ताज्या घडामोडी - भाग १५
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा.
तृणमूल काँग्रेसचे संस्थापक मुकूल रॉय यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच असंतुष्ट होते अशा बातम्या होत्या.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने उत्तर भारत अगदी पूर्ण स्वीप केला होता. अनेक राज्यांपैकी सगळ्या जागा पक्षाने जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये त्यात वाढ होणे नाही आणि होईल ते नुकसानच होईल. त्यामुळे पूर्वापार कधीच शिरकाव करता न आलेल्या राज्यांमध्ये (बंगाल, ओरिसा, तामिळनाडू इत्यादी) बर्यापैकी जागा जिंकून इतरत्र पडझड झाल्यास ती भरून काढण्याकडे भाजपचा कल असेलच. त्या दृष्टीने मुकूल रॉय यांचा भाजप प्रवेश ही पक्षासाठी उत्साहवर्धक घडामोड आहे.
💬 प्रतिसाद
(212)
M
mayu4u
Tue, 11/07/2017 - 14:04
नवीन
हेर वगैरे?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 11/07/2017 - 14:08
नवीन
Morphed picture
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Tue, 11/07/2017 - 13:02
नवीन
तजो, अंधभक्तांना अशी भीतीदायक चित्रे दाखवू नका हो.बिचारे फिट येवून पडतील.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 11/07/2017 - 13:38
नवीन
आता फक्त डांगे अण्णा यायचे राहिले आहेत.
उद्या निश्चलनीकरणाला एक वर्ष पूर्ण होत आहे त्या पार्श्वभूमीवर तेच यशस्वी कलाकार.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 11/07/2017 - 18:13
नवीन
ते आले की चार खांदेकरी पूर्ण होतील. नंतर खांदेपालट करण्याची वेळ आली तर अजून काही मिपाकर आहेतच.
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Tue, 11/07/2017 - 18:29
नवीन
ते आले की चार खांदेकरी पूर्ण होतील. नंतर खांदेपालट करण्याची वेळ आली तर अजून काही मिपाकर आहेतच.
तुमच्यापैकी कोण 'शहीद' होऊन बोहनी करणार ते ठरवा. धंद्याच्या टायमाला खोट नको.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 11/07/2017 - 18:42
नवीन
आमच्याकडे काळेधन नाही, त्यामुळे आम्ही शहीद होऊच शकत नाही.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 11/08/2017 - 05:55
नवीन
दहाव्याला कावळा शिवणार होता. आता वर्षश्राद्ध आले तरी काही शोकाकुल मिपाकर लोक, कावळा येईल आणि काळ्या पैशाच्या पिंडाला शिवेल म्हणून वाट बघत बसलेत. पण कावळा काही केल्या शिवेना.
त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत...!!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 11/08/2017 - 06:45
नवीन
कोणाच्या दहाव्याला?
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 11/08/2017 - 06:51
नवीन
प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा उत्तर मिळेल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 11/08/2017 - 08:25
नवीन
नाही मिळालं उत्तर.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 11/08/2017 - 06:51
नवीन
प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा उत्तर मिळेल.
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Tue, 11/07/2017 - 13:49
नवीन
वर्षश्राध्द की वर्धापन दिन ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 11/07/2017 - 18:10
नवीन
काळेधनधारकांसाठी वर्षश्राद्ध, इतरांसाठी वर्धापन दिन!
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Tue, 11/07/2017 - 18:38
नवीन
काळेधनधारकांसाठी वर्षश्राद्ध, इतरांसाठी वर्धापन दिन!
नोटाबंदीमुळे काहींना खरोखर वर्षश्राद्ध घालावे लागणार आहे, ते सगळे काळे धनधारकच समजायचे का?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 11/07/2017 - 18:43
नवीन
तुम्ही काहीही समजा.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 11/07/2017 - 13:50
नवीन
जो तुम कहो
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Tue, 11/07/2017 - 14:01
नवीन
त्यातही गुप्तता?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 11/07/2017 - 14:04
नवीन
आता यात काय गुप्तता आली?
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Tue, 11/07/2017 - 14:12
नवीन
नक्की कसला कार्यक्रम आहे ते सांगत नाही म्हणून म्हटले.
'जो तुम कहो' आमच्या म्हणण्याला इतकी किंमत कधीपासून?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 11/07/2017 - 14:42
नवीन
बड्या बड्या नोटा रद्द झाल्यावर छोट्या छोट्या मतांना किंमत येणारंच ना?
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Tue, 11/07/2017 - 14:56
नवीन
बड्या बड्या घोडचूका केल्यावर थोडी थोडी अक्कल आली हे ही नसे थोडके.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 11/07/2017 - 15:02
नवीन
कुणाला?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 11/07/2017 - 18:57
नवीन
(अर्थातंच) पप्पूला. ;-)
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 11/08/2017 - 06:01
नवीन
गोडसे अण्णा
थोडी थोडी अक्कल आली
कुणाला याचं उत्तर दिलं नाही तुम्ही
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 11/07/2017 - 14:34
नवीन
तुम्हाला वर्धापन दिन साजरा करायचा आहे कि वर्षश्राद्ध हा तुमचा प्रश्न आहे.
म्हणून "जो तुम कहो"
आम्हाला काय घेणं देणं आहे?
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
Tue, 11/07/2017 - 19:09
नवीन
मला वाटतं पुढचे २ एक दिवस या धाग्याला धुळवड किंवा लठमार होली नाव द्यायला हरकत नाही. ;)
ह. घ्या.
- Log in or register to post comments
ज
जेसीना
Wed, 11/08/2017 - 04:31
नवीन
काळ तिघांत एक खंबा घेतला
तीन तीन पॅक येणार होते वाट्याला
पण एक जण दोन पॅक मधेच आउट झाला
आणि मग तो पॅक मला मिळाला
होय मी लाभार्थी
हे माझं सरकार हाय
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 11/08/2017 - 05:03
नवीन
वर्षपूर्तीनिमित एक चांगला लेख
http://indianexpress.com/article/opinion/columns/demonetisation-anniversary-narendra-modi-note-ban-arun-jaitley-indian-economy-cashless-economy-manmohan-singh-4927164/

- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 11/08/2017 - 06:10
नवीन
DM च्या खर्च लाभ विश्लेषण (cost benefit analaysis ) बाबत अजून कोणीच लेख पाडले मला दिसले नाहीत.
माझा DM बद्दलचा पहिल्यापासून एकच सवाल आहे ज्याचे समाधानकारक उत्तर कोणताच लेख अद्याप तरी देऊ शकला नाही. DM चा "फायनल औटकॉम" काय असणार हे निर्णायकर्त्याने रोड मॅप बनवला होता का? त्यानुसार त्याचा फरक विश्लेषण (Variance Analysis) कोणी देऊ शकले तर योग्य ठरेल.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 11/08/2017 - 07:24
नवीन
http://www.livemint.com/Opinion/wxDyTt00PCTYcn5AQSzsEK/Demo-one-year-later-Success-or-failure.html
एक संतुलित लेख आहे.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 11/08/2017 - 10:51
नवीन
सुरजित भल्ला हे आता मोदींच्या इकॉनॉमिक अॅदव्हायझरी कौन्सिलचे सदस्य आहेत. त्यांनी नोटबदल कार्यक्रमाची स्तुती न करणे अपेक्षित नाही.
- Log in or register to post comments
र
रामदास२९
Wed, 11/08/2017 - 11:00
नवीन
हो ते तर आहेच .. मला वाटतय .. तटस्थ पणे पाहिला तर काही चान्ग्ल्या आणि वाईट गोष्टी आहेत ..
http://indianexpress.com/article/opinion/columns/demonetisation-anniversary-narendra-modi-black-money-income-tax-money-laundering-arun-jaitley-4927165/
- Log in or register to post comments
म
मोदक
Wed, 11/08/2017 - 11:59
नवीन
पूर्वग्रहदुषीतपणाचा चष्मा घातला आहे हे लपून नसलेले गुपीत असले तरी असे उघड उघड अमान्य न करणेही अपेक्षित नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 11/08/2017 - 15:20
नवीन
हे "आता" सदस्य असतील, पण एक वर्षापूर्वी ते सदस्य होते का?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 11/08/2017 - 07:27
नवीन
http://www.livemint.com/Money/WTRdjKNoA2OCsI0cWquYxN/We-did-say-we-wanted-less-corruption.html
हा एक वर्षांपूर्वीचा लेख आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 11/08/2017 - 07:59
नवीन
दिल्लीमध्ये प्रचंड बहुमत असल्यामुळे दिल्लीतील तीनही राज्यसभेच्या जागांवर आम आदमी पक्षाला आपले उमेदवार निवडून आणता येतील. राज्यसभेवर अराजकिय व्यक्तींना पाठवावे असे पक्षाचे मत आहे असे https://www.ndtv.com/india-news/raghuram-rajan-offered-rajya-sabha-seat-by-aap-sources-1772618 वर लिहिले आहे. आणि त्यात रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव आघाडीवर आहे असेही लिहिले आहे.
राज्यसभेवर अराजकीय व्यक्तींना पाठवायची कल्पना चांगलीच आहे. ज्यांना निवडणुकांचे राजकारण झेपणार नाही पण तरीही आपले योगदान देऊ शकतील अशा व्यक्तींना संसदेत जायला मिळावे यासाठी राज्यसभा या सभागृहाचे अस्तित्व ठेवावे यामागच्या कारणांपैकी एक कारण होते. पण गेल्या ६७ वर्षात नेहमीप्रमाणे आपल्या लोकांनी त्या चांगल्या कल्पनेचेच वाटोळे केले. जर कोणीही रघुराम राजन सारख्यांना राज्यसभेवर पाठविण्यात येत असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे. फक्त अपेक्षा ही की एकदा आआपचे उमेदवार म्हणून तिथे निवडून गेल्यावर स्वतःचा स्वतंत्र बाणा विसरून परत त्याच पक्षाची री ओढण्यात आली तर मात्र मुळातल्या कल्पनेलाच धक्का पोहोचेल. आणि मला स्वतःला आआपचा कमालीचा तिटकारा असल्यामुळे राजनसाहेबांनी परत आआपच्या माकडचाळ्यांचीच री ओढली तर मात्र त्यांच्याविषयीचा जो काही आदर आहे तो पूर्ण लयाला जाईल.
- Log in or register to post comments
र
रामदास२९
Wed, 11/08/2017 - 08:09
नवीन
रघुराम राजन भारताचे नागरिक आहेत.. का अनिवासी नागरिक आहेत .. मला वाटतय कुमार विश्वास सारख्या पक्षान्तर्गत प्रतिस्पर्ध्यान्ना सम्पविण्याची केजरीवाल खेळी आहे ..
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 11/08/2017 - 09:17
नवीन
हो तसेच वाटते आहे. राज्यसभेच्या तीन जागांवर आशुतोष, आशिष खैतान आणि कुमार विश्वास यांचा डोळा आहे हे उघड आहे. कविराजांशी केजरीवालांचे जमत नाही. तेव्हा त्यांचा पत्ता कापायचा इरादा केजरीवालांनी केलाच असेल. पण त्याबरोबरच आशिष खैतान आणि आशुतोषही दुखावले जातील ही शक्यता आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीमधून पक्षाने उमेदवारी दिलेल्या ७ नेत्यांपैकी राजमोहन गांधी वृध्द झाले आहेत आणि जरनेल सिंग स्वतःच्या कर्माने पंजाबमध्ये निवडणुक लढवायला जाऊन राजौरी गार्डनमधील विधानसभेची जागा गमावून बसले. आनंद कुमार या तिसर्या नेत्याचे नक्की काय झाले हे माहित नाही. पण राखी बिर्ला आणि देविंदर सेहरावत यांना २०१५ मध्ये दिल्ली विधानसभेत प्रवेश मिळाला (आणि सेहरावत यांचे केजरीवालांशी बिनसले सुध्दा). उरलेल्या उमेदवारांपैकी आशुतोष आणि आशिष खैतान या दोन मिडिया सॅव्ही उमेदवारांना मात्र त्यानंतर आमदार/खासदार पदे मिळालेली नाहीत. त्यातल्या त्यात आशिष खैतानना दिल्ली डायलॉग कमिशनचे अध्यक्षपद (आणि मंत्र्याचा दर्जा) मिळाला पण त्या माणसाची महत्वाकांक्षा जास्त असावी असे वरकरणी वाटते.
तेव्हा कुमार विश्वासचा पत्ता कापायच्या या भानगडीत इतरही नेते दुखावले जायची शक्यता आहे.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Wed, 11/08/2017 - 09:37
नवीन
खैतान, आशुतोष आणि तो कवडा कुमार विश्वास तिघेही डोक्यात जातात, ह्यांच्यापेक्षा कुणीही परवडेल.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 11/08/2017 - 09:42
नवीन
मला पंजाबमधील फुलका, कमांडो सुरिंदरसिंग इत्यादी सोडून आआपशी संबंधित असलेला प्रत्येक माणूस डोक्यात जातो. अजून एक चांगला माणूस डॉ. धरमवीर गांधी यांना केजरीवालांनी पक्षातून काढले. त्यामुळे आआपशी संबधित असूनही डोक्यात न जाणार्या लोकांच्या यादीत फार लोक राहिलेले नाहीत :)
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 11/08/2017 - 08:29
नवीन
त्यातही एक अडचण येऊ शकेल असे वाटते . एखाद्या राज्यातून राज्यसभेवर निवडून पाठवायचे असेल तर तो मनुष्य त्या राज्यात १५ वर्षांपासूनचा रहिवासी आहे हे सिध्द करावे लागते. अनेक नेते (उदाहरणार्थ मनमोहनसिंग आसाममधून, पर्रीकर उत्तर प्रदेशातून, चिदंबरम महाराष्ट्रातून इत्यादी) ते रहिवासी नसलेल्या राज्यातून राज्यसभेवर वेळोवेळी निवडून गेले आहेत. पण हे सगळे नेते १५ वर्षांपासून भारतातच वास्तव्य करत होते. तेव्हा ही १५ वर्षांसाठीची अट पूर्ण करायला खोट्या भाड्याच्या पावत्या वगैरे बनविल्या जातात हे जगजाहिर असले तरी या पावत्या खोट्या आहेत हे सिध्द करता येणे सोपे नसल्यामुळे अशा नेत्यांची निवड न्यायालयाकडून अवैध सिध्द करता येणे कठिण होते. पण रघुराम राजन यांची गोष्ट तशी नाही. ते गेल्या १५ वर्षांपासून (खरं तर जास्तच) भारताबाहेर राहात आहेत हे त्यांच्या पासपोर्टवरील नोंदींवरून सिध्द करता येईलच. तेव्हा राजन १५ वर्षांपासून दिल्लीमध्ये वास्तव्य करून आहेत हे सिध्द कसे करणार? कारण भाड्याच्या पावत्या खोट्या दिल्या तरी राजन तिथे राहात नव्हते हे अगदीच उघड होईल. राजन यांच्याऐवजी कोणी लो प्रोफाईल अगदी ग्रीन कार्ड असलेला मनुष्य राज्यसभेवर पाठवायचा असेल तर त्यात फार अडचण येणार नाही. पण राजन यांची गोष्ट वेगळीच असेल.
- Log in or register to post comments
र
रामदास२९
Wed, 11/08/2017 - 11:17
नवीन
मला वाटतय राज्यसभेतून निवडून जाण्यासाठी
तसा झाला तर इतर पक्ष कोर्टात जातील आणि मग उपराष्ट्रपती (राज्यसभा अध्यक्ष) वेन्कय्या नायडू त्यावर निर्णय घेतील. सुप्रीम कोर्ट पण राज्यसभा अध्यक्ष्यान्च्या अधिकारात हस्तक्षेप नाही करणार
मला तरी वाटतय केजरीवालान्ना काही जरी वाटला तरी राजन राज्यसभेवर जायला तयार पाहिजेत कारण सदस्य बनायचा असेल तर सम्पत्ती जाहिर करण आला आणि मग त्याचे स्त्रोत जगजाहिर होणार .. त्यापेक्षा ते नोबेल साठीच्या रान्गेत उभा राहण पसन्त करतील. पुन्हा मधून मधून मीडीया, कोन्ग्रेस, आआप त्यान्चा सरकार विरुध्द वापर करून घेईल , जे पक्षाचा शिक्का लागल्याने राज्यसभा सदस्य म्हणून त्यान्ना करणे अवघड जाईल ..
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 11/08/2017 - 12:17
नवीन
हो बरोबर. कुणाही एन.आर.आय ला राज्यसभेवर पाठवायचे असेल तर ही अडचण येईलच. त्यातल्या त्यात फारसा परिचित नसलेला चेहरा असेल तर कदाचित तितक्या प्रमाणात बारकाईने छाननी होणार नाही. पण राजनसाहेबांच्या बाबतीत त्यांनी कधी काय केले आणि ते कधी कुठे होते ही 'खुली किताब' असल्यामुळे नक्कीच छाननी होईल.
हो राजन केजरीवाल आणि आम आदमी पक्ष या सर्कशीत कुठल्याही अॅन्गलने फिट बसणारे नाहीत. तसेच आआपचे अमुक फुकट देऊ, तमुक अर्ध्या किंमतीत देऊ हे प्रकार राजन सारख्यांना मान्य असतील असे वाटत नाही. पण मनमोहनसिंगांनी विद्वत्ता असूनही राजकारणासाठी स्वतःचा वापर करून दिला त्याप्रमाणे राजन यांना वाटत असले तर गोष्ट वेगळी.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
गुरुवार, 11/09/2017 - 06:10
नवीन
हे म्हणजे असं होईल, प्रसिद्ध तलवारबाजाला युद्धासाठी न वापरता स्वयंपाकघरात तलवारीने भाजी चिरायला ठेवण्यासारखे आहे.
- Log in or register to post comments
र
रामदास२९
गुरुवार, 11/09/2017 - 06:16
नवीन
आपण चर्चा केल्याप्रमाणे. .
http://lokmat.news18.com/national/raghu-ram-rajan-denies-rajyasabha-offer-273892.html
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 11/09/2017 - 06:34
नवीन
हे इथे पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद.
राजन यांच्या उंचीच्या प्राध्यापकाला युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोसारखे त्यांच्या कामाला पोषक वातावरण सोडून राज्यसभेत यावेसे वाटले नाही तर ते अगदी समजण्यासारखे आहे. तरीही मनमोहन सिंग यांचे उदाहरण बघून अशी विद्वान मंडळी कसा विचार करत असतील असे आपल्याला वाटते त्याप्रमाणेच प्रत्यक्षात ते तसाच विचार करत असतील याची खात्री वाटत नाही. तसेच मणीशंकर अय्यर, कपिल सिब्बल, पी.चिदंबरम अशी हुषार मंडळीही आपल्या बुध्दीचा वापर एकाच कुटुंबाची री ओढायला (किंवा बहुदा काही गैरकारभार करायलाही) करत असतील तर अशी खात्री अजूनच कमी होते.
विद्वान मंडळी केवळ आपल्याच प्राध्यापकी पेशाशी आणि आपल्या कामाशीच इमान राखून असतात आणि ते सोडून त्यांना इतर कोणत्याही प्रकारच्या स्वार्थी महत्वाकांक्षा नसतात हे नेहमीच खरे नसते. याविषयी कधीतरी लिहायचे आहे.
- Log in or register to post comments
र
रामदास२९
गुरुवार, 11/09/2017 - 07:37
नवीन
सत्तेपुढे विद्वत्ता गहाण टाकली कि वरील मन्डलीन्प्रमाणे होता ..
तत्कालीन नेर्तुत्वामुळेच ह्या लोकान्ना किम्मत होती.
- Log in or register to post comments
र
रामदास२९
Wed, 11/08/2017 - 13:15
नवीन
मनमोहन हे अत्यन्त हुशार माणूस जर धोरणी माणसाच्या ( नरसिन्ह राव) सम्पर्कात आला तर काय चमत्कार करू शकतो (१९९१ आठवा) आणि जर मुर्खान्ना शरण गेल तर कसा हतबलतेने पगारी नोकरासारखा घोटाळ्यान्ना सामोरे जातो त्याचे उत्तम उदाहरण आहे. असो भारतातले मुरब्बी राजकारणी आणि मुजोर नोकरशाही हुशार लोकान्ची पण वासलात लावतात .. उ.दा. राजा रामण्णा, श्रीकान्त जिचकार, शशी थरूर , अशी बरीच ..
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 11/08/2017 - 13:38
नवीन
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »