Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग १५

ग
गॅरी ट्रुमन
Fri, 11/03/2017 - 16:34
🗣 212 प्रतिसाद
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा. तृणमूल काँग्रेसचे संस्थापक मुकूल रॉय यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच असंतुष्ट होते अशा बातम्या होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने उत्तर भारत अगदी पूर्ण स्वीप केला होता. अनेक राज्यांपैकी सगळ्या जागा पक्षाने जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये त्यात वाढ होणे नाही आणि होईल ते नुकसानच होईल. त्यामुळे पूर्वापार कधीच शिरकाव करता न आलेल्या राज्यांमध्ये (बंगाल, ओरिसा, तामिळनाडू इत्यादी) बर्‍यापैकी जागा जिंकून इतरत्र पडझड झाल्यास ती भरून काढण्याकडे भाजपचा कल असेलच. त्या दृष्टीने मुकूल रॉय यांचा भाजप प्रवेश ही पक्षासाठी उत्साहवर्धक घडामोड आहे.
वर्गीकरण
ताज्या घडामोडी

प्रतिक्रिया द्या
44836 वाचन

💬 प्रतिसाद (212)
म
मराठी_माणूस Sat, 11/11/2017 - 07:46 नवीन
बातमीत तर मुलाखतीचा उल्लेख दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
भ
भाते Sat, 11/11/2017 - 11:46 नवीन
बरोबर दुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
म
महाठक Sat, 11/11/2017 - 13:46 नवीन
टेकाडी - तालुक्‍यातील ग्रामपंचायत जुनी कामठी-गाडेघाट येथे ९ सदस्य व सरपंच अशा १० सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात भाजपच्या सरपंचासह ६ सदस्य भाजपने जिंकून आणून कमळ फुलविले. परंतु काँग्रेस पक्षाने आपल्या तीन जागा राखत एका जागेसाठी कोर्टाच्या पायरीवर पाय ठेवला आहे. जुनी कामठी येथील काँग्रेस पक्षाच्या समर्थित पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार प्रफुल्ल कावळे व त्यांच्या समर्थकांनी ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप केला आहे. त्यांना स्वतःचेही मत मिळाले नसल्याची त्यांची तक्रार आहे. प्रभाग ३ मधील अनुसूचित जाती सदस्यपदाचे उमेदवार दीपक महादेव कोथरे यांना चक्क शून्य मते मिळालीत. आश्‍चर्याची बाब म्हणजे कोथरे यांनी स्वत:ला मतदान केले, त्यांच्या कुटुंबीयांनी व समर्थकांनीही कोथरे यांना मत दिले. तरी मतदान शून्य आल्याने एव्हीएमबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याप्रकरणी प्रभागातील सरपंचपदाचे उमेदवार प्रफुल्ल कावळे, दीपक कोथरे, सुनीता खंते व ज्योती मेंढे यांनी ईव्हीएम मशीनच्या घोळाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ईव्हीएम मशीनचा घोळ उघड करण्याचे ठरविले आहे. कोथरे हे ग्रामपंचायत जुनी कामठी-गाडेघाट येथून प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणूक लढत होते. याच प्रभागातील त्यांचे प्रतिद्वंद्वी राहुल गोपीचंद ढोके यांना ३०३ मतांपैकी १३१ मते मिळाल्याने ते विजयी झाले. एकूण ३०३ मते असलेल्या प्रभागात १७२ मते ही नोटावर गेलीत. ज्यात कोथरे यांच्या पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार कावळे यांना १६२ मते मिळाली. तेव्हा कोथरे यांचे स्वतःचे, ज्या पॅनेलसोबत ते निवडणुकीत उभे होते त्यांचे व कुटुंबीयांचे मत नेमके गेले कुठे, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. ईव्हीएम घोळामुळे कोथरेंच्या चिन्हाची बटण दाबले तर मते मात्र नोटाला गेली असल्याचे तर्कदेखील लावण्यात येत आहेत. दरम्यान, निवडणुकांमध्ये झालेल्या ईव्हीएम मशीनच्या घोळामुळे लागलेला एकतर्फी निकाल हा सध्या चर्चेचा विषय झालेला आहे. निवडणूक आयोगाला प्रभाग ३ मध्ये सरपंचासह ३ सदस्य अशा ४ जागांसाठी फेरमतदान घेण्याची मागणी काँग्रेस पक्ष जुनी कामठीतर्फे करण्यात आला आहे.
  • Log in or register to post comments
र
रविकिरण फडके Sat, 11/11/2017 - 15:08 नवीन
मतदान यंत्रात (EVM) जर खरोखरच असा (टेकाडी - तालुक्‍यातील ग्रामपंचायत जुनी कामठी-गाडेघाट: कोथरे यांनी स्वत:ला मतदान केले, त्यांच्या कुटुंबीयांनी व समर्थकांनीही कोथरे यांना मत दिले. तरी मतदान शून्य आल्याने...) झोल करता येत असेल तर परिस्थिती चिंताजनक आहे. EVM manipulation चे अनेक आरोप विशेषतः उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीनंतर केले गेले आणि त्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. म्हणूनच, उपरोक्त घटना गांभीर्याने घ्यायला हवी. मतदान प्रक्रियेवरील लोकांचा विश्वासच जर उडाला तर संपलंच सगळं. श्रीयुत महाठक त्यांना ह्याबद्दल मिळेल ती माहिती ते येथे देत राहतील अशी आशा करूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महाठक
क
कपिलमुनी Mon, 11/13/2017 - 13:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
B
babu b Tue, 11/28/2017 - 10:50 नवीन
गुपचुप तमाशा देखे , वाह रे तेरी खुदाई !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मोदक Tue, 11/28/2017 - 11:09 नवीन
फोटो व्हायरल करायची आज्ञा केजरीवालने दिली का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
B
babu b Mon, 11/13/2017 - 15:04 नवीन
नोटाबंदीबाबत ३ मुद्द्यांवर लोक गप्प आहेत. १ . काळे धन मिळाले तर पकडून शिक्षा देणार होते, तर अचानक मग वॉलंटरी डिस्क्लोजरची सोय का ठेवली ? २. नोटाबंदी ही काळे धन बाहेर काढायला होती म्हणे. या वॉलंटरी डिस्लोजरचा वापर करुन अचानक जास्तीत जास्त पैसे अकाउंटला भरणारा माणूस गुजरातचाच कसा निघाला? ३. अमित शहाच्या मुलाची नेमकी कसली कंपनी आहे? एकाच वर्षात इतका नफा कसा झाला?
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 11/13/2017 - 15:28 नवीन
एकाच वर्षात इतका नफा कसा झाला?
कंपनी तोट्यात बंद झाली. जो आकडा फिरतो आहे तो टर्नोव्हरचा आहे. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b Mon, 11/13/2017 - 15:49 नवीन
https://thewire.in/185512/amit-shah-narendra-modi-jay-shah-bjp/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b Mon, 11/13/2017 - 15:39 नवीन
http://164.100.47.4/BillsTexts/LSBillTexts/Asintroduced/165_2017_LS_Eng.pdf 4जून, 2017ला केंद्रीय मंत्रिमंडळाने The Financial Resolution and Deposit Insurance (FRDI) Bill, 2017 ला मंजूर केलं आहे. संसदेच्या येत्या अधिवेशनात ते सादर होईल. या बिलाद्वारे एका “Resolution Corporation” ची निर्मिती केली जाणार आहे.
  • Log in or register to post comments
B
babu b Tue, 11/28/2017 - 09:41 नवीन
https://m.maharashtratimes.com/maharashtra/pune-news/chhagan-bhujbal-should-get-bail-says-mos-dilip-kamble/articleshow/61831251.cms भाजपाच्या नेत्यानीच भुजबळांची प्रकरणे ओपन केली. भाजपानेच त्याना आत टाकले. आता ह्यांचेच नेते बोलतात.. भुजबळ गरिबांचे तारणहार
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा