Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

व
वामन देशमुख
Tue, 01/01/2019 - 15:48
🗣 616 प्रतिसाद
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.
वर्गीकरण
राजकारण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
225912 वाचन

💬 प्रतिसाद (616)
L
lakhu risbud Tue, 01/22/2019 - 09:55 नवीन
ते बघू हो आमचे आम्ही. तुम्हाला काकांना बोलले तर एवढा ठसका का लागतोय ? तुम्ही पण कोणत्यातरी पक्षाच्या कामाची,नेत्याची वैयक्तिक पातळीला जाऊन मापे काढत असतातच की ! मग त्याच न्यायाने बाकीचे वागले तर ? का "हम करे तो रास लीला ,तुम करो तो कॅरेक्टर ढीला ??" हा रडीचा डाव भक्तांना शोभतो का? अजून तर २०२४ ची संभाव्य उमेदवारीही जाहीर करायची आहे. कळ काढा राव जरा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
L
lakhu risbud Tue, 01/22/2019 - 10:03 नवीन
मनाची नाही तरी जनाची तरी लाज राखली असती तर बरे झाले असते. ते बघू हो आमचे आम्ही. तुम्हाला काकांना बोलले तर एवढा ठसका का लागतोय ? तुम्ही पण कोणत्यातरी पक्षाच्या कामाची,नेत्याची वैयक्तिक पातळीला जाऊन मापे काढत असतातच की ! मग त्याच न्यायाने बाकीचे वागले तर ? का "हम करे तो रास लीला ,तुम करो तो कॅरेक्टर ढीला ??" हा रडीचा डाव भक्तांना शोभतो का? अजून तर २०२४ ची संभाव्य उमेदवारीही जाहीर करायची आहे. च्या पेक्षा किटली लई येळ गरम ऱ्हाऊन कसं चालल ? च्या कळकतो त्यांनी कळ काढा राव जरा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 01/22/2019 - 11:39 नवीन
बुडणार्या जहाजातून उंदरे बाहेर पडत आहेत असे उच्चारता तुम्हाला का मळमळ झाली? का पवारांचा झटका आला, ते पण नमके माझ्या प्रतिसादाखाली ? का खिंड लढवयला आला होतात? भक्ती करायची तर उघड करा हो, आम्ही तुमच्या श्रध्देच्या आड नसतो आलो. शिव्या द्यायच्या तर बिंदास्त द्यायच्या ना. माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन कशाला? त्यात नको असलेले देव संमतीशिवाय इतरांच्या माथी मारणारे, देवार्यात बसवणारे आणि लुडबुड करणार्या आपल्या भाईबंधाना सलमान च गाणं नीट समजून सांगा. === 2024च काय घेवुन बसलात, 2050 पर्यंतचे स्वप्नरंजन करणारे येथे महाभाग आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
स
सुबोध खरे Tue, 01/22/2019 - 08:08 नवीन
मिपावर पण त्यांचा वॉच असण्याची दाट शक्यता आहे. अरेरे साहेब स्वतः एवढ्या खालच्या पातळीवर उतरणार नाहीत (त्यांच्याबद्दल जेवढे ऐकले वाचले आहे त्यावरून याची मला खात्री आहे) पण त्यांचे चेले मिपावर नजर ठेवून आहेत हे वाचून आश्चर्य वाटले. MORE LOYAL THAN THE KING असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 01/22/2019 - 08:43 नवीन
मी आयटी सेल बाबत बोलत होतो. पवारांबद्दल नाही. सेल वाल्यांचे ते कामच आहे. त्यामुळे कोणाच्या कामाची अवहेलना करणे योग्य नाही,असे वाटते. चमचे-चेले फक्त एकाच पार्टी विद डिफरेंस मधेच उरले आहेत. हे जगमान्य झाले आहे. फक्त पुर्वी चमकोगीरी करणारे सगळे कुंपणावर बसले आहेत. जो माझा खरा विषय होता की बुडणार्या जहाजातून किती उंदीर बाहेर पडणार आणि आसरा घायला कुठे कुठे धावणार. हे सोडून दिले आणि असले नसलेले हिशोब चुकवण्यासाठी चेलेचपाटे विनाकारण शिक्के मारत फिरत आहेत. === डाॅ. साहेब तुम्ही जाणते आहात, तुम्हीच बघा काय तोडगा निघतोय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 01/22/2019 - 15:22 नवीन
त्यांची यादी करून त्यांच्याशी

संपर्क

करण्याचा प्रयत्न केला जातो
हे वाक्य काय दर्शवते? त्यांची यादी करून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो आणि पक्षाच्या ध्येयधोरणे बाबतीत असणारे गैरसमज व्यक्तीपरत्वे दूर केले जातात. I think, It's part of प्रचार!! That's all." बाकी आय टी सेल अशा हजारो लाखो लोकांशी संपर्क करत असते हे वाचून करमणुक झाली चमचे-चेले फक्त एकाच पार्टी विद डिफरेंस मधेच उरले आहेत. बाकी चेला आणि चमचा यात फार फरक आहे. मी चमचा असा शब्द अजिबात वापरलेला नाही चेला हा शब्द आदरार्थी असतो. आणि चमचा हा शब्द स्पष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/22/2019 - 15:38 नवीन
चेला हा शब्द आदरार्थीच आहे, पण हिंदू शब्द आदरार्थी व मुस्लिम शब्द वाईट अर्थाने वापरायचे असतात उदा - तो ह्याचा शिष्य आहे. तो काय , त्या ह्याचाच चेला. हे आमचे सुपुत्र आहेत, ठेचून काढा ती औलाद .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 01/23/2019 - 07:00 नवीन
आता शब्दांनाही धर्माचे लेबल लागणार ह्या कल्पननेने मनाचा केवळ थरकाप उडाला. भाषेला कोणतीही जात धर्म किंवा प्रांताचे बंधन नसते असे वाटणार्‍या माझे डोळे खाडकन उघडले. ही असली विषवल्ली जर फोफावली तर भविष्यकाळ नक्कीच अंधकारमय आहे याची मोठ्या तिव्रतेने जाणीव झाली. असल्या गलिच्छ आणि विभाजनवादी विचारसरणीचा मी स्पष्ट शब्दात धिक्कार करतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
स
सुबोध खरे Wed, 01/23/2019 - 07:10 नवीन
chela (plural chelas or chele) a pupil or disciple, especially in Hinduism quotations ▼ https://en.wiktionary.org/wiki/chela मोगा खान तुम्ही तुमचा हिरवा चष्मा काढला आणि वस्तुस्थिती जाणून घेतली तर बरे होईल. गुरु -चेला (उदा- गुरु कि करणी गुरु जायेगा, चेले कि करणी चेला- उड जायेगा हंस अकेला हे पंडित कुमार गंधर्व यांचे अत्यंत लोकप्रिय भजन आहे त्यातील एक ओळ) आणि उस्ताद -शागीर्द अशा जोड्या आहेत. विचारसरणी गढुळ झाली आहे एवढेच म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ट
ट्रेड मार्क Mon, 01/21/2019 - 22:45 नवीन
मला राग यायच काय कारण आहे. तुमच्या प्रतिसादाचा सूर तसा वाटला म्हणून... नसेल आला राग तर सोडून द्या. हाकानाका. तुमची बौधिक कुवत चंगली आहे तुम्हाला "चांगली" असं म्हणायचं असावं अशी आशा करतो. सर्टिफिकेटबद्दल धन्यवाद... ते शिक्के मारायचे काम बदला आता मी काही कोणावर शिक्के मारले नाहीत. आता काहींना अंगावर ओढून घ्यायची सवय असते, त्यामुळे ते स्वतःवरच शिक्का मारून घेतात. बाकी तुम्हाला वकीलपत्र दिले आहे का लख्मिचंद ने? मी त्यांच्याबाजूने काहीच बोललो नाही. फक्त फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सल्याने त्यांना बोलायचं ते बोलूदे असं म्हणलं. हे फक्त लख्मिचंद यांच्यासाठी नसून समस्त जनतेसाठी आहे. का LHS=RHS सिद्ध करण्याचा प्लान हवा आहे? चालेल... कुठला तरी प्लॅन दिल्याचं समाधान तुम्हाला मिळूदे. बाकी तुम्ही प्लॅनचा बराच धसका घेतलेला दिसतोय! प्रयत्न तर करा, तुमचा कुठलाच प्लॅन फेल जाणार नाही... लावताय पैज?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
L
lakhu risbud Tue, 01/22/2019 - 06:28 नवीन
विशुमित भाऊ, कुठेतरी-कोणाकडून कळत-नकळत आपल्या श्रद्धास्थानाच्या धोतराला हात घातला गेला..........ते सत्याचा जवळ जाऊन कितीही बोचणारे असले ...............तरीही असे पातळी सोडून वागायचे नाही. ही शिकवण मिळाली तरी ती पाळण्याचा आवाका प्रत्येकाचाच असतो असे नाही. ऐऱ्यागैऱ्या ने माझी लायकी काढायला मी त्याच्या तीर्थरुपांचे खात नाही ही बाब नम्रपणे आपल्या आकलनात अनु इच्छितो. समर्थक मग काढायचा का नाही ते बघतील.... तुम्ही त्या काळजीने स्वतःचा रक्तदाब वाढवून न घेणे योग्य. राष्ट्रवादी- फडणवीस-भाजप हा संबंध या प्रतिसादात जोडण्यामागे तुमच्या प्रकांड अशा पांडित्याचे काय कारण असावे हे पण आम्हा सामान्य जनांना विषद करून सांगावे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/16/2019 - 16:50 नवीन
Jan 12, 2018 presser by judges has not served purpose: Former CJI Lodha on collegium सर्वोच्च न्यायालयाचे भूतपूर्व मुख्य न्यायाधिश लोधा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सद्याच्या कॉलेजियमबद्दलच्या टीप्पणी बोलक्या आहेत.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/16/2019 - 18:44 नवीन
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाह यांनी स्वत: टि्वट करुन ही माहिती दिली आहे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प गुरुवार, 01/17/2019 - 03:25 नवीन
मैड़म सुद्धा पाठीमागे दोन तीन वेळा परदेशी उपचार करण्यासाठी गेल्या होत्या !!!!! त्यावेळी देखील तुम्ही ती ' बातमी ' मिपावर छापली असेल अशी आशा आहे .
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 01/17/2019 - 05:03 नवीन
परदेशी उपचार हा फक्त गांधी कुटुंबाचा व त्यांच्या चमच्यांचा एकाधिकार आहे . मोगा मिंया च दुखः हे आहे की भा ज प चे लोक उपचारासाठी परदेशी कसे काय जाउ शकतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
व
विशुमित गुरुवार, 01/17/2019 - 06:39 नवीन
मला असे वाटते की भाजपच्या लोकांचे स्वदेशी अणि आयुर्वेदावर प्रचंड असा अभिमान अणि विश्वास असताना विदेशी उपचार घेण्याची का गरज पडत असावी असे ब्लैक कैट याना कुत्सितपणे सांगायचे तर नसेल? हिपोक्रेसी का काय म्हणतात ते! === काही ही असो.. जेटलीजीनी लवकरात लवकर बरे ह्वावे ही ईश्वरचरणी सदिच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/17/2019 - 12:16 नवीन
आरोग्य क्षेत्र विशाल आहे , कुणी कुठेही उपचार घ्यावेत व निरामय आयुष्य जगावे , राहुल गांधींनीही जेटलीना लवकर बरे व्हा , अशा शुभेच्छा दिल्या आहेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 01/17/2019 - 12:22 नवीन
"कुणी कुठेही उपचार घ्यावेत व निरामय आयुष्य जगावे " अगदी खरे. पण ह्यापुढे दुसर्या पक्षाचा नेता उपचारासाठी/पर्यटनासाठी कोठे जातो ह्यात विनाकारण लक्ष घालू नये. दुसर्यावर जी वेळ येते तीच आपल्यावर येऊ शकते हे आता समजले असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/18/2019 - 11:05 नवीन
कोण परदेशात उपचार घेतो कोण धनगराचे मलम लावतो. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे औषध वेगळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
व
विशुमित Fri, 01/18/2019 - 10:26 नवीन
)))राहुल गांधींनीही जेटलीना लवकर बरे व्हा , अशा शुभेच्छा दिल्या आहेत ==)) पण त्यानी त्या शुभेच्छा वाचल्या नसाव्यात्त. अमेरिकेत जावून एका ब्लॉग च्या माध्यमातून गांधी घराणे (especially राहुल गांधीना) लक्ष केले आहे. दवाखान्यात सुद्धा काम करणे सोडत नाहीत. मानलं पाहिजे! किती वर्क होलिक!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/17/2019 - 12:13 नवीन
https://indianexpress.com/article/cities/delhi/jnu-sedition-case-ex-abvp-members-claim-outfit-planned-row-rohith-vemula-case-5542114/ JNU sedition case: Ex-ABVP members claim outfit planned row At a press conference, former JNU ABVP unit vice-president Jatin Goraiya and former joint-secretary Pradeep Narwal also claimed students present in a video shown by a news channel allegedly raising the slogan of ‘Pakistan Zindabad’ were actually ABVP members or sympathisers
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 01/17/2019 - 13:44 नवीन
'कर्नाटकाच्या शापामुळे अमित शहांना डुकराचा ताप' -- https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/operation-lotus-caused-fever-to-amit-shah/articleshow/67572224.cms
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 01/17/2019 - 14:35 नवीन
हे सपशेल चुकीचे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/17/2019 - 16:10 नवीन
BJP Tears Into Rahul Gandhi After Congress's Shocking 'suwar Ka Zukham' Jibe At Amit Shah, Says The "rogue" Needs To Learn Human Values ही गोष्ट जगजाहीर आहे आणि तिचा काँग्रेसच्या गटांतील अनेक विरोधी पक्षांनीही निषेध केला आहे. त्या मूळ कन्नड भाषेतील भाषणातील, संबंधीत मजकूराचे भाषांतर असे आहे... "Amit Shah knows very well. Even Narendra Modi knows well that you can't shake Karnataka. On Rafale issue, they've looted Rs 30,000 cr. They think using that money you can destabilise the govt in Karnataka. If there is a duplicate or bogus Chanakya, it's Amit Shah and they've proven this point. They keep trying again and again. Amit Shah is party to this crisis. He's already kidnapped 6 MLAs and placed them at a Mumbai hotel. They've been taken as prisoners and BJP and RSS workers are keeping vigil outside. Some MLAs have returned, so Amit Shah is worried and has fallen ill. It's not a normal fever, it's called 'pig fever' or swine flu. If you try to meddle with the Karnataka govt, not just 'pig fever', you will also get diarrhoea and vomiting illness," he said.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ड
डँबिस००७ गुरुवार, 01/17/2019 - 15:58 नवीन
कन्हय्या कुमार , शैला राशिद व उमर खालिद यांच्या वर दाखल केलेल्या भर भक्कम एफ आय आर मुळे अर्बन नक्षल गँगची तंतरलेली आहे. ९२ लोकांच्या साक्षी, १० चित्रफिती ( डॉक्टर केलेल्या २ वगळुन) उमर खालिद , कन्हय्या कुमार व शैला राशिद यांच्यातला वॉट्स अ‍ॅप मेसेजेस, टेक्स्ट मेसेजेस , कॉल डेटा सर्व ह्या एफ आय आर मध्ये घेतलेला आहे. दोन तिन महिन्या पुर्वी मी दोषी असेल तर सरकार अजुन एफ आय आर का दाखल करत नाही अस म्हणणारा कन्हय्या कुमार आता ऐन निवडणुकीच्या पुर्वी एफ आय आर का दाखल करत आहेत अशी दयनिय कैफियत मांडत आहे !! NDTV ची निधी राझदान तर म्हणते कि JNU च्या लहान पोरांना विचारुन बनवलेला एफ आय आर कोर्टात काय टिकणार ? एकंदरच CBI चा प्रमुख काय बदलला सगळ्या गोष्टी लाईनीवर यायला लागल्यात !!
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 01/17/2019 - 17:06 नवीन
आज ओरीसाच्या समुद्रकिनाऱ्यावरील चंडीपूर येथे हवेतून हवेत मिझाईल सोडण्याची एक चाचणी झाली. या चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे हे मिझाईल भारतीय बनावटीच्या लढाऊ हेलिकॉप्टरवर बसवलेले होते. या मिझाईलने हवेतल्या उडत्या वस्तूचा अचूक वेध घेऊन ती वस्तू नष्ट करण्यात यश मिळवल. भारतात हे प्रथमच होतय. म्हणजे चाचण्या खूप झाल्या पण यश मिळत नव्हत. ते आज मिळाल. अशी १५ हेलिकॉप्टर बनवायची ऑर्डर हाल(HAL) ला मिळालीय. त्यातील १० वायूसेनेसाठी व ५ सैन्यासाठी बनवली जातील. हेल्मेटलाच जोडलेल्या स्क्रीनमुळे वैमानिक कुठल्याही दिशेने हे मिझाईल सोडू शकेल. त्यासाठी त्याला हेलिकॉप्टर वळवायची जरूरी भासणार नाही. डागा व विसरून जा प्रकारचे हे मिझाईल आहे. बाकी बरीच उपकरण या हेलिकॉप्टरला आहेत व त्यांची चाचणी मागच्याच वर्षी होऊन ती उपकरणे परिक्षेत उत्तिर्णही झाली होती फक्त आजच्या चाचणीसाठी आपण थांबलो होतो. हे हेलिकॉप्टर सियाचीनला वापरता येणार आहे. जगात एवढ्या उंचीवर वापरले जाणारे अशा प्रकारचे पहिलेच हेलिकॉप्टर असणार आहे. अनेक वर्षाचे स्वप्न साकार होते आहे. HAL चे अभिनंदन. आणि हो एक लिहावयाचे राहिलेच. टेस्ट पायलट म्हणून कर्नल रणजित चितळे होते हे वेगळे सांगायला नकोच.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 01/17/2019 - 18:43 नवीन
उत्साहवर्धक वार्ता आहे. धन्यवाद! :-) -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ड
डँबिस००७ Fri, 01/18/2019 - 06:53 नवीन
जबरदस्त बातमी !! भारतीय वायु दलाच DRDO व कर्नल रणजीत चितळे साहेबांच खास अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 01/18/2019 - 07:31 नवीन
जबरदस्त बातमी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/18/2019 - 09:27 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/17/2019 - 17:32 नवीन
टीप्पणीची गरज नाही...
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/18/2019 - 10:31 नवीन
महाराष्ट्र सरकारने न्यायालयात इतकी अभ्यासपूर्ण बाजू मांडली की कोर्टाने शिवस्मारकावर स्थगिती आणली आणि डान्सबार वरची बंदी उठवली. *अभ्यासू सरकार*
  • Log in or register to post comments
C
Chandu Sun, 01/20/2019 - 19:23 नवीन
1.समुद्रात कोणतेही बांधकाम करण्यासाठी पर्यावरण विभगाची परवानगी हवी.ती शिव स्मारक समीतिने घेतलेली आहे. 2.शिव स्मारक झाल्यास समुद्रातील मासाली वर परीणाम हो ऊ न आमच्या ऊप जीविकेचा प्रश्न निर्माण होइल असा अर्ज कोळी बांधवां नी केला होता.त्यासाठी वरील प्रमाणे बांधकाम परवानगी शिवाय वेगळे ना हरक त पत्र कोर्टाने सादर करण्यास सांगीतले आहे.तो पर्यंत स्थ गिती दिली आहे. 3.डांस बार वर बंदी आहेच.कायद्याप्रमाणे हे "मनोरंजन केंद्र"असून नाटक,चित्रपट गृहा प्रमाणे ,"ऑर्केस्ट्रा आणी नृत्य गृह"चालवण्यास अत्यंत कडक अटी घालून न्यायालयाने संमती दिलेली आहे.सरकार चा संबंध फक्त कायदा आणी सुव्यवस्थे पुरता असुन त्याला पूर्ण सहकार्य देण्याची जबाबदारी सदरहू मनोरंजन्गृह मालकाची राहील. 4.हे नियाम इतके जाचक आहेत की अद्याप एक ही नवीन परवाना दिलेला दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/19/2019 - 09:09 नवीन
*कॉंग्रेसच्या काळातही विकास कामे झाली : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत* नागपूर : सध्या विकासाची गती संथ आहे. हे खरे असले तरी गेल्या 70 वर्षांमध्ये काहीच विकास झाला नाही, असे मी मानत नाही. मी सकारात्मक विचार करणारा आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचलक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.   प्रहार या संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना डॉ. भागवत यांनी भाजपच्या काही नेत्यांच्या वक्तव्याला छेद दिल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी कॉंग्रेसमुक्त भारतच्या संदर्भात केलेल्या भाजप नेत्यांच्या विधानावर डॉ. मोहन भागवत यांनी नापसंती व्यक्त केली होती. गेल्या काही वर्षांपासून गेल्या 70 वर्षांमध्ये काहीच विकास झाला नाही, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपासून गल्लीतील नेत्यापर्यंत बोलले जाते. या सर्वांना डॉ. भागवत यांनी विधाने करताना "दक्ष' राहावे, असे सल्ला दिल्याचे बोलले जात आहे. http://www.sarkarnama.in/rss-progress-32893
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/19/2019 - 12:04 नवीन
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेताकन्हैय्या कुमार याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र कोर्टाने फेटाळून लावले आहे. याप्रकरणी कोर्टाने दिल्ली पोलिसांची चांगलीच कानउघाडणीही केली. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी दिल्ली सरकारची परवानगी का घेतली नाही, असा सवाल कोर्टाने पोलिसांना केला. 'राज्याच्या कायदा विभागाकडून परवानगी न घेता तुम्ही आरोपपत्र दाखल केलेच कसे?' अशी विचारणा शहर दंडाधिकारी दीपक राजावत यांनी केली. दिल्ली पोलिसांनी कन्हैयासह उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य, आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली आणि खालिद बशीर भट यांच्या विरोधात १२०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. संसद हल्लाप्रकरणी फाशीची शिक्षा देण्यात आलेला दहशतवादी अफझल गुरू याच्या समर्थनार्थ ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयूत एका कार्यक्रमाचं आयोजन करून देशद्रोही स्वरूपाच्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आपली चूक मान्य करत 'आप' सरकारची परवानगी घेणार असल्याचं दंडाधिकाऱ्यांना सांगितलं. सोबतच यासाठी कोर्टाकडून १० दिवसांची मुदत मागून घेतली.
  • Log in or register to post comments
C
Chandu Sun, 01/20/2019 - 18:45 नवीन
1.न्यायदंडा धिकार्यानी पोलिसाना सक्षम अधिकारयाची परवानगीघेउन आरोप पत्र फेरसादरकरण्यास सांगितले आहे 2.दिल्ली पोलिस नायब राज्य पालान्च्या अखत्या रीत आहेत.दिली सरकारच्या नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
C
Chandu Mon, 01/21/2019 - 02:52 नवीन
1.न्यायदंडा धिकार्यानी पोलिसाना सक्षम अधिकारयाची परवानगीघेउन आरोप पत्र फेरसादरकरण्यास सांगितले आहे 2.दिल्ली पोलिस नायब राज्य पालान्च्या अखत्या रीत आहेत.दिली सरकारच्या नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
श
शाम भागवत Sat, 01/19/2019 - 17:29 नवीन
संजय.दत्त@टाईम्सग्रुप.काॅम उंच पर्वतरांगांमुळे लेह, लडाख व कारगील हे नेहमीच पाॅवरग्रीडपासून वंचित राहीले होते. पण या डोंगररांगांतून ३५० किमीची लाईन टाकण्यात आपल्याला आता यश मिळाल आहे. भारताच्या सर्वात उत्तरेला असलेला भाग आता राष्ट्रीय ग्रीडमधे आला आहे. या कामाचा शिलान्यास समारंभ मोदींच्या हस्ते १२ आॅगस्ट २०१४ रोजी साजरा झाला व ४ दिवसांपूर्वी हे काम पूर्ण झाले. या कामाचे सुरक्षीततेच्या दृष्टिने महत्व आहेच. पण त्याचबरोबर इथल्या लोकांच्या जिवनात खूपच फरक पडणार आहे. उणे ५० डिग्री तपमान असताना अखंडीत विज असण्याचे महत्व वेगळेच. जनरेटर्स चालवण्यासाठी कित्येक दशलक्ष लिटर्सचे डिझेल आता वाचणार आहे. पर्यटनाला फायदा होणार आहे व एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. २०१३ पासून एनएचपीसी वीज निर्मिती करत होती व या भागाला विज पुरवली जायची. पण ग्रीडच्या जोडणीअभावी ही विजनिर्मिती पूर्ण क्षमतेने करता येत नव्हती. आता मात्र ही विज निर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू करून उन्हाळ्यात जास्तीची विज ग्रीडला पाठवायची व हिवाळ्यात १००-१५० मेगॅवॅट ग्रीडमधून उचलणे शक्य होणार आहे. महत्वाचे म्हणजे सोलर प्रोजेक्टमधून ७.५ गिगॅवॅट विज निर्माण करून ती ग्रीडला पाठवणे आता शक्य होईल. इतकेच नव्हे तर लडाख व कारगील हा भाग भारताचा अति उत्तरेकडील वीजनिर्मिती केंद्र म्हणून ओळखला जाऊ शकेल.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 01/19/2019 - 17:56 नवीन
बातमीबद्दल धन्यवाद! केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे! -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ड
डँबिस००७ Sat, 01/19/2019 - 18:32 नवीन
शाम भागवत, बातमीबद्दल धन्यावाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/19/2019 - 19:07 नवीन
ऊत्तम माहिती ! याने लेहमधील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होऊ शकते. लेह सारखी थंड हवामानाची ठिकाणे विकसित केल्यास भारतिय लोकांना आपल्याच देशात थंड हवामानातल्या सहलींचा आनंद घेता येईल. यामुळे, महत्वाचे परकीय चलन तर वाचेलच, पण लेहसारख्या दुर्लक्षित भागाचा विकासही होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
न
नगरीनिरंजन Sun, 01/20/2019 - 07:36 नवीन
आयएलएफएस डबघाईला आल्याने झोजिला बोगदा बासनात. परत टेंडर मागवणार. बोगीबीलचे श्रेय लाटणारे मोदी ह्याचं अपश्रेय कॉंग्रेसच्या गळ्यात मारणार. https://www.thehindubusinessline.com/companies/after-scrapping-6800-cr-zojila-tunnel-ilfs-road-may-stop-3-more-projects/article26017322.ece
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 01/20/2019 - 16:15 नवीन
आयएलएफएस डबघाईला आल्याने झोजिला बोगदा बासनात. परत टेंडर मागवणार. बोगीबीलचे श्रेय लाटणारे मोदी ह्याचं अपश्रेय कॉंग्रेसच्या गळ्यात मारणार. मगरीचे अश्रु बंद करा, आयएलएफएस डबघाईला आल्याच कारण काँग्रेसच आहे, तत्पुर्वी २०१३ ला कॅबिनेटची ह्या प्रकल्पाला परवानगी मिळाल्यावर टेंडर नोटिसा निघाल्या त्यात आयएलएफएस च टेंडर सर्वात कमी होत व त्यांना काश्मिरातलाच Chenani-Nashri Tunnel हा प्रकल्प पुर्ण करण्याचा अनुभव होता त्याबळावर आयएलएफएस ला हे काम २०१८ ला मिळाल. जानेवारी २०१८ पासुन ५ वर्षांत हा बोगदा पुर्ण व्हायला पाहीजे होता पण आयएलएफएसच्या प्रॉब्लेम मुळे सरकारने लगचे निर्णय घेऊन आयएलएफएस ला ह्या कामावरुन हटवले. लगेच निर्णय घेणे हे सुद्धा एका चांगल्या सरकारचे गुण असतात. वायुदलासाठी तसेच देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचे लढाऊ विमान १२ वर्षे खरेदी करु न शकणार्या निरुपयोगी सरकारपेक्षा हे सरकार फार फार बरे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Sun, 01/20/2019 - 16:44 नवीन
अरे! कॉंग्रेसच्या गळियात अपश्रेय मारायचे काम मोदींना करावेच लागत नाही. भक्तच परस्पर करतात! वाह मोदीजी वाह!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
न
नगरीनिरंजन Sun, 01/20/2019 - 16:48 नवीन
ह्याच्या सारखेच खाजगीतही अनेक कॉर्पोरेट प्रोजेक्ट्स स्टॉल्ड आहेत अर्थव्यवस्थेची तंतरल्यामुळे याकडे भक्त सोयीस्करपणे दुर्लक्ष करणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/20/2019 - 16:52 नवीन
मोदींच्या गुजरात मेट्रोचे काय झाले , 10 वर्षे झाली ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/20/2019 - 08:01 नवीन
काश्मीर हा भारताचाच भाग आहे, यामध्ये पाकिस्तानने लुडबुड करणे बंद करावे असे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. काश्मीर हा भारताचाच भाग आहे, होता आणि यापुढेही असेल असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. या प्रश्नात पाकिस्तानने नाक खुपसण्याची अजिबात गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. काश्मीर प्रश्न हा जेम्स बॉन्ड किंवा रॅम्बो सिनेमातील धोरणांप्रमाणे सोडवावा असे आपल्याला वाटत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 01/20/2019 - 09:50 नवीन
त्या ओवैसी ला कोणीही काहीही म्हणो पण मला मात्र त्याचे आश्चर्ययुक्त कुतूहल वाटते !!! 15 मिनटात कापाकापी चा विषय सोडला तर हा माणूस अभ्यासपूर्वक बोलतो . अल्पसंख्यक समाज मध्ये याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्या मुळे अल्पसंख्यक चा ढोंगी मसीहा काँग्रेस चे धाबे दणानले आहेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
C
Chandu Sun, 01/20/2019 - 18:51 नवीन
लातूर जिल्ह्यातील औसा गावचा हा ओवैसी. 15मिनिटात कापा कापी ची भाषा करणारा हा नाही.तो याचा भाऊ.अकबरूद्दीन्ं .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
S
sandip_pawar Sun, 01/20/2019 - 10:32 नवीन
नोकरी विषयक इंटरनेट वरील सर्व जाहिराती एकाच ठिकाणी मिळविण्याचे केंद्र म्हणजे mhnmk.com | NMK All Maha NMK Job Recruitments advertisement details in Marathi in one place. Maha MH NMK Marathi Nokari Recruitments details information in Marathi with NMK Mahanews Mahajobs Updates about latest jobs, upcoming Naurki ads and MahaNews Maharashtra Government Jobs Details.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा