Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१८

ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 10/01/2018 - 08:35
🗣 213 प्रतिसाद
Companies pay up Rs 1.1 lakh crore for fear of insolvency action कर्ज देणे व वसूल करणे यांच्या प्रशासनासंबंधीचे (इन्सॉल्व्हन्सी व बँकरप्सी) नवीन कायदे (उदा : Insolvency and Bankruptcy Code किंवा IBC) आणल्यामुळे पूर्वी चालढकल करत बुडित कर्जांच्या दिशेने वाटचाल करणार्‍या कर्जदारांवर वचक निर्माण झाल्याचे दिसत आहे. याचा परिणाम म्हणून, याअगोदर कर्ज फेडण्याबाबत चालढकल करणार्‍या कर्जदारांनी, आतापर्यंत सुमारे रु१.१ लाख कोटीचा भरणा बँकात केला आहे. गेल्या आठवड्यात सरकारने, या वित्तवर्षांत, नाठाळ कर्जदारांकडून रु१.८ लाख कोटी वसूल करण्याचे लक्ष ठेवल्याचे जाहीर केले आहे.  कायद्याचे बळ व प्रशासकिय पाठींब्याचे (Insolvency and Bankruptcy Board of India किंवा IBBI; National Company Law Tribunal किंवा NCLT; इत्यादी) बळ व बारीक देखरेख आस्तित्वात आल्यामुळे, भविष्यात बँका आपले कर्ज वसूल करण्यात कसूर करण्याची आणि/किंवा कर्जदारांनी चलाखी करून कर्ज बुडवण्याची शक्यता फार कमी झाली आहे.

प्रतिक्रिया द्या
90096 वाचन

💬 प्रतिसाद (213)
र
रणजित चितळे Sat, 10/27/2018 - 09:11 नवीन
हा खूप महत्वाचा निर्णय आहे
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 10/27/2018 - 11:21 नवीन
शुक्रवारी २६ ऑक्टोबरला श्रीलंकेत राष्ट्रपती सिरीसेना यांनी पंतप्रधान राणिल विक्रमसिंघे यांची हकालपट्टी करून माजी राष्ट्रपती राजपक्षे यांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे सिरीसेना यांनी २००५ मध्ये राजपक्षे यांना हरवून राष्ट्रपतीपद मिळवले होते व ते दोघ एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. २००५ मध्येच श्रीलंकन घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात येऊन राष्ट्रपतींचे पंतप्रधानांना पदच्युत करण्याचे अधिकार काढले गेले होते. त्यामुळे आताचा सिरीसेना यांचा हा निर्णय घटनाबाह्य असल्याचं म्हटलं जातंय. टीप १ : १) सिरीसेना - सध्याचे राष्ट्रपती २) विक्रमसिंघे - परवापर्यंतचे पंतप्रधान ३) राजपक्षे - (२००५ पर्यंत राष्ट्रपती होते.) सिरीसेना यांनी काल नियुक्त केलेले पंतप्रधान टीप २ : या तिघांनीही मागील काही महिन्यात भारतात येऊन विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. टीप ३ : मागच्या आठवड्यात कॅबिनेट बैठकीत सिरीसेना व विक्रमसिंघे यांच्यात श्रीलंकेचे एक बंदर भारताला भाड्याने वापरायला देण्यावरून वाद झाला होता. टीप ४ : राजपक्षे हे चीन समर्थक व भारत विरोधी समजले जातात. त्यामुळे आपल्यादॄष्टीने या घटनेचा सिग्निफिकन्स काय ते बघावं लागेल.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 10/29/2018 - 18:30 नवीन
श्रीलंकेचे पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक
श्रीलंकेत राजकीय संकट अधिकाधिक गडद होत चालले आहे. श्रीलंकेचे पदच्च्युत पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांचे विश्वासू समर्थक आणि पेट्रोलियममंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक करण्यात आली आहे. रविवारीच रणतुंगा यांच्या सुरक्षारक्षकाने राजपक्षे यांच्या समर्थकांवर गोळीबार केला होता. ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. दोन जण जखमी झाले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 10/31/2018 - 15:50 नवीन
India jumps 23 spots, now ranks 77 in Ease of Doing Business जागतिक बँकेने (वर्ल्ड बँक) प्रसिद्ध केलेल्या "व्यापार करण्यासाठीची सहजता (Ease of Doing Business)" यादीत भारताचा क्रमांक गेल्या वर्षीच्या १०० वरून २३ने कमी होत आता ७७ वर आला आहे. गेल्या वर्षीही भारताचा क्रमाक त्यापूर्वीच्या १३० वरून कमी होत १०० झाला होता. दोन वर्षांत क्रमांकाच्या ५३पायर्‍या पार करणे हा एक विक्रम समजला जात आहे ! Image removed. (टाईम्स ऑफ इंडिया संस्थळावरून साभार)
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 10/31/2018 - 16:36 नवीन
India jumps 23 spots, now ranks 77 in Ease of Doing Business मा श्री मोदीजीं व सरकारचे अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 10/31/2018 - 17:12 नवीन
कर्नाटक सरकारला कोर्टाची सणसणीत चपराक !! लाखो हिंदुची कत्तल करणार्या क्रुरकर्मा टिपु सुलतानाची जयंती दर वर्षी साजरी करण्याच काम कर्नाटक सरकार गेली काही वर्षे करत आहे ! कर्नाटकात ल्या जनतेचाच पैसा वापरुन जनतेच्या जुन्या जखमेवर मिठ चोळण्याच अमानुष काम कॉंग्रेस सरकार करत आहे , त्यावर कर्नाटक मधली जनता कोर्टात गेली ! कोर्टाने सरकारला त्यांची बाजु मांडण्यासाठी बोलावल पण सरकारने त्यावर पुर्ण दुर्लक्ष केल म्हणुन कोर्टाने सणसणीत चपराक कर्नाटक सरकारला मारलेली आहे !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 10/31/2018 - 17:20 नवीन
पुर्ण भारतभर हिंदु समाजाच्या जखमेवर मिठ चोळण्याच काम ईमानेएतबारे कॉँंग्रेस करत आलेली आहे !! श्री राम जन्म भुमि सारख्या प्रकरणात सरकारने सत्याची बाजु घेतली नाही त्यामुळे आता हिंदु समाजाने आपल्या दोन लाखाच्या वर उध्वस्त केलेल्या मंदिरांचा हक्क परत घ्यावा ! आता हिंदु समाजाने जाग झाल पाहीजे व अश्या पक्षाच तोंड फोडल पाहिजे !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 11/02/2018 - 18:44 नवीन
..... मीठ चोळण्याच काम ईमानेएतबारे कॉँंग्रेस करत आलेली आहे !! + १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/01/2018 - 13:26 नवीन
शक्ती अवतरला ! IIT-Madras creates ‘Shakti’, India’s first microprocessor आयआयटी (मद्रास) ने भारताचा पहिला मायक्रोप्रोसेसर बनवला आहे. या मायक्रोप्रोसेसरमध्ये जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान (cutting edge of technology) वापरलेले नसले (शक्तीचे १८०nm तंत्रज्ञान विरुद्ध अमेरिकेचे 20nm तंत्रज्ञान) तरीही, त्याचे व्यापारी स्तरावर उत्पादन सुरू होऊ शकल्यास तो भारतिय तंत्रज्ञानातील एक महत्वाची पायरी ठरेल, हे मात्र नक्की. त्याच्यामुळे, केवळ मायक्रोप्रोसेसरच्या आयातीची गरज कमी होईल असेच नाही, तर सायबर अ‍ॅटॅक्सवर ताबा ठेवणे सोपे होईल. "शक्ती" असे नामकरण केलेल्या या मायक्रोप्रोसेसरचा दळणवळ व संरक्षण communication and defense sectors) या क्षेत्रांत खास उपयोग होईल असे म्हटले जाते.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 11/01/2018 - 15:42 नवीन
आयआयटी (मद्रास) ची कौतुकास्पद कामगिरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ग
गामा पैलवान Sat, 11/03/2018 - 09:09 नवीन
बातमीबद्दल धन्यवाद डॉक्टर सुहास म्हात्रे! हे स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठाम पाऊल आहे. गणनचिप ( = मायक्रोप्रोसेसर) तंत्रज्ञान जरी अद्ययावत नसलं तरी काही बिघडंत नाही. कारण की गणनचिप हा मंडलातला (=सर्किट) सर्वात वेगवान घटक असतो. त्यामुळे मंडलवेग हा अवांतर घटकांवर अवलंबून असतो. एकंदर उरक वाढवण्यासाठी अवांतर उपकरणांचा वेग वाढवणे आवश्यक असते. त्यादृष्टीनेही संशोधन करायला भरपूर वाव आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मुक्त विहारि Sun, 11/04/2018 - 20:37 नवीन
भारतात स्वतःच्या मोटर कार्स पण बनत न्हवत्या... त्यामुळे अशीच जर वाटचाल चालू राहिली तरी येत्या १५-२० वर्षात मायक्रो प्रोसेसर आधारीत बर्‍याच गोष्टी भारतात पण बनू शकतील. स्मार्ट मोबाइल पण मायक्रो प्रोसेसर आधारीत असतो का? (अज्ञानी) मुवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/05/2018 - 04:54 नवीन
A microprocessor is a computer processor that incorporates the functions of a central processing unit on a single integrated circuit (IC), or at most a few integrated circuits. The microprocessor is a multipurpose, clock driven, register based, digital integrated circuit that accepts binary data as input, processes it according to instructions stored in its memory, and provides results as output. Microprocessors contain both combinational logic and sequential digital logic. Microprocessors operate on numbers and symbols represented in the binary number system. थोडक्यात, microprocessor म्हणजे कोणत्याही संगणक व संगणकावर आधारीत (मोबाईल, काँप्युटराईझ्ड सिस्टिम्स, इ) वस्तूचा मेंदू (हार्डवेअर) असलेले integrated circuit असते... त्या वस्तूत इन्स्टॉल केलेल्या प्रणालीमधील (सॉफ्टवेअर) आज्ञा व तर्कांचा वापर करून, तो त्याला पुरवल्या गेलेली माहितीवर (इनपुट) कार्य करतो व उत्तरे (आउटपुट) तयार करतो. इतर हार्डवेअर व सॉफ्टवेअर ती उत्तरे (आउटपुट) वापरून, स्क्रीनवर चित्र/अक्षरे दाखवणे; आवाज, चलतचित्र, हालचाल, इ स्वरूपात (उदा: गाणे, व्हिडिओ, रिंगटोन, व्हायब्रेशन, इ) प्रस्तूती करणे; निर्माण केलेला संदेश पुढे पाठवणे; इत्यादी अनेक कृती करू शकतात. हातावरचे डिजिटल घड्याळ, मोबाईल, (मांडीवरचा/टेबलावरचा) संगणक, चारचाकी, रेल्वे, विमान ते अंतराळयानापर्यंत आणि उद्योगधंद्यांतील अनेक मशिन्समध्ये आवश्यक असणारी करोडो प्रकारची कामे करायला microprocessorचा उपयोग केला जातो... किंबहुना, आजच्या घडीला microprocessorचा उपयोग असलेल्या वस्तूंच्या यादीपेक्षा, त्याचा उपयोग नसलेल्या वस्तूंची यादी करणे जास्त सोपे आहे ! गेल्या काही दशकांतली microprocessorच्या विकासाची झेप इतकी मोठी आहे की आज, संगणकशास्त्राच्या क्षमतेची सीमा 'microprocessor (किंवा एकंदरीत सर्वच हार्डवेअर) ची ताकद' नसून 'मानवी विचारशक्तीची ताकद' हीच आहे ! (Today, not 'power of microprocessor' but 'extent of human imagination' is the limit of computing.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा