ताज्या घडामोडी - भाग २०
आजतक व एबीपी न्यूज या दोन वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या नवीन मतदार सर्वेक्षणाचे अंदाज आज जाहीर केले.
१) आजतक - कार्वी सर्वेक्षण
हे सर्वेक्षण ३० डिसेंबर २०१७ ते १० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ४०% मतांसहीत एकूण ३०९ जागा मिळतील तर संपुआला २७% मतांसहीत एकूण १०२ जागा मिळतील. या सर्वेक्षणात शिवसेना रालोआत आहे असे गृहित धरलेले आहे व संजदचा देखील रालोआत समावेश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे.
जर संपुआत तॄणमूल काँग्रेस, सप व बसप सामील झाले तर संपुआच्या मतांची टक्केवारी ३८% पर्यंत जाऊन एकूण जागा २०२ मिळू शकतील, तर या परिस्थितीत रालोआला २५८ जागा मिळू शकतील.
म्हणजे रालोआ वजा शिवसेना आणि संपुआ अधिक तृणमूल अधिक सप अधिक बसप अशी निवडणुक झाली तर संपुआ रालोआपेक्षा जास्त जागा मिळवू शकेल.
https://www.indiatoday.in/india/story/india-today-mood-of-the-nation-poll-is-narendra-modi-still-india-s-first-choice-as-pm-1154288-2018-01-25
२) एबीपी न्यूज - सीएसडीएस सर्वेक्षण
हे सर्वेक्षण ७ जानेवारी २०१८ ते २० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ३४% मतांसहीत एकूण ३०१ जागा मिळतील तर संपुआला २५% मतांसहीत एकूण १२७ जागा मिळतील. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे.
http://www.abplive.in/india-news/nda-to-win-293-309-seats-if-general-elections-were-held-today-abp-news-csds-survey-639813-639813?rs_type=internal&rs_origin=section&rs_medium=article&rs_index=4
देशातील जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास कमी झाल्याचं 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'च्या रँकिंग आणि गुणसंख्येवरून दिसून येतं. दावोसमध्ये जारी करण्यात आलेल्या 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'मध्ये भारताचं यंदाचं रँकिंग आणि गुणसंख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात घसरली आहे. गेल्या वर्षी भारत रँकींगमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, यावर्षी तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.'मटा'चा मूर्खपणा दिवसेंदिवस वृद्धिंगत होताना दिसतोय. एडेलमॅन या विदेशी कंपनीने केलेले हे सर्वक्षण राजकीय नसून वेगवेगळ्या देशातील सरकार, माध्यमे व असरकारी संस्था यांच्यावर जनतेचा किती विश्वास आहे याचे सर्वेक्षण आहे. हे प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन केलेले सर्वेक्षण नसून ऑनलाईन सर्वेक्षण असल्याने या सर्वेक्षणाला प्रतिसाद देणारे एका ठराविक वर्गातील आहेत. 'मटा'च्या बातमीचे शीर्षक आहे 'जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला!'. मुळात सर्वसामान्य जनता या सर्वेक्षणात सहभागीच नाही, हे राजकीय सर्वेक्षण नाही आणि सरकारबरोबरच माध्यमे व असरकारी संस्था यांची विश्वासार्हता सुद्धा तपासण्यात आली आहे. तरीसुद्धा 'जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला!' असा दिशाभूल करणारा, असत्य व सनसनाटी मथळा देऊन 'मटा'ने स्वतःचे हसू करून घेतले आहे. मागील वर्षी असलेल्या ७२ व्या क्रमांकावरून ६८ वर येणे म्हणजे जनतेचा विश्वास उडाला असे म्हणणे म्हणजे मागील परीक्षेतील गुणांच्या तुलनेत या परीक्षेत एका विषयात ४ गुण कमी मिळाल्यानंतर विद्यार्थी संपूर्ण परीक्षेत अनुत्तीर्ण झाला असे म्हणण्यासारखे आहे. याच बातमीत लिहिले आहे की 'जीएसटी आणि नोटाबंदीसारख्या कठोर आर्थिक सुधारणांनंतर 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'नं दिलेलं रँकिंग सरकारसाठी आशादायी आहे, असं मानलं जात आहे.'. एकीकडे म्हणतात की 'जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला' आणि दुसरीकडे म्हणतात कठोर आर्थिक सुधारणांनंतर सुद्धा मिळालेला क्रमांक सरकारसाठी आशादायी आहे. म्हणजे एका विषयात ४ गुण कमी मिळाल्यानंतर विद्यार्थी संपूर्ण परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याची दवंडी पिटायची आणि दुसरीकडे म्हणायचं की प्रश्नपत्रिका खूप अवघड असूनसुद्धा इतके गुण मिळणे विद्यार्थ्यासाठी आशादायी आहे. 'मटा'ला लाज वाटायला हवी. मोदीद्वेषाची परिसीमा होत आहे. केतकरांनी ९० च्या दशकाच्या उत्तरार्धात 'मटा'चे संपादक झाल्यानंतर त्याचा 'सोटा' (सोनिया टाइम्स) करून त्याचे खांग्रेसचे मुखपत्र बनविले होते व वृत्तपत्राची विश्वासार्हता पूर्ण रसातळाला नेली होती. आता नवीन आलेले विजय चोरमारे त्यांच्या एक पाऊल पुढे आहेत. सातत्याने मोदींविरोधी असत्य बातम्या छापणे, 'सामना'च्या अग्रलेखाचा कचरा छापणे असले फालतू प्रकार बंद होतील तो सुदिन.ही दमछाक नाहीतर काय आहे ?दमछाक वगैरे झाली का ते सांगता येणार नाही. परंतु वाटेल ते बेलगाम आरोप करणारा नबाब मलिक, आपल्या पप्पांची व चुलतभावाची कारकीर्द विसरणार्या सुळेवहिनी, बेताल धनंजय मुंडे इ. ना मात्र या आत्महत्येमुळे आनंदाच्या उकळ्या फुटल्या हे नक्की.सरकार कोणाचे का असेना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, या मताचा मी आहे.या मुद्द्यावर पूर्ण सहमत.