Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी - भाग २६

क
कपिलमुनी
Wed, 03/14/2018 - 21:50
🗣 175 प्रतिसाद
राणे भाजपात दाखल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या संस्थापकानेच पक्षाचा राजीनामा देण्याची ही बहुधा पहिली वेळ असेल. चला , राणे भाजपात नाही असे ठासून सांगणाऱ्याच्या आता कोलांट्या उड्या बघायच्या :)
वर्गीकरण
काथ्याकूट; राजकारण

प्रतिक्रिया द्या
41073 वाचन

💬 प्रतिसाद (175)
प
पगला गजोधर गुरुवार, 03/15/2018 - 15:34 नवीन
तटस्थपणा (ना नफा ना तोटा) किंवा थेट नफा सापडू शकेल
. शिंपल आहे वांड साहेब, शिवसेना व इतर प्रतिपक्षातील, उपद्रवमूल्य (राजकीय उपद्रवमूल्य नव्हे तर हमरीतुमरीवर वेळ आलीच तर रस्त्यावरचे उपद्रवमूल्य) असलेला मराठा नेता शहा साहेबानी पदरी बाळगलाय हो ...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/15/2018 - 15:52 नवीन
उपद्रवमूल्य मराठा नेता हे लक्षातच आले नव्हते
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/15/2018 - 16:08 नवीन
Sharad Pawar, president of Nationalist Congress Party (NCP), which is part of the ruling alliance in Maharashtra told a Marathi news channel:“We are not a bunch of saints, and if we are going to get political advantage for giving reservations to Marathas and Muslims, then so be it.”हे साहेबांचे निर्लज्ज वक्तव्य होते. http://www.livemint.com/Opinion/76XE10XAWthbQgvyhHjnNN/Will-Maratha-and-Muslim-reservation-stand-legal-scrutiny.html यानंतर महा मोर्चा वगैरे प्रकरणे झाली. तेंव्हा काट्याने काटा काढावा या न्यायाने श्री नारायण राणे याना त्यांच्या समोर उभे करणे हा एक हेतू असू शकतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/15/2018 - 16:09 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/arvind-kejriwal-apologies-to-punjab-minister-1646152/ मी चुकलो, मला माफ करा – अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पंजाबचे महसूल मंत्री बिक्रम सिंह मजिठिया यांची माफी मागितली. मे २०१६ मध्ये मजिठिया यांनी केजरीवाल आणि आपच्या अन्य दोघांविरोधात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला होता. पंजाबमधल्या ड्रग समस्येवरुन केजरीवालांनी मजिठियांना टार्गेट केले होते. खोटे आरोप करुन केजरीवाल आपली व आपल्या कुटुंबाची बदनामी करत आहेत असा आरोप मजिठिया यांनी केला होता. केजरीवालांच्या आरोपांनी संतप्त झालेल्या मजिठियांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितला होता. अलीकडे मी तुमच्यावर तुम्ही ड्रग व्यवसायात सहभागी असल्याचे आरोप केले होते. माझी विधाने राजकीय हेतुन प्रेरित होती. या आरोपातून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे माझ्या लक्षात आले आहे. या मुद्यांवरुन पुन्हा राजकारण नको असे केजरीवाल यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. मी तुमच्यावर केलेले सर्व आरोप मागे घेतो आणि माफी मागतो असे केजरीवालांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. मागच्यावर्षी केजरीवालांनी हरयाणाचे भाजपा नेते अवतार सिंह भडाना यांची माफी मागून विषय संपवला होता. २०१४ साली केजरीवालांनी अवतार सिंह भडाना यांना भ्रष्टाचारी म्हटले होते. या विधानाबद्दल भडाना यांनी सुद्धा केजरीवालांविरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/15/2018 - 16:50 नवीन
खोटे आरोप केल्यावर माफी मागायला लागली हे चांगले झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/15/2018 - 17:24 नवीन
अजून बरेच खटले शिल्लक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
पगला गजोधर गुरुवार, 03/15/2018 - 16:14 नवीन
आणि म्हणे "पार्टी विथ डिफरन्स" ... "चाल - चेहरा - चरित्र".... ब्ला ब्ला ब्ला .....
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 03/15/2018 - 17:25 नवीन
तुम्ही म्हणाल तेच डिफरन्सेस गृहीत धरायचे का? बरं मग एकदा लिस्ट करून टाका कि अमुक एक डिफरंट गोष्टी केल्या तरच पार्टी विथ डिफ्फरन्स नाहीतर नाही, कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 03/15/2018 - 16:44 नवीन
सगळे तसलेच रे गजोधरा. त्या 'आप'वाल्या अरविंदाकडून थोड्या अपेक्षा होत्या. दिल्लीत तो बर्यापैकी काम करतोय असे वाचले आहे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sun, 03/18/2018 - 18:41 नवीन
माईसाहेब, कानांचा इलाज करून घ्या, ह्यांच्या डोळ्यांचा पण इलाज करा. ================================ केजरीवालाने दिल्लीची पुरती वाट लावली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
स
सर टोबी गुरुवार, 03/15/2018 - 17:49 नवीन
उद्देश हा अंध, संघ, भाजप विरोधकांनी नव्याने समजून घ्यावा या उद्देशाने हा प्रतिसाद लिहीत आहे. खरे तर मला देखील असा साक्षात्कार हल्लीच झाला आहे. असे बघा, सत्य जर सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असते तर एक दोन भागातच अंध भक्त झाले असते किंवा भक्त अंध झाले असते. पण तसे नाहीये. त्यामुळे जर हि मालिका भक्तांसाठीच जर राखीव ठेवली तर किती चांगले होईल. भक्त अनेक नव्या तऱ्हांनी हे धागे सजवतील. कधी नरेंद्र सूक्त, कधी नरेंद्र सप्तशतीचा पाठ, संकट मोचनासाठीचा अध्याय, आणि नरेंद्र आरती अशा गोष्टी नावारूपाला येतील. सवाई गंधर्व वगैरे ठिकाणी जसे रसिक एकमेकांना स्वतःला भावलेल्या जागा दाखवून एकूणच परस्परांचे भावविश्व समृद्ध करतात तद्वत इथे लोक या सरकारच्या अनवट गोष्टींचे आपल्याला समजलेले मर्म समविचारी लोकांना समजावून सांगतील. जसे नोटबंदी नंतरची काश्मीर शांतता, सर्जिकल स्ट्राईकनंतरचे पाकिस्तानचे मोडलेले कंबरडे, भ्रष्टाचाराची झालेली उचलबांगडी, डिजिटल इंडिया वगैरे गोष्टींमुळे महासत्तेचे वास्तव कसे उंबर्यापर्यंत आले आहे अशा गोष्टींची चर्चा होईल. तेंव्हा अंध विरोधकांना हे आवाहन आहे कि त्यांनी या मालिकेचे काही भाग भक्तांना महानुभाव घेण्यासाठीच मुक्त ठेवावेत.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 03/15/2018 - 18:11 नवीन
संदिग्ध प्रतिसाद, नेमकं काय म्हणायचंय तेच झेपंना!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
M
manguu@mail.com गुरुवार, 03/15/2018 - 20:06 नवीन
भक्तांसाठी पेशल जागा या धाग्यावर कशी असणार ? ही मुम्बै लोकल आहे . इथे सगळेच येणार. भक्तांसाठी खास गाडी - राजधानी बुलेट ट्रेन श्रीगुरुजीनी एकदा चालवली होती .. पहिल्या वर्षी ... नंतर ती परत कधी दिसली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
M
manguu@mail.com गुरुवार, 03/15/2018 - 20:12 नवीन
http://www.misalpav.com/comment/806937
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Fri, 03/16/2018 - 03:06 नवीन
तुम्ही कोण? भक्त, गुलाम, चाटु की आपटार्ड?? कि नविन एखादी कॅटेगरी??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
श
श्रीगुरुजी Fri, 03/16/2018 - 05:17 नवीन
ते या सगळ्याचे मिश्रण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
श्रीगुरुजी Fri, 03/16/2018 - 05:22 नवीन
>>> भक्तांसाठी खास गाडी - राजधानी बुलेट ट्रेन श्रीगुरुजीनी एकदा चालवली होती .. पहिल्या वर्षी ... नंतर ती परत कधी दिसली नाही. पण त्यात विनातिकीट अंधद्वेष्टेच झुंडीने घुसुन जागा बळकावण्याचा प्रयत्न करीत होते. तो धागा वर्षभर चालला आणि त्या अवधीत कागलकरला संपादकांनी १०-१२ वेळा हाकलून त्याचे सदस्यत्व नष्ट केले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Fri, 03/16/2018 - 06:10 नवीन
विनातिकिट गंमतच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुखीमाणूस गुरुवार, 03/15/2018 - 18:07 नवीन
पण सरकारच्या/भाजपा च्या चुका कोणीतरी ईथे लिहितयत की... मग त्यावर दोन्ही बाजू हिरिरीने मत मांडत आहेत. ताज्या घडामोडी हा धागा काय फक्त सरकारला शिव्या घालायला हवा का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/16/2018 - 05:51 नवीन
तेलगू देसमने मोदी सरकारचा पाठिंबा काढून घेतला असून ते सरकारविरोधातील अविश्वास ठरावाला पाठिंबा देणार आहेत. बरोबर १९ वर्षांपूर्वी एप्रिल १९९९ मध्ये जयललिताने वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेऊन अविश्वास ठरावाला पाठिंबा दिल्याने केवळ १ मताच्या फरकाने सरकार पडले होते. त्यावेळी वाजपेयींनी जयललिताच्या blackmail पुढे मान झुकविली नव्हती आणि आज मोदी नायडूंच्या blackmail पुढे मान झुकवायला तयार नाहीत. कणखर बाणा दाखविल्याबद्दल मोदींचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 03/16/2018 - 05:57 नवीन
बाकी विरोधी पक्ष पाठिंबा देत नाहीत तोपर्यंत अविश्वास प्रस्ताव पुढे सरकार नाही. कदाचित प्रस्तावच फेटाळला जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बिटाकाका Fri, 03/16/2018 - 07:13 नवीन
प्रस्ताव पुढे जाईल असे दिसते. काँग्रेस, माकप, अण्णा द्रमुक, एमआयएम ने पाठिंबा द्यायचे ठरवले आहे. काँग्रेस ४८ + अण्णा द्रमुक ३७ + टिडीपी १६ + माकप ९ + वायएसआर ८ + एमआयएम १ = ११९ जणांचा पाठिंबा आहे. यात तृणमूल ३४ आणि शिवसेना १८ यांचे काय होतेय हे पाहणे रोचक आहे. ----------------------------------------------------- भाजपचे स्वतःचे २७४ सदस्य असल्याने सरकारला कुठलाही धोका दिसत नाही पण निवडणूक येऊ घातल्याने वातावरण तयार करून मित्रपक्ष फोडण्याचे प्रयत्न विरोधकांकडून चालल्याचे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
M
manguu@mail.com Fri, 03/16/2018 - 06:34 नवीन
कास्मिरपासून नागापर्य्ंत सगळ्या फुटिर पक्षाना मिठ्या मारणारी, गोवा , पूर्व राज्यात गोमांस खायला पर्मिशन देणारी, अतिरेक्याना विमान देणारी.. भाजपा ताठ कण्याची !!!! एक्स रे काढून बघा गुरुजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बिटाकाका Fri, 03/16/2018 - 06:58 नवीन
हे तुमचे एखाद्या पक्षाचे समर्थन करायचे निकष आहेत का? असतील तर तुमचा आवडता पक्ष कोणता? नसेल तर फक्त भाजप विरोध हा तुमचा अजेंडा असण्यामागचे कारण काय? --------------------------------------------- इतरत्र फुसके बार काढून मग प्रतिसाद इग्नोर मारला जातो तसा इथेही मारला तरी काही हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Sun, 03/18/2018 - 18:48 नवीन
अतिरेक्याना विमान देणारी..
हे नविनच. भाजपानं सरकारी विमानावर तुळशीपत्र ठेवलं??????????????? ================================================== अफगाणिस्तानात काय पदयात्रा काढायची होती का? भाजप द्वेष्ट्यांचा आय क्यू लैच भारी असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Fri, 03/16/2018 - 09:25 नवीन
विशेष राज्याचा दर्जा देवू असे आधी बोलून मग भाजपे वचन विसरले. चंद्राबाबूनी कैकयीच्या आवेशात मोडू नका वचनास नाथा , असे स्पष्टपणे सांगितले. अविश्वास ठरावाचा प्रस्तावही मांडायचे ठरवले. म्हणजे कणखर बाणा बाळगल्याबद्दल अभिनंदनास भाजपा/ मोदी/ शहापेक्षा चंद्राबाबूच अधिक पात्र आहेत ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 03/16/2018 - 11:02 नवीन
निवडणुक जवळ आल्यावर एकदम कणखर बाणा कसा काय जागृत झाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Fri, 03/16/2018 - 11:08 नवीन
विचार करायला ३-४ वर्षे दिली . कोर्टात घटस्फोटसुद्धा काडी मोडण्याइतक्या सहजतेने होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 03/16/2018 - 11:17 नवीन
कसला डोंबलाचा विचार. पुढील वर्षी आपली वाट लागणार याचा अंदाज आल्यावर आपल्या नाकर्तेपणाचे खापर दुस-यावर फोडण्याचाच हा प्रकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Fri, 03/16/2018 - 12:34 नवीन
हाहाहा, आश्वासन (दिले असेल तर) पूर्ण होणार कि नाही हे समजायला ३-४ वर्षे लागतात होय, छानय! इथे अंधविरोधक वाहिल्या वर्षीपासूनच फेकूगिरी वगैरे म्हणून नाचत आहेत, त्यांच्याकडून काहीतरी शिकून घ्यायचं ना चंद्राबाबूंनी! --------------------------------------------------- मग आता विशेष राज्याचा दर्जा पुढच्या वर्षी देणार का कोणी? काँग्रेस? कि तिसरी आघाडी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
स
समाधान राऊत Fri, 03/16/2018 - 11:35 नवीन
उगच चंपाबाई ची आठवण आली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
श
श्रीगुरुजी Fri, 03/16/2018 - 11:13 नवीन
बिहारमधील पोटनिवडणक राजदने जिंकल्यावर विजयी मिरवणुकीत "भारत तेरे तुकडे होगे", "पाकिस्तान झिंदाबाद" अशा घोषणा देत असतानाच्या चित्रफिती व्हायरल झाल्यात. भाजपला विरोध करण्याच्या धुंदीत आपण कोणाला समर्थन देतोय याबद्दल ना खंत ना खेद.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 03/16/2018 - 11:28 नवीन
काय झाले त्यांचे ? जिथे भाजप्यांची नाके आपटतात नेमके तिथेच अशा फिती कशा सापडतात ? अशा फिती कितीका असेनात , विकास , संघ , हिंदुत्व इ इ फुल्ल्ल्ल हिंदुत्वाचा डोस असताना हिंदुबहुल भागात भाजपे का हरले म्हणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 03/16/2018 - 11:40 नवीन
तिथेच सापडणार ना पाकिस्तानप्रेमी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Fri, 03/16/2018 - 12:57 नवीन
३० वर्शे मठाची सत्ता असताना कधी दिसले नाहीत. आता एकदमच उगवले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बिटाकाका Fri, 03/16/2018 - 13:03 नवीन
जिथे भाजप्यांची नाके आपटतात नेमके तिथेच अशा फिती कशा सापडतात ? अशा फिती कितीका असेनात , विकास , संघ , हिंदुत्व इ इ फुल्ल्ल्ल हिंदुत्वाचा डोस असताना हिंदुबहुल भागात भाजपे का हरले म्हणे ? ---------------------- या दोन्ही प्रश्नांची तुमची उत्तरे सांगाल का? का परत हवेतच बाण? ती फीत सापडली आहे यावर काहीच बोलणे नाही, तिथेच कशी सापडली म्हणे? काहींच्या काही! ---------------------- विकास , संघ , हिंदुत्व इ इ फुल्ल्ल्ल हिंदुत्वाचा डोस चालत नाही किंवा मोदी वेव्ह वगैरे नाही माहित होतं तर सपा बसपा युती का झाली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Sun, 03/18/2018 - 19:11 नवीन
जिथे भाजप्यांची नाके आपटतात नेमके तिथेच अशा फिती कशा सापडतात ?
अरे भाऊ, किशनगंज, अरेरिया बद्दल तुला काई माहिती आहे का? =============================================== आणि तू स्वतः कधी गेलाय का जे एन यू मधे? मी स्वतः आय आय एफ टी मधून एम बी ए केलं आहे जे जे एन यू पासून १ कि मी वर आहे. मी तिथे खूपदा गेलो आहे. (तिथली कँटीन मस्त आहे.) तिथली घाण चुक्षुरवे पाहिली आहे. असह्य भारतद्वेष (बाकी असोच) पाहिला आहे. त्यावेळी कोण्याचंही नाक आपटलं नव्हतं. ============================== जे एन यू असं जगातलं एकमात्र कँपस असावं जिथे अ‍ॅलम्नायला पण आत घेत नाहीत. =================================== तू ना अगोदर काश्मिर. ईशान्य भारत, जे एन यू, किशन्गंज, इ इ स्वतः फिरून ये. ====================================== तुला भाजपला मत द्यायचं नाही तर नको देऊ. तू म्हणतो म्हणून मी ही नाही देणार. पण बरगळायचं बंद कर. हा प्रश्न काही तिथल्याच स्थानिक लोकांच्या दूरगामी अस्तित्वाचा आहे. सुरक्षेचा आहे. तू आणि तुझा पक्ष तुमच्या पद्धतीनं सोडवा. पण गाढवासारखं एखादा प्रश्नच नाही असं म्हणू नकात. ============================ बाय द वे, भारताचं खरंखुरं विभाजन करायचं सामर्थ्य जे एन यू मधे आहे आणि ते ते बर्‍याच अंशी वापरतात देखील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 04:50 नवीन
असह्य भारतद्वेष तुम्हाला दिसला तर रीतसर पोलिस केस करायची की . किंवा निदान संघ , अभाविप अशा हिंदुरक्षक संघटनाना तरी सांगायचे . माझ्यावर राग काढणे , हे उत्तर नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 06:22 नवीन
धन्यवाद. =========== आमच्या कॉलेजच्यावेळी विद्यार्थ्यांची गुंडगिरी, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान, कॉलेजात संप घडवून आणणे, अंमली पदार्थांची व्यसने, राजकीय विरोध, सामाजिक चळवळींचे तिथल्या राजकारणात दिसणारे प्रारुप आणि भारतद्वेष यांच्यात नक्की भेद करता येत नसे. तितकी अक्कल नव्हती. हे सगळं आम्हाला सारखंच वाईट वाटायचं. आज मला इतर गोष्टी तारुण्यसुलभ, इ इ वाटतात. पण भारतद्वेष आजही खुपतो. बाकी संघविरोधी शैक्षणिक वातावरणात शिकल्यामुळं आम्ही काही तिकडे तक्रार केली नाही. आज मात्र पाठींबा आहे. ================= मला काही तुमचा राग असायचा प्रश्न येत नाही. आणि तक्रार करायचं कर्तव्य माझं एकट्याचं नाही. तुमचंही आहे. आज जितका मी परिपक्व आहे आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे तितका तेव्हा असतो तर बर्‍याच जणांना जेलमधे घातलंही असतं. आज जे मी तुम्हाला 'काहीही फालतू बरगळू नकोस' असं लिहितो ते मला परवडतं. त्या काळात नसतं. ===================== बाय द वे, तुम्ही इथे जे एकूण काही मोदी, भाजप, संघ, अभाविप इ इ बद्दल विष ओकता, तर किती पोलिस तक्रारी केल्यात? का लोका सांगे...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 06:52 नवीन
बाय द वे, तुम्ही इथे जे एकूण काही मोदी, भाजप, संघ, अभाविप इ इ बद्दल विष ओकता फारच आक्षेपार्ह बोलता आहात. तुम्हाला मार्ग सुचवला , तर मलाच उलट बोलत आहात. तुम्ही जे बोलतात गुंडगिरी , व्यसन , राजकारण ते कितेव्तरी कॉलेजात होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 07:52 नवीन
कास्मिरपासून नागापर्य्ंत सगळ्या फुटिर पक्षाना मिठ्या मारणारी, गोवा , पूर्व राज्यात गोमांस खायला पर्मिशन देणारी, अतिरेक्याना विमान देणारी.. भाजपा ताठ कण्याची !!!! एक्स रे काढून बघा गुरुजी
हे विष नाहीतर काय आहे? अतिरेक्यांना काश्मिरमधून काबूलला पायी नेतात का? तुम्ही भाजपला शौर्य नसलेली म्हणा, सत्तेचा हव्यास असलेली म्हणा आणि त्यासाठी फुटीरवादी शक्तींना खुश करणारी म्हणा. तुम्हाला यातून भाजप ही अतिरेकीप्रेमी आहे असंच म्हणायचं आहे ना? ================ अतिरेक्यांना विमान दिलं तर कुठे पोलिस कंप्लेंट केली होतीत? गोमांसाची कंप्लेंट कुठे केलीत? ======================= अक्कल नसेल तर माणसानं गप्प बसावं. भाजपची सत्ता मणिपूरमधे यायच्या आधी मणिपूर सतत १२० दिवस जळत होतं. पेट्रोल ३०० रु. गॅस २०० रु. https://energy.economictimes.indiatimes.com/news/oil-and-gas/lpg-price-touches-rs-3000-per-cylinder-in-manipur-on-economic-blockade/55468096 ज्या दिवसापासून भाजप दोन्हीकडे युतीत सत्तेत आली, त्या दिवसापासून लोक इम्फाळ ते कोहिमा स्कूटरवर जात आहेत. काहीही दंगा झालेला नाही. फूटिरांना मिठ्या मारल्यात त्या तिथे अभूतपूर्व शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून. तुमच्यासाठी सन्मानाची भाषा करण्याची आमची निश्चितच इच्च्छा आहे. पण अख्ख्या काश्मिरच्या मतदारांना, नागालँडच्या मतदारांना, लोकशाही मार्गाने बनलेल्या पक्षांना, त्यांच्या आकांक्षांना तुम्ही फुटीर म्हणून संभावता तेव्हा सन्मान द्यायची इच्छा मरून जाते. -------------------- तुमचा भाजपशी राजकीय मतांतर असणं अत्यंत सन्मान्य आहे. मोदीला २०१९ मधे २ काय १ च जागा मिळो. तुमच्या तोंडात घी शक्कर. अ‍ॅडवान्समधे अभिनंदन. पण त्यात विष, विखार नको. थोडं वास्तव पण पहा. सुयोग्य तितकीच टिका करा. नाही तर मग संघावाले चेकाळून तितकीच घाणेरडी टीका काँग्रेसच्या चांगल्या माणसांवर करतात. कशाला संभाषणाचा दर्जा घसरवायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
श
श्रीगुरुजी Mon, 03/19/2018 - 10:02 नवीन
परफेक्ट! परंतु इतके जोडे खाऊन सुद्धा कागलकर सुधारणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 10:15 नवीन
https://www.goodreturns.in/petrol-price-in-imphal.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 10:49 नवीन
अरे भावा, मी वर दिलेली लिंक पाहा. त्यात एका गॅस सिलिंडरची किंमत ३००० रुपये लिहिली आहे. तो काळ काँग्रेसचा. लिंक देऊन आजची (भाजपच्या शांतीपूर्ण काळातली) पेट्रोल प्राईस का सांगतोस? ब्लॉकेडच्या काळातली पाहा. गूगल जमत नाही का ? मी खाली लिंक देतो. वाच. http://www.nagalandpost.com/ChannelNews/Regional/RegionalNews.aspx?news=TkVXUzEwMDEwNTE5NQ%3D%3D =========================== तरीच म्हटलं, भाजपद्वेष (विरोध नव्हे) करायला एक विशिष्ट किमान निर्बुद्धता आवश्यक आहे. ======================== आणि अशा ब्लॉकेडस तिथे पवित्र काँग्रच्या काळात एकूण किती झाल्यात ते पण वाच मंजे त्यांचं महत्त्व कळेल. मग फुटीर , मिठ्या म्हणत गावभर फिर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Mon, 03/19/2018 - 11:02 नवीन
अरुण जोशी सर, पटलं नाही म्हणून सांगतो, तुमच्याकडून त्रागायुक्त भाषेची बिलकुल अपेक्षा नाही, एकेरी तर नाहीच नाही! --------------------------------------- maguuu तुमच्या ओळखीचे असतील तर, चालुद्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 11:49 नवीन
अरुण जोशी सर, पटलं नाही म्हणून सांगतो, तुमच्याकडून त्रागायुक्त भाषेची बिलकुल अपेक्षा नाही, एकेरी तर नाहीच नाही!
तुमची अपेक्षा नॉर्मल, रास्त आहे. ======================= माझ्या प्रतिक्रिया अचानक नाहीत. त्या बर्‍याच दिवसांच्या निरीक्षणानंतरच्च्या आहेत. ========================== सभ्यता, औपचारिकता, शिष्टाचार इ इ आपल्या मूळ उद्देशापेक्षा महत्त्वाचं असू शकत नाही. अनेक लोकांना पात्रतेप्रमाणेच वागवणे इष्ट असते. द्वेषबुद्धीला सन्मानाने वागवणे आत्मघातक असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 10:20 नवीन
अख्ख्या काश्मिरच्या मतदारांना, नागालँडच्या मतदारांना, लोकशाही मार्गाने बनलेल्या पक्षांना, त्यांच्या आकांक्षांना तुम्ही फुटीर म्हणून संभावता तेव्हा सन्मान द्यायची इच्छा मरून जाते. असेच आहे तर भाजपावाल्यानीही इतर पक्ष , त्यांचे नेते व त्यांची कारकीर्द ह्यांचा सन्मान ठेवावा. ( तसेही व्यक्तिश: ना तुमच्या सन्मानावर जगतो ना तुमचे जोडे घालून फिरतो . दोन्ही तुमच्याकडेच ठेवले तरी चालेल. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
व
विशुमित Mon, 03/19/2018 - 10:22 नवीन
<< तसेही व्यक्तिश: ना तुमच्या सन्मानावर जगतो ना तुमचे जोडे घालून फिरतो . दोन्ही तुमच्याकडेच ठेवले तरी चालेल.>> ==>> यासाठी +1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 11:23 नवीन
विशुमितराव, ह्या मंगूच्या या मानसिकतेला प्रोत्साहन देऊ नकात. सन्मानच काय माणूस पेटला तर त्याला कोणाच्या कशाचीच गरज पडणार नाही. पण म्हणून काय आपल्याला लोक किती सन्मान देतात याला काहीच मूल्यच नसावं का? जे लोकांत आपण संवाद करत आहात तिथे ते तुम्हाला काय मानतात याचा तुम्हाला फरकच पडत नसला तर सामाजिक संवाद नासून जाईल. ============ आणि माझ्या सन्मानाची व्यक्तिशः त्यांना गरज आहे असं मला म्हणायचंही नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ब
बिटाकाका Mon, 03/19/2018 - 10:28 नवीन
हाहाहा, विरोधाभास तर बघा, विरोधी पक्षवाले काय भाजपच्या सन्मानावर जगात आहेत काय? मग कशाला अपेक्षा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा