Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लेखाजोखा ४ वर्षाचा

स
संन्यस्त खड्ग
Tue, 02/06/2018 - 06:28
🗣 222 प्रतिसाद
अच्छेदिन वाले सरकारचे ४ वर्षातील कामे ▪️आधार कार्ड बनवा. ▪️आधार क्रमांक बँक खात्याला जोडा ▪️आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा. ▪️आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा ▪️एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा ▪️जुलैच्या अगोदर रिटर्न भरा. ▪️नोट बदलून घ्या. ▪️बदलेल्या नोटांचा हिशोब दया. ▪️गैस सब्सिडी सरेंडर करा. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा ▪️बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा. ▪️बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब दया.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा. ▪️सामान(Goods) वर टॅक्स भरा ▪️सर्विस वर टॅक्स भरा ▪️कफन वर टैक्स भरा. ▪️सर्व पैसे बँकेतच ठेवा खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही. ▪️आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश ▪️उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका गोव्यात मजेत खाऊ शकतात. ▪️शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय. ▪️जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका. फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते. ▪️भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत. तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय? ▪️६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला. ७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का? "अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते. हे तुम्हाला माहीत नाही का?" ▪️आधार कार्ड बनवा. ▪️आधार क्रमांक बँक खात्याला जोडा ▪️आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा. ▪️आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा ▪️एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा ▪️जुलैच्या अगोदर रिटर्न भरा. ▪️नोट बदलून घ्या. ▪️बदलेल्या नोटांचा हिशोब दया. ▪️गैस सब्सिडी सरेंडर करा. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा ▪️बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा. ▪️बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब दया.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा. ▪️सामान(Goods) वर टॅक्स भरा ▪️सर्विस वर टॅक्स भरा ▪️कफन वर टैक्स भरा. ▪️सर्व पैसे बँकेतच ठेवा खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही. ▪️आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश ▪️उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका गोव्यात मजेत खाऊ शकतात. ▪️शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय. ▪️जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका. फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते. ▪️भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत. तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय? ▪️६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला. ७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का? "अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते. हे तुम्हाला माहीत नाही का?"

प्रतिक्रिया द्या
40793 वाचन

💬 प्रतिसाद (222)
व
विशुमित Fri, 02/09/2018 - 06:53 नवीन
आम्ही मूढ, आम्हाला काय लिहतो हे उमगत नाही असे एकवेळ गृहीत धरा पण असहिष्णुतेचा शिक्का कोणावर आणि कशासाठी मारत चालला होतात? ""(......नाहीतर पुन्हा न हसणे म्हणजे असहिष्णुता वगैरे म्हणायचे लोक म्हणून हसून घेतले...:):)).""" हे तुम्हीच लिहले आहे ना? माझ्या प्रतिसादाला उप प्रतिसाद दिला म्हंटल्यावर तो माझ्यासाठीच होता अशी समजूत करून घायला मला वाव आहे. विनोदाला फक्त ह्यह्यह्या केले असते तर पुरेसे ठरले असते. हसण्यासाठी मी तरी अडवले नव्हते कोणाला. सुरवात तुम्ही करायची आणि परत म्हणायचे दाखवून द्या, याला काय अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 02/09/2018 - 06:59 नवीन
लोक विनोद पण फार गंभीरपणे घेतात बुवा...!!
ह्या तुमच्या वरच्या वाक्याबद्दल होतं ते! त्यातीलही विनोद खपला नाही होय, बरं! बाकी ते राक्षसीण कुठे म्हटले तेही सांगून टाका! कि तेही विनोद म्हणून घ्यायचं होतं? नाही तिथे हसायचं राहिलं आहे. पुन्हा म्हणाल लोक विनोदही गंभीरपणे घेतात वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 02/09/2018 - 07:48 नवीन
https://www.misalpav.com/comment/981671#comment-981671 हा तुमचा प्रतिसाद वाचा आणि सांगा . लोक विनोद पण फार गंभीरपणे घेतात बुवा...!! ह्या वाक्यासाठी तुम्ही ह्याह्याह्या केले होते का? स्वतःचे प्रतिसाद तरी नीट वाचत चला मग लोकांना अभ्यास वाढवायला सांगा. आणि "लोक विनोद पण फार गंभीरपणे घेतात बुवा...!!" हे माझ्यासाठी कोणीतरी वापरले होते. हे वाक्य ह्या धाग्यातील प्रतिसादावर चपखल बसत होते म्हणून वापरले होते. त्यांनी कॉपी राईटचा दावा केला तर हटवायला माझी हरकत नसेल. https://www.misalpav.com/comment/980407#comment-980407 त्या धाग्यात विनोदासारखा काय होते हा संशोधनाचा भाग असताना देखील. त्या वेळेस मी पण नाईलाजास्तव नाही तिथे हसलो होतो विनोद समजून. https://www.misalpav.com/comment/980351#comment-980351 त्यामुळे म्हणतोय हसत खेळत मजेत राहा... चिल्लाक्स...!! आणि हो राक्षसीणच राहिले. तुम्ही वाच्यार्थाच घेणार म्हंटल्यावर भावार्थ कुठला तुम्हाला समजणार आहे. असो चालायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 02/09/2018 - 08:25 नवीन
हा एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करण्याचा प्रयत्न आहे असे समजायला हरकत नसावी! भावार्थ, वाच्यार्थ वगैरे सोडा...लिहिलेलं काय हे तरी नक्कीच कळत असणार तुम्हाला! तुम्ही दुसऱ्याला विनोद सिरिअसली घेऊ नका हे सांगताय आणि मोदींनी केलेल्या विनोदाचा तुम्हाला हवा तसा अर्थ काढून त्यावर भाष्य करताय - हा मी काढलेला अर्थ भावार्थ/वाच्यार्थ कशातही बसवून कसा चुकीचा आहे हे सांगाल का? कुठे हसायचे कुठे नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि हे मी वर लिहिलेलेच आहे. पण विनोद पण चालत नाही हा शिक्का तुम्ही लावताय लोकांना (मागे कुणी कुठे म्हटलं होतं याच्याशी माझा काही संबंध नाही, मी त्याचा ट्रॅक ठेवून चालावं अशी अपेक्षा नसावी), म्हणून मी असहिष्णुतेचा मुद्दा मांडला! राक्षसीण कुठेही म्हणाले नाहीत, मी तो तसा अर्थ काढलाय असा सरळ मान्य करण्यात काय अडचण असावी? जाताजाता, मोदींच्या विनोदावर मते मांडणार्यांना ते छद्मी/कुत्सित/कि अजून कसलं हसणं योग्य वाटलं का यावर कोणी मत मांडताना दिसत नाही. यालाच मी माझ्या वैयक्तिक मतांनुसार चष्मा किंवा दुटप्पीपणा म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 02/09/2018 - 09:02 नवीन
ब्वॉर्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
व
विशुमित Fri, 02/09/2018 - 13:33 नवीन
<<हा एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करण्याचा प्रयत्न आहे असे समजायला हरकत नसावी!>> ==>> ते मी दाखवून दिलेच आहे तुमच्या बाबतीत. असो. <<<भावार्थ, वाच्यार्थ वगैरे सोडा...लिहिलेलं काय हे तरी नक्कीच कळत असणार तुम्हाला!>>> ==>> एकाच कलरचा जत्रेतील गॉगल घातल्यावर भावार्थ, वाच्यार्थ कुठला समजायला. <<<तुम्ही दुसऱ्याला विनोद सिरिअसली घेऊ नका हे सांगताय आणि मोदींनी केलेल्या विनोदाचा तुम्हाला हवा तसा अर्थ काढून त्यावर भाष्य करताय - हा मी काढलेला अर्थ भावार्थ/वाच्यार्थ कशातही बसवून कसा चुकीचा आहे हे सांगाल का? कुठे हसायचे कुठे नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि हे मी वर लिहिलेलेच आहे. पण विनोद पण चालत नाही हा शिक्का तुम्ही लावताय लोकांना (मागे कुणी कुठे म्हटलं होतं याच्याशी माझा काही संबंध नाही, मी त्याचा ट्रॅक ठेवून चालावं अशी अपेक्षा नसावी), म्हणून मी असहिष्णुतेचा मुद्दा मांडला!>>> ==>> स्वतःच्या प्रतिसादांचा क्रम एकदा चेक करून बघा आणि मग सांगा. <<<राक्षसीण कुठेही म्हणाले नाहीत, मी तो तसा अर्थ काढलाय असा सरळ मान्य करण्यात काय अडचण असावी?>>> ==>> खालील लेखाचा शेवटचा परिच्छेद वाचा, मोदीजींच्या विनोदाचा सरळ अर्थ काय होतो हे बऱ्याच जणांनी व्यक्त केला आहे. आणखी काही उदाहरणे सापडली तर चिकवतो. हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. लगेच बिगुलला देशद्रोहाच्या यादीत टाकू नका. http://www.bigul.co.in/bigul/2147/sec/9/modi%20speech तुमची अडचण काय आहे हे मला ज्ञात आहे फक्त मला कोणाच्या वर्मावर आता बोट ठेवायला जास्त आवडत नाही. <<<जाताजाता, मोदींच्या विनोदावर मते मांडणार्यांना ते छद्मी/कुत्सित/कि अजून कसलं हसणं योग्य वाटलं का यावर कोणी मत मांडताना दिसत नाही. >>> ==>> प्रक्षुब्ध हा शब्द पण ऍड करा. मी जर संसदेत रेणुका चौधरींच्या जागेवर असतो तर यांचे भाषण ऐकून ढसाढसा रडलो असतो, चष्मा काढून. विडिओ पाहिला असेल तर शाह कसे बाके वाजवून हसत होते, इसके उपर भी गौर फर्माइये. मागे घोषणा बाजी करून कितीतरी तास संसदचे कामकाज वाया घालवले होते उसको भी याद करो...म्हणजे चष्मा आणि दुटप्पीपणाचा वाच्यार्थ भावार्थ नीट समजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 02/09/2018 - 17:13 नवीन
पहिल्या चार मुद्द्यांना एकही उत्तर नाही, फक्त वैयक्तिक टीका!! हेच धोरण आहे का तुमचं? 100 जणांनी राक्षस असा अर्थ लावला म्हणून मोदी तसे म्हणाले हे सिद्ध होतं का?? मी तुम्हाला स्पष्ट विचारलं की मोदी तसे म्हणाले कि तुम्ही तसा अर्थ लावला तर तुम्ही इतरांनीही तसाच अर्थ लावलाय त्यामुळे मोदी तसेच म्हणाले हे सिद्ध करायचा प्रयत्न करत आहात. माझी काय अडचण आहे हे सांगून टाका, उगाच फालतू खडे मारून पळून तर गल्लीतली छोटी पोरं पण जातात. संसद बंद पाडणाऱ्या, धिंगाणा करणाऱ्या सगळ्या खासदारांवर, मग ते भाजप चे असले म्हणून काय झाले, टिका करण्यात मला अडचण किंवा कमीपणा नाहीये. तुम्ही शहा आणि रेणुका यांच्या हसण्याची तुलना करताय यातच काय ते आले. तुम्हाला फक्त तुमचा मुद्दा सिद्ध करायचा आहे आणि बाकी काहीही नाही असे दिसते. तुम्हीही त्यांच्यासारखेच किंबहुना त्यापेक्षा अजून विचित्रपणाने वागला असतात हे आपणच सांगत आहात, त्यामुळे त्यांच्या वागण्यात काहीच गैर नाही असे आपल्याला वाटणे साहजिक आहे. बाके वाजवणे म्हणजे थिल्लरपणा हे आपले मत आहे, अजून दुसरे काय बोलणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 02/10/2018 - 11:29 नवीन
<<<पहिल्या चार मुद्द्यांना एकही उत्तर नाही, फक्त वैयक्तिक टीका!!>>> तुमचे चार मुद्दे जरा बुलेट करून देता का? म्हणजे उत्तर द्यायला सोपे जाईल. वैयक्तिक टीका कुठून चालू झाली ती पुन्हा विनंती करतो आणखी एकदा तपासून पहा. <<<100 जणांनी राक्षस असा अर्थ लावला म्हणून मोदी तसे म्हणाले हे सिद्ध होतं का??>>> ==>> बालिश प्रतिवाद. आपला पास. ते maangu दुसऱ्या धाग्यावर म्हंटल्या प्रमाणे काय अर्थ होतो तो तुम्ही सांगा. आमची बुद्धी तिथं पर्यंत पोहचत नाही. त्यांच्या बाबत बऱ्याच गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत म्हणजे त्यांनी त्या केल्याचं नाहीत हे म्हणणे थोडे धाडसाचे होईल. <<< माझी काय अडचण आहे हे सांगून टाका, उगाच फालतू खडे मारून पळून तर गल्लीतली छोटी पोरं पण जातात.>>> ==>> माणूस एकदा काका झाले की त्यांना सगळे जण लहान लहान पोरेच दिसतात. तुमच्या हसण्याचा आणि माझ्या असहीष्णूतेचा काय संबंध ? हे पण सांगून टाका. काका झाले म्ह्णून डबल बायटिंग मिळणार नाही, सांगून ठेवतो. <<<संसद बंद पाडणाऱ्या, धिंगाणा करणाऱ्या सगळ्या खासदारांवर, मग ते भाजप चे असले म्हणून काय झाले, टिका करण्यात मला अडचण किंवा कमीपणा नाहीये.>>> ==>> चांगली गोष्ट आहे. मी तरी कुठे कोणाचे उदात्तीकरण केले. फक्त आरसा दाखवला. नायडू म्हणत होते कोणीच संसदेत हसायचे नाही. संपूर्ण विडिओ तुम्ही बघितला आहेच. <<< तुम्हाला फक्त तुमचा मुद्दा सिद्ध करायचा आहे आणि बाकी काहीही नाही असे दिसते.>>> ==>> तुम्ही काय करताय मग. सुरवात तुम्ही केली. <<< तुम्हीही त्यांच्यासारखेच किंबहुना त्यापेक्षा अजून विचित्रपणाने वागला असतात हे आपणच सांगत आहात, त्यामुळे त्यांच्या वागण्यात काहीच गैर नाही असे आपल्याला वाटणे साहजिक आहे.>>> ==>> असे विचित्रपणाने वागायला पुढचा माणूस तसे भाग पाडत असेल तर मानवी स्वभावाच्या मर्यादा समजा हवे तर. मला तर केस उपटू वाटतात माझे यांचे भाषण चालू झाल्यावर. माझ्यासारखे बरीच जणांचे हे म्हणणे झाले आहे. अशा लोकांची सांगत लाभली नसावी बहुतेक म्हणून माहित नसेल. <<<बाके वाजवणे म्हणजे थिल्लरपणा हे आपले मत आहे, अजून दुसरे काय बोलणार!>>> ==>> माझा प्रतिसाद पुन्हा नीट वाचावा हि विनंती करतो मग समजेल थिल्लरपणा मी कशाला बोललो ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sat, 02/10/2018 - 11:49 नवीन
मी परत प्रतिवाद करायलाच हवा असं मला वाटत नाही. कोणते चार मुद्दे, बुलेट वगैरे अनावश्यक आहे. फक्त वर स्क्रोल करा आणि कळेल. मी तुमचे प्रतिसाद वाचलेत म्हणूनच तर मी माझी प्रतिक्रिया लिहिली आहे. बाकी ते काका, केस उपटणे वगैरे अतिशय बलिशपणाकडे झुकणारे वाटले, त्याबद्दल माझा पास! मी पातळी सोडू शकत नाही. मोदींनी राक्षस म्हटले की तुम्ही तसा अर्थ लावला? आणि त्यांचे हसणे संसदेची शोभा वाढवणारे होते का? हे दोन थेट प्रश्न!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 02/10/2018 - 12:17 नवीन
<<<कोणते चार मुद्दे, बुलेट वगैरे अनावश्यक आहे.>> ==>> पहिल्या चार मुद्द्यांना एकही उत्तर नाही, फक्त वैयक्तिक टीका!!... हे तुम्हीच लिहले आहे. असे काय करताय. खाली तर फक्त दोनच मुद्दे दिलेत. बुलेट वगैरे अनावश्यक वाटत असेल तर राहू द्यात. <<<मी तुमचे प्रतिसाद वाचलेत म्हणूनच तर मी माझी प्रतिक्रिया लिहिली आहे.>>> ==>> तेच म्हणतोय तुम्ही नीट वाचले नाहीत चष्मा लावून. <<<बाकी ते काका, केस उपटणे वगैरे अतिशय बलिशपणाकडे झुकणारे वाटले, त्याबद्दल माझा पास! मी पातळी सोडू शकत नाही.>>> ==>>'काका" तुमच्या सदस्य नामामध्ये काका होते म्हणून वापरले. आपल्याला रुचले नसेल तर क्षमस्व. केस उपटणे हे मी कशासाठी वापरले हे तुम्हाला समजलेच नाही बहुतेक. असो. पातळी तुम्ही तुमच्या पहिल्याच मला दिलेल्या उप-प्रतिसादात सोडली म्हणून एवढे मोठे 'यदाकदाचित' घडलं. याला आपण दोघे समसमान जवाबदार आहोत असे वाटते. तुम्हाला तुमचा वाटा घायचा नसेल तर मी घेतो. हाकानाका. असहिष्णुताचा मुद्दा तुम्ही सोयीस्कर बाजूला केलात. असो. <<<मोदींनी राक्षस म्हटले की तुम्ही तसा अर्थ लावला? ==>> वाच्यार्थ आणि भावार्थ तुम्हाला सांगितलं आहेच. तुम्हीच ठरवा, तुम्हाला काय घायचा तो. <<<आणि त्यांचे हसणे संसदेची शोभा वाढवणारे होते का?>> ==>> नक्कीच नव्हते. पण माझा रोख तो नव्हताच. हसायचे कि नाही हे मी आनंद याना विचारला होता. तुम्हाला कोठून असहिष्णुता दिसली काय माहित. असो... आशा करतो तुमचे समाधान झाले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sat, 02/10/2018 - 13:33 नवीन
असो, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 02/08/2018 - 12:53 नवीन
स्वतःच्या राजकीय प्राधान्यांना सुखावण्यासाठी अंधविरोध आणि प्रत्येक गोष्टीकडे चष्मा घालून बघण्यात लोकांना काय आनंद होतो देव जाणे. भाजप चांगलं सरकार चालवत नाही ते या कारणांमुळे आणि हिच कारणे आधीचे सरकार व्यवस्थित हाताळत होते म्हणून त्यांना परत सरकारात आणलं पाहिजे असं सरळ मत ठेवण्यात अडचण ती काय? वरील मुद्द्यांपैकी बहुतेक मुद्द्यांवर आक्षेप काय हे काहीच कळले नाही . भाजप ने हे केले, ते केले, पण त्यात चुकीचे काय केले हे कोण लिहिणार? बाकी लेखक महोदय परत धाग्याकडे फिरकलेले दिसत नाहीत!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 02/08/2018 - 13:06 नवीन
ते साडे चार लाख कोटींचा वाय फाय सेट अप करायला गेले असावेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
न
नाखु गुरुवार, 02/08/2018 - 18:15 नवीन
कधी परत येतील, त्यांना बर्याच जणांनी या लिंका जोडणी करून घ्यायच्या खोळंबल्या आहेत. अखिल मिपा नानावतारी वडाची साल पिंपळाला लावण्याची कलाबाज स्वयंघोषित सुधारक (धूमकेतू) विचारवंत यांच्या नमोकावीळ या साथीच्या आजारांनी त्रस्त असलेल्या बद्दल अनुकंपा असलेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बिटाकाका गुरुवार, 02/08/2018 - 18:18 नवीन
हायला! स्वाक्षरी म्हणायची का काय...:):):):)..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सुखीमाणूस गुरुवार, 02/08/2018 - 19:12 नवीन
नमोकावीळ भारी आवडला हा शब्द.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 02/08/2018 - 18:20 नवीन
मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले तसं ही पण हिट अँड रनची केस दिसतेय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/08/2018 - 18:24 नवीन
ही "शिट अँड रन"ची केस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
M
manguu@mail.com गुरुवार, 02/08/2018 - 18:44 नवीन
तुम्हीही एकच केक कापून हिट ॲंड रन केलेत. पुढच्या वाढदिवसांचे केक आलेच नैत की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/08/2018 - 19:11 नवीन
आणि ही "शिट अँड अगेन अँड अगेन अँड अगेन कम"ची केस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
क
कपिलमुनी Fri, 02/09/2018 - 13:00 नवीन
“When Indira Gandhi signed the Shimla Agreement, or the pact with Benazir Bhutto, we were not in agreement. However, Atal Bihari Vajpayee did not go out and talk about it, instead, he took time from Indira Gandhi and talked to her. We didn’t let the nation suffer.” मा. पं. प्र. मोदी ( लोकसभा भाषण ) कुणीतरी यांना सांगायला हवे , हे प्रचाराचे भाषण नाही , संसद आहे , इथले रेकॉर्ड असते. फेकत जाउ नका. सिमला करार झुल्फिकार भुत्तोसोबत झाला होता .
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 02/09/2018 - 17:43 नवीन
६०० कोटी जनतेने फेकुगिरि मान्य केली आहे असा अर्थ काढुन गप्प बसायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बिटाकाका Fri, 02/09/2018 - 18:35 नवीन
अर्थात कोणीतरी मोदींना सांगायलाच हवे की हे सतत संदर्भ चुकणे हास्यास्पद होत चालले आहे. भाषणाच्या ओघात हे रेफरन्स चुकतात तेव्हा प्रत्येकवेळेला मुद्यांपेक्षा चुकांवर लक्ष देणाऱ्या (भावार्थ की वाच्यार्थ वगैरे न बघणाऱ्या) लोकांना आयतेच कोलीत मिळते. मोदीसाहेब, या बाबतीत सुधारणा करणे गरजेचे आहे. बाकी, ते बेनझीर विररुद्ध झुल्फिकार काही क्षण बाजूला ठेवून वरील मुद्द्याबद्दल आपले काय म्हणणे आहे तेही मांडा की राव! अनावधानाने संदर्भ चुकणे म्हणजे फेकणे असते होय, छानय की!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ग
गामा पैलवान Fri, 02/09/2018 - 18:54 नवीन
बिटाकाका,
अनावधानाने संदर्भ चुकणे म्हणजे फेकणे असते होय, छानय की!!
काय बोललात! 'गरिबी ही मानसिक अवस्था आहे' हे विधान फेकणे या सदरांत मोडेल काय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
श्रीगुरुजी Fri, 02/09/2018 - 19:07 नवीन
"वि ह्याव थू सेवंती थू" हे कशात मोडेल? अनावधानाने झालेला चूक का फेकणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मार्मिक गोडसे Fri, 02/09/2018 - 19:52 नवीन
ठीक आहे त्यांच्याकडून अनावधानाने झालेल्या चुकीला फेकणे म्हणता येणार नाही. परंतू जमीन कसायला घेताना ती नापीक आहे हे माहीत असताना ती कसायची सोडून उगाच ज्याने ती नापीक केली त्याच्या नावाने खडे फोडण्यात काही अर्थ नाही. भरपूर मनुष्यबळ असूनही नसेल जमत तर द्या सोडून जमीन कसने. आणि बजेटच्या भाषणात अर्थमंत्री म्हणाले होते की , आम्ही रब्बी पिकाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव दिला आता हे ही अनावधानाने म्हटले असं समजून दुर्लक्ष करायचे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
M
manguu@mail.com Fri, 02/09/2018 - 20:28 नवीन
जमीन कसण्यात त्याना interest असता तर ४७ साली त्यांचे लोक पंतप्रधानच नसते का झाले ? आजादी की लडाई लढून मुस्लिम लीग आणि काँग्रेसने आपापल्या वाटण्या घेतल्या. हे ना ह्यांच्या बाजूचे , ना त्यांच्या बाजूचे. ना ४२ ला लढले , ना ४७ ला खुर्चीत बसले .. नुसती काव काव काव काव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ब
बिटाकाका Sat, 02/10/2018 - 03:13 नवीन
हे अतिशय आक्षेपार्ह आहे. लढाईत कोण लढले कोण नाही हे कसे काय ठरवले तुम्ही? साधारण अशी बालीश वक्तव्ये स्वतःला मुस्लिम समाजाचा नेता समजणारा एक इसम सतत करत असतो. आजच्या पक्षांमधील कोणते नेते देशासाठी लढलेले आहेत हो? मग त्या पार्श्वभूमीवर तुमचे वरील वक्तव्य बलिशपणाचे ठरणार नाही का? @मार्मिक गोडसे - तुम्हाला खरच वाटत असेल कि तुमचा विरोध सेन्सिबल आहे तर मोदींची लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही भाषणे तुम्ही ऐका (तुमच्यासाठी तो कष्टदायक प्रकार असेल पण ऐका). शिवाय आदल्या दिवशीचे खर्गे यांचे आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे भाषण ऐका. मोदींचे भाषण हे त्या मुद्द्याना उत्तर होते. या भाषणामध्ये फक्त काँग्रेसवर टीका होती हे म्हणणे फक्त एवढेच सिद्ध करते की तुम्ही त्यांचे भाषण (स्वतः) पूर्ण ऐकले नाही हे निरीक्षण नोंदवू इच्छितो. आपल्याला ज्याचा विरोध करायचंय त्याचे पूर्ण ऐकून घेऊन विरोध करणे हे खऱ्या बुद्धिवादी लोकांचे लक्षण आहे याबाबतीत दुमत नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sat, 02/10/2018 - 03:35 नवीन
कोण म्हणजे ? काँग्रेसने देशाचे वाटोळे केले अन भाजपा देशाचा उद्धार करत आहे , हे बोलताना भक्त लोक थोडेच काँग्रेसच्या व्यक्ती अन भाजपाच्या व्यक्ती , असा वेगळा हिशोब देतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sat, 02/10/2018 - 08:07 नवीन
म्हणून त्याचा संबंध तुम्ही भारतीय स्वातंत्र्यसमराशी लावणार? मग त्याच हिशेबाने त्याआधीच्या युद्धांमध्ये भारताकडून कोण लढले आणि अफगाणी सत्तांकडून कोण लढले हाही हिशेब लावणार का? सर्वाधिक काळ काँग्रेस सत्तेत होती म्हणून त्या काळामध्ये ज्या एका वेगाने विकास व्हायला हवा होता तो झाला नाही म्हणून काँग्रेसला जबाबदार धरले तर त्यात चुकले काय? भाजपच्या काळात जे काही चुकले त्यावर टिका कराच की कोण नको म्हणतंय पण नुसती पूर्वग्रहित टिका करायला काही विशेष कौशल्य लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
मार्मिक गोडसे Sat, 02/10/2018 - 10:13 नवीन
या भाषणामध्ये फक्त काँग्रेसवर टीका होती हे म्हणणे फक्त एवढेच सिद्ध करते की तुम्ही त्यांचे भाषण (स्वतः) पूर्ण ऐकले नाही हे निरीक्षण नोंदवू इच्छितो. ते भाषण तुम्ही पूर्ण ऐकले असेलच, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असं पंतप्रधान म्हणतात आणि रब्बी पिकाबावत अर्थमंत्री बजेटच्या भाषणात धातांत खोटं बोलतात हे कसं असा मी प्रश्न विचारला तर त्याला तुम्ही सोयीस्कर बगल दिली. मागच्यांनी शेण खाल्ले त्याची शिक्षा त्यांना जनतेनी दिली आहे , स्वातंत्र्यानंतर अमुक पंतप्रधान असता तर तमुक झाले असते अशा अात्याबाईला मिशा असत्या तर? अशा गोष्टींमध्ये मध्ये मला तरी रस नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
व
विशुमित Sat, 02/10/2018 - 11:01 नवीन
आघाडीचे कीर्तनकार असतात ना अभंग घेतात एक आणि दृष्टांत देतात कुठली तरी प्रापंचिक, विनोदी, नेहमीचे, दोन चार इकडचे तिकडेच मस्त अभंग गातात आणि दीड तासाचे कीर्तन समाप्त. पुन्हा दुसऱ्या कार्यक्रमाला, तिकडे तेच कॅसेट लावतात. दृष्टांत आलटून पालटून. लोकांना असले कीर्तनकार खूप म्हणजे खूप आवडतात. लोकांना फक्त फर्डा वक्तृत्व करणारा, हावभाव करणारा, प्रसंगी रडणारा नौटंकीबाज कलाकार कीर्तनकार भावतो. सगळीकडे कॅसेट एकच. त्यांनी कीर्तनासाठी घेतलेला अभंग कोणता आहे, त्याचा कशा प्रकारे वाच्यार्थ आणि नंतर भावार्थ सोडवला आहे याचे कोणाला सोयरे सुतक नसते. दिसतो कसला भारी, कपडे कसले भारी, बोलतो कसला भारी, गातो कसला भारी , विनोद करतो कसला भारी एवढेच प्रिय असते. बाकी सगळी फेका फेकी का करेना.. कोण तपासायला जातंय. बाकी घेतात/ म्हणतात म्हणून आपण पण घ्या त्यांचे चरण दर्शन...! सब मायेचा दरबार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ब
बिटाकाका Sat, 02/10/2018 - 11:17 नवीन
वाच्यार्थ आणि भावार्थ शब्द आवडले. परवा तीन तलाकबद्दल एक नेते काहीतरी बोलले तो वाच्यार्थ होता की भावार्थ? की अजून कोणता अर्थ होता? त्यांनी लाख फेकफेकी करूद्यात हो, तुम्ही आहात ना सुज्ञ? मग दाखवा ना त्यांची फेकफेकी उघड करून. उगाच फेकफेकी वगैरे मोठे शब्द वापरले की आपण फार अभ्यास करून बोलतो असे वाटायचे काही कारण नसावे. लोक कीर्तनातून काहीही सांगितले तर माना डोलावतात, कारण ते "श्रद्धाळू/भक्ताळू" किंवा इथल्याच एका नास्तिक लेखकाच्या मतानुसार मूर्ख असतात असे आपल्याला म्हणायचे आहे का? बाकीचे काही कीर्तनकार कधीही न बोलता, काही इंग्लिशबाधित हिंदीमध्ये आणि काही कीर्तनकार फक्त काड्या सारण्यासाठी कीर्तन करायचे हे निदर्शनास आणू इच्छितो. लोक त्यांनाही माना डोलावतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 02/10/2018 - 11:49 नवीन
<<वाच्यार्थ आणि भावार्थ शब्द आवडले.>> ==>> धन्यवाद. आमच्या गुरुवर्यांचे आहेत (जेष्ठ कीर्तनकार आहेत, कृपया गैरसमज नसावा) <<<परवा तीन तलाकबद्दल एक नेते काहीतरी बोलले तो वाच्यार्थ होता की भावार्थ? की अजून कोणता अर्थ होता?>>> ==>> हे मला कशाला विचारता ? अशी शिक्के मारून सुरवात तुम्ही करता आणि मग म्हणता पोरेसोरे दगडे मारून पळून गेली. <<<त्यांनी लाख फेकफेकी करूद्यात हो, तुम्ही आहात ना सुज्ञ?>> ==>> ढिगाने लेख पडलेत, वाचून काढा. <<<लोक कीर्तनातून काहीही सांगितले तर माना डोलावतात, कारण ते "श्रद्धाळू/भक्ताळू" किंवा इथल्याच एका नास्तिक लेखकाच्या मतानुसार मूर्ख असतात असे आपल्याला म्हणायचे आहे का? >>> ==>> काहीही सांगितले/सांगत असेल आणि त्याला "श्रद्धाळू/भक्ताळू" फक्त माना डोलवत असतील तर अशा लोकांना मूर्खच म्हंटले पाहिजे नाही का? <<<बाकीचे काही कीर्तनकार कधीही न बोलता, काही इंग्लिशबाधित हिंदीमध्ये आणि काही कीर्तनकार फक्त काड्या सारण्यासाठी कीर्तन करायचे हे निदर्शनास आणू इच्छितो.>>> ==>> अडचण खरी ही आहे, म्हणून लोकांना चष्म्याचे कारण पुढे करून टोप्या घालायचे काम चालले आहे. <<<लोक त्यांनाही माना डोलावतात!>> ==>> लोकांनी त्यांच्या माना मोडल्या आहेत . त्यामुळे सध्य कीर्तनकारांनी देखील त्या भ्रमात राहू नये. टाळकरी प्रसंगी डोक्यात टाळ घालायला पण मागे पुढे पाहत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sat, 02/10/2018 - 12:11 नवीन
काही म्हणजे काही कळले नाही बघा! तुम्हाला का विचारायचे म्हणजे? तुम्ही का विचारत आहात मग इतरांना? कसले शिक्के? गुरुवाऱ्यांचे नाव आले की तिथे आपली प्रतिक्रिया असते हे एक निरीक्षण आहे. तुम्ही आणखी कोणाचे समर्थक असाल तर तसं सांगा, म्हणजे त्यांचे प्रश्न तुमच्याकडे वळवू, हा.का.ना.का. ढिगानी लेख पडले आहेत तुमच्यासाठी देखील. असली उत्तरे कोणीही देऊ धकतो, कौशल्य काहीही नाही. तेच सांगतोय, (बहुतांशी)जनता हुशार आहे हो, निश्चिन्त रहा! तुमच्या मूर्ख म्हणण्याने ती मूर्ख ठरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 02/10/2018 - 12:35 नवीन
कोण गुरुवर्य ? कसले निरीक्षण? कोणाचे समर्थक ? कोणाला काय विचारायला गेलो मी? काही म्हणजे काही कळले नाही बघा! आता कुठे प्रतिक्रिया द्याची यासाठी पण आधार लिंक करावा लागणार की काय ? तेच सांगतोय, (बहुतांशी)जनता हुशार आहे हो, ते काहीही सांगितले तरी माना डोलावणारे मूर्ख नाही आहेत. त्यामुळे आम्ही देखील निश्चिन्त आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sat, 02/10/2018 - 13:39 नवीन
गुरुवर्य कोण हे पुढे संदर्भ दिसला की सांगतो/कळवतो! बाकी, "आधार लिंक..." बद्दल परत एकदा ह्याह्यह्या...(सर्कल पूर्ण झाले)!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ब
बिटाकाका Sat, 02/10/2018 - 11:06 नवीन
पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही काय म्हणताय ते मला अजूनही कळले नाही. पंतप्रधान उत्पादन दुप्पट करण्याबद्दल बोलले आणि जेटली रब्बीचा भाव दिडपट दिला म्हणाले असं तुम्ही म्हणताय. बरं मग? तुम्हाला नेमकं कोण काय खोटं बोललं असं सूचित करायचंय ते सांगता का? दुसरा मुद्दा - अत्याबाईला मिशा आल्या असत्या तर वगैरे गोष्टींमध्ये तुम्हाला नसेल हो रस पण म्हणून जनतेला ते कळुच नये की काय? मागाच्याना जनतेने शिक्षा ही त्यांनी शेण खाल्ले म्हणून होती हे मान्य केल्याबद्दल अभिनंदन! तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्याच्या सत्तेतील पक्षाने चुनावी जुमले वापरू नये असा नियम आहे की काय? त्यांच्या भाषणातील बरेचसे मुद्दे (मी परत अधोरेखित करू इच्छितो की त्यांची कॉंग्रेसवरील सगळी टिका बहुतांशवेळी "आपने कहा.." याने सुरुवात करून होती) हे काँग्रेस करत असलेल्या हिट अँड रनला प्रत्युत्तर म्हणून होते. तुम्हाला फक्त त्यांचे काही जुमले लक्षात राहतात हा मोदींचा दोष असू शकत नाही. असो, ज्याच्या त्याच्या भूमिकेनुसार माणूस एखादी गोष्ट ग्रहण करत असतो. तुम्ही एखादेवेळेला तरी त्यांच्या भाषणात हे चांगलं वाटलं किंवा ते सत्य परिस्थितीला धरून होतं असं लिहिणार आहात का? नसेल तर मग तुम्ही मोदी फेकू आहेत ह्या तुमच्या मताला कवटाळून बसण्यास हरकत नसावी. ह्यांनीही शेण खाल्ले तर जनता कदाचित कोणी जास्ती शेण खाल्ले ते बघून त्यांना पुढच्यावेळी शिक्षा देईल हे नक्की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Sat, 02/10/2018 - 11:44 नवीन
पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही काय म्हणताय ते मला अजूनही कळले नाही. अर्थमंत्री बजेट भाषणात धातांत खोटं बोलतात हे मी स्पष्ट म्हटलं आहे, त्याच आकडेवारीचा आधार घेवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले असे पंतप्रधान म्हणणार. त्यापेक्षा आताच अर्थमंत्र्यांना खोटी आकडेवारी फेकल्याबद्दल तंबी का देत नाही? की त्यांनाही ही फेक आकडेवारी मान्य आहे? मागाच्याना जनतेने शिक्षा ही त्यांनी शेण खाल्ले म्हणून होती हे मान्य केल्याबद्दल अभिनंदन! मी कधीच अमान्य केलेले नाही. अभिनंदनाची गरज नाही. सध्याच्या सत्तेतील पक्षाने चुनावी जुमले वापरू नये असा नियम आहे की काय? मी असं काही म्हटलेच नाहीये. चूनावी जुमल्याकरता संसदेचा वापर करत असतील तर चांगलेच आहे. पडुदे प्रथा, वाटल्यास श्रेयही घेऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sat, 02/10/2018 - 12:02 नवीन
जेटली काय म्हणाले हे वाचून त्याबद्दल बोलतो. तुम्ही त्या दोघांच्या वक्तव्याचा संबंध जोडून मोदी पुढे असे म्हणतील असा काहीसा निष्कर्ष काढता आहात असे जाणवते, अधिक माहितीची आवश्यकता आहे. संसदेत राजकीय भाषणाची प्रथा पडू दे? हाहाहा! थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे कि कालचे मोदींचे भाषण म्हणजे संसदेतील पाहिले राजकीय भाषण आहे? काहीच्या काही! तरी मी वर विचारले तुम्ही खरगे यांचे भाषण आणि इतर नेत्यांचे भाषण वाचले/ऐकले का. मोदींचे भाषण आतापर्यंतच्या अनेक भाषणांपैकी मुद्देसूद आणि चांगले होते असे नम्रपणे नमूद करू इच्छितो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
व
विशुमित Sat, 02/10/2018 - 12:26 नवीन
<<<मोदींचे भाषण आतापर्यंतच्या अनेक भाषणांपैकी मुद्देसूद आणि चांगले होते असे नम्रपणे नमूद करू इच्छितो!>>> ==>> काय मुद्दे होते आणि ते चांगले का होते हे जरा सांगता का ? आम्ही ऐकली दोन्ही भाषणे पण त्यातले नेमके चांगले काय हे समजायला आमच्याकडे एवढी हुशारी नाही आहे. कृपया सांगाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sat, 02/10/2018 - 14:02 नवीन
हो नक्की सांगू शकतो! तुम्ही हुशार आहात किंवा नाहीत याच्याशी माझं काहीही देणं घेणं नाहीये! अर्थात तुम्ही अडीच तासाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला समजला नाही असे म्हणत आहात म्हणून मी माझा वेळ इन्व्हेस्ट करून लिहू शकतो पण त्यांनातरही कोणाचा चष्माच राहणार असेल तर माझा वेळ वायाच जाणार!फक्त एक सांगतो मी स्वतः मोदींची दोन्ही, लोकसभा आणि राज्यसभेतील, भाषणे पूर्ण ऐकली. त्यात फक्त काँग्रेसवर टिका होती म्हणणारे दांभिक किंवा बायस्ड आहेत असेच म्हणायला हवे. त्यांची राजकीय भाषणे फार काही श्रवणीय असतात असे मला अजिबात वाटत नाही पण त्यांचे मुद्दे समजावून घेण्यासाठी त्याकडे कानाडोळा करायला कसली अडचण असते? असो तुम्ही (केस न उपटता) ती अडीच तासांची भाषणे ऐकली असतील असे मला वाटत नाही, शिवाय शेवटचा प्रतिसाद माझाच असावा असे मला वाटत नाही...त्यामुळे माझ्याकडून फुलस्टॉप!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 02/10/2018 - 14:19 नवीन
तुम्ही हा चष्मा शब्द वापरता ना तिथेच घोळ होतो. राजकीय सोडून बाकी काय मुद्दे मांडले आणि ते कसे चांगले एवढेच समजून सांगा म्हणत होतो. श्रवणीय तर निवृत्तीमहाराजांचे पण कीर्तन असते. फूल्सटोप द्यायला देखील जास्त कौशल्ल्य लागते असे मला वाटत नाही. असो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
म
मार्मिक गोडसे Sat, 02/10/2018 - 14:35 नवीन
जेटली काय म्हणाले हे वाचून त्याबद्दल बोलतो. वाचा वाचा. काळजीपूर्वक वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sat, 02/10/2018 - 15:13 नवीन
वाचले - मला जे कळले त्याप्रमाणे, जेटली म्हणाले की बहुतेक रब्बी पिकांना आधीच आम्ही दिडपट हमीभाव दिला आहे (म्हणजे उत्पादन खर्चाच्या मिनिमम ५०% नफा). आता उरलेल्या पिकानाही दिडपट हमीभाव (एमएसपी) लागू करण्यात येईल. नुसते हे न करताच जर हमीभाव बाजारात मिळत नसेल तर सरकारे अशी पिके खरेदी करून हमीभाव मिळेल याची काळजी घेतील. गुगल करून पाहिले तर 2016-17 आणि 2017-18 या दोन्ही वर्षात रब्बी पिकांचे हमीभाव सरकारने वाढवले होते. आता यातील नेमक्या कुठल्या भागावर तुमचा आक्षेप आहे हे सांगाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Sat, 02/10/2018 - 15:25 नवीन
रब्बी पिकांचे उत्पादन खर्च किती धरले व प्रत्यक्षात उत्पादन खर्च किती आला त्याप्रमाणे दीडपट भाव दिला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sat, 02/10/2018 - 15:28 नवीन
तुम्ही दिला नाही असा दावा करतय का? मग त्याचे प्रमाण द्याल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Sat, 02/10/2018 - 17:54 नवीन
गव्हाचा उत्पादन खर्च १२५६, उत्पादन खर्च+ ५०%= १८८४. जाहीर केलेला आधारभाव १७३५. हरभरा उत्पादन खर्च ३५२६, उत्पादन खर्च+५०%= ५२८९. जाहीर केलेला आधारभाव ४४००. कृषिमूल्य आयोग धरत असलेला उत्पादन खर्च हा नेहमी वास्तव खर्चापेक्षा कमीच असतो. आता अर्थमंत्री अनावधानाने असे दावे करत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sat, 02/10/2018 - 18:39 नवीन
कृपया संदर्भ द्याल का? बाकीच्या पिकांबाबत के स्थिती आहे तेही पाहता येईल. शिवाय मागच्या सरकारचे भाव काय होते तेही पाहणे योग्य ठरणार नाही का? किमान परिस्थिती आश्वासक आहे का हे तरी ठरवता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Sat, 02/10/2018 - 20:15 नवीन
ते तुम्ही शोधा , सापडलं तर इथे द्या. घाला सापाच्या बिळात हात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा