चालू घडामोडी - जानेवारी २०१९
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका
“राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती.
पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.”
मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का?
संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का?
नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.
त्याने सर्व पक्षाच्या लोकांना व निवडणूक आयोगास बोलावणे दिले होते म्हणे,-- -- मग निवडणुक आयोगाने ई. व्ही. एम. हॅक करण्याचे खुले आव्हान दिले होते, तेंव्हा ही कॉंग्रेसी पिलावळ कुठे लपली होती ? तेंव्हा घ्यायचे की आव्हान. आता परदेशात जाऊन भारतीय निवडणुक आयोगाची बदनामी करण्यात काय अर्थ आहे. -- या कॉंग्रेसी नेते/समर्थकांचा मेंदु बहुतेक गुडघ्यातच असावा. जर सत्तेत नसून २०१४ साली भाजपा मतदान यंत्रे हॅक करुन विजय मिळवू शकला तर आता केंद्रात व राज्यात सत्तेत असूनही तीन राज्याच्या निवडणुका कश्या काय हरला. ऐवढा विचार करण्याइतका ही मेंदू ह्या लोकांच्या डोक्यात नाही.