Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

व
वामन देशमुख
Tue, 01/01/2019 - 15:48
🗣 616 प्रतिसाद
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.
वर्गीकरण
राजकारण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
225912 वाचन

💬 प्रतिसाद (616)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 01/01/2019 - 16:24 नवीन
मुलाखत बघत आहोत. चांगली आहे. एकच खटकले- मुलाखतीत केंद्रिय मंत्री कुठेच दिसत नाहीत.(म्हणजे त्यांचा उल्लेख नाही) म्हणजे सर्जिकल हल्यावेळेस मनोहर परीकर, नोटाबंदीच्यावेळेस जेटले होते.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/02/2019 - 03:06 नवीन
भाजपात मोदी हा एकच चेहरा आहे , इतर वारस नाहीत , ह्यावर एक धागा आहे , विसरलीस ? (संपादित) https://www.bbc.com/marathi/india-46592150
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ग
गब्रिएल Wed, 01/02/2019 - 08:51 नवीन
पैले तर काळी मांजर गल्ली चुकलिया. आनी त्येच्या येड्चाप धाग्यांना कोनीबी भीक घालत नाय ह्ये बगून चिडून स्वबावाला धरून एकदम खालच्या लेवलवर आली. उगी उगी ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/01/2019 - 17:14 नवीन
प्रकाश आंबेडकर बोलले होते की अध्यादेश कशासाठी काढता येतो , त्याची यादी आहे. त्यात मंदिर नाही म्हणे
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Wed, 01/02/2019 - 02:48 नवीन
अलाहाबाद उच्च न्यायालयाने, २०१० साली, सध्या जेथे रामलाला ची मूर्ती स्थापित आहे ती जागा व त्या सभोवतीची जागा हिंदूंना दिली आहे. सर्वोच्च न्यायालय हा निर्णय फिरवेल असे वाटत नाही. तेंव्हा श्रद्धा आणि सबुरी हा पर्याय चांगला वाटतो.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 01/02/2019 - 06:01 नवीन
माणसाला माणुसकीची वागणूक द्यायची सोडून देव आणि चिलिम फुकणाऱ्या साधु संताच्या नादी लागणारी जमात सर्व धर्मात असते , ह्याच जमातीने राम मंदिर प्रश्न वाढविला आहे . हिंदू धर्मियांची भावना , श्रद्धा असलेली रामजन्मभुमीची जागा मुस्लिमसमजाने कोर्ट कचेरी न करता उदारअंतकरणाने दिली असती तर पुढचे कित्तेक वर्ष दोन्ही समुदाय या देशात सुखाने नांदले असते . कोण कुठला बाबर ? त्याची मस्जिद जाणीवपूर्वक 1527 साली रामजन्म भूमिवर बांधून दोन्ही समाजात दूरी निर्माण करण्यासाठी पाचर ठोकण्या चे काम केले गेले , ती दूरी कमी करण्याची संधी आताच्या मुस्लिम समाजाने घालवली हे निश्चित . बाबरा च्या मस्जिद ऐवजी अल्ल्ला चा हजारो वर्षा पूर्वीचा दर्गा असता तर मुस्लिम समाजाने त्यासाठी हिंदू बरोबर वाद घालने योग्य होते पण बाबरा साठी चुकीचे आहे ,आणि ही बाब मुस्लिमसमाजाला माहित असूनही ते कर्मठ असल्या मुळे वाद घालत बसले आहेत .
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/02/2019 - 08:16 नवीन
स्तुपांची मंदिरे झाली , अशीही उदाहरणे आहेत म्हणे, मग त्यांचे काय करायचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
स
सुबोध खरे Wed, 01/02/2019 - 08:37 नवीन
म्हणे, कोण म्हणतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
व
विशुमित Wed, 01/02/2019 - 09:04 नवीन
आपले कवीराज केंद्रीय मंत्री !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 01/02/2019 - 14:38 नवीन
आपले कवीराज केंद्रीय मंत्री ! त्यांच्या कडे काय लक्ष देताय? ते चालले होते ट्रम्प साहेबाना भेटायला "री"पब्लिकन पार्टी निवडून आली अमेरिकेत म्हणून व्यक्तीश: अभिनंदन करायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/02/2019 - 09:12 नवीन
समजा , तसे झाले सिद्ध , मग काय करायचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 01/02/2019 - 10:29 नवीन
आपण लगेच फुसकुली सोडून द्यायची की स्तुपांच्या खाली गुरुद्वारा होते. आणि जो पुरावे मागेल त्यालाच परत विचारायचे
समजा , तसे झाले सिद्ध , मग काय करायचे ?
हाय काय अन नाय काय पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
न
नाखु Wed, 01/02/2019 - 13:55 नवीन
उत्खनन!!
स्तुपांच्या खाली गुरुद्वारा होते. आणि जो पुरावे मागेल त्यालाच परत विचारायचे समजा , तसे झाले सिद्ध , मग काय करायचे
गुरुद्वारा खाली कबरी होत्या,आणि कबरींच्या खाली शिवलिंग,त्या शिवलिंगाच्या खाली पवित्र क्रॉस आणि क्रॉसचे खाली पवित्र केस,आणि केसांच्या डबीखाली त्रिशूळ (डमरू सहित) होते. आणि जो पुरावे मागेल त्यालाच परत विचारायचे समजा , तसे झाले सिद्ध , मग काय करायचे ? पुराव्यानिशी साबित झालेल्या मिपाकर मांदियाळीतील वारकरी वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
त
तेजस आठवले Wed, 01/02/2019 - 14:13 नवीन
आणि ह्या सगळ्यांखाली एका हातात घड्याळासदृश वस्तू आणि दुसऱ्या हातात कमळ, तिसऱ्या हातात निळ्या रंगाचे काहीतरी आणि चौथा हात नुसताच पाची बोटे जोडलेला आणि पायाखाली वाघ अशी एक प्राचीन मूर्ती सापडल्यास काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सुबोध खरे Wed, 01/02/2019 - 14:39 नवीन
समजा , तसे झाले सिद्ध , तुम्ही "सिद्ध "करून दाखवा बरं . नुसत्या फुसकुल्या सोडताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ग
गब्रिएल Wed, 01/02/2019 - 08:54 नवीन
थापा माराय्ला पुरावा लागत नाय आनी आक्कलबी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ट
ट्रम्प Wed, 01/02/2019 - 12:22 नवीन
फूटाणे खायचे कमी करा राव !!! अशा फेक प्रतिसादा मुळे तुमची गांभीर्यपूर्ण प्रतिमा खुजी होईल !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ट
ट्रम्प Wed, 01/02/2019 - 12:24 नवीन
किमान एक तरी उदाहरण द्या हो फुटाणे मास्टर =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ड
डँबिस००७ Wed, 01/02/2019 - 10:24 नवीन
ट्रम्प मुस्लिमसमाजाला माहित असूनही ते कर्मठ असल्या मुळे वाद घालत बसले आहेत . खरी परीस्थिती वेगळी आहे. कारण मु स्लिम समाजाला हे माहीती होत की ईथे राम मंदिर होत आणि ही जागा रामजन्म भुमीला द्यावी लागेल. १९७० च्या दरम्यान मुस्लिम वफ्त बोर्डाच्या मुख्य अधिकार्यांनी जवळ जवळ हे नक्की केल होत की ते भारत सरकारला आपली भुमिका सांगणार होते. त्यांच्या मते बाबरी मस्जिद ची जागा सरकार तर्फे राम मंदिराला देण्यात यावी. पण त्याच वेळेला भारतातले एरवी निधर्मी असल्याचे ढोंग करणारे डावे विचारवंत ईरफान हबिब यांनी मुस्लिम वफ्त बोर्डाच्या मुख्य अधिकार्यांचे कान भरले व सांगीतले की हिंदुना ही जमिन द्यायची काही ही गरज नाही. ही माहीती के के मोहम्म्द (आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ ईंडीया चे चीफ ) यांनी सांगीत ली. के के मोहम्म्द हे तेच ज्याम्नी बाबरी मस्जिदच्या खाली हिंदु मंदिर असल्याची माहीती सु कोर्टाला दिली होती. के के मोहम्म्द ह्यांच्या पुर्वी बीके लाल हे आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ ईंडीया चे चीफ होते. त्यांनी सरकारच्या निर्देशावर बाबरी मस्जिदच्या खाली हिंदु मंदिर असल्या चा निर्वाळा दिलेला होता. पण ते हिंदु असल्याने डाव्यांना ते पचले नाही म्हणुन त्यांच्या नंतर के के मोहम्म्द यांना कामाला लावल. हिंदु धर्माच ह्या डाव्यांनी ईतक नुकसान केल आहे ईतक ईतर कोणीही केलल नाही. पण त्याच बरोबर के के मोहम्म्द सारखे लोकही ह्या देशात आहेत. एक मुसल मान असुन सुद्धा ते ईतके अस्खलिखित संस्कृत श्लोक बोलतात की लोकांनी तोंडात बोटे घालावी. https://www.youtube.com/watch?v=57wklQCTd-Q केके मोहम्मद यांची मुलाखत https://www.youtube.com/watch?v=WzgR7yTQNzY राममंदिर केस वर खुप मेहनत करुन माहिती मिळवलेल्या श्रीमती जैन ह्यांची मुलाखत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Wed, 01/02/2019 - 12:31 नवीन
बरोबर आहे . हिंदू धर्माचे अतोनात नुकसान झालेच पण मुस्लिमसमाजाची विश्वासहर्ता सुद्धा लयाला गेली . मुस्लिमसमाज वक्फ बोर्डा विरोधात जावून राम जन्मभूमि हिंदुना प्रेमाने देतील याची बिलकुल आशा नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/02/2019 - 09:34 नवीन
अलाहाबादमध्ये ५ जानेवारीपासून कुंभमेळा सुरू होत असून आताच या महासोहळ्याचे पडघम वाजू लागले आहेत. प्रचंड भव्य अशा तात्पुरत्या वसाहतींसह सोयीसुविधा उभारल्या जात असून बॉलीवूडमधल्या चित्रपटाचा भव्य सेट उभारला जातो की काय असं वातावरण आहे. इथं गंगा नदीपासून अवघ्या १०० मीटरवर पन्नास एकरांमध्ये १००० भव्य लक्झरी व्हिलाजही उभारण्यात येत असून त्यांच्या उभारणीसाठी बॉलीवूडमधले आर्ट डायरेक्ट ज्यांनी संजय लीला भन्साळीसाठी काम केलं आहे असे अनंत बाबुराव शिंदे काम करत आहेत. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार तीन प्रकारचे लक्झरी व्हिला किंवा तंबू याठिकाणी असून सगळ्यात महागडा तंबू ३५,००० रुपये प्रति रात्र या दराचा आहे. तर डिलक्स व लक्झरी अशा उर्वरीत प्रकारांसाठी प्रति रात्र अनुक्रमे १३,००० रुपये व १८,००० रुपये आकारण्यात येत आहेत. या एकूण व्हिलांपैकी ८० टक्के तंबू आधीच बुक झाल्याचे हितकरी प्रॉडक्शनच्या सत्येंद्र कुमार यांनी सांगितलं. प्रत्येक व्हिला ९०० चौरस फुटांचा असून दोन बेडरूम्सनी सज्ज आहे. तसेच टिव्ही, सोफा आदी सुविधाही देण्यात येणार आहे. लक्झरी व्हिला बुक करणाऱ्यांमध्ये ३० टक्के अनिवासी भारतीय आहेत
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 01/02/2019 - 14:31 नवीन
काळीमाऊ, हे कुंभमेळ्याचं सरळसरळ व्यापारीकरण आहे. हजयात्रेचंही अगदी असंच व्यापारीकरण झालेलं आहे. मक्केत महमंद पैगम्बरांशी निगडीत प्राचीन वास्तू भुईसपाट केली गेली. तिथेही असेच वातानुकुलित तंबू लावले जातात. जरा गुगालल्यावर दोन लेख सापडले : https://www.independent.co.uk/news/world/middle-east/mecca-for-the-rich-islams-holiest-site-turning-into-vegas-2360114.html https://www.independent.co.uk/voices/hajj-saudi-arabia-mecca-pilgrimage-commercialisation-riches-reclaim-worship-a7919606.html अर्थ उघड आहे. दोन्हीही ठिकाणी व्यापारीकरण आणणारी शक्ती एकंच आहे. मक्केच्या अनुभवावरून आपण हिंदूंनी शहाणं व्हायला हवं. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
स
सुबोध खरे Wed, 01/02/2019 - 14:36 नवीन
गामा साहेब कुठे त्या मोगाच्या नादाला लागलाय? नुसतं भंपक काड्या टाकणार ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
स्वलिखित Sun, 01/06/2019 - 16:08 नवीन
अलाहाबादमध्ये ५ जानेवारीपासून कुंभमेळा सुरू होत असून आताच या महासोहळ्याचे पडघम वाजू लागले आहेत. प्रचंड भव्य अशा तात्पुरत्या वसाहतींसह सोयीसुविधा उभारल्या जात असून बॉलीवूडमधल्या चित्रपटाचा भव्य सेट उभारला जातो की काय असं वातावरण आहे>>>>>> धन्यवाद बरं का.. अशी अनपेक्षित पणे स्तुती सुमने उदळल्याबद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 01/02/2019 - 13:33 नवीन
राफेल प्रकरणातील एक ऑडियो क्लिप काल काँग्रेसने मिडियाला ऐकवली. https://www.youtube.com/watch?v=A73advKAjn8 मंत्री विश्वजीत राणे एका व्यक्तीला फोनवर सांगतात- "मनोहर परीकरांकडे राफेल प्रकरणाच्या सर्व फाईल्स आहेत असे स्वतः पर्रेकर म्हणाले आहेत" पडलेले प्रश्न- ही ऑडियो क्लिप खरी की खोटी ? काँग्रेसने काही पत्ते आपल्या हातात ठेवले आहेत. म्हणजे दुसर्या व्यक्तीचे नाव प्रसिद्ध केलेले नाही. दुसरे म्हणजे नुसत्या फाईल्स आहेत ह्यावरून काय सिद्ध होते?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 01/02/2019 - 14:35 नवीन
एवढे मोठे दिग्गज वकील काँग्रेसकडे आहेत (कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, पी चिदंबरम, के टी तुलसी ) तर या सर्व "फडतूस फुसकुल्या" सर्वोच्च न्यायालयात का नेल्या नाहीत? त्यांना माहिती आहे कि या फडतूस गोष्टी सत्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत. इथे मिपावर लोक अशा भंपक गोष्टी वर काथ्याकूट करत आहेत. नुसता भंपकपणा आणि हवेत वायबार काढणं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 01/02/2019 - 15:08 नवीन
सुबोधा, अशा 'फडतुस फुसकुल्या' सगळेच पक्ष सोडतात. सहा महिन्यांपुर्वी भाजपाने मायवतींवद्दल अशीच कथित भ्रष्टाचाराची सी.डी. दाखवली होती- https://www.indiatvnews.com/politics/national/bjp-releases-cd-on-alleged-scams-during-mayawati-039-s-rule-3078.html २००५ मधील संघाचे गुजरात्मधील नेते संजय जोशी ह्यांची 'सेक्स सी.डी.' कोणाच्या आदेशावरून बनवली गेली होती हे सर्वश्रुत आहे. https://www.rediff.com/news/2005/dec/28bjpspec.htm हल्लीच्या राजकारणात हे चालायचेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 01/02/2019 - 15:55 नवीन
माई या दोन्ही फालतू प्रकरणात मामला सर्वोच्च न्यायालयात गेलेला नव्हता आणि त्यातील सत्य असत्यतेचा देशाच्या संरक्षणाच्या गंभीर प्रश्नाशी कोणताही संबंध नव्हता. आता हे रफालच्या भ्रष्टाचाराचे गुऱ्हाळ चालू ठेवण्यामुळे पुढच्या ९० किंवा ११८ किंवा १५३ ( १२६नंतर अधिक ६३ विमाने घेण्याचा पर्याय खुला होता) विमाने घेण्याच्या निर्णयावर थंड पाणी ओतले गेले आहे. कोणताही बाबू किंवा राजकारणी आता निवडणूक होईस्तोवर याला हात घालणार नाही. मुळात २००२ पासून वायुसेनेने मागणी केलेल्या लढाऊ विमानांची प्रक्रिया २००७ साली चालू झाली होती ती ७ वर्षात काँग्रेसला पूर्ण करता आली नव्हती. मग आता नवीन सरकार ती पूर्ण करते आहे आणि त्याचा राजकीय फायदा मिळतो आहे हे पाहून हे सर्व काँग्रेसने रचलेले कुभांड आहे. त्यात एकही गोष्ट त्यांना सिद्ध करता आली नाही. पण या ३६ विमानांनंतरची मागणी पूर्ण होण्यासाठी अजून उशीर होतो आहे याचे त्यांना काहीही घेणे देणे नाही. तेंव्हा त्या दोन फालतू गोष्टी आणि रफाल कंत्राट यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/02/2019 - 16:11 नवीन
डॉक्टरसाहेब, दगडफेक करून पळून जाणार्‍या आणि त्यामध्ये आपण किती चलाख आहोत असे समजून स्वतःवरच खूष होण्यार्‍या जमातीला अनुल्लेखाने मारणेच योग्य ठरेल. कारण, खोटे किंवा मुद्दाम विकृत केलेले सत्य बोलण्याचा धडा आता त्यांचे सर्वोच्च मालकच त्यांना देत आहेत. अश्यांना प्रतिसाद देणे म्हणजे उगाचच त्यांचे नसलेले महत्व वाढविण्यासारखे होते आहे. सुज्ञ वाचक त्यांचे लेखन वाचून त्यांची (नसलेली) किंमत ओळखून आहेतच. (हल्ली सूज्ञ वाचक त्यांचे नाव पाहिल्यावर वाचण्याचा त्रासही घेत नसतील हीच जास्त शक्यता आहे.) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 01/02/2019 - 15:09 नवीन
युवराज काल काय म्हणत होते https://www.rediff.com/news/report/modi-changed-rafale-contract-while-prrikar-was-buying-fish-rahul/20180226.htm "The defence minister was in Goa buying fish from a fish shop ... he did not even know that Modiji had changed the contract of the Rafale deal," Rahul alleged. आणि आज काय म्हणताहेत The Congress claimed that Manohar Parrikar had said at a meeting of the Goa cabinet that no one could remove him as "all the Rafale papers are in my flat, in my bedroom". https://www.ndtv.com/india-news/manohar-parrikar-and-rafale-deal-congress-asks-whats-the-rafale-secret-hidden-in-manohar-parrikar-s-1971340 कुठेतरी काही ताळमेळ हवा कि नाही? सगळा सावळा गोंधळ. पण मी जे "म्हणाले" तेच "खरं" बाकी सर्व मूर्ख
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Wed, 01/02/2019 - 15:52 नवीन
राम मंदिराबद्दल ची माझी भूमिका - एखादी गोष्ट जी स्वतःची आहे ती भीक मागून घेण्याची वेळ भारतातील हिंदूंची यावी ही खूप मोठी शोकांतिका आहे. " स्वतः ची " हा शब्द मी एवढ्यासाठी वापरला कारण हिंदू तसेच इतर धर्मियांच्या धर्मस्थळांवर हल्ला करून ती जमीनदोस्त करून तिथे मस्जिद उभारण्याचे धर्मकार्य हे जवळपास प्रत्येक इस्लामी राजवटी मध्ये झाले आहे. त्यामुळे अयोध्या च नव्हे तर भारतातील शेकडो किंबहुना हजारो ठिकाणी अश्याच पद्धतीने नवीन संस्कृती जबरदस्तीने लादण्यात आली आहे. आता प्रत्येक मशिद पाडून खाली काय होते ते पाहत बसायला पाहिजे असं मला म्हणायचं नाही पण सत्य मान्य करून बाबर ने आक्रमक आणि असहिष्णू पणे उभी केलेली इन मीन 400-500 वर्ष्यापुर्वीची मशिद आणि जागा भारतातील मुस्लिम लोकांनी सहिष्णू पणा दाखवून स्वतः हुन हिंदू मंदिरासाठी द्यायला हवी होती. इस्लाम जेव्हा अगदी पहिल्या टप्प्यात होता त्यावेळी केरळ मध्ये एका हिंदू (कि बौद्ध? प्लीज करेक्ट मी इफ रॉंग ) राजा ने मशिदी साठी जमीन दिली होती. तीच भारतातील पहिली मस्जिद. अश्या प्रकारची सहिष्णू वृत्ती एकीकडे आणि या लोकांची अत्याचारी आणि जबरदस्ती ची अतेरिकी वृत्ती एकीकडे. इतके सगळे खाच खळगे खाऊन सुद्धा हिंदू समाज अजून देखील बहुसंख्य आहे तरीही इतर धर्मीय (फक्त मुस्लिम नाही ) लोकांच्या भावना आणि त्यांच्या संस्कृती बद्दल खूप सहिष्णू आहे. पण एक दिवस हिंदूंची ही अति -सहिष्णू वृत्ती त्यांचे स्वतःचे अस्तित्व संपवेल. ज्या प्रमाणे पर्शिया चा इराण झाला त्याच प्रमाणे या देशाचे च दुसऱ्या कशात तरी रूपांतर होईल. भारताचे शेजारी राष्ट्र मालदीव चा देखील इतिहास वाचू शकता. स्लो पॉयझनिंग चा प्रकार चालू आहे. आणि त्याला सर्वाला तथाकथित फेक्युलर आणि डाव्या विचार सरणीतील लोकांचा खूप मोठा हातभार आहे. नाहीतर कोण्या सोम्या गोम्याने 15 मिनिटात 80% लोकांना संपवण्याची भाषा केली नसती. माझा प्रतिसाद अगदी टोकाचा किंवा अतिरंजित वाटेल कदाचित पण ज्या पद्धतीने घडामोडी चालू आहेत त्यावरून आज तरी असेच वाटतेय..
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Wed, 01/02/2019 - 16:12 नवीन
आपल्या प्रतिसादाला counter argument करणे अवघड आहे. इतिहास पहाता असं झालंय खरं हिंदूंचे नुकसान अहिंदू पेक्षा हिंदू लोकांनीच जास्त केले. धर्म (संस्कृती म्हणा हवेतर) जेव्हा जेव्हा लयाला जात आहे असे वाटते तेव्हा कुणी ना कुणी जन्म घेऊन हिंदू संस्कृतीचे रक्षण केले मग ते आद्य शंकराचार्य असो की शिवाजी महाराज , राणा प्रताप वगैरे असो. पण आता असं कुणी येऊन आपली सहिष्णु संस्कृती टिकवेल अशी भाबडी अपेक्षा न करणेच योग्य . रच्याकने एक प्रश्न पडतो की डावे विचारवंत हे बव्हंशी हिंदूद्वेष्टेच का बरं असतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 01/03/2019 - 04:56 नवीन
अगदी सत्य परिस्थिती बोललात. पण इथे कोणाला पडलीये. देश पूर्ण धर्मांतरित झाला तरी आपल्याला काय फरक पडणार आहे अश्या मनोवृत्तीची लोक बहुसंख्य आहेत. मला काय आत्ता फायदा हे महत्वाचं! त्यातून शिक्षणाचे पण इस्लामीकरण झाल्याने नवीन पिढीला तर बाबर, अकबर, जहांगीर, औरंगझेब, तैमूर ईई यांच्याबद्दल भरपूर माहिती आहे पण ५ हिंदू राजांची नाव सांगा म्हणलं तर सांगता येणार नाहीत. नशिबाने शिवाजी महाराजांना अजून टाकाऊ ठरवलं नाहीये, नाहीतर संभाजी महाराज कवीच्या मागे लागलेले आणि बाजीराव स्त्रीलंपट म्हणून प्रसिद्ध झालेलेच आहेत. अजून काही वर्षाने शिवाजी महाराज कपटी होते आणि त्यांनी बिचाऱ्या औरंगजेबाला उगाच सळो की पळो करून सोडलं होतं असं शाळेत शिकवलं जाईल. कालांतराने समस्त हिंदू राजे काफीर म्हणून निंदनीय आहेत असं शाळेतच शिकवलं जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
R
Rajesh188 Wed, 01/23/2019 - 07:42 नवीन
सर्वच देशात काही प्रश्न न सोडवण्यात च जास्त फायदा राजकारणी लोकांचं असतो . काश्मीर प्रश्न सुटणे हे दोन्ही देशातील राजकारणी लोकांच्या हिताचा नाही ह्याची त्यांना जाणीव आहे . राम मंदिराचा प्रश्न न सुटणे हे देशातील दोन्ही धर्माचं राजकारण करणाऱ्या लोकांच्या हिताचं आहे प्रश्न जर सुटला तर बेकारी येईल . गरीबी ,शेतकऱ्यांचे प्रश्न हे सर्व प्रश्न सोडवायचा कोणाचीच इच्या नसते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
ग
गब्रिएल Wed, 01/02/2019 - 16:02 नवीन
तिकडं लोकसबेत युव्राज फुसकुल्या सोड्तात आनि तुमचा पुरावा ऑथेंटिकेट करा म्हनलं की पाय लाऊन पळत्यात. मंग त्येंच्या बालपनापासून त्येंचे पाय धरून बस्लेले मोगाभायसारखे हुजरे त्येंच्यासार्केच फुसकुल्या सोडनार नाय बेचारे तर बाकी काय कर्नार म्हना? न्येता तसा च्येला. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 01/02/2019 - 16:15 नवीन
बाप्पू , अगदी मनातले बोललात !! पण प्रोब्लेम असा आहे की राममंदिरा बद्दल जितक्या ज्वलंत भावना ब्राह्मण , क्षत्रिय आणि वैश्य च्या आहेत त्याच्या अगदी उलट दलितांच्या आहेत . दलित समाजातील नेते डाव्या विचारसरणी च्या लोकासारखे रामजन्म भुमीच्या ठिकाणी सुपर स्पेशल हॉस्पिटल , कॉलेज व्हावेसे वाटत . बर डावे आणि दलित नेते जन्माने हिंदुच असतात पण उच्च शिक्षणामुळे त्यांना रामजन्म भूमी च्या बाजूने बोलायला लाज वाटत असेल .
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/02/2019 - 17:41 नवीन
त्या काळात सर्वाना देवळात प्रवेश नव्हता , कदाचित म्हणूनच त्या काळात त्या वास्तू परकीयांनी सुलभतेने पाडल्या असणार , कारण समाजाचा तो भाग अलिप्त राहिला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ड
डँबिस००७ Wed, 01/02/2019 - 16:43 नवीन
Accidental Prime Minister च्या पाठोपाठ आता Tashkent Files नावाचा नविन सिनेमा येऊ घातलाय. लाल बहादुर शास्त्री यांच्या ताश्कंद मधल्या रहस्यमय मृत्युवर हा सिनेमा बेतलेला आहे. पल्लवी जोशी, नसरुद्दीन शहा, मिथुन चक्रवर्ती सारख्या कलाकारां बरोबर बनवलेल्या ह्या सिनेमा मुळे काँग्रेस च्या पाया खालची जमिन सरकल्या शिवाय रहाणार नाही. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ह्या सिनेमा रिलिज होणार आहे.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/02/2019 - 17:38 नवीन
नेताजींच्या फाईलबाबतही असेच बोलत होते , काय झाले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
स
सुबोध खरे गुरुवार, 01/03/2019 - 05:02 नवीन
कोण बोलत होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/23/2019 - 09:01 नवीन
नेताजींवर गुमनामी म्हणून सिनेमा येतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बाप्पू गुरुवार, 01/03/2019 - 08:36 नवीन
@ ट्रेड मार्क तुमचा मुद्दा बरोबर आहे. सध्याच्या घडीला सर्वाना बाबर, हुमायू, औरंग झेब यांच्याबद्दल सर्व माहिती आहे पण कित्येक लोकांना शिवाजी महाराज कोण होते ते माहिती नाही. या निमित्ताने एक प्रसंग सांगतो. एकदा मी कॉम्पुटर च्या वॉलपेपर ला शिवाजी महाराजांचे वॉलपेपर लावले होते. माझ्या शेजारी एक उडिया (ओडिसा मधला )कलीग होता. त्याने विचारले शिवाजी महाराज कौन से भगवान के अवतार है??? च्या मायाला म्हणजे त्याला शिवाजी नावाचा कोणी राजा होता हेच माहिती नाही... आता ही परिस्तिथी का आली? याचे कारण हिंदूंच्या अति सहिष्णू पणा मध्ये दडलेले आहे. कारण आपण जो इतिहास नावाचा विषय शिकतो त्यामध्ये आपली नेमकी आयडेंटिटी काय आहे किंवा आपण कोणत्या संस्कृती चे पाईक आहोत हे सांगितले जात नाही. समाजातील संभाव्य तेढ रोखण्यासाठी किंवा एखाद्या समाजाला खुश ठेवण्यासाठी इतिहासातील ठराविक गोष्ट उचलून तेच सर्व काही आहे असे भासवण्यात येते. त्यामुळेच बाबर औरंगझेब अशी कॅरॅक्टर एका हिरो प्रमाणे डोक्यात भरवण्यात आली पण पृथ्वीराज चौहान, शिवाजी, बाजीराव यांना सोयीस्कर रित्या दुर्लक्षित ठेवले किंवा त्याच्यावर वादविवाद वाढवले गेले. याला हिंदू लोक सुद्धा तितकेच जबाबदार आहेत कारण फक्त एक - नजीकच्या काळातील फायदा बघण्याची वृत्ती किंवा सर्व माहित असून फक्त सहिष्णू पणा दाखवण्यासाठी सोयीस्कर रित्या केलेले दुर्लक्ष. @ट्रम्प दलित सुशिक्षित लोकांचा प्रॉब्लेम हा आहे कि त्यांना हिंदू म्हणून जन्माला आल्याची लाज वाटते ( सरसकटीकरण करत नाहीये. पण ही टक्केवारी मोठी आहे. ) हिंदू धर्मातील काही चुकीच्या परंपरानां विरोध करता करता आपण संपूर्ण हिंदू धर्म आणि संस्कृती लाच कधीपासून विरोध करायला लागलो हे त्यांचे त्यांना समजेना. आणि हे करायला भाग पडणारे त्यांचे म्होरके आणि डाव्या विचारसारनी ची लोक आहेत. हे सर्व मते, पैसा, आणि राजकारण यासाठी होतेय पण याचे लॉन्ग टर्म इफेक्ट काय होतील याचा विचार आजघडीला कोणीच करत नाहीये. फक्त मतपेटीच्या राजकारणासाठी हे लोक आज अवेसी आणि इतर जहाल मुस्लिम संघटना यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. यामध्ये दुर्दैवाने प्रकाश आंबेडकर जे कि बाबासाहेब आंबेडकरांचा वंशज म्हणवतात ते सर्वात पुढे आहेत. कदाचित त्यांनी बाबासाहेंबाचे मुस्लिम धर्मा बद्दल चे विचार आणि लेखन आणि दलित- मुस्लिम संबंध यावरचं भाष्य कधीच समजून घेतले नाही. किंवा फक्त राजकारण करून आपले उपद्रव मूल्य वाढवण्याचा हेतू दिसतो. @काळे मांजर आपले म्हणणे म्हणजे काहींच्या काही तर्क आहे. एखाद्या धर्मस्थळावर हल्ला करून तोडफोड करून त्यावर मस्जिद उभी करणे ही मुस्लिम राजवटी मध्ये अगदी सामान्य गोष्ट आहे. किंबहुना ते धर्मकार्य आहे. आणि हे फक्त इतिहासातच झाले असे नाही. अगदी आजकाल सुद्धा या घटना होतात. जिथे मुस्लिम बहुसंख्य आहेत तिथे तर ही अगदी कॉमन गोष्ट आहे. पाकिस्तानातील किंवा बांग्लादेशातली दिवसागणिक कमी होणारी इतर धर्मियांची धर्मस्थळ संख्या काय सूचित करते? अगदी काही वर्षा पूर्वी झालेले बिहार बौद्ध स्थळी झालेले हल्ले किंवा अफगाणिस्तान मध्ये 2001 साली फोडण्यात आलेली जवळपास 1500 वर्ष्यापुर्वीची बौद्ध मूर्ती अशी हजारो उदाहरणं जगाच्या इतिहासात आहेत. एखाद्या ठिकाणी मस्जिद उभारणे या गोष्टी ला विरोध नाहीये पण दुसऱ्या धार्मिक स्थळांवर हल्ला करून जमीनदोस्त करणे व त्याठिकाणी मशिद उभी करणे या असुरी प्रवृत्ती ला माझा विरोध आहे. परंतु इस्लाम मध्ये हेच कार्य पवित्र समजले जाते. बहुतांश भारतीय मुस्लिम देखील हेच पवित्र कार्य समजून असे करणाऱ्या व्यक्तींना आदर्श मानतात म्हणून तर बाबर, औरंगझेब, तैमूर इ बाबत त्यांना आपुलकी वाटते. आणि नेमक्या अश्याच धर्मवेड्या समाजाची मते मिळवण्यासाठी डावे आणि तथाकथित सेकुलर लोक हे आपले राजकारण चालू ठेवतात. बराचसा हिंदू समाज देखील सहिष्णू पणा व सर्व धर्म समभाव अश्या गोंडस नावाखाली अश्या लोकांना सपोर्ट करतो. किंवा आपल्याला काय करायचेय म्हणून दुर्लक्ष करतो. पण मी आधी म्हणल्याप्रमाणे हा स्लो पॉयझनिंग चा प्रकार आहे आणि या अतिसहिष्णू पणाचे दुष्परिणाम काही वर्षानंतर प्रकर्षाने जाणवतील आणि ते इर्रीवर्सिबल असतील.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/03/2019 - 16:07 नवीन
हजारो शीख बांधवांची अमानुषपणे हत्या करणाऱ्या आणि दंगलीतील आरोपींना मुख्यमंत्रिपदाची बक्षिसी देणाऱ्यांपासून केवळ पंजाबच नाही तर संपूर्ण देशवासीयांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर निशाणा साधला. ------------ गुजरात दंगलीत ह्यांच्या भाजपाचे व सम्बमधीत संघटनांचे लोक होते ना ? काँग्रेसपासून सावध रहा म्हणे, कितीतरी काँग्रेसवाले भाजपात घेतले , भ्रष्टयाचाराचे आरोप केले , पण एकही आत गेला नाही, मग का सावध रहायचे , हे म्हणतात म्हणून ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 01/03/2019 - 16:22 नवीन
सज्जन कुमार यांच्यावर आरोप सिद्ध होऊन त्यांना शिक्षा झाली आहे. गुजरात दंगलीत असे कोणत्या बड्या नेत्याचे झालेले नाही. फरक समजून घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/03/2019 - 16:57 नवीन
पण मोदींचे काँग्रेसबद्दलचे मत फारच बदलले आहे, हे महत्वाचे. 4 वर्षे बोलत होते - काँग्रेसमुक्त भारत, आता चार महिने बोलतील - काँग्रेसपासून सावध रहा. म्हणजे मोदिंच्या शापाने काँग्रेस मरत नाही, ह्याची मोदीना खात्री पटलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/04/2019 - 03:22 नवीन
फरक तुम्हीच समजून घ्या, शीख दंगलीबद्दल शिक्षा झाली , गुजरात दंगलीत भाजपाच्या लोकांना कोर्टाने आधी शिक्षा दिली, नन्तर आता त्यांना सोडून दिले , मग गुजरात दंगल भुतांनी घडवली होती की काय ? काँग्रेसच्याच काळात कसाब , अफझलला शिक्षा मिळाली, भाजपाच्या सरकारात सलमान ,2 जी आणि आता तेलगीवाले उर्वरित लोक सुटले . तेलगीचे बाइज्जत बरी सरटफिकेट कुरियरने स्वर्गास पाठवणार असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 01/04/2019 - 05:18 नवीन
गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेस मधील ५९ लोकांनी आत्महत्या केली होती का? तेलगीला AIDS सरकारने दिला का? बनावट स्टॅम्प पेपर आपोआप प्रेसमधून बाहेर आले का? काँग्रेने ६० वर्षे सत्ता उपभोगली त्यात कसाब आणि अफझलला शिक्षा झाली यात कोणते शौर्य? काळविटाने आत्महत्या का केली? सलमान ,2 जी आणि आता तेलगीवाले या केसची "काँग्रेसच्या काळातच" पोलीस/ सी बी आय तपासणी झाली. ती अशी ढिसाळ कशी झाली, किती राजकारणी (शरद पवार पासून इतर सर्व) त्यातून कसे आणि का सुटले? त्यांची नार्को टेस्ट का घेतली गेली नाही? उगाच काड्या टाकण्यापेक्षा याची उत्तरे द्या पाहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/03/2019 - 17:09 नवीन
छान Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 01/03/2019 - 17:11 नवीन
काही लोक संध्याकाळ नंतर उडत असतात ! पण काळा बोका रात्रंदिवस हवेत असतो !! रा गा च्या अमृृृत तुल्यचा परीणाम दिसतोय !!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/03/2019 - 18:09 नवीन
SC asks Ahmed Patel to face trial on plea by rival BJP candidate over Rajya Sabha election बापरे, आता सर्वोच्च न्यायालयाच्या सद्य मुख्य न्यायाधिशांविरुद्धही महाअभियोगाची तयारी होणार की काय ?! ;) :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा