Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी - भाग २६

क
कपिलमुनी
Wed, 03/14/2018 - 21:50
🗣 175 प्रतिसाद
राणे भाजपात दाखल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या संस्थापकानेच पक्षाचा राजीनामा देण्याची ही बहुधा पहिली वेळ असेल. चला , राणे भाजपात नाही असे ठासून सांगणाऱ्याच्या आता कोलांट्या उड्या बघायच्या :)
वर्गीकरण
काथ्याकूट; राजकारण

प्रतिक्रिया द्या
41073 वाचन

💬 प्रतिसाद (175)
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 11:03 नवीन
असेच आहे तर भाजपावाल्यानीही इतर पक्ष , त्यांचे नेते व त्यांची कारकीर्द ह्यांचा सन्मान ठेवावा.
अर्थातच. ठेवतातच कि. कोणाचा नाही ठेवला? ===================================== तुम्ही भाजपचं राहूच द्या. संघावाले कम्यूनिस्ट, काँग्रेस, बसपा, लीग यांचादेखील (मंजे तत्त्वतः आणि काही काही नेत्यांचा) सन्मान ठेवतात. फायजे असेल तर मी लिंक देतो. कालच मी फेसबुकवर पोस्ट केलं होतं. आंबेडकरांचा वारसा कसा श्रेष्ठ आहे आणि तो आज कोणाकडे आहे याबद्दल काल मी एका संघावाल्याचं भाषण ऐकत होतो. यूट्यूबवर. भाषणाअंती तो म्हणाला कि आंबेडकरांचा हा वारसा आज त्या सर्व लोकांकडे आहे ज्यांकडे त्यांना अभिप्रेत असलेलं देशप्रेम आहे, विचार आहेत, संस्कृती आहे, तत्त्वे आहेत, इ इ. अर्थातच इथे "ज्यांकडे" मंजे संघाकडे असंच त्याला म्हणायचं होतं. मला वाटलं इथे तो भाषण संपवेल. पण तो पुढे असं म्हणाला कि दक्षिणेतील अनांबेडकरी चळवळ आणि उत्तरेतील आंबेडकरी चळवळ यांची आजची फलितं पाहीली तर आंबेडकरांचा खरा वारसा बहुजन समाजवादी पक्षाकडे आहे असं म्हणता येईल. असं नाव घेऊन संघावाला आंबेडकरांचा वारसा त्यांच्या विरोधात युती करणारांना देतात हे मला अजिबात अपेक्षित नव्हतं. ह्यांचेच संस्कार भाजपवाल्यांकडे आहेत असं तुम्हीच म्हणत असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 11:15 नवीन
तसेही व्यक्तिश: ना तुमच्या सन्मानावर जगतो ना तुमचे जोडे घालून फिरतो .
याचा मला देखील आनंद आहे. ईश्वर आपणांस असेच ठेवो. =============== एक राजकीय विचार म्हणून किंवा एक अयशस्वी सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा अजून काही म्हणून भाजपला मत देऊ नका असं सांगायचे शेकडो मुद्दे आहेत. त्यांचा आधार घ्या. पण अव्वाच्या सव्वा काहीही बरगळत कमी जा. ========================= तुमच्यासारख्या लोकांनी भाजपविरोधाची इज्जत घालवलीय. भाजपसमर्थक इतका अभ्यास आणि लॉजिक घेऊन येतात आणि त्यांना टोटल चित करणारा एकही अभ्यस्त मुद्दा तुम्ही मांडू शकत नाही मंजे काय? ========================= बाय द वे, त्या अतिरेक्यांना कंचे जोडे घालून कंच्या रस्त्यानं पायी श्रीनगरवरून काबूलला न्यायचं होतं? फार उत्सुकता लागून राहिलिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
व
विशुमित Mon, 03/19/2018 - 14:14 नवीन
<<<भाजपसमर्थक इतका अभ्यास आणि लॉजिक घेऊन येतात आणि त्यांना टोटल चित करणारा एकही अभ्यस्त मुद्दा तुम्ही मांडू शकत नाही मंजे काय?>>> ==>> यासाठी -१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
सर टोबी Mon, 03/19/2018 - 18:04 नवीन
मांगु यांच्या प्रतिसादातील विखार तुम्हाला सहन झालेला दिसत नाही. तुमच्या या प्रतिसादात तत्कालीन पंतप्रधानांबद्दल काय प्रेम उतू चालले होते? हा घ्या तुमचा प्रतिसाद:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
सर टोबी Mon, 03/19/2018 - 18:07 नवीन
प्रतिसादाची लिंक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
A
arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 06:32 नवीन
त्याच धाग्यावर त्याच प्रतिसादाच्या वर नेहरूविरोधकांवर टिका करताना (श्रीगुरुजींनी नेहरूंना -१०० दिले म्हणून) मी खालील प्रतिसाद दिला. इथे मी थेट नेहरूंच्या विरोधकांना अतिद्वेष (म्हणजे विखारापेक्षा खतरनाक काहीतरी) नसावा असं म्हटलं आहे. ============================================ त्याच धाग्यावरचा हा उतारा वाचूक मला नेहरूंचा विखार आहे असं तुमच्यासारखा सुबुद्ध डावाच म्हणो जाणे.
वर अनेक लोकांनी नेहरूंना -१०० मार्क दिले आहेत. अतिद्वेषाबद्दलचा हा सल्ला त्यांना देखिल लागू पडतो. कंपनीचे चेअरमन "चीप, मीन" असू शकतात, पण त्यांच्यात काहीही चांगलं नाही असं कसं? नेहरूंमधे सत्ताहव्यास एकिकडे आणि देशाचे हित काँप्रो करणारा भाबडेपणा दुसरीकडे होता म्हटलं तरी त्यांनी केलेल्या कार्यांत बरिच चांगली पण असणार ना? तुम्हाला -१०० (सर्वस्वी दुर्गुणी?) मार्क्स द्यावेत असा वाटणारा मनुष्य १५ वर्षे निवडून कसा आला? लोक इतके मूर्ख होते? किंवा इतर शब्दांत माझे, तुमचे पणजोबा इतके मूर्ख होते? हा त्या काळातल्या त्यांना नेते मानणार्‍या सर्व खासदारांचा अपमान नाही का? नेहरूंना एकही मार्क न देण्यातलं अनौदार्य आणि मोदींना २१ कलमी दोष देणे यात गुणात्मक फरक आहे का? (नाही असं माझं मत आहे. नाहीच असा दावा तुमच्यासाठी नाही, आहे का असा प्रश्न आहे.). त्यांच्या विचारसरणी आपल्याला मान्य नसणं वेगळं, त्याच्या चुका दिसणं वेगळं मात्र त्यांची त्यांचि जी काही विचारसरणि आहे तिच्याशी देखिल त्यांची प्रामाणिकता नव्हती याची खात्री असणं विचित्र आहे. पहा, एकूणात, मला देखिल नेहरू द्वेष (तसलं कैतरि) आहे, मात्र -१०० वैगेरे नाही हो.
================================== मूळात मला मोदीविरोधकांचा विखार आहे या गृहितकाने तुम्ही माझा विखार माझ्या लेखनात शोधत आहात. जीवनभरासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 05:44 नवीन
असह्य भारतद्वेष तुम्हाला दिसला तर रीतसर पोलिस केस करायची की . किंवा निदान संघ , अभाविप अशा हिंदुरक्षक संघटनाना तरी सांगायचे . माझ्यावर राग काढणे , हे उत्तर नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
M
manguu@mail.com Sat, 03/17/2018 - 13:38 नवीन
https://www.altnews.in/audio-analysis-of-the-viral-araria-video-with-alleged-pro-pak-slogans-raises-suspicions/ http://fewsnews.com/arria-videos-truth/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ड
डँबिस००७ Fri, 03/16/2018 - 19:04 नवीन
बिहार मधील ऐका गावातल्या चौकाला मा श्री नरेद्र मोदी यांच नाव दिल्याच्या कारणावरुन ऐका वरीष्ठ नागरिकाची शीर धडावेगळ करुन हत्त्या करण्यात आली! भारतात हळु हळु मोघल हुकुमत परत येत आहे !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 03/16/2018 - 19:07 नवीन
http://m.gulfnews.com/news/asia/india/indian-man-beheaded-for-naming-village-square-after-prime-minister-modi-1.2189145 जमोप्या अभिनदंन !
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 03/16/2018 - 19:20 नवीन
चौकाला एका माणसाने बळजबरीने नाव दिले, ही मोगलाई की त्याबद्दल त्याचे मुंडके उडवले ही मोगलाई ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
A
arunjoshi123 Sun, 03/18/2018 - 19:15 नवीन
याच न्यायाने घटनेत जबरदस्तीने सेक्यूलर शब्द घुसडला म्हणून इंदिरा गांधीचे मुंडके उडवले गेले असते तर ती मोघलाई असली नसती, शब्द जबरदस्तीने घुसडले हीच मुघलाई असली असती, बरोब्बर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ड
डँबिस००७ Fri, 03/16/2018 - 20:24 नवीन
पुर्ण देशा तल्या प्रत्येक गोष्टीला एकाच गांधीच नाव देण्याची ६५ वर्षांची मोगलाई च होती ! हे मान्य केल्या बद्दल अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 03/16/2018 - 22:37 नवीन
मी एका माणसाचे नाही म्हटले एका माणसाने असे म्हटले. चौकाला नाव द्यायला तिथल्या लोकल म्युन्सिपलमध्ये ठराव करतात व मग नाव देतात. एक गांधी , एक नेहरु सर्वानाच आवडले तर प्रत्येक गावात त्या नावाचे चौक , रस्ता , शाळा असणारच. पण त्यांचं नाव चौकाला आहे , तर ह्यांचंही हवेच , म्हणून एका माणसाने अधिकार नसताना बोर्ड लावणे , हे चूक. ( मोगलाई हा शब्द का वापरायचा ? मोगलांच्या काळात मोगल हेच म्युन्सिपल कौन्सिल होते ना ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
आ
आनन्दा Sat, 03/17/2018 - 04:13 नवीन
हम्म बरोबर आहे.. लोकांना कळत नाही. शरियामध्ये अश्याच शिक्षा आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sat, 03/17/2018 - 05:09 नवीन
http://www.newindianexpress.com/nation/2018/mar/16/man-hacked-to-death-in-bihar-over-naming-of-a-site-as-narendra-modi-chowk-probe-points-at-old-lan-1788211.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ब
बिटाकाका Sat, 03/17/2018 - 05:20 नवीन
हाहाहा, हेच सुरुवातीला करायचं असतं हो! अंधविरोध काहीही करायला लावतो माणसाला!! यामुळेच, भक्त, गुलाम, चाटु, आपटार्ड असणे केव्हाही वाईट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Sat, 03/17/2018 - 05:17 नवीन
छान, छान!! अंधविरोधाची पुढची पायरी गाठल्याबद्दल हार्दिक हबिणंदन!!! --------------------------------- थोडक्यात, उद्या एखाद्याने पालिकेकडून परवानगी न घेता चहाचा गाडा वगैरे लावला की गळे कापले जावेत याला तुमचे समर्थन आहे काय?? तुमच्या आवडत्या सरकारच्या काळात अच्छे दिन बद्दल तुमची अपेक्षा अशी आहे होय, छानय! -------------------------------- ते पालिकेचा नियम असताना विंग्रजीमध्ये फलक लावणाऱ्यांचं तुमच्यामते काय करायचं असतं? देशात कायदा नावाची गोष्ट आहे याची आपल्याला जाणीव असणारच! ------------------------------- नेहरू सगळ्यांना आवडतात आणि मोदी सगळ्यांना आवडत नाहीत याची काही आकडेवारी? की आपलं नेहमीप्रमाणे हवेत गोळ्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sat, 03/17/2018 - 05:34 नवीन
गळे कापण्याचे समर्थन केलेले नाही. त्याना कायद्याने शिक्षा दिली जाईल. तसेही न्यायप्रिय भाजपाचेच शासन आहे. विश्वास ठेवावा. गोमांस प्रकरणातील हत्यांचे भाजपे नक्कीच समर्थन करणार नाहीत. तसेच ह्याही प्रकरणात हत्यांचे समर्थन अ-भाजपे लोक कधीही करणार नाहीत. नेहरुंच्या काळात मोदी नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sat, 03/17/2018 - 05:58 नवीन
तुम्ही तुमचाच उत्स्फूर्त प्रतिसाद परत वाचा वरचा! असो, तुम्ही तुमचे म्हणणे स्पष्ट केल्याने परत प्रतिवाद करण्यात फायदा नाही. पण अंधविरोधच अशा उत्स्फूर्त प्रतिसादाना कारणीभूत असतो असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Sun, 03/18/2018 - 19:19 नवीन
गळे कापण्याचे समर्थन केलेले नाही.
अर्थातच नाही केलं तुम्ही. तुम्ही फक्त इतकंच म्हणालात कि मोदीचं नाव ठेवणं हे गळा कापण्यापेक्षा अधिक अन्यायकारक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
श
श्रीगुरुजी Sat, 03/17/2018 - 05:47 नवीन
>>> एक गांधी , एक नेहरु सर्वानाच आवडले LLRC
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Sun, 03/18/2018 - 19:25 नवीन
एक गांधी , एक नेहरु सर्वानाच आवडले तर प्रत्येक गावात त्या नावाचे चौक , रस्ता , शाळा असणारच.
नेहरू हा अहिंसावादी (बोस, मुखर्जी, गांधी सोडून ??) स्टॅलिन होता. किम जोंग उत्तर कोरीयात फार प्रसिद्ध आहे तसा होता. यांचे सर्वांचे मुखवटे हळूहळू उतरताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माहितगार Sat, 03/17/2018 - 05:24 नवीन
भारताचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी अलिकडे इंडियन सायन्स काँग्रेसच्या व्यासपीठावरून खालील प्रमाणे दावा केला.
....Even Stephen Hawking said, our Vedas might have a theory superior to Einstein’s law E=MC2.
कोणती थेअरी कुणाला कशापासून सुपीरीअर वाटते ते ठरवण्याचा ज्याला त्याला अभिव्यक्ती स्वांतंत्र्याचा अधिकार आहेच पण Stephen Hawking चे नाव वापरले गेल्याने काही मंडळी बुचकळ्यात पडली असावीत. Stephen Hawking असे म्हणाल्याचा स्रोत संदर्भ काय असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी पत्रकारांना तुम्हीच शोधून काढा असे सांगितले डॉ. हर्ष वर्धन यांच्या माहितीच्या स्रोताचा अंदाजा किमान एका लेखकास आल्याचे या लेखावरुन वाटते आहे. बेसिकली कुणी तिसर्‍याने फेसबूकवर stephen-hawking/ च्या नावाने पान बनवून स्वतःचे मत मांडले ते stephen-hawking चे समजून कोणत्याच्शा हिंदू विचराने प्रेरीत वेबसाईटवर आले आणि ते डॉ. हर्ष वर्धन यांच्या वाचनात कुठून तरी आले असावे . एनी वे त्या फेसबूक पेजचा दावा काय आहे ?
Vedas might have a theory superior to Einstein’s law E=MC2. The Satapatha Brahmana 7-1-2-23 and Gayatri Mantra talk about Universe being threefold (triloka): Prithvi (Earth), Antariksha (the space in between) and Dayu (Heaven). Krishna Yajurveda 23.12 (7-4-45) 43 Pannam-18th Anuvakam-45th Panasa suggests the existence of a softer intermediate space called Pilipila. Modern science says the matter and energy are interchangeable but the Vedic science says there is Pilipila in between.the two.(Ref: Modern Science in Vedas- 1 and 2 by Dr. Sakamuri sivaram Babu and Arjunadevi-Guntur-A.P.India published in 2007). Both Vedic and modern science agree upon a continuous dance of creation and annihilation of particle energy everywhere in the universe - Siva tandavam as per Hindu mythology, Rigveda discusses this cycle in detail. Vedic View: The Universe rotates, shaped like an egg. Modern View: The Universe is still and it resembles the surface of a sphere.
या बद्दल मिपा जाणकारांची काय मते आहेत ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 03/17/2018 - 05:25 नवीन
फेसबूक पेजची लिंक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बिटाकाका Sat, 03/17/2018 - 05:56 नवीन
असे बिनबुडाचे दावे करणाऱ्या मंत्र्यांना सरळ मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात यावा. सत्यपाल सिंह, हर्षवर्धन हे उच्छशिक्षित लोक विनापूरावा असले दावे करतात तेव्हा खरच किव येते. --------------------------------- वेद महत्वाचे असतीलही पण असा दावा करताना पुरावे सज्जड पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 03/17/2018 - 06:06 नवीन
त्या फेसबुक कराने दावा Modern Science in Vedas- 1 and 2 by Dr. Sakamuri sivaram Babu and Arjunadevi-Guntur-A.P.India published in 2007) इथून घेतला आहे. लेखक Dr. Sakamuri sivaram Babu ह्यांची त्यांच्या बायोडाटावरून रसायनशास्त्रातील पिएचडी दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 03/17/2018 - 06:31 नवीन
त्यांचे पुस्तक स्क्राईब्ड डॉट कॉमवर या दुव्यावर उपलब्ध दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 03/17/2018 - 09:13 नवीन
The Indian Express spoke to Dr. Sakamuri Sivaram Babu, whose theory Vardhan referred to Friday, who said he was not aware of the minister’s comment since he was working on his book on the Yajurveda. “According to the research paper I wrote in 2007, there is an intermediate stage between the Yajurveda and the Atharvaveda which suggests that energy cannot directly convert into matter. There is an intermediate stage. So what I proposed was a modification from the Einstein theory to a Vedic theory,” he said. Babu said he had forwarded this research paper to Hawking who replied with an endorsement. As proof, he showed the text of the fake Facebook post. He wrote a second research paper which he said was published in the the Vedic Science Journal in 2013. Babu approached Hawking again: “Later I asked him (Hawking) to comment on my other paper for which he expressed his inability due to health reasons. Initially, he commented himself for my first paper,” he added. “Both times we were not able to connect with Hawking. The only reply we received was an email which was not directly related to us,” said K.V. Kirshnamurthy, former chairman of I-SERVE. The website states that I-SERVE is “recognised by DSIR, Government of India, as a Scientific and Industrial Research Organisation and is registered under FCRA, Ministry of Home Affairs in September 2008. इंडीयन एक्सप्रेस : Written by Sowmiya Ashok | Imphal | Updated: March 17, 2018 7:31 am
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 03/17/2018 - 08:36 नवीन
BJP spreads hate, Congress spreads love: Rahul Gandhi
Who hates the hate is hater and who loves the hate is lover ! : Lover'hul
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 03/18/2018 - 19:24 नवीन
शेवटच्या चेंडूवर षटकार मारून मॅच जिंकली. बऱ्याच दिवसांनी थरारक मॅच पाहिली
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 04:43 नवीन
राज ठाकरे यांचे वक्तव्य - मोदी हटाव मतदान पुन्हा पेपरवर घेण्याची विरोधकांची मागणी
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Mon, 03/19/2018 - 06:45 नवीन
ईव्हीएम मशीन हाताळणे/घोळ घालणे अवघड जात असावे बहुतेक. त्यापेक्षा मतपेट्या पळवणे सोपे असावे, कौशल्य असेल म्हणून? ------------------------------------------- मोदींच्या बाजूने बोलून मोदींच्या मतांमधील वाटा मिळू शकत नाही. जे काही खेचायचंय ते मोदीविरोधी मतांमधून! मग काय, द्या मोदींना शिव्या! अंधविरोधकांना काही लागत नाही. राज ठाकरे हे त्या विरोधी मतांमधील नवे वाटेकरी आहेत असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 04:43 नवीन
राज ठाकरे यांचे वक्तव्य - मोदी हटाव मतदान पुन्हा पेपरवर घेण्याची विरोधकांची मागणी
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 03/19/2018 - 06:54 नवीन
Image removed. कालच्या मॅचचा हिरो !!
  • Log in or register to post comments
च
चावटमेला Mon, 03/19/2018 - 08:34 नवीन
दिनेश कार्तिक हा एक गुणी खेळाडू आहे, पण धोनी नामक वादळापुढे झाकोळून गेला आणि सतत दुसर्‍या फळीतला विकेटकीपर अशीच त्याची ओळख राहिली. ह्या खेळीने त्याचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल.
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Mon, 03/19/2018 - 09:02 नवीन
ज्याचे अस्तित्व महाराष्ट्रात ,ज्यांच्यामुळे होत्याचे नव्हते झालेले आहे, ते त्यांच्याबद्दल असेच म्हणणार.राष्ट्रवादी , खांग्रेसबरोबर आणि मनसे राष्ट्रवादी बरोबर, काय युती आहे ?
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 03/19/2018 - 10:30 नवीन
ज्याचे अस्तित्व महाराष्ट्रात ,ज्यांच्यामुळे होत्याचे नव्हते झालेले आहे, ते त्यांच्याबद्दल असेच म्हणणार.
शिवसेने ने उष्टवून फेकलेल्या पत्रावळी, चाटणार्या पक्षाच्या समर्थकांनी, जरा स्वतःच्या गिरेबान मध्ये ढुंकून पहा, 70 % उमेदवार काँ, राष्ट्र काँ, शिवसेना मनसे मधून आयात केलेत.. कठीण काळात पक्षा बरोबर असलेल्याना सतरंज्या उचलायला ठेवलंय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
ब
बिटाकाका Mon, 03/19/2018 - 10:38 नवीन
70 % उमेदवार काँ, राष्ट्र काँ, शिवसेना मनसे मधून आयात केलेत..
याचा स्रोत देणे, कोणत्या निवडणुकीत, कोण कोण वगैरे. --------------------------------- डेटा नसताना फेकाफेकी करणे हि जुनीच मोडस ऑपरेंडी आहे असे एक निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 10:45 नवीन
गुजरात विधानसभेत काही होते म्हणे. https://www.ndtv.com/india-news/gujarat-election-results-2017-5-congress-rebels-lose-2-win-on-bjp-tickets-1789882 आता ते महाराष्ट्रात शिवरायांबद्दल अपशब्द वापरलेले ते कोण , तेही दुसर्या पक्षातून आले ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Mon, 03/19/2018 - 10:59 नवीन
अरे देवा, टक्केवारी कशी काढतात ते माहित असेल अशी अपेक्षा आहे माझी. नसेल माहित तर सांगतो, त्यात काय एवढं! -------------------------------------- बातम्या तरी स्वतःच्या दाव्याला साजेशा देत जावा. बाहेरून आलेल्या सात पैकी ५ हरले म्हणे, दोनच जिंकले. अशा बाहेरून येऊन हरलेल्या लोकांमुळे सरकार बनतं होय, चान चान!! यावरून तरी भाजपला धडा मिळाला असेल, ९९ ऐवजी १०४ झाले असते. --------------------------------------- भाजपमधून नाराज होऊन बाहेर गेलेल्यांची यादी माहित नसेलच, त्याची काय आवश्यकता म्हणा! याशिवाय ते का त्यांचे पक्ष सोडून जातात हे तर अतिशयच गौण आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 11:21 नवीन
मी काय सगळ्या भारताचा सेन्सस घेऊन बसावं की काय ? प्रत्येकजण आपल्याला माहीत असेल तितकी माहिती देत राहील. यावेळची गुजरात एलेक्शन अटीतटीची ठरली. त्यात जो डिफ्रन्स भाजपाने घेतला almost तितकेच उमेदवार बाहेरुन आले होते , असे कुठेतरी वाचले होते. आता या निमित्ताने शोधण्याचा प्रयत्न केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Mon, 03/19/2018 - 12:01 नवीन
७०% चा अर्थ कळतो का? त्यांच्या त्या प्रतिक्रियेवर समर्थनार्थ तुम्ही मला हि लिंक दाखवण्याचे कारण काय? मी भाजपमध्ये दोन चार जण बाहेरून आले हे नाकारले आहे काय? असे निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे भाजपने सुरु केले काय? इतर पक्ष याबाबतीत काय करतात? मग हा मुद्दा तुमच्या भाजपद्वेषाचा निकष कसा काय बनू शकतो? यामुळे तुमची भाजप विरोधाची दांभिकता उघडी पडत नाही काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 12:07 नवीन
मी त्यांच्या ७० % समर्थनासाठी लिहिलेले नाही. काही उमेदवार आले आहेत , मी याबद्दल लिहिले . त्यांच्या ७० % चा हिशोब त्याना विचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Mon, 03/19/2018 - 12:18 नवीन
व्हय मालक, त्यांस्नीच इचारलं व्हतं! तुमास्नी फट्याक्कन पर्तिसाद द्यायची जणू सवयच हाये त्याला आपुन काय करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
प
पगला गजोधर Mon, 03/19/2018 - 12:18 नवीन
In 2013, the BJP had forfeited its deposit in 49 of the 50 seats it contested, bagging less than two percent of the vote. This time around, it swept to a comfortable majority winning 43 seats with an ally, ousting the long-serving Communist Chief Minister of the state, Manik Sarkar. Biplab Deb, a young BJP leader with a background in the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS), is expected to be the state’s new CM. The BJP’s strategy of switching from Nagaland’s dominant regional party, Naga People’s Front, and allying with former CM Neiphiu Rio-led new formation, Nationalist Democratic Progressive Party (NDPP), seemed to have paid off. Madhav tweeted on Saturday evening, “NDPP BJP Alliance has secured 30 seats. With the support of one independent, we are comfortably placed to form the government.” ================================================ The BJP has had mixed success with its strategy of first calling incumbent parties corrupt and then ‘importing’ their disgruntled members to gain power in the State. It was the winners among the 51 “imported” candidates who helped BJP move close to the 122 mark. Notable among such candidates were “giant-killers” like Sunil Deshmukh who won from the prestigious Amravati constituency defeating Congress leader and former President Pratibha Patil’s son Raosaheb Shekhawat. Deshmukh had left the Congress after being denied ticket. Dr. Vijaykumar Gavit, who was ousted from the NCP, retained his traditional stronghold of Nandurbar for the BJP this time. Former NCP member Kisanrao Kathore, who filed his nomination from Murbad as a BJP candidate, won against the NCP candidate with a margin of over 25,000 votes. Former Congressman Prashant Thakur, who left the party on the issue of toll plazas, won the Panvel seat for the BJP. Not all ‘imported’ candidates were successful. Former NCP strongman and ex-minister Babanrao Pachpute, who crossed over to the BJP claiming he was insulted by another NCP stalwart, could not win the Srigonda constituency. Former Minister and ex-Congressman Sanjay Deotale, who joined the BJP after being denied a ticket, lost to Shiv Sena candidate in Warora (Chandrapur). Former NCP leader Ajit Ghorpade, who joined BJP and contested from Tasgaon, lost to former Home Minister R.R. Patil. Of the nearly 51 candidates imported by the BJP in the hope of cashing in on their local clout, around 35 were from the Congress and the Nationalist Congress Party. The BJP also drew about a dozen candidates from the Shiv Sena. Some independents who were sure to win were given offers.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 12:53 नवीन
संपूर्ण पूर्वोत्तर भारतातली भाजप उधारीवर आणलेली आहे. पण तिथे खूपकाळापासून सतरंज्या उचलणारे लोक नव्हतेच म्हणून फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ब
बिटाकाका Mon, 03/19/2018 - 12:55 नवीन
असं बघा गजोधर साहिब, भाजप कडे १२२ आमदार आहेत, त्यातील ७०% म्हणजे साधारण ८६ आमदार आपल्या म्हणण्यानुसार दुसऱ्या पक्षातून आलेले असायला हवेत नाही का? आता जे आले आणि हरले ते तर सोडूनच देऊ कारण त्यांचा इथे संदर्भ देण्याचा आपला उद्देश नसेल असे मी गृहीत धरतो. आता हे ८६ आमदार कोणते हे जरा कृपा करून सांगाल का? ------------------------------------- भाजपमध्ये आलेले आणि निवडून आलेल्यांपैकी किती लोकांना त्यांच्या पक्षाने तिकीट द्यायचे ठरवले होते? तिथे त्यांना डावलले म्हणूनच ते भाजपमध्ये आले असे नाही का? ------------------------------------ बाहेरून भाजपमध्ये आलेल्यांपैकी जिंकलेल्यांचे प्रमाण सुद्धा ४५% नाही, तुम्ही एकूण आमदारांच्या ७०% बाहेरून आलेले आहेत हा हास्यास्पद दावा करत आहात. पहिल्यांदाच २८८ जागा लढवणाऱ्या या पक्षांनी २८८ उमेदवार द्यायचे कुठून होते? तुमचा भाजपद्वेष तुम्हाला फक्त भाजपचे आकडे दाखवतोय, पण एकदा बाकीच्यांचे आकडेही बघून घ्या. भाजपने स्वतःचे २०९ उमेदवार उभे करून १०० जागा जिंकल्या तर बाहेरचे ५१ उमेदवार (हे सगळे निवडणुकीआधी ४ ते ० वर्षे आधी भाजपात आले असावेत) उभे करून २२ जागा जिंकल्या. या ५१ मध्ये ४ अपक्ष उमेदवार बाहेरून आले होते, एक मनसे, एक लोकसंग्राम असे सहा छोट्या पक्षांचे उमेदवार होते. ते भाजपचं काय जिंकण्याची संधी असेल तर कुठेही गेले असते. ------------------------------------- उरलेले जे ४५ आहेत त्यातले किती नावाजलेले होते, आधी आमदार किंवा मंत्री होते कि संधी मिळत नाही म्हणून ते भाजप मध्ये आले होते याच्याशी काहीही देणे घेणे न ठेवता सरसकट आरोप करणे हा अंधविरोधाचा कळस आहे. उलट, जी मोठी नवे भाजपमध्ये आली होती ती बहुतेक सगळी २०१४ मध्ये हरली आहेत. बाकी सुज्ञास सांगणे न लगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
श्रीगुरुजी Mon, 03/19/2018 - 12:36 नवीन
>>> 70 % उमेदवार काँ, राष्ट्र काँ, शिवसेना मनसे मधून आयात केलेत.. थापेबाजी नको. भाजपने २०१४ मध्ये २५२ जागा लढविल्या होत्या. यातील १७६ आयात केलेले उमेदवार सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 03/19/2018 - 12:45 नवीन
It was the winners among the 51 “imported” candidates who helped BJP move close to the 122 mark.
परंतु जिंकलेल्या १२२ पैकी ५१ बाहेरून आयात केलेले , म्हणजे जवळ जवळ ४२ % . त्यामुळे ७०% च्याऐवजी , वरील प्रतिक्रियेत फक्त ४२% आयात असे वाचावे. साहित्य संपादक वरील प्रतिक्रियेत ७०% बदलून ४२% करावे ही विनन्ति.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा