Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी - भाग २६

क
कपिलमुनी
Wed, 03/14/2018 - 21:50
🗣 175 प्रतिसाद
राणे भाजपात दाखल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या संस्थापकानेच पक्षाचा राजीनामा देण्याची ही बहुधा पहिली वेळ असेल. चला , राणे भाजपात नाही असे ठासून सांगणाऱ्याच्या आता कोलांट्या उड्या बघायच्या :)
वर्गीकरण
काथ्याकूट; राजकारण

प्रतिक्रिया द्या
41073 वाचन

💬 प्रतिसाद (175)
क
कपिलमुनी Wed, 03/14/2018 - 21:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 03/18/2018 - 17:47 नवीन
राज ठाकरे यांचे गुढीपाडवा भाषण ऐकले, आज दि 18 मार्च 2018, त्यांनी भाकीत केलात, भाजपा या निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू मुसलमान दंगे घडवून आणणार, राम मंदिर मुद्द्यावरून.... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
M
manguu@mail.com Wed, 03/14/2018 - 22:05 नवीन
बिरबलाचे माकड पाण्यात बुडू नये म्हणून पोर पाया खाली घेते. तसे ह्यानी स्वत:च्याच पक्षाचे अध्यक्षपद पायाखाली दाबून भाजपाकडुन् ऑक्सिजन घेतला. मुख्यमंत्री फडणवीस पूर्वीच बोलले होते - राणे ही पक्षाची संपत्ती आहे ! http://abpmajha.abplive.in/mumbai/cm-devendra-fadanvis-on-eknath-khadse-and-narayan-rane-latest-update-492296 संपत्ती वाढल्याबद्दल भक्तांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 03/15/2018 - 03:50 नवीन
राणेंवर आक्षेप काय आहे तुमचा??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ज
जेम्स वांड गुरुवार, 03/15/2018 - 04:03 नवीन
ते श्रीगुरुजींना विचारा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/15/2018 - 05:24 नवीन
राणेला पक्शात अधिकृत प्रवेश दिल्याची बातमी प्रमुख वृत्तपत्रात आलेली दिसत नाही. खरोखरच प्रवेश दिला असेल तर ती भाजपचा घोडचूक ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ब
बिटाकाका गुरुवार, 03/15/2018 - 06:09 नवीन
तुम्हाला नैतिक दृष्टिकोनातून घोडचूक वाटतेय कि राजकीय दृष्टिकोनातून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ज
जेम्स वांड गुरुवार, 03/15/2018 - 06:12 नवीन
राजकीयदृष्ट्या अमितभाई शहा कधीही आतबट्याचा व्हावहार करणार नाहीत, राजकीय दृष्टिकोनातून ह्याचा भाजपला फायदा नसता तर राणेंना घेतलेच नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 03/15/2018 - 06:57 नवीन
सहमत, राजकीयदृष्ट्या घोडचूक म्हणण्यास सध्यातरी मुद्दे नाहीत. ======================= नैतिकदृष्ट्या घोडचूक का म्हणावे ते कळत नाही. भाजपला उजवा पक्ष म्हटले जाते, शिवसेनेला उजवा पक्ष म्हटले जाते. शिवसेनेत ४० वर्षे काढलेल्या राणेंची विचारसरणी उजवीच असावी असा साधारण अंदाज आहे. त्यांना काँग्रेस संस्कृती मानवणारीच नव्हती पण बहुदा सत्तेत राहण्याच्या हिशेबाने ते काँग्रेसमध्ये गेले असावेत. चिरंजीवांनी मधल्या काळात चर्चेत राहण्यासाठी जे काही केले तो राणेंचा पिंड असावा असे मला वाटत नाही. ======================= सगळेच पक्ष एकमेकांवर राजकीय चिखलफेक करत असतात, मग आधी तुम्ही ज्यांच्यावर चिखलफेक करत होतात त्यांना का घेतले म्हणण्यात काही मुद्दा नाही. राजकीय लाभ मिळणार असेल तर सगळेच पक्ष अशा आयाराम गायरामांसाठी नैतिकता धाब्यावर बसवतात असे मला वाटते. फक्त सिद्ध गुन्हे किंवा वैयक्तिक गुन्हेगारी केसेस चालू असणाऱ्यांना पक्षांनी घेऊ नये असे मलातरी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड गुरुवार, 03/15/2018 - 07:04 नवीन
सगळेच पक्ष अशा आयाराम गायरामांसाठी नैतिकता धाब्यावर बसवतात असे मला वाटते. हीच ती काँग्रेसी संस्कृती, आयाराम गयाराम जोजवणे, येनकेनप्रकारेण सत्ता घट्ट धरून ठेवणे, त्यासाठी पक्षांतरबंदी वगैरे रीतसर कायदे करून घेणे, हिलाच तर मुळापासून गाडायचं, भारतीय राजकारणाला एक सकारात्मक वळण लावायचं ह्या हेतूनेच तर जनतेने मोदींजींना भरभरून प्रेम दिलं होतं, आजही देतेय, हे किमान भाजपने तरी करणे मला उदास करून गेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 03/15/2018 - 07:17 नवीन
जोपर्यंत फक्त विकासाच्या मुद्द्यावर बहुमत मिळवणे एखाद्या पक्षाला शक्य होत नाही तोपर्यंत हे असलेच राजकारण करणे - मग ते मोदी असोत कि वाजपेयी - कुठल्याही नेत्याला अपरिहार्य आहे असे मला वाटते. ----------------------------------- माफ करा पण भारतीय राजकारणाला वळण लागण्याची शक्यता अजून २५ एक वर्षे तरी मला दिसत नाही. याला फक्त नेते नाही, मतदारही तितकेच कारणीभूत आहेत असे मला वाटते. "आपला माणूस" या बेसिस वर मतदान होत राहणार तोपर्यंत हेच होत राहील. ----------------------------------- ३.५ लाख मते आहेत ना कोळी समाजाची मग करू निषादला उभे, ब्राह्मणांची मते दूर जाऊ द्यायची नाहीत ना मग करू शुक्ला ला उभे हि असली विचारसरणी निवडणुकांमधून संपेल तो सुदिन, शक्यता तसूभरही नाही!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
स
सुबोध खरे गुरुवार, 03/15/2018 - 07:26 नवीन
३.५ लाख मते आहेत ना कोळी समाजाची मग करू निषादला उभे, ब्राह्मणांची मते दूर जाऊ द्यायची नाहीत ना मग करू शुक्ला ला उभे हि असली विचारसरणी निवडणुकांमधून संपेल तो सुदिन बाडीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ज
जेम्स वांड गुरुवार, 03/15/2018 - 07:29 नवीन
जोपर्यंत फक्त विकासाच्या मुद्द्यावर बहुमत मिळवणे एखाद्या पक्षाला शक्य होत नाही तोपर्यंत हे असलेच राजकारण करणे - मग ते मोदी असोत कि वाजपेयी - कुठल्याही नेत्याला अपरिहार्य आहे असे मला वाटते. बरेच लोक (माझ्यासहित) भाजपने २०१४ मध्ये विकास आधारित राजकारण करून विकासाच्या मुद्द्यावर (अच्छे दिन) बहुमत घेतल्याचे कायम अभिमानाने सांगत असत, २०१४ चे लोकसभा निवडणूक घोषणापत्र (भाजपचे) पाहिले तरी त्यात मंदिर मस्जिद वगैरे ठेवणीतल्या भाजपीय मुद्द्यांपेक्षा विकास आधारित मुद्दे जास्त दिसतात (असे एक निरीक्षण माझे) , जर तुमचं विधान ग्राह्य धरले तर २०१४ मधेही भाजपने जातीय राजकारण केले किंवा विकास सोडून राजकारण केले असा अर्थ निघू शकेल जो अजूनच क्लेशकारक आहे काका. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
M
manguu@mail.com गुरुवार, 03/15/2018 - 07:30 नवीन
पण भाजपाने तर मुस्लिम एरियातही हिंदू खासदार निवडून आणले , एकही मुसलिम उमेदवार दिला नाही . लोकाना जात धर्म नको , विकास हवा आहे , असे बोलून स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. आता हेच भाजपे बोलतात - लोकाना विकास नको म्हणे. जात हवी. भाजपाच्या गाढवावरून विकासाचे खोटार्डे कातडे सरकले , हे लोकान्नी ओळखले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ज
जेम्स वांड गुरुवार, 03/15/2018 - 07:33 नवीन
बघा! काळ सोकावतो तो असा, आतातरी माझ्या क्लेषाचे नेमके कारण तुम्हाला हा सूर्य हा जयद्रथ अश्या ह्या उदाहरणातून समजून यावे ही अपेक्षा. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका गुरुवार, 03/15/2018 - 10:02 नवीन
पण भाजपाने तर मुस्लिम एरियातही हिंदू खासदार निवडून आणले..
हे खोटे आहे का? मग त्या त्या ठिकाणी त्यांनी पाठ थोपटवून घेतली तर दुखणे काय आहे? ------------------------------------------ एक तो घोडा बोलो या चतुर बोलो....तुमचे काय मत आहे ते सांगा उगा एक भाजप समर्थक काही म्हणाला कि भाजपे असं म्हणतात मग दुसऱ्या समर्थकाने काही वेगळं मत मांडलं कि (तेच) भाजपे तसं म्हणतात असला दुटप्पीपणा कशाला? ------------------------------------------ २७२ पलीकडे पोहोचण्यासाठी नुसत्या विकासाचं राजकारण पुरेसं नाही हे न कळायला मोदी शहा काही दुधखुळे नाहीत. पण जाहीर विकासाचं राजकारण आणि जागा वाढवण्यासाठी आतलं राजकारण त्यांनी केलं असावं असं आपल्याला वाटत नाही का? आणि केलं तर चूक काय? सपा-बसपा एकत्र येण्याचं कारणच काय होतं? ----------------------------------------- सध्याच्या युत्या/आघाड्या आणि अंधविरोधकांचं नकारात्मक राजकारण बघून माझं तर असं मत बनत चाललं आहे कि भाजप ने काय वाट्टेल ते करावं आणि जिंकावं. धुतल्या तांदळासारखं राहून/म्हणवून घेऊन काय मिळणार आहे? भाजप ने जशास तसे वागावे, जिंकावे आणि देशहिताचे निर्णय "लादावेत".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ज
जेम्स वांड गुरुवार, 03/15/2018 - 10:06 नवीन
तुमची मते असण्याचा तुमचा हक्क मान्य करून मी असहमती दर्शवून थांबतो. कारण भाजपचा हाय मोरल कंपास हेच भाजपचं यूएसपी होतं/आहे/राहील असा माझा ठाम विश्वास होता/आहे/राहील. संघाच्या मुशीतून तावून सुलाखून तयार झालेली राजकीय संघटना मोरल हाय ग्राउंड सोडणार असेल तर माझ्यामते ते दुर्दैवी आहे. असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/15/2018 - 08:47 नवीन
>>> सहमत, राजकीयदृष्ट्या घोडचूक म्हणण्यास सध्यातरी मुद्दे नाहीत. राणेमुळे कोकणातील १-२ मतदारसंघात फायदा होऊ शकेल. परंतु महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात अर्धापाऊण ब्राह्मण मते विरोधात गेली तरी भाजपला मोठा फटका बसू शकेल. राणे अत्यंत उपद्रवी आहे. त्याचे खरे ध्येय मुख्यमंत्रीपद आहे. भाजपत राहून राणे सातत्याने फडणवीसांना त्रास देत राहील. राणे व राणेपुत्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. ज्याप्रमाणे लालूपुत्रांनी नितीशकुमारांना त्रस्त करून सोडले होते तसेच राणेपुत्रांमुळे फडणवीस त्रस्त होतील व त्यामुळे भाजपचा प्रतिमा अजून खराब होईल. हा निर्णय नैतिक व राजकीय दृष्ट्या चूकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ज
जेम्स वांड गुरुवार, 03/15/2018 - 09:54 नवीन
माझा हाच प्रश्न आहे श्रीगुरुजी. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात अर्धापाऊण ब्राह्मण मते विरोधात गेली तरी भाजपला मोठा फटका बसू शकेल. हे विधान मोघम वाटते आहे, अनेक मतदारसंघ म्हणजे नेमके किती मतदारसंघ ? तिथली किती लोकसंख्या ब्राह्मण आहे, तिथले वोटिंग ट्रेंड काय होते, तिथली किती मते दुरावल्याने भाजपला मोठा फटका बसेल, शिवाय 'मोठा फटका' ची व्याख्या काय, हे मला पडणारे प्रश्न आहेत. अर्थात, तुमचा अभ्यास वादातीत आहेच, त्यामुळे तुम्ही जर नीट आकडेवारीसह साद्यांत पद्धतीने जर ह्याची उत्तरे देऊ शकले तर माझेही डाऊट क्लिअर होतील आणि मी ही नैतिक अन राजकीय अशी दोन्ही पातळ्यांवर भाजपने केलेली चूक आहे असे निःशंकपणे मान्य करून टाकेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/15/2018 - 06:29 नवीन
दोन्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
M
manguu@mail.com गुरुवार, 03/15/2018 - 04:12 नवीन
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीच्या निकालांनी देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपाचा गड असलेल्या गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाने जबरदस्त मुसंडी मारली. गोरखपूर लोकसभा मतदारसंघात २९ वर्षांनंतर पहिल्यांदाच गोरक्षधाम मठाबाहेरील एखादी व्यक्ती निवडून आली आहे. यापूर्वी महंत अवैद्यनाथ आणि नंतर योगी आदित्यनाथ १९८९ ते २०१७ पर्यंत गोरखपूरचे खासदार राहिले आहेत. पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाकडून प्रवीणकुमार निषाद गोरखपूरचे खासदार झाले आहेत. प्रवीण हे अवघे २९ वर्षांचे असून ते लखनऊ येथील गौतम बुद्ध विद्यापीठातून २०११ साली अभियंत्याची पदवी घेतली आहे. त्यांच्याविरोधात एकही गुन्हेगारीविषयक गुन्ह्याची नोंद नाही. प्रवीण यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे जमीन नाही. ‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार प्रवीण यांनी दूरस्थ शिक्षणाद्वारे एमबीए पदवीही मिळवली आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवलेल्या प्रवीण यांनी सप अध्यक्ष अखिलेश यादव यांचे आभार मानले आहेत. प्रवीण यांची पत्नी रितिका या सरकारी नोकरी करतात. प्रवीण यांच्याकडे सुमारे ११ लाख रूपयांची संपत्ती आहे. यात ९९ हजारांचे कर्ज देखील आहे. प्रवीण आणि रितिका यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 03/15/2018 - 07:57 नवीन
उत्तर प्रदेशातील दोन जागा गमावल्यामुळे भाजपाचे लोकसभेतील संख्याबळ २७२ वर येऊन पोहोचले आहे. केंद्रात बहुमतांसाठी जितक्या जागा लागतात तितक्याच जागा आता भाजपाकडे आहेत. २०१४ मध्ये भाजपाने एकूण २८२ जागा जिंकल्या होत्या. सरकार स्थापनेसाठी भाजपाला मित्रपक्षांच्या पाठिंब्याची सुद्धा गरज नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com गुरुवार, 03/15/2018 - 08:07 नवीन
२ वरून २८२. पुन्हा ह्यान्ना २ वर न्यायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Sun, 03/18/2018 - 18:31 नवीन
घुबडाच्या शापानं गाय मरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका गुरुवार, 03/15/2018 - 12:08 नवीन
चान चान!! पण भाजप २७२ वर कशी पोहोचली ते काय कळलं नाय बगा! जरा इस्कटून सांगता का? -------------------------------------- माझ्या माहितीनुसार भाजप २७२ + १ सभापती महोदय + २ अँग्लो इंडियन असे २७५ वर असायला हवेत. २०१४ नंतर भाजप ने रतलाम (म.प्र.), गुरुदासपूर (पं.), अलवर आणि अजमेर (रा.), गोरखपूर आणि फुलपुर (उ. प्र.) या सहा जागा गमावल्या आहेत. एका जागेचा हिशेब लागत नाय, अजून कुठली पोटनिवडणूक बाकी आहे का ते बघावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
R
ray Fri, 03/16/2018 - 04:14 नवीन
भंडारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 03/16/2018 - 05:52 नवीन
बरोबर! भंडारा-गोंदिया बाकी आहे. पण ती या पोटनिवडणुकांसोबत का घेतली नाही काय माहित? कदाचित भाजप ०-४ झाली असती! ------------------------------------------- प्रफुल्ल पटेलांची भाजप जवळीक खटकल्याने पटोलेंनी "भंडारा" उधळला असेल काय? बहुतेक पटेल भाजपचे पुढचे उमेदवार असतील (अंधविरोधकांनुसार पवित्र होतील)!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ray
M
manguu@mail.com गुरुवार, 03/15/2018 - 07:18 नवीन
http://www.freepressjournal.in/mumbai/mumbai-pil-seeks-ed-probe-against-narayan-rane-in-multi-crore-money-laundering-case/1149803 ही काय भानगड होती ? Mumbai: In what can cause serious problems for Narayan Rane, the new ally of BJP-led Nationalist Democratic Alliance (NDA), a criminal PIL has been filed in the Bombay High Court. The PIL has sought directions to the Enforcement Directorate to “reopen” a multi-crore money laundering case against Rane and his associate Avigna group head — Kailash Agarwal. The criminal PIL has been filed by journalist-turned-activist Ketan Tirodkar. In his petition, Tirodkar has stated, “I learnt from my sources in the last week of September that the Union Finance Ministry had directed the ED to stop the probe it initiated against Avighna group owner Kailash Agarwal & Neelam Hotels Pvt. Ltd. founder Narayan Rane. The ED was probing their money laundering operations.”
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/15/2018 - 09:07 नवीन
युपी मधल्या २ सिटमुळे राष्ट्रीय राजकारणावर फार फरक पडणार नाही. पण भाजपच्या अंर्तगत वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे. योगींच्या मनात मठाचे स्वामी चिन्मयानंद यांचे नाव होते , ते डावलून शहांनी दुसरा उमेदवार दिला . यंदा बर्‍यच वर्षांनी मठाच्या बाहेरचा उमेदवार दिला गेला . आता योगींचा उमेदवार कापल्याने योगिंनी शहांचा उमेदवार पाडला की होम ग्रांऊड वर योगींना सेट्बॅक बसण्यासाठि दुसरा उमेदवार , ताकद न लावणे असे प्रकार करून त्यांना बॅकफूटवर जाण्यास मोदी- शहांनी भाग पाडले ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहेत. आकडे : https://en.wikipedia.org/wiki/Gorakhpur_(Lok_Sabha_Constituency)#Election_Results आकड्यांकडे नजर टाकली तर सप + बसप यांच्या मतात फार वाढ नाही , पण मोदी+ योगींचा करीष्मा या वेळी नव्हता आणि मतदानामध्ये घट झाली ही झालेलि घट भाजपाच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहे असे वाटते
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 03/15/2018 - 10:32 नवीन
ह्म्म.. म्हणजे भाजपाला ही निवडणूक जिंकायची नव्हतीच असं तुम्हाला म्हणायचे आहे का? त्याची कारणे काय असावीत? केवळ अंतर्गत दुफळी हेच कारण असेल असे वाटत नाही. तसेही मोदींनंतर शहा हे पंप्रचे उमेदवार नक्कीच नाहीयेत. त्यामुळे हे नेमके असे का वागले हे समजणे कठीण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी गुरुवार, 03/15/2018 - 11:09 नवीन
पण योगी असू शकतात. यूपी मधले ७० खासदार म्हणजे पंप्र पदाचे तिकिट मानले जाते. हा एक चर्चिला जाणारा तर्क आहे . माझे मत कमी झालेले मतदान ,विरोधी युती आणि अगरवाल सारख्या नेत्यांचे प्रवेश , विजय गृहित धरल्याने कमी पडलेले प्रयत्न ही कारणे आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/15/2018 - 11:20 नवीन
बिहारप्रमाणे इथेही विरोधी मते एकवटल्याने भाजप हरला. मायावतीला राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याच्या बदल्यात बसपने सपला पाठिंबा दिला. परंतु २०१९ मध्ये हे दोघे युती करतील का हे सांगणे अवघड आहे. विरोधी पक्शात पंतप्रधान इच्छुक अनेकजण आहेत. त्यांच्यात एकमत होणे अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
A
arunjoshi123 Sun, 03/18/2018 - 18:33 नवीन
अशा चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहेत.
या वर्तुळांना काही इज्जत नाही उरली. निवडणूकीत पराभव होतच असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/15/2018 - 11:29 नवीन
मतदान यंत्रात घोटाळा झाला नसती तर आमचे मताधिक्य अजून वाढले असते. - अखिलेश यादव
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे गुरुवार, 03/15/2018 - 12:15 नवीन
खरे असेल तर धक्कादायक !! बुद्धी भ्रष्ट झालीय काय असले बोर्ड लावणार्‍यांची ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com गुरुवार, 03/15/2018 - 12:47 नवीन
http://zeenews.india.com/hindi/india/pune-deenanath-mangeshkar-hospital-doctor-get-patient-treated-by-tantrik-causes-death/380205 http://indianexpress.com/article/cities/pune/video-shows-man-performing-rituals-on-dying-patient-in-hospital-her-doctor-booked-5097037/ https://www.loksatta.com/maharashtra-news/news-of-black-magic-in-dinanath-mangeshkar-hospital-of-pune-1644716/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
म
माहितगार गुरुवार, 03/15/2018 - 12:58 नवीन
एवढ्या बातम्यांच्या आधारावर घाईने निष्कर्ष काढणे श्रेयस्कर होईल असे वाटत नाही . अ‍ॅडीषनल डिटेल्सची गरज आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बबन ताम्बे गुरुवार, 03/15/2018 - 12:59 नवीन
घटना वाचली आहे मी पेपरमध्ये. ती धक्कादायक तर आहेच. तुम्ही ज्या बोर्डची इमेज इथे चिकटवलीय तो बोर्ड खरा आहे का हे मी विचारतोय. खरा असेल तर अजून धक्कादायक आहे असे मला म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com गुरुवार, 03/15/2018 - 17:21 नवीन
फेसबुकावरुन कॉपी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ब
बिटाकाका गुरुवार, 03/15/2018 - 17:28 नवीन
कोणता बोर्ड? वरचा एखादा प्रतिसाद उडाला काय? काही गणित लागत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माहितगार गुरुवार, 03/15/2018 - 18:57 नवीन
manguu@mail.com चा एक निराधार वक्तव्य कॉपीपेस्ट करणारा एक प्रतिसाद संपादकांनी उडवलेला दिसतोय. मी संदर्भासहीत उत्तर टाईपून प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला तर मूळ प्रतिसाद गेला असे सांगून मिपा सॉफ्टवेअरने माझा देखील उपप्रतिसाद गिळला. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
म
माहितगार गुरुवार, 03/15/2018 - 12:39 नवीन
घाई होतीए ? एका दुर्दैवी घटनेवर प्रतिक्रीया देण्याची !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
क
कपिलमुनी गुरुवार, 03/15/2018 - 12:17 नवीन
इथे आणि इथे तुम्ही लिहिल्याप्रमाणे "राणे भाजपत आला तर मी व्यक्तिशः विशेषतः विधानसभेसाठी भाजपला मत देणार नाही." सध्या आता प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि मुरलीधरन हे भाजपचे अधिकृत उमेदवार असतील, असे राज्याचे मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. या दुव्यानुसार आणि वरती दिलेल्या दुव्याच्या माहितीनुसार राणे सध्या भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत . तर तूम्ही तुमच्या "राणे भाजपत आला तर मी व्यक्तिशः विशेषतः विधानसभेसाठी भाजपला मत देणार नाही." या मतावर ठाम आहात का ??
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/15/2018 - 12:24 नवीन
राणे भाजपत आला आहे, का तो भाजप पुरस्कृत आहे ते अजून स्पष्ट नाही. पण मी माझ्या मतावर ठाम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सालदार गुरुवार, 03/15/2018 - 14:08 नवीन
A day before filing his nomination papers for the Rajya Sabha elections, former CM Narayan Rane quit his own party, the Maharashtra Swabhiman Paksha. He has now joined the BJP. Rane told TOI he quit the Maharashtra Swabhiman Paksha as it would have been incorrect for him to be associated with two parties at the same time. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/narayan-rane-quits-own-party-joins-bjp-ahead-of-rs-polls/articleshow/63292383.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ज
जेम्स वांड गुरुवार, 03/15/2018 - 14:11 नवीन
आता श्रीगुरुजींच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सालदार
प
पगला गजोधर गुरुवार, 03/15/2018 - 14:18 नवीन
"वाल्याचा वाल्मिकी झाला" छापाच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/15/2018 - 15:54 नवीन
http://www.misalpav.com/comment/986975#comment-986975
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
स
सुबोध खरे गुरुवार, 03/15/2018 - 14:16 नवीन
श्री नारायण राणे याना पक्षात घेऊन भाजप ला नक्की काय फायदा होणार आहे हे कळत नाही
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 03/15/2018 - 14:46 नवीन
हा विचार करून बघा न सर मग, म्हणजे तितका बाजूला काढला की उरलेला तटस्थपणा (ना नफा ना तोटा) किंवा थेट नफा सापडू शकेल, म्हणजे असे मला वाटतं बरंका डॉक्टर साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा