Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग २२

श
श्रीगुरुजी
Mon, 02/12/2018 - 19:03
🗣 228 प्रतिसाद
मल्याची किंगफिशर कंपनी इंग्लंडमध्ये खटला हरली. ९ कोटी डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागणार. https://timesofindia.indiatimes.com/world/uk/vijay-mallyas-kfa-loses-court-battle-in-uk-to-pay-90m-in-claims/articleshow/62886014.cms

प्रतिक्रिया द्या
39850 वाचन

💬 प्रतिसाद (228)
न
नाखु Tue, 02/13/2018 - 04:44 नवीन
इंडियन एअर फोर्सची राफेल विमान खरेदीची मागणी सत्तेवर असताना चक्क 10 वर्षे काँग्रेसला पुरी करता आली नाही आणि मोदींनी मात्र त्या विषयाला हात घातला आणि अवघ्या एका वर्षात विमान खरेदीचा करार केलासुद्धा आणि तोसुध्दा काँग्रेस खरेदी करत होती त्यापेक्षा तब्बल 12600 कोटी रुपये देशाचे वाचवून। हिच खरी त्यांच्या आजच्या कोल्हेकुईची खरी कारणे आहेत। म्हणे राफेल विमान खरेदीमध्ये मोदींनी भ्रष्टाचार केलाय। देशातील किती जनता तुमचा हा आरोप गंभीरपणे घेतेय हे तरी जरा निरखून पहा। कट्टर मोदी विरोधक लोकसत्ताने काल काय बातमी दिलीय ती वाचाच-" मोदी सरकारचा राफेल करार काँग्रेसपेक्षा 2268 कोटी रुपयांनी स्वस्त" असा मथळा देऊन लोकसत्ता म्हणतो- मोदी सरकारने केलेल्या करारानुसार एका राफेल लढाऊ विमानासाठी 91 दश लक्ष युरो किंवा 717 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत। हा 36 विमानांचा करार असून 25812 कोटी रुपये भारताला मोजवे लागणार आहेत। युपीए सरकारच्या करारानुसार एका विमानासाठी 99 दश लक्ष किंवा 780 कोटी रुपये मोजावे लागणार होते। त्यामुळे नवीन करारानुसार प्रति राफेल विमान 63 कोटी रुपये वाचणार आहेत। एकूण 36 विमानांच्या खरेदीचा विचार करता भारताची नवीन करारानुसार 2268 कोटीची बचत होणार आहे। लोकसत्ताने इंडिया टुडे सूत्रांचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे। इंडिया टुडेने विविध सुत्रांबरोबर चर्चा करून ही माहिती मिळवलीय। सुटे भाग आणि देखभाल खर्च मिळून 36 विमानासाठी 25812 कोटी खर्च येईल। युपीएचा करार कायम ठेवला असता तर सरकारला आता 28080 कोटी मोजावे लागले असते। मोदी सरकारने 2015 मध्ये युपीएचा 126 विमानांचा करार रद्द केला आणि 36 विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला। कारण त्या करारात अनेक विसंगती होत्या। जेव्हा आपला देश 126 विमानं फ्रान्सकडून खरेदी करेल तेव्हा युपीए सरकारच्या तेव्हाच्या खरेदीपेक्षा आताचं मोदी सरकार देशाची किती रक्कम वाचवेल याची राहुल गांधींना कल्पना तरी आहे का ? तब्बल 7938 कोटी रुपये म्हणजे चक्क 10 विमाने मोफत मिळतील। युपीए सरकारनेच 2008 मध्ये फ्रान्सशी गुप्ततेचा करार केला होता म्हणून लोकसभेत सखोल माहिती देणे योग्य नाही हेही राहुलना माहीत नाही म्हणायचं का ? उचलली जीभ लावली टाळ्याला केल्यामुळे त्यांची जनमानसातील विश्वासार्हता मात्र पणाला लागलीय। संजीव पेडणेकर संदर्भ- लोकसत्ता 9/2/2018
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Wed, 02/14/2018 - 16:55 नवीन
या प्रतिसादानुसार https://www.misalpav.com/comment/982157#comment-982157 खरेदीची किंमत अजूनतरी गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे नमो भक्तांचा अजून एक अविष्कार यापेक्षा काय वेगळे वर्णन करणार? हा करार मागील सरकार दहा वर्ष करीत होतं याचा काही विशेष दुवा आहे का? आणि सध्याच्या सरकारने हा करार लवकरात लवकर पूर्ण केला याचे कारण मागील सरकारने मसुदा तयारच ठेवला होता. विमान खरेदी म्हणजे 'केवढ्याला दिली विमानं' इतकी सोपी नसावी अशी आमची समजूत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रचेतस Tue, 02/13/2018 - 04:46 नवीन
आज, मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजी निशिथकालात म्हणजे रात्री १२.२८ ते उत्तररात्री १.१८ या कालात माघ कृष्ण चतुर्दशी आहे, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. आज, शिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर एकच चमचा दूध वाहून उरलेल्या दुधाचा प्रसाद म्हणून द्यावा, पिशवीभर दूध शंकराच्या पिंडीवर ओतू नये, असे आवाहन सोमण यांनी शिवभक्ताना केले. ब्रह्माने सृष्टी निर्माण केली. विष्णू पालन करतो आणि भगवान शंकर सृष्टीतील वाईट गोष्टींचा लय करतो, अशी श्रद्धा आहे. आपल्यातील वाईट गोष्टींचा लय व्हावा, यासाठीच शिवपूजन करावयाचे असते. रात्री आकाशात मृग- व्याधाचे दर्शनही घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 02/13/2018 - 04:54 नवीन
तुमच्या वतीने हा ट्वीट का आला कळलं नाहि :) कहना क्या चाहते हो भाई ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 02/13/2018 - 04:57 नवीन
ताजी घडामोड म्हणून :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/13/2018 - 05:49 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/13/2018 - 05:03 नवीन
ब्रम्ह विष्णू आणि महेश या सर्व कवी कल्पना आहेत. आम्ही कुठेही शिवपूजा वगैरे करणार नाही. धन्यवाद. मोदींच्या सभांसाठी वकिलातींचा गैरवापर. मा. नरेंदरजी मोदी हे विदेश दौर्‍यावर भारतीयांची सभांना गर्दी व्हावी म्हणून भारतीय वकिलातींचा गैरवापर करत असल्याचे म्हटल्या जात आहे. मस्कत येथे मोदींच्या सभेसाठी भारतीय वकिलाताने तेथील उद्योजकांना आपल्या कामगारांना पाठविण्यासाठी पत्राद्वारे सूचना दिल्या होत्या असे आरोप केला जात आहे. विदेश दौर्‍यावर असतांना आधीच्या सरकारांना बदनाम करण्याची परंपरा मोदींनी कायम राखली आहे असे काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे. ( बातमी सौजन्य दै. लोकमत) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 02/13/2018 - 05:12 नवीन
मुंबई - राज्यातील पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजनेंतर्गत पुस्तके खरेदी करताना राज्याच्या शिक्षण विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमाचा वर्षाव केला आहे. थोर व्यक्तींपेक्षा मोदी यांच्या चरित्राची माहिती देणाऱ्या पुस्तकांवर चक्क 59 लाख 42 हजारांचा खर्च केल्याने हे प्रेम चर्चेत आले असून, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे. पंतप्रधान मोदी यांच्या पुस्तकांवर शिक्षण विभागाने मराठी भाषेतील 72 हजार 933 प्रती, इंग्रजीतील 7148, गुजरातीत 33 आणि हिंदीतील 425 प्रती खरेदी केल्या आहेत. मात्र, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुस्तक खरेदीसाठी केवळ तीन लाख 25 हजार रुपये खर्च केले आहेत. गांधीजींवरील पुस्तकांसाठी सम्राट प्रकाशनाकडून 2675 प्रती, डायमंड पॉकेटकडून गुजराती भाषेतील 33 प्रती, निशिगंध प्रकाशनाकडून 7260 प्रती शिक्षण विभागाने खरेदी केल्या आहेत; तर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 78 हजार 388 पुस्तक प्रतींसाठी 24 लाख 28 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्राची माहिती देणाऱ्या 78 हजार 348 प्रती शिक्षण विभागाने खरेदी केल्या. त्यासाठी 22 लाख 63 हजार रुपये रक्कम खर्च करण्यात आली. खरेदी पारदर्शक - तावडे पुस्तक खरेदीप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झाली आहे. मोदी यांच्यावरील पुस्तके सर्वाधिक खरेदी केल्याचा दावा चुकीचा आहे. शिवाजी महाराज, अब्दुल कलाम, शाहू महाराज आणि साने गुरुजी यांच्या चरित्रावरील पुस्तक खरेदीची संख्याही मोठी आहे, असा दावा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला; परंतु या पुस्तकांसाठी खर्च केलेली रक्कम त्यांनी सांगितली नाही. ( बातमी सौजन्य दै. सकाळ)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/13/2018 - 05:18 नवीन
जम्मु : सुंजवा लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यांसाठी थेटपणे पाकिस्तानला जबाबदार ठरवतांना संरक्षणमंत्री निर्मला सीताराम यांनी शेजारी देशाला या दु:साहसाची किंमत चुकवावी लागेल असा इशारा सोमवारी दिला. (दै. सकाळ) [ हे सरकारही सालं पुंगट निघालं : प्रा.डॉ. ] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 02/13/2018 - 05:23 नवीन
पुणे : विकासाचा मंत्र हा भाजप सरकारच्या धोरणाचा भाग आहे, परंतु त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा धोकादायक आहे, असे माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी येथे सांगितले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात माजी केंद्रीय गृह व न्यायसचिव आणि लेखक डॉ. माधव गोडबोले यांच्याशी निवेदक सुधीर गाडगीळ यांनी संवाद साधला. देशात २० टक्के अल्पसंख्यांक आहेत. पुढील १०-१५ वर्षात ही संख्या ३०-३५ टक्क्यांपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे भारतात हिंदुत्व ही संकल्पना राबवण्याजोगी नाही. सरकारने धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवणे अत्यंत घातक आहे, अशा शब्दांत गोडबोले यांनी चिंता व्यक्त केली. ‘भाजपने लोकपाल विधेयकासाठी आंदोलन केले. त्यांचे सरकार येऊन ४ वर्षे झाल्यानंतरही याबाबत काहीच पावले उचलली गेली नाहीत. राजकीय टिपण्णीत अग्रेसर असलेला सोशल मीडिया विधायक बाबतीत सक्रिय दिसत नाही. बोलायचे पुष्कळ आणि करायचे काहीच नाही, हे चित्र आजही कायम आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधानांची काम करण्याची पध्दत बदलली आहे. कोणत्याही प्रकरणात ‘माझी दिशाभूल करण्यात आली’ असे म्हणण्याची फॅशन रुजली आहे. लोकशाही अस्तित्वात आहे, तोवर उद्योगपतींना काय करू द्यावे, काय करू देऊ नये, याचे दंडक घातले पाहिजेत, अशी अपेक्षाही गोडबोले यांनी बोलून दाखविली. ...तर बाबरी मशीद वाचवता आली असती बाबरी मशिदीचे पतन हा भारताला स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत मोठा धक्का होता. उत्तर प्रदेशातील राज्य सरकार बरखास्त करण्याची सूचना गृह विभागातर्फे करण्यात आली होती. सरकारला राष्ट्रपती राजवट लागू करता आली असती, असेझाले असते तर बाबरी मशीद वाचवता आली असती. - माधव गोडबोले, (दै. लोकमत) माजी केंद्रीय गृहसचिव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अर्धवटराव Tue, 02/13/2018 - 05:35 नवीन
बाबरी बद्दल इतक्या टोकाचा धक्का का बसतो लोकांना कळत नाहि :) अर्धा काश्मीर पाककडे जाणे, तिबेट, सियाचीन ड्रेगनने गिळणे, आणिबाणी, एका विद्यमान आणि एका भूतपूर्व (कदाचीत तत्कालीन भावी देखील ) पं.प्र.ची हत्या... शिवाय मिपावर आध्यात्म, अंधश्रद्धा वगैरे लेखन... अनेक धक्के बसलेत भारताला. बाबरीचं मॅग्नीट्युड मोठं होतच, पण सर्वात मोठं होतं असं वाटत नाहि. मुळात ते प्रकरण इतक्या लेव्हलला पोचायलाच नको होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 02/13/2018 - 05:39 नवीन
बाबरीनंतरच जम्मू काश्मिरपर्यंतच मर्यादित असलेलं अतिरेक्यांचं लोण भारतभर पसरलं, इतर शहरांतही साखळी बॉम्बस्फोट घडू लागले, तोकाचं धृवीकरण होऊ लागल< ह्या घटना सर्वसामान्यांशी थेट निगडित असणार्‍या होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Tue, 02/13/2018 - 05:52 नवीन
पण अतिरेक्यांचं लोण भारतात पसरणारच होतं. त्याची सोय २०व्या शतकाच्या पुर्वार्धात झाली होती. धृवीकरणाची प्रक्रीया बाबरीमुळे स्टिम्युलेट झाली हे खरं आहे. पण अदरवाइज ते काम एक-दोन दशकं उशीराने झालं असतं. बाबरीनामक समस्या मुळात उत्पन्नच व्हायला नको होती. पण तो व्हायरस आपल्या शरीरात होता. त्याचे परिणाम कधि होतील हा काळाचा प्रश्न होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 02/13/2018 - 06:25 नवीन
ते खरंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/13/2018 - 05:36 नवीन
पाकशी चर्चेशिवाय पर्याय नाही : मेहबूबा. श्रीनगरमधे भारतीय जवान आणि दहशतवादी यांच्यात जोर्दार चकमक सुरु असतांना जम्मू काश्मीरच्या मूख्यमंत्री मेहबूबा मुफ़्ती यांनी राज्यातील हिंसाचार संपुष्टात आणण्यासाठी भारत आणि पाकिस्तान दरम्यान नव्याने चर्चा सुरु झाली पाहिजे असे मत व्यक्त केले . वृत्तवाहिन्यांचा समाचार घेतांना त्या म्हणाल्या की फ़ारुक अब्दुला आणि मेहबूबा मुफ़्ती पाकशी चर्चा करावी असे म्हणाले की त्यांना राष्ट्र विरोधी ठरवले जाते, मात्र, प्रश्न सोडविण्यासाठी चर्चेशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. रक्तपात थांबवायचा असेल तर पाकिस्तानशी चर्चा आवश्यक आहे. मला माहित आह ए, की व्रुत्तनिवेदक मला राष्ट्रविरोधी ठरवतील मात्र याने कोणताही फ़रक पडत नाही जम्मू काश्मीरच्या लोकांना त्रास होत आहे. युद्ध हा पर्याय नस्ल्यामुळे आपण चर्चा केली पाहिजे. (दै. सकाळ ) [ हेच दिवस बघायचे होते का तुम्हाला सत्ता देऊन कार्यवाही करा. प्रा.डॉ. ] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 02/13/2018 - 05:40 नवीन
सिंदानूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टिप्पणी करताना म्हटले आहे, की मोदी हे यष्टीरक्षकाकडे पाहून फलंदाजी करतात, त्यामुळे त्यांना माहितच नसते की चेंडू कोठून येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘रियर व्ह्यू मिरर’ संबंधी वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधी आता त्यांची क्रिकेटपटूशी तुलना केली आहे. मोदी हे असे क्रिकेटपटू आहेत जे, यष्टीरक्षकाकडे पाहत फलंदाजी करतात. त्यांना हे माहीत नसते की चेंडू कुठून येतोय. जर सचिन तेंडुलकरने यष्टीरक्षकाकडे पाहत फलंदाजी केली असतील तर त्याला धावा काढता आल्या असत्या का? कर्नाटकमधील सभेत बोलताना राहुल यांनी मोदींना लक्ष्य केले. आमचे पंतप्रधान असे क्रिकेटर आहेत जे विकेटकिपरकडे पाहतात आणि त्यांना हेही माहीत नसते की चेंडू कुठून येत आहे. मोदी भविष्याविषयी बोलण्याऐवजी भूतकाळावरच बोलत आहेत. त्यांचा कार्यकाळ संपण्यास आता जास्त वेळ राहिला नसून, त्यांनी फक्त भाषणबाजी बंद करून काम करावे. पाच वर्षांत तुम्ही काय केले, हे तुम्हाला नागरिकांना सांगावे लागेल. (दै. सकाळ)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/13/2018 - 05:46 नवीन
फक्त भाषणबाजी बंद करून काम करावे. पाच वर्षांत तुम्ही काय केले, हे तुम्हाला नागरिकांना सांगावे लागेल. खरंय...! तिकडे कच्च्या तेलाचे भाव गडगडले तरी आपले पेट्रोल डिझेलचे भाव कमी होत नै ये. मला कंटाळा आला पेट्रोल भरायचा. लै जीवावर येतं दररोज हजार पाचशे रुपयांचे पेट्रोल भरायचं. ड्युटीला जाण्यापेक्षा घरी बसून राहावं वाटतं. काही विकास नका करु फक्त पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले तरी पुश्कळ आहे. -दिलीप बिरुटे (आदरणीय मोदीजींच्या भाषणाला पकलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 02/13/2018 - 05:52 नवीन
http://www.esakal.com चंदीगड : गेल्या काही वर्षांपासून 'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्ताने विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोहिम राबवत निषेध करत आहेत. मात्र, या 'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्ताने विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, ''तरुण पुरुष आणि महिलांना प्रेम करण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यामुळे 'व्हॅलेंटाइन डे'ला कोणताही निषेध किंवा हिंसाचार होणार नाही''. चंदीगड येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ''प्रेम नाही केले तर विवाह होणार नाही आणि जर विवाह झाला नाही तर सृष्टी चालणार कशी? तरुण आणि तरूणींना प्रेम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे, मला असे वाटते आपल्या मुलीला प्रेम करण्याचा हक्क आहे आणि आपल्या बहिणीलाही प्रेम करण्याचा अधिकार आहे. असे म्हणत यंदा 'व्हॅलेंटाइन डे'ला कोणताही निषेध किंवा हिंसाचार होणार नाही''. गेल्या अनेक वर्षांपासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून 'व्हॅलेंटाइन डे'वर भारतात बंदी आणली जावी, यासाठी मागणी केली जात आहे. 'व्हॅलेंटाइन डे'ला त्यांच्याकडून हिंदूविरोधी आणि भारतविरोधी म्हणून संबोधले जात आहे. दरम्यान, विहिपच्या या निर्णयामुळे 'व्हॅलेंटाइन डे'साठी तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना याचा फायदा होणार आहे. (दै. सकाळ)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पुंबा Tue, 02/13/2018 - 06:00 नवीन
दरम्यान, विहिपच्या या निर्णयामुळे 'व्हॅलेंटाइन डे'साठी तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना याचा फायदा होणार आहे.
ही टिपिकल 'सकाळगिरी' बघा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 06:09 नवीन
हाहाहा..!! यात काय तयारी करणार आहेत ? आरास सजावणार का आता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 06:01 नवीन
प्रा डॉ. तुमच्या ताज्या घडामोडी वाचून असे वाटतंय की ३-४ वर्ष आपण टाईम मशीन ने कोणत्यातरी युगामध्ये गेलो होता आणि आता पुन्हा पूर्वस्थितीत परतलो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/13/2018 - 06:02 नवीन
खरंय....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 06:02 नवीन
प्रा डॉ आणि प्रचेतस असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 02/16/2018 - 11:47 नवीन
प्राडॉ अणि पचेतस यांची जुगलबंदी आवडली ! बातम्याही रोचक !! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सचिन७३८ Tue, 02/13/2018 - 06:28 नवीन
पुढील १०-१५ वर्षात ही संख्या ३०-३५ टक्क्यांपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे भारतात हिंदुत्व ही संकल्पना राबवण्याजोगी नाही. सरकारने धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवणे अत्यंत घातक आहे, अशा शब्दांत गोडबोले यांनी चिंता व्यक्त केली.
विचार करण्याजोगी गोष्ट आहे. उलट २० टक्के वाढून ३० ते ३५ टक्के होणे हेच मुळात धर्मनिरपेक्षतेविरूद्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अर्धवटराव Tue, 02/13/2018 - 05:37 नवीन
कदाचीत २०१९ निवडणुकांची पार्श्वभूमी असावी या प्रकरणाला... कोण जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/13/2018 - 06:01 नवीन
त्याच्या पुढील निवडणूकीत लोक इतकं खोलवर गाडतील ना की लोक विसरुन जातील. की कोणा थापाड्याचं सरकार आपण निवडून दिलं होतं. प्रश्न पूर्वीही होते आताही आहेत. कोणत्या प्रश्नांना प्राधान्याने सोडवायला हवं ? सामान्य नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत ? त्यांचे रोज जीवनमरणाचे प्रश्न काय आहेत याकडे लक्ष देण्याची गरज आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
प्रचेतस Tue, 02/13/2018 - 06:24 नवीन
देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक २२, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर ११ तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरोधात तीन गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहे. एडीआरने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून देशातील मुख्यमंत्र्यांवर दाखल असलेल्या गुन्हेगारी खटल्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. फडणवीस यांच्याविरोधात २२ गुन्हे आहेत. त्यातील तीन गंभीर स्वरुपाचे आहेत. तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर ११ खटले दाखल आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. त्यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. (सौजन्य-मटा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/13/2018 - 07:28 नवीन
मुझफ्फरपूर : देश संकटात सापडला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तीनच दिवसांमध्ये लष्कर उभे करू शकतो, असे वक्तव्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथील संघाच्या शिबिरामध्ये बोलताना केल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. भारतीय लष्करास जे करण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा अवधी लागतो, तेच लष्करी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे काम आमची संघटना तीन दिवसांमध्ये पूर्ण करू शकते. हीच आमची ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. देशासमोर आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यानंतर राज्यघटनेने परवानगी दिली तर आमचे स्वयंसेवक युद्धाच्या आघाडीवरदेखील जातील. रा. स्व. संघ ही काही लष्करी अथवा निमलष्करी संघटना नसून, ते एक पारिवारिक संघटन आहे. येथे प्रत्येक स्वयंसेवक लष्कराच्या शिस्तीमध्ये वावरत असतो. आमचे स्वयंसेवक हे नेहमीच देशासाठी आनंदाने सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी तयार असतात, असेही त्यांनी नमूद केले. भागवत यांनी या वेळी स्वयंसेवकांना समाजामध्ये चांगली वर्तणूक ठेवण्याचे आवाहन केले. सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवर स्वयंसेवकांनी आपले चारित्र्य जपावे आणि आपल्या वर्तणुकीतूनच समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. (दै. सकाळ) ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भारतीय लष्करास जे करण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा अवधी लागतो, तेच लष्करी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे काम आमची संघटना तीन दिवसांमध्ये पूर्ण करू शकते. हीच आमची ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतीय लष्करावर आमचा विश्वास आहे. बाय द वे, हे टोपीवाले आणि त्यांच्या सर्व नेत्यांना खरडून सीमेवर पाठवा रे. पाहू तरी सैनिकांपेक्षा असे काय मोठे दिवे लावतात ते.....! प्रा.डॉ. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 02/13/2018 - 07:33 नवीन
लाडाचा जावई म्हणून सासुरवाडीची मंडळी जावयाचे सर्व चोचले पुरवतात. त्याला मानसन्मानही देतात. पण हाच जावई डोक्यावर बसू लागला तर त्याला चोप देण्यासही सासुरवाडीची मंडळी मागे पुढे पाहत नाहीत. अहमदाबादच्या बोटाडमध्ये अशीच एक घटना घडली आहे. पत्नीसह मेव्हण्याच्या लग्नाला न जाणं या जावयाला भलतंच महागात पडलं आहे. मेव्हण्याच्या लग्नाला न आल्याचा राग मनात धरून सासुरवाडीच्या मंडळींनी या जावयाची धुलाई केली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदाबादच्या बोटाड येथे ही घटना घडली. पिनाकिन सोलंकी असं या जावयाचं नाव असून ते बँकेत कामाला आहेत. ५ फेब्रुवारी रोजी पिनाकिन यांचा मेव्हणा निलेशचा विवाह होता. त्याच दिवशी पिनाकिन यांची ऑफिसात प्री-प्रमोशन ट्रेनिंग होती. त्यामुळे ते पत्नी निकितासह अहमदाबादला लग्नाला जाऊ शकले नव्हते. शनिवारी १० फेब्रुवारी रोजी पिनाकिन त्यांची आई शारदाबेन यांच्यासोबत पत्नीला घेण्यासाठी सासुरवाडीला आले होते. पण पिनाकिन यांना दारात पाहताच सासुरवाडीच्या मंडळींनी शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सासरा, मेव्हणा आणि मेव्हणीने त्यांना आणि त्यांची आई शारदाबेन यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. निकितानेही सासू आणि नवऱ्याला चोप दिला. त्यामुळे जखमी झालेल्या पिनाकिन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी चंद्रखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक अंकुर पटेल यांनी सांगितलं. (दै. मटा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/13/2018 - 07:42 नवीन
छेड काढलेल्या मुलीस 'पवित्र' करण्यासाठी तिचे कापले केस...! रायपूर - छत्तीसगडमधील कवर्धा जिल्ह्यामधील एका 13 वर्षीय मुलीची छेड काढण्यात आल्यानंतर तिला पुन्हा "पवित्र' करण्यासाठी तिच्या समाजाने तिचे केस कापल्याची घटना घडली. दरम्यान, छेड काढणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आले आहे. या मुलीस पुन्हा पवित्र करुन घेण्याचा "विधी' करणाऱ्या समाजामधील आरोपींचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. "गेल्या 21 जानेवारी रोजी अर्जुन यादव (वय 22) या आरोपीने पीडितेची छेड काढली. हा प्रकार कळताच या मुलीच्या पालकांनी पंचायतीमध्ये धाव घेतली. पंचायतीने दुसऱ्या दिवशी आरोपीकडून पाच हजार रुपयांचा दंड घेतला व प्रकरण निकालात काढले. मात्र यानंतर काही दिवसांनी बैगा आदिवासी या मुलीच्या समाजामधील काही जणांनी एक सभा घेत पालकांना संबंधित मुलगी अपवित्र झाल्याचे सांगितले. यामुळे तिला पुन्हा पवित्र करुन घेण्यासाठी तिचे केस कापण्यास सांगण्यात आले. याचबरोबर, या समाजाच्या सभासदांसाठी पालकांना मेजवानीही द्यावी लागली,'' असे येथील पोलिस अधीक्षक लाल उमेद सिंग यांनी सांगितले. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. [आपण समाजाला कोणत्या दिशेला घेऊन जात आहोत. पोलीस कार्यवाही करुन समाजातील त्या लोकांना चोपलं पाहिजे. - प्रा.डॉ.] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 02/13/2018 - 07:45 नवीन
भोर (पुणे) : टिटेघर (ता.भोर) येथील महिलांनी हाताने बनविलेल्या गोधड्यांना अमेरीकेत स्थायिक असलेल्या भारतीयांकडून मागणी होत आहे. अमेरीकेत स्थायिक असलेले अनेक भारतीय मायदेशी आल्यावर टिटेघरला भेट देऊन गोधड्या खरेदी करू लागले आहेत. याशिवाय टिटेघरमधील महिलांनी बनविलेल्या विविध वस्तूंनाही अमेरीकेतील नागरिकांना भुरळ पडली आहे. टिटेघर मधील महिलांची किर्ती सातासमुद्रापार पसरली असून महिलांना विविध वस्तू बनविण्यासाठी देशातील नागरिकांचे सहकार्य मिळाले तर या महिला चांगला व्यवसाय करू शकतील. मूळचे पुण्यातील असलेले परंतु सध्या अमेरीकेतील 'आयोवा' राज्यातील 'केडर-रॅपीड' शहरात स्थायीक असलेले प्रशांत परांजपे यांनी भारतात आल्यानंतर मित्र अमित जोशीसमवेत टिटेघरला भेट दिली. आणि महिलांकडून गोधड्या विकत घेतल्या. अमेरीकेतील मशीनवर बनविलेल्या गोधड्यांपेक्षा भारतातील महिलांनी बनविलेल्या गोधड्यांमध्ये आम्हास मायेची ऊब मिळत आहे. हाताने बनविलेल्या वस्तूंना अमेरीकेत मोठी मागणी असून टिटेघरमधील महिलांच्या गोधड्या अमेरीकेत मोठ्या प्रमाणात व चांगल्या किमतीत विकल्या जात असल्याचे परांजपे यांनी सांगितले. टिटेघरमधील ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी गोधड्या बनविण्यासाठीचे प्रशिक्षण घेतले. यासाठी भोरच्या प्रांताधिकारी मौसमी बर्डे-चौगुले आणि तहसीलदार वर्षा शिंगन-पाटील यांनी महिलांना समुपदेशन केले आणि पुण्यातील सिटी कार्पोरेशन प्रा. लि. यांच्या वतीने महिलांना योग्य पध्दतीने गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण दिले (दै. सकाळ)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/13/2018 - 07:50 नवीन
बॉलिवूडची ठुमका क्वीन शिल्पा शेट्टीला विआन नावाचा मुलगा असल्याचं सर्वश्रुत आहे. मात्र अलीकडेच तिनं आपल्याला मुलगी हवी असल्याचं बोलता-बोलता कबूल केलंय. खरं तर आधीपासूनच शिल्पाला मुलगी हवी होती. त्यात 'सुपर डान्सर २'मधील एक परफॉर्मन्स बघून ती भावुक झाली आणि मनातील ही इच्छा बोलून दाखवली. लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचा हा इशारा तर नाही ना? [समाज नावाची व्यवस्था लै वाईट असते. लोकांना फार घाई असते, काही आहे का नाही, विचारायची. सालं व्यक्तीगत आयुष्य आहे, वाटेल तसं जगू द्यावं ना -प्रा.डॉ. -] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 02/13/2018 - 08:00 नवीन
धन्स ह्या बातमीबद्दल, तिला विआन नामक मुलगा आहे हे मला ठाऊक नव्हतं(बातमी सर्वश्रुत असली तरी).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ए
एमी Wed, 02/14/2018 - 03:24 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
M
manguu@mail.com Tue, 02/13/2018 - 07:41 नवीन
तीन दिवसात काठी फिरवून आर्मी तयार होते. मग हे बाबराच्या खापरपणतूकडून तोफ उडवायची विद्या का शिकत आहेत ? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सुबोध खरे Tue, 02/13/2018 - 13:46 नवीन
मोगा खान तुम्ही नागरिक शास्त्र वाचलं नाही हे सिद्ध करून दाखवला होतंच आता इतिहासहि वाचला नाही हे हि सिद्ध करून दाखवतेय का? बाबर अरब नव्हता उझबेक होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Tue, 02/13/2018 - 14:37 नवीन
असुद्या हो. तसे तर मोघल राजपुतांचे जावई लागतात. मग अरब उझबेकवाल्यांचे पणतू न लागायला काय झाले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 02/13/2018 - 14:59 नवीन
अरब लोक इतर मुसलमानांना "कमअस्सल" समजतात. उदा ताजिक उझबेक बांगलादेशी पाकिस्तानी ई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sun, 02/18/2018 - 03:24 नवीन
आणि भारतात स्वातंत्र्य , समता आणि बंधुता आहे का ? सूतपुत्र ते सैराट !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सचिन७३८ Tue, 02/13/2018 - 06:30 नवीन
समर्थ पर्याय आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 07:00 नवीन
आपले एक मिपाकर आहेत त्यांचा हा बिगुल वरचा लेख वाचनीय आहे. http://www.bigul.co.in/bigul/1514/sec/9/alternative%20for%20Modi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन७३८
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/13/2018 - 07:21 नवीन
आदरणीय नरेंदरजी मोदींना पर्यायच नाही, किंवा सध्या सत्तेच्या राजकारणात समर्थ पर्यायच नाही, ही मानसिकता बनविण्याचे काम सध्याची यंत्रणा करीत आहे. लोकंही गोंधळून गेले आहेत. आपण एक चांगल्या लेखनाचा दुवा दिला. धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सचिन७३८ Tue, 02/13/2018 - 08:03 नवीन
संपूर्ण लेखात चर्चा फक्त मोदींवरच आहे. ह्यात १२५ वर्षांचा जाज्वल्य इतिहास असणारा पक्षही फसतो हे आश्चर्य आहे. शेवटी पक्षापेक्षा तो चालविणारा कसा आहे यावर भवितव्य अवलंबून आहे. नमो नमो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सुबोध खरे Sun, 02/18/2018 - 06:54 नवीन
तो डांगे यांचा लेख आहे . मुळातच चष्मा लावलेला आहे त्यामुळे काळा सोडून कोणताच रंग दिसणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन७३८
म
मार्मिक गोडसे Sun, 02/18/2018 - 09:02 नवीन
तो डांगे यांचा लेख आहे . मुळातच चष्मा लावलेला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 02/19/2018 - 09:48 नवीन
लेख अगोदर वाचला आणि नंतर तो डांगेंचा आहे हे वाचले. त्यामुळे मतात काही बदल झाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
M
manguu@mail.com Mon, 02/19/2018 - 10:07 नवीन
बिगुल संघाचा आहे की डांगेंचा, यावरही आवडनिवड ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
सुबोध खरे Tue, 02/13/2018 - 07:07 नवीन
काय आहे प्रा डॉ तुम्हाला लष्करी डावपेच समजत नाहीत तेंव्हा उगीच टेन्शन घेऊ नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/13/2018 - 07:17 नवीन

काय आहे प्रा डॉ
तुम्हाला लष्करी डावपेच समजत नाहीत तेंव्हा उगीच टेन्शन घेऊ नका

खरंय...! सामान्य माणूस म्हणून आम्हाला काही लष्करी डावपेच समजत नाही, हे मान्यच आहे. पण गेली साठेक वर्ष पूर्वीची सरकारं पाकिस्तानला असेच सज्जड दम आणि इशारे द्यायचे तेव्हाही तो एक डावपेचाच भाग असायचा असं समजतो. मला वाटलं होतं हे सरकार थेट लाहोरात धडक मारेल असं एक स्वप्नाळू मत होतं, सालं हाही डावपेचाचेच भाग होता ते आता ते समजलं. धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा