चालू घडामोडी - जानेवारी २०१९
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका
“राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती.
पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.”
मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का?
संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का?
नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.
'No mention of Rafale, feel let down': Parrikar slams Rahul for politicising courtesy visit
पूर्वी एकदा, रागांनी वाजपेयी आजारी असताना, "मीच्च कसा पहिला (पक्षी : भाजप नेत्यांच्या अगोदर) त्यांच्या भेटीला गेलो" असा राजकिय भाव खाण्याचा खालच्या पायरीवरचा केविलवाणा दावा केला होता. काही दिवसांपूर्वी, कर्नाटकमधिल एका कॉन्ग्रेस विधायकाने, अमित पटेल यांच्या आजारावर खालच्या पातळीवर जाऊन टीप्पण्या केल्या होत्या. आता रागांनी गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांना त्यांच्या आजारानिमित्ताने सदिच्छाभेट दिली असे सांगत नंतर, "राफालं विमानांच्या न केलेल्या चर्चेबद्दल टीप्पणी करून, आपली भेट ही सदिच्छाभेट नसून, अजून खालच्या पायरीवर उतरून केलेले राजकारण होते, हे सिद्ध केले. अरेरे, अगतिक होऊन किती खोटे बोलायचे आणि किती खालच्या स्तरावर जायचे याला काही सीमा?... याबाबतीत, कॉन्ग्रेस आणि खुद्द तिचे अध्यक्ष जणू बुड नसलेल्या पिंपात उभे असल्यासारखे वागत आहेत... भारताच्या इतिहासात, "विरोधकांच्या आजारपणाचे भांडवल करणारे" असे राजकारण, इतक्या खालच्या पायरीवर गेल्याची दुसरी उदाहरणे शोधणे कठीण आहे!!! :( :( :(