Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भिमा कोरेगाव- स्वतःकडे बघा

अ
अंतरा आनंद
Sat, 01/06/2018 - 06:53
🗣 327 प्रतिसाद
"या जय भीमवाल्यांचं काहितरी आहे", "उगाच दंगे करतात, काम करा म्हणावं त्यापेक्षा", " काहि नाही, फडणविसाची खुर्ची यांच्या डोळ्यात खुपतेय" अश्याच सुरातल्या पण संभावित प्रतिक्रिया इथे बघायला मिळत आहेत. आपल्याला कोणत्याही प्रश्नाचा विचार फक्त आपल्या जागेवरूनच करायचा आहे हे खास आहे. (१) भिमा कोरेगाव हा अभिमानाचा विषयच नाही. : मुळात चारपाच वर्षांपूर्वी हे स्मारक आणि त्याबद्द्ल कोणालाही जास्त महित नव्हते परंतू महार रेजिमेंट याला आपल्या अभिमानाचा विषय मानत होती. कोणत्याही समूहाला मग तो रेजिमेंट सारखा ऑफिशियल लढवय्या समूह असो वा जात, सार्वजनिक अभिमानाचा विषय शोधणं हे आपल्या सु-संस्कृतीचा भाग आहे, नाही का? तसंही भावनिक कढ काढण्याखेरीज काही करावं हे आपल्या सुसंस्कृत मनांना नको वाटतं. गेल्या काही वर्षात प्रत्येक समूहाने आपलं असं सार्वजनिक अभिमानस्थळ शोधून त्याचा उदो उदो करणं हे सुरू केलेलं आहे. आधुनिक विचारसरणीशी तुलना करायला गेल्यास प्रत्येक अभिमान स्थळावर प्रश्नचिन्ह उठवता येतील, पण तसं कोणी करत नाही कारण प्रत्येकामागे आंधळी झुंड असते. त्यामुळे प्रत्येक समूह, जातीगट आपल्या अभिमानस्थळाला जास्तीत जास्त ’टीआरपी" मिळ्वण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातूनच मग त्या त्या गटाचं नेतृत्व उदयाला येतं. आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो. (१ अ) मुळात भिमा कोरेगावचं युद्ध इंग्रजांनी जिंकलंच नव्हतं: नसेलही. पण महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? या संदर्भात तिथे जमलेल्या लोकांना विरोध म्हणून दुकानं बंद केली गेली, त्यांच्यावर दगडफेक झाली अश्या प्रकारच्या बातम्या आहेत, त्याचं काय? जमलेले लोकं काही आता जाऊन इंग्रजांना आवताण देणार नव्हते. मग अश्या प्रकारे त्यांच्या विरूद्ध जनमत तयार करणं कोणत्या संस्कृतीत बसतं? ब्राम्हण-मराठा सारख्या प्रस्थापित आणि गावपातळीवर मान असणार्‍या जातींना आपापली प्रतिकं लख्ख कराविशी वाटतात, तिथे झुंडीनं जावं वाटतं तर अजूनही मागास असलेल्या गावकुसाबाहेरच्या लोकांनी एवढा विचार करावा ही सक्ती का? (२) राजकिय अपरिहार्यता: प्रत्येक गोष्टीत राजकारण्यांना दोष देणं ही फॅशन बनली आहे. कारण ते सोप्पय. आपणही आपल्या व्यक्तीगत पातळीवर हे राजकारण पुरेपूर खेळत असतो. अश्या जाती विभागणीला, उतरंडीला समाजात मान्यता असते, प्रत्येक व्यक्तीच्या मनात ती उतरंड जागी असते म्हणूनच त्याचा फायदा राजकारणी उठवू शकतात. प्रत्येकाने व्यक्ती म्हणून आपण ही उतरंड पाळतो की नाही (मानतो की नाही असं मी म्हटलेलं नाही. कारण ’मी मानत नाही पण नाती तोडून चालत नाहीत, सवय ’, वैगेरे सुटकेचे मार्ग असतात ) हे मनाला विचारावं. खालच्याला वर येण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर आपण किती आधार दिलाय हे शोधून पहावं. तसं होत नाही. मागासांच्या वागण्यातल्या विसंगती शोधून, त्यांची आधुनिकता किती बेगडी आहे ह्याकडे बोट दाखवणारे आणि त्यांना वेगळे पाडणारेच मोठ्या संख्येने असतात. (इथे या विषयावर ज्या हिरीरीने लिहीलं गेलंय त्यावरून सिद्धच होत.) "जातीने महापुरुष वाटून घेतले आहेत", असं तोंडाने म्हणायचं आणि फक्त आपल्याच जातीतल्या महापुरुषाचा उदो उदो करायचा ही दांभिकता बहुसंख्यांमध्ये असते, म्हणून तर असे अभिमानी गट तयार होतात आणि राजकारण्यांना आयतं खाद्य मिळतं. जातींनी महापुरुष वाटून घेतलेत म्हणणार्‍यांपैकी किती जणं आंबेडकर जयंती साजरी करतात? नाहीपेक्षा ती आपल्या सोसायटीत साजरी व्हावी असं किती जणांना वाटतं? उलटपक्षी कोणी करत असेल तर "ते जय भीम वाले" म्हणत आपण त्यातले नाही हे प्रकर्षाने दाखवलं जातं. मग वरील तक्रार करताना आपण दांभिकपणे वागत नाही का? किती जणांनी मुलांना राम-कृष्णासोबत बुद्धाच्या गोष्टी सांगीतल्या? किमान स्वत:तरी जाणून घेतल्या? "ही कसली मिरवणूक आहे?" असं विचारणार्‍या पहिलीतल्या मुलाला आंबेडकर- जयंतीच्या मिरवणुकीबद्द्ल "ज्यांच्यामुळे मला प्रमोशन मिळत नाहीय ना त्यांची मिरवणूक आहे" असं उत्तर माझ्या एका कलीगनं दिलं होतं. अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते. (३) पेशवाईत महारांना कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं बांधून वावरावं लागत होतं हे खरं नाही तसा कागदोपत्री पुरावा नाही:- पलीकडल्या संस्थळावरच्या विद्वान (हे उपहासाने म्हटलेलं नाही, आदर खरा आहे) इतिहाससंशोधकांनी तिथे "याला कागदोपत्री पुरावा कुठेय?" असं विचारलं आणि अर्धवट शहाणे पैलवान इथेही ते विचारत सुटलेत. महार इतके महत्वाचे होते का की त्यासाठी एक कागदी फर्मान सुटेल? कोतवालाला तोंडी आदेश दिले असणं ही शक्य आहे ना? हे ही शक्य आहे की सैन्यात मानाच्या ठिकाणी असलेल्यांना यातून सूट असेल पण सर्वसामान्य महारांना हे लागू असेल. मग ते फक्त सामान्य महारांना लागू होतं म्हणत त्याचं समर्थन करता का? झाडू-गाडगं नसेलही पण "बाजू हो शिवशील, सावली पडली तर विटाळ होईल" हे उद्गार तरी महारांसाठी निघत होतेच ना? मग त्याचं समर्थन करताय का? किती वर्षं हे ऐकावं लागत होतं? अजूनही कुठेतरी लागत असेल. कोपर्‍यातल्या कपात वरून पडलेला चा पिणारी म्हारीण तर आता आतापर्यंत साहित्याचा भाग होतीच ना. ती काय सर्वस्वी काल्पनिक होती? बरं धरून चालू की हे झाडू-गाडगं प्रकरण खोटं होतं. पण महारांना किती गावात मानाचं स्थान होतं? इथे आपण किती गावच्या मातीतले आहोत हे दाखवण्याची होड लागलेली असते, त्यांना हे गावाचं वास्तव माहित नाही का? आताही त्यांना दिला जाणारा मान किती मनापासून येतो? वेळ येताच "गेले आपल्या जातीवर", "हे असंच अन्कल्चर्ड वागणार", "माजलेत" अशी मुक्ताफळं उधळली जात नाहीत का? आणि "माजलेत, पायरी सोडताय" म्हणत हत्याही घडवल्या जातातच ना? (४) आरक्षण म्हणजे फुकटचंबूपणा : आरक्षण लागू केल्यावर द्णादण सगळ्या महारांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा एवढं शिक्षण त्यांच्याकडे होतं का? आरक्षण घेतलेली पहिली पिढी आता कुठे रिटायर होतेय. पिढ्यापिढ्या शिक्षण, मानाचं जगणं नाकारलं गेलेली, स्वत:ची जमीन नसलेली अशी जमात आता कुठे प्रवाहात येऊ लागलीय तर फुकटचंबूपणा दिसतो. मग ब्राम्हणांनाही आरक्षण हवं म्हणत ब्राम्हण मेळावे का भरवता? आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात. (५) दलितांच्या आंदोलनात नासधूस जाळपोळ होतेच:- इतर आंदोलनात होत नाही का?. स्वघोषित सैनिक काय पुष्पवृष्टी करत आंदोलनं करतात का? जाळपोळीचं समर्थन नाही पण ठराविक समाजाला दोष का देता? रिकामटेकडे आणि समाजकंटक ही नासधूस करतात आणि प्रत्येक आंदोलनात थोडफार होतंच. ते होऊ नये तर ठाम कायद्याचं राज्य हवं (मग त्या राज्यात झुंडीने प्रार्थनास्थळ पाडता येईल का हो? ती सूट द्यायला हवी नाही का? किमान गोमाताचोरांना देहदंड देण्याची गोमातेच्या सुपुत्रांची गुंडगिरी क्षम्य मानायला हवी नाही का? ) (६) प्रकाश आंबेडकरांनी याचा राजकीय लाभ उठवला / त्यांनी चिघळवलं: इथे एवढ्या लिंका फेकल्या गेल्या आहेत. त्यात ही एक ही वाचून पहावी. प्रकाश आंबेडकरांचा ३१ डिसेंबरला प्रकाशित झालेला लेख आहे. त्यात त्यांनी ह्या विजयस्तंभाबद्द्लची मांडणी भावनिक आहे असं म्हटलय. त्यांची मांडणी पोलोटिकली करेक्ट असण्यापेक्शा लॉजिकली करेक्ट असते म्हणूनच निवडणुकीच्या राजकारणात त्यांना स्थान निर्माण करता येत नाही. प्रकाश आंबेडकरांची राजकीय ताकद ती काय आणि अशी आंदोलनं ते करतातच कशी काय? असा एक सुज्ञ प्रश्न आहे. म्हणजे? जे निवडून येऊ शकतात त्यांना अशी हिंसक आंदोलनं करण्याचा फुकट परवाना मिळतो? जे निवडून येत नाहीत त्यांची अशी काही बाजू नसतेच? आंबेडकरांनी हिंसक आंदोलन करा असं म्हटलं होतं का? कोणाला जमवलेल्या जमावावर नियंत्रण ठेवता येतं? (ठेवता आलं असतं तर बाबरी मशीद पाडली गेली नसती. का ती नियंत्रणाखाली जाणून बुजून घडवलेली घटना होती?) (७) दरवर्षी एवढे लोक येत नाहीत यावेळेला मुदाम जमवून दंगल माजवली : एवढी माणसं काय एकदम आकाशातून अवतरली का? ही माणसं एवढ्या मोठ्या संख्येनं येणार याची गृहखात्याला खबर लागत नाही का? [२०० वर्षापूर्वीच्या लढाई बद्द्ल : (१) पेशवे हरले नाहीत त्यांनी गनिमी कावा वापरला (२) इंग्रज हरले पण त्यांनी स्तंभ उभारला (३) इंग्रज जिंकले पण त्यांचं खूप नुकसान झालं इतके किमान पर्याय संभवतात तेवढ्याच जुन्या झाडू गाडगं प्रथेबद्द्ल (१) ती होती (२) नव्ह्ती इतके किमान पर्याय संभवतात मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्‍या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं. ] एखादं उभ असलेलं स्ट्र्क्चर झुंडशाहीने पाडून आर्थिक विकासाकडे वाटचाल करणार्‍या भारतीय समाजाला थेट पुराणकाळात नेऊन दोन दंगलखोर बनविणार्‍या, "खतरेमें" ची हूल देत हिंदू समाजाला गेल्या दशकांपर्यंत आणि अजूनही वेठीला धरणार्‍यांबद्द्ल प्रेम असणार्‍यांनी दोन दिवसातल्या आर्थिक नुकसानीबद्द्ल गळे काढावे हा शुद्ध दांभिकपणा नाही का? हे सर्व या संस्थळावर आलेल्या प्रतिक्रियांबद्द्ल आहे. त्या प्रतिक्रिया बघताना एक लक्षात आलं की मुळात एखाद्या ठिकाणी जमाव मोठ्या संख्येनं येतो त्यावर दगडफेक होते, दुकानं बंद ठेवली जातात, त्यांच्याविरोधात वातावरण तयार केलं जातं, या मूळ मुद्द्यावर कोणीही बोलत नाहीय. जणू काही ते चुकीचं स्मारक पुजताहेत म्हणोन त्यांनी दगड खायलाच हवेत. खरंतर "याच लोकांनी दगड आणून आजूबाजूच्या घरातून साठवून ठेवले असतील आम्हाला मारा म्ह्णून", एवढंच सरळसोट म्हणायचं बाकी राहिलं आहे. हे असतं आपल्याला हवं तेच बघण्याचं आणि सांगण्याचं टेक्निक. पिढ्यानपिढ्याच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान आणि नव्या युगाचं शिक्षण हे यासाठी छानपैकी वापरता येतं. ’बाबासाहेबांना आम्ही मानतो पण हे आहेत का कोणी तसे?" असं सर्रास म्हणणार्‍या किती जणांमध्ये त्यांच्या त्यांच्या जातीच्या महापुरुषाचे गुण १०% तरी आहेत? अरे ही गावकुसाबाहेर ठेवलेली माणसं आता प्रवाहात येतायत. आता जगणं शिकलेली ही नवीन पिढी ही आधीच्या पिढीचा अशिक्षित वा अर्धशिक्षितपणा, एकंदरीत जगण्यात वाढलेली स्पर्धा, स्त्री-पुरूष समानता, गावाकड्ची आपली माणसं आणि नवीन सुशिक्षित समाजात वावरताना आजूबाजूला गोळा केलेली माणसं यांच्यात वावरण्याचा तोल सावरणे, आपल्या पूर्वज-काळात फारसं अभिमानास्पद काही नाही किंवा जे आहे असं आपण मानतो त्याला समाज मान देत नाही अश्या अनेक पातळ्यांवर लढत असते. संपन्नतेची सुखं उपभोगतानाही स्वप्निल सोनावणे, नितीन आगे सारखी प्रकरण त्यांना आपण आजूनही गावकुसाबाहेरच आहोत याचं वेदनादायक भान आणून देतात, सैरभैर करून सोडतात. व्यक्तिगत पातळीवर छोटे मोठे संभावित अपमान आणि "तुम्ही ते काय!" च्या नजरा असतातच. मास्लोच्या पहिल्या पायरीवरून आताच वर चढलेल्या या लोकांनी थेट चौथ्यापातळीवरचा विचार करावा अशी अपेक्षा बाळगत समाज यांच्याकडे (१) आरक्षणाच्या कुबड्या घेतलेले हे लोक (२) संस्कार आहेत का यांच्याकडे (३) मी म्हटलं बाकी कोणीही आण नवरा/नवरी म्हणून पण जय भीमवाला/वाली नको बाई (४) अच्छा तू *** आहेस? वाटत नाही हे असे अनेक खडे येता जाता फेकत असतो आणि त्यांचेच दगड होऊन अश्या आंदोलनातून समाजाकडे भिरकावले जातात. तेव्हा हे असे खडे आपल्याकडून भिरकावले जाणार नाही याची प्रत्येकाने वैयक्तिकरित्या दक्षता घेतली तरी हे असे भडके उडण्याला थोडाबहुत आळा बसेल. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांनी या स्मारकाला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेसाठी बैठक घेतली एवढंच फेबुवर पोस्ट केलं. त्या पोस्टवर एवढ्या विखारी प्रतिक्रिया आल्यात की हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते. ( कुंभमेळ्यासाठी दुष्काळातही गोदावरीत पाणी ओतलं तेव्हा ते नाही खटकलं या लोकांना.) हाच मानभावी सुसंस्कृतपणा या मागासवर्गीय शहरी लोकांना पदोपदी भेटत असतो (गावच्यांचे प्रश्न आजून वेगळे.) आणि त्या घाणीत पाय बरबटू न देता त्यांना स्वतःचं जगणं अजून चांगलं करायचं असतं. इथे दणादण प्रतिक्रिया देण्याएवढं सोपे नसतं ते एवढ भान तरी ठेवावं. आपल्याला समाजात मान आहे, आपलया प्रतिकांना ही अखील समाजाची प्रतिकं म्हणून मान मिळतो पर्यायाने आपल्याला मान मिळतो तरिही लहानपणी आपल्याला "बामण भट कढी आंबट" म्हणून चिडवत होते हे शल्य जाणवतं तर आपल्याला मानच नाही आपले आई वडील केवळ जन्माने वरच्या जातीतला म्हणून छोट्या वयाच्या व्यक्तीलाही मान देतात, हात जोडतात (हे आता आता पर्यंत उत्तर, मध्यप्रदेशात होतं की नाही? अजूनही असेल) हे बघताना त्या जातीच्या मुलांना वेदना होत नसतील का? जिथे तिथे आपली लायकी काढली जाते आपल्याला कमी लेखलं जातं हे स्वीकारून आत्मसन्मान कसा जपत असतील ते? पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते. सफाईकामात अजूनही ठराविक जातीला अघोषित आरक्षण आहे, जाता का हिरीरीने तिथे आरक्षण नको म्हणत? सवर्णांना चांगलं बोलण, वाचणं बाळकडू घरात मिळालेलं असतं. ५० च्या दशकातल्या बहुसंख्य आरक्षितांना ते मिळालं होतं का? पण उच्चारावरून लिहीण्यावरून , वागण्या बोलण्यातल्या रांगडेपणावरून त्यांना खुसूखुसू हसताना ते हे कुठून शिकतील हे भान असतं का? कुणी उच्च्पदस्थ वा परदेशस्थ नातेवाईक, उच्चविद्याविभुषित परिचितांचं मार्ग दर्शन, आईवडिलांनी साठवलेला पैसा, मिळवलेलं ज्ञान या कुठल्याच कुबड्या आपण नाही वापरल्या का? मग ज्यांच्या अगदी एखादया पिढीपलीकडल्या पूर्वजांनी भिका मागत पोटं भरली (ज्याला जोदार असं गोंडस नाव दिलं गेलं होतं.) त्यांनी एखादी कुबडी वापरली तर त्यांना चोर म्हणावं वाटतं? त्या कुबड्याच आहेत हे वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला माहित असतं पण "ते जय-भीमवाले " असं म्हणत त्यांना आपण "घेट्टोत" ढकलतो. त्या कुबड्या पुढच्या पिढीला वापराव्याश्या वाटू नयेत असं समाज म्हणून आपण काय करतो? आरक्षणाविरूद्ध इथे गळे काढले जातात मग मेडिकलच्या सीटस जातीची खोटी प्रमाणपत्र देऊन मिळवल्याचं प्रकरण उघडकीला आलं होतं त्याचा निषेध किती जणांनी केला या संस्थळावर? मनोमन तरी किती जणांना वाटलं हे चुकीचं झालं म्हणून? एखादा मागासवर्गीय जनरल जागेसाठी अर्ज करू लागला की "आले हे. स्वत:च्या राखीव जागेतूनच करायचा ना अर्ज, इथेपण यांना हवं" अशी बरोबर उलटी भुमिका घेतली जात नाही का? अश्यावेळी तो माणूस स्वत:ला आजमावण्याचं धाडस कसं करेल याचा विचार अश्या पिंका टाकताना केला जातो का? समाज म्हणून ते नाही तर सवर्ण किती मागासलेले आहेत हेच यातून दिसतंय. आता खरंतर भिमा-कोरेगाव प्रकरणीत ग्रामस्थांनी परस्पर सहकार्याची भुमिका घेतल्याच्या बातम्या आहेत. चूक कोणाचीही असो असं पुन्हा होणार नाही अशी भाषा दोन्ही बाजूकडून झाली आणि ते ही कोणत्याही प्रस्थापित राजकारण्यांच्या नाक खुपसण्याला वाव न देता. ही खूप आशेची गोष्ट आहे. कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी. दोन गटात फूट पडणे हे आपल्या जगणं कठीण होण्याशी थेट निगडीत आहे, याचं गावकर्‍यांना लवकर भान आलं असावं. पण ते झालं हे खरच चांगलं, समुद्रमंथनातून विषाबरोबर अमृतही निघतं हा दिलासा देणारं आहे. या संस्थळावर मात्र शहाण्यांनी विषाचा प्यालाच दाखवत जो काही एकांगी हैदोस घातलाय तो बघता या समाजातलं असल्याची लाज वाटावी. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एवढे विष ओकू शकता तर खाजगीत किती विषमय असाल? असो, अश्या बाबतीत यापुढे तरी विवेकाने विचार मांडावा (जमल्यास करावा) एवढीच अपेक्षा. राजकारणी, ब्रिटीश, संघटना या कोणालाही नावं ठेवण्याआधी प्रत्येकाने माझ्याकडून जे मांडलं जातय त्यात तथ्य किती आणि कांगावा किती याचा डोकं स्थिर ठेवून विचार केला तरी अश्या घटना टळायला मदतच होईल. शेवटी समाज म्हणून सगळ्यांनाच पुढे जायचय.

प्रतिक्रिया द्या
122881 वाचन

💬 प्रतिसाद (327)
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 01/06/2018 - 07:56 नवीन
21- मुझे विश्वास है कि मैं फिर से जन्म ले रहा हूँ (इस धर्म परिवर्तन के द्वारा). मग गतजन्मीच्या जाती च कौतुक कशाला?
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sat, 01/06/2018 - 13:40 नवीन
अविनाशजी.... निदान या जन्मी... एखाद्या महाराने शंकराचार्य व्हावं, आणि शेकडो ब्राह्मणांनी त्या शंकराचर्याच्या पाया पडावं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
स
सुबोध खरे Sat, 01/06/2018 - 16:15 नवीन
एखाद्या महाराने शंकराचार्य व्हावं, आणि शेकडो ब्राह्मणांनी त्या शंकराचर्याच्या पाया पडावॅ गजोधर बुवा आमच्यासारखे असंख्य ब्राम्हण भक्तिभावाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पाया पडतात. माणूस कर्तृत्वाने मोठा व्हावा. कोणी " चढवल्याने" नव्हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सुखीमाणूस Sat, 01/06/2018 - 18:11 नवीन
कुठलाही बहुजन शंकराचार्य का नको? अणि पाय फक्त ब्राम्हणानी का धरावेत सगळ्यानी का नको? उलट कुठल्याही जातीच्या माणसाने शंकराचार्य व्हावे व सर्व जातीतल्या लोकानी त्याना वन्दावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ए
एमी Sun, 01/07/2018 - 02:41 नवीन
ते शंकराचार्य आणि पाय वगैरे राहुदेत! आपण जातपात न मानणारे आहोत अशा समजुतीत असलेल्यां प्रत्येकाने एक प्रयत्न करा. तुमचा एखाद दलित मित्र/मैत्रीण आहे? त्याला/तिला आणा मिपावर आणि एक वर्ष एक्टिव ठेवा. बघा जमतय का! इथे साध्या RTE मुळे 'त्यांची' मुलं 'आपल्या'सोबत शिकायला लागली हे सहन होत नाहीय लोकांना. विषवल्ली वगैरे म्हणत सुटलेत आणि शंकराचार्य बनायच्या बाता करतायत......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
स
सुखीमाणूस Sun, 01/07/2018 - 03:29 नवीन
आजकाल काही चांगल सांगायला गेल की तुमच बामणी शहाणपण शिकवू नका आस ऐकायला लागत. दलित मैत्रिणीलां मिपावर आणून काय बर सिद्ध होईल सामाजिक एकता? शाळेत नक्की सगळ्या प्रकारची मुले असावीत. त्याचा फायदा मुलांनाच होतो. आम्ही तर मुलाना मुद्दाम अशा शाळेत घातले जिथे मिक्स क्राउड असेल. अगदी दोघांच्या शाळाही बदलल्या कारण आधीची शाळा फारच साजूक तुपातली वाटली. सगळ्या मुलांनी आपल्याहून गरीब/श्रीमंत लोकांच्यात सहजतेने वावरले पाहीजे. कुठलाही गंड न बाळगता. आता एकीकडे समानता हवी असे म्हणायचे आणि दुसरीकडे मराठ्यांना वेगळ करायचा प्रयत्न करायचा. अवघड आहे बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
प
पगला गजोधर Sun, 01/07/2018 - 03:49 नवीन
ओ पंत, टेस्टमोनि आहे प्रत्यक्ष दर्शी कडून ... शाळेत नावात "दक्षिण" अर्थी शब्द असलेल्या शैक्षणिक संस्थेत, ऍडमिशन च्या वेळेस, एका विशिष्ट जातीच्या मुलांनाच निवडा/पुढे आणा, आणि मुस्लिम मुले अजिबात नको, पुढे शैक्षणिक वर्षात शाळेच्या प्रतिनिधीतवात भलेही ते ओलांपियाड असो किंवा अजून काही... फक्त बुद्धीवान आडनावाची जमातच निवडा, असे स्पष्ट व्हर्बल ऑर्डर्स आहेत... लवकरच स्टिंग करून पुढे आणूच मॅटर....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
ए
एमी Sun, 01/07/2018 - 03:55 नवीन
आजकाल काही चांगल सांगायला गेल की तुमच बामणी शहाणपण शिकवू नका आस ऐकायला लागत. >> सांगणार्याच्या बोलण्यातला आणि वागण्यातला फरक जाणवत असेल त्याना लगेच; म्हणून असं काहीतरी ऐकावं लागतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
अ
अंतरा आनंद Wed, 01/10/2018 - 03:11 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
अ
अंतरा आनंद Wed, 01/10/2018 - 18:29 नवीन
खर आहे अॅमी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 01/09/2018 - 08:27 नवीन
जे महार धर्मान्तर करून इसाई मुसलमान झाले ते का येत नाहीत समारंभाला? त्यांना अभिमान नाही का आपल्या पूर्वाश्रमीच्या जातीचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Tue, 01/09/2018 - 09:40 नवीन
अविनाशजी, या कार्यक्रमाला येणाऱ्या जनतेची "जातीनिहाय व धर्मनिहाय", माहिती/डेटा/संदर्भ आपल्याला देता येईल काय इथे ? म्हणजे ती माहिती अभ्यासून आपल्याला उत्तर देता येईल, मिपावरील सभासदांपैकी कोणालाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
ए
एमी Sat, 01/06/2018 - 08:54 नवीन
नसेलही. पण महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? >> +१. === इतिहाससंशोधकांनी तिथे "याला कागदोपत्री पुरावा कुठेय?" असं विचारलं आणि अर्धवट शहाणे पैलवान इथेही ते विचारत सुटलेत. महार इतके महत्वाचे होते का की त्यासाठी एक कागदी फर्मान सुटेल? >> जोपर्यंत टाईम मशीनचा शोध लागत नाही तोपर्यंतत 'खरा' इतिहास कळणार नाही. कागद, कलम उपलब्ध असलेले+ लिहिता येणारे जे थोडेफार असतील त्यांनी जे लिहिलं त्यावर विसम्बुन राहायचं. ब्रिटिश काहीतरी लिहिणार, ब्राह्मण काहीतरी लिहिणार, अर्थ लावणारं काहीतरी अर्थ लावणार.... आणि सत्य काहीतरी तिसरेच असणार.... === बाकीचे नंतर वाचते :)
  • Log in or register to post comments
श
शलभ Sat, 01/06/2018 - 09:21 नवीन
इकडच्या प्रतिक्रिया वाचुन 2 दिवस असलेच विचार येत होते.. बाकी वेळा चांगली असणारी माणसं अशावेळी ईतकी विखारी कशी होतात. तुम्ही खूप पोटतिडकीने लिहिलंय पण त्यातही चुका काढणारे येतील पण त्यातला आशय किती जण समजून घेतील?
असे अनेक खडे येता जाता फेकत असतो
असे खडे फेकणारे तर रोजच दिसतात.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Sat, 01/06/2018 - 11:20 नवीन
जर तुम्ही मुस्लीम असाल आणि तुम्हाला या देशात असुरक्षित वाटायला लागलं असेल, जर तुम्ही दलित असाल आणि अचानक तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आपला अपमान केला जातो असं वाटत असेल, जर तुम्ही हिंदू असाल आणि अचानक तुम्हाला वाटायला लागलं की हिंदु धर्म धोक्यात आलाय, जर तुम्ही जैन असाल आणि तुम्हाला अचानक वाटतंय की आपल्या परंपरा बंद केल्या जात आहेत, तुम्ही कुठल्याही जातीधर्माचे असाल आणि अचानक तुम्हाला जातीधर्माच्या वादांमुळे असुरक्षित वाटायला लागेल तेव्हा —सोशल मिडियापासुन दूर रहा... — न्युज चॅनलवरची भांडणं पाहु नका आणि एकच काम करा एकदा तुमच्या सभोवताली असलेल्या तुमच्या वेगवेगळ्या जातीधर्माच्या पण जीवाला जीव देणार्‍या मिञांना आठवून पहा... तुम्ही एका सुंदर देशात राहता याचा तुम्हाला अभिमान वाटेल कायप्पा फॉरवर्ड!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sat, 01/06/2018 - 12:21 नवीन
लॉजीकल म्हणा किंवा पोटतिडकिने म्हणा, जे काहि टंकलय ते प्रामाणिकपणे अवतरलय म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच. जातीच्या उतरंडीत दलीत-पददलीतांना अनंत यातना भोगाव्या लागल्या यात कोणाचं दुमत नसावं. ऐकुन खरं वाटणार नाहि, पण जातीव्यवस्थेमुळे जे दु:ख दलीतांनी भोगलं तेच आणि तसच दु:ख प्रामुख्याने ब्राह्मण समाजाने भोगलं. अर्थव्यवस्थेत नगण्य स्थान, आपल्या वाटेला आलेल्या कामाचा घरबंध नसण्याचा मानसीक जाच, सामाजीक अवहेलना (केवळ इतर जातींमधुन नाहि तर अगदी स्वजातीय, किंबहुना स्वजातीय जास्तच), स्त्रीयांची पिळवणुन (केवळ एक स्त्री म्हणुन नव्हे तर ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलली स्त्री म्हणुन) हे केवळ वानगीदाखल उदाहरणं. जातीय श्रेठत्वाचा अहंकार, थोडीफार सामाजीक जबाबदारीची जाणिव आणि काहि पदं, कधिमधी चार दमड्या गाठीशी, एव्हढ्या भांडवलावर भटांचं दु:ख झाकल्या गेलं. अर्थात, त्याची दलीतांच्या दु:खाशी तुलना होणार नाहि, पण पिढीजात दु:ख भोगल्यामुळे दलीत समाजाचा दंगल सदृश उद्रेक एकवेळ स्वाभावीक म्हणता येईल, पण तो जस्टीफाय होत नाहि. भूकमरीने मरणासन्न झालेल्या माणसाने अन्नाची नासाडी करण्याबाबत जो आक्षेप आहे त्याच पद्धतीचा आक्षेप दलीत समाजाबाबत, मुख्यतः त्यांच्या नेतृत्वाबद्दल ऐकायला मिळतो. भारताचे राजकीय स्वातंत्र्य आणि आंबेडकरांचा उदय असे दोन सुदैवयोग एकाच कालखंडात भारतात अवतरले. त्यापैकी भारतीय स्वातंत्र्य दोन पाऊल पुढे, एक पाऊल मागे करता करता लोकशाहीच्या मार्गाने उन्नत होत गेलं. त्याच वेगाने बाबासाहेबांनी चेतवलेला ज्ञानप्रकाश दलीत समाजात मॅच्युअर झाला असता तर आज दलीत समाजाने आपल्या विद्वत्तेच्या आणि कर्तुत्वाच्या जोरावर उभा भारत पादाक्रांत केला असता. त्याच्या नेमकी उलट स्थिती आज बघायला मिळते. ज्ञानलालसेने पेटुन उठलेल्या दलीत विद्यापीठांमधे अ‍ॅडमिशन घेताना जीव मेटाकुटीला येणारे सर्व वर्गाचे विद्यार्थी बघण्याऐवजी आरक्षणाची ढाल मिरवण्यात आनंद मानणारा दलीत समाज बघुन खेद वाटतो (हे सार्वत्रीकरण नाहि. खरोखर विद्वत्ता गाजवणार्‍या दलीतांची संख्या अजीबात कमि नाहि. पण समाज म्हणुन हे वास्तव आहेच). शिवाय आता हा ट्रेंड वेगळच रुप घेताना दिसतो. ज्यांना ठेचा लागल्या, ज्यांचे मार्ग अवरुद्ध करण्यात आले, त्यांच्या वाटा मोकळ्या झाल्याबरोबर त्यांनी आपले राजमार्ग बनवण्यात व्यग्र होण्याऐवजी ते रस्ता रोको करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवताहेत. अभिमानाची उदाहरणं तयार करण्याऐवजी अत्यंत तकलादु अशा अभिमानाच्या जागा इतिहासातुन उकरुन काढायला बघताहेत. यात इतर कुणाचं नाहि, स्वतः दलितांचं नुकसान आहे. राहिला मुद्दा भिमा-कोरेगाव प्रकरणातल्या राजकारणाचा. हि सर्व भानगड राजकारणच नाहि तर सत्ताकारण प्रेरीत आहे असं मानायला भरपूर वाव आहे. गुजरातमधे तद्दन जातीय भांडवलावर एक तरुण आमदार होतो. दिल्लीस्थीत राजकारण्यांच्या साथीने देशपातळीवर जातीय खेळी मांडायला महाराष्ट्रातुन सुरुवात करतो. त्याला प्रकाश आंबेडकरांसारखे जुने-जाणते लिडर्स बळी पडतात याचं जास्त दु:ख वाटतं. असो. हा केवळ दलीत समाजाचा प्रॉब्लेम आहे असं नव्हे. कमि-अधीक प्रमाणात/प्रकारात सर्वत्र हे असच चालु आहे. पिकल्या पानांनी काय करायचे ते उपद्व्याप केले आहेतच. नवीन पिढीने डोळे उघडे ठेऊन मार्गक्रमण करावे आशी इच्छा आहे. बाकी आपला मेरा भारत महान आहेच.
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Sun, 01/07/2018 - 19:19 नवीन
ऐकुन खरं वाटणार नाहि, पण जातीव्यवस्थेमुळे जे दु:ख दलीतांनी भोगलं तेच आणि तसच दु:ख प्रामुख्याने ब्राह्मण समाजाने भोगलं. >> राजकारण, समाज आणि एकूणच परिस्थिती बदलताना प्रत्येक जातीने दु:ख भोगलय. ब्राम्हण म्हणून त्यांना किमान मान मिळत होता हे तुम्ही नाकारू शकतच नाही. हा मान दलितांना नव्हता किंबहूना तो असावा ही जाणीवही नव्हती. आंबेडकरांनी ही जाणीव निर्माण करण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न केले. ही अशी मानचिन्ह शोधणं, हिंदू संस्कृतीमधले, धर्मातले विपर्यास दाखवणं हे सर्व समाजाचा आत्मसन्मान जागृत करण्यासाठी आवश्यक वाटलं असावं. जेणेकरून आपली परिस्थिती ही आपल्या गतजन्माच्या कर्माचे फळ किंवा धर्माने आपल्याला जे दिलय तेच स्वाकारायला हवं असे विचार सोडून त्यांनी आपली परिस्थिती बदलण्यासाठी प्रवृत्त व्हावं. स्त्रियांच्या बाबतीत तुम्ही बरोबर बोलताय. किंबहूना ब्राम्हणांच्या स्त्रियांना जिथे पोचायला शतकं लागली तिथे या स्त्रिया काही दशकातच पोहोचू लागल्या. कारण परिस्थितीने आधीपासून त्यांना घराबाहेर पडायची सवय होती. म्हणूनच ब्राम्हण बायका जेव्हा जातीच्या अभिमानाबद्दल बोलत असतात तेव्हा सांगावं वाटतं की बायांनो या जातीनं कित्येक वर्षं तुम्हाला काय दिलय त्याची मोजदाद करा आणि मग अभिमानाच्या गोष्टी करा. केशवपवन, सतीसारख्या टोकाच्या स्त्रीद्वेष्ट्या सवर्ण सामाजातल्या प्रथा या समाजात नव्हत्या. अर्थात घरातलं स्त्रियांचं स्थान दुय्यमच होतं पण तोंड दाबून बुक्क्याचा मार नसावा. त्याच वेगाने बाबासाहेबांनी चेतवलेला ज्ञानप्रकाश दलीत समाजात मॅच्युअर झाला असता तर आज दलीत समाजाने आपल्या विद्वत्तेच्या आणि कर्तुत्वाच्या जोरावर उभा भारत पादाक्रांत केला असता. त्याच्या नेमकी उलट स्थिती आज बघायला मिळते. >> विद्वता आणि कर्तृत्वाला अचूकपणे पुढे येण्यासाठी आपल्या भारतीय व्यवस्थेत जागा आहे का हो? कोणत्याही व्यवस्था ठाम नियमांनी बांधलेल्या नाहीत. आरक्षित जागां खोट्या प्रमाणपत्राने मिळ्वणे हे त्यातलंच एक, बरेचदा उमेदवार मिळत नाही म्हणून जागा ठाराविक वर्ष रिकाम्या ठेवून मग जनरल उमेदवार नेमला जाणं हे सर्रास होत होतं कालपरवापर्यंत. समाजाने टाकलेले आरक्षणाचे चार तुकडे त्यांनी निमूटपणे चघळावे आणि उपकार मानावे अश्या प्रकारच्या मानसिकतेचं वारंवार घडणारं दर्शन . जिथे आरक्षित आहे तिथे हा प्रकार मग परफॉर्मन्स बेस्ड जागांवर/ व्यवसायांसंदर्भात विचारूच नका. इथेच कित्येक वेळेला आरक्षित कोट्यातून प्रवेश मिळवलेल्या डॉक्टरकडे मी का जाव? असा प्रश्न विचारला गेलाय. डॉक्टर होण्याची पात्रता नसलेली पण वडिलांच्या पाठिंब्यावर पुढे जात राहणारी मुले, पेड सीट्सवर प्रवेश मिळवलेली मुले यांच्या बाबतीत असं विधान मी ऐकलेलं नाही. फक्त आरक्षित म्हणजे गुणहीन, नि:सत्व, आणि पैश्याच्या वा वशिल्याच्या जोरावर पुढे जाणारी? बरेचदा योग्य व्यक्तींना पुढे आणण्यात मिडियाची भुमिका निर्णायक ठरते. मिडीयात अर्थातच चांगलं लिहीता- बोलता येण्याला प्राधान्य असल्याने सवर्णांचं वर्चस्व असतं त्या मुळे कौतुकही सिलेक्टीव्हांचच होतान दिसतं. (हे आता त्वरेने भूतकाळात जमा होत आहे याची मला कल्पना आहे.) दलित साहित्य म्हणजे दु:खांचं भांडवल करणारं असं म्हणताना शिल्पा कांबळेची "निळ्या डोळ्यांची मुलगी" मिडीयानं कितीसं उचलून धरलं? या पुस्तकात ज्या अलिप्तपणे दलितत्व, शिक्षणाची आस, भोवतालची दारू, झगड्यातली संस्कृती, आपल्या आपल्याच सुस्थितीत पोचलेल्याकडून नाकारलं जाणं अश्या अनेक सत्यांची गुंफण आहे ती निव्वळ अमेझिंग आहे. किती ठिकाणी या पुस्तकांची परिक्षण लिहीली गेलीत? अनुल्लेखानं मारलं जाणं हे कित्येक गुणी दलित कलाकारांनी सोसलय, सोसत आहेत. त्यांचं पॉलिश्ड नसणं हे त्यांच्या गुणांना मारत आलेलं आहे. अर्थात ही परिस्थिती आता झपाट्याने बदलते आहे. ज्यांना ठेचा लागल्या, ज्यांचे मार्ग अवरुद्ध करण्यात आले, त्यांच्या वाटा मोकळ्या झाल्याबरोबर त्यांनी आपले राजमार्ग बनवण्यात व्यग्र होण्याऐवजी ते रस्ता रोको करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवताहेत. अभिमानाची उदाहरणं तयार करण्याऐवजी अत्यंत तकलादु अशा अभिमानाच्या जागा इतिहासातुन उकरुन काढायला बघताहेत. >> हे करायला सामाजिक वातावरणही कारणीभूत असतं. आपले पूर्वज, आपली संस्कृती याबद्दल नको तेवढा अभिमान आजूबाजूला ओसंडून वाहत असताना प्रत्येक जातीगटाला आपापल्या अभिमानाच्या जागा शोधायच्या असतात. त्या "तकलादू" आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्या गटाच्या अस्मितेला ठेच पोहोचते आणि सामाजिक ऐक्यात मुळातच असलेल्या भेगा रुंदावायला लागतात. मला नेमकं हेच म्हणायचं आहे. कोणत्या गटाचा अभ्भिमानविषय कसा चुकीचाय ते दाखवत बसायची इतरांनाही गरज का भासावी? वाद त्यांच्या अभिमानाच्या जागेवरून झालेला नाही आणि ते आता उकरून काढलेलं ही नाही. पण सध्याच्या राष्ट्र्भक्त-द्रोही या खेळात इंग्रजांना पाठिंबा देणारे अशी त्यांची संभावना करणारे ढ्कलसंदेश पाठ्वले गेले. हे चुकीचं होतंच असं कोणीतरी म्हणतय का? त्याऐवजी तेच चुकले असा सार्वत्रिक समज पसरवला गेलाय. मी मेवाणीची भाषणं ऐकलेली नाहीत. उना प्रकरणातून त्याचा उदय झाला आहे. आणि ते प्रकरण निषेधार्हच होतं. त्याची कोणत्याही प्रश्नाबद्द्ची कोणतीही मांडणी मी ऐकली नाही. त्यामुळे मी भाष्य करणार नाही पण तुम्ही हे जे ठामपणे सांगताय एवध्या ठामपणे फक्त चर्चेतल्या भाजपा प्रवक्त्यांनी सांगीतलं आहे. बातम्याही तश्या नव्हत्या. या प्रकरणात दलित जमावाकडून दगडफेक झाली नव्ह्ती त्यामुळे त्याचा हात वैगेरे कल्पनाविलास असावा. अर्थात मला सत्ताकारण वा राजकारण यावर कोणतंही भाष्य करायचं नाही. मुळात समाजात सामंजस्य असलं तर अश्या प्रकारच्या राजकारणाला वाव मिळणारच नाही. मी कोणताही उद्रेक जस्टीफाय केलेला नाही. पण उद्रेक का होतो हे डोळे उघडून नीट बघा तरी. ह्या बद्दल द्वेषमूलक विधानं तरी करू नका. (दलित आंदोलनात नेहमी असं होतंच, हे कोणाचंततरी विधान होतं ना आधीच्या चर्चेत. ) नव्या पिढीच्या डोक्यात आधीच बायस्ड मतं भरायची, मग कसे राहणार त्यांचे डोळे उघडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Mon, 01/08/2018 - 05:46 नवीन
केवळ एक घटनाविशेष म्हणुन नाहि तर थोडा लार्जर पर्स्पेक्टीव्ह विचारात घ्या. समाजमनाचं जे काहि थोडंफार ऑब्सर्वेशन मी केलय त्यावरुन मला एव्हढं नक्की वाटतं कि अगदी ८०-९० च्या दशकापर्यंत सामाजीक अभिसरणाची पुढे जाणारी गाडी आता यु टर्न घ्यायला लागली आहे अशी शंका येते. दलीतांसाठी, फोर दॅट मॅटर कुठल्याही पर-जातीय व्यक्तीसाठी घरचे आणि मनाचे दरवाजे एकदम बंद असणं, मग थोडं किलकिले होणं, दारं सताड उघडी होणं आणि शेवटी जात हा फॅक्टर अजीबात विचारात न येणं, हे सगळं स्थित्यंतर मी बघितलं आहे. केवळ प्रातिनीधीक म्हणुन नाहि तर समाजजीवनाचा ट्रेण्ड तसा होतोय याची शाश्वती येण्याइतपत ते जाणवलं. अगदी मागच्या पिढीचे लोक २१व्या शतकाच्या दुसर्‍या-तिसर्‍या दशकापर्यंत जातीभेद नामशेष जरी नाहि तरि अगदी डायल्युट होण्याच्या मार्गावर होण्याबद्दल बरेच सकारात्मक दिसायचे. आंबेडकरांनी शक्य त्या सर्व मार्गांनी दलीत समाजाची अस्मीता जागृत केली हे स्वाभावीक होतं, योग्य देखील होतं. आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग इतका स्वच्छ होता कि त्यात अंध-पोथीवादासारखा धोका निर्माण व्हायचे चान्सेस जवळपास शुण्य होते. शिवाय त्यावर मार्गक्रमणाची अनिवार्यता देखील वादातीत होती/आहे. हा रोग, हे औषध इतका सरळ कारभार होता. समाजधुरीणांचा पराभव त्यांचेच वैचारीक अनुयायी करतात असं म्हणतात. कधि त्यात नेत्याच्या वैचारीक बैठकीची अँबिग्युटी असते, कधि ते काळानुरुप नसतात, कधि मूळ समस्या आपोआप डायल्युट होते, तर कधि समाज/अनुयायी आळशी बनतात, शिवाय राजकीय/आर्थीक फायदे मिळवण्याची धडपड. आंबेडकरी चळवळीला यापैकी कुठल्याच कारणाचा धोका नव्हता. दबलेला, पिचलेला, अधिकारांपासुन वंचीत असा समाज ते आधुनीक काल सुसंगत, व्यवस्थीत एस्टेब्लीश्ड समाज हा प्रवास तसा सोपा नाहि. पण दलीत चळवळीला आंबेडकरांसारखा नेता आणि नुकताच स्वतंत्र झालेला भारत अशी युनीक बैठक मिळाली. जगाच्या इतीहासात फार थोडी अशी उदाहरणं सापडतील. या पार्श्वभूमीवर गाडी कुठे जायला हवी होती आणि आता ति कुठे जातेय हे बघायला हवं. इतर समाज घटकांप्रमाणे दलीत समाजाला देखील आपल्या अस्मीतांचं कौतुक असणे, अभिमान असणे वगैरे अगदी योग्य आहे. किंबहुना कर्तुत्व गाजवणे, त्यातुन जाज्वल्य अस्मीता निर्माण करणे, व त्यातुल पुढील कर्तुत्वाला पोषक खाद्य पुरवणे हे सहज-स्वाभावीक समाजशास्त्र आहे. पण इतर समाजांचं जाऊ दे, स्वतः दलीत समाजाला आपल्या अस्मीतांमधुन कुठले पोषक मुल्य मिळताहेत याचं भान हवं. आजुबाजुला अंध-अस्मीतांचा बाजार भरला असताना दलितांनी तसं केलं तर काय बिघडलं असा युक्तीवाद करता येईल, पण इतरांच्यात चुकीच्या अस्मीतामुळे होणारं नुकसान सहन करायला बरीच राखीव चरबी आहे. दलितांना सध्या तरी ते प्रिव्हिलेज नाहि. २-३ पिढ्यांच्या चुका त्यांना मूळ मार्गावरुन बर्‍याच लांब घेऊन जातील. इतर समाज घटकांनी दलितोद्धाराकडे किती सकारात्मक दृष्टीने बघितलं हा हमखास वादाचा विषय असेल. मला वाटतं या बाबतीत भारत देश अगदी डिस्टींक्शनने नाहि तरि काठावर नक्कीच पास झाला असावा. ५-१० मार्क जास्तच पडले असावे. दलीत समाज स्वतः देखील अंतर्गत आणि बाह्य मर्यादांवर मात करत पुढे नक्कीच गेला आहे. पण हा प्रवास उत्तोरोत्तर पोझीटीव्ह वळणं घेण्याऐवजी नकारात्मकतेकडे का झुकायला लागला आहे हे कळायला मार्ग नाहि. तसा तो होत नसेल देखील, नसल्यास आनंदच आहे. पण ताक घुसळुन लोणि वर यावं आणि त्यावरुन मूळ मटेरिअलची क्वालिटी कळावी या न्यायाने जर दलीत लिडरशीप अजमावतो म्हटलं तर चित्रं फार काहि बरं नाहि. उना व तत्सम प्रकरणांमधे नेमकं काय झालं याचं चर्वीतचर्वण बाजुला ठेवलेलं बरं. एक नवीन नेतृत्व उदयाला आलं एव्हढच सध्या महत्वाचं. त्याबद्दल काहि वावगं वाटत नाहि. पण हे तरुण तुर्क महाराष्ट्रात येतात. आधुनीक पेशवाई, आर.एस.एस ला नागपुरात जाऊन संपवणे, संवीधान कि मनुस्मृती वगैरे अत्यंत बाष्कळ मुद्यांवर इथे गर्दी खेचतात. मराठी दलीत सारस्वत त्याची री ओढतात. हे केवळ सोईचं राजकारण म्हणुन सोडुन द्यायचं कि खरच आपल्याकडे विचारांची वानवा आहे हा प्रश्न छळतो. अवांतरः दलीत हि केवळ एक जात नाहि. ति एक अवस्था आहे. माणुस म्हणुन जगण्याचा हक्क नाकारणारी. या अवस्थेला कारणीभूत व्यवस्था जशी जुन्या काळात कळत-नकळत निर्माण झाली असेल तशीच व्यवस्था आज पाय रोऊन घट्ट होत चालली आहे. स्वच्छ पाणि, शुद्ध हवा, पोषक आहार, मनाला आवडेल त्या विषयाची स्वच्छंद बौद्धीक भटकंती, एक सजीव प्राणि म्हणुन व्हायला हवा तो विकास... हे सगळं मला नाकारण्यात येत आहे. ते तसच स्विकारायला माझ्या नकळत मला भाग पाडण्यात येत आहे. इथे तसं करणारा कुठलाच दृष्य धर्मग्रंथ नाहि कि राजसिंहासन नाहि. मागच्या शतकातलं आव्हान परतुन लावण्या अगोदरच एक नवीन आव्हान समोर उभं ठाकलं आहे. मी आधुनीक दलीत आहे. ( कसलं भारी लिवलय... वाह :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
अ
अंतरा आनंद Wed, 01/10/2018 - 18:27 नवीन
पण इतर समाजांचं जाऊ दे, स्वतः दलीत समाजाला आपल्या अस्मीतांमधुन कुठले पोषक मुल्य मिळताहेत याचं भान हवं. आजुबाजुला अंध-अस्मीतांचा बाजार भरला असताना दलितांनी तसं केलं तर काय बिघडलं असा युक्तीवाद करता येईल, पण इतरांच्यात चुकीच्या अस्मीतामुळे होणारं नुकसान सहन करायला बरीच राखीव चरबी आहे. दलितांना सध्या तरी ते प्रिव्हिलेज नाहि. २-३ पिढ्यांच्या चुका त्यांना मूळ मार्गावरुन बर्‍याच लांब घेऊन जातील. >> मान्यय. पण त्यांच्या अस्मिता जोपर्यंत कोणाच्या मार्गात येत नाहीत तोपर्यंत त्यांना विरोध का करावा? तो ही हिंसक? (त्यांच्यावर दगडफेक झाली, गाड्या जाळल्या गेल्या, दुकानं आदी बंद ठेवून त्यांची गैरसोय केली गेली याबद्द्ल मी बोलतेय. ते नक्की चुकीचच होतं असं कोणीही इथे स्पष्ट बोलायला तयार नाहीय. ) दलीत समाज स्वतः देखील अंतर्गत आणि बाह्य मर्यादांवर मात करत पुढे नक्कीच गेला आहे. पण हा प्रवास उत्तोरोत्तर पोझीटीव्ह वळणं घेण्याऐवजी नकारात्मकतेकडे का झुकायला लागला आहे हे कळायला मार्ग नाहि. >> तुम्ही नेत्यांवरून समाजाचं आकलन करू बघता आहात. तसं नाहीय. दुसरं म्हणजे सगळीकडेच भरलेला अस्मितांचा बाजार, वाढता धार्मिक आंधळेपणा/एकारलेपणा, संधी आणि संपत्तीच्या वाटपातली वाढ्ती असमानता यामुळे प्रत्येक समाजगट नकारात्मकतेकडेच वळतोय. हे तरुण तुर्क महाराष्ट्रात येतात. आधुनीक पेशवाई, आर.एस.एस ला नागपुरात जाऊन संपवणे, संवीधान कि मनुस्मृती वगैरे अत्यंत बाष्कळ मुद्यांवर इथे गर्दी खेचतात. मराठी दलीत सारस्वत त्याची री ओढतात. >> राममंदिर , गोमाता, लव-जिहाद, राष्ट्रगीताला उभे रहाणे असे एकाहून एक बांष्कळ मुद्दे गेली कित्येक वर्षे देशभर, मिडीयात चर्चेत आहेतच की. उना प्रकरणात काय झालं याचं चवीतर्वण नाही पण ती घटना दलितांना भान आणून देणारी ठरली. या हिंदूराष्ट्रात आपले स्थान काय असेल याचं भान. त्यामुळे तो बाष्कळ (सौम्य शब्दय) प्रकार झाला नसता तर हे मेवानी वैगेरे उदयाला आले नसते. अवांतराबद्द्ल : मी/ तुम्ही वा इतरही नागरीक म्हणून दलित आहोत, हे सत्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ए
एमी Wed, 01/10/2018 - 19:28 नवीन
राममंदिर , गोमाता, लव-जिहाद, राष्ट्रगीताला उभे रहाणे असे एकाहून एक बांष्कळ मुद्दे गेली कित्येक वर्षे देशभर, मिडीयात चर्चेत आहेतच की. उना प्रकरणात काय झालं याचं चवीतर्वण नाही पण ती घटना दलितांना भान आणून देणारी ठरली. या हिंदूराष्ट्रात आपले स्थान काय असेल याचं भान. त्यामुळे तो बाष्कळ (सौम्य शब्दय) प्रकार झाला नसता तर हे मेवानी वैगेरे उदयाला आले नसते. >> राममंदिर तसं जुनं झालं. २०१४ पासून चालू झालेला दादरी उना वगैरे ठिकाणचा गोराक्षसांचा धुमाकूळ, आता परवाचा लवजिहादचा विडिओ, तीन वर्ष सलग दुष्काळ पडूनही शेतकऱ्यांकडे केलेले साफ दुर्लक्ष....मेवानी, हार्दिक, मराठा मोर्चा वगैरे यातून, यामुळे आलेत. आताही या नेत्यांवर टीका करताना मुळ प्रोब्लेमबद्दल कोणीच बोलत नाही. त्यांना लोकांचा पाठिंबा का मिळतोय? कारण यांना पीडितांबद्दल सहानुभुती नाही कि मदत करायची नाही! फुकटचम्बू, विषवल्ली, कॅन्सर वगैरे उपहासच चालुय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
अ
अर्धवटराव गुरुवार, 01/11/2018 - 04:27 नवीन
केवळ दलीतांच्या अस्मीता डोळ्यात खुपल्या म्हणुन हा तंटा उभा झाला हे मनाला पटत नाहि. या शंकेला सबळ पुरावा असा काहि नाहि. पण हल्ली जसे वारे वाहताहेत त्यात सर्वकाहि आलबेल वाटत नाहि. पहिला दगड कुणी व का मारला हे कदाचीत त्या दगडालाच ठाऊक. अर्थात, सामाजीक दुभंगलेपणा आहेच. त्यात आपल्या उच्चनीचतेच्या कल्पनांचं बारुद देखील ठासुन भरलय. किंबहुना म्हणुनच ठिणगी पेटवायचा प्रयत्न झाला असावा. मी नेत्यांवरुन समाजाचं आकलन नाहि करत आहे. काहि दशकांचा ग्राफ डोळ्यासमोर धरला तर सामाजीक परिस्थिती ज्या स्टेजला यायला हवी होती त्यापासुन बरीच भरकटलेली दिसतेय. व या भरकटलेपणात अंगभूत सामाजीक मर्यादा आणि बाह्य परिस्थितीपेक्षा नेतृत्वाचा वाटा जास्त वाटतोय. जास्त वाईट याचं वाटतं कि नेतृत्वाची नवी फळी त्याच कर्दमात रुतायला बघतेय. इतर समाजगट फक्त सामाजीक नकारात्मकडे झुकतोय, पण त्यांच्या तिजोरीला आणि सर्वंकष हितसंबंधांना बाधा येईल असं दिसत नाहि. त्यामानाने दलितांचे सर्वंकष हितसंबंध मजबूत व्हायला एव्हाना जो पाया डेव्हलप व्हायला हवा होता तसा होताना दिसत नाहिए. दलितांच्या संघर्षातुन आग तर निर्माण होतेय लेकीन हंडी नहि पक रही. असो. दलीत समाजाला गेल्या १ वर्षात जर सो कॉल्ड हिंदुराष्ट्रातल्या स्वतःच्या स्थानाबद्द्ल अचानक भान निर्माण होत असेल तर दलीत समाजाने एका फटक्यात आजवरच्या समस्त आंबेडकरी कर्तुत्वाचा शुण्याने गुणाकार केला असं म्हणावं लागेल. राममंदीर, गोमाता, लव जिहाद हे मुद्दे हे मुद्दे अगोदर देखील तेव्हढेच तीव्र होते. त्याला मिडीया कव्हरेज गेल्या २-३ वर्षात मिळायला लागलय एव्हढच. मेवानी आणि तत्सम नेतृत्वाचा उदय होणारच होता. दलितांना अचानक आलेल्या भानाची हि परिणीती नाहि. शुद्ध राजकीय सारीपटावरची विशुद्ध चाल एव्हढच त्यामागचं सत्य. भगव्याच्या जोडीला निळा रंग यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात गेला नव्हता. या रंगसंगतीचा परिणाम म्हणजे मेवानी आणि मित्रपरिवार. (मेवानी हे नाव केवळ प्रातिनीधीक म्हणुन वापरलं आहे. प्रत्यक्ष्य मेवानी कसा उदय पावला याबद्दल पूर्ण खात्री नाहि). असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
अ
अंतरा आनंद Sun, 01/14/2018 - 04:41 नवीन
केवळ दलीतांच्या अस्मीता डोळ्यात खुपल्या म्हणुन हा तंटा उभा झाला>> असं मी म्ह्टलेलंच नाही. त्यात आपल्या उच्चनीचतेच्या कल्पनांचं बारुद देखील ठासुन भरलय. किंबहुना म्हणुनच ठिणगी पेटवायचा प्रयत्न झाला असावा. >> हे खरं आहे. म्हणूनच आपल्या पातळीवर या कल्पना मोडीत काढायला हव्यात असं म्हणतेय मी. जे तसं करत असतील त्यांना हे लागायचं कारणच नाही. तसं न करता "दलित समाज असाच" असं म्हणं चुकीचं आहे. इतर समाजगट फक्त सामाजीक नकारात्मकडे झुकतोय, पण त्यांच्या तिजोरीला आणि सर्वंकष हितसंबंधांना बाधा येईल असं दिसत नाहि. त्यामानाने दलितांचे सर्वंकष हितसंबंध मजबूत व्हायला एव्हाना जो पाया डेव्हलप व्हायला हवा होता तसा होताना दिसत नाहिए. दलितांच्या संघर्षातुन आग तर निर्माण होतेय लेकीन हंडी नहि पक रही. >>खरं आहे. इतर समाजाच्या तिजोर्६या आहेत. दलित (त्याच बरोबर भटक्या , विमुक्त वैगेरे) समाजाच्य नाहीत म्हणून त्यांची बाजू माध्यमांमध्येही लंगडी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 01/11/2018 - 17:32 नवीन
तेजस यांनी या प्रतिसादात "ज्यांनी कोणी त्यांच्यावर दगडफेक केली त्यांना शोधून शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणलंय.". मी या प्रतिसादात असं म्हणलंय की "दगडफेक ई. करणारे (मग ते कुठल्याही गटाचे असोत) हे समाजकंटक होते/ आहेत.". आता यात प्रॉब्लेम असा आहे की ही दगडफेक ब्राम्हण लोकांनी केली सरळसरळ आरोप केलाय. पण याचे काही पुरावे आहेत का? नुसतीच भिडे गुरुजींना आणि एकबोट्यांना अटक करा म्हणून मागणी करत आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती दगडफेक या दोघांनी किंवा ब्राम्हणांनी केली याचे पुरावे कोणी देत नाही आणि मागतही नाही! आता मी म्हणतोय दगडफेक करणारे समाजकंटक आहेत. लक्षात घ्या मी कुठल्याही जातीधर्माकडे बोट दाखवत नाहीये. जर खरंच ब्राम्हणांनी केली असेल तर ते पण समाजकंटकच आहेत, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण सिद्ध तर करा. व्यक्तीकडे बघून समजतं का त्याची जात कुठली आहे ते? वाढता धार्मिक आंधळेपणा/एकारलेपणा, संधी आणि संपत्तीच्या वाटपातली वाढ्ती असमानता यामुळे प्रत्येक समाजगट नकारात्मकतेकडेच वळतोय. यातून बाहेर पडायला आपले आपणच प्रयत्न केले पाहिजेत. संधी तर सगळ्यांनाच उपलब्ध आहेत, का अजूनही तुम्हाला म्हणायचंय की दलितांना मुद्दाम काही संधी नाकारल्या जात आहेत? म्हणजे पात्रता असूनही केवळ दलित आहेत म्हणून संधी दिली जात नाही अशी उदाहरणं द्या. उना प्रकरणात काय झालं याचं चवीतर्वण नाही पण ती घटना दलितांना भान आणून देणारी ठरली. भान यायला ही घटना घडायची काय गरज होती? यात सुद्धा मारणारे ब्राम्हण होते का? इंडियन एक्सप्रेस मधली ही बातमी वाचा. प्रत्येक घटनेला जातीय रंग द्यायची काय गरज आहे? उद्या मी एखाद्या निरुद्योगी माणसाला पैसे दिले आणि सांगितलं की एका चौकात जा आणि सांग मी xxx संस्थेचा कार्यकर्ता आहे आणि दगडफेक कर. मला त्या माणसाची जात/ धर्म माहित नाही आणि त्या माणसाला फक्त पैसे मिळण्याची कारण. कशाला दगड फेकायचेत, कोणावर फेकायचेत याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. मग बघणारे म्हणतात xxx संस्था जातीय आहे. पण सत्य काय आहे याचा शोध किती जण घेतात? माझं वैयक्तिक मत सांगतो - एखाद्या स्पर्धेत जो स्पर्धक मागे असतो त्याने पुढे जाण्याला महत्व दिलं पाहिजे. बाकी प्रेक्षक काय ओरडत आहेत, आपल्याला स्पर्धेच्या ठिकाणी पोचायला किती त्रास झाला, ऊन आज जरा जास्त आहे ई. ई. मागे ओढणाऱ्या अन्य गोष्टींकडे लक्ष देऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
भ
भंकस बाबा Sat, 01/13/2018 - 14:15 नवीन
बऱ्याच वर्षापुर्वी पाहीलेल्या तमस मालिकेचि आठवण झाली, मी जेव्हा माझ्या दलित, मुस्लिम, ख्रिस्ती मित्रात असतो तेव्हा जातिभेद दिसुन येत नाहीत, वा मी त्यांच्या घरी जातो किंवा ते माझ्याकडे येतात. किंबहुना आम्हाला जात ,धर्म ,पंथ आहे हेच लक्षात येत नाहि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
र
रांचो Sat, 01/06/2018 - 13:00 नवीन
अंतरा आनंद, उत्तम व संतुलीत लेख. खुप दिवसांनी असा सकस लेख वाचला.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 01/06/2018 - 13:18 नवीन
अंतरा आनंद, माझं भाष्य येणेप्रमाणे : १.
आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो.
मी स्वत:स यांतून वगळतो आहे. मी भावनांच्या लाटेवर हेलकावत वगैरे नाही. २.
जातींनी महापुरुष वाटून घेतलेत म्हणणार्‍यांपैकी किती जणं आंबेडकर जयंती साजरी करतात? नाहीपेक्षा ती आपल्या सोसायटीत साजरी व्हावी असं किती जणांना वाटतं?
मला स्वत:ला कुठल्याही माणसाची जयंती बियंती साजरी करायला आवडंत नाही. भयाण कंटाळवाणा प्रकार असतो. मात्र आंबेडकरांनी दिलेली शिकवण आचरणांत असावी म्हणून माझा जमेल तितका प्रयत्न चाललेला असतो. मी भारतात असतो तर असली जयंती अजिबात साजरी केली नसती. हां, पण त्या दिवशी शुभेच्छा आवर्जून पाठवल्या असत्या. शिवाय त्यांनी भारताचं हित कसं पाहिलं यावर यथोचित भाष्य केलं असतं. ३.
"ज्यांच्यामुळे मला प्रमोशन मिळत नाहीय ना त्यांची मिरवणूक आहे" असं उत्तर माझ्या एका कलीगनं दिलं होतं. अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते.
म्हणूनंच आरक्षण रद्द करायला पाहिजे. आंबेडकर फक्त दहा वर्षं ठेवायचं म्हणंत होते ते उगीच नाही. ४.
झाडू-गाडगं नसेलही पण "बाजू हो शिवशील, सावली पडली तर विटाळ होईल" हे उद्गार तरी महारांसाठी निघत होतेच ना? मग त्याचं समर्थन करताय का?
कोणीही समर्थन करत नाहीये. अस्पृश्यतेवर कायद्याने बंदी आहे. असो. हे उद्गार निघायचे कारण की महार मेलेल्या गुरांचं मांस खायचे. नेमक्या याच कारणासाठी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मेलं ढोर खाऊ नका आणि मेलं ढोर ओढू नका. ५.
कोपर्‍यातल्या कपात वरून पडलेला चा पिणारी म्हारीण तर आता आतापर्यंत साहित्याचा भाग होतीच ना. ती काय सर्वस्वी काल्पनिक होती?
असेलही. पण अस्पृश्यता कायद्याने बंद झाली आहे. ६.
पण महारांना किती गावात मानाचं स्थान होतं? इथे आपण किती गावच्या मातीतले आहोत हे दाखवण्याची होड लागलेली असते, त्यांना हे गावाचं वास्तव माहित नाही का?
ज्या अर्थी महार वतन दिलं जायचं त्याअर्थी महारांना व्यवस्थित मान होता. फक्त पराक्रम गाजवायला हवा. जो अनेक महारांनी गाजवला होताही. ७.
आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात.
माझ्या बापाने भले केला असेल अन्याय. म्हणून तुम्ही माझ्यावर केलेला अन्याय मी खपवून घेणार नाही. भले मला कोणी दांभिक म्हंटलं तरी चालेल. ८.
प्रकाश आंबेडकरांची राजकीय ताकद ती काय आणि अशी आंदोलनं ते करतातच कशी काय? असा एक सुज्ञ प्रश्न आहे. म्हणजे? जे निवडून येऊ शकतात त्यांना अशी हिंसक आंदोलनं करण्याचा फुकट परवाना मिळतो? जे निवडून येत नाहीत त्यांची अशी काही बाजू नसतेच? आंबेडकरांनी हिंसक आंदोलन करा असं म्हटलं होतं का? कोणाला जमवलेल्या जमावावर नियंत्रण ठेवता येतं?
च्यायला, एकतर आगी लावायच्या आणि मग बूड जळू लागलं की पेट्रोलच्या नावाने बोंबा ठोकायच्या. जर कोणालाच जमावावर नियंत्रण ठेवता येत नाही तर मग पूज्य संभाजी भिडे यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर खोटेनाटे आरोप का करताहेत? पूज्य भिडे गुरुजी पुण्यांत कुणाच्या तरी अंत्यविधीस गेले होते. भीमा-कोरेगावाचा संबंध आलाच कुठे? प्रकाश आंबेडकर जनतेस मूर्ख समजतात काय? लोकांना ढोंगं बरोब्बर कळतात. ९.
(ठेवता आलं असतं तर बाबरी मशीद पाडली गेली नसती. का ती नियंत्रणाखाली जाणून बुजून घडवलेली घटना होती?)
बाबरी नामे कोणती मशीद तिथे नव्हती. जे पडलं ते जुनं राममंदिर होतं. हिंदूंनी हिंदूंचं देऊळ पाडलं तर कोणासही कसलीही अडचण व्हायला नको. शिवाय प्रस्तुत भीमा-कोरेगाव प्रकरणाचा रामजन्मभूमीशी कसलाही संबंध नाही. १०.
मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्‍या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं.
अगदी बरोबर बोललात पहा. श्रीराम हा राष्ट्रीय पुरुष आहे. त्याच्या जन्मस्थानाबद्दल कुठलीही तडजोड केली जाणार नाही. प्रस्तुत भीमा-कोरेगाव प्रकरणाचा रामजन्मभूमीशी कसलाही संबंध नाही. ११.
मुळात एखाद्या ठिकाणी जमाव मोठ्या संख्येनं येतो त्यावर दगडफेक होते, दुकानं बंद ठेवली जातात, त्यांच्याविरोधात वातावरण तयार केलं जातं, या मूळ मुद्द्यावर कोणीही बोलत नाहीय.
बोलताहेत की. पूज्य संभाजी भिडे यांनी शासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. १२.
’बाबासाहेबांना आम्ही मानतो पण हे आहेत का कोणी तसे?" असं सर्रास म्हणणार्‍या किती जणांमध्ये त्यांच्या त्यांच्या जातीच्या महापुरुषाचे गुण १०% तरी आहेत?
मी महापुरुषांना जातीच्या दृष्टीकोनातून पहात नाही. बाकी गुणांचं म्हणालात तर हिंदूंना धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. पूज्य संभाजी भिडे हेच काम निरलसपणे करताहेत. १३.
१) आरक्षणाच्या कुबड्या घेतलेले हे लोक (२) संस्कार आहेत का यांच्याकडे (३) मी म्हटलं बाकी कोणीही आण नवरा/नवरी म्हणून पण जय भीमवाला/वाली नको बाई (४) अच्छा तू *** आहेस? वाटत नाही हे असे अनेक खडे येता जाता फेकत असतो
म्हणूनंच बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे वागायचं असतं. वागतो का कोणी नेता त्यांच्यासारखा? १४.
हे असे खडे आपल्याकडून भिरकावले जाणार नाही याची प्रत्येकाने वैयक्तिकरित्या दक्षता घेतली तरी हे असे भडके उडण्याला थोडाबहुत आळा बसेल.
साफ चूक. पूज्य संभाजी भिडे कोणाच्याही अध्यातमध्यात नसतांना जितेंद्र आव्हाड आणि प्रकाश आंबेडकर हे गणंग त्यांचा द्वेष करतातच की नाही? १५.
हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते.
मग तुम्ही शिकवला की नाही सुसंस्कृतपणा? का नुसतेच शंका प्रदर्शित करताहात? १६.
( कुंभमेळ्यासाठी दुष्काळातही गोदावरीत पाणी ओतलं तेव्हा ते नाही खटकलं या लोकांना.) हाच मानभावी सुसंस्कृतपणा या मागासवर्गीय शहरी लोकांना पदोपदी भेटत असतो
का म्हणून खटकावं? १७.
आपले आई वडील केवळ जन्माने वरच्या जातीतला म्हणून छोट्या वयाच्या व्यक्तीलाही मान देतात, हात जोडतात (हे आता आता पर्यंत उत्तर, मध्यप्रदेशात होतं की नाही? अजूनही असेल) हे बघताना त्या जातीच्या मुलांना वेदना होत नसतील का?
अशा वेदना होऊ नयेत म्हणूनंच ब्राह्मण सुधारला पाहिजे. १८.
आपल्याला कमी लेखलं जातं हे स्वीकारून आत्मसन्मान कसा जपत असतील ते? पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते.
ब्राह्मण भिक्षुक नाही का भिका मागून जगतात ते? तरी त्यांच्या आत्मसन्मानास धक्का पोहोचंत नाही. कसा काय बरं? काय मत आहे यावर तुमचं? १९.
सवर्णांना चांगलं बोलण, वाचणं बाळकडू घरात मिळालेलं असतं. ५० च्या दशकातल्या बहुसंख्य आरक्षितांना ते मिळालं होतं का? पण उच्चारावरून लिहीण्यावरून , वागण्या बोलण्यातल्या रांगडेपणावरून त्यांना खुसूखुसू हसताना ते हे कुठून शिकतील हे भान असतं का?
म्हणूनंच आंबेडकरांनी दलितांना सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. २०.
मग ज्यांच्या अगदी एखादया पिढीपलीकडल्या पूर्वजांनी भिका मागत पोटं भरली (ज्याला जोदार असं गोंडस नाव दिलं गेलं होतं.) त्यांनी एखादी कुबडी वापरली तर त्यांना चोर म्हणावं वाटतं?
आंबेडकरांनी फक्त दहा वर्षंच आरक्षण ठेवायला सांगितलेलं होतं म्हणून. स्वार्थी नेत्यांनी आंबेडकरांच्या शिकवणुकीस धाब्यावर बसवलं, त्याचा दोष बाकी समाजावर का म्हणून ढकलता? २१.
आता खरंतर भिमा-कोरेगाव प्रकरणीत ग्रामस्थांनी परस्पर सहकार्याची भुमिका घेतल्याच्या बातम्या आहेत. चूक कोणाचीही असो असं पुन्हा होणार नाही अशी भाषा दोन्ही बाजूकडून झाली आणि ते ही कोणत्याही प्रस्थापित राजकारण्यांच्या नाक खुपसण्याला वाव न देता. ही खूप आशेची गोष्ट आहे. कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी.
बरोबर आहे. आहेच मुळी ही आशेची गोष्ट. मात्र इथे जानव्याचा संबंध काय आहे ते कळलं नाही. जानवेधारी लबाड असतात असं सूचित होतं आहे. एकीकडे आशेची गोष्ट म्हणायचं आणि लगेच पुढच्या वाक्यात बकवास ओकायचा. अशाला थोतांड म्हणतात. २२.
या संस्थळावर मात्र शहाण्यांनी विषाचा प्यालाच दाखवत जो काही एकांगी हैदोस घातलाय तो बघता या समाजातलं असल्याची लाज वाटावी.
या समाजात असल्याची लाज वाटंत असेल तर तुम्ही खुशाल वानप्रस्थ स्वीकारा. माझं अनुमोदन आहे. २३.
सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एवढे विष ओकू शकता तर खाजगीत किती विषमय असाल?
तुम्ही कारण नसतांना राममंदिर आणि जानवं ओढून आणलंत. तुम्हीसुद्धा खाजगीत भरपूर विष ओकंत असणार. २४.
शेवटी समाज म्हणून सगळ्यांनाच पुढे जायचय.
राममंदिर व जानवं अशा असंबंधित गोष्टी चर्चेस आणल्याने तुम्हाला पुढे जाण्यात रस नाही, असं माझं मत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ए
एमी Sun, 01/07/2018 - 02:43 नवीन
आंबेडकर फक्त दहा वर्षं ठेवायचं म्हणंत होते ते उगीच नाही. >> फेकू नका! पाप लागतं! 'तो' बघतोय सगळं, हिशेब ठेवतोय! पुढल्या जन्मी ते हे बनाल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सुखीमाणूस Sun, 01/07/2018 - 06:35 नवीन
देव आहे नक्की आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Mon, 01/08/2018 - 03:20 नवीन
टॉन्ट पण कळेना का आता लोकांना :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
ग
गामा पैलवान Sun, 01/07/2018 - 11:13 नवीन
अॅमी, प्रत्यक्ष वाल्मिकी ऋषींच्या कुटुंबियांनी पापाचा वाटा उचलायला नकार दिला होता. पण इथे तर तुमच्यासारखी साक्षात कम्युनिस्ट हिंदूंच्या पापाची काळजी वाहते आहे हे पाहून मला गहिवरून आलं. लगेच खिडकीतून सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना याची खातरजमा केली. असो. प्रकाश आंबेडकरांची मुलाखत आहे. तीत थोरल्या आंबेडकरांना फक्त दहा वर्षं आरक्षण अभिप्रेत होतं हे स्पष्टपणे सूचित होत आहे. : https://www.outlookindia.com/magazine/story/what-if-reservations-had-come-to-an-end-in-1960/224881 आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Sun, 01/07/2018 - 21:25 नवीन
स्वतःच ज्या लिंका चिटकवताय त्यातरी नीट वाचत जा हो... जमलं तर... political reservation आणि reluctantly agreed या शब्दांचा अर्थ काय आहे? === बाकी कॉम्युनिस्ट या (अजूनेका) शिक्कयासाठी आभार _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 01/07/2018 - 23:41 नवीन
अॅमी, तो दुवा तुमच्यासाठी दिला आहे. मी अजिबात वाचणार नाहीये. कारण की थोरले आंबेडकर आरक्षणाच्या विरोधात होते आणि ठेवलंच तर फक्त दहा वर्षांसाठी असावं असं त्यांना अभिप्रेत होतं. हे तथ्य तुम्हाला मान्य का नाही? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Mon, 01/08/2018 - 03:13 नवीन
धन्य आहात _/\_ === बाकीच्यांसाठी, राखीव मतदारसंघ ठेवणे आणि शिक्षण, नोकरीत आरक्षण ठेवणे या दोन भिन्न बाबी आहेत. गापैनी दिलेल्या लिंक मधूनच: In fact, while he advocated a 10-year period for the reservation of constituencies, he wanted reservation in service and colleges to be permanent. --- If those reservations were not put in plave, there would have been a People's War Group in ever Indian state. The oppressed classes would have never found a channel to come into mainstream. What would have been deni to them, they would have taken by force. In fact, I foresee the future generations taking up violence if this madness of privatisation continues. Job opportunities for Dalits are shrinking because of privatisation. Sso 'what-if-there-were-no-reservations-after-independence' is close to becoming a reality. And the way the poor Dalit youths will respond will answer the question what would have happened if there were no reservations in free India. >> याची चुणूक दिसलीच असेल गेल्या काही दिवसात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 01/08/2018 - 09:13 नवीन
अॅमी,
In fact, while he advocated a 10-year period for the reservation of constituencies, he wanted reservation in service and colleges to be permanent.
थोरल्या आंबेडकरांना नोकऱ्या व शिक्षणात कायमस्वरूपी आरक्षण हवं होतं ही प्रकाश आंबेडकरांची लोणकढी थाप आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
श
शलभ Mon, 01/08/2018 - 10:38 नवीन
अभ्यास वाढवा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 01/08/2018 - 18:33 नवीन
शलभ, अभ्यास वाढवायच्या सूचनेबद्दल धन्यवाद. त्यानुसार अभ्यास वाढवला आहे. वाढीव अभ्यासानुसार असं कळलं की थोरले आंबेडकर हयात असतांना सरकारी नोकरी व शिक्षणात आरक्षण नव्हतं. जे काही आरक्षण होतं ते केवळ राजकीय (म्हणजे लोकप्रतिनिधी निवडण्यापुरतं) होतं. सहजिकंच आंबेडकरांनी जे काही भाष्य केलंय त्याचा संबंध केवळ राजकीय आरक्षणाशीच आहे. शैक्षणिक व शासकीय नोकरी क्षेत्रांत आरक्षण १९८२ नंतर सुरू झालं. तेव्हा बाबासाहेब हयात नव्हते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
ए
एमी Mon, 01/08/2018 - 20:24 नवीन
१९०२ शाहू महाराज, कोल्हापूर https://en.m.wikipedia.org/wiki/Reservation_in_India http://indianexpress.com/article/explained/a-short-history-of-quota-story-that-predates-mandal/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 01/09/2018 - 14:04 नवीन
अॅमी, शाहू महाराज घटनापूर्व काळांतले होते. स्वतंत्र भारतात नोकऱ्या व शिक्षणात आरक्षण १९८२ नंतर सुरू झालं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Tue, 01/09/2018 - 23:04 नवीन
म्हणजे घटनापूर्व काळात इंग्रजांनी/काही राजांनी आपापल्या राज्यात शिक्षण, नोकरीत आरक्षण दिलं होतं, मग १९४७ ते १९८२ शून्य आरक्षण होतं आणि १९८२ ला परत ते आरक्षण चालू झालं असं का? तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली? === तुम्ही मअंजावर बरेच जुने आहात, आरक्षणावरच्या बऱ्याच चर्चा वाचल्या असणार, सहभाग घेतला असणार तरी असे काहीतरी बोलताय याचं आश्चर्य वाटतंय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
शलभ Wed, 01/10/2018 - 06:28 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
न
नितिन थत्ते Mon, 01/15/2018 - 17:42 नवीन
आम्ही १९८० मध्ये इंजिनिअरिंगला अ‍ॅडमिशन घेतली तेव्हा ३४ टक्के आरक्षण होते. त्यामुळे १९८२ मध्ये शैक्षणिक आरक्षण सुरू झाले हे अगदीच कैतरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ए
एमी Mon, 01/15/2018 - 22:27 नवीन
त्यामुळे १९८२ मध्ये शैक्षणिक आरक्षण सुरू झाले हे अगदीच कैतरी आहे. >> +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
प
पगला गजोधर Sat, 01/06/2018 - 13:20 नवीन
अंतरा आनंद, उत्तम लेख 1+ ===== Patriotism is the last refuge of a scoundrel. - Samual Johnson What he's calling attention to is that scoundrels, when challenged, will often use false patriotism in order to shut up their opponents. ≠======= नवपेशवाई / पेशवाई 2.0 2017’s Top Fake News Stories Circulated by the Indian Media https://thewire.in/210115/2017s-top-fake-news-stories-circulated-by-the-indian-media/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/06/2018 - 14:53 नवीन
बाकी, चांगले हात धुवून घेतले. छान. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अँड. हरिदास उंबरकर Sat, 01/06/2018 - 16:01 नवीन
एकविसाव्या शतकातील दोन दशकं पूर्ण होत असताना एकूणच राज्याच्या पारंपरिक राजकारणाचे स्वरूप बदलत चालले असून त्यामुळे जातीय, सांप्रदायिक, वांशिक समीकरणे कालबाह्य होत असल्याचा जो समज करून घेतला जात होता, त्या धारणे ला भीमा कोरेगाव घटनेने तडा दिला आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sat, 01/06/2018 - 16:33 नवीन
+१. काही मूर्ख लोकांमुळे संपूर्ण दलित समाज आज दुर्दैवाने इतरांपासून खूप दूर गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अँड. हरिदास उंबरकर
प
पगला गजोधर Sat, 01/06/2018 - 16:42 नवीन
मूर्ख लोकांमुळे संपूर्ण दलित समाज आज दुर्दैवाने इतरांपासून खूप दूर गेला.
खरंय आणि या मूर्ख लोकांनाच मनुस्मृती समर्थक म्हणतात... ज्यांनी दलितांना इतरांपासून खूsssssप दूर, अगदी गावकुसाबाहेर नेऊन ठेवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
सुखीमाणूस Sun, 01/07/2018 - 06:44 नवीन
त्या भूतकाळातून आता कोणी गावकुसाबाहेर नाहीये आणि कायद्याने दलिताना पुर्ण रक्षण पुरवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ग
गामा पैलवान Mon, 01/08/2018 - 18:44 नवीन
प.ग., तथ्यांमध्ये किटाळ शोधायचं तुमचं कसब अपरंपार आहे. इंग्रजीत यांस assuming evidence in fact म्हणतात. गूगल करू नका. काही सापडणार नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
आ
आनन्दा Sat, 01/06/2018 - 16:32 नवीन
बहुधा इथे झलेल्या बर्‍याचश्या चर्चा या "दलित समाज कसा वाईट आहे" यावर नसून दलित समाजाला त्याचे नेते कसे वापरून घेतायत यावर बरीचशी चर्चा झाली. तसेच मूळ इतिहास नेमका काय आहे यावर देखील बरीचशी चर्चा झाली होती. त्यातून तुम्ही नेमके सेलेक्टिव्ह रीडिंग करून मोती वेचलेत. असो. अम्ही काय समजवणार? परंतु दलितांचे मुसलमानांसारखे होऊ नये अशी इच्छा आहे म्हणून बोलावे लागतेय. सो कोल्ड दलित असलेले माझे अनेक मित्र आहेत, पण ते आत्ता काय विचार करत असतील हे त्यांना विचारायची पण हिंमत होत नाहीये. जातीयवादाचे भूत, विशेषतः जाती जातींमध्ये भांडणे लावण्याचे प्रयत्न भारतात बरेच होत आहेत, यामागे एक मोठा राजकीय अजेंडा आहे, ते प्रयत्न दुर्दैवाने यशस्वी होऊ नयेत एव्हढीच इच्छा. मोदी विरोधक असण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण सामाजिक एकता विरोधक असण्याचा आणि एखाद्या जातीविरुद्ध गरळ ओकण्याचा अधिकार नाही (म्हणजे नसावा, बाकी बोलायचेच असेल अभिव्यक्तीस्वतंत्र्य आहेच.). किमान एकांगी विचार टाळावेत एव्हढीच इच्छा...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा