चालू घडामोडी - जानेवारी २०१९
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका
“राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती.
पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.”
मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का?
संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का?
नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.
💬 प्रतिसाद
(616)
ड
डँबिस००७
Sat, 01/26/2019 - 04:08
नवीन
वाकुल्या दाखवणारी काळी मांजर आवडते ब्वा आपल्याला
जरा जपुन रहा हो , वेगवेगळी रुपे घेणारा मारिच राक्षस आहे तो ! कधी शेळी तर कधी रैडा बनुन समोर येतो !!
मिपावर त्याचे अवतार कार्य संपवण्याच काम संपादक मंडळी करत असतात !
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 01/25/2019 - 20:50
नवीन
काळीमाऊ,
हेहेहे, येडी गं येडी माझी काळीमनी!! बारामुल्ला हे वराहमूलम् वरनं पडलंय.
तु.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 01/26/2019 - 13:25
नवीन
The Man Who Predicted 2014 Indian Election Reveals Who Will Take The Throne In 2019
२०१४ पासून भारत आणि अमेरिकेतील निवडणुकांचे निकालांचे सतत यशस्वी अंदाज वर्तविणार्या व्यक्तीचा २०१९ च्या निवडणूकीचा अंदाज. त्याच्या विश्लेषणामागची कारणे समजाऊन घेण्यासाठी सर्व लेख मुळापासूनच वाचण्याची गरज आहे, म्हणून त्या उत्सुकतेला मारक अधिक मजकूर इथे देण्याचा मोह आवरला आहे.
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
Tue, 01/29/2019 - 01:30
नवीन
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
Tue, 01/29/2019 - 01:31
नवीन
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 01/29/2019 - 13:04
नवीन
ह्या साहेबांबद्दल काही वेगळेच वाचायला मिळाले.
हा तर भाजपचा चाटू भक्त दिसतोय.
https://www.altnews.in/a-peek-into-the-online-world-of-gaurav-pradhan-a-compilation-of-misinformation/
====
The World will be Ruled by Nationalists
ह्या "Ruled" शब्दा मुळे भारतीय लोकांचा मूड चन्ज हाऊ शकतो.
त्या ऐवजी Governed शब्द योग्य वाटला असता का?
===
बाकी डिसेंबर मधे झालेल्या 5 राज्यातील निकलांबद्दल त्यांचे काय मत होते, हे समजेल का?
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
Tue, 01/29/2019 - 18:59
नवीन
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
Tue, 01/29/2019 - 19:00
नवीन
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 01/26/2019 - 13:45
नवीन
70th Republic Day: 7 Abu Dhabi buildings to be lit in Indian tricolour
भारताचे आंतरराष्ट्रिय पटलावर लक्षणियरित्या वाढलेले महत्व, विचारअंधत्व आलेल्या लोकांना दिसत नाही, त्याला इलाज नाही. पण ते अश्या व इतर अनेक प्रकारच्या रितींनी जगभर सतत व्यक्त होत असते. :)
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 01/26/2019 - 15:46
नवीन
Brightest star in South Asia: India to grow at 7.6%, says United Nations; Pakistan to slip
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते, सन २०१९ मध्ये, दक्षिण आशियात ७.६% दराने भारत आर्थिक आघाडी सांभाळेल. (पाकिस्तानची अर्थव्यवस्था खालावर चालली आहे, हे काही फार मोठं गुपित नाही.)
अर्थात या वरच्या दोन्ही अंदाजांमुळे मोदीविरोधकांचा पोटशूळ वाढेल, हे सुद्धा काही फार मोठं गुपित नाही. :) ;)
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 01/26/2019 - 16:39
नवीन
26 जानेवारी कार्यक्रमात मोदी सरकारने राहुल गांधींना पहिल्या रांगेत खुर्ची दिली,
गेल्या कार्यक्रमात 5 व्या रांगेत खुर्ची दिली तेंव्हा भौ तोरसेकरनी लेख लिहिला होता ,
आता पुन्हा लेख लिहितील का ?
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 01/26/2019 - 17:18
नवीन
खरे तर, लोकसभेत अधिकृत विरोधी पक्ष नसण्याइतके संख्याबळ नसले तरी, कॉन्ग्रेस सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याने, सरकारने मोठ्या मनाने दोन्ही वर्षे त्या पक्षाच्या अध्यक्ष्याला पहिल्या रांगेत जागा दिली, हे स्पृहणिय आहे.
त्या वेळेस कॉन्ग्रेस अध्यक्ष असणार्या सोनिया गांधींना पहिल्या रांगेत जागा दिली होती. या वेळेस रागा कॉन्ग्रेसचे अध्यक्ष असल्याने त्यांना पहिली रांग दिली. सिंपल !
गेल्या वेळेस रागा कॉन्ग्रेसचे उपाध्यक्ष होते, तेव्हा त्यांच्यासाठी ५/६वी रांग ठीकच होती. कारण, त्या पदाला राजकिय शिरस्त्यात फारशी किंमत नाही. "केवळ आमच्या पक्षाच्या अध्यक्षाचा मुलगा आहे म्हणून पहिल्या रांगेत बसवा" असे म्हणायला बुरसटलेली, वंशवादी, गुलामी, विचारसरणी अंगात भिनलेली असायला हवी, जी अनेक वंशवादी राजकीय पक्ष आणि त्यांची मिंधी असलेली माध्यमे दाखवतात. :(
Blackcat, सतत चुकीचा चष्मा लावल्यामुळे, मूलभूत राजकिय शिरस्त्यांसंबंधीही, तुम्ही "नकळत विसंगत विनोद" करण्याबाबत जगभर फेमस असलेल्या तुमच्या नेत्याशी स्पर्धा करू लागला आहात. ही प्रगती आहे की वैफल्याने आलेली अगतिकता आहे?... हे तुमचे तुम्ही ठरवा. =)) =)) =))
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Sat, 01/26/2019 - 18:19
नवीन
गुलामी अंतःकरणात ईतकी खोलवर रुजलेली आहे की ईतके पुर्नजन्म झाले तरी जात नाहीय !!
धनगाराकडुन एखाद औषध घ्या !!
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 01/26/2019 - 19:35
नवीन
पण नेटवर खोटे लिहितानाही लोकांना खरे खोटे तपासण्याची गरज वाटत नाही आहे,
राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले , दिसेम्बर 2017 ला, प्रजासत्ताक 2018 , चा कार्यक्रम त्यांनतर होता , म्हणजे तेंव्हा ते काँग्रेसचे अध्यक्षच होते.
जरा नेटवर दोन्ही तारखा तपासून तरी घ्यायच्या,
( बरोबर एक वर्षाने त्याच दिवशी , दिसेम्बर 2018 ला , तीन राज्याचे निकाल आले व काँग्रेस जिंकली )
आम्हाला गुलाम म्हणा , पण तुम्ही चुकीचा इतिहास लिहून कुणाचे दास्यत्व करताय ?
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 01/26/2019 - 19:51
नवीन
प्रजासत्ताक 2018 च्या कार्यक्रमात सोनिया गांधी गेल्याच नव्हत्या , त्यामुळे त्यांना पहिल्या रांगेत बसवायचा प्रश्नच नव्हता .
काँग्रेसचे नूतन अध्यक्ष म्हणून राहुल गांधीच गेले होते व त्यांना सहाव्या रांगेत जागा दिली होती,
त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद 11 दिसेम्बर 2017 ला स्वीकारले, बरोबर 1 वर्षाने 11 दिसेम्बर 2018 ला 3 राज्यांचे निकाल आले व काँग्रेस जिंकली , म्हणून तारीख माझ्या लक्षात आहे .
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 01/27/2019 - 17:26
नवीन
गडबडीत लिहिलेल्या प्रतिसादात एका गोष्टीत थोडिशी सरमिसळ झाली, याबद्दल दिलगीर आहे, पण, तरीही खालील सत्ये सांगणे जरूर आहे...
१. मी मांडलेला, प्रथेसंबंधीचा मूळ मुद्दा, १००% खरा आहे. "कॉन्ग्रेस अध्यक्ष" या कारणाने किंवा वंशपरंपरेने पहिल्या रांगेत बसण्याचा हक्क मिळत नाही. तो हक्क फक्त अधिकृत विरोधी पक्ष नेत्यालाच असतो... आणि सद्या कॉन्ग्रेस पक्ष, केवळ लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे. पण, कॉन्ग्रेसकडे अधिकृत विरोधी पक्ष होण्याइतके संख्याबळ (१०% किंवा ५५ जागा) नाही. पूर्वी आणि आता या संबंधात जे काही महत्व कॉन्ग्रेसला दिले आहे, तो केवळ एनडीएचा भलेपणा/मेहेरबानी आहे."
२. सन २०१८ साली, इतर अनेक विरोधी पक्षांच्या अध्यक्षांच्या बरोबरीचेच असलेल्या रागांना पहिल्या खुर्चीचा हक्क नव्हताच, हे त्यांना व त्यांच्या इतर अनुभवी व धुरंधर नेत्यांना पूर्णपणे माहीत होते. तरीही, त्यांच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे/रणनीतीप्रमाणे, "मला स्वतःला काहीच समस्या नाही (not bothered) असे म्हणत असतानाच, "Congress sources say it is the first time since independence that the party's chief was not assigned a front-row seat." असा बगलबच्च्यांकरवी गळा काढला होताच. म्हणजे, कॉन्ग्रेसला लोकसभेत कितीही कमी जागा मिळाल्या तरी, कॉन्ग्रेसच्या अध्यक्षाला (म्हणजे अर्थातच गांधी कुटुंबाला) जगाच्या अंतापर्यंत पहिल्या रांगेतली खुर्ची मिळालीच पाहिजे, ही सरंजामी मानसिकता त्या म्हणण्यात स्पष्ट होत होतीच. ( https://www.ndtv.com/india-news/not-row-1-or-4-rahul-gandhi-in-row-6-at-r-day-parade-congress-furious-1804982 )
थोडक्यात, आता सन २०१९ मध्ये रागांना दिलेली पहिल्या रांगेतली खुर्चीसुद्धा सरकारचा भलेपणा/मेहेरबानी होती; रागांचा हक्क नव्हता.
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 01/27/2019 - 17:35
नवीन
तुमच्या कोलांट्या उड्या मनमोहक आहेत,
आधी बोलले , सोनियांना जागा दिली होती,
राहुल जागा मागायला गेले ,
म्हणून सहाव्या रांगेत बसवले ,
मग बोलले , ते अधिकृत विरोधी पक्ष अध्यक्ष नव्हते ,
जे दिले ती मेहेरबानी.
असो , तीच काँग्रेस , तेच पद , तोच राहुल , तेच मोदी , तोच दिवस
अन जागा मात्र सहाव्या रांगेतून पहिल्या रांगेत.
तुमचे नवे लॉजिक चालू द्या.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 01/27/2019 - 17:43
नवीन
वरचा प्रतिसाद वाचा मग स्वतःचा हा प्रतिसाद वाचा. मग कोलांट्याउड्या कोण मारतोय ते कळेल... अर्थात ते कळले तरी कबूल करण्याची दानत रागाभक्तांकडे नाही हे सर्वच माध्यमांत दिसत आहेच. बहुतेक, सत्य आणि तर्कशास्त्र म्हटले की बळजबरीने स्वतःची मती कुंठित करण्याची वरून ऑर्डर आहे! तेव्हा चालू द्या. शुभेच्छा !
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Sat, 01/26/2019 - 18:16
नवीन
तोरसकरांनी लेख लिहावा ईतकी राहुल गांधीची लायकी नाही !! मागच्या वेळेला लिहीलेला लेख हा मोदीजींनी निवडणुक न जिंकलेल्या राजकीय परीवाराच्या उत्तराधिकारीला कशी जागा दाखवली त्या बद्दल होता !!
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 01/26/2019 - 19:45
नवीन
आपल्या टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून देशभक्तीचे डोस पाजणारी एस्सेल कंपनी अडचणीत. नोटाबंदीच्या काळात 3 हजार कोटी डिपॉझीट करणाऱ्या कंपनीसोबत एस्सेलचे संबंध असल्याचं समोर आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये एस्सेल ग्रुप कंपन्यांचे शेअर्स धडाधड खाली कोसळले आहेत. ब्लूमबर्ग क्वींटच्या प्राथमिक अंदाजाप्रमाणे भाजपाचे राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा गोयल यांच्या एस्सेल ग्रुपला १४ हजार कोटींचा फटका शेअर बाजारात बसला आहे.
http://www.maxmaharashtra.com/zee-group-shares-crash-on-report-of-money-laundering-post-notes-ban/30558/
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
Sun, 01/27/2019 - 10:35
नवीन
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा आणि वैफल्य यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते.
मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ?
@ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 01/27/2019 - 10:51
नवीन
काळीमाऊ,
अगं माझे मनीमावशे, कैत्रीच कै बोल्तेस गं तू! भाऊ तोरसेकरांचा लेख कशाला पाहिजे त्यासाठी? मी सांगतो एका वाक्यात :
तु.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 01/27/2019 - 12:23
नवीन
http://jagatapahara.blogspot.com/2019/01/blog-post_26.html?m=1
दोन प्रियंका
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Sun, 01/27/2019 - 12:27
नवीन
शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना भारत सरकारने पद्मविभुषण पुरस्काराने गौरविल्याने, कळव्याच्या बिग्रेड जितुद्दीन आव्हाड याच्या तळपायाची आग मस्तकात जाऊन त्याने उभा महाराष्ट्र पेटवण्याची प्रतिज्ञा केली आहे.
--
.. अन् जितेंद्र आव्हाड संतापले; म्हणाले, ‘महाराष्ट्र पेटवणार...’
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 01/27/2019 - 13:12
नवीन
इंद्रियदास आव्हाडच्या अंगात शक्ती किती? ९०+ वय असलेल्या बाबासाहेब पुरंदऱ्यांना धमकावण्याइतकीच. काल शिवाजीमहाराजांच्या लोहगडावर मुस्लिमांनी धुमाकूळ घातला त्यावर आव्हाड काहीही बोलणार नाहीये. जिकडे शिवप्रभू फिरले तिकडे ठिकठिकाणी हागून ठेवलंय. आणि आव्हाड साहेब महाराष्ट्र पेटवायला निघालेत. फार सुंदर व ठळक प्रकारे आव्हाड स्वत:ची लायकी दाखवून देताहेत.
-गा.पै.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 01/28/2019 - 03:50
नवीन
अॅच्युअल जाळपोळ करायचं बोलले नाहित साहेब. तसंही... आपल्याकडे जाळपोळ प्रकारात आता फार काहि नाविन्य राहिलं नाहि :(
- Log in or register to post comments
फ
फारएन्ड
Mon, 01/28/2019 - 15:44
नवीन
ब्रिगेड व त्यांच्या मागाच्या राजकीय नेत्यांनी गेली दहा वर्षे पुरंदर्यांची जी बदनामी केली त्याची भरपाई २०१५ च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारापाठोपाठ या सन्मानानेही होत आहे हे चांगले आहे. धादांत खोटे आरोप गेली अनेक वर्षे सोशल नेटवर्क्स वर ब्रिगेड चे लोक पसरवत आहेत. स्वतःला लिबरल समजणार्या अनेकांचे याबाबतीत बोटचेपे धोरण सुद्धा त्यांच्या फायद्याचे ठरले होते.
पण गेल्या काही वर्षात एका बाजूने बहुजन संघटनांना ब्रिगेड म्हणजे नवी सरंजामी व्यवस्था आहे हे कळून चुकले व ते दूर गेले, तर दुसरीकडून अनेक राजकीय नेतेही दूर होउ लागले. त्यामुळे सध्या एकूण हवा कमी झालेली दिसते. मात्र तेव्हा केलेले आरोप अजूनही सोशल नेटवर्क्स वर अधूनमधून दिसत असतात.
काल एका पेपरच्या बातमीत यामुळे "मराठ्यांना" दुखावले आहे अशी बिनडोक बातमी वाचली. हे म्हणजे नेहरूंना नोबेल दिले तर हिंदू लोकांना दुखावले आहे म्हंटल्यासारखे आहे. ब्रिगेड सोडली इतर कोणालाच याबद्दल आक्षेप दिसत नाही.
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Sun, 01/27/2019 - 17:43
नवीन
अतेरिकी ची केस लढणारा मजीद मेमन , आणि बेवड्या सारखे उलटसुलट बड़बड़ करणारा अव्हाड़ रा कॉ मध्ये आहे म्हणूनच राष्ट्रवादी महाराष्ट्रात बदनाम आहे , नाहीतर गेल्या 10 वर्षात कांग्रेस कुठल्या कुठे फेकली गेली असती आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रात एक भक्कम पक्ष म्हणून उदयास आला असता .
2014 मध्ये अचानक भाजप ला एवढी मते कुठून भेटली ?
राष्ट्रवादी आणि काँग्रेस वर नाराज असलेल्या मतदरामुळेच ना !!! ती मते पुन्हा रा कॉ कडे खेचुन आणण्यासाठी साहेबाना या दोघांना बाहेरचा रास्ता दाखवावाच लागेल . रागा जर शिवमंदिरात फिरून फिरून सौम्य हिंदुत्व दाखवत असेल तर साहेबांनी अल्पसंख्यक।मतांचा विचार न करता मजीद ला हाकलले पाहिजे ( आता तरी रा कॉ च्या आय टी सेल ची करड़ी नजर माझ्यावर नसेल !!!! )
साहेब पण त्या बेवड्या ला का डोक्यावर घेत आहेत हे समजत नाही , मिपावरिल राकॉ चे प्रवक्ते काही माहिती सांगतील का =) =)
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Mon, 01/28/2019 - 06:16
नवीन
अँटिग्वा सरकार म्हणतंय, चोक्सीमुळं आमची बदनामीच झालीय!
--
मेहुल चोक्सीला आश्रय दिल्यामुळे आमचीच बदनामी झाली आहे. तो जितक्या लवकर अँटिग्वातून बाहेर पडेल तितकं चांगलं असं मत अँटिग्वाच्या पंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख सचिव लिओनेल 'मॅक्स' हर्स्ट यांनी व्यक्त केलं आहे. चोक्सीला अटक करण्यासाठी भारताची टीम कधी येते याची अँटिंग्वाच आतुरतेने वाट पाहत असल्याचा दावाही हर्स्ट यांनी केला आहे. - बातमी
--
वरिल बातमी जर का खरी असेल तर,
भारत सरकार काय मुहुर्त पाहातेय चोक्सीला परत आणायचा.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 01/28/2019 - 08:14
नवीन
प्रसाद_१९८२,
मोदींना थेट वार करण्यापेक्षा फरपटयात्रा घडविण्यात अधिक रस असतो. तसंही पाहता जर मेहुलमामास अटक केली तर भारतातली न्यायालयं लगेच जामिनावर सोडतील. मग त्यापेक्षा फुटबॉलसारखा लाथाडून जगभर उडवलेला काय वाईट?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 01/28/2019 - 10:18
नवीन
मोदी येऊनही कोर्ट गुन्हेगारांना सोडत असेल तर मोदी येऊन नेमके काय साधले ?
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 01/28/2019 - 13:39
नवीन
राज्यक्रांतीने राज्यसत्ता बदलते तेव्हा पूर्वीच्या सर्व गुन्हेगारांचे आणि त्यांना मदत करणार्या अधिकार्यांचे समूळ उच्चाटन करता येते, केले जाते.
त्याविरुद्ध, लोकशाहीत सरकार बदलले की कॅबिनेट पूर्णपणे बदलते पण पूर्वी गुन्हेगारांच्या हातात हात घालून काम केलेले भ्रष्ट सरकारी बाबू, इतर सरकारी/निमसरकारी/स्वायत्त/इ संस्थांतील अधिकारी त्यांच्या पदावर तसेच असतात... त्यांना तडक हलवले तर निवडणूक हरलेले पक्ष, "लोकशाहीचा खून" असे म्हणून गळा काढतात, हे आपण गेली चार-पाच वर्षे बघत आहोच.
हे घरभेदी लोक, आपल्या पदांचा गैरवापर करून, गुन्हेगारांना लपूनछपून मदत करतात, पुरावे लपवतात किंवा कमकुवत होतील असे बघतात, कोर्टातल्या केसेस सरकार हारेल अश्या गुप्त कारवाया करतात... हे सुद्धा उघड गुपीत अनेकदा माध्यमांतून समजून येतेच. मायकेल ख्रिश्चनमामाला पकडून आणल्यावर हितसंबंधियांचे वकील ताबडतोप त्याला भेटायला गेले होते, हे आठवत असेलच! :)
वास्तविकतेकडे लक्ष देऊन, ५०-६० वर्षे साठलेली (किंबहुना, स्वार्थी हितसंबंधाच्या आधारांवर मुद्दाम निर्माण केलेली) ही घाण साफ करायला लोकशाहीत, काही वेळ लागणारच. पण, चिंता नको, ते काम गुप्ततेने आणि सावधगिरीने चालू आहे, याचा अदमास माघ्यमातल्या बातम्यांवरून दिसत आहेच.
काय हे, ब्लॅककॅट. अगदी राजकारणाच्या बालवाडीत असलेल्याच्या बालबुद्धीला जे समजेल तेही तुम्हाला समजत नाही, असे लिहून स्वतःचे वारंवार हसे करून घेत आहात आणि "विचित्र-विनोदी विधाने करण्यात" तुमच्या लाडक्या नेत्याशी चढाओढ करत आहात! =)) =)) =))
***************
“Nobody will remain hungry and nobody will remain poor. The poor will get a minimum income directly into their bank account." असे विधान तुमच्या नेत्याने आजच केले आहे. गेल्या ७० पैकी जवळ जवळ ५० वर्षे सत्ता हातात असतान केवळ स्वतःच्या कुटुंबाची आणि बगलबच्च्यांची तुंबडी भरण्याचे काम केलेल्या पक्षाचा नेता, २०१९ साली सत्तेत आलो तर (या वेळेस १,२,३,...१० असे म्हणायला, बहुतेक, विसरून) लगेच देशातली गरीबी आणि भूक हटविण्याची घोषणा करतो, याहून अधिक मोठा काळा विनोद तो कोणता ???!!! :( :( :(
२०१४ साली शेवटच्या दिवसांत अन्नसुरक्षा बिल आणण्याचा फार्स केला होताच, पण त्याला जनता भुलली नाही. नुकत्याच झालेल्या निवडणूकांत, शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन देऊन त्यांची घोर फसवणूक केली आहे. या पुराव्याच्या पार्श्वभूमीवर, जनता हुशार होऊन, अश्या नेत्यांना त्यांची खरी जागा दाखवून देतीलच.
***************
असो. हे सगळे नेहमीप्रमाणेच, पालथ्या घड्यावर पाणी असणार आहे. तेव्हा, हा प्रतिसाद इतर जनतेसाठी आहे आणि तुमच्यासाठी... फक्त शुभेच्छा ! =))
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 01/28/2019 - 14:39
नवीन
हा तर सरळसरळ कोर्टावर आरोप आहे ,
असो,
देशप्रेमाची सर्टिफिकेट द्यायचा आपणास अधिकार आहेच , तो बजावा
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 01/28/2019 - 14:44
नवीन
कोर्टाने शहाना सोडले , लोया केस क्लोज केली , बॉम्बवाले साधुबुवा , जोगीणी सोडल्या , तेंव्हा कोर्ट प्रामाणिक असते, मोदींचे निर्भय सरकार असते
अन सलमान सुटला , 2 जी वाले सुटले की कोर्ट लाचखाऊ असते , मोदींचा काय सम्बमध ?
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 01/28/2019 - 15:53
नवीन
किती तो तिरळेपणा दृष्टीत, की समजूतीचा अभाव ? (तुमचे तुम्ही ठरवा ! =)) =)) =))
कोर्ट त्याच्यासमोर सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावरच कोर्ट निर्णय देते, हे तुम्हाला माहीत असेल अशी अपेक्षा आहे... ते तुम्हाला माहीत नसल्याचे कळल्यामुळे, आता सांगितले आहे, ओके?! :)
म्हणजेच, जर भ्रष्ट बाबू किंवा तपासणी अधिकार्यांनी हेतुपुर्रसर अर्धवट, चुकीचे किंवा दिशाभूल करणारे पुरावे कोर्टासमोर सादर केले तर निकाल चुकीचा मिळणारच... यात कोर्टची चूक नसते तर यंत्रणेतल्या भ्रष्ट अधिकार्यांची असते... हा वरच्या प्रतिसादातला बालवाडीतल्या मुलाला समजेल असा बाळबोध अर्थ समजणे फार कठीण पडले तुम्हाला !!??
काय हे? तुमच्या हुशारीबद्दल किती चांगल्या-चांगल्या अपेक्षा-अंदाज केले होते आम्ही... दर प्रतिसादामागे ते सगळे अधिकाधिक धुळीला मिळवत आहात तुम्ही. :( =)) =))
एकंदरीत फारच विनोदी बुवा तुम्ही ! या विचित्र-विनोदी विधाने करण्याच्या तुमच्या सवयीबाबत मी वर केलेल विधान लगेचच इतक्या सबळपणे सिद्ध कराल असे वाटले नव्हते... पण तसे करून तोंडावर पडायची तुमच्या नेत्याची सवय अचूक अंगी बाणली आहे ! अभिनंदन आणि शुभेच्छा !! =)) =)) =))
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 01/28/2019 - 16:47
नवीन
नेहरू , गांधी , काँग्रेस
नैतर
मग प्रशासन , भ्रष्ट कर्मचारी जबाबदार.
मग तुमचे लोक निवडून येऊन करतात तरी काय ? पतंग उडवण्याचे काम का ?
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Mon, 01/28/2019 - 18:18
नवीन
७० वर्षे देशात घाण करणारे आता विचारताहेत ?
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Mon, 01/28/2019 - 18:25
नवीन
गरीबी हटाव म्हणत ७० वर्षे काढली आणि आता युवराज म्हणत आहेत,
“Nobody will remain hungry and nobody will remain poor. The poor will get a minimum income directly into their bank account."
मग पतंग उडवायचच काम कोण करत होत हे लक्षात आलेल असेलच ..............
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/29/2019 - 09:25
नवीन
नेहमीप्रमाणे सगळा प्रतिसाद वाचला नाहीच.
कारण, बहुतेक "डोळे, कान आणि डोके" गच्च बंद करण्याची "वरून" आलेली ऑर्डर अगदी आज्ञाधारक बालकाप्रमाणे पाळणे चालू आहे. इतर काही चांगले जमत नाही तेव्हा निदान, असेच आमचे मनोरंजन चालू ठेवा... अगदी तुमच्या देवाप्रमाणे. =)) =)) =))
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 01/28/2019 - 11:03
नवीन
पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) चुना लावून भारत सोडून पळून गेलेला मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणणे आणखीन अवघड होऊन बसले आहे. कारण, अँटिग्वा सरकारने चोक्सीला भारतात पाठवण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. शनिवारी काही माध्यमांतील वृत्तांतून हा दावा करण्यात आला होता की, मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता यांना भारतात आणण्यासाठी भारताकडून बोईंग विमान पाठवण्यात आले आहे. या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर अँटिग्वा सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे.
मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता हे दोघेही अनुक्रमे अँटिग्वा आणि किट्स या देशांमध्ये शरण गेले आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी कॅरेबिअन बेटांवर जाणार होते. त्यासाठी भारताचे हे अधिकारी एक बोईंग विमान घेऊन जाणार होते.
मात्र, एका वृत्तवाहिनीवर बोलताना अँटिग्वाच्या पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी लियोनेल हर्स्ट यांनी सांगितले की, चोक्सी आता अँटिग्वाचा नागिरक आहे आणि इथले सरकार त्याची नागरिकता हिसकावून घेऊ शकत नाही. या अधिकाऱ्यांनी हे देखील स्पष्ट केले की, भारत सरकारचे कोणी अधिकारी आमच्या देशात मेहुल चोक्सीला घेण्यासाठी आले असल्याची आपल्याला माहिती आपल्याला नाही.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/pnb-scam-antigua-government-says-will-not-deport-mehul-choksi-to-india-1830682/
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Mon, 01/28/2019 - 12:44
नवीन
MT: अँटिग्वा सरकार म्हणतंय, चोक्सीमुळं आमची बदनामीच झालीय!
http://mtonline.in/8wjGpa/dga via @mataonline: http://app.mtmobile.in
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Mon, 01/28/2019 - 11:57
नवीन
गांधी कुटुंबाला रायबरेली ची निवडणुकी जड़ जाण्याची शक्यता वाटते , ज्या प्रमाणे देशातील समस्या कड़े दुर्लक्ष केले तसेच रायबरेली कड़े .
एका यूट्यूब न्यूज चैनल वाल्याने रायबरेली नागरिकांच्या मुलाखती अगदी खुमासदार आहेत .
https://youtu.be/2TcfOiPz9X8
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Mon, 01/28/2019 - 16:14
नवीन
आयला म्हणजे ह्यांचे प्रियांका वार्डा गांधी नामक ब्रम्हास्त्र सुद्धा फुस्स होणार !!
प्रियांका वार्डा गांधी ह्यांना गांधी परिवाराचा सदस्य व गांधी परिवाराचा भावी नेता दाखवण्याचा केविलवाणा
प्रयत्न सुब्रमनियम स्वामी मुळे गळुन पडलेला आहे.
ह्या सुब्रमनियम स्वामी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींना पंत प्रधानाचा मुकुट घालता आला नाही !!
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Tue, 01/29/2019 - 06:40
नवीन
काळ्या मांजरीच्या लाडक्या शांतताप्रिय धर्माच्या लोकांनी भारत देशात घातपाती कारवाया करण्यासाठी कंबर कसलेली होती हे समोर येत आहे. आयएसआयएस ने भारतात आपली मुळे पसरवत आहे , पिण्याच्या पाण्यात विष कालवुन लाखो लोकांना एकाच वेळी मारण्याच काम करण्याचा उद्देश ह्या लोकांचा होता हे समोर आलेल आहे.
अतिरेक्यांना विषप्रयोगासाठी पोहण्याचे प्रशिक्षण
https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/swimming-training-to-is-terrorists-for-poisoning-lakes/articleshow/67728559.cms
ठाणे आणि औरंगाबाद येथून अटक झालेल्या 'आयएस' या दहशतवादी संघटनेशी संबंधित संशयितांकडून एकापाठोपाठ एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. शहरांना पाणीपुरवठा करणारे जलसाठे लक्ष्य करण्यासाठी या सर्व दहा संशयितांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. मुंब्रा येथून शनिवारी अटक करण्यात अतिरेक्यांना विषप्रयोगासाठी पोहण्याचे प्रशिक्षण आलेला तलाह हा पट्टीचा पोहणारा असल्याचेही उघड झाले आहे.महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गेल्या आठवड्यात मुंब्रा आणि औरंगाबाद येथे छापे टाकून मझहर शेख, जम्मन खुठेऊपाड, सलमान खान, फहाद अन्सारी, मोहम्मद मोहसीन सिराजउल्लाह खान, मोहम्मद तकीउल्लाह सिराज खान, काझी सर्फराज, मुशाहेदूल इस्लाम उर्फ तारेख, तलाह ऊर्फ अबूबकर पोतरिक यांच्यासह एका अल्पवयीन तरुणाला अटक केली. शनिवारी अटक करण्यात आलेला तलाह हा पाणबुडा असल्याचे 'एटीएस'ने म्हटले आहे. सलमान हा देखील पोहण्यात तरबेज असून, तो या सर्वांना कुर्ला आणि मुंब्रा येथे जलतरणाचे धडे देत होता. पिण्याच्या पाण्यात विष मिसळण्याचा या दहाजणांचा कट होता. त्यासाठी त्यांनी ठाणे आणि औरंगाबाद येथील जलसाठे लक्ष्य करण्याचा कट रचला होता. पाणीसाठ्यात विष मिसळण्यासाठी गरज पडल्यास पोहता यावे यासाठी हे सर्व प्रशिक्षण घेत होते. एटीएस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये या सर्वांची पोलखोल झाली. 'सलमान आम्हाला फुटबॉल शिकवायचा', असे उत्तर नऊ जणांनी चौकशीत दिले. मात्र पोलिसांनी फुटबॉलचे नियम विचारले त्यावेळी सर्वांची बोलती बंद झाली. नियम सांगता येत नसल्याने हे सर्व खोटे बोलत असल्याचे उघड झाले.
देशात पतंग उडवत असतानाही भाजपाच सरकार अतिरेक्यांना घातक कारवाया करण्या अगोदरच पकडत आहे ! मागच्या वेळेला
मुंबईच्या हल्याच्या वेळेला भ्रष्ट काँग्रेसचे भारत सरकार व महाराष्ट्र सरकार घोरत पडलेल होत हे सर्वांनी पाहीलेल आहे.
जर मुंबई सारखे हल्ले परत व्हायचे नसतील तर भ्रष्ट काँग्रेसचे सरकार परत येता कामा नये. अन्यथा अल्ला मलिक !!
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 01/29/2019 - 08:42
नवीन
घातपाती लोकांना पकडल्याबद्दल सरकारचे अभिनंदन
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 01/29/2019 - 10:16
नवीन
जयपूर: 'जीएसटी'वर पुस्तक लिहीणारे अधिकारी सही राम मीणा यांना एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. या अटकेनंतर एसीबीने मीणा यांच्या निवास स्थानासह अन्य ठिकाणी छापे घातले. यावेळी एसीबीला सुमारे १०० कोटींचे घबाड सापडले.
भारतीय महसूल सेवेतून सही राम मीणा यांना निवृ्त्त होण्यास अवघे सहा महिन्यांचा कार्यकाळ उरला होता. मीणा यांनी 'नीड ऑफ टॅक्स रिफॉर्म इन इंडिया' हे पुस्तक लिहीले आहे. एसीबीने मीणा यांच्या निवासस्थान व अन्य ठिकाणी छापा घातल्यानंतर अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. जवळपास २.२६ कोटी रुपयांची रोख रक्कम त्यांच्या घरी सापडली. त्याशिवाय विविध ठिकाणी ८२ प्लॉट, एक पेट्रोल पंप, मुंबईत एक फ्लॅट त्याच्या नावावर असल्याची नोंद अधिकाऱ्यांना आढळून आली. त्याशिवाय दागिने व इतर मौल्यवान वस्तू मीणा यांच्याकडे आढळून आल्या.
सही राम मीणा सेवेतून निवृत्त झाल्यानंतर राजकारणात प्रवेश करणार होते. आगामी लोकसभा निवडणुकीत मीणा हे काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. यासाठी त्यांनी तसे पत्रदेखील लिहीले होते. एसीबीने टाकलेल्या छाप्यात दोन पत्रे सापडली आहेत. एका पत्रात लहानपणापासून आपण संघाचे कट्टर समर्थक असल्याचा दावा त्यांनी केला होता. तर, दुसऱ्या पत्रात आपला धर्मनिरपेक्ष मुल्यांवर दृढ विश्वास असल्याचे नमूद करण्यात आले होते. दुसरे पत्र हे काँग्रेस नेत्यांना पाठवण्यात येणार होते.
याआधी त्यांनी छबडा आणि गंगापूर शहर या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याचे समोर आले आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 01/29/2019 - 20:05
नवीन
:))) भारतातील धर्मनिरपेक्षता आणि परंपरावादी राजकारण्यांच्या मर्यादा या निमीत्ताने अधोरेखित झाल्या हे बरे झाले.
बाकी पुर्वाश्रमीचे एक्साईज म्हणजे आताचे जिएसटी विभागाच्याच्या दृष्टीने अशा रकमांचे आकडे छाटछूट असावेत- केंद्रसर्कारचे असे खाते जिथे टेबल खालूनची चर्चा मुळीच होत नाही सरळ सरळ उघडपणे टेबलवरून मोकळेपणा असतो, बाकी खात्यांप्रमाणे लपवा लपवीच्या भानगडीत पडत नाहीत राजरोस आणि भक्कम- त्यांची क्षमता यापेक्षा अधिकच असेल. राजकीयसरकारे आली गेली यांना फर्क नही असो,
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Tue, 01/29/2019 - 13:17
नवीन
Cash-strapped Jet Airways forced to ground 4 planes over rising dues; flights hit
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/cash-strapped-jet-airways-forced-to-ground-4-planes-over-rising-dues-flights-hit/articleshow/67739912.cms
NEW DELHI: Lessors have started grounding Jet Airways’ aircraft over mounting dues, affecting the cash-strapped airline’s schedule. Almost four to five planes were reportedly grounded at airports across India on Monday night itself due to which about 20 flights have been cancelled,
say sources. On Monday night, some Boeing 737s — the mainstay of Jet’s operations were reportedly grounded at Delhi, Mumbai, Bengaluru and Chennai airports. “One plane was grounded at each of these places. Another plane has been grounded for some time as the lessor has started the repossession process,” said a source. The airline has been in talks with various players over the issue of payment delay but some lessors have now started the process of grounding planes over default. Jet's website says it has 123 aircraft in its fleet. However, due to mounting dues to lessors and maintenance organisations as well as a cash crunch to buy spares, a number of these planes have now been grounded. The airline is yet to reveal how many planes are operational.
जागतिक विमान वहातुक मार्केट मध्ये भारतातले मार्केट खुप अॅट्राक्टिव्ह आहे. भारतात दर महिन्याला नविन विमानतळे उघडत आहेत त्यामुळे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये खुप संधी उपलब्ध आहेत. दर रोज वेगवेगळ्या सेक्टरमधली विमाने भरभरुन जात असतात, ह्या पार्श्व भुमीवर जेट ऐअर वेज ची ४ - ५ विमाने आज उडण्यापासुन रोखण्यात आलेली आहे. १२३ वेगवेगळी विमाने असलेली भारतातली १ नं ची नागरी विमान वहातुक कंपनी आज तोट्यात चाललेली आहे. गुंतवणुकदाराना तसेच विमान लिज वर देणार्या, विमानचे मेंटेनेन्स करणार्या कंपनीला द्यायला जेट कडे सध्या पैसे नाहीत . जेट कंपनी वेगवेगळ्या नविन गुंतवणुकदारांकडे बोलणी करत आहे पण अजुन काही नक्की झालेले नाही.
भारता सारख्या वेगाने वाढणार्या मार्केट मध्ये विमान कंपन्याना उत्तम संधी उपलब्ध आहे . त्याचा फायदा घेत स्वस्त, समाधानकारक सेवा देणारी पण त्याच बरोबर कमी रिसोर्सेमध्ये चालणारी कंपनी ह्या मार्केट मध्ये तग धरुन राहु शकेल.
- Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 01/29/2019 - 17:21
नवीन
कल के टाईम्स में दो खबरें विचारणीय हैं:
1.यह कि मेहुल चौकसी को एन्टीगुआ की नागरिकता ,भारत सरकार से "क्लीन चिट "मिलने के बाद दी गई ।
2. यह कि CAG ने बताया है कि 16-17 के बजट डाक्युमेंट में सबसिडी/जीडीपी रेशो 1.53 बताया गया है, जबकि असल में यह 2.21 होना चाहिए, क्योंकि सरकार ने सरकारी उपक्रमों से सबसिडी तो दिलवा दी, पर उसका एक लाख तीन हजार करोड़ रूपया नहीं चुकाया गया है ।
https://www.timesofindia.indiatimes.com/blogs/toi-editorials/avoid-a-fudge-budgets-tend-to-understate-deficits-which-leads-to-a-fresh-set-of-problems/
https://www.thehindu.com/news/national/mea-did-not-provide-adverse-information-on-mehul-choksi-antigua/article24591949.ece
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 01/29/2019 - 19:54
नवीन
खरेतर शहाजहान-औरंगजेब तत्ख्तापलट राजकारण विषयक धाग्यात किंवा संगित आणि राजकारण विषयक धाग्यात कुणितरी हि पोस्ट टाकली तर बरे होईल. हि पॉडकास्ट म्हणजे तानसेनाच्या मुघलदरबारी असलेल्या पणतू खुशलाल याचा आगाऊपणा त्याच्या संगिताच्या बाबत कसा अंगलट आला आख्यायिका आहे, या निमीत्ताने एका रागाच्या बॅकग्राऊंडवर तख्तापलटीच्या इतिहासाची रोचक माहिती देत एक ब्रिटीश इतिहास संशोधक हि रोचक पॉडकास्ट वाचून दाखवते जरूर ऐकाच.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- ›
- »