ताज्या घडामोडी - भाग २०
आजतक व एबीपी न्यूज या दोन वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या नवीन मतदार सर्वेक्षणाचे अंदाज आज जाहीर केले.
१) आजतक - कार्वी सर्वेक्षण
हे सर्वेक्षण ३० डिसेंबर २०१७ ते १० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ४०% मतांसहीत एकूण ३०९ जागा मिळतील तर संपुआला २७% मतांसहीत एकूण १०२ जागा मिळतील. या सर्वेक्षणात शिवसेना रालोआत आहे असे गृहित धरलेले आहे व संजदचा देखील रालोआत समावेश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे.
जर संपुआत तॄणमूल काँग्रेस, सप व बसप सामील झाले तर संपुआच्या मतांची टक्केवारी ३८% पर्यंत जाऊन एकूण जागा २०२ मिळू शकतील, तर या परिस्थितीत रालोआला २५८ जागा मिळू शकतील.
म्हणजे रालोआ वजा शिवसेना आणि संपुआ अधिक तृणमूल अधिक सप अधिक बसप अशी निवडणुक झाली तर संपुआ रालोआपेक्षा जास्त जागा मिळवू शकेल.
https://www.indiatoday.in/india/story/india-today-mood-of-the-nation-poll-is-narendra-modi-still-india-s-first-choice-as-pm-1154288-2018-01-25
२) एबीपी न्यूज - सीएसडीएस सर्वेक्षण
हे सर्वेक्षण ७ जानेवारी २०१८ ते २० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ३४% मतांसहीत एकूण ३०१ जागा मिळतील तर संपुआला २५% मतांसहीत एकूण १२७ जागा मिळतील. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे.
http://www.abplive.in/india-news/nda-to-win-293-309-seats-if-general-elections-were-held-today-abp-news-csds-survey-639813-639813?rs_type=internal&rs_origin=section&rs_medium=article&rs_index=4
"३ आमदार असून विरोधी पक्षनेतेपद दिले का नाही? "नाही