Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग २०

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/25/2018 - 18:08
🗣 217 प्रतिसाद
आजतक व एबीपी न्यूज या दोन वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या नवीन मतदार सर्वेक्षणाचे अंदाज आज जाहीर केले. १) आजतक - कार्वी सर्वेक्षण हे सर्वेक्षण ३० डिसेंबर २०१७ ते १० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ४०% मतांसहीत एकूण ३०९ जागा मिळतील तर संपुआला २७% मतांसहीत एकूण १०२ जागा मिळतील. या सर्वेक्षणात शिवसेना रालोआत आहे असे गृहित धरलेले आहे व संजदचा देखील रालोआत समावेश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे. जर संपुआत तॄणमूल काँग्रेस, सप व बसप सामील झाले तर संपुआच्या मतांची टक्केवारी ३८% पर्यंत जाऊन एकूण जागा २०२ मिळू शकतील, तर या परिस्थितीत रालोआला २५८ जागा मिळू शकतील. म्हणजे रालोआ वजा शिवसेना आणि संपुआ अधिक तृणमूल अधिक सप अधिक बसप अशी निवडणुक झाली तर संपुआ रालोआपेक्षा जास्त जागा मिळवू शकेल. https://www.indiatoday.in/india/story/india-today-mood-of-the-nation-poll-is-narendra-modi-still-india-s-first-choice-as-pm-1154288-2018-01-25 २) एबीपी न्यूज - सीएसडीएस सर्वेक्षण हे सर्वेक्षण ७ जानेवारी २०१८ ते २० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ३४% मतांसहीत एकूण ३०१ जागा मिळतील तर संपुआला २५% मतांसहीत एकूण १२७ जागा मिळतील. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे. http://www.abplive.in/india-news/nda-to-win-293-309-seats-if-general-elections-were-held-today-abp-news-csds-survey-639813-639813?rs_type=internal&rs_origin=section&rs_medium=article&rs_index=4

प्रतिक्रिया द्या
43001 वाचन

💬 प्रतिसाद (217)
म
माहितगार Wed, 01/31/2018 - 08:29 नवीन
ईनाडू वृत्तसंस्थेची Published 21-Jan-2018 22:57 IST | Updated 22:59 IST एक हेडलाईन
म्हणून, पालकांनी विवाहित शिक्षकांकडेच मुलीला शिकवणीसाठी पाठवावे - शरद पवार
वरील प्रमाणे आहे . बातमीतून याचा नेमका काँटेक्स्ट समजला नाही. शरद पवारांसारख्या 'पुरोगामी' वक्त्याच्या तोंडी असे वाक्य असलेली निव्वळ हेडलाईन प्रश्न चिन्ह / साशंकता निर्माण करते .
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 01/31/2018 - 08:37 नवीन
ओके चेष्टेनी केलेल्या वाक्याची हेडलाईन करायची आणि चेष्टेने म्हटले आहे हे नमूदही करयचे नाही हे आजकलच्या पत्रकारांचे वाग्णे विचीत्र आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
श्रीगुरुजी Wed, 01/31/2018 - 08:39 नवीन
कॉंटेक्स्ट पूर्ण वेगळा आहे. आ ह साळुंख्यांची पत्नी त्यांची पूर्वाश्रमीची विद्यार्थिनी होती. त्यामुळे आपल्या मुलीला शिकवणीसाठी अविवाहीत शिक्षकांकडे पाठवू नका असे त्यांनी गंमतीने सांगितले. बादवे, पवार 'पुरोगामी' आहेत हा गैरसमज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Wed, 01/31/2018 - 08:58 नवीन
कोणते गामी आहेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 01/31/2018 - 15:07 नवीन
प्रतिगामी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गॅरी ट्रुमन Wed, 01/31/2018 - 17:46 नवीन
कोणते गामी आहेत ?
पुरोगामी म्हणजे नक्की कोण याची व्याख्या काय यावर बरेच काही अवलंबून असेल. गोपाळराव आगरकर इत्यादींच्या पंगतीतले खरोखरचे पुरोगामी या भूतलावर आता अस्तित्वात नाहीत. आणि सध्या ज्यांना पुरोगामी म्हटले जाते ते एक नंबरचे लुच्चे, लबाड, लफंगे असतात. तेव्हा सध्याचा पुरोगामी शब्दाचा अर्थ घ्यायचा असेल तर पवार पुरोगामींचे सरताज आहेत. पण जुना अर्थ घ्यायचा असेल तर ते पुरोगामी नक्कीच नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
श्रीगुरुजी Wed, 01/31/2018 - 13:15 नवीन

RSS idea aimed at dis-empowering women. Does anyone know many leadership positions are with women in RSS? Zero. If you see pix of Mahatma Gandhi you'll find women on this side (right), this side (left) but if you see pix of Mohan Bhagwat, he'll be alone or surrounded by men: RG pic.twitter.com/52xSDReDLc

— ANI (@ANI) January 31, 2018
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 01/31/2018 - 13:31 नवीन
And they were saying after Gujrat election that he has grown up and became mature.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
माहितगार Wed, 01/31/2018 - 13:57 नवीन
हे विनोदी आहे खरे , खास करून काँग्रेस वर्कींग कमिटी मध्ये त्यांची माता वगळता एकच स्त्री सदस्य आहे. काँग्रेस सारख्या पुरोगामी पक्षात घराणेशाही ची गच्छंती होऊन ५० % स्त्रीया आणि ५० खासदार स्त्रीया एवढी प्रगती आता पर्यंत होण्यास हरकत नव्हती . पण त्याच वेळी काँग्रेसची मर्यादा म्हणजे संघाचे भूषण होऊ शकत नाही. संघात आणि शंकराचार्य पदावर स्त्री आणि सर्व जातीत जन्मलेल्यांना समान संधीची गरज नक्कीच असावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बिटाकाका Wed, 01/31/2018 - 14:08 नवीन
मला तर आपलेही बोलणे तितकेच विनोदी वाटत आहे (कि तुम्हाला वरच्या टिवटिवाटातील विनोदच कळला नाही?). आरएसएस हि स्वयंसेवकांची पुरुष आघाडी आहे तर आरएसएसची स्त्री आघाडी राष्ट्रीय सेविका समिती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे तो वरचा टिवटिवाट विनोदापेक्षा वेगळं काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Wed, 01/31/2018 - 14:57 नवीन
दुसर्‍यांकडे बोट नक्कीच दाखवा तीन बोटे आपल्याकडे निर्देश करतात हा विनोद वाटत असेल तर ठिकच आहे. स्त्री - पुरुश समानते पासून संघ दूर आहे हे आपण का नाकारत आहोत ? स्त्री पुरुषांच्या शाखा एकत्र होतात का ? सघ आणि संघ परिवारातिल सर्व पदे स्त्रीयांना समान संधी साठी खुली आहेत का ? सामाजिक आणि सांस्कृतिक जिवनात स्त्री -पुरुष समानतेसाठी संघाचे नेमके योगदान कोण कोणते खासकरून शंकराचार्य पद स्त्री आणि ब्राह्मणेतर जन्मियांना संधी मिळावी म्हणून संघाने नेमकी कोणती सकारात्मक पावले उचलली ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
श्रीगुरुजी Wed, 01/31/2018 - 15:06 नवीन
आधी काही काळ संघात व्यतीत करा, संघ समजून घ्या आणि नंतर बोलता येईल. पोहणे काय आहे हे काठावर उभे राहून नाही शिकता येत. त्यासाठी पाण्यात उतरावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Wed, 01/31/2018 - 15:45 नवीन
:) इथे व्यक्तिलक्ष्य तर्कदोष आणि गोल पोस्ट शिफ्टींगचा प्रयत्न तर्कदोष येतो. पहिले आपण काँग्रेस कम्यूनीस्ट रिपब्लीकन, तृणमुळ द्रविड मुन्नेत्र मुस्लिम लीग अशा वेगवेगळ्या पक्षात किती काळ घालवला आहे माहित नाही. दुसरे समोरच्या मिपाकर व्यक्तिस संघाची जवळून माहिती नाही असे आपण गृहीत धरता आहात हे ठिक पण विरोधकां ना कच्चे दाखवणे आणि समजणे यात फरक असतो. राहुल गांधी ( घराणेशाहीवर काडिचे प्रेम नाही माझे) सध्या व्यवस्थीत अभ्यास करुन भरवले जाताहेत . उणीवा झाकण्यापेक्षा मान्य करणे आणि काळाच्या ओघात होण्याची अपेक्षा करणे अधिक श्रेयस्कर असते नाही तर दुध किती डोळे झाकुन पिले तरी समोरच्यांना समजतेच. स्त्री सरसंघचालक , स्त्री शंकराचार्य, आणि स्त्रीयांच्या बाजूच्या सामाजिक सुधारणात सरसंघचालकाम्चा सक्रीय पुढाकार कधी पहाण्यास मिळणार हा रोखथोक आणि रास्त प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 01/31/2018 - 16:07 नवीन
आपणास संघाची माहिती असती तर असे प्रश्न पडलेच नसते. मनुस्मृती प्रमाणेच शंकराचार्य ही कालबाह्य संस्था आहे़. त्यावर संघाचे नियंत्रण नाही. डॉ. ख-यांचे प्रतिसाद नीट वाचल्यास उलगडा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Wed, 01/31/2018 - 16:24 नवीन
म्हणायला तसे एकमेकांच्या दृष्टीने काँग्रेस , कम्यूनीस्ट , संघ लीग सगळ्याच कालबाह्य संस्था असतीलही. त्या प्रत्यक्षात नामशेष होतील तेव्हा होतील सध्या आहेत तो पर्यंत स्त्रीयांना समान संधी का असू नयेत . खास करून तुम्ही (म्हणजे संघ) ज्या संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करण्याची भाषा करतो त्या संस्कृतीत स्त्री देवता होण्यास पात्र असू शकते तर सरसंघचालक होण्यास पात्र होऊन आता पर्यंत किमान अर्ध्या किंवा जास्तही सरसंघचालकांची यादीतील नावे स्त्रीयांची असावयास नको होती किंवा कसे . तुम्ही (म्हणजे संघ) जेव्हा सांस्कृतीक प्रतिनिधीत्वाची भाषा करता तेव्हा अप्रत्यक्षपणे जबाबदारी नेतृत्वाची असते नेतृत्वाकेडे समन्याय समसंधी दृष्टी असणे , आपल्यातील (संस्कृतीतील ) चांगल्याचे भूषण बाळगताना आपल्या लोकांना अयोग्या पासून दूर रहाण्यास सांगण्याची जबाबदारी नेतृत्वावर असते की नाही, अशी नैतीक जबाबदारी संघ या संघटनेवर नाही / नव्हती हे दिशाभूल करणारे आणि कातडी बचावू नाही किंवा कसे . या बाबतीत स्वा. सावरकरांच्या बाबतीत टिकेस संधी कमी मिळते समाजसुधारणे बाबत सावरकर सक्रीय पुढाकारात दिसतात . तसे संघाचे नेतृत्व सक्रीय पुढाकारात दिसते का ? बाबा आढावांनी एग गाव एक पाणवठाचे आंदोलन केले की सरसंघचालक त्यांच्या मांडीला मांडीलावून चला मी येतो तुमच्या सोबत असे म्हणाले का किंवा अशा कोणत्याही सामाजिक सुधारणा चळवळीत चला आम्ही येतो तुमच्या सोबत ही सकारात्मक कमी तर पडत नाही ना हा चिंतनाचा विषय असावा. डॉ. खर्‍यांना माझा समतोल संपल्या सारखे वाटले कदाचित आपणासही तसे वाटेल पण योग्य जागी टिका करणारा मिपा टिकाकारांचे विचारावर चिंतन करावे की करू नये हा निर्णय ज्याचा त्याचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 01/31/2018 - 18:21 नवीन
>>> खास करून तुम्ही (म्हणजे संघ) ज्या संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करण्याची भाषा करतो त्या संस्कृतीत स्त्री देवता होण्यास पात्र असू शकते तर सरसंघचालक होण्यास पात्र होऊन आता पर्यंत किमान अर्ध्या किंवा जास्तही सरसंघचालकांची यादीतील नावे स्त्रीयांची असावयास नको होती किंवा कसे . सरसंघचालक ज्या संघटनेचे प्रमुख आहेत ती मिश्र संघटना नसून फक्त पुरूषांची संघटना आहे. महिलांसाठी वेगळी राष्ट्रसेविका समिती आहे. ज्याप्रमाणे पुरूष व महिलांचे क्रिकेट संघ वेगळे आहेत तशाच या संघटना आहेत. >>> तुम्ही (म्हणजे संघ) जेव्हा सांस्कृतीक प्रतिनिधीत्वाची भाषा करता तेव्हा अप्रत्यक्षपणे जबाबदारी नेतृत्वाची असते नेतृत्वाकेडे समन्याय समसंधी दृष्टी असणे , आपल्यातील (संस्कृतीतील ) चांगल्याचे भूषण बाळगताना आपल्या लोकांना अयोग्या पासून दूर रहाण्यास सांगण्याची जबाबदारी नेतृत्वावर असते की नाही, अशी नैतीक जबाबदारी संघ या संघटनेवर नाही / नव्हती हे दिशाभूल करणारे आणि कातडी बचावू नाही किंवा कसे . या बाबतीत स्वा. सावरकरांच्या बाबतीत टिकेस संधी कमी मिळते समाजसुधारणे बाबत सावरकर सक्रीय पुढाकारात दिसतात . तसे संघाचे नेतृत्व सक्रीय पुढाकारात दिसते का ? हे काय लिहिलंय ते समजलंच नाही. एकच सांगू शकतो की संघ आपल्या कामांची जाहिरातबाजी करीत नाही. >>> बाबा आढावांनी एग गाव एक पाणवठाचे आंदोलन केले की सरसंघचालक त्यांच्या मांडीला मांडीलावून चला मी येतो तुमच्या सोबत असे म्हणाले का किंवा अशा कोणत्याही सामाजिक सुधारणा चळवळीत चला आम्ही येतो तुमच्या सोबत ही सकारात्मक कमी तर पडत नाही ना हा चिंतनाचा विषय असावा. संघात कधीही अस्पृश्यता पाळली जात नाही. त्यामुळे असल्या दिखाऊ कार्यक्रमात जाण्याची संघाला गरज पडली नाही. समजा संघवाले तिथे गेले असते तर आढावांनी पाल अंगावर पडल्यासारखे त्यांना झटकले असते कारण हिंदुत्ववादी हे समाजवाद्यांच्या दृष्टीने अस्पृश्य आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
त
तेजस आठवले Wed, 01/31/2018 - 17:31 नवीन
एखाद्या स्त्रीने शंकराचायांचे पद भूषवावे ह्यासाठी सरसंघचालक काय करणार ? ह्या दोन संस्थांचा-पदांचा एकमेकांशी संबंध काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
सुबोध खरे Wed, 01/31/2018 - 15:43 नवीन
माहितगार साहेब रा स्व संघ आणि त्यांची स्त्री आघाडी "राष्ट्रसेविका समिती" आहे मग त्या साठी रा स्व संघात महिलांना कशाला पद हवंय. ज्यांना काम करायचंय त्या स्त्रिया "समितीत" काम करतीलच कि. हि संस्था "स्वयंसेवकांची" आहे "पदाधिकाऱ्यांची" नाही. बाकी रा स्व संघातील सर्व "पदे" हि केवळ प्रशासनिक सोयीसाठी आहेत. आणि यातील बहुसंख्य माणसे आयुष्यभर कार्यकर्ते म्हणून खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घालून निरलस पणे २४ तास कार्यरत राहूनच मोठी झालेली आहेत. रा स्व संघात "घराणेशाही" नाही. त्यातील कोणीही "युवराज" नाही किंवा आजोबाच्या, काकाच्या किंवा बाप कमाईवर मोठे झालेले नाही. एकही सरसंघचालक आपल्या बापाच्या पुण्याईवर "वर चढलेला" नाही. एवढे आपण समजून घेतले तरी पुष्कळ होईल. अन्यथा विविध ठिकाणी चालू असलेली घराणेशाही(मुंबई,बारामती, नांदेड,,उ. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश पासून दिल्ली पर्यंत) दिसते आहेच आणि या सर्व घराण्यातील युवराजांची एकंदर बौद्धिक आणि वैचारिक पातळी सुद्धा दिसून येतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Wed, 01/31/2018 - 15:47 नवीन
.....रा स्व संघात महिलांना कशाला पद हवंय
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! असमानता लपवूनही लपत नाही. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 01/31/2018 - 15:52 नवीन
असमानता लपवूनही लपत नाही. :)) स्त्री पुरुष समान आहेत याचा अर्थ असा नव्हे कि स्त्रियांनी पण काश्मीरमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तंबूत राहून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. त्या आदिवासी क्षेत्रात स्त्रियांना शिक्षण देणे कुटुंब नियोजनाबद्दल माहिती देणे इ कामे करीत असतील तर ती कामे पण पुरुषांनीच करायला हवीत जाऊ द्या. तुम्ही एकांगी (चष्मा लावून) विचार करीत आहात. तेंव्हा तुम्हाला समजावणे माझ्या मर्यादित बुद्धीच्या पलीकडचे आहे. क्षमस्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
सुबोध खरे Wed, 01/31/2018 - 15:58 नवीन
माझ्या पूर्ण प्रतिसादातील तेवढीच ओळ तुम्ही शोधून काढून जितं मया म्हणत आहात. बाकी पुरोगामी आपटार्ड डावे इ करतात तसाच छिद्रान्वेष करून मुद्द्याला बगल देऊन दाखवलीत ठीक आहे तुमचंच खरं. मला तुम्ही समतोल आहात असे वाटत होते. हा हन्त असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
माहितगार Wed, 01/31/2018 - 16:07 नवीन
area of improvement is area of improvement and that it is !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
माहितगार Wed, 01/31/2018 - 16:04 नवीन
स्त्री पुरुष समान आहेत याचा अर्थ असा नव्हे कि स्त्रियांनी पण काश्मीरमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तंबूत राहून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे.
धर्म संस्कृतीच्या गप्पा करता त्यात स्त्रीला देवता होण्याचा मान काय कोनाड्यात बसवून ठेवण्यासाठी दिला जातो ? काश्मिरात स्त्रीयांनी काम न करण्यासारखे काय आहे ? संघीष्ट विचारप्रणाली या बाबतीत खर्‍या समतेच्या धर्माला पारखी झालेली आहे ह्या आक्षेपात तथ्य असावे आणि समता सिद्ध करण्यासाठी स्त्रीयांप्रती असलेले असामातचे लपवलेले अ‍ॅटीट्यूड मधून बाहेर पडण्यासाठी सरसंघचालकपद आणि शंकराचार्य पद स्त्रीयांना मिळावयास हवेच . ( मी इतर धर्मीय संघटनांसाठीही हाच आग्रह मांडेन) स्त्री देवता असू शकते तर सरसंघचालक किंवा शंकराचार्य का असू शकत नाही ? इथे म.गांधी प्रणित काँग्रेस वैचारीक दृष्ट्या पुढे दिसते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Wed, 01/31/2018 - 16:09 नवीन
>>> संघीष्ट विचारप्रणाली या बाबतीत खर्‍या समतेच्या धर्माला पारखी झालेली आहे ह्या आक्षेपात तथ्य असावे आणि समता सिद्ध करण्यासाठी स्त्रीयांप्रती असलेले असामातचे लपवलेले अ‍ॅटीट्यूड मधून बाहेर पडण्यासाठी सरसंघचालकपद आणि शंकराचार्य पद स्त्रीयांना मिळावयास हवेच . ( मी इतर धर्मीय संघटनांसाठीही हाच आग्रह मांडेन) स्त्री देवता असू शकते तर सरसंघचालक किंवा शंकराचार्य का असू शकत नाही ? इथे म.गांधी प्रणित काँग्रेस वैचारीक दृष्ट्या पुढे दिसते . बरं, तसे समजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
सुबोध खरे Wed, 01/31/2018 - 17:02 नवीन
काश्मिरात स्त्रीयांनी काम न करण्यासारखे काय आहे ? हे वाक्य "जितं मया" म्हणण्यासाठी पुरेसे आहे. __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
सुबोध खरे Wed, 01/31/2018 - 15:48 नवीन
शंकराचार्य पद स्त्री आणि ब्राह्मणेतर जन्मियांना संधी मिळावी म्हणून संघाने नेमकी कोणती सकारात्मक पावले उचलली ? रा स्व संघ हा हिंदू महासभा/ हिंदू राष्ट्रीय संघ नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे जो हिंदू हित रक्षण यासाठी "पण" काम करतो. याचा अर्थ असा नव्हे कि हिंदू धर्माबद्दल कुठेही काहीही झाले कि संघाने त्यात पडावे शंकराचार्य काय करतात यात त्यांनी का लुडबुड करावी? . उद्या तुम्ही हेही म्हणाल कि हिंदू धर्म सुधारणेच्या कामात ते का काम करत नाहीत?किंवा अनिस बरोबर काम का करत नाहीत रा स्व संघाने काय काम करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे? तेंव्हा शंकराचार्याच्या पदात त्यांनी भाग का घेतला नाही हा प्रश्न संपूर्ण गैरलागू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
माहितगार Wed, 01/31/2018 - 16:28 नवीन
श्रीगुरुजींना दिलेला प्रतिसाद पान बदलल्याने दिसणार नाही म्हणून कॉपी पेस्टवतो म्हणायला तसे एकमेकांच्या दृष्टीने काँग्रेस , कम्यूनीस्ट , संघ लीग सगळ्याच कालबाह्य संस्था असतीलही. त्या प्रत्यक्षात नामशेष होतील तेव्हा होतील सध्या आहेत तो पर्यंत स्त्रीयांना समान संधी का असू नयेत . खास करून तुम्ही (म्हणजे संघ) ज्या संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करण्याची भाषा करतो त्या संस्कृतीत स्त्री देवता होण्यास पात्र असू शकते तर सरसंघचालक होण्यास पात्र होऊन आता पर्यंत किमान अर्ध्या किंवा जास्तही सरसंघचालकांची यादीतील नावे स्त्रीयांची असावयास नको होती किंवा कसे . तुम्ही (म्हणजे संघ) जेव्हा सांस्कृतीक प्रतिनिधीत्वाची भाषा करता तेव्हा अप्रत्यक्षपणे जबाबदारी नेतृत्वाची असते नेतृत्वाकेडे समन्याय समसंधी दृष्टी असणे , आपल्यातील (संस्कृतीतील ) चांगल्याचे भूषण बाळगताना आपल्या लोकांना अयोग्या पासून दूर रहाण्यास सांगण्याची जबाबदारी नेतृत्वावर असते की नाही, अशी नैतीक जबाबदारी संघ या संघटनेवर नाही / नव्हती हे दिशाभूल करणारे आणि कातडी बचावू नाही किंवा कसे . या बाबतीत स्वा. सावरकरांच्या बाबतीत टिकेस संधी कमी मिळते समाजसुधारणे बाबत सावरकर सक्रीय पुढाकारात दिसतात . तसे संघाचे नेतृत्व सक्रीय पुढाकारात दिसते का ? बाबा आढावांनी एग गाव एक पाणवठाचे आंदोलन केले की सरसंघचालक त्यांच्या मांडीला मांडीलावून चला मी येतो तुमच्या सोबत असे म्हणाले का किंवा अशा कोणत्याही सामाजिक सुधारणा चळवळीत चला आम्ही येतो तुमच्या सोबत ही सकारात्मक कमी तर पडत नाही ना हा चिंतनाचा विषय असावा. डॉ. खर्‍यांना माझा समतोल संपल्या सारखे वाटले कदाचित आपणासही तसे वाटेल पण योग्य जागी टिका करणारा मिपा टिकाकारांचे विचारावर चिंतन करावे की करू नये हा निर्णय ज्याचा त्याचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
त
तेजस आठवले Wed, 01/31/2018 - 17:24 नवीन
बाबा आढावांनी एग गाव एक पाणवठाचे आंदोलन केले की सरसंघचालक त्यांच्या मांडीला मांडीलावून चला मी येतो तुमच्या सोबत असे म्हणाले का किंवा अशा कोणत्याही सामाजिक सुधारणा चळवळीत चला आम्ही येतो तुमच्या सोबत ही सकारात्मक कमी तर पडत नाही ना हा चिंतनाचा विषय असावा.
आपण संघाला हे का सुचवत नाही ? बाकी बाबा आढावांनी आदिवासींच्या प्रश्नांवर काय केले, नरेंद्र दाभोलकरांनी काश्मिरी विस्थापितांच्या प्रश्नावर काय केले, मुक्तांगण चे अनिल अवचट ह्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय केले हे असे अनंत प्रश्न मलाही पडले आहेत. थोडक्यात काय, कोणी काय करावे ह्यावर आपले नियंत्रण नसते.खाजगी संस्था आणि वैयक्तिक आयुष्य ह्यावर तर नाहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/01/2018 - 04:13 नवीन
नरेंद्र दाभोलकरांनी काश्मिरी विस्थापितांच्या प्रश्नावर काय केले, मुक्तांगण चे अनिल अवचट ह्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय केले हे असे अनंत प्रश्न मलाही पडले आहेत.
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
स
सुबोध खरे गुरुवार, 02/01/2018 - 06:39 नवीन
बाबा आढावांनी एग गाव एक पाणवठाचे आंदोलन केले मग त्यांनी काश्मीर प्रश्नावर काहीच काम का केलं नाही? किंवा पुर्वांचलात आदिवासी प्रश्नावर काही का केलं नाही? त्यांचं सगळं सगळं फुकट गेलं म्हणायचं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
आ
आनन्दा गुरुवार, 02/01/2018 - 06:00 नवीन
मुळात मला एक वेगळा प्रश्न आहे, संघातील बरेचसे कार्यकर्ते सामान्यपणे आपले घर सोडून एका विशिष्ट ध्येयाने कार्यप्रवण होऊन येत असतात, आपल्या समाजाचा भाग बघता संघासारख्या सामाजिक संघटनेसाठी पूर्णवेळ घरदार सोडून काम करण्याची सवय अजून स्त्रियांमध्ये असेल असे वाटत नाही, विशेषतः संघकार्यकर्ते ज्या कुटुंबामधून येतात तिबे तर नाहीच नाही. राष्ट्रसेविका त्यांचे काम घर सांभाळून करतात, संघाचे कोणतेही पदाधिकारी घर सांभाळून काम करत नाहीत त्यामुळे हि तुलनाच apple to orange आहे. संघाची पॉलिटिकल विंग भाजपमध्ये असे का नाही हे मात्र तुम्ही विचारू शकता, पण तिथे विचारलेत तर तोंडघशी पडण्याची शक्यता जास्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
त
तेजस आठवले Wed, 01/31/2018 - 17:15 नवीन
बघा हं पटतंय का, एक शिक्षण संस्था आहे, तिची दोन शाळा / कॉलेज आहेत. एक फक्त मुलींसाठी आणि एक फक्त मुलांसाठी. ह्या दोनही संस्थांची घडण वेगवेगळी आहे. ही शिक्षण संस्था ह्या दोन्ही शाळेतल्या विद्यार्थी/विद्यार्थिनी एकत्र येतील असे एकही कार्यक्रम घेत नाही.इतकंच काय, एखादा प्रचंड हुशार असलेला विद्यार्थी मुलगा मुलींच्या शाळेत प्रवेश मिळवू शकत नाही तसेच एखादी हुशार मुलगी मुलांच्या शाळेतल्या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही.बरं असहिष्णुता फोफावली नसल्याने ह्या दोघांनाही आपल्यावर अन्याय होत आहे असे ओरडून जगाला सांगता येत आहे.
सामाजिक आणि सांस्कृतिक जिवनात स्त्री -पुरुष समानतेसाठी संघाचे नेमके योगदान कोण कोणते खासकरून शंकराचार्य पद स्त्री आणि ब्राह्मणेतर जन्मियांना संधी मिळावी म्हणून संघाने नेमकी कोणती सकारात्मक पावले उचलली ?
माहित नाही. तुम्ही संघाच्या संपर्क कार्यालयाला हे प्रश्न विचारू शकता आणि त्याची उत्तरे आम्हालाही सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/01/2018 - 06:14 नवीन
सामाजिक आणि सांस्कृतिक जिवनात स्त्री -पुरुष समानतेसाठी संघाचे नेमके योगदान कोण कोणते खासकरून शंकराचार्य पद स्त्री आणि ब्राह्मणेतर जन्मियांना संधी मिळावी म्हणून संघाने नेमकी कोणती सकारात्मक पावले उचलली ?
शंकराचार्य पदावर नव्या नियुक्त्या नक्की कशा करतात याची कोणाला माहित आहे का? तिथे प्रायमरी, इलेक्शन वगैरे होतात का? त्यात संघाचा किंवा कम्युनिस्टांचा किंवा काँग्रेसचा किंवा ते मठ-आखाडे बाहेरच्या कोणाचाही किती रोल असतो याविषयी कोणाला काही माहिती आहे का? मला तरी नाही. दुसरे म्हणजे वेगवेगळ्या चार पीठांचे वेगळे शंकराचार्य आहेत हे माहित आहे. मागे जयललितांनी कांचीपीठाच्या जयेंद्र सरस्वतींना अटक केली होती तेव्हा त्यांचे आणि द्वारका पीठाचे स्वरूपानंद सरस्वती मधूनमधून अयोध्या प्रश्नावर बोलत असतात म्हणून त्यांचे अस्तित्व कळले. बाकीचे दोन शंकराचार्य नक्की कोण आहेत याविषयी मला तरी काहिही माहित नाही. या पदावरील व्यक्तीचे काम काय, जबाबदार्‍या काय वगैरे गोष्टीही माहित नाहीत. त्या माहितगारांना माहित असल्यास त्यांनी लिहावे ही विनंती. म्हणजे त्यात संघ कुठून आला आणि संघाने त्याविषयी काही करावे का याविषयी काहीतरी मत मांडता येईल. नाहीतर जो काही चालू असेल तो हवेतलाच गोळीबार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
त
तेजस आठवले Wed, 01/31/2018 - 14:46 नवीन
मला कधी कधी वाटतं की हा माणूस खरंच इतका मंद आहे का वेडा बनून पेढा खातोय ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 01/31/2018 - 15:01 नवीन
ज्या मूढाला महिलांच्या आणि पुरूषांच्या स्वच्छतागृहातील फरक समजत नाही तो मंदच असला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
अ
अर्जुन Wed, 01/31/2018 - 18:18 नवीन
माहितगार, शंकराचार्य पद स्त्री आणि ब्राह्मणेतर जन्मियांना संधी मिळावी म्हणून संघाने नेमकी कोणती सकारात्मक पावले उचलली ? संघाबद्दल आपले मत कळले. क्रु प या खालिल बातमिबद्दल आपले बहुमोल विचार सांगाल का? https://www.hindustantimes.com/india-news/kerala-muslim-woman-who-led-friday-prayers-now-faces-threat/story-GqW65QTABkiyd5SjZQ9YZM.html
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/01/2018 - 10:24 नवीन
स्त्रीयांना समान संधी नाकारण्यात कोणतेच धर्मिय मागे नसतात. ख्रिश्चनांमध्ये पोपची पदे श्रद्धावंतांच्या खलिफ ते मुल्ला मौलवी ते प्रेषित ते ईश्वर या जागा ( सोबलॉपर्सनल लॉ बोर्ड ते वक्फ बोर्ड) अजूनही पुरुषांसाठी राखीव असतात कम्युनिस्ट पार्टीतही वरच्या लेव्हलवर स्त्रीयांचेप्रतिनिधीत्व जेमतेम असते. ते आता मी चर्चा करत असलेली ह्यांची पदे राखीव कुरणे आहेत. काम तर मुख्यत्वे बौद्धीक अथवा संघटन कौशल्याचे दिसते आणि स्त्रीयांमध्ये संघटन कौशल्य अथवा बौद्धीकतेचे गुणसूत्रे ट्रान्सफर होण्याची प्रोबॅबीलीटी पुरुषांपेक्षा वेगळी नसावी तरीही ... समान संधी नाकारणारी विषमता प्रगतीस मारक असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्जुन
ब
बिटाकाका Wed, 01/31/2018 - 19:02 नवीन
माहितगार साहेब, स्त्री आणि पुरुष आघाड्या वेगळं असणं हे स्त्री पुरुष समानतेच्या विरोधात आहे हा निष्कर्ष कसा काय काढला? वेगळी स्त्री समिती - स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली - असणं हे तर उलट स्त्री सक्षमीकरणातील महत्वाचं पाऊल नाहीये का? मुळात महिलांना पुरुषांच्या बाजूला बसवले म्हणजे समानता आणि सक्षमीकरण झाले हा निष्कर्षच चुकीचा आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/01/2018 - 10:27 नवीन
महिलांना पुरुषांच्या बाजूला बसवले म्हणजे समानता आणि सक्षमीकरण च्या संधी निर्माण होतात. मुख्य म्हणजे अ‍ॅटीट्यूड बदलण्या च्या दिशेने सकारात्मक पाऊल पडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 02/01/2018 - 12:38 नवीन
सक्षमीकरणाच्या संधी फक्त त्यानेच निर्माण होतील हा अट्टाहास कशाला? स्त्रियांना स्वतंत्र नेतृत्व करण्याची संधी दिली तर त्या सक्षम होणार नाहीत का? महिला बचत गटाचा प्रमुख स्त्री असताना महिलांना सक्षम होण्याची जास्त संधी आहे कि प्रमुख पुरुष असताना? तुमचा ऍटिट्यूडचा मुद्दा बरोबर आहे पण तो संघाच्या बाबतीत वापरून तुम्ही संघ स्त्री पुरुष समानतेच्या विरोधात आहे हे सिद्ध करू पाहत आहात कि काय असे वाटू लागले आहे. संघात पुरुष आणि स्त्रिया वेगळ्या असण्याची करणे खाली आलेली आहेतच आणि वेगळे असूनही सक्षमीकरण कसे साधले जातेय हेही आलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 02/01/2018 - 16:14 नवीन
......संघात पुरुष आणि स्त्रिया वेगळ्या असण्याची करणे खाली...
पुरुषांचा स्त्रीयांवर विश्वास नाही म्हणून कि स्त्रीयांचा पुरुषांवर विश्वास नाही म्हणून , स्त्रीला देवी , परस्त्री माते समामा, किमान भाऊ बहीणी राखी अशा परंपराचा अभिमान सांगणार्‍यांचा आत्म्यांचे अद्वैत सांगणार्‍यांच्या संघटनेत अशा अविश्वासास जागा असावयास नको.
सक्षमीकरणाच्या संधी फक्त त्यानेच निर्माण होतील हा अट्टाहास कशाला?
रामनाथ कोविंदांना राष्ट्रपती पद दिले म्हणजे दलितांचे सक्षमीकरण पूर्ण होते असे नाही पण तुम्ही तुमचे इंटेशन स्वच्छ आहे आणि तुम्ही मन मोकळेपणाने दलितांना स्विकारु इच्छिता हे स्पष्ट होत असते. मोदींना किंवा त्यांच्या मंत्र्यांना रामनाथ कोविंदांच्या जाणार्‍या फोनला किंवा मोहन भागवतांच्या फोनला एक मुल्य प्राप्त होत असते . तेच मुल्य समितीच्या संचालिकेच्या फोनला प्राप्त होईल याची गॅरंटी देता येऊ शकते का ? पण तिच संचालिका भागवतांच्या जागी सरसंघचालक असते तेव्हा तिच्या फोनला अधिक मुल्य प्राप्त होते हे वेगळे सांगावे लागावे का ? त्याही पेक्षा महत्वाचे पुरुष सरसंघचालकांपेक्षा काही महिला संचालिका अधिक प्रगल्भ राहील्या असू शकतीलही केवळ संघीय पुरुष प्रधान प्रभावामुळे एखाद्या संचालिकेचे अधिक चांगले विचार दृस्।टीकोण संधी पासून वंचित राहिल्यास नुक्सान कुणाचे अधिक होते हिंदूंचेच होते ना ? अटलजी दुर्गा कुणास म्हणाले तर संघाच्या एखाद्या संचालिकेकडे बोट जात नाही क्रेडीट चक्क काँग्रेसकडे जाते ! सक्षमीकरण आणि नेतृत्व संधीचा संबंढ याचे बाकी उत्तर मी गा पैंसाठी खाली लिहिले आहे त्याच्या पुर्नावृत्तीची आवश्यकता नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 02/02/2018 - 07:08 नवीन
तुम्ही सतत गोलपोस्ट चेंज करत आहात. आता सेविका समितीच्या प्रमुखांचा फोन मोदींना किती महत्वाचा आहे किंवा नाही याची खात्रीपूर्वक काही माहिती आहे का आपल्याकडे? मोदींनी कुणाचा फोन उचलला यावरून सक्षमीकरण ठरणार का? उद्या संघाचे प्रमुखपद (फक्त तुमच्या म्हणण्याखातर) बदलून महिलेला दिले आणि उद्या काँग्रेसचे सरकार आले तर त्यांचे पंतप्रधान सरसंघचालकांचा फोन उचलतीलाच याची खात्री आहे का? मुळात संघात महिला असण्याचा आणि नसण्याचा तुम्ही सक्षमीकरणाशी लावलेला संबंध हास्यास्पद आहे. खाली कोणीतरी विचारलेल्या प्रश्नांकडे तुम्ही सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेले दिसते. वर्षानुवर्षे खेळत असलेल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघात महिला का नाहीत हा प्रश्न तुम्हाला पडलाय का कधी? तिथेही तर महिलांच्या संघाला पुरुषांइतके स्थान, मान नाही. एखादी महिला कदाचित गांगुली, धोनी, विराटपेक्षा जास्त चांगले कर्णधारपद भूषवू शकली असती. हा प्रश्न पडलाय का कधी तुम्हाला? शिवाय, महिलांना स्वतंत्रपणे नेतृत्व दिल्याने त्यांचे सक्षमीकरण जास्त होईल कि पुरुषांसमोर लढण्याचे स्थान दिल्याने त्यांचे जास्त सक्षमीकरण होईल हा प्रश्नही तुम्ही दुर्लक्ष केलेला दिसतोय. जर महिलांना फक्त उमेदवारी देण्याने त्या सक्षम होणार असतील तर फक्त उमेदवारी देणे बंधनकारक करायला हवे होते, महिला राखीव मतदारसंघांची काय गरज होती? तुम्ही फक्त संघात महिलांना स्थान नाही म्हणून संघ स्त्री पुरुष समानता मनात नाही असा धोशा लावून बसला आहात. ते तसे का आहे याच्याबद्दल काहीही मत न व्यक्त करता तसे आहे म्हणजे समानतेला विरोध आहे असे मत आपण व्यक्त करत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गामा पैलवान Wed, 01/31/2018 - 19:29 नवीन
माहितगार,
सामाजिक आणि सांस्कृतिक जिवनात स्त्री -पुरुष समानतेसाठी संघाचे नेमके योगदान कोण कोणते खासकरून शंकराचार्य पद स्त्री आणि ब्राह्मणेतर जन्मियांना संधी मिळावी म्हणून संघाने नेमकी कोणती सकारात्मक पावले उचलली ?
एखाद्यास शंकराचार्यपदावर बसवणं हे संघाचं काम नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/01/2018 - 10:31 नवीन
एखाद्यास शंकराचार्यपदावर बसवणं हे संघाचं काम नाही.
ऐक्य असल्या शिवाय हित कसे साधेल ? आणि जिथे विषमता आहे तिथे ऐक्य कसे साधेल ? विषमता असेल तर हित कसे साधेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्वेता व्यास गुरुवार, 02/01/2018 - 06:06 नवीन
रा स्व संघात महिलांना पद का नाही? भारतीय क्रिकेट पुरुष संघाची कप्तान मिथिला राज का नाही? भारतीय हॉकी पुरुष संघाची कप्तान सुशीला चानू का नाही? मिस्टर वर्ल्ड स्पर्धेची विजेती मानुषी चिल्लर का नाही? किती दिवस चालणार ही स्त्री-पुरुष असमानता?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/01/2018 - 09:58 नवीन
खि खि खि . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता व्यास
म
माहितगार गुरुवार, 02/01/2018 - 10:28 नवीन
पवित्र वाटले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/01/2018 - 10:34 नवीन
धन्य आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 02/01/2018 - 10:13 नवीन
....रा स्व संघात महिलांना पद का नाही? भारतीय क्रिकेट पुरुष संघाची कप्तान मिथिला राज का नाही?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व हिंदूंसाठी आहे कि केवळ पुरुष असलेल्या हिंदुंसाठी चे राखीव कुरण आहे ? हे कुरण राखीव का आहे याचे काही तारतम्य असलेले कारण पुढे येताना दिसत नाही . जेनेटिकली संघटना कौशल्यात केवळ पुरुष सुपीरियर असतात कि संघाला द्यावयाच्या बौद्धिकांसाठी जेनेटिकली केवळ पुरुष सुपीरियर असतात ? कि एखाद्या देवीचे नेतृत्व स्वीकारण्याने संघिष्टांची झोप उडते ? टेनिस मध्ये जशा मिक्स मॅचेस असतात तशा क्रिकेट हॉकी आणि इतर खेळातही असाव्यात आणि त्याची केप्टनशिप काही वेळा महिलांना मिळण्यास काय हरकत आहे ? हॉकी इंडियाला किमान एकवेळा स्त्री अध्यक्ष मिळाली बोर्ड फॉर कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियास खेळात कर्तृत्व नसलेली मंडळी चालतात पण ९० वर्षाच्या इतिहासात एकही स्त्री अध्यक्ष सापडू नये हि लाजिरवाणी गोष्ट नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता व्यास
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/01/2018 - 10:30 नवीन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व हिंदूंसाठी आहे कि केवळ पुरुष असलेल्या हिंदुंसाठी चे राखीव कुरण आहे ? हे कुरण राखीव का आहे याचे काही तारतम्य असलेले कारण पुढे येताना दिसत नाही . जेनेटिकली संघटना कौशल्यात केवळ पुरुष सुपीरियर असतात कि संघाला द्यावयाच्या बौद्धिकांसाठी जेनेटिकली केवळ पुरुष सुपीरियर असतात ? कि एखाद्या देवीचे नेतृत्व स्वीकारण्याने संघिष्टांची झोप उडते ? इतक्या जणांनी वेगवेगळ्या प्रकारे अनेकवेळा सांगूनही तुम्हाला अजूनही लक्षात येत नाही याचे आश्चर्य वाटते. संघ हा सर्व हिंदूंसाठी आहे. त्यासाठी संघाने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी अनेक संघटना तयार केल्या आहेत. काही संघटनांमध्ये फक्त पुरूष सदस्य आहेत, काहीत फक्त महिला आहेत तर काहींमध्ये महिला व पुरूष असे दोघेही असतात. विश्व हिंदू परीषद ही संघटना धार्मिक क्षेत्रात काम करते व यात महिला व पुरूष हे दोघेही असतात. अखिल भारतीय विद्यार्थी परीषद ही विद्यार्थी संघटना असून यात विद्यार्थी व विद्यार्थिनी आहेत. राष्ट्रसेविका समिती ही महिलांची संघटना असून यात फक्त महिला असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाने ओळखल्या जाणार्‍या संघटनेत फक्त पुरूष असतात. याव्यतिरिक्त वनवासी संघ, भारतीय मजदूर संघ, बँक कर्मचार्‍यांची संघटना अशा अनेक संघटना आहेत ज्यात फक्त पुरूष, फक्त स्त्रिया किंवा पुरूष व स्त्रिया असे दोघेही असू शकतात. अजूनही लक्षात येत नसेल तर जास्त डोक्याला ताप करून न घेता सोडून द्या. टेनिस मध्ये जशा मिक्स मॅचेस असतात तशा क्रिकेट हॉकी आणि इतर खेळातही असाव्यात आणि त्याची केप्टनशिप काही वेळा महिलांना मिळण्यास काय हरकत आहे ? हॉकी इंडियाला किमान एकवेळा स्त्री अध्यक्ष मिळाली बोर्ड फॉर कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियास खेळात कर्तृत्व नसलेली मंडळी चालतात पण ९० वर्षाच्या इतिहासात एकही स्त्री अध्यक्ष सापडू नये हि लाजिरवाणी गोष्ट नाही का ? चांगली अभिनव कल्पना आहे. कल्पना भारतीय क्रिकेट महामंडळ, हॉकी महासंघ इ. संघटनांना पाठवा. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेलाही ही कल्पना पाठवा. म्हणजे ऑलिंपिकमध्ये पुरूष व स्त्रियांचे वेगवेगळे सामने न होता एकत्रित सामने होतील. परंतु त्यात एक धोका आहे. उदाहरणार्थ १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पुरूष व महिला अशा दोघांचीही एकत्रीत शर्यत घेतली तर महिलांना एकही पदक न मिळण्याची शक्यता आहे. २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर अशी कोणत्याही अंतराची शर्यत एकत्रित घेतली तर सर्व पदके पुरूष खेळाडूंनाच मिळतील व त्यामुळे महिलांवर अन्याय झाल्याचा आरडाओरडा सुरू होईल. त्याच्या आधी मिपापासूनच सुरूवात करूया. मिपा संपादकांशी संपर्क करून अनाहिता या महिलांच्या गटात सर्वांना प्रवेश द्यायला सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा