपल्यासाठी रामदास स्वामी हेर म्हणून काम करतात हे खुद्द औरंगजेबालाही माहित नव्हते. हेच बघा ना--- Image removed. (आंतरजालावरून साभार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
व
विशुमित Mon, 11/06/2017 - 10:02 नवीन
चला बाबा उपरती आली म्हणायची लगेच.. http://www.loksatta.com/maharashtra-news/water-resources-minister-girish-mahajan-apologise-over-liquor-remark-says-dont-want-to-insult-women-1581320/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
प्रसाद_१९८२ Mon, 11/06/2017 - 10:32 नवीन
लोकसभेच्या ५४५ पैकी फक्त ६ जागा निवडुन येणार्‍या पक्षाचा अध्यक्ष, २०१९ मध्ये पंतप्रधान व्हायची स्वप्न पाहतोय ?
शरद पवार २०१९ मध्ये पंतप्रधान होऊ शकतात- प्रफुल्ल पटेल
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 11/06/2017 - 10:36 नवीन
देशाच्या राजकारणात शरद पवार यांच्या शब्दाला वजन असल्यामुळे सर्वत्र त्यांचा दबदबा आहे. ळोळ . . . . हहपुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
प
पुंबा Mon, 11/06/2017 - 10:58 नवीन
politics is the game of possible
शप पंप्र व्हावेत असे वाटत नसले तरी शक्यता शून्य आहे असे म्हणवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
प
प्रसाद_१९८२ Mon, 11/06/2017 - 11:06 नवीन
लालू, मुलायम, ममता वगैरे लोकांनी २०१९ पुर्वी एकादी महाआघाडी बनवून, शरद पवारांच्या नेतृत्वात निवडणुक लढवायची ठरवली तर एकादवेळी शरद पवारांचे पंतप्रधान बनणे शक्य आहे. मात्र लालू, मुलायम, ममता सारखे नेते, शरद पवारांसारख्या राजकारणातील शुल्लक नेत्याला नेतेपद देतील हे अश्विसनीय वाटतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ग
गोंधळी Mon, 11/06/2017 - 17:53 नवीन
खिचडिच काय ़झाल National Food घोशना होनार होति ना?
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Tue, 11/07/2017 - 12:10 नवीन
साहेबान्चे अद्रुष्य हात भा.ज.पा ला आहेत का शिवसेनेला .. सत्तेतून बाहेर पडायला साहेबान्ना का विचारायला लागत आहे .. का नेहमी प्रमाणे गूगली .. :) http://abpmajha.abplive.in/mumbai/uddhav-thackerays-meeting-with-sharad-pawar-latest-update-476711 http://abpmajha.abplive.in/mumbai/sharad-pawar-statement-on-with-uddhav-thackeray-meeting-476729
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 11/07/2017 - 12:17 नवीन
चला म्हणजे खिशात ठेवलेले राजीनामे बाहेर काढायची वेळ आली तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९
म
मोदक Tue, 11/07/2017 - 12:44 नवीन
सब मिले हुएं है जी.. ये मोदीजीकी चाल है...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
त
तर्राट जोकर Tue, 11/07/2017 - 12:49 नवीन
विरोधात असतांना एक, सत्तेत असतांना दुसरंच. वाह रे भाजप. शेतकर्‍यांच्या भावनांना हात घालून स्वतःची पोळी भाजून घेतली, आणि ह्या मागण्यांना दिले वार्‍यावर सोडून. Image removed.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 11/07/2017 - 13:05 नवीन
चित्र दिसत नाही. का ते पण पारदर्शक आहे? कुठे नेऊन ठेवलाय लाभार्थी??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा