Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१८

ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 10/01/2018 - 08:35
🗣 213 प्रतिसाद
Companies pay up Rs 1.1 lakh crore for fear of insolvency action कर्ज देणे व वसूल करणे यांच्या प्रशासनासंबंधीचे (इन्सॉल्व्हन्सी व बँकरप्सी) नवीन कायदे (उदा : Insolvency and Bankruptcy Code किंवा IBC) आणल्यामुळे पूर्वी चालढकल करत बुडित कर्जांच्या दिशेने वाटचाल करणार्‍या कर्जदारांवर वचक निर्माण झाल्याचे दिसत आहे. याचा परिणाम म्हणून, याअगोदर कर्ज फेडण्याबाबत चालढकल करणार्‍या कर्जदारांनी, आतापर्यंत सुमारे रु१.१ लाख कोटीचा भरणा बँकात केला आहे. गेल्या आठवड्यात सरकारने, या वित्तवर्षांत, नाठाळ कर्जदारांकडून रु१.८ लाख कोटी वसूल करण्याचे लक्ष ठेवल्याचे जाहीर केले आहे.  कायद्याचे बळ व प्रशासकिय पाठींब्याचे (Insolvency and Bankruptcy Board of India किंवा IBBI; National Company Law Tribunal किंवा NCLT; इत्यादी) बळ व बारीक देखरेख आस्तित्वात आल्यामुळे, भविष्यात बँका आपले कर्ज वसूल करण्यात कसूर करण्याची आणि/किंवा कर्जदारांनी चलाखी करून कर्ज बुडवण्याची शक्यता फार कमी झाली आहे.

प्रतिक्रिया द्या
90096 वाचन

💬 प्रतिसाद (213)
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 10/01/2018 - 08:50 नवीन
ED attaches Nirav Modi's assets worth Rs 637 crore, spanning spanning over five countries नीरव मोदीच्या, भारत व इतर चार अश्या एकूण पाच देशांतील, ६३७ कोटी किमतीच्या मालमत्तेवर EDने टांच आणली आहे. यामध्ये, न्यु यॉर्कमधील स्थावर मालमत्ता, मुंबईतली सदनिका, हिरेजडीत दागिने व ५ परदेशी बँक खात्यांचा समावेश आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 10/01/2018 - 09:27 नवीन
3 floors of builder’s Bandra HQ sealed for Rs 45 crore loan default कर्जाच्या परताव्यात चालढकल केल्यामुळे एनपीए झालेले रू४५ कोटी वसूल करण्यासाठी, The Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act या कायद्याचा वापर करून, देना बँकेने RNA Corp नावाच्या बिल्डर-डेव्हलपर कंपनीच्या मुंबईतील बांद्रा (पूर्व) या उपनगरातील मुख्यालयाचे तीन मजले सीलबंद केले आहेत. आता त्या मालमत्तेचा लिलाव करून कर्जाची वसूली करण्याचा बँकेचा विचार आहे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 10/01/2018 - 12:44 नवीन
मोदींनी सार्वजनिक बँकांना लावलेली आर्थिक शिस्त समजण्याची लायकी किती मतदारांना असते ? सोशल मीडियावरील पडीक पुरोगामी सुद्धा या योजनांचे कौतुक करण्याऐवजी न केलेल्या घोटाळ्या वरून रान पेटवत असतात .
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 10/01/2018 - 12:53 नवीन
कुठेतरी दोन जाती मध्ये मारहाणी ची घटना घडली संपूर्ण देशातील मीडियाला वेठीस धरून नंगा नाच करून देशाच्या सार्वजनिक संपत्ती ची जाळपोळ करण्यात पटाईत असलेले ढोंगी पुरोगामी ' कर्ज बुडव्या कडून वसूल केलेला पैसा कित्तेक लाख करोड जरी असला तरी हे ' ते पंधरा लाख कुठाय ? ' म्हणून बोंबलत बसणार .
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Mon, 10/01/2018 - 15:15 नवीन
मी पहिला. ६३७+४५=६८२ करोड मोदींनी अंबानींना दिले असा आरोप मी आत्ताच करून टाकतो. १.१ लाख कोटी म्हणजे कितीवर किती शून्य ते मी आईला विचारून सांगतो. सध्या मी रा (फेल) ची हुल उठवण्यात व्यस्त आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 10/01/2018 - 15:29 नवीन
डॉ सुहास म्हात्रे , देशाच्या आर्थिक स्थिती बद्दल तुम्हाला काय कळतय हे विचारणार्याच्या डोळ्यात चांगलच अंजन घातलत ! अंध विरोधक कोण जाणे ईतका पराकोटीचा विरोध का करत आहेत. त्यांना देशात ईतक्या चांगल्या घडणार्या गोष्टी दिसतच नाहीत. ६५ वर्षांची गुलामीची सवय काही सुटत नाहीय ! जनतेच चांगल होईल ह्याचीच धास्ती घेतलेली आहे !!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 10/01/2018 - 17:29 नवीन
राफालं करारासंबंधी पूर्व लष्करी अधिकारी आणि अधिकारी सामरिक तज्ज्ञ माहरूफ रझा यांनी केलेले खालील मतप्रदर्शन व दिलेली माहिती पाहून, पूर्वग्रहदूषीत मनःस्थिती असलेले आणि/किंवा झोपेचे सोंग घेणारे सोडून इतर सर्व जणांचे, समाधान व्हायला हरकत नाही...

  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 10/01/2018 - 17:49 नवीन
Pakistan cuts Chinese 'Silk Road' rail project by $2bn over debt concerns "विकसनशील आणि गरजू देशांना सावकारी काव्याची कर्जे देऊन आपल्या सापळ्या अडकावयाचे आणि त्यांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन त्यांची बंदरे व जमिनी मोठ्या काळासाठी ताब्यात घ्यायच्या" या रणनीतीचा वापर करून चीनने अनेक देशांत शिरकाव केला आहे. हा नव-वसाहतवादी कावा इतका भयानक आहे की, चीनला आपला सर्वेसर्वा (ऑल वेदर) मित्र असे काल कालपर्यंत अभिमानाने जगजाहीर करणार्‍या पाकिस्तानने चीनच्या CPEC या ४२ बिलियन डॉलर्स किमतीच्या प्रकल्पातली अनेक कामे थांबवणे आणि/किंवा रद्द करणे सुरू केले आहे. खालील चलतचित्रफीत वरील चिनी रणनीतीचे सोप्या शब्दातले वर्णन आहे...

  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Mon, 10/01/2018 - 17:53 नवीन
जो हो रहा है वो अच्छा है... जो होगा वो अच्छा होगा.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 10/01/2018 - 19:45 नवीन
राफेल खरेदी व्यवहार करण्या अगोदर तो मिपावरील मोजक्या विचारवंत ज्येष्ठ मिपाकर यांचेकडून तपासणी करून प्रमाणित करून घेतला असता आणि भारताचे भाग्यविधाते रा रा राहुलजी, जगन्मान्य शतकोत्तर संपादक (राऊत-कुबेर )द्वयींना दाखवूनच करायला हवा होता.(सध्या लोकसत्ता चे कार्यालय सामनाचे वळचणीला असल्याने एकाच ठिकाणी दोन्ही कामं करून घेतली असती) तसेच यापुढे जर माझ्याकडे असलेल्या झाडावर पुर्वी इतके आंबे असायचे की तुम्हां पन्नास मुलांना प्रत्येकी दहा आंबे मिळाले असते असली जर तर ची उदाहरणे देऊन आंबे दिले नाहीत कुठेत आंबे असा आंबट चेहरा करुन कुणी विचारलं नसते. बरं झालं पुलं आधी लिखाण करून गेले, नाहीतर त्यांची आणि त्यांच्या चितळे मास्तर यांची रेवडी+बाकरवडी झाली असती नक्की.दोन तोट्या,चार मजूर,भिंत असली जर तर वाली उदाहरण टाकणं किती असहिष्णुता आहे हे कळलं असतं. आता राहिला प्रश्न वरच्या वसूलीचा तर येणे रक्कम ही व्याज व दंड धरून असते हेच मी मान्य करणार नाही. शेवटचा रूपया वसूल करणे हेच मोदी सरकारची जबाबदारी आहे,भले कर्ज लायकी नसताना महामहीम मनमोहनसिंग यांच्या कालावधी त दिले असेल (ते अर्थ तज्ञ असल्यानेच) त्यांना त्यांच्या पक्षात प्रचंड प्रमाणात आदर व मान आहे) ह्या वसूलीने माझी भाजी स्वस्त होणार आहे का? माझी बैंक माझ गृहकर्ज माफ करणार आहे का? आमच्या मनपामधले बायोमेट्रिक हजेरी बंद करणार आहेत का? नसेल तर या कायद्याचा मला नाय फायदा. ताक:गुदस्ता एक्का काका ं यांनी आमचा कार्यरत विभाग अगत्याने लक्षात ठेवला हे पाहून बरे वाटले.पण सात वर्षांपूर्वी आमची बदली केंद्रीय भांडार (माहीती व संकलन)साठवण विभागात झाली होती. या मोदींच्या स्वच्छता अभियानात सहभागी झालो आणि आमची बदली झाली अतिक्रमण मालमत्ता विभागीय भांडार इथे. त्याचं असं झालं आम्ही आमच्या मोठ्ठ्या साहेबांच्या दालनात टेबलाखाली आणि कोपरयात असलेल्या अति अति जुन्या फायली उघडल्या साफ करून जागेवर लावायला,ते पाहूनच आमचे भाऊसाहेब (वाटले) गरजले "त्या फायली आपल्या नोंदीनुसार गहाळ झाले अश्या आहेत उगाच जागेवर लावायचा शहाणपणा करु नका. हे धाकले भाऊसाहेब आमच्या साहेबांचे मावसमेहुणे आहेत त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे दोन्ही गठ्ठे साफसूफ करून आतल्या फायलींची सूची तयार करून त्या गठ्ठ्यावर लावली आणि ठळकपणे लिहीलं "हरवलेल्या फायली आहेत/मंत्रालय जळीतकांड मध्ये जळालेल्या फायली (उघडून बघण्यासाठी नाहीत.)" झालं आमची बदली झाली दुसर्याच दिवशी!!! एक्का काका त्या मोदींना सांगा स्वच्छता अभियानात आमचा हकनाक बळी गेला. आपलाच नम्र कारकून स.दा.बोंबले ( अतिक्रमण जंगम मालमत्ता वस्तू विभाग) भांडार नेहरू नगर पिंपरी,मगर स्टेडीयम पिछाडीस. काका भेटायला येणार असाल तर हापिसात न येता थेट झाडाच्या जवळ असलेल्या टपरी वर भेटणे. दुपारी एक ते चार लंच टैम असतोय
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Tue, 10/02/2018 - 04:04 नवीन
मस्त वो नाखू काका !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/02/2018 - 05:36 नवीन
लै भारी ! नाखुसाहेब सुटले की त्यांना आवरणे कठीण... कारण त्यांचा वेग पाहता, आवरण्यासाठी त्यांना पकडणेच मुळात कठीण असते !! =)) =)) =)) राफेल खरेदी व्यवहार करण्या अगोदर तो मिपावरील मोजक्या विचारवंत ज्येष्ठ मिपाकर यांचेकडून तपासणी करून प्रमाणित करून घेतला असता हे बाकी लाख टक्के खरे आहे. या गुस्ताखीबद्दल मोदींना पुढच्या सात जन्मी माफी मिळणे शक्य नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे ! "हरवलेल्या फायली आहेत/मंत्रालय जळीतकांड मध्ये जळालेल्या फायली (उघडून बघण्यासाठी नाहीत.)" अश्या कल्पकतेचे कौतून होण्याचे दिवस गेले हो ! =)) =)) =)) हल्ली, "त्या गठ्ठ्यात अजून काही फायली टाकून त्यांना, (अ) तळघरात टाकू का ? की त्यापेक्षा उत्तम म्हणजे (आ) अजून एका आगीच्या नवीन अपघातात त्या नाहिश्या होतील अशी व्यवस्था करू का ?" अश्या प्रकारची "भूतपूर्व पापे पुण्यात कन्व्हर्ट करणार्‍या टेक्नॉलॉजीला" जादा भाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ट
ट्रेड मार्क Mon, 10/01/2018 - 23:47 नवीन
सत्तेपासून दूर गेलेल्यांना, आर्थिक नियमितता आणण्यासाठी बदललेले धोरण आणि त्याची कडक अंमलबजावणी यामुळे कळत नकळत काळाबाजाराला हातभार लावणाऱ्यांना, तथाकथित पुरोगाम्यांना आणि ल्युटेन्स मध्ये नेक्सस बनवून आपल्याला पाहिजे तश्या बातम्या फिरवून जनमानस कलुषित करणाऱ्या न्यूज हाऊसेसना मोदींनी चांगलाच चाप लावल्यामुळे या सर्वांची चांगलीच तडफड सुरु आहे. त्यात मोदीविरोध हा एकमेव अजेंडा असल्याने यांना मोदींचे कुठलेच निर्णय चांगले वाटत नाहीत. तसं बघायला गेलं तर या लोकांना मोदी किंचितही किंमत देत नाहीत हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. फालतू आरोपांना ते प्रत्युत्तर देत बसत नाहीत कारण एकदा उत्तर दिलं की न संपणारी प्रश्नोत्तरांची मालिका चालू होते. त्यापेक्षा त्यांचं ठरवलेलं काम करणं हे ते सोयीस्कर समजतात. महामहिम केजरीवालांनी विवेक तिवारीच्या केसमध्ये सुद्धा जातीय मुद्दा घुसवला. ज्याबद्दल त्यांना श्रीमती तिवारींनी झापलं आहे. पण ज्या वेळेला खरंच जातीमुळे हिंदूंच्या हत्या होतात तेव्हा मात्र केजरीवाल मिठाची गुळणी धरून बसतात. तसेच काँग्रेसने लगेच योगी आदित्यनाथांचा राजीनामा मागितला. राफेलसाठी चालू असलेले नाट्य असो किंवा सर्जिकल स्ट्राईक असो, विरोधक आपला मुद्दा पण धड मांडू शकत नाहीत. मला १५ मिनिटे लोकसभेत बोलू दिलं तर भूकंप होईल असं म्हणणारे युवराज तब्बल १ तास बोलले. अगदी मिठ्या मारण्याची आणि नंतर डोळे मारण्याची नाटकं पण करून झाली. कसला भूकंप झाला का? उगाच फुकाच्या गफ्फा हाणायच्या. राहुल गांधी भाषण करतात तेव्हा त्यांच्या मागे उभं असणाऱ्या कमांडोंना बहुतेक हसू नये म्हणून पण स्पेशल ट्रेनिंग द्यावं लागत असावं.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Tue, 10/02/2018 - 04:30 नवीन
माझा 10 वर्षाचा नातू राहुल बाबा चे भाषणाचे व्हिडीओ पाहताना खदाखदा हसत असतो !!!!! आता मला सांगा जर लहान मुलांना रागा ची बौद्धिक पातळी समजत असेल तर 70 / 80 करोड मतदारांना समजत नसेल ? मला कीव येते रागा ला नेता मानणार्याचीं . धुरंदर , चतुर , धडाकेबाजपणा , आत्मविश्वास हे गुण असलेला नेता जर म्याडम चा पुत्र असता तर 2019 च काय आशा कित्तेक निवडणुका भाजप ला जड गेल्या असत्या पण भारतातील नागरीकांनी पारतंत्र्यात सोसलेलं हाल फळास आले असावे आणि दैवी शक्ती असलेला व्यक्ती काँग्रेस चा उत्तराधिकारी झाला . भाजप राममंदिर प्रश्न जनमानसात बिंबवुन सत्तेत आल्या मूळे रागा शिवभक्ती ला लागलाय अस ही ऐकलंय . भारताच्या पंतप्रधान ची बायको म्हणून जगात मिरवण्याचा पण स्पंदना ने केला आहे , असं ही मी ऐकलं आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
त
तुषार काळभोर Tue, 10/02/2018 - 04:15 नवीन
गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. गीता गोपीनाथ यांचा जन्म (म्हैसूर) व पदवीपर्यंत शिक्षण (दिल्ली) भारतात झाले. दिल्ली विद्यापीठात अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवल्यावर त्यांनी दिल्ली विद्यापीठात एम ए केले. त्यानंतर University Of Washington मधून एम ए व Princeton University मधून पीएचडी केली आहे. सध्या त्या Harvard University मध्ये प्राध्यापिका आहेत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/02/2018 - 07:11 नवीन
Gujaratis disclosed Rs 18,000 crore in black money in 4 months, reveals RTI नोटाबंदी, जीएसटी आणि इतर सरकारी उपायांमुळे काळे धन लपविणे अशक्य होत चालल्याने अनेक उंदीर आता बिळातून बाहेर पदत आहेत. करसंकलन खात्याच्या गोपनियतेच्या नियमांमुळे यासंबंधीची माहिती सहजपणे माध्यमांत जाहीर केली जात नाही. मात्र, सर्वसामान्य नागरिकाला माहितीहक्क कायद्याअंतर्गत ही माहिती मागवून प्रसिद्ध करता येत. तशी प्रसिद्धी झाल्यास, इतर काही करचुकव्यांना तिचा फायदा मिळून, ते पळून जाणे अथवा काळे धन लपवण्यासाठी त्यांनी इतर काही उपाय करणे, इत्यादी शक्यता जमेस धरता अशी माहिती सहजपणे देण्यास करसंकलनविभाग तयार नसतो. तरीही चिकाटी लावून मिळवलेल्या माहितीप्रमाणे, २०१६ साली लपवलेल उत्पन्न स्वतःहून जाहीर करण्याच्या योजनेअंतर्गत (Income Declaration Scheme, २०१६) भारतभरातून एकूण ६२,२५० कोटी लपवलेले (पक्षी : काळे) धन लोकांनी स्वेच्छेने जाहीर केले आहे. त्यापैकी, गुजरातचा वाटा १८,००० कोटीचा आहे. वरील योजनेचा फायदा घेऊन धन उघड केले आहे आणि त्यानंतर योग्य त्या कराचे हप्ते वेळेवर भरले आहेत असेच उत्पन्न या आकड्यांत समाविष्ट आहे. या रकमांत, 'करसंकलन विभागाने छापे टाकून उघड केलेले' किंवा 'इतर मार्गांनी उघड केलेले व सद्या चौकशी चालू असलेले' धन सामील नाही, कारण ते करदात्यांनी स्वतःहून उघड केले नसल्याने, Income Declaration Scheme, २०१६ योजनेत धरले जात नाही. त्याच्या संबंधीची कारवाई करचुकवेगिरीसाठी असलेल्या कायद्यांंखाली केली जाईल, व ती प्रक्रिया जास्त किचकट व जास्त वेळखाऊ असते. त्या रक्कमेबद्दलची खात्रीलायक माहिती, त्यासंबंधीची कारवाई व खटले संपल्यावरच मिळू शकते. टीप : "भारतभरातून एकूण ६२,२५० कोटी लपवलेले (पक्षी : काळे) धन स्वेच्छेने जाहीर केले गेले आहे" असा मथळा न देता, "गुजराती लोकांनी १८,००० कोटीचे काळे धन जाहीर केले" असा मथळा देण्यामागे टाईम्स ऑफ इंडीयाची काहीतरी चाल असावी का ?! :)
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 10/02/2018 - 07:49 नवीन
लोकसत्तामध्ये बातमी आली आहे, संभाजी भिडे गुरुजी यांचेवरील २००८ चा गुन्हा मागे घेतला आहे. पण लोकसत्ता ने नेहमीप्रमाणे खोडसाळपणा करून बातमी दिली राज्यसरकारने दंगलीचा गुन्हा मागे घेतला आहे. आता तीच बातमी मटा मध्ये तपशीलवार आहे, शिवसेनेचे चार पाच नेते, राष्ट्रवादी एक, मनसे एक, भाजपाचा एक अश्या सर्वांवर दाखल करण्यात आले रे २००८ सालचे गुन्हे मागे घेतले आहेत. कुबेरांचे पूर्वगृहदूषीत लोण खालपर्यंत झिरपत चांगले मुरले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे Tue, 10/02/2018 - 08:58 नवीन
त्यांच्या दुर्दैवाने ज्यांना आपण वंदनीय राष्ट्रपिता मानतो आणि ज्यांची जयंती आज साजरी करतो आहोत ते महात्मा गांधी पण गुजराती होते हे ते विसरले आहेत. कदाचित श्री मोदी आणि श्री शाह ज्यांचा ते द्वेष करतात ते "गुजराती आहेत म्हणून" अशी वर्गवारी करताना ते वरील गोष्ट विसरले असावेत. द्वेषाने माणूस आंधळा होतो तो असा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अथांग आकाश Tue, 10/02/2018 - 10:24 नवीन
टीप : "भारतभरातून एकूण ६२,२५० कोटी लपवलेले (पक्षी : काळे) धन स्वेच्छेने जाहीर केले गेले आहे" असा मथळा न देता, "गुजराती लोकांनी १८,००० कोटीचे काळे धन जाहीर केले" असा मथळा देण्यामागे टाईम्स ऑफ इंडीयाची काहीतरी चाल असावी का ?! :)
प्रेस्टीट्यूटस अशी महान बिरुदावली प्राप्त झालेल्या माध्यमांवर असा संशय? शांतम पापम् ! पंतप्रधान गुजराथ राज्यातून आलेले म्हणजे पक्षी: गुजराती! मग त्यांच्या समाजातील लोकांनी जाहीर केलेले १८,००० कोटीचे काळे धन "गुजराती लोकांनी १८,००० कोटीचे काळे धन जाहीर केले" असा मथळा देऊन कुठल्याही गोष्टीचा मोदींशी कसा अप्रत्यक्ष संबंध जोडता येतो हेच तर दाखवायचा प्रयत्न केलंय कि त्यांनी! तसं नाही केलं तर मालक ढुंगणावर लाथ मारून हाकलून देईल कि! आणि मालकांनी हाकललं तर सध्याच्या मोदी समर्थक आणि मोदी विरोधक अशा सरळ सरळ दोन गटात ध्रुवीकरण झालेल्या सामाजिक परिस्थितीत नवीन नोकरी शोधायची म्हणजे भलतच कठीण काम! एकीकडे २०१९ मध्ये परत मोदी पंतप्रधान झाले तर आपलं काय होणार? आत्ता आहोत त्या गटातून दुसऱ्या गटात उडी मारायची कि हीच कार्यपद्धती सुरु ठेवायची? हीच कार्यपद्धती सुरु ठेवण्याची वेळ आली तर त्यासाठी अवसान कुठून आणायचं? अशा चिंता सतावत असताना बातमीदारी करणे सोपे नाहीये :-) सध्याची बातमीदारी अशी झाली आहे कि वाचणाऱ्याला वाटावं , देशात केंद्रीय मंत्रिमंडळ वगैरे असं काही नाहीच आहे! आहेत फक्त एकटे पंतप्रधान नरेंद्र मोदी! त्यामुळे कुठलाही निर्णय हा मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यात चर्चा वगैरे होऊन घेण्याची कालबाह्य परंपरा मोडीत निघालेली आहे! आली मोदींना लहर कि घेतला निर्णय, केली योजना किंवा बंदी जाहीर! अशाच पद्धतीने कारभार चालू आहे! सगळ्या योजना, उपक्रम पण त्यांचे वैयक्तिक असतात! जसे कि मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट- बुलेट ट्रेन, मोदींची आयुष्मान भारत योजना, मोदींची नोटाबंदी वगैरे वगैरे! आणि अशा प्रत्येक योजना, निर्णयाचा कडाडून विरोध केला नाही आणि साप साप म्हणून भुई धोपटली नाही तर तुम्ही पुरोगामी नसून प्रतिगामी आहात असा शिक्का बसून तमाम पुरोगामी वर्गाकडून वाळीत टाकले जाण्याची भीती आहेच! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कपिलमुनी Tue, 10/02/2018 - 10:49 नवीन
मालकांनी टोच्चन दिली म्हणून राडे थांबवले तर इथे चौकीदारच चोऱ्या करतोय. असो, मालकांच्या मेहनतीमुळे त्यांच्या सूचनेचा रिस्पेक्ट इथून पुढेही ठेवला जाईल .
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 10/02/2018 - 15:14 नवीन
गुजराती लोकांनी आपला काळा पैसा बाहेर काढला याचे एक कारण म्हणजे मोदी जे बोलतात ते करून दाखवता त्याची त्यांना पटलेली खात्री असावी. गुजरात राज्याच्या वीज स्थिती वर काम करताना त्यांनी दाखवलेले धैर्य. त्यांनी एकंदर ७०,००० शेतकऱ्यांवर वीज चोरीचे खटले भरले होते जे बिल भरल्यावर मागे घेतले. अशा धडाकेबाज पद्धतीमुळे गुजराती लोकांना एक गोष्ट नक्की माहिती आहे कि श्री मोदी जर मागे लागले तर कोणीही आपल्याला वाचवू शकणार नाही. The BJP government began plugging the leakages in distribution. Power thefts in Gujarat then ranged between 20 per cent in urban areas and 70 per cent in rural regions. It passed a law against power thefts and set up five police stations across the state, solely to nab such thieves. Stringent action began against those who ran up large power bill arrears, including disconnecting their supply. The Modi government took care to ensure that the state electricity regulator - unlike in most states - remains truly independent of political pressures. Getting Indians to pay more for their power is not easy. Across the country around a fifth of power goes unpaid for and many still believe free power is a right rather than privilege. http://www.businessworld.in/article/Why-Delhi-Looks-To-Gujarat-Model-For-Power-Sector-Reforms/15-09-2015-86004/ महापुरुष श्री केजरीवाल सुद्धा आता गुजरातकडे पाहायला लागले आहेत म्हणजे पहा. बाकी राज्यातून किती काळा पैसा नोटबंदीनंतर बँकेत भरला गेला आहे आणि किती त्यातून करपात्र आहे हे पाहणे ( भविष्यात) मनोरंजक ठरावे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 10/02/2018 - 15:21 नवीन
http://www.iwmi.cgiar.org/iwmi-tata/PDFs/2012_Highlight-06.pdf
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
ट्रम्प Tue, 10/02/2018 - 17:40 नवीन
महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राममध्ये काँग्रेसच्यावतीने मंगळवारी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गांधीजींना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, राहुल आणि सोनिया गांधी यांच्यासह सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या स्वावलंबनाच्या संदेशाचे पालन करीत दुपारच्या जेवणानंतर स्वतःचे ताट-वाटी स्वतः धुतले. याचा व्हिडीओ एएनआयने प्रसिद्ध केला आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 10/02/2018 - 19:39 नवीन
गांधीजींच्या स्वावलंबनाच्या संदेशाचे पालन करीत दुपारच्या जेवणानंतर स्वतःचे ताट-वाटी स्वतः धुतले. व त्याचा व्हिडीओ सुद्धा घेतला! ..... धन्य आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/02/2018 - 19:42 नवीन
India, Russia to sign S-400 missile deal this week: Kremlin CAATSA (Countering America's Adversaries through Sanctions Adversaries through Sanctions Act) नावाच्या अमेरिकन कायद्याअन्वये, अमेरिकेने बहिष्कार टाकलेल्या देशाशी लक्षणीय स्वरूपाचे आर्थिक अथवा लष्करी व्यवहार केरणार्‍या देशावरही अमेरिका बहिष्कार टाकते. अमेरिकेने सद्या इराण व रशियावर बहिष्कार (सँक्शन्स) टाकला आहे. या कायद्याच्या कचाट्यापासून काही ठराविक देशांना मुक्तता देण्याचे कलम आहे. मात्र, हे कलम फार क्वचित वापरले जाते. अमेरिका भारताला इंडोपॅसिफिक विभागातील स्ट्रॅटेजिक सिक्युरिटी पार्टनर म्हणत असला तरी, अजून अमेरिकेने हे कलम भारताला सूट देण्यासाठी वापरले जाईल असे म्हटलेले नाही. असे असतानाही भारताने इराण व रशिया या दोन देशांशी असलेले आर्थिक किंवा सामरिक करार तोडणार नाही असे जाहीर करून, अमेरिकेबरोबर डोळ्यास डोळा भिडविला आहे... हे प्रथमच घडले आहे. १. इराक आणि सौदी अरेबियानंतर इराण हा भारताचा तिसर्‍या क्रमांकाचा तेलपुरवठादार देश आहे. इराणकडून खनिज तेल विकत घेणार असे भारताने जाहीर केल्यावर एका बाजूने भारताला बहिष्काराचा इशारा देतानाच त्याच श्वासात "भारताच्या इराणी खनिज तेलासाठी अमेरिका पर्याय शोधत आहे" असे सुद्धा अगोदरच जाहीर केले आहे. अमेरिकन बहिष्कारामुळे इराणच्या तेलाच्या गिर्‍हाईकांत लक्षणिय घट झाली आहे. त्यांच्या यादीत आता चीन व भारत हेच दोन मोठे देश राहीले आहेत. अर्थातच, बहिष्कारामुळे इराणकडून मोठ्या प्रमाणात मिळणार्‍या स्वस्त दराच्या तेलाला दुसर्‍या देशाचा पर्याय शोधणे तितकेसे सोपे नाही. अमेरिकेने दबाव आणून सौदी अरेबियाला स्वस्त तेलपुरवठा करायला भाग पाडले तरच ते शक्य आहे. तसे झाले तरीही तो पर्याय स्विकारणे भारताला तितकेसे सरळ होणार नाही. कारण, इराणला नाराज केल्यास इराण-भारत चाबाहार बंदराच्या प्रकल्पात समस्या येऊ शकतात. हा प्रकल्प भारतासाठी जितका महत्वाचा आहे तितकाच अमेरिकेसाठीही आहे. कारण, अफगाणिस्तानमधील अमेरिकन लष्कर कमी करून तेथे भारताला जास्त जबाबदारी द्यायची असल्यास, पाकिस्तानला टाळून अफगाणिस्तानमध्ये रसद नेण्यासाठी इराणचे चाबाहार बंदर हाच एक व्यावहारीक मार्ग उपलब्ध असणार आहे; आणि तेथे भारताची मोठी गुंतवणूक आधीच झाली आहे. नुकतीच भारताने तेथून अफगाणिस्तानसाठी गव्हाची रसद पाठवून दळणवळणाचा श्रीगणेशा केला आहे. याशिवाय, या बंदरापासून सुरु होणार्‍या खुश्कीच्या मार्गांचा उपयोग भारताला मध्य आशियातील देशांशी (तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, किर्घिझस्तान, कझाकस्तान, अझरबैजान) व्यापार करण्यासाठीही होणार आहे. तेव्हा भारताने इराणशी संबंध तोडणार नाही असे म्हणणे भारताच्या दूरगामी रणनीतीच्या दृष्टीने योग्यच आहे. सद्याच्या बदललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत आपले म्हणणे खरे करेल याची खात्री असल्याने अमेरिकेने मवाळ भूमिका घेतली आहे. सद्यातरी भारतावर बहिष्कार टाकण्याचा विचार न करता आणि दोघांना सन्माननिय व फायदेशीर तडजोड केली जाईल असेच दिसत आहे. २. जगातील प्रथम क्रमांकाची अत्याधुनिक S-400 ही रशियन विमानविरोधी प्रणाली खरेदी करण्यासाठी भारत-रशिया वाटाघाटी चालू आहेत. चीन व पाकिस्तानचा धोका पाहता ही प्रणाली भारताच्या रणनीतीतला एक मोठा भाग आहेत व त्या विकत घेणारच असे भारत सतत उघडपणे बोलत आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन दोन दिवसांनी (४ व ५ ऑक्टोबर रोजी) भारताच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात या $५ बिलियनच्या करारावर सह्या होतील असे रशियाने जाहीर केले आहे. म्हणजे, ही खरेदी नक्की झाली असे समजायला हरकत नाही. या प्रणालींच्या बदल्यात भारताला देण्याजोगा पर्याय अमेरिकेकडे नाही. तेव्हा, या बाबतीतही अमेरिकेने सामजस्याने वागणे अपेक्षित आहे. आजपर्यंत, आपला प्रत्येक एककल्ली कायदा भारतासह इतर विकसित देशांवर लादणार्‍या अमेरिकेला, बदलत्या द्विपक्षिय व जागतिक परिस्थितीशी जमवून घेणे भाग पडत आहे. यामुळे, कमीत कमी, भारतासंबंधीचे अमेरिकन धोरण कसे विकसित होत जाणार आहे, हे रोचक आणि दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहे.
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Wed, 10/03/2018 - 08:52 नवीन
सद्यकाळात देशाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी अशा दबावांना झुगारून देणे हीच योग्य परराष्ट्रनीती आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 10/05/2018 - 10:53 नवीन
India inks $5.43 bn deal to buy S-400 Triumf missiles from Russia अमेरिकन दबावाला झुगारून भारताने आज दिल्लीमध्ये सुमारे रु४०,००० कोटींच्या S-400 Triumf अस्त्रांच्या करारावर सह्या केल्या ! ही अस्त्रे एकाच वेळी १०० ते ३०० लक्ष्ये भेदू शकतात. ही अस्त्रे आणि दस्सॉ विमाने याचा संयुक्त उपयोग भारतामधील अनेक महत्वाची ठिकाणे चीन व पाकिस्तानसाठी अभेद्य करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
ट्रम्प Wed, 10/03/2018 - 04:39 नवीन
आंतराष्ट्रीय राजकारणातील भारताची सध्याची भूमिका व भविष्यातील गरज खूप छान अधोरेखित केली , हळूहळू का होईना भारताला इतर देश सन्माननीय वागणूक देत आहेत .
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 10/03/2018 - 08:15 नवीन
भाजप च बाकी सगळं ठीक वाटतंय !!!! पण राफेल च्या किंमतीवरून विरोधकांनी जो गदारोळ माजवलाय त्यास भाजप चा प्रतिरोध कमी पडतोय हे नक्की . कुठल्याही परिस्थितीत मोदींनी त्या व्यवहारात पाच पैशाचाही भ्रष्टरचारा होऊन दिला नसणार याची सर्वांना खात्री आहे पण अनिल अंबानी च्या अनुभवशून्य कंपनी ला यात घेण्याचे कारण काय होते ?. फ्रांस चा माजीअध्यक्ष ने अगोदर रिलायन्स प्रकरण भाजप वर टाकण्याचा प्रयत्न केला नंतर सावरासावर केली म्हणजे आधीच भारतातील लोकांना घरच झालं थोडं आणि व्यह्याच्या घोड्याची आठवण झाली असणार . काल दिल्ली मध्ये शेतकऱ्यां वर लाठीहल्ला व अश्रूधुर चा मारा करण्यात आला , एखाद्या बाबाला रामदेवबाबा सारखे पळे पर्यंत मारहाण केली को तो ही गुण भाजप च्या खात्यात जमा होईल . मला तर भाजप काँग्रेसच्या पावलावरपाऊल ठेवतांना दिसत आहे जो पर्यंत कुठल्याही परिस्थितीत भाजप राफेलचं हा सूर्य हा जयद्रथ करत नाही तो पर्यंत सामन्य माणुस रागा च्या पुंगी डान्सवर डोलत राहणार . दुष्मन देशांना राफेल मधील खुबी कळू नये म्हणून त्या व्यवहारातील कागदपत्रे सार्वजनिक करता येत नाही , आणि काँग्रेस नीं ठरवलेल्या किंमती मध्येच अजून ज्यास्त कार्यप्रणाली राफेल मध्ये बसवून घेतल्या असे संरक्षणमंत्र्यांचे म्हणणे होते . देशाची सुरक्षितता खुंटीला टांगून ' राफेल व्यवहार कागदपत्रे उघड करा ' यावर काँग्रेस वाले गदारोळ माजवून भाजप ला 2019 अवघड करत असेल तर भाजप ने सुद्धा कुठेतरी सुवर्णमध्य काढला पाहिजे जेणेकरून बलिशबुद्धी रागा शांत होईल व सामान्यांच्या मनात रागा ने निर्माण केलेली मोदीं " चोर " ही प्रतिमा राहणार नाही .
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 10/03/2018 - 10:12 नवीन
....पण राफेल च्या किंमतीवरून विरोधकांनी जो गदारोळ माजवलाय त्यास भाजप चा प्रतिरोध कमी पडतोय हे नक्की .....
वस्तुतः अरुण जेटलींनी जी मुलाखत दिली त्यात युपीएच्या काळातील मिनीमम क्वोट पेक्षा -विथ ऑर विदाऊट टॉप अप वेपन्स- कमी क्वोटवर निगोशीएशन झाले असे अरुण जेटली सांगतात. - किमतीच्या निगोशीएशन्स मध्ये गुजराथी कच्चे नक्कीच नसतात - नुसतीच लढाऊ विमाने घेण्यापेक्षा विथ वेपन्स घेतली तर युद्धास लागलीच सज्ज असतील ह्या मुद्द्यातही दम आहे. हे दोन्ही मुद्दे भाजपा समर्थकांना जनतेपर्यंत नेणे कठीण जात असेल तर संघ आणि भाजपा समर्थक मुद्देसूद प्रतिवादात नेहमीच बर्‍यापैकी कमी पडतातत, तो कौशल्य विकासाचा भाग जसा काँग्रेस कडे आहे तसा अद्याप भाजपाकडे अद्याप व्यवस्थित विकसीत व्हावयाचे आहे. फ्रेंच कंपनीने परतावा काँट्रॅक्ट रिलायन्स किंवा अजून कुणाला का दिला या मुद्द्यात दम नाही. परतावा काँट्रॅक्ट धोरण काँग्रेस कालीन आहे. मोदींनी उघडपणे सांगितले कि अमुक तमुक भारतीय कंपन्यांची मी रदबदली केली तर बहुधा कायदेशीर रित्यात त्यात वावगे काही नसावे. जगातले सगळेच देश आपापल्या देशातील कंपन्यांची रदबदली करतात मोदींनी केले त्यात तुम्ही खासगी क्षेत्राचे कडक कम्युनीझमने विरोधक असाल तर भाग वेगळा अन्यथा त्यात बेकायदेशीर काही नाही. बेसिकली एच ए एल कडचे राफाएलला उत्पादन खरेच विकत घ्यावे लागले असते त्यासाठी तंत्रज्ञानही द्यावे लागले असते , तेच रिलायन्स अथवा इतर खासगी कंपन्यांच्या बाबत जुजबी जुळवणी भारतात करुन घेऊन कागदोपत्री भारतातले उत्पादन विकत घेतल्याचे नाटक करता येऊ शकते. आणि प्रत्यक्षात भारतास तंत्रज्ञान मिळणारच नाही ही मोठी शक्यता राफाएल करारातील निसटती बाजू आहे. अनिल अंबानींनी किंवा अजून कुणि जो पर्यंत व्यवसायाच्या निश्चित ऑर्डर हातात नाहीत तो पर्यंत व्यवसायात पडत नाहीत . अनिल अंबानीने किंवा अजून कुणि कंपनी ऐनवेळी स्थापन करो किंवा अजून काही त्यात राजकीय पक्षांना काही देणे घेणे असण्याचे काम नाही. भारतातून फ्रेंच कंपनीने करारानुसार संरक्षण उत्पादन विकत घेणार का घेतले का त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान पुरवले का ? हा फोकसचा एरीआ असावयास हवा. ते होत नसेल तर टिका अवश्य करावी. उर्वरीत राजकीय साठमारीसाठी जनतेची दिशाभूल झल्याने कोणत्याही राजकीयपक्षास काहीच फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 10/03/2018 - 11:25 नवीन
अनिल अंबानी च्या अनुभवशून्य कंपनी ला यात घेण्याचे कारण काय होते ? सरकार-ते-सरकार करारात कोणत्याही खाजगी कंपनीचे नाव येत नाही. असल्यास केवळ, ज्या कंपनीकडून वस्तू/सेवा विकत घेतली आहे तिला तिच्या किंमतीचा काही ठराविक भागाची ग्राहक देशात गुंतवणूक करावी अशी अट असते*. ती गुंतवणूक करताना, वस्तू/सेवा पुरवणार्‍या कंपनीने ग्राहक देशात स्वतः कंपनी स्थापन करावी किंवा कोणत्या सरकारी/खाजगी कंपनीशी करार करावा, याबाबत त्या कंपनीला पूर्ण सूट असते. ही वस्तूस्थिती सद्य सरकारने सांगीतली आहे आणि (असे डझनांनी सरकार-ते-सरकार करार केलेल्या) भूतपूर्व सरकारमधील राजकारण्यांनाही माहीत आहे. पण, दशक किंवा जास्तीच्या न्यायिक प्रक्रियेनंतर व सर्वोच्च न्यायालयाची दीर्घ प्रक्रिया पूर्ण होऊन झालेल्या अतिरेक्यांच्या फाशीबद्दल, जेथे "ज्युडिशिअल मर्डर" हे मत अजूनही सतत व्यक्त केले जात आहे, अश्या आपल्या देशात राफालंच्या वस्तूस्थितीला डोळ्याआड करून कपोलकल्पित वक्तव्ये केली जाणे अजिबात आश्चर्यकारक नाही. :( * : या अटीचा मुख्य उद्येश आपण खर्च केलेल्या रकमेचा काही भाग आपल्याच देशात गुंतवला जावा हा असतो. ही गुंतवणूक मूळ कराराशी निगडीत असलेल्या वस्तू/सेवेशी असावी अशीही अट सहसा नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 10/03/2018 - 12:21 नवीन
या सगळ्या गदारोळात काही मुद्दे सोईस्करपणे विसरले जात आहेत... १. या करारातील सर्व ३६ राफालं विमाने संपूर्णपणे फ्रान्समध्ये बनवून पूर्ण कार्यरत अवस्थेत भारताला मिळणार आहेत. याचा साधा व स्पष्ट अर्थ असा की, या ३६ विमानांच्या बनावटीत दसॉ ज्यांच्याशी करार करणार आहे अश्या जवळ जवळ १०० भारतीय (HAL सकट इतर सरकारी व रिलायन्ससकट इतर खाजगी) कंपन्यांपैकी कोणालाही काहीही काम मिळणार नाही. २. भारताने दस्सॉकडे भविष्यात अजून काही राफालं विमाने देण्याची मागणी केली तर त्या प्रकल्पावर; आणि तसे झाले नाही तर इतर कोणत्या तरी प्रकल्पावर काम करण्याची संधी या कंपन्यांना मिळेल... आणि त्यांना कोणती संधी मिळेल हे त्या कंपन्यांच्या कौशल्य व कार्यशैलीवर अवलंबून असेल... दसाँ तिच्या वस्तू/सेवेच्या बाबतीत तडजोड करून स्वतःची जगभरच्या बाजारात उच्च पत कमी करून घेण्याचा अविचार करणार नाही, हे सांगायची गरज नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
माहितगार Wed, 10/03/2018 - 12:31 नवीन
...दसाँ तिच्या वस्तू/सेवेच्या बाबतीत तडजोड करून स्वतःची जगभरच्या बाजारात उच्च पत कमी करून घेण्याचा अविचार करणार नाही, हे सांगायची गरज नाहीच....
दसाँ असो का अजून कोणती परकीय कंपनी असंख्य युरोमेरीकी कंपन्या चीन मधून आणि इतर देशातून उत्पादन करुन घेऊ लागल्या . भारतात उत्पादन केले म्हणजे मिकृष्टच होते असेही नसावे. विकसनशील देशांचा सर्वाधिक पैसा विकसीत देशांना प्रगत तंत्रज्ञान आणि संरक्षण सामग्रीतून मिळत रहातो. प्रगत तंत्रज्ञान आणि संरक्षण सामग्री बाबत विकसनशील देश स्वावलंबी होणार नाहीत असेच विकसीत देशांचे नियम असतात. विक्सनशी देशातील राजकीय पक्ष आणि नेतृत्व कोणतेही असूद्यात युरोमेरीकी संरक्षण सामग्री कंपन्या अब्जावदीच्या व्यवसायासाठी नाही नाही ते पाताळयंत्री कामे करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
माहितगार Wed, 10/03/2018 - 12:35 नवीन
जी जिद्द इस्रोतून दाखवली जाते तशी जिद्द डिआरडिओतून पुरेशी पुढे येताना दिसत नाही. आणि जे काम डिआरडिओतून होते त्यास भारतीय सेनादले विवीध कारणांनी चटकन स्विकारत नाहीत. क्वालितीसाठी परकीय उत्पादने वापरा नाही असे नाही पण भारतीय उत्पादकांना (सरकारी असो वा खासगी) काहीच काम दिले नाही तर ते उत्पादन करणार कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
माहितगार Wed, 10/03/2018 - 12:38 नवीन
आयाअयटीअन पर्रीकरांना संरक्षण मंत्री करण्याची कल्पना चांगली होती पर्रीकर आणि सितारामन अशी जोडी चांगले काम सोबतही करु शकली असती. पर्रीकरांना दुर्दवाने गोव्याच्या राजकारण सांभाळण्यास परत जावे लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
माहितगार Wed, 10/03/2018 - 12:24 नवीन
.... : या अटीचा मुख्य उद्येश आपण खर्च केलेल्या रकमेचा काही भाग आपल्याच देशात गुंतवला जावा हा असतो. ही गुंतवणूक मूळ कराराशी निगडीत असलेल्या वस्तू/सेवेशी असावी अशीही अट सहसा नसते.....
हि अट युपिए सरकारने घातलेली दिसते. माझ्या व्यक्तिगत मते किमान गुंतवणूक आणि किमा खरेदी या अटी कराराची अमंलबजावणीच्या आधी पूर्ण करण्याची अट असावी. नाही तर परकीय कंपनी किमंत वाढवणार भारतीयांच्या पैशाने भारतात गुंतवणूक किंवा खरेदीचे लुटूपुटूचे नाटक करणार याला पॉईंट रहात नाही. उदाहरणार्थ समजा अ‍ॅमेझॉ नावाची परकीय कंपनी आहे वस्तुची क्वोटेशन सर्वसाधारण क्ष रुपये आहे, युपिए पासून चालू झालेल्या अटी मुळे भारतात गुंतवणूक किंवा खरेदी करायची म्हणून क्ष +३० % अशी किंमत वाढवून क्वोटेशन देणार मग भारत सरकार क्ष + ३० % मोजणार मग आधिकचा ३० % भांडवलावर परकीय अ‍ॅमेझॉ कंपनीस मालकी मिळाली असेल ते ३० % भारतात गुंतवले जातील पण भांडवल कुणाचे भारतीयांनी टॅक्स मधून पुरवलेले. याला काय अर्थ आहे ? भाजपासरकारने युपिए ने तयार केलेल्या धोरणात बदल करावयास हवा होता. त्यांच कंत्राटदारांना सहभाग घेता येईल ज्यांची भारतात किमान अमूक कोटी गुंतवणूक किमान पाच वर्षे पासून असेल. मग आपो आप परकीय कंपन्या गुंतवणूक चालू करतील. तसे भारत कमी लष्करी खरेदी करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/04/2018 - 20:24 नवीन
उदाहरणार्थ समजा अ‍ॅमेझॉ नावाची परकीय कंपनी आहे वस्तुची क्वोटेशन सर्वसाधारण क्ष रुपये आहे, युपिए पासून चालू झालेल्या अटी मुळे भारतात गुंतवणूक किंवा खरेदी करायची म्हणून क्ष +३० % अशी किंमत वाढवून क्वोटेशन देणार मग भारत सरकार क्ष + ३० % मोजणार मग आधिकचा ३० % भांडवलावर परकीय अ‍ॅमेझॉ कंपनीस मालकी मिळाली असेल ते ३० % भारतात गुंतवले जातील पण भांडवल कुणाचे भारतीयांनी टॅक्स मधून पुरवलेले. याला काय अर्थ आहे ? वस्तूस्थिती अशी आहे... १. ग्राहक देशात गुंतवणूक करायची अट बहुतेक सर्व देशांच्या आंतरराष्टिय करारांत असते. ही भारताची युपिए/एनडिए/किंवा इअतर कोणत्या सरकारची) मक्तेदारी नसून, शक्य ते सर्व देश आपल्या खर्च झालेल्या पैशांपैकी शक्य तेवढे पैसे या मार्गाने आपल्या देशातील गुंतवणूकीच्या रुपाने परत आणण्याचा प्रयत्न करतात. २. ग्राहक देशातील गुंतवणूकीची टक्केवारी खरेदीच्या एकूण किमतीची टक्केवारी असते... म्हणून, समजा कराराच्या किमतीच्या ५०% गुंतवणूकीची रक्कम ठरली आहे व केवळ वादासाठी, तुम्ही म्हणता अशी, कराराचू एकूण किंमत क्ष+३०% इतकी वाढवली तर, गुंतवणूकीची एकूण रक्कम (क्ष+३०%) च्या ५०% टक्के इतकी होईल. त्याशिवाय, कराराची रक्कम ३०%ने वाढवल्यास तो प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या मानाने महाग ठरेल, ते वेगळे. ३. ही स्थानिक गुंतवणूक केवळ मूळ खरेदीशीच निगडीत उत्पादने/सेवांची असावी अशी अट नसते, कारणः अ) विशेषतः, हाय टेक वस्तूंच्या प्रकल्पांत (उदा. दस्सॉ विमाने, विमानवाहू नौका, पाणबुड्या, अणूप्रकल्प, इ) जरूर असणारी उत्पादने/सेवा, ग्राहक देशात उपलब्ध असण्याची शक्यता कमी/शून्य असते. तशी उत्पादने/सेवांची क्षमता ग्राहक देशांत निर्माण करून मग ती मूळ प्रकल्पासाठी विकत घ्यायचा आग्रह केल्यास मूळ प्रकल्पाला अक्षम्य उशीर होईल ! आ) स्थानिक गुंतवणूकीचे मुख्य उद्येश, (क) आपण खर्च केलेल्या पैशातील काही टक्के भाग आपल्या देशात गुंतवणूकीच्या रुपाने परत यावा, (ख) स्थानिक उद्योगांना दीर्घकालीन चालना मिळावी, (ग) स्थानिक उद्योगांना सद्या देशात आस्तित्वात नसलेले तंत्रज्ञान मिळावे (टेक्नॉलॉजी ट्रान्सफर), आणि (घ) त्यामुळे देशाच्या जीडीपीत व प्रगतीत दीर्घकालीन भर पडावी, असे असतात. ४. वरील कारणांमुळेच या ग्राहक देशातील गुंतवणूकीच्या कलमाला, "प्रकल्पासंबंधिची स्थानिक गुंतवणूक" असे न म्हणता, "ऑफसेट (खरेदीची परिणामकारक किंमत कमी करणारी इन्वेस्टमेंट करणारा) क्लॉज", असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 10/05/2018 - 07:50 नवीन
२. ग्राहक देशातील गुंतवणूकीची टक्केवारी खरेदीच्या एकूण किमतीची टक्केवारी असते... म्हणून, समजा कराराच्या किमतीच्या ५०% गुंतवणूकीची रक्कम ठरली आहे व केवळ वादासाठी, तुम्ही म्हणता अशी, कराराचू एकूण किंमत क्ष+३०% इतकी वाढवली तर, गुंतवणूकीची एकूण रक्कम (क्ष+३०%) च्या ५०% टक्के इतकी होईल. त्याशिवाय, कराराची रक्कम ३०%ने वाढवल्यास तो प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या मानाने महाग ठरेल, ते वेगळे
* कोणतीही (पुरवठादार) कंपनी किमान नफ्याशी (सहसा) तडजोड करणार नाही. * कोणतीही कंपनी (आस्थापना) स्वतःच्या नफ्याच्या पलिकडे जाऊन, ऑफसेट / परताव्याची गुंतवणूक (किंवा खरेदी) करणार नाही. * म्हणजे ऑफसेट / परताव्याची गुंतवणूक अट सांभाळायची अट असेल तर उत्पादन किंमत + किमान नफा + ऑफसेट / परताव्याची अपेक्षीत गुंतवणूक इतकी किंमत वाढवण्या शिवाय पर्यायच रहात नाही. * स्पर्धेचे म्हणाल तर , ऑफसेट / परताव्याची गुंतवणूक अट सांभाळण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाला तेवढी किंमत वाढवावीच लागेल. * मी ३०% हे उदाहरण घेतले आहे. ऑफसेटची अट ५०% ची असेल तर वस्तुंची किंमतीत ५०% वाढवण्या शिवाय पर्याय रहात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 10/05/2018 - 10:34 नवीन
वरच्या लेखनावरून, "ऑफसेट कलमातील ती रक्कम मूळ देशाला परत करणे आणि ती रक्कम कंपनीच्या खर्चात समाविष्ट होणे असते" आणि/किंवा "ऑफसेट कलमाने फक्त ग्राहक देशाचाच फायदा होतो", असा तुमचा ग्रह झालेला दिसतोय. तो दूर करण्यासाठी जरा विस्ताराने सांगणे जरूरीचे आहे. सर्वप्रथम, ऑफसेट कलम, ही जागतीक स्तरावर मान्य असलेली कायदेशीर प्रक्रिया आहे. इकडचे पैसे तिकडे फिरवून केलेला किंवा "ओव्हर-इन्व्हॉइस-अंडर-इन्व्हॉईस" प्रकारचा जुगाड तर नक्कीच नाही. तसे करणे जगभरात भ्रष्टाचारात गणले जाते. ऑफसेट कलमामागचा विचार असा आहे... १. कोणतीही कंपनी सतत वाढ होण्याच्या (ग्रोथ) अवस्थेत असावी लागते, नाहीतर ती मंदीत/दुरावस्थेत (स्टॅग्नेशन/डीके) जाऊन बंद पडू शकते. २. याचाच अर्थ असा होतो की, प्रत्येक कंपनी आपली सतत वाढ करण्याच्या प्रयत्नात असते. ही वाढ, (अ) आहे त्या उत्पादन/सेवेचे प्रमाण वाढवून आणि/किंवा (आ) नवीन प्रकारचे उत्पादन/सेवा देणे सुरू करून, केले जाते. या वाढीमुळे अर्थातच कंपनीच्या नफ्यात वाढ होते... किंबहुना, नफावाढ व्हावी याकरिताच नवीन गुंतवणूक केली जाते. ३. वरच्यापैकी कोणत्याही नफावाढीच्या पर्यायासाठी गुंतवणूक करून अधिकचे संसाधन निर्माण करणे आवश्यक असते. ... ३.अ) कंपनीची उत्पादने/सेवा विकून आलेले पैसे, हा सर्वात सोपा व कमी खर्चाचा गुंतवणूकीचा स्त्रोत असतो. ... ३.आ) ज्या जागेजवळ उत्पादन/सेवा विकली जाईल (पक्षी : ग्राहक देश) अश्या जागेवर गुंतवणूक करणे केव्हाही जास्त फायद्याचे, किंबहुना स्वतःच्या देशात गुंतवणूक करण्यापेक्षा जास्त फायद्याचे असते. ... ३.इ) ग्राहक देशात झालेला फायदा परदेशी न नेता, तो स्थानिक व्यापारात गुंतविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून, सर्वच देश अनेक फायदे/सोयी/सुविधा/करसवलती/इ देतात. या गोष्टींमुळे कंपनीच्या फायद्यात लक्षणिय वाढ होते... किंबहुना, परकिय गुंतवणूक वाढविण्यासाठीच सर्व देश हा मार्ग स्विकारतात. ४. ग्राहक देशात स्वतंत्र अथवा स्थानिक भागिदाराबरोबर संयुक्त/जॉईंट कंपनी स्थापन करून गुंतवणूक केल्याने कंपनीला अनेक "प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष" आणि "मूर्त/अमूर्त" फायदे मिळतात. ... ४.अ) ग्राहक देशाबरोबर जवळीकीचे (व्यापारी, आर्थिक, राजकिय, इ) संबध स्थापीत होणे, जे पुढील व्यापारवाढीला (वरची २ व ३ कलमे) उपयोगी असतात. ... ४.आ) ग्राहक देशातील संयुक्त कंपनीत, स्थानिक भागिदार असण्याने, कलम '३.अ' ला अधिक बळ मिळते. ... ४.इ) ग्राहक देशातील संयुक्त कंपनीत स्थानिक भागिदार असण्याने, भागिदाराच्या (स्थानिक परिस्थितीच्या) पूर्वानुभवाचा फायदा घेता येतो. ... ४.ई) मूळ विक्रीशी ऑफसेट गुंतवणूकीचा संबंध असलाच पाहिजे अशी अट नसल्याने, कंपनीला आपली इतर अनेक उत्पादने/सेवा ग्राहक देशाच्या सरकारला विकणे किंवा सर्वसाधारण बाजारपेठेत उतरवणे सोपे होते (पक्षी : सहज व्यापारवाढ शक्य होते). ... ४.उ) ग्राहक देशात स्थानिक पातळीवर आपली पत सिद्ध केल्यामुळे भविष्यात कंपनीला सरकारी आणि अथवा खाजगी व्यापार मिळणे जास्त सुकर होते. इत्यादी, इत्यादी. ५. ग्राहक देशात स्वतंत्र अथवा स्थानिक भागिदाराबरोबर संयुक्त/जॉईंट कंपनी स्थापन करून गुंतवणूक केल्याने देशाला अजून अनेक "प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष" आणि "मूर्त/अमूर्त" फायदे मिळतात. ... ५.अ) देशात उपलब्ध नसलेले तंत्रज्ञान सहजपणे मिळते. ते तंत्रज्ञान केवळ करारातील उत्पादन/सेवा यासाठीच नाही तर इतर बाबतीतही वापरण्याची मुभा असल्यास देशाच्या तांत्रिक विकासात आणि काही प्रसंगांत निर्यातीत (उदा : मारुती सुझुकी) भर पडते. ... ५.आ) देशातील तत्रंज्ञ व कामगारांना नवीन उच्च तंत्रातील प्रशिक्षण मिळून त्यांच्या कौशल्य व अनुभवात आपोआप वाढ होते. याला नेहमीच्या भाषेत आपण मानव संसाधन विकास म्हणतो. मुख्य म्हणजे, जे परदेशी उच्च तंत्रज्ञान परदेशात जाऊन व पैसे खर्च करूनही घेणे कठीण असते / शक्य नसते, ते परदेशी कंपनीच्या सहकार्याने स्वतःच्या देशात आयते मिळते किंवा कराराने मनुष्यबळ परदेशी पाठवून तसे केले जाते... हा ग्राहक देशाचा कायमचा फायदा असतो, जो ती कंपनी परत घेऊन जाऊ शकत नाही, हा मुद्दा फार कळीचा आहे. ... ५.इ) ऑफसेट गुंतवणूकीमुळे निर्माण होणार्‍या स्थानिक कंपन्यांमध्ये काही उच्च स्तरीय तंत्रज्ञ सोडले तर बहुसंख्य कर्मचारी स्थानिक देशातले असतात, म्हणजे ग्राहक देशात रोजगार निर्माण होतो. ... ५.ई) स्थानिक कंपन्यांच्या स्थापनेमुळे ग्राहक देशात अनेक तरंगप्रभावाचे (रिपल् इफेक्ट्स) फायदे निर्माण होतात. उदा. मूलभूत सोईसुविधा निर्मान होतात, मूळ कंपनीच्या पुरवठा/खरेदीदार कंपन्या, कर्मचार्‍यांमुळे घरे/दुकाने/रेस्तराँ/करमणुकीची साधने/इ ची वाढलेली गरज व ती पुरी करताना होणारा व्यापारी/अर्थ विकास. ...५.उ) सरकार-ते-सरकार करारामुळे दोन सरकारातील संबंध घट्ट होऊन, त्यांचा व्यापारी असलेल्या/नसलेल्या आंतरराष्ट्रिय राजकारणातही खूप उपतोग होतो. वानगीदाखल, आपला सर्वात मोठा सामरिक उत्पादनांचा पुरवठादार असलेल्या रशियाने, भारताची अनेक दशके (बांगलादेश युद्धासह) अनेक प्रसंगात, युएनमध्ये केलेली पाठराखण आठवावी. त्याला फ्रान्ससारख्या सुरक्षा परिषदेचा सदस्य असलेल्या देशाची अश्या आणि इतर अनेक बाबतीत कशी आणि किती मदत होऊ शकेल, हे सांगायलाच हवे काय ? इत्यादी, इत्यादी. वर नमूद केलेले, ग्राहक देश व परदेशी कंपनी, या दोघांचेही फायदे केवळ काही नमुने म्हणुन दिलेले आहेत. प्रत्यक्षात, अजून खूप नजिकचे व दूरगामी फायदे असतात. म्हणजे... १. ऑफसेट कलम ग्राहक देशाने आपल्या पैशांचा "काही वाढीव भाग वसूल करावा" यासाठी नसते. तो भाग, "जागतीक स्तरावरच्या प्रतिस्पर्धेने खरेदी केलेल्या उत्पादन/सेवेच्या खर्‍या किमतीचाच भाग" असतो. तसे नसते तर, विरोधी पक्षाने विक्रीकरार वादग्रस्त ठरवायला, विमानाची किंमत हा सर्वात मोठा मुद्दा केला नसता, तर ऑफसेट कलम हा मुद्दा केला असता. आजही ऑफसेट कलमाचा उल्लेख, ते कलम चूक/भ्रष्टाचारी आहे असा होत नाही तर, त्या कलमाखाली कोणाकोणाशी करार केले जात आहेत यासाठी होत आहे. २. ऑफसेट कलमासाठी भाववाढ करणे व नंतर तोच आपला पैसा, आपल्या देशात कसा गुंतववावा याचा हक्क परदेशी कंपनीला देणे हा प्रकार ग्राहक देशाच्या सार्वभौमाला बाधक, आतबट्ट्याचा आणि द्रविडी प्राणायामाचा होईल. त्याऐवजी, कंपनीला तसा वाढीव पैसा न देता, तो स्वतःकडेच ठेऊन आपल्या देशात कसा/किती/केव्हा वापरावा करावा हे ग्राहक देशाने ठरविणे जास्त संयुक्तिक होईल, नाही का? ३. ऑफसेट कलमातील रक्कम कंपनीसाठी स्वतःच्या व्यापारवृद्धीसाठी केलेली फायदेशीर गुंतवणूक असते... करारासाठी दिलेली रक्कम किंवा नुकसान किंवा अनुत्पादक खर्च नव्हे.... ऑफसेट गुंतवणूक आणि त्या कंपनीची जगभरातील इतर कोणतीही गुंतवणूक यांच्यात केवळ एकच फरक असतो, तो म्हणजे, ऑफसेट गुंतवणूक खरेदीदार देशातच करावी अशी अट असते... जी नजिकच्या व दूरगामी फायद्याची कशी असते हे वर आलेच आहे. एकंदरीत... ऑफसेट कलम ग्राहक देश व विक्री करणारा देश/कंपनी या दोघांनाही फायद्याचा (विन-विन) असतो... मुख्य म्हणजे, त्या कलमामुळे करारातील उत्पादन/सेवेची किंमत वाढत नाही... तशी हेतूपुर्रसर भाववाढ केल्यास तो एक प्रकारचा भ्रष्टाचार होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 10/03/2018 - 11:57 नवीन
Kerala hero who saved many dies crying for help Image removed. (द टाईम्स ऑफ इंडिया संस्थळावरून साभार) नुकत्याच केरळमध्ये हाहा:कार माजविलेल्या महापुराच्या काळात, पुराच्या पाण्यात पोहत अनेकांना मृत्युच्या जबड्यातून वाचविणार्‍या केरळच्या वीर सुपुत्रांपैकी एक असलेल्या "जीनेश"ला मात्र त्याच्या जरूरीच्या काळात स्वतःचा जीव वाचविण्यासाठी मदत मिळाली नाही ! :( दुचाकीवरून प्रवास करताना घसरून पडलेल्या जीनेशच्या कमरेवरून ट्रक गेला. त्याच्या बरोबर प्रवास करणार्‍या त्याच्या मित्राच्या विनवण्यांना तेथून जाणार्‍या वाहनांच्या चालकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने जीनेशचा रस्त्यावरच मृत्यु झाला. :( अपघातग्रस्तांना मदत करणार्‍यांना पोलिसांनी त्रास देऊ नये अश्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही रस्त्यांवरची परिस्थिती फारशी सुधारलेली नाही, हे वास्तव आहे. याची मुख्य कारणे अशी आहेत : (अ) अजूनही सर्वसामान्य लोकांच्या मनात असलेली 'पोलीस नस्ता त्रास देतील', (आ) ही भिती रास्त ठरावी अशी असलेली पोलिसांची वागणूक आणि या दोन्हींचा परिणाम म्हणून (इ) अपघातग्रस्तांसंबधी सर्वसामान्य भारतियांच्या मनात असलेली उदासिनता. नैसर्गिक आपत्तीत (उदा. पूर, भूकंप, इ) व मोठ्या अपघातांत (उदा. बस/रेल्वे अपघात, इमारत कोसळणे, इ) असाधारण धैर्य व मानवीयता दाखवणार्‍या आपण भारतियांना खूपच अंतर काटावे लागणार आहे आणि ते होण्यासाठी भारतिय पोलिसांना आपली वागणूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 10/03/2018 - 12:48 नवीन
Unless someone is to be hanged, evicted': CJI Ranjan Gogoi on urgent hearings "केवळ आज फाशी जाणार्‍या किंवा राहत्या घराबाहेर काढल्या गेलेल्या व्यक्तीसंबधींचे सोडून इतर खटले त्वरीत सुनावणीसाठी घेण्यात येऊ नयेत" अशी आज्ञा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशाची सुत्रे हातात घेतल्या दिवशीच न्या रंजन गोगोई यांनी दिली आहे. ही आज्ञा त्यांनी एका जनहित याचिका फेटाळून लावताना दिली आहे. गेली काही वर्षे, फुटकळ कारणांवरून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणे आणि त्यांना प्राधान्यक्रमाने सुनावणीस घेण्याचा प्रघात पडलेला होता. "महत्वाच्या खटल्यांना सुनावणीस घेण्यासाठी महिनोमहिने लागणे आणि निर्णयास वर्षानिवर्षे लागणे" या वस्तूस्थितीच्या पार्श्वभूमीवर, छोट्यामोठ्या जनहित याचिकांना प्राधान्यक्रम मिळणे हे सर्वसामान्य जनतेसाठी आश्चर्यकारक आणि काहीसे विमनस्क करणारे होते. तेव्हा, सर्वसामान्य भारतियांसाठी हा निर्णय स्वागतार्हच आहे यात संशय नाही. मात्र, खुट्ट झाले की जनहित याचिका दाखल करण्याची सवय लागलेले लोक* या निर्णयाचे स्वागत कसे करतील हे पाहण्याची उत्सुकता जरूर आहे. =============== * : काही काळापूर्वी न्या गोगोई यांच्यासह सर्वोच्च न्यायलयाच्या चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवले होते, तेव्हा याच लोकांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या घटनेवरची त्यांची प्रतिक्रिया पाहणे रोचक असेल !
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 10/03/2018 - 13:00 नवीन
उच्च न्यायालये पि आय एल चे काम करु शकत असताना , प्रत्येक केस सरळ सर्वोच्च न्यायालय गाठणे नाही म्हटले तरी जरा जास्तच झाले होते,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
आ
आकाश कंदील Wed, 10/03/2018 - 13:09 नवीन
म्हात्रे सर "चालू घडामोडी" हे सदर "महिना-वर्ष" या पद्धतीत मांडल्या बद्दल खूप आभारी आहे. या मुळे जुने संदर्भ शोधण्यात खूप फायदेशीर होते. कृपया सर्व लेखकांनी हेच स्वरूप (महिना-वर्ष) ठेवावे हि विनंती. वर ट्रम्प साहेबांनी म्हटल्या प्रमाणे मलाही वाटते भाजपने अजून आक्रमकपणे आणि मुद्देसूद पणे त्यांची बाजू मांडली पाहिजे. जसे कि १. म्हात्रे साहेबानी वर पोस्ट केलेल्या ध्वनिचित्रफितीतले (१ ऑक्टोबर ६:५९ pm) मुद्धे उच्चारवाने जनते समोर मांडले पाहिजेत. २. जेव्हा काँग्रेस "ललित मोदी, मल्ल्या" सारख्यांचे विषय काढते तेव्हा या लोकांना इतके कर्ज कोणाच्या कार्यकाळात मिळाले आणि कोणत्या निकषावर मिळाले ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. कारण जर या लोकांना पळून जाण्यात "फक्त" मोदी जबाबदार असतील तर त्याच न्यायाने त्यांना कर्ज देण्यात मनमोहन (पक्षी सोनिया गांधी) सुद्धा "फक्त" जबाबदार धरल्या जातील. ३. रघुराम राजन यांनी JPC पुढे अनुत्पादित कर्जा संदर्भात दिलेली माहिती सर्वदूर पोहोचवली पाहिजे, जी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ४. जी व्यक्ती आयकर विभागाने भरलेल्या खटल्यात जामिन्यावर बाहेर आहे (म्हणजे न्यायालयाला यात प्रथमदर्शी पुरावा योग्य वाटतो आहे) आज देशाला रोज दिवस रात्र मोदी भ्रष्ट आहे हे बोलते ते कोणत्या नैतिकतेत बसते. हे सर्व कागदपत्रांच्या पुराव्यासकट न्यायालयाची अवमानना टाळून "दर आठवड्याला" पत्रकार परिषद घेऊन विशद केले पाहिजे. युद्धशात्र सांगते पद्धतशीर आक्रमण हाच उत्तम बचाव असतो. मला वाटते भाजपमध्ये आज मोदीइतका चांगला दुसरा संवाददाता नाही हे भाजपचे खरे दुखणे आहे. त्यांनी हि कमी लवकरात लवकर पूर्ण करावी कदाचित अशी व्यक्ती त्याच्या मातृसौसंस्थेत सापडू शकेल. म्हणजे राफेल वर बाजू मांडण्या करता कृषीमंत्र्याला बोलवायची नामुष्की येणार नाही. बाकी सविस्तर नंतर
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 10/03/2018 - 15:32 नवीन
राफेल करार मध्ये भाजप ने घोटाळा केला हे सामान्य जनतेच्या मनात ठासविण्यात काही अंशी रागा यशस्वी झाला कारण भाजप त्या करारातील मुद्दे संरक्षणात्मक दृष्ट्या मीडिया समोर मांडू शकत नाही . भाजप 2019 च्या अगोदर संसदीय समिती नेमून राफेल कराराचे डाग पुसून काढू शकत नाही का ? फक्त काँग्रेसच या विषयावर का बोंबलत आहे हे एक न समजलेले कोडे आहे . 2019 च्या अगोदर एक वर्ष भाजप काँग्रेस च्या खादाडी च्या सगळ्या फायली बाहेर काढणारं अशी एक वदंता एक वर्षा पूर्वी पसरली होती पण झालंय उलट आता भाजप आरोपी च्या पिंजऱ्यात उभी आहे . मंदबुद्धी माणूस दोन ओळी सलग बोलू शकत नाही तो धडाधड आरोप करत आहे आणि राफेल प्रकरण भाजप एव्हढं लाईटली का घेतंय तेच कळायला मार्ग नाही , बोफोर्स ने काँग्रेस सत्ता बेदखल झाली तशी वेळ राफेल मूळे भाजप वर न येवो म्हणजे झालं .
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 10/03/2018 - 16:04 नवीन
मुळात बोफोर्स प्रकरणात भ्रष्टाचार झाला होता हे उघड असल्यामुळे तो झालाच नाही असे कुणाला म्हणता आले नाही. त्यातून त्यात स्वीडन मध्ये कुठला पैसा कुठे वळवला गेला आणि कुणाला आणि कसा दिला गेला याचे बरेच कागद तिकडे उपलब्ध झाले. राफेल बाबत हे दोन सरकारांमधील कंत्राट होते ज्यामध्ये मध्यस्थ हा प्रकारच नाही. पाश्चात्य देशात कंत्राट मिळवण्यासाठी लाच देणे( ज्याला सोयीचा पैसा facilitation money सारखी सोज्वळ नावे हि असतात) इ गोष्टी मान्य असतात. सामान्य माणसांना एक गोष्ट नक्की माहिती आहे कि श्री मोदी ४ वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री असून त्यांच्या कडे काहीही पैसे नाहीत किंवा त्यांच्या कुटुंबाकडे शेकडो एकर जमीनी नाहीत. किंवा एका एकरात त्यांनी ५ कोटी रुपये विक्रमी उत्पादन देणारे पीकहि लावलेले नाही. किंवा पार्टीने पैसे दिल्यामुळे श्रीमती मायावतींसारखा महाल नाही. जी गोष्ट त्यांनी गेली १६ वर्षे केली नाही तेंव्हा आता "एका कंत्राटात" पैसे खाण्यासारखा दळभद्री पण ते करणार नाहीत याबद्द्ल सामान्य माणसाच्या मनात अजिबात शंका नाही. त्यामुळे विऱोधकानी कितीही आरडा ओरडा केला तरी श्री मोदी हे भ्रष्ट आहेत हे सिद्ध करणे त्यांना शक्य नाही. बाकी मोदी हुकूमशहा आहेत असा प्रसार केल्याने मतदाराला काहीही फरक पडत नाही.उदा श्रीमती इंदिरा गांधी या हुकूमशहा होत्या हे आणीबाणीत सिद्ध होऊनही ३ वर्षांनी लोकांनी त्यांना परत निवडून दिले होतेच. श्री मोदींच्या हुकूमशाहीचा सामान्य माणसाला काहीही फरक पडत नाही. पेट्रोलच्या किमतीबद्दल जरी विरोधकांनी रान उठवले असले तरी पेट्रोलमुळे सामान्य माणसाच्या खिशावर फार मोठा बोजा पडत नाही. तो फक्त "अर्बन नक्षलवाद्यांच्या" पडतो. जोवर अन्नधान्याच्या किमती आभाळाला भिडत नाहीत तोवर सामान्यमाणसाला फार फरक पडत नाही. यथावकाश पेट्रोलियमच्या किमती कमी होतीलच त्याबरोबर पेट्रोलच्याही. आणि त्या जर नाही झाल्या तर निवडणुकीचं ४ महिने अगोदर त्या कमी करण्याइतके श्री मोदी नक्कीच चलाख आहेत. राफेलची ३६ विमाने २०१९ मधेय आपल्या ताफ्यात दाखल होतील आणि त्यातील किमान २७ विमाने पूर्ण वेळ चालू स्थितीत ५ वर्षे ठेवण्याचे कठीण काम डेसो कंपनीला दिलेले आहे. हि ७५ % सर्व्हीसेबिलिटी फ्रेंच वायूदळातही नाही तिथे ती ४८ % आहे. हे आणि या कंत्राटात पाच पैशाचा घोटाळा नाही सर्व सेनादलातील आणि संरक्षण मंत्रालयातील लोकांना आणि सर्कारी नोकरांना माहिती आहे. बाकी श्री राहुल गांधी काय बोलतात याकडे भाजपचे लक्ष नसेल हे म्हणणे अतिशयोक्तीचे वाटते. जोवर श्री राहुल गांधी भंपक बोलत असतात तोवर त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही. कारण सातत्य हा श्री राहुल गांधी यांचा गुण नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Wed, 10/03/2018 - 16:54 नवीन
ओरडून विकणाऱ्याची माती घेण्याची मानसिकता भारतीय जनते ची असल्याने शांत बसणाऱ्याच्या सोन्याचा खप होणार नाही म्हणून चिंता वाटते . सोशल मीडियावर उफळणार्या अफवांमुळे मिडियाग्रस्त लोकांनी कित्तेक जीव घेतले गेले त्याच मीडियावर रागा भाजप विराधात रान पेटवत असताना भाजप च्या तुटपुंज्या प्रतिकारामुळे तुम्हा आम्हाची त्याच गोची होते .
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Wed, 10/03/2018 - 17:14 नवीन
मला तर वाटतंय राहुल गांधी पंतप्रधान व्हावा. देशात एकदम शांतता नांदेल, पेट्रोलचे भाव ५० रुपयांवर येतील. मोदींनी तरी कशाला उगीच त्रास करून घ्यावा? ६७-६८ हे वय निवृत्त होऊन निवांत आयुष्य जगण्याचे आहे, कशाला उगाच नसत्या उठाठेवी कराव्यात? तसेही त्यांना राफेल सौद्यातून पैसे मिळतीलच, वर निरव, मल्ल्या यांच्याकडूनही पैसे मिळतील. तोही प्लॅन फेल गेला तर अंबानी आहेच की मदतीला. मस्त निवृत्त व्हायचं आणि ७ जनकल्याण मार्गावरचे घर रिकामे करायचेच नाही. म्हणजे घराचाही प्रश्न सुटेल. गुजराथी थाळी खावानु, निंबू पाणी पिवानु, योगा करवानु... मज्जानी लाईफ.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 10/03/2018 - 17:16 नवीन

एक भयानक विदारक सत्य

भारत चंद्रावरच नव्हे तर मंगळावर यान पाठवू शकतो. अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, अणुपाणबुडी https://en.wikipedia.org/wiki/INS_Arihant स्वतः बनवू शकतो. अणुपाणबुडीतून डागता येणारे आंतरखंडीय क्षेपणास्त्र https://en.wikipedia.org/wiki/K-4_(SLBM)स्वतःच्या हिमतीवर बनवून त्याचे सफल परीक्षण करु शकतो. ब्राह्मोस सारखे अतिवेगवान क्षेपणास्त्र बनवून तैनात करू शकतो किंवा नाविक सारखी स्वतःची GPS (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) https://en.wikipedia.org/wiki/Indian_Regional_Navigation_Satellite_System बनवू शकतो. तर तोफा बंदुका आणि विमाने सारखे अत्युच्च तंत्रज्ञान भारताला स्वतःला बनवता येणार नाही? सीरिया इराक इराण यांनी अणुबॉम्ब बनवू नये म्हणून अमेरिका एवढे प्रचंड प्रयत्न करते आहे तर ते भारताने चांद्रयान अग्नी अरिहंत सारखे तंत्रज्ञान विकसित करु नये म्हणून प्रयत्न केले नाहीत? भरपूर केले अमेरिकाच काय रशिया फ्रांस ब्रिटन आणि इस्रायल सुद्धा करत आहे आणि करत राहणारच . पण जे तंत्रज्ञान बाहेर उपलब्ध होणारच नाही उदा अणुबॉम्ब PSLV इ. ते देशातच निर्माण करणे आवश्यक होते.

पण ज्या गोष्टी विकत मिळू शकतात त्यामध्ये भरपूर पैसे खाता येतात. हि संस्कृती गेल्या ७० वर्षात तयार झालेली आहे.

त्यामुळे हे तंत्रज्ञान भारतात तयार होऊच नये म्हणून जसे पाश्चात्य देश प्रयत्न करतात तसेच प्रयत्न भारतातील राजकारणी सरकारी बाबू प्रयत्न करत असतात आणि दुर्दैवाने उच्च सेनाधिकारी आणि उच्च शास्त्रज्ञ सुद्धा यात सामील असतात/ केले जातात आणि जे त्याची तयारी दाखवत नाहीत त्यांना बाजूला सारले जाते किंवा खोटे खटले भरून त्यांना जेरीस आणले जाते किंवा अक्षरशः कुठे तरी ते अपघातात सापडतात आणि मृत्युमुखी पडतात. https://timesofindia.indiatimes.com/india/11-nuclear-scientists-died-in-mysterious-circumstances-in-4-years/articleshow/49272275.cms https://m.dailyhunt.in/news/india/english/defence+lover-epaper-defence/india+s+nuclear+scientists+are+dying+mysteriously+for+many+years-newsid-81939982 जो देश चंद्रावर आणि मंगळावर यान पाठवतो त्याला रायफल किंवा मशिनगन तयार करता येणार नाही का? HAL सारख्या कंपनीला कायमच पांगळं ठेवलं गेलंय. त्यामुळे ७० वर्षे झाली तरी त्यांना स्वतःचे एक विमान धड बनवता आले नाही. तेजस बनवण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पैसाच पुरवला नाही तर शास्त्रज्ञ काम कशावर करणार? आजही HAL ला आपल्या हातात असलेल्या सुखोई विमानांची ऑर्डर पुरी करता येत नाहीये मग त्यांना राफेल दिला असतं तर त्याचे उत्पादन सुरु होण्यासाठी २०२२ उजाडले असते मग ती ऑर्डर पुरी कधी करणार? https://indianexpress.com/article/india/in-rafale-season-hals-3-year-delay-in-sukhoi-rollout-raises-concerns-5381852/ आता सुद्धा हवाई दलाच्या आणि संरक्षण मंत्रालयाच्या डोक्यावर बसून श्री मोदींनी १०० तेजसची ऑर्डर देणे भाग पाडले आहे. https://economictimes.indiatimes.com/news/defence/iaf-to-order-100-modified-tejas-aircraft/articleshow/49330662.cms ऑर्डर नाही त्यामुळे ऍडव्हान्स पैसे नाहीत म्हणून विमान तयार करता येत नाही मग कार्यक्रम रेंगाळत जातो आणि त्यातून अशी स्थिती येते कि परदेशातून विमाने थेट विकत घ्यावी लागतात. असे होऊ नये आणि सुखोई विमानांच्या कंत्राटाच्या वेळच्या चुका परत होऊ नयेत म्हणून ५ व्या पिढीचे लढाऊ विमान पूर्ण तंत्रज्ञानासकटच मिळावे म्हणून मोदी सरकार प्रयत्नशील आहे. A HAL-made Sukhoi (around Rs 450 crore) also costs Rs 100 crore more than the price of the same jet imported from Russia. आहे कि नाही ( भयाण) गंमत. https://economictimes.indiatimes.com/news/defence/after-sukhoi-mistake-india-to-go-for-russian-5th-generation-fighter-only-on-full-tech-transfer-pact/articleshow/57551801.cms डेसो कंपनीच्या मिराज २००० च्या बाबतीत सुद्धा अशीच स्थिती झाली( केली गेली) https://en.wikipedia.org/wiki/Dassault_Mirage_2000#India आपल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात (IGMDP) https://en.wikipedia.org/wiki/Integrated_Guided_Missile_Development_Programme डॉ अब्दुल कलाम यांनी तरुण आणि अतिशय कार्यक्षम अशा शास्त्रज्ञांना कालापूर्वी भराभर बढती देऊन कार्यक्रम झपाट्याने पुढे नेला होता परंतु पोखरण २ साठी त्यांना या कार्यक्रमातून बाजूला केल्यावर सरकारी बाबू मधील दुद्धचार्यानी त्यांना लाल फितीने जेरीस आणले शेवटी त्यांच्या बुद्धिमत्तेवर डोळा ठेवून बसलेल्या पाश्चात्य कंपन्यांनी त्यांना सुरुवातीला भारतातच लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या दिल्या आणि काही महिन्यांनी उचलून अमेरिका जर्मनी फ्रांस सारख्या ठिकाणी सन्मानाने बोलावून घेतले. यानंतर हा धावणारा कार्यक्रम रांगू लागला आणि शेवटी हे दुद्धाचार्य निवृत्त झाले आणि नव्या दमाचे तरुण शास्त्रज्ञ आले तेंव्हा तो कार्यक्रम परत धावतो आहे. या कार्यक्रमातील बहुसंख्य क्षेपणास्त्राना मंजुरी आणि सुरुवातीचा निधी देणे हे श्री वाजपेयींच्या कार्यकाळातच झाले होते. श्री जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यात स्वतः लक्ष घातले होते. तेंव्हा त्यांच्यावरही आरोपांची सरबत्ती झाली होती आणि शवपेटिके बाबत प्रचंड गदारोळ केला गेला होता. परंतु पुढच्या १० वर्षात ना धड लक्ष दिले गेले ना पैसे मंजूर झाले. UPA II मध्ये घोटाळूयाच्या भीतीने श्री अँटनी यांच्या काळात कोणतीच गोष्ट मंजूर झाली नाही. त्यामुळे पाणबुडीतील साध्या बॅटऱ्या न बदलल्याने आपली एक पाणबुडी स्फोट होऊन मुंबईतच बुडाली.( हे मी माझ्या पाणबुडीवरील लेखात लिहिले आहे) जितकी खरेदी जास्त तितके पैसे जास्त हि संस्कृती तयार झाली आहे. श्री वाजपेयी किंवा श्री मोदी हे एकटे याला पुरे पडू शकणार नाहीत. श्री वाजपेयी फार सरळ मनाचे होते. श्री मोदी त्यांच्यापेक्षा धूर्त आहेत त्यामुळे हि प्रणाली थोडीतरी बदलेल अशी आशा निर्माण झाली आहे. परंतु एकाच बाबतीत एवढा प्रचंड गदारोळ का होतो आहे कारण हि पैसे झिरपण्याची प्रणालीच बंद करण्याच्या हेतूने श्री मोदी यांनी यात हात घातला आहे. आणि आपले दुकान कायमचे बंद होईल या भीतीने विरोधक जिवाच्या पणाने त्याला विरोध करत आहेत आणि त्याला पाश्चात्य संस्था मदत करत आहेत. एक उदाहरण म्हणून देतो आहे. --कुडानकुलमच्या अणुऊर्जा प्रकल्पापासून तुतिकोरिन(तुथीकुडी) हे १०३ किमी दूर आहे. मग तुतिकोरिन(तुथीकुडी) येथिक ख्रिश्चन डायोसिस चर्च ला कुडानकुलम अणुप्रकल्पाचा विरोध करण्याचे काय कारण ? हे म्हणजे वापीला होणाऱ्या प्रकल्पाला मुंबईच्या चर्चने विरोध करण्यासारखे आहे. हा प्रकल्प रशियाच्या मदतीने चालू होता त्यामुळे त्यात काड्या घालण्यासाठी अमेरिकेने ख्रिश्चन एन जि ओ च्या मदतीने तेथे जन आंदोलन चालवले Prime Minister Manmohan Singh went public with the charge that US non-governmental organisations were behind the agitation, which has stalled work on the nuclear plant in power-starved Tamil Nadu. Although Singh did not mention the faith-based affiliation of these NGOs, it is an open secret that church groups based in the coastal districts of Tamil Nadu, which receive crores of rupees in donations from overseas, have been active in backing the anti-nuclear protest https://www.firstpost.com/politics/church-role-in-kudankulam-protests-merits-wider-probe-228719.html या विषयावर मी "शस्त्रास्त्रांचा बाजार" म्हणून एक लेख मालिका सुरू केली होती परंतु त्याची लांबी रुंदी खोली इतकी जास्त आहे हे मला तेंव्हा जाणवले नव्हते. त्यामुळे मी पार दिशाहीन स्थितीत ते काम अर्धवट सोडले. जेंव्हा त्याची खोली किती आहे ते लक्षात येईल तेंव्हा त्यात परत हात घालायची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
N
NiluMP गुरुवार, 10/04/2018 - 14:06 नवीन
:-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
माहितगार गुरुवार, 10/04/2018 - 15:09 नवीन
.....या विषयावर मी "शस्त्रास्त्रांचा बाजार" म्हणून एक लेख मालिका सुरू केली होती परंतु त्याची लांबी रुंदी खोली इतकी जास्त आहे हे मला तेंव्हा जाणवले नव्हते. त्यामुळे मी पार दिशाहीन स्थितीत ते काम अर्धवट सोडले. जेंव्हा त्याची खोली किती आहे ते लक्षात येईल तेंव्हा त्यात परत हात घालायची इच्छा आहे.....
या विषयाच्या लेखनावर काँसट्रेट कराच सोबतच हि कोंडी सोडवण्यासाठी नव्या मराठी पिढीस काय करता येऊ शकेल याबाबत ही अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करावे. मराठी माणूस गोष्टी मनावर उशीरा घेतो पण मनावर घेतल्यास सहसा व्यवस्थित निभावतो. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा