चालू घडामोडी - जानेवारी २०१९
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका
“राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती.
पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.”
मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का?
संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का?
नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.
तुमची डिग्री संस्कृतात घेतली की इंग्रजीतअश्या असंबंध टीप्पणीमुळे सभ्यतेने वादविवाद करण्याची तुमची क्षमता (परत एकदा) उघड झाली आहे. बेताल वक्तव्ये करून तोंडावर आपटल्यानंतर, स्वतःवरचा ताबा सुटून, काहींची अशी अवस्था (वारंवार) होते. तेव्हा, उगी उगी ! =)) =)) =)) *************** अवांतर : आता विषय काढलाच म्हणूनच केवळ सांगत आहे की, माझ्या एका कर्मभूमीत अनेक गोरे माझे कनिष्ठ म्हणून काम करत होते. सर्वसाधारण गोर्यात विशेष फार मोठी विचारक्षमता आहे असे मला दिसले नाही. मात्र, कातडी गोरी आहे म्हणून त्यांच्यासमोर (शारिरिक व मानसिकरित्या) सतत वाकून राहणारे अनेक भारतिय होते व त्याचा ते पुरेपूर फायदा उठवत असत, हे पाहून सकारण दु:ख होत असे. भारतातही अजून असे लोक आहेत, हे सिद्ध करणारे प्रतिसाद वाचून काय वाटते, हे तुम्हाला सांगून समजणार नाही आणि ते तुम्हाला सांगण्यात अर्थही नाही. :( तेव्हा, मोठे व्हा!