ताज्या घडामोडी - भाग १५
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा.
तृणमूल काँग्रेसचे संस्थापक मुकूल रॉय यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच असंतुष्ट होते अशा बातम्या होत्या.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने उत्तर भारत अगदी पूर्ण स्वीप केला होता. अनेक राज्यांपैकी सगळ्या जागा पक्षाने जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये त्यात वाढ होणे नाही आणि होईल ते नुकसानच होईल. त्यामुळे पूर्वापार कधीच शिरकाव करता न आलेल्या राज्यांमध्ये (बंगाल, ओरिसा, तामिळनाडू इत्यादी) बर्यापैकी जागा जिंकून इतरत्र पडझड झाल्यास ती भरून काढण्याकडे भाजपचा कल असेलच. त्या दृष्टीने मुकूल रॉय यांचा भाजप प्रवेश ही पक्षासाठी उत्साहवर्धक घडामोड आहे.
विरोधकांच्या ओरडण्याला केव्हापासून महत्त्व द्यायला लागली आहे जुमला पार्टी?विरोधकांच्या ओरडण्याला भाजप कधीच महत्त्व देत नाही. महत्त्व देत असले तर राहुल डिसेंबर २०१६ मध्ये भूकंप करणार म्हणाला होता तो भूकंप झाला असता किंवा सुषमा स्वराज राजीनामा देईपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असे काँग्रेसवाले २०१५ मध्ये म्हणत होते ते खरे झाले असते.जनक्षोभाला घाबरुन रेट्स कमी केले आहेत असे सांगायची हिंमत नाही ५६ इंची छातीत.जनक्षोभाला घाबरून दर कमी केलेत हा जावईशोध कसा काय लावला?म्हणून गुजरात मध्ये जाऊन मोदी म्हणतात की जीएसटीच्या पापात काँग्रेसपण भागीदार आहे... मलाच एकट्याला दोष देऊ नका.बरोबर आहे ना. खांग्रेस आता वसेक पासून नामानिराळा रहायचा प्रयत्न करीत आहे. वसेक विधेयक लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही मंजूर झाले. राज्यसभेत तर रालोआला साधे बहुमत सुद्धा नव्हते. तिथे खांग्रेसने विधेयकाच्या बाजूने मतदान केले. नंतर खांग्रेसशासित राज्यातही खांग्रेसने विधेयकाला पाठिंबा दिला. आता मात्र स्वतः नामानिराळा रहायचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे खांग्रेसचा हा खोटारडेपणा जनतेला सांगणे आवश्यक होते.म्हणजे वाईट झालं की काँग्रेसमुळे , चांगलं झालं की माझ्याचमुळेत्यात काय चूक आहे?अनुभवी लोकांचे ऐकलं असतं तर ही वेळ कशाला आली असती?२-३ अनुभवी लोकांची नावे सांगता का? आणि हो, आधी त्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि नंतर सांगा.