ताज्या घडामोडी - भाग २२
मल्याची किंगफिशर कंपनी इंग्लंडमध्ये खटला हरली. ९ कोटी डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागणार.
https://timesofindia.indiatimes.com/world/uk/vijay-mallyas-kfa-loses-court-battle-in-uk-to-pay-90m-in-claims/articleshow/62886014.cms
💬 प्रतिसाद
(228)
ब
बिटाकाका
Tue, 02/13/2018 - 10:25
नवीन
हेच लॉजिक जवानांना लावणार का तुम्ही? नाही म्हणजे पराक्रम आणि सहकाऱ्यांचे प्राण वाचवणे याच्या संबंधाचं लॉजिक समजावून सांगता का?
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 02/13/2018 - 10:54
नवीन
हे लॉजिक नाही लावणार.
ते पराक्रम गाजवून पुन्हा वचपा काढतात, स्वयंसेवकांनी कशा प्रकारे बदला घेतला ते सांगता का ?
जवान म्हणत नाहीत, आम्ही शाहिद होतो म्हणून लोकांनी आमच्यासाठी गळे काढावेत. त्यांचे ते स्वयम्भू असतात.
बायदवे केरळ मध्ये पुरोग्यम्यांबरोबर पार हत्या होई पर्यंत कसले पराक्रम करत आहेत स्वयंसेवक ?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Tue, 02/13/2018 - 12:23
नवीन
त्यांनी घ्यायला पाहिजे होता अशी आपली अपेक्षा दिसते, काहींच्या काही!
संदर्भ देता का संघाने काही गळा काढला असेल त्याचे? आणि कोणाच्या शाहिद होण्यावर कोण गळे काढतंय हे दिसतंच असते अधूनमधून. लोकशाहीची हत्या, चौथ्या खांबावर हल्ला, पुरोगाम्यांवर हल्ला, मेणबत्ती मोर्चा ई. ई. ऐकले असेलच (नाही, म्हणजे ऐकायचे असेल तर). असे गळे उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या हत्यांबाबत निघताना दिसले का कधी?
ते संविधानाला धरून चालत होते! तुमची अपेक्षा आहे का कि त्यांनी त्यांच्या हत्यांचे बदल घ्यायला पाहिजे होते? पाकिस्तानचा बदला घेणे आणि देशांतर्गत हत्यांचा बदला घेणं एकाच आहे जणू आपल्या मते!
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 02/13/2018 - 12:34
नवीन
हा फरक समजला ना जवान आणि स्वयंसेवकांमधला. बस्स एवढेच मला सांगायचे होते.
बायदवे हे पुरोगामी का फुरोगामिनी मोर्चे नाही काढले तर तीन दिवसात आर्मी उभी करणाऱ्यांनी किमान तेवढे तरी करायला पाहिजे, संविधानाच्या चौकटीत राहून. नाही का ?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Tue, 02/13/2018 - 12:42
नवीन
कोणता फरक? जरा नीट इस्कटून सांगता का? आणि तुम्ही म्हणता तो फरक कोणी कधी नाकारलंय हेही जरा सांगा?
त्यांनी मोर्चे काढायला पाहिजे होता का कोर्टात जाऊन केस लढ्याला हवी होती हा त्यांचा त्यांचा आणि त्य्नाच्या संघटनेचा प्रश्न आहे. इतरांचा त्याच्याशी काय संबंध? जवान म्हणत नाहीत कि आम्ही शाहिद होतो म्हणून लोकांनी आमच्यासाठी गळे काढावेत तर मग असे कोण म्हणते याबद्दल आपलं काय मत आहे?
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 02/13/2018 - 13:06
नवीन
प्रतिसाद करता म्हणतोय :
स्वयंघोषित फुरोगाम्यांना येऊन-जाऊन सारखे ‘अघोषित आणीबाणी’च्या नावाने गळे काढून फक्त रडता येते. केरळ, बंगाल येथे स्वयंसेवकांच्या होणाऱ्या हत्येबद्दल फुरोगामी नेहमीच मूकदर्शक राहतात.
तुम्ही म्हणताय :
असे गळे उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या हत्यांबाबत निघताना दिसले का कधी ?
===<<< आता इथे पुरोगाम्यांनी यांच्यासाठी का म्हणून गळे काढावेत ? जे त्यांच्या विचारसरणीचे नाही आहेत. खेद वाटत असावा. पण बोलून दाखवले नसेल. सिम्पल लॉजिक आहे.
मग याठिकाणी त्या डाव्या पुरोगाम्यांचा वचपा काढायला/बदल घायला मी कुठे म्हंटले कि बंदुका घ्या (काठ्या घ्या ). डोकी फोड. कोणत्या प्रकारे बदल घेतला हे तुम्हाला विचारले. जे काही कायदेशीर मार्ग आहे त्यानुसारच करा. आर्मी देखील संविधानाच्या चौकटीत राहूनच सीमेवर काम करत असते.
उजव्यांनी किमान मोर्चा काढून झालेला प्रकार निंदनीय आहे असे ठणकावून सांगायला पाहिजे.
मी तरी अजून मिसळपाववर कोण्या स्वयंसेवकाची हत्या झाली म्हणून श्रद्धांजलीचा धागा / प्रतिसाद टाकलेला पाहिला नाही .(माझ्या नजरेतून सुटला असेल असेल तर कृपया दाखवा)
.....
बायदवे केरळ मध्ये पुरोग्यम्यांबरोबर पार हत्या होई पर्यंत कसले पराक्रम करत आहेत स्वयंसेवक ? हे अनुत्तरीतच ठेवलेत. (खरंच मला तिथली परिस्थिती माहित नाही आहे म्हणून विचारतो आहे. गैरसमज नसावा.)
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Tue, 02/13/2018 - 13:55
नवीन
तुम्हाला बहुतेक मूळ मुद्दा समजलेला नसावा!
तर मला समजलेला मूळ प्रतिसादातील मुद्दा असा आहे कि पुरोगाम्यांना हे समजणे आवश्यक आहे कि जेव्हा अशा हत्या होतात तेव्हा तो एक गुन्हा असतो. उगाच लोकशाहीवर हल्ला वगैरे गळे काढायचे आणि जेव्हा अशाच हत्या जेव्हा आपल्या विचारसरणीच्या विरोधी विचारसरणीच्या लोकांच्या होतात तेव्हा मुकदर्शक बनायचे हा दांभिकपणा आहे. अशा हत्या जेव्हा होतात, तेव्हा लेट लॉ टेक इट्स कोर्स! कायद्याला आपलं काम करू द्या! उगाच लोकशाही आणि बाकीच्या गोष्टी करून स्वतःच्या दांभिकपणाचं प्रदर्शन कशासाठी? याउलट तुम्ही म्हणताय कि संघाने किंवा उजव्या विचारसरणीवाल्यानीही असं दांभिक प्रदर्शन करावं. हे पटत नाही. आणि हो उजव्यांनी ते केलं तरी ते दांभिक प्रदर्शनच असेल!
यात तुमच्या बादवे चं उत्तर आलं असेल अशी अपेक्षा करतो! स्वयंसेवक हत्या रोखू शकण्यासाठी काय करू शकतात? (आणि म्हणून मी म्हणालो कि पराक्रम आणि स्वतःच्या सहकार्यांना वाचवणे याचा बादरायण संबंध कशाला जोडायचा - म्हणून सैनिकांचं उदाहरण!) ते संविधानात राहतात आणि ते कायद्याला त्याचा न्यायनिवाडा करण्याबद्दल पाठपुरावा करू शकतात! माझ्यामते उजवे हेच करत आहेत केरळ मध्ये!
- Log in or register to post comments
स
सचिन७३८
Tue, 02/13/2018 - 16:26
नवीन
तुम्हांला नक्की फुरोगामी म्हणायचं आहे की पुरोगामी?
सर्व समान, सगळे सारखेच असा स्वघोषित दंभ मिरवणाऱ्यांनी “आपल्या विचारसरणीचे नाहीत” म्हणून इथे समान न्याय लावू नये हे जरा खटकते.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 02/13/2018 - 12:41
नवीन
<<<संदर्भ देता का संघाने काही गळा काढला असेल त्याचे?>>>
==>> बीटाकाका काय होतंय तुम्ही मूळ प्रतिसादकर्ता काय म्हणतोय आणि त्याला दिलेल्या उप प्रतिसादात मी काय म्हणतोय हे नीट वाचताना दिसत नाही आहात.
गळे का काढले नाही असे प्रतिसादकर्ता म्हणतोय, संघ नव्हे.
वाचताना "दक्ष राहा" हि आर्जव...
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Tue, 02/13/2018 - 12:44
नवीन
एकदा ते आर्जव स्वतःलाही करा हो हि विनंती!
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 02/13/2018 - 13:09
नवीन
स्वतःला आर्जव केला.. पुन्हा ३-४ वेळा वाचून काढले.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Tue, 02/13/2018 - 13:37
नवीन
त्यांची आता आरम: करायची वेळ येणार आहे. २०१९ ला
५ वर्षे दक्ष नंतर धावीस वर्षे आरम:
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Wed, 02/14/2018 - 04:36
नवीन
वर्षानंतर परत दक्ष का?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/13/2018 - 09:44
नवीन
खांग्रेसी लष्कराबद्दल कायमच आदरपूर्वक बोलतात.
उदा. लष्करप्रमुख बिपिन रावत यांचा 'सडकछाप गुंड' असा खांग्रेसी संदीप दिक्शितने केलेला गौरव.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 02/13/2018 - 13:56
नवीन
व्यक्तीलक्ष्य तर्कदोष
मुळ युक्तिवादास बगल देऊन, युक्तिवाद करणाऱ्या व्यक्तिस नकारात्मक लक्ष्य बनवण्याच्या उद्देशाने अथवा अप्रस्तुत विषयाकडे लक्ष वळवण्यारा, अप्रस्तुत मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तर्कदोषास(तार्कीक उणीवेस) व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा व्यक्तियुक्ती[१] अथवा Ad hominem [मराठी शब्द सुचवा] असे म्हणतात.यास अप्रस्तुत अथवा अनौपचारिक तर्कदोष असेही समजले जाते.
मराठी विश्वकोशातील लेखक मे. पुं.रेगे ह्यांच्या मतानुसार 'विरोधकाच्या मतांचे खंडन न करता त्याच्या स्वभावावर किंवा वर्तनावर टीका करण्यात आलेली असते; विशेषतः विरोधकाचे वर्तन त्याने प्रतिपादन केलेल्या मतांविरुद्ध आहे असे दाखवून देण्यात आले असते. उदा., दारूबंदी असावी ह्या मतांवर टीका करताना दारूबंदीचे पुरस्कर्ते स्वतः दारू पीत असतात हे दाखवून देणे.
व्यक्तिगत आरोप व्यक्तिलक्ष्य तर्कदोष ("व्यक्तिगत आरोप " अथवा "व्यक्तिगत हल्ला") सहसा विरोधकांचा युक्तीवाद अग्राह्य ठरावा या उद्देशाने विरोधकाच्या दाव्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो; यात विरोधकाच्या युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या कृती अथवा विरोधकाच्या चारीत्र्यातील खऱ्या (पण सदहुर युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या) उणीवांकडे लक्ष वेधणे याचा आंतर्भाव केला जातो.
एखाद्या व्यक्तिच्या समर्थ युक्तिवादाची तुलना त्या व्यक्तिच्या चारीत्र्यविषयक इतर गुणांशी, अथवा संबंध नसलेल्या कृतीशी करणे हा एक तर्कदोष असतो. युक्तीवादच अस्तीत्वात नसेल तर केवळ verbal abuse , however,व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा कोणत्याही प्रकारचा तर्कदोष म्हणवला जाऊ शकत नाही.
उदाहरणे
" महापौरपदाच्या उमेदवाराचा विभागीकरण विषयक प्रस्ताव हास्यास्पद आहे. २००३ मध्ये त्यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप झाले होते."
" तू एवढा काय दिडशहाणा लागून गेला आहेस की इश्वराचे अस्तीत्वसुद्धा नाकारू शकतोस ? तुझे शालेय शिक्षण सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही."
"डॉ.स्मीथ एवढे नावाजलेले हृदयरोग तज्ञ आहेत, तरीही त्यांना जुगार खेळण्याच्या कारणावरून अटक का केली गेली?"
"तुमचे फॅशन बद्दलचे मत अवैध आहे ;कारण तुम्हाला साधी नवे बूट घेणे देखील परवडत नाही."
"सरकारच्या आर्थीक स्थितीवर मत मांडावयास मोहन आहे तरी कोण? त्याला स्वत:ला साधी नौकरी सुद्धा नाही!"
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 02/13/2018 - 14:33
नवीन
वा !
काय भाषा आहे!
अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/13/2018 - 09:45
नवीन
https://www.thestatesman.com/india/nitish-kumar-defends-mohan-bhagwats-ready-in-3-days-remark-1502584293.html
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 02/13/2018 - 09:46
नवीन
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापेक्षाही महाराष्ट्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अधिक प्रेमात पडलं आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने मोदींवरील चार-पाच हजार नव्हे तर १.५ लाख पुस्तकांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ५९.४२ लाख रुपये मोजण्यात येणार आहेत.
हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि मराठी भाषेतील ही पुस्तके जिल्हा परिषदांच्या ग्रंथालयात ठेवण्यात येणार आहेत . चांगली पुस्तके घ्यायचे सोडून भंकस पुस्तके घेतात आणि
त्याहून वाईट हिंदी, इंग्रजी, गुजराती भाषातील पुस्तके ?? मराठी ग्रंथालयात मराठी पुस्तके ठेवणे उचित झाले असते . पण फडणवीसांना दिल्लीकरांना खुश करायचे असेल.
असे वाचले की भाजपा हा काँग्रेसचा दुसरा चेहरा आहे हे पटते
- Log in or register to post comments
म
मामाजी
Wed, 02/14/2018 - 10:51
नवीन
माझ्या फेबू वर आलेला हा मेसेज.
वाचा अाणि माध्यमे केवढा गोंधळ उडवून देतात हे लक्षात येईल.
_*मोदींच्या पुस्तकांआडून विशिष्ट प्रकाशकांचा सरकारवर दबाव*_
- राजेश प्रभु साळगांवकर
मुंबई, दि. 13 फेब्रुवारी 2018 :
नरेंद्र मोदी यांच्यावरची लाखो पुस्तके घेतली असा खोटा प्रचार करत काही प्रसिद्धीमाध्यमातून येत असलेल्या बातम्यात काही तथ्य नसून काही विशीष्ट विचारसरणीचे नाराज प्रकाशक या बातम्यांच्या मागे असल्याचे कळते. सरकारी यंत्रणांना हाताशी धरून काही विशिष्ट विचारांचे साहित्य समाजात पसरविण्याचे चाललेले "वैचारिक उद्योग" नवीन सरकार आल्यावर बंद पडल्याने हे विशिष्ट प्रकाशक सैरभैर झाले आहेत. मात्र राज्यातील प्रकाशकांच्या संघटनेने सरकारला पत्र लिहून नवीन निकष आणि प्रक्रियेबद्दल सरकारचे कौतुक केले आहे.
यापूर्वी राज्याबाहेरचे अनेक प्रकाशक आपली सुमार पुस्तके राज्य सरकारच्या गळ्यात मारत होते. शिक्षण विभागातील अतिशय उच्चपदस्थ सूत्रांच्या म्हणण्यानुसार यातील अनेक पुस्तकांची मजकूर आणि निर्मितीमुल्ये यातील गुणवत्ता अत्यंत सुमार दर्जाची होती. यासंदर्भात राज्यातील अनेक प्रकाशकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यासंदर्भात एक समिती गठीत केली होती. या समितीच्या अहवालानुसार सप्टेंबर 2017 मध्ये काढलेल्या निविदांप्रक्रियेत सुधारणा केली गेली आणि नवीन अटींसह तीच निविदा प्रक्रिया 13 जानेवारी 2018 रोजी पुढे राबवली गेली. त्यामुळे राज्याबाहेरचे अनेक प्रकाशक या प्रक्रियेतून बाहेर गेले. त्यांनी सादर केलेली पुस्तके दर्जा आणि शैक्षणिक मूल्ये या दोन्ही निकषांवर नाकारण्यात आली. त्यातील अनेक पुस्तके मूळ कुठल्या पुस्तकावरून तयार (भाषांतरित / आधारित) केली आहेत किंवा ती पूर्णतः नवीन सृजन आहे, हे ही कळत नव्हते. त्यातील विषयांचे नीट आकलनही होत नव्हते. तर अनेक पुस्तके ही एक विशिष्ट विचारसरणी प्रसारित करण्यासाठीच आहेत असे वाटावे, अशी स्थिती होती.
यापूर्वी राज्यातील केवळ वीस प्रकाशक राज्य सरकारला ही अवांतर वाचनाची पुस्तके पुरवीत होते. आणि बहुसंख्य प्रकाशक हे राज्याबाहेरचे होते. मात्र आता राज्याबाहेरचे प्रकाशक नाहीत. राज्यातील प्रकाशकांचे संख्या चाळीसने वाढली आहे. निवड समितीने निवडलेली पुस्तके विषयाची मांडणी, वैचारिक दर्जा आणि निर्मिती मूल्ये या निकषांवर उत्कृष्ट आहेत, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.
शिक्षण विभागातून मिळालेल्या माहितीनुसार मोदींवरची लाखो नव्हे तर केवळ 69 हजार पुस्तके खरेदी करण्यात अली आहेत. तर त्याच जोडीला छ.शिवाजी महाराजांवरची साडेचार लाख पुस्तके, अब्दुल कलाम यांच्यावरची अडीच लाख पुस्तके आणि भारतरत्न डॉ.आंबेडकर आणि म.फुले यांच्यावरची 2 लाख पुस्तके खरेदी करण्यात आली आहेत.
-----------------------
*एका विशिष्ट विचारांचा प्रसार*
एका विशिष्ट विचारसरणीचा प्रसार मागील सरकार कसे करत होते याचे उदाहरण सांगताना शिक्षण विभागातील एक उच्च पदस्थ अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले की पुण्यातील एका समाजवादी साप्ताहिकाच्या दीड लाख प्रती प्रत्येकी 40 रुपये या दराने पूर्वीचे सरकार घेत होते. (बाजारात ते साप्ताहित 15 ते 20 रु.च्या दरम्यान विकले जाते !) त्यातील विचारसरणी, त्यातील आराजकवादी आणि समाजाच्या श्रद्धा दुखवणारी तिखट भाषा याबद्दल तक्रारी प्राप्त होऊनही आधीच्या सरकारने हे पाक्षिक सरकारी खर्चाने शाळांना पाठवणे सुरू ठेवले होते. तावडेंकडे याविषयातील तक्रारी गेल्यावर तावडेंनी या साप्ताहिकाचे काही अंक पाहून ते नियतकालिक शाळांना न पाठविण्याचा निर्णय घेतला. सरकारी खर्चाने शाळांना जाणारी पुस्तके व नियतकालिके यातून राजकीय विचार नव्हे तर शैक्षणिक संस्कार आणि सकारात्मक विचार पोहोचले पाहिजेत हा तावडेंचा आग्रह आहे, असे या उच्च पदस्थाने सांगितले. त्यामुळे आजवर या सरकारी योजनांवर जगणाऱ्या ज्या विशिष्ट विचारसरणीच्या प्रकाशकांचे आणि राजकीय विचाराधारांचे नुकसान झाले आहे, त्यांनी काही माध्यमांना हाताशी धरून या विषयात गोंधळ उडवून देण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा थेट आरोपही या उच्च अधिकाऱ्याने केला.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/14/2018 - 13:41
नवीन
येथे फेबू व्हॉट्स अप चे संदर्भ फाट्यावर मारण्यात येतात
- Log in or register to post comments
म
मामाजी
Wed, 02/14/2018 - 14:05
नवीन
आपल्या मोदींवरील दीड लाख पुस्तकांची खरेदी या धाग्याचा संदर्भ कोणता?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 02/13/2018 - 09:56
नवीन
झोपेत घोरणे हे इतरांना त्रासदायक आणि नकोसं वाटतं. मुंबईहून सुटलेल्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांनाही असाच वाईट अनुभव आला. त्यांनी जोरजोरानं घोरणाऱ्या आणि सगळ्यांची झोप उडवणाऱ्या एका प्रवाशाला अजब 'शिक्षा' दिली. त्यांनी घोरणाऱ्या प्रवाशासोबत वाद घातला. सहप्रवाशांचा रुद्रावतार पाहून या प्रवाशाला प्रवासादरम्यान जागं राहावं लागलं.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/13/2018 - 15:07
नवीन
आपली काय मतं असतील ती मतं मांडू द्या, फक्त व्यक्तिगत न होता.
बाकी चालू द्या...!!! :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 02/13/2018 - 15:22
नवीन
डॉक्टर , बघा कसे निट झाले आहे आता.
श्रीगुर्जीचा प्रतिसाद त्याखाली माहितगारचा प्रतिसाद त्याखाली सुबोध खरे... परफेक्ट फिट. हेच हवे होते. ते तसेच आले आहे.
=)) =))
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 02/13/2018 - 15:41
नवीन
!
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 02/13/2018 - 15:52
नवीन
श्रीगुर्जीचा प्रतिसाद त्याखाली माहितगारचा प्रतिसाद त्याखाली सुबोध खरे
अरे वा
माझं नाव नीट लिहिता आलं तर.
पण भाषा अजूनही सभ्य आणि सुसंस्कृतच आहे
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 02/13/2018 - 16:07
नवीन
ब्वॉर्र... बसा कुढत. =))
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 02/13/2018 - 16:20
नवीन
=))
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 02/14/2018 - 11:37
नवीन
https://epaper.timesgroup.com/Olive/ODN/TimesOfIndia/#
रोड रेज ची एक दुर्दैवी घटना. क्षुल्लक कारणावरुन एकाचा जीव गेला. टाइम्स ने फ्रंट पानावर ही बातमी देउन तीचे महत्व अधोरेखीत केले आहे.
त्याच बातमीत, पुर्वी घडलेल्या अशा घटनाही संक्षीप्त स्वरुपात दिल्या आहेत.
आपला समाज हिंसक होत चालला आहे का ?
त्याच पानावर दुसरी घटना . मदत केल्याचे बक्षीस (?)
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/grp-scolds-man-who-saved-accident-victim/articleshow/62908112.cms
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 02/14/2018 - 12:49
नवीन
चैन्नई
दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात एकीकडे व्हॅलेंटाइन्स डे जोरात साजरा होत असताना दुसरीकडे मात्र हिंदुत्ववादी संघटनांकडून या प्रेमदिवसाला जोरदार विरोध होताना दिसत आहे. या विरोधाच्या प्रदर्शनार्थच अनेक ठिकाणी प्रेमी युगुलांना पळवून लावले जात आहे तर काही ठिकाणी प्रेमाचे पोस्टर्स फाडले जात आहेत. तामिळनाडूची राजधानी चैन्नईत मात्र एका विचित्र पद्धतीने व्हँलेंटाइन्स डेला विरोध करण्यात आला.
व्हॅलेंटाइन्स डेला विरोध करताना चैन्नईतील छुलई भागात भारत हिंदू फ्रंट मोर्चाच्या सदस्यांनी एका कुत्र्याचे लग्न गाढवासोबत लावून दिले. त्यावेळी त्यांनी कुत्रा आणि गाढवाच्या गळ्यात फुलांचे हार घातले. त्यांच्या डोक्याला हळद कुंकू लावले. व्हॅलेंटाइन्स डे विरोधात त्यांनी घोषणाही दिल्या. नंतर निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान दुसरीकडे गुजरातमध्ये साबरमती रिव्हरफ्रंटमध्ये बजरंग दलाच्या सदस्यांनी काही प्रेमी युगुलांना मारपीट केल्याची घटनाही समोर आल्या आहेत. इथेही पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
(दै. मटा)
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 02/15/2018 - 19:01
नवीन
:)) :))
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 02/14/2018 - 13:57
नवीन
A video, claiming to show Crown Prince of Abu Dhabi Mohamed bin Zayed al Nahyan chanting 'Jay Siya Ram' during Indian Prime Minister Narendra Modi's visit to Abu Dhabi, was shared by mainstream Indian media houses, ahead of the PM's visit. The video, as has later been turned out, is fake, and more than a year old.
The video, shared by mainstream channel Times Now and Zee News ahead of Modi's visit to the UAE claimed that Shaikh Mohammad Bin Zayed had chanted “Jai Siya Ram” while addressing a Hindu spiritual programme. A report by the Gulf News busted the fake news with true facts.
https://www.outlookindia.com/website/story/indian-news-channels-run-fake-video-on-abu-dhabi-crown-prince-saying-jai-siya-ra/308233
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Wed, 02/14/2018 - 14:23
नवीन
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 02/14/2018 - 17:10
नवीन
https://timesofindia.indiatimes.com/india/after-stopping-haj-subsidy-bjp-offers-to-send-christians-to-jerusalem-for-free/articleshow/62910805.cms
मुसलमानांची हज बंद करणारे भाजपा सरकार ख्रिश्चनांसाठी जेरुसलेमची यात्रा सुरु करणार !
भक्तलोक गप्प कसे ?
- Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर
Wed, 02/14/2018 - 17:20
नवीन
- Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर
Wed, 02/14/2018 - 17:21
नवीन
- Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर
Wed, 02/14/2018 - 17:23
नवीन
- Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर
Wed, 02/14/2018 - 17:23
नवीन
The website encountered an unexpected error. Please try again later.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 02/14/2018 - 17:55
नवीन
इंग्लिश कळत नाय तर मराठीत सांगू का ?
......
महिन्याभरापूर्वी हज अनुदान बंद करणाऱ्या भाजपनं नागालँडमध्ये सत्ता आणण्याकरिता येथील ख्रिश्चन मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी आकर्षक घोषणा करायला सुरुवात केली आहे. सत्तेत आल्यास ख्रिश्चनांना पवित्रभूमी असलेल्या 'जेरूसलेम'ची मोफत वारी घडवून आणण्याचं आश्वासन भाजपनं दिलं आहे. मात्र देशातील सर्वच ख्रिश्चनांसाठी हे आश्वासन आहे की केवळ उत्तर-पूर्वेतील राज्यांपूरतं ते मर्यादित आहे, याबाबतचं कोणतंही स्पष्टीकरण भाजपनं दिलेलं नाही.
https://m.maharashtratimes.com/india-news/north-east-elections-bjp-offers-to-send-christians-to-jerusalem-for-free/articleshow/62915543.cms
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Fri, 02/16/2018 - 02:37
नवीन
भाजपा ने असे का केले असावे.
कारण भाजपला मते तर हवी आहेत.
बर ह्या सीमेवरच्या राज्यात हिन्दु संख्या कमी होऊन तो भाग
ख्रिश्चनबहुल होण्यामागे आजवर ची चुकीची धोरणे कारण नाहीत का?
बहुमतात निवडून आल्याशिवाय चांगले बदल करणे शक्य आहे का?
साध तीन तलाकचे प्रकरण राज्य सभेत बहुमताशिवाय लटकल.
मुस्लिम महिलांना निदान दुसरा तरी न्याय मिळावा म्हणुन भाजपा सरकारने हज यात्रेची रक्कम मुस्लीम महिलांच्या शिक्षणासाठी वळवली.
भाजपा काय आणि कौन्ग्रेस्स काय मतासाठी सगळेच वाट्टेल ते करतात. पण कौन्ग्रेस्स च्या राजकारणामुळे देश ही संकल्पना धोक्यात येण्याची वेळ येते आहे.
भाजपा ला स्पष्ट बहुमत मिळून समान कायदे होण्याची शक्यता आहे.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 02/16/2018 - 02:51
नवीन
जेरुसलेम जायला विमान दिले की ख्रिस्चन लोक मत देतात !
हे लॉजिक अजबच आहे.
पण आसिंधुच्या पलीकडच्या पुण्यभूला भाजपा इतके महत्व देत आहे , हे पाहून 'त्याना' स्वर्गात काय वाटत असेल ? हेची फळ का ?
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 02/16/2018 - 03:05
नवीन
गोव्यात गाय खायला परवानगी दिली की ख्रिस्चन मत देतात !
पूर्व राज्यात जेरुसलेमला विमान दिले की ख्रिस्चन मते देतात !
...
भाजपाभक्त : झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची !!
- Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर
Wed, 02/14/2018 - 17:24
नवीन
- Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर
Wed, 02/14/2018 - 17:24
नवीन
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/14/2018 - 18:24
नवीन
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Wed, 02/14/2018 - 19:27
नवीन
दिल व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन हो गया l
https://youtu.be/0oMOw59mNWk
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 02/14/2018 - 22:30
नवीन
manguu@mail.com,
हाहाहा! बाबराच्या खापरपणतूचं वय काय असेल हो? तुमचा अंदाज काय आहे? तो आजवर जिवंत राहील काय? तुमच्या डॉक्टरकीत शिक(व)लेल्या माहितीच्या आधारे उत्तर द्या बरं!
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 02/15/2018 - 07:19
नवीन
https://www.google.co.in/amp/s/m.hindustantimes.com/mumbai-news/maharashtra-paid-80-times-more-than-delhi-for-cctv-cameras-says-aap/story-UqODzY060zQDi7Shy52NPJ_amp.html
खरं हाय का ?
सीसीटीव्ही घोटाळा.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 02/15/2018 - 07:32
नवीन
ओ मोंगो डीबी, ते प्रतिसादाच्या शिर्षकात काही लिहीत जा की. तुमच्या त्या टिंब टिंब शिर्षकामुळे तुमचा नवीन प्रतिसाद मोबाईलवरुन उघडायला अवघड जाते.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 02/15/2018 - 08:42
नवीन
ओके नोटेड
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »