ताज्या घडामोडी - भाग २०
आजतक व एबीपी न्यूज या दोन वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या नवीन मतदार सर्वेक्षणाचे अंदाज आज जाहीर केले.
१) आजतक - कार्वी सर्वेक्षण
हे सर्वेक्षण ३० डिसेंबर २०१७ ते १० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ४०% मतांसहीत एकूण ३०९ जागा मिळतील तर संपुआला २७% मतांसहीत एकूण १०२ जागा मिळतील. या सर्वेक्षणात शिवसेना रालोआत आहे असे गृहित धरलेले आहे व संजदचा देखील रालोआत समावेश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे.
जर संपुआत तॄणमूल काँग्रेस, सप व बसप सामील झाले तर संपुआच्या मतांची टक्केवारी ३८% पर्यंत जाऊन एकूण जागा २०२ मिळू शकतील, तर या परिस्थितीत रालोआला २५८ जागा मिळू शकतील.
म्हणजे रालोआ वजा शिवसेना आणि संपुआ अधिक तृणमूल अधिक सप अधिक बसप अशी निवडणुक झाली तर संपुआ रालोआपेक्षा जास्त जागा मिळवू शकेल.
https://www.indiatoday.in/india/story/india-today-mood-of-the-nation-poll-is-narendra-modi-still-india-s-first-choice-as-pm-1154288-2018-01-25
२) एबीपी न्यूज - सीएसडीएस सर्वेक्षण
हे सर्वेक्षण ७ जानेवारी २०१८ ते २० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ३४% मतांसहीत एकूण ३०१ जागा मिळतील तर संपुआला २५% मतांसहीत एकूण १२७ जागा मिळतील. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे.
http://www.abplive.in/india-news/nda-to-win-293-309-seats-if-general-elections-were-held-today-abp-news-csds-survey-639813-639813?rs_type=internal&rs_origin=section&rs_medium=article&rs_index=4
गोलपोस्ट शिफ्टींग - मिपा हे संस्थळ संपादक पद देताना स्त्री पुरुष असा भेद करत नसावे म्हणजे पैसा किमान काही काळ संपादक होत्या असे आठवते. अनाहिता सारखा पुरुषांना वेगळा कोनाडा असावयास माझी हरकत नाही. पण कॉमन मिसळपाव वर संपादक पदा साठी मिपा मालकांनी स्त्री - पुरुषांना समान संधी दिल्या आहेत त्याचा आदर वाटतो. संघाने हा चांगला गूण मिपा मालकांकडूण घेऊन पैसा ताईनां सरसंघचालक केल्यास आम्ही संघ आणि पै ताईंचे अभिनंदन करण्यास अग्रभागी असू : )हद्द झाली. दुर्दैवाने तुम्हाला अजूनही समजत नाहीय्ये (किंवा समजत नसल्याचा आव आणताय). मिपा हे संयुक्त संस्थळ आहे. त्यामुळे या संस्थळाचा संपादक स्त्री किंवा पुरूष असा कोणीही असू शकतो. अनाहिता हा फक्त महिलांसाठी असलेला वेगळा गट आहे. मुख्य संस्थळ संयुक्त असले तरी हा गट फक्त महिलांसाठीच आहे. या गटासाठी पुरूष संपादक असण्याचा आग्रह वेडगळपणाचा होईल. संघाचे तसेच आहे. संघाच्या अनेक संघटनांपैकी संघ ही फक्त पुरूषांसाठी असलेली, राष्ट्रसेविका समिती ही फक्त महिलांसाठी असलेली व अभाविपसारखी संयुक्त संघटना आहे. हे अनेकवेळा सांगूनही का समजत नाही?क्रिडा वेग वेगळ्या टिम्स बंद करण्यासाठी नव्हे पण एकत्रित टिम आणि एकत्रित खेळ टेनिस बॅटमींटन प्रमाने असावेत . धावण्याच्या किंवा इतर क्रिडा शर्यतीत किती पुरुष स्त्रीयांपेक्षा अधिक चांगले पळू शकतात आणि किती स्त्रीया किती पुरुषां ना मात देऊ शकतात हे पहाणे रोचक आणि स्त्रीयांची प्रगती मानवी उत्क्रांतीस सबळ करणारी ठरेल.धावण्याच्या स्पर्धेतील पुरूषांचे व स्त्रियांचे टाईमिंग पहा. अनेक पुरूष खेळाडूंनी १० सेकंदांपेक्षा कमी वेळात १०० मीटर धावण्याची शर्यत पूर्ण केली आहे. पुरूषांची विक्र्मी वेळ ९.५८ सेकंद आहे तर महिलांची सर्वोत्तम वेळ १०.४९ सेकंद आहे. जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीतील जवळपास सर्व ८ पुरूष खेळाडू १०.४९ सेकंदांपेक्षा कमी वेळात शर्यत पूर्ण करतात. अशी शर्यत संयुक्त घेतली तर महिलांना एकही पदक न मिळण्याची शक्यता आहे. इतर अंतरांच्या धावण्याच्या/पोहण्याच्या शर्यतीत असेच चित्र दिसते. काही क्रीडाप्रकार संयुक्त न खेळविले जाता वेगळे खेळविले जाणेच योग्य असते.ताप कुणाला कशाला होतोय ;)) - असा ताप होण्याचे कोणत्याच बाऊस काही कारण नाही खरे तर- स्त्रीयांना ही अशा पदांमध्ये उत्साह असता तर त्यांना ताप झाला असता पण असा ताप करुन घेण्या पेक्षा बहुतेक सुज्ञ लोक सघंटना पंथ आणि धर्मापासून दुरावतात अशा दुरावण्याने नुक्सान कुणाचे होते ? विषमता राबवल्याचा पश्चाताप कुणास व्हावयास हवा ? बाकी कुणाला किती लक्षात येते आहे किंवा नाही हे पहाणे मी माझ्या बाजूने बापड्या वाचकांवर सोडतो. :)परत तेच!असे का ? याला काहीही तार्कीक आधार नाही :). जेनेटिकली संघटना कौशल्यात केवळ पुरुष सुपीरियर असतात कि संघाला द्यावयाच्या बौद्धिकांसाठी जेनेटिकली केवळ पुरुष सुपीरियर असतात ? याचे उत्तर अद्याप आलेले नाही . आणि बहुतेक येणारही नाही तेव्हा असो.परत तेच! सांगून कंटाळा आला आता.